आज मी पुन्हा एकदा गाडी-गाडी खेळले, किंबहुना मला खेळायला मिळालं. "मो$$$ठी चक्कर मिळाली मला गाडी-गाडी करत, वरून खाली, खालून वर". पण हो, त्या गाडी ढकलणाऱ्या ताई आणि दादाचे मनापासून आभार, कारण माझ्या सारखी वजनदार व्यक्तिमत्व बसल्यावर + त्या ढकलगाडीच वजन, जरी चाक असली तरी सोप्प नाही. असो. आधी मला वाटायचं उगाचच कि व्हील चेअर वर बसलं कि सगळी दुनिया फक्त आणि फक्त माझ्याच कडे बघते आहे म्हणून, पण तसं काही नसत, कोणाला वेळही नसतो आणि हा फक्त माझ्या मनाचा खेळ आहे, एवढंच. त्या तास-दोन तासात उत्कृष्ट, भन्नाट आणि जगावेगळे व्यक्तिमत्व बघायला मिळाले, काही जणांशी बोलणं पण झालं आणि एकंदरीत वेगळा अनुभव आला. १२ तास सलग रोज उभं राहून सेक्युरिटी ची नोकरी करणाऱ्या टीपटाप, हसमुख, लाघवी, मदतगार मावशी बोलल्या, डॉक्टर पण प्रसन्न व्यक्तिमत्व आणि फार प्रोत्साहित करणारा, एक्सरे करणारी माझ्या विद्यापीठाची विद्यार्थिनीच होती, मग काय माझी चक्कर सार्थकी झाली हे नक्की. आठ दिवस सक्तीची रजा, आराम आणि हुकूम सोडणे बसल्या जागेवरून जे मला आवडत नाहीच हे करावं लागतंय आता, "अशक्य आणि अवघड" पण सध्या तेच उपयोगाचं. हे पण करून बघुयात. खूप काही शिकायला मिळालं मला आज.
#wheelchair #security-guard #disciplined-lady-guard #neat-clean-hospital #radiology-intern #rest #leave #work-from-home
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा