१९९५ सालची गोष्ट. त्यावेळी दूरदर्शन वर दोन प्रसिद्ध कार्यक्रम होते, एक चित्रगीत आणि दुसरं छायागीत. नावाप्रमाणे छायागीत म्हणजे व्हिडीओ गाण्याचा आणि चित्रगीत म्हणजे फक्त गाणं, व्हिडीओरहित. मला तशीही भयंकर गाण्याची आवड, त्यामुळे सतत आणि मोठ्यांनी गाणं म्हणत राहणं व्हायचं माझं. त्यावेळी भौतिक शास्त्राचे एक गाढे अभ्यासक होते माझ्या ऑफिस मधे. त्यांना देखील गाण्याची आवड आणि ते फार बिनधास्त व्यक्तिमत्व देखील. आम्ही त्यावेळचे सगळेच शिक्षक फारच मोकळे होतो स्वभावाने त्यामुळे मज्जा यायची. मी गाणं गुणगुणायला सुरवात केली, किंवा सगळे एकत्र आल्यावर जर एखाद्या गाण्याचा विषय निघालाच तर ते म्हणायचे कसे "बरं आहे इथे फक्त चित्रगीत सुरु असतं छायागीत नाही". असो, तर असे ते सर आज नावाजलेल्या इंजिनीरिंग कॉलेज चे प्रिन्सिपॉल आहेत. अख्ख जग फिरून झालं आहे कामानिमित्याने, संशोधन कार्य विस्तारण्यासाठी, असंख्य विद्यार्थी PhD झाले आहेत त्यांच्या कडे आणि बरेच उत्कृष्ट शिखरे पादाक्रांत केली आहेत त्यांनी आजपर्यंत. ह्या नवीन दिवसांमधे देखील ते स्वस्थ बसले नाहीतच. दररोज एक जुन्या गाण्याचा त्यांनी स्वतः गायलेला भन्नाट व्हिडीओ करणार आणि सगळ्या सोशल मीडिया वर टाकणार, तसेच दररोज कोणत्या ना कोणत्या, लहान / मोठ्या कार्यक्रमाचे ते भाग असणारच, मग त्याची पण पोस्ट शेर करणार. अहाहा, म्हणजे त्यांची रोजनिशी बघा, सतत कार्यशील. आणि विषय अगदी नॅनो टेकनॉलॉजि पासून, ते मेन्टॉरिंग, १०वी नंतर काय, १२वी नंतर काय, NEP-२०२० ई. वैविध्य विषय. असे एव्हर ग्रीन व्यक्तिमत्व आपल्या संपर्कात असल्यामुळे प्रचंड मोटिव्हेशन तर मिळतंच आणि खूप शिकायला पण. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाला इतक्या सगळ्या गोष्टी एकावेळी, इतक्या कमी वेळेत आणि वयात करणं जमत नाहीच, अशक्य आहे. त्यामुळे अजूनच अप्रुप वाटत मला. मी फक्त हे इमॅजिन करते कि ज्या कॉलेज चे असे प्रिन्सिपॉल आहेत तिथले विद्यार्थी काय धमाल असतील नाही. सहीच. (भल्यामोठ्या संस्थेचे मुख्य, गाणं, मित्र, वैविध्य विषयावर उत्कृष्ट भाषण,लिखाण, सातत्याने टिकवून ठेवलेलं उच्च दर्जाचं राहणीमान, जगभर भटकंती, हास्य, मदती साठी तय्यार सतत,.... just to name a few )
सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१
भन्नाट व्यक्तिमत्व - २
तीन तऱ्हेची दुकानं
पुण्यात वास्तव्याला आल्यापासून गेले अनेक वर्ष मी चितळेंची भली मोठी फॅन आहे. आधी मी तुळशीबागेत गेले कि चितळेंकडून अनेकविध गोष्टी विकत घेत असे. त्या शनिपारच्या दुकानात मोजून वजनावर मिठाई आणि बऱ्याच गोष्टी मिळतात. त्या नंतर काही वर्षांनी माझी थोडी सोय झाली आणि त्यांचच अजुन एक तस्सच दुकान गरवारे पुलाजवळ सुरु झालं. त्याचा हि मी भरपूर फायदा करून घेतला. एक तर भरलेलं घर, खाणारी माणसं आणि आवड.
हळूहळू अनेक ठिकाणी दुकानं सुरु झाली आणि अगदी माझ्या घराजवळ पण दोन दुकानं आली. माझी अजूनच सोय झाली. प्रत्येक वेळी ह्या नवीन दुकानात पाऊल टाकलं कि काहीतरी नवीन दृष्टीपथात पडतच आणि त्यामुळे मला तर खूप आवडतं अधेमधें ह्या दुकानांमधे जायला.
भरीसभर माझ्या ऑफिस च्या रस्त्यावर मला नवीन दुकान उघडलेलं दिसलं आणि "सोन्याहून पिवळं" च झाल्यासारखं वाटलं मला. अर्थात त्या दुकानाचं नाव एक्सप्रेस असं होत. ते काय आहे हे मला बाहेरून समजत नव्हतं. एक दिवशी गेले तर चाट पडले मी कारण त्या दुकानात आधी सारखं हे पाव द्या, ते अर्धा किलो असं काहीच नव्हतं. सगळं म्हणजे सगळं आधीच पॅक करून ठेवलेलं. बघा, उचला, पैसे द्या आणि फटाफट बाहेर पडा = एक्सप्रेस. अहाहा. आवडलं मला हे फारच. उगाच वेळ दवडायला नकोच सर्वांचाच हो, दुकानदाराचा, गिऱ्हाईकाचा आणि तो जो हे पदार्थ तय्यार करतो त्याचा. सगळं केलं कि पाकिटात थेट. ने-आण सोप्प अगदी. इतकी सुंदर कल्पना कदाचित त्यांना थोडसं संशोधन केल्यामुळे सुचली असावी असा माझा अंदाज आहे. हा प्रवास ठराविक टिपिकल मिठाई दुकान ते अनेक दुकाने ते एक्सप्रेस ते संपूर्ण दिवस सुरु राहणे हे फारच कौतुकास्पद आहे आणि संशोधनात्मक असंच.
रविवार, २९ ऑगस्ट, २०२१
सोचते रह जाओगे
असं काहीस झालं माझं. मनसुबे फक्त घडवत राहिले मी, तोंडाची वाफ दवडणे म्हणतात ह्याला. मुलांची १२ वी झाली कि मी आईला नेहेमीकरता माझ्या कडे राहायला बोलावणार. मग मेडिकल ची महत्वाची प्रवेश परीक्षा होऊ दे मग तर मी कोणासाठी नाही थांबणार. सगळ्यांना सांगत सुटले, कृती करण दूरच. आई आली कि मी ६ महिने सुट्टी घेईन, तिची सेवा करेन, एका मावशींना तिला सांभाळण्यासाठी तय्यार करेन, सगळे टीव्ही वर येणार सिरीयल एकत्र एन्जॉय करेन, तिच्या पायांना रोज तेल लावून देईल, ई. फक्त शब्द. आधी आधी नाही म्हणायची, मी नाही येणार, जावयाच्या घरी कसं राहायचं?, पण नंतर हो म्हणाली, मनापासून नव्हतं ते बहुतेक, मला फक्त बरं वाटावं म्हणून. बास. शेवटी तिनेच मार्ग काढला ह्यातून. काहीही म्हणजे काहीही करू दिल नाहीच मला. असो. आता फक्त डोळ्यात पाणी उरलं आहे, आयुष्यभराकरता.
ह्यापुढे कधी हि कोणीही कशाचीही वाट बघायची नाहीच, हे च खरं. मनात आलं कि करून टाकायचं. वेळ आणि नशीब कोणासाठी थांबत नाही. फार मोठा आणि भयानक धडा देऊन गेली ती.
माझी खाण्याची आवड
मला भरपूर, वैविध्य प्रकार आणि कधीही खायला / ताव मारायला भयंकर आवडतात. माझ्या नागपूरच्या वास्तव्यात तर अनेक जण मला म्हणायचे "अगं भयंकर हा शब्द कसा काय वापरतेस तू सर्रास, ते देखील खाण्याच्या बाबतीत?"
गेले कित्येक दिवस मी नारळांकडे आणि नारळ माझ्याकडे फक्त बघत होते. खूप काही खुणावत होते पण माझा थोडासा आळस आडवा येत होता. म्हटलं आज नाहीच. आज त्याच काही तरी करायचंच म्हणजे करायचंच.
मी अनेक वर्षांनी आज प्रयोग केला उकडीच्या करंज्यांचा. मोदकाचा आकार काय आणि कारंजी काय. तशीपण मोदक केले तरी "भाऊ-बहीण" ह्या नात्याने एक कारंजी करावी लागतेच. माझ्या लेकाला मोदकाचं डोकं फारसं नाही आवडत खायला. आणि कारंजी आकार द्यायची नसल्यामुळे झटकीपट होते देखील. म्हणून फटाफट सारण केलं, उकड केली आणि करंज्या केल्या देखील. अन-सीझनल उकडीच्या करंज्या खायला नक्की मज्जा येईलच, तय्यार झाल्यावर. पण आधी मी मनसोक्त ताज खोबर खाल्लं, मग सारण एन्जॉय केलं आणि जश्शी उकड झाली रे झाली मळून ती कोमट असतांनाच अगदी स्वर्ग सुख जशी फस्त केली. काय पदार्थ आहे ना उकड म्हणजे? अहाहा. भन्नाट प्रतिच्या चिन्नोर तांदळाची, त्यात मीठ आणि जरासं तेल आणि तो कोमटपणा, देवा, ह्या जगाच्या पलीकडलेच, माझ्या साठी. कित्ती लिहू आणि कित्ती नाही असं झालयं मला आता. मला काहीही आवडतं हेच खरं. का? ते माहित नाही बिलकुल. पण ह्या उकडीने दिलेला परमानंद पुढील खूप दिवस / आठवडे पुरणार हे नक्की, माझ्या साठी.
सुगंध आणि सुवास
काल सुट्टी म्हणून इडली चा बेत आखला मी. आदल्यादिवशी तांदूळ डाळ छान भिजत घातले, त्याचं पीठ तय्यार केलं आणि ते मस्त फुगून आलं सकाळी. त्याच्या जेव्हा इडल्या लावल्या कुकरला तेव्हा संपूर्ण घरात जो घमघमाट सुटला होता म्हणून सांगते, ज्याचं नाव ते. सहज मग मी बोलून गेले "हा तांदूळ किती चांगल्या प्रतीचा आहे नाही, भन्नाट सुगंध पसरला आहे".
त्या तांदळाला जाऊन सांगण्याची गरज पडली नाही कि मी किती चांगल्या प्रतीचा आहे तो, त्याचा सुगंध सगळं सांगून गेला आपोआप.
तसेच मी माझ्या विद्यार्थ्यांना सतत सांगत असते कि "तुमचं काम बोललं पाहिजे तुम्ही नाही / your work should speak about you, not you". त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला काल.
अर्थातच ज्या शेतकऱ्याने ते तांदळाचे पीक घेतलं असेल त्याने फारच मनापासून कष्ट केलेलं दिसले आणि त्यांच्या मुळे पोटभर तृप्त होईपर्यंत इडली फस्त केली आम्ही सर्वानी. तो सुगंध इतका अप्रतिम होता ना कि ज्याला भूक नसेल किंवा इडली आवडत नसेल तो देखील नक्की चाखून बघणार हे नक्की. ज्या ज्या कष्टकऱ्यांनी माझ्या इडली साठी काम केलं त्या सर्वांना धन्यवाद. अशीच माझ्या घरची, सर्वांच्या घरची ताटं नेहेमी भरलेली असो हिच प्रार्थना.
बेसिक ऐमिनिटीज
" बेसिक ऐमिनिटीज " हा शब्द म्हणजे सोसायटी मधे काय काय देऊ केलं आहे बिल्डरनी, ह्या अनुशंघाने वापरला जातो सहसा. पण जेव्हा पासून मला स्वतःला माझ्या पायांचा त्रास सुरु झाला, अगदीच चालणं / पाऊल टाकणं अशक्य झालं तेव्हा समजलं कि माझ्या साठी आणि सर्वांसाठी चालता येणं हि एक बेसिक ऐमिनिटी आहे. मी माझ्या पायांना फारच गृहित धरलं होत तो पर्यंत.
त्या नंतर मला सहज आढळून आलं कि स्वाक्षर असणं, डोळ्यांना दिसणं, कानांना ऐकू येणं, आणि अर्थातच सर्वच अवयव व्यवस्थित चालू राहणं, त्यांचं आखून दिलेलं कार्य सातत्याने चालू राहणं ह्याला च बेसिक ऐमिनिटीज म्हणतात. एक जरी बंद पडली तरी अवघड होत. अर्थात त्यातून भरपूर शिकायला मिळत ते वेगळंच.
माझ्या सोसायटी मधे अनेक मुली मी बघते त्या वाहून घेतल्यासारख्या काम करतात, घरात आणि ऑफिस मधे देखील. नुसतंच काम, अती होत बरेचदा आणि ते त्यांना देखील कळत असणार. पण मग कृती करायला हवी. मान्य आहे कि पैश्याची गरज असते सर्वांना, पण बेसिक ऐमिनिटीज चालू राहणं पण तेवढंच महत्वाचं माझ्या दृष्टीने. शारीरिक बेसिक ऐमिनिटीज व्यवस्थित काम करत राहिल्या कि मग आपण बाकीच्या ऐमिनिटीज चा उपभोग सहज घेऊ शकतो, किंबहुना रोजचा व्यवहार पण नीटनेटका करू शकतो.
माझे एक सहपाठी होते आधीच्या ऑफिस मधे ते विद्यार्थ्यांना नेहेमी म्हणायचे जेव्हा विद्यार्थी कुरकुर करायचे ते, कि तुम्हाला सगळं सहज मिळालं आहे त्याचे धन्यवाद माना सतत नाहीतर आपण एक चक्कर मारून येऊ सरकारी रुग्णालयाची म्हणजे तुम्हाला जास्त चांगल समजेल कदाचित, जे आहे त्याचं महत्व. असो.
माझी हि नवीन परिभाषा "बेसिक ऐमिनिटीज" ची, तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते आणि सर्वजण त्याची काळजी घेतील हि अपेक्षा.
शीतकपाट
माझा एक मानलेला भाऊ आहे. अनेकदा त्याच्या आईकडे माझं जाणं झालं होत, अनेक वर्षांपूर्वी, विविध कार्यासाठी. तेव्हा त्यांच्या घरी खूप वेगळेपण जाणवलं. जसे कि कुठलीही उसळ हि शांतपणे चुलीवर ठेवून शिजवली जायची जसे कि छोले, राजमा, आणि इतर. दुसऱ्या चुलीवर दिवसभर / चूल थंड होई पर्यंत दूध उकळत किंवा गरम असायचं सतत. हे खूप छान आणि नवीन होत मला, अर्थात मी हे सगळं खूपच वर्षांपूर्वीच सांगते आहे.
मग ह्या माझ्या भावाचं लग्न झालं. त्याने त्याच घर उभं केलं, मुलं मोठी झाली आणि पुन्हा काही कारणास्तव माझं आता त्याच्या घरी जाणं झालं, आईच्या नाही. तेथे देखील एक गोष्ट बघून मी उडालेच, अक्षरश:. सर्वसाधारण सगळ्यांच्या घरी एक शीतकपाट / फ्रिज असतो. कारण एक फ्रिज पुरेसा असतो. पण ह्या पठ्या कडे एक फ्रिज जो होता तोच इतका भलामोठा होता कि ज्याचं नाव ते आणि तस्साच दुसरा पण त्याहून मोठा दिसला. दाही बोटं तोंडात घालून मी जेव्हा विचारलं कि का दोन दोन एका घरात तर म्हणे एक नेहेमीच्या वस्तू ठेवण्यासाठी आणि दुसरा मुख्यतः फक्त आईसक्रिम आणि थंड पेयांचा साठा ठेवण्यासाठी. देवा. काय काय करतील लोक सांगताच येत नाही. एकावेळी एका घरात इतके लिटर आईसक्रीम आणि ते पण इतक्या प्रकारचे म्हणजे माझ्या बघण्यात नव्हतंच कधीही. अर्थात दिल्ली कडे खाण्यापिण्याचं जरा प्रस्थ जास्तच आहे, दिखावा पण. असो. मला नवीन काही तरी शिकायला आणि बघायला मिळालं आणि असं हि असत हे समजलं.
शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१
Confidence
शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१
भन्नाट बॅकग्राऊंड
तुझे माझे नाते अनेक जन्मीचे
" तुझे माझे नाते अनेक जन्मीचे" असं माझी आई तिच्या भजनांमधे म्हणत असे, अर्थातच "त्या" देवाला उद्देशून. मी पण म्हणतेच. पण आज त्याच बरोबर पुन्हा एकदा अजून एका नात्या बद्दल लिहावसं वाटलं.
सध्या ह्या नवीन दिवसात माझा एक मदतनीस धोबी-दादा उपलब्ध नाही. किंबहुना मी सध्या कपडे घरीच इस्त्री करते आहे. मी विद्यार्थिनी असतांना आईकडे देखील रविवारी माझा धोबीघाट असायचा. कारण त्या दिवशी सकाळी सगळे बाहेरचे कपडे धुवायचे हातानी आणि मग इस्त्री. तो एक मोठा कार्यक्रम असायचा. मोठ्याने, अतिउंच आवाजात संपूर्ण इस्त्री होईस्तोवर गाणी लावायची टेप रेकॉर्डरवर आणि भरभर हात चालवायचा.
आता मोबाईल वर गाणी लावली जातात, स्वतःला ऐकू येतील इतक्याच आवाजात आणि दरदिवशी हा प्रयोग होतो. पट्टाकिनी एका ड्रेस ला इस्त्री करून घ्यायची दररोज. कधीतरी करते रविवारी सगळे इस्त्री एकत्र पण सहसा नाहीच.
माझा अजून एक सखा आहे, हिटिंग पॅड. ते चालूकरून मी आपली पाय दुखायला लागले कि शेकत बसते. छान वाटत. हलकं वाटत. काही दिवसांपुर्वी सकाळीच वाटलं शेकावे, तेव्हाच इस्त्री करून झाली होती. एक सहज प्रयोग केला. पायावर चादर घेऊन बंद पण तापलेली इस्त्री फिरवायला सुरवात केली. भन्नाट अनुभव होता तो. कमीतकमी २० मिनिटं पुढे परमानंद उपभोगला मी त्या इस्त्री मुळे. समाधान तर उच्च कोटींचं मिळालं कारण वीज वाया गेली नाही त्या दिवशी आणि त्या दिवशीपासून आताशा रोज १५ मिनिटं माझी असतात, वेगळ्या प्रकारची इस्त्री करण्यासाठी. अहाहा. "प्रयोगातून विज्ञान" ह्या नावाचा विषय उगाच नाही शिकले मी शाळेत. हे माझे चाळे बघून दोघा मुलांनी कपाळावर हात मारून घेतला, म्हटले तुझं काही खरं नाही मम्मा.
हाताला चाळे
आताशा ऑनलाईन क्लास सुरु असतांना विद्यार्थी गप्प ऐकत नाहीत शिक्षकांचं, काही तरी करतंच असतात, अभ्यासाशिवाय. त्यात एक म्हणजे म्युट - म्युट खेळणं, उगाचच हं, काय मिळत कि असं करून, अर्थात हे सगळं करणं म्हणजेच कदाचित विद्यार्थी असणं. असो मला तर मज्जा येते. म्हणजे सगळ्या तांत्रिक मंडळींना अजून हे सगळं इम्प्लिमेंट करायचं राहील आहे ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर. नाही का? असे खेळणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतात. त्यांना अकॅसेस बंद केला पाहिजे ऑटोमॅटिकली. काही नियम लावेल कि कदाचित हे म्युट करणं थांबवतील आणि अर्थातच दुसरं काही करायला सुरवात करतील. मला मान्य आहे कि छोट्या वर्गातली मुलं असं करतात कारण त्यांना हे नवीन दिवस ऑनलाईन शिक्षणाचे झेपत नाही आहे, किंवा सतत काहीतरी न कळत करण्याचं ते भोळे, छोटे, आडनिड्या वयातले आहेत. पण हे कॉलेज चे घोडे का करतात ?
असुरी-आनंद असं म्हणते मी ह्याला, कारण वैविध्य पद्धितीचे लोक असतातच ह्या जगात. एक असा पण क्लास असतो ज्यांच्या हाताला सतत चाळे करायला आवडतात, रादर चाळे केले नाही तर चैन पडतच नाही त्यांना. असो.
त्यांच्यामुळे असे लोक असतात हे समजलं, सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींचा / तंत्रज्ञानाचा दुरुपयोग कसा करतात हे कळलं, नवीन तंत्रज्ञान, संशोधन / कृती लागणार आहे अश्यांना आळा घालण्यासाठी हे पण समजलं, आणि एकंदरीत मज्जा आली हे लिहितांना देखील.
ह्या अश्या चाळे करणाऱ्यांना हे कसं समजत नाही कि ह्यांचं शिक्षण वेळेवर सुरु तरी आहे, अश्या नवीन परिस्थिती देखील. कित्येक जणांकडे मोबाइल इंटरनेट तर सोडाच पण साधी वीज नाही. ते फक्त शाळेवर अवलंबून होते.
हे पण दिवस जातील झटकिनी निघून आणि शाळा / शिक्षण पुर्ववत लवकरच सुरु होतील.
दिशा
अनेक दिवस / महिने एक दुकान मी बघत होते आणि ते दुकान देखील मला खुणावत होते. कधी जाणं होत नसे. मी त्या दुकानाबद्दल त्यांच्या वेबसाईट वर बघितलं होत, पण प्रत्यक्षात जाणं झालं नव्हतं. जाता-येता रस्त्यावरून फक्त त्याची झलक दिसत असे. त्यावरून दुकांची खोली, रुंदी, लांबी ई. काहीच लक्षात आलं नाही. काही दिवसांपूर्वी एकदाच शेवटी जाणं झालंच त्या दुकानात. किंबहुना दुसरा काहीही पर्याय दिसला नाही मला, त्यामुळे गेलेच. पहिल्यांदा गेले असल्यामुळे आणि उत्सुकतेमुळे माझं सगळं लक्ष दुकानात काय काय असेल ह्याच्या कडे होत आणि मी नेमकी एक्सिट दारातून प्रवेश केला. असो. तेव्हा आत बघितलं तर भलं मोठं दुकान होत आणि भरपूर भरलेलं, प्रचंड व्हरायटी होती. त्या दुकानाची थोडक्यात रचना अशी होती कि रस्ता, नंतर ४ पायऱ्या, दोन दारं आणि आत शिरल्यावर सगळ्या वस्तू, त्या दुकानाच्या मालक आणि त्यांच पैसे घेण्याचं काउंटर दोन दारांच्या मधे. म्हणजेच मालकाची पाठ सतत रस्त्याच्या दिशेला, किंवा प्रवेश दाराच्या दिशेला. माझ्या दृष्टीने हे उलटं असायला हवं खरं तर. एक तर मालकाला दिसायला हवं कोण येतंय जातंय, गाड्या कश्या पार्क केल्या आहेत, किंवा प्रथमदर्शनी स्वागत करण्याकरता ई. दुकानात शिरल्याशिवाय मालकाला कळणार नाहीच कोण आलंय. जेव्हा एखादा बंगला बांधला जातो भारतात, तेव्हा प्रकर्षाने हे बघितलं जातं कि स्वयंपाक घरातून बाहेरच गेट दिसलं पाहिजे. कारण घरातली स्त्री हि बहुतांशी स्वयंपाक घरात असते आणि तिची नजर हवी बाहेर आणि सहज. तसेच इथे पण मला ते जाणवलं. असो. ज्याचं त्याच्या बरोबर. वास्तु शास्त्राप्रमाणे त्यांनी ती रचना केली असेल, कोणास ठाऊक. काही का असेना दुकान चालतंय ना ते महत्वाचं.
गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१
Haier Duo Washers
Haier Duo Washers
Fully automatic twin load washing machines
The other day in the local daily news paper, something immediately caught my attention. It looked like washing machine and after going through that advertisement, it indeed was a new avatar of washing machine. It looked awesome and hence read more about it by visiting that company's website.
As the name suggests there are two machines (as if) mounted on top of each other, one looks little tiny than the bottom one. And its true also. The above portion is for the tiny / new born's or kids cloths or delicate few, and other bottom one is for large size cloths with larger quantity too. I really loved the idea, for the joint families its the blessing for sure.
This episode of reading the articles online reminded me of my habit when my kids were new born babies. We did receive huge gifts that time multiplied by two for two kids separately. There were toys, other kids items and clothes in large numbers of varied age groups and sizes, suitable and best fit for growing babies. Because of this it was feasible for me to celebrate their monthly birthdays, sravan fridays with new cloths. But as the kids skin is delicate, I preferred to wash it before using. My basin became my best buddy then as for such small / tiny size cloths it was really handy.
If such awesome duo washing machine would have been available then it would have solved my purpose and it would have been easy for me to manage things well. Anyways, it will be useful for new mom's henceforth. Thank you Haier for thinking about our requirements and implementing it too.
To read more about this product, kindly visit:
https://www.flipkart.com/haier-12-kg-fully-automatic-twin-load-gold/p/itmeux3uvrwffvhs
बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१
।। ज्ञानेश्वर माउली ।।
माझ्या लेकीला तिच्या महाविद्यालयात श्री. ज्ञानेश्वर माउलींबद्दल माहिती द्यायला सुरवात केली आहे. २०२१ मधे देखील ह्या श्रेष्ठ संतांची महती कायम आहे हे ऐकून फारच समाधान वाटले मला. इतक्या वर्षांनी देखील त्यांची शिकवण उपयुक्त ठरते आहे ह्या नव्या पिढीला देखील. त्या शिक्षकाची कमाल आहे. माउलींच्या कार्याचा आढावा घेऊन तो ह्या नव्या पिढीला पटेल अश्या पद्धतीने इंग्लिश मधे समजावून सांगणे, भन्नाट. मला ती जेव्हा सगळं काल सांगत होती, तेव्हा मला माझी आजी आठवली दोन कारणांसाठी.
१. माझी आजी हि माऊलीची फार मोठी भक्त. तिचा एवढा प्रचंड अभ्यास होता ह्या ग्रंथाचा कि ती सहज आणि असंख्य PhD विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे, अनेक वर्ष, त्या काळी. स्वतः फक्त काही वर्ग शाळेत शिकलेली पण त्या अगाध ज्ञानाचा सदुपयोग बघा कसा केला तिने.
२. तिच्या माऊलीच्या श्रद्धेमुळे आणि तिच्या आईच्या भक्तीमुळे आळंदिला अनेक वर्षांपूर्वी एक पायरी बांधली त्या काळी.
धन्य ती माझी आजी आणि तिची भक्ती.
#dyaneshwarmauli #santdyaneshwar #saint #saintdyaneshwar #mygrandmom #followerofdyaneshwar #phdguide
गगनचुंबी इमारती
आजकाल ग्लास-टेकनॉलॉजी मुळे अतिशय सुंदर काचेचं काम केलेल्या इमारती बघायला मिळतात. अर्थात सूर्यप्रकाश आणि उजेड मिळावा हा पण एक उद्देश असतोच म्हणजे वीज जास्त वापरली जात नाही सकाळच्या वेळी. गगनचुंबी कारण सध्या शहरात एक तर आडवं पसरायला जागा उरली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे छोटे छोटे प्लॉट्स असतात आणि त्याचा सदुपयोग करायचा म्हणजे मग उंच जाण्याशिवाय पर्याय नाहीच.
मला तर नेहेमीच आणि दररोज अश्या भल्यामोठ्या इमारती बघायला मिळतात. कधी त्या सोसायटीज असतात किंवा ऑफिस किंवा दोन्ही एकत्र. मी जेव्हा गाडी चालवत असे तेव्हा जमेल तसे वेगवेगळे रस्ते वापरत असे. रोज एकाच रस्त्याने यायचं म्हणजे काय? मला जमतच नाही. असो. तसेच आता मी ऑटोने ये-जा करत आहे आणि त्यालापण कधी कधी ह्या-त्या रस्त्याने घ्यायला सांगते मी.
गगन, मोठी झाडे, पक्षी, भल्यामोठ्या इमारती बघणं आवडण्यामागे एक महत्वाचं कारण आहे. रस्त्यावर खाली बघण्यासारखं काहीच सापडत नाही मला. त्यापेक्षा डोंगर, त्याचे आकार, त्यावरच्या विविध हिरव्या रंगांच्या छटा, आकाशातली सतत बदलणारी रांगोळी, पक्षी ई. जास्त प्रसन्न ता देऊन जातात मला. दिवसभर मोबाईल, लॅपटॉप वर खाली मान घातली असतेच ना, मग प्रवासात तरी त्या वस्तूला बाजूला सारून निसर्ग आणि मानवनिर्मित सौंदर्य अनुभवावं असं मला वाटत आणि आवडत देखील. कदाचित ह्या सर्व कारणांसाठीच उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत, झाड उंच वाढली आहेत, पक्षी अतिशय सुंदर कवायती करत उंच उडत असतात म्हणजे सगळीकडे पसरलेला कचरा बघून उगाच वाईट वाटत नाही. अर्थात मी राणी सारखी बसून प्रवास करते म्हणून हे सहज शक्य आहे मला.
#highrisebuildings #lookup #sky #talltrees #naturebeauty #keepawaymobile #backseat #dailycommute
सीटे नही है
एवढ्यातच आमच्याकडे एक गोरगोमटं, फारंच लोभस हतीच्च पिल्लू आलं होत. तसं नाही हो मंडळी, एक माझ्या मैत्रिणीची भन्नाट गोड छोटी गोलमटोल मुलगी आली होती. ती इतकी गोड होती, इतकी हजारजवाबी होती, इतकी लाघवी होती कि ज्याचं नाव ते. वैविध्य विषयावर फारच आत्मविश्वासाने बोलत होती. मी पण सतत बडबडणारी आणि ती देखील मग काय हवं. अहाहा. मधेच ती स्वतःला मुलगा म्हणून / संबोधून बोलायची. अगदी तिच्या मैत्रिणीपासून, शेजारी, फॅमिली, खाण्याच्या सवयी, मास्क, टीव्ही, गाडी, बाबांचं रागावणं, ई. असंख्य विषयावर अखंड बोलत होती, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तय्यार. मी पण काही ह्या जमान्यातले आणि काही माझ्या वेळचे ठरलेले प्रश्न विचारून तिला भंडावून सोडत होती, पण ती सगळ्यांपेक्षा दोन पाऊलं पुढे. जबरदस्तच. मी विचारलेल्या भरपूर प्रश्नांमधला एक होता, "आप यहा रह जाओ", नाही म्हणाली, मग "हम आ जाये आप के घर" तरी देखील नाही म्हणाली. म्हटलं का? तर म्हणते कशी "सीटे नही है". मला काही समजलं नाही. मग तिच्या आईनी सांगितल्यावर हसून हसून पुरेवाट झाली माझी आणि तिच्या तल्लख बुद्धीची कमाल वाटली. ती तिच्या आई बाबा आजी आजोबा आणि मोठ्या बहिणी सोबत आमच्या कडे आली होती त्यांच्या कार ने. असं म्हणणं होत, कि गाडीत माझ्या साठी बसायला जागा नाही हो. त्यामुळे मी यायचं नाही. बाप रे. अगदी झटपट, क्लिअर उत्तर, ना आड ना पडदा. आणि तिच्या आईने पण असं काही म्हटलं नाही "असं म्हणू नये...", कारणंच दिलेलं इतकं पटणार होत ना, कि ज्याचं नाव ते. आणि हे सगळं फक्त वय वर्ष तीन, देवा. पुढल्या रविवारी मी पुन्हा जाणारच आहे तिच्याकडे, तिच्याशी खेळायला / बोलायला / तिच्या सगळ्या हावभावांना एन्जॉय करण्याकरता.
#noplaceincar #verysmartgirl #talkative #smart #adorable
सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१
खराखुरा संशोधक
"अबसेन्ट माईंडेड प्रोफेसर" हा शब्द, एक चित्रपट आणि असे भरपूर व्यक्तिमत्व मी बघितले आहेत. त्यांना फक्त अभ्यास, नवनवीन शोध, आणि त्यांच तांत्रिक विश्व च रमायला पुरेसं असत. त्यांच्या दृष्टीने बाकी कशालाही महत्व नसतंच, मग ते कपडे असो, चपला, गाडी, जेवण, छे, ते आणि त्यांचं काम.
गेले एक - दोन वर्ष जेव्हा जेव्हा मी ऑफिस ला गेले तेव्हा तेव्हा एक सातत्याची गती मी अनुभवली आणि त्याने माझे लक्ष वेधले. काहीही झालं तरी ती गती कधीच बदलली नाही. ऊन, वारा, पाऊस, पण गती तीच. जरा आश्चर्य वाटलं आणि सहज माझे चार डोळे अजून व्यवस्थित गोष्टी टिपू लागले तेव्हा असं लक्षात आलं कि ते व्यक्तिमत्व संशोधक असावं. मला आणि माझी काहीही हरकत नाहीच पण दररोज बहुतांशी एकच किंवा जास्तीत जास्त दोन चौकड्याचे बुशर्ट, हातात काहीही नाही, बॅग सुद्धा नाही. ठराविक वेळेला येणार सकाळ संध्याकाळ आणि पंच करणार, जाणार. बास. सतत डोक्यात काही तरी भन्नाट विचार. कधीही कोणीही नाही सोबत. एकंदरीत आवडलं मला. "लेस इज मोर" म्हणतात ते खरं आहे. विविध वर्ग असतातच ना लोकांचे, त्यातला हा विचारी, अगदी साधा, हुशार, मेहेनती,सरळ असा "त्या" खास वर्गात मोडणारा. असो. त्याच्या संशोधन कार्याला शुभेच्छा आणि सातत्याला सलाम.
स्वानुभव
मी एक नोकरी करणारी आई असल्यामुळे माझ्या मुलांना भलभलते अनुभव आलेत, घरी मावशींबरोबर एकटं राहणं, पाळणाघरात राहणं, तिष्ठत आईची वाट बघणं, आईच्या ऑफिस मधे येणं, थंड जेवण.... to name a few. माझ्या आणि त्यांच्या सुट्ट्या एकत्र येत नसत नेहेमीच. त्यात भरीसभर मावशी सुट्टीवर मग काय आमच्या तिघांची वरात ऑफिस ला. अर्थात माझ्या सगळ्याच ऑफिस मधे कधीही ना नव्हती मुलांना घेऊन यायची. त्यामुळे निभावलं. पण त्या वरातीत माझी बॅग, त्या दोघांच्या दोन ब्यागा, मोठे डब्बे, जास्त पाणी, करमणुकीसाठी अनेक गोष्टी, विचारू नका. देवा. आणि त्याऊपर ऑफिस ला पोचलं रे पोचलं कि "१. मम्मा आता काय करू? २. कधी घरी जायचं?".
आज हे सगळं पुराण का आठवलं म्हणताय? सांगते.
आज मी एक अप्रतिम फोटो बघितला LinkedIn वर. त्यात एका कर्त्या मुलांनी लिहिलं आहे फोटो सहित कि मी आई सोबत बऱ्याचदा ऑफिस ला गेलो होतो लहान असतांना. आज माझी आई आली आहे माझ्या ऑफिस मधे. त्याच्या खुर्चीत आई बसलेली दाखवली आहे त्या फोटोत. काकू मस्त साडी नेसून तय्यार होऊन आल्या आहेत मुलाच्या ऑफिस मध्ये, कित्ती कौतुकास्पद आहे ना हे. अहाहा. मी पण वा$$$$$ट बघते आहे केव्हा माझी बारी येईल माझ्या मुलांनी कष्टाने कमावलेल्या खुर्चीत ऐटीत बसायची. अजून ४ वर्ष थांबव लागेल त्या करता मला. मी पण अशीच तय्यार होऊन, भरपूर काही घरचे खाण्याचे पदार्थ घेऊन जाईन मुलांच्या ऑफिस मधे. नवीन ड्रेस पण घेईन स्पेशली त्या करता.
ह्या फोटो मुळे सगळी पळापळ धावपळ आठवली मला आज, माझ्या पिल्लांची पण फार दमछाक झाली, पण इलाज नव्हता. असो.
महाविद्यालयाचा पहिला दिवस
आज मी मोठी झाले एकदाची. आज पर्यंत मला तरुण च असल्यासारखं सतत वाटत होत माझ्या मुलांमुळे कारण ती दोघे शाळेत जाणारी अशी होती. त्यामुळे मी पण मिरवत असे दिमाखात, कोणी विचारलं कि, "माझी मुलं अजूनही शाळेत जातात", कारण त्यांनी ११ वी -१२वी त्यांच्या शाळेत केली. असो.
आज माझ्या लेकीचा कॉलेज चा पहिला दिवस. काल पासून / तिला मेल आल्यापासून २००० वेळा मला सांगून झालं, उद्या माझा पहिला तास, तो पण रसायनशास्त्र. तिच्या आणि माझ्या पोटात थोडासा / छोटासा गोळा आला होता, ती सतत दाखवत होती, फक्त म्हणून मी फार धिराची असल्यासारखं भासवत होते, पण एक नवीन सुरवात आहे हि.
सध्या सगळंच ऑनलाईन असो, पण नवीन दुनियेत पाऊल पडलं शेवटी, नवीन शिक्षक, नवीन मित्र-मैत्रिणी अहाहा, मला माझे नवीन दिवस आठवले १९९२ मधले. झकास.
रविवार, २२ ऑगस्ट, २०२१
राखी
खूप पूर्वी पासून हट्टा कट्टा तगडा भाऊ बहिणीची रक्षा करत असे किंवा करावी ह्या उद्देशाने रक्षाबंधन हा सण आखला गेला आणि साजरा केला गेला. समुद्र देवता सर्व कोळी बंधूना सांभाळतो, भरपूर देतो म्हणून देखील हि नारळी पौर्णिमा साजरी केली जाते आणि तिला असं नाव देखील दिलं गेलं आहे. आज किंबहुना सध्या काही वर्षांपासून ह्याच सणाचे विविध प्रकार दृष्टीस पडले आणि ते भरपूर आवडले म्हणून म्हटलं लिहावं.
आज माझ्याकडे एक कुटुंब येणार होत. ते म्हणाले आम्ही दुपारी येतो कारण सकाळी राखीचा कार्यक्रम आहे. जे येणार होते ते सुंदर चौकोनी कुटुंब आहे, दोन मुली आणि आई बाबा. माझ्या मनातला प्रश्न ओठातून बाहेर पडायच्या आत उत्तर मिळालंच. दोन्ही मुली त्यांच्या वडिलांना म्हणे राखी बांधतात.
माझ्या ओळखीच्या काही कुटुंबात दोन बहिणी आहेत, तीन बहिणी आहेत त्या आपआपसात एकमेकींना राखी बांधतात ह्या दिवशी.
मी लहान असतांना मागे एकदा लिहिल्या प्रमाणे माझ्या आई बाबांना आणि भावाला विचारत असे कि मीच का राखी बांधायची दादाला? आधी त्याने बांधावी मला. ती जरी गम्मत होती किंवा राखी चे महत्व न कळण्यासारख्या वयात होते त्यामुळे असेल. पण ते आज किती सहज बघायला मिळतंय किंवा कृतीत येतंय. सध्या मी माझ्या मोठ्या भावाला माझ्या कडे येऊन राहायची विनंती करते आहे कारण तो आता एकटा पडला आहे, एकटा राहतो आहे, त्यापेक्षा म्हटलं सगळे गुण्या गोविंदाने राहू. हो म्हणाला. आणि आज राखी म्हणुन मी फोन केला तर म्हणतो कसा, आता तू मला सांभाळणार म्हणजे मी तुला राखी बांधायला हवी.
माझी लेक पण म्हणाली, कि ज्या कुटुंबात भाऊ लहान आणि बहीण मोठी असेल तेथे तर भावानी बहिणीला राखी बांधावी, कारण ती मोठी असल्यामुळे त्याला भरपूर मदत करणार, रक्षा करणार, सतत त्याच्या बरोबर उभी राहणार ई.
बॉर्डर वर काम करणाऱ्या जवानांना काही जणी आवर्जून राखी बांधतात, आज मी एक व्हिडिओ बघितला त्यात ती वॉचमन भैया ला राखी बांधते, असो.
रक्षा करणारा / करणारी मग ती कोणीही असो त्यांच्या सोबत आजचा सण आनंदाने आणि समाधानाने साजरा करू या, वेगळया पद्धतीने ह्या सणाकडे बघुयात, ह्या बंधनाला मान सन्मान देऊया. राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना.
Who is the wife?
Why the numbers of same gender marriages are increasing these days? Why government made a proper law for such increasing number of people and their togetherness?. According to me there is a proper fundamental reason behind it. The nature or God or the society etc. initially and originally made two different genders and the marriage system between a boy and girl. Boy-boy or girl-girl pair was done after many ages / generations and they are constantly increasing in number and proudly opening it up about it too. Why? Who is the wife in such special marriages? And the clear answer is “no one”, both are equal, both go to work for the entire day and hence take care of every other chores together too. Then same thing why it’s not applicable in normal marriages? Why the household front is still in the year 2021 is the sole responsibility of a girl counterpart in normal couple? According to me hence the nature started with increasing number of same gender attractions, so that at least then both partners will take equal responsibility, finally. For a girl there is absolutely no issue in taking care of her family with motherly care, but on top of that there is a blame game too, why?. Also while fixing the normal marriage, everyone wish to have a working girl.
I am so happy for the special pairs as I see many around me, even when I was outside India and here too. Ultimately there should be someone of same age or slightly elder as a support to each other, to share everything, to take care of their individual families etc. Right? I know few special pairs who went ahead with adopting a baby and becoming proud parents too. So then that is also taken care of.
I am extremely happy with the special law and observing such courageous people around. Wow. Hope the normal couple quickly learn something great from these special pairs and spend rest of their life with peace.
शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१
भन्नाट व्यक्तिमत्व - ४
माझ्या शाळेच्या दिवसांमधे १९८१-८२ साली असेल कदाचित, "समभुज त्रिकोण", "काटकोन त्रिकोण" ई. मुलभूत संकल्पना शिक्षकांनी कश्या शिकवल्या असतील? काही कल्पना? बहुतांशी शिक्षकांनी फळ्यावर खडूने चित्र काढून, किंवा जास्तीत जास्त लाकडी प्रतिकृती दाखवून किंवा कागदावर कापून ई. प्रकारे. बरोबर?
एक जगावेगळे, बहुगुणी, काळाच्या पुढे चालणारे शिक्षक आम्हाला लाभले होते, फार आधी, सुरवातीलाच. मला अजूनही तो दिवस जसाच्या तस्सा आठवतो जेव्हा आम्हाला पटांगणात / मैदानात सर घेऊन गेले होते. गोल करून सर्व विद्यार्थ्यांना बसवलं. ९ विद्यार्थी, ३-३-३ असे उभे केले त्रिकोणी आकारात आणि तय्यार "समभुज त्रिकोण". बास. इतकं सोप्प केलं त्यांनी. मग एक एक विद्यार्थी बोलावून हा कुठला कोन / अँगल आहे हे समजावत गेले. अहाहा. त्यावेळी बाकीच्या वर्गात बसून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे चेहेरे बघण्यासारखे झाले होते.
मग त्याच आमच्या गणिताच्या शिक्षकांना संगणक शिकण्याची संधी मिळाली. शाळेने त्यांची निवड केली होती. ते गेले आणि जिंकूनच आले. देवळात गेल्यासारखं आम्ही त्या भव्य दिव्य वातानुकूलित खोलीत प्रवेश करत असू चपला बूट ई. खोलीबाहेर काढून. संगणकावर जन-गण-मन ऐकलं होत आम्ही तेव्हा, सहावी - सातवीत असेल. अर्थात तो संगणक त्यावेळी ओळख करून घेतलेला आता देवासारखाच सातत्याने साथ देतो आहे माझी आणि सगळ्यांचीच.
असे हे आमचे गणिताचे जगावेगळे / जगापुढे चालणारे / चालायला लावणारे शिक्षक. अश्या छत्रछायेखाली शिकलेले आम्ही सगळे विद्यार्थी मग कसे असणार सांगा?
फारच भन्नाट व्यक्तिमत्व होत ते माझ्या साठी, मला घडवणार.
पळापळ धावपळ
आज पहाटे सव्वा सहा- साडे सहा च्या दरम्यान माझा मोबाईल गुरगुरला. म्हटलं पहाटे पहाटे कोणाला माझी इतकी आठवण आली. माझं माझं आवरुन झालं होत सगळं आणि बहुतेक मी माझी ऑफिस ची बॅग भरत होते तेव्हा. तर खणखणीत आवाजात डायरेक्ट बोलणं सुरु झालं फोन उचलता क्षणीच.
"ताई मला ताप आली, मी काल लस घेतली. त्यामुळे मी आज येणार नाही कामाला"- इति आमच्या मावशी, ज्या नाहीतर सकाळी सात ला हजर असतात कामाला.
"काळजी घ्या, जास्त ताप नाही ना?" - मी.
आता?
भला मोठा प्रश्न माझ्यापुढे. नाश्ता, डब्बा काय करू? काय करू पेक्षा कसं करू? माझ्या पायाने जमेल का? खिचडीच करते? मॅग्गी खाऊन जाते... अनेक विचार डोक्यात. मग आधी हातातले काम संपवले. मस्त चहा बिस्कीट फस्त केलं आणि मग इन्स्टंट डोसा पीठ भिजवलं, चटणी केली आणि लेकीला आवाज दिला. तिने डब्याचा बंदोबस्त केला दुसऱ्या मावशींच्या मदतीने. बास. झालं काम, ते पण शांततेत. का कुणास ठाऊक पण मुलं लहान होती तेव्हा मला सुचायचंच नाही मावशी येत नाही म्हटलं कि फार मोठ्या प्रमाणात गडबड व्हायची.
चला त्या निमित्याने चव बदल झाला सगळ्यांनाच आज. मावशींना आराम मिळाला तो वेगळाच आणि मुख्य म्हणजे दोन लसी घेऊन झाल्या एकदाच्या, आता थोडी काळजी घेत राहिली मावशींनी दररोज कि निश्चिन्त (मास्क, सॅनिटायझर ई).
तर अशी हि आज ची पळापळ-धावपळ असणारी नेहेमीपेक्षा जरा हटके सकाळ सुरु झाली.
भन्नाट व्यक्तिमत्व - १
ते मुळचे एक रसायनशास्त्र तज्ञ, (औषध निर्मिती संशोधनात देखील) अनेक वर्ष रासायनिक कारखान्यात / कंपनीत विविध पदांवर काम केलं. ते करत असतांना अनेक पेटंट हाताळले, विद्यावाचस्पती झाले. त्यानंतर पेटंट ह्या क्षेत्रात रस निर्माण झाला आणि त्या दिशेने अतिवेगाने वाटचाल सुरु झाली, अनेक शिखरं पादाक्रांत केली. हे सगळं सुरु असतानां स्वतःची गाण्याची आवड जपली. एका सुप्रसिद्ध मोबाईल अँप वर अग्रगण्य स्थान प्राप्त केलं अतिशय सुमधुर गायक, सातत्याने गाणारा गायक म्हणून. संपूर्ण वेळ नोकरी चालूच आणि शिवाय विविध कविता लिखाण पण. मग त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. इतकं सगळं असून देखील अतिशय साधं व्यक्तिमत्व. शांत आणि सातत्याने दुसऱ्यांना मदत करणे, प्रेरणा देणे चालूच. हे सगळं करता करता सामाजिक विषयांवर विविध वर्तमानपत्रात लेख पण. स्वतःची एक माहितीचा खजिना असलेली वेबसाइट पण तय्यार केली आहे आणि ती वेळोवेळी अपग्रेड करतात. शिवाय पेटंट लिहण्यास प्रोत्साहित करण्याकरिता सतत मार्गदर्शनपर वर्ग देखील घेतात. अहाहा. प्रत्येक सणाला आवर्जून एक विशिष्ट्य असे स्वनिर्मित आधुनिक शुभेच्छा पत्र पण करत राहणार, पाठवत राहणार. अतिशय नीट पद्धतीने मेल लिहिणार, ताबडतोब उत्तर देणारच. कसं काय सगळं सांभाळतात, कोणास ठाऊक. प्रबळ इच्छाशक्ती वैविध्य काम करण्याची, वेळेला दिलेलं महत्व, वेळेचं उमगलेल अस्तित्व आणि महत्व, आणि सतत कामात विविधता हे यशाचं सूत्र असावं कदाचित. अश्या व्यक्तीशी परिचय असणं हे माझं अहोभाग्य.
मायक्रोसॉफ्ट टिम
मी हे अनेकदा अनुभवलं आहे कि मला मायक्रोसॉफ्ट टिम मधे अचानक ऍड करतात. असं कित्येकदा होत नाही आयुष्यात देखील, कधी, कुठे, केव्हा, कोण, काय ऍड करेल ते सांगता येत नाहीच. पण आपण हसत-खेळत, धडपडत, चाचपडत आणि अंशतः कधीतरी रडत त्याला सामोरे जातोच. अगदी जसे टिम. एकदा त्या टिम चा तुम्ही भाग झालात कि जिंकायचंच, नाही का?, धडपडत, हसत-खेळत सर्वांसोबत. आवडत नसलं तरी देखील सुरु करायचं, आवडायला लागत हळू हळू. आणि त्याचा महत्वाचं अर्थ असा असतो कि तुम्ही आवश्यक आहात त्या टिम साठी. त्यामुळे जे जे होतंय ते तुमच्यासाठी गरजेचंच आहे, अत्यावश्यक आहे. आणि फार काही शिकवून जाणार देखील. नाही का? आधी मला वाटायचं "अरे बाप रे आता नवीन टिम का?" पण आता "अरे वा वा छान च अजून एक टिम". खूप जास्त टिम दिसल्या डोळ्यासमोर, सध्या लागणार नसेल तर त्यातल्या ज्या सध्या नको असल्या त्या हाईड करायच्या, सोप्प आहे. म्हणजेच, अगदी खऱ्या आयुष्यासारखे, जर एखादी गोष्ट आपल्याला पटत नसेल तर "दृष्टी आड सृष्टी", थोड्या वेळा करता / क्षणभर डोळे बंद करायचे, आणि पुन्हा नव्या जोमाने सुरु.
शब्दाविण कळले सारे
कुठल्याही विषयावर व्हिडीओ असणं म्हणजे जो बोलतो / सादर करतो तो दिसणं, स्लाईड्स / माहिती दिसणं, पार्श्व संगीत ई. पण वक्ता नसेल तर? चालणार का? उत्तर आहे हो. आज आणि ह्या आधी मी असे असंख्य व्हिडीओ बघितले ज्यात फक्त स्क्रीन दिसते, त्यात काय काय होतंय हे दिसत बाकी काही नाही. म्हणजे एखाद सॉफ्टवेअर किंवा वेबसाइट कशी हाताळायची हे फक्त दाखवणं, न बोलता. अर्थातच हे सगळं करतांना सुमधुर संगीताची धून चालू असते. मला फारच आवडतात असे विडिओ बघायला, कारण त्यात माहिती कडे फक्त लक्ष जात, बाकी कुठेही नाही. वक्ता असेल तर न कळत तो कसा बोलतोय, त्याची वेशभूषा, केशभूषा, कसा दिसतोय ई. कडे विचलित होत. असो प्रत्येकाची आवड. म्हणून तर इतके प्रकार आहेत ना व्हिडीओ तय्यार करण्याचे. माझ्या दृष्टीने आपल्या खास दोस्तांना हे आवडेल ज्यांना बघण्याची शक्ती सर्वात जास्त बहाल झाली आहे, ऐकण्याची तेवढी नाही. बरोबर ना? "स्क्रीन कडे बघूनच समजले सारे, शब्दांच्या पलीकडले". प्रत्येक वेळी बोललंच पाहिजे असं नाही ना, आईचे मोठे झालेले डोळे पण पुरेसे आहेत / असतं.
टाक टाक - बेलीज आणि मी
बेलीज हा एक मुलींच्या बुटाचा प्रकार. मी इंजिनिअरिंग ची विद्यार्थी होते तेव्हा, शिकवायला लागले तेव्हा पासून विविध प्रकारच्या बेलीज च वापरल्या. मला तो टाक-टाक सुमधुर संगीतमय नाद ऐकत चालणं खूप म्हणजे खूप ऊर्जा देऊन जात असे त्या काळी. का? अजिबात माहित नाही. माझी चाल मला आवडायची. एक विशिष्ट पद्धतीने त्या बेलीज चा आवाज येत असे, आणि त्यात माझं चालणं अतिशय भरभर, त्यामुळे अजूनच मस्त. अर्थात कधीही तो आवाज फक्त ऐकत बसले नाही मी, बसणं शक्य पण नव्हतं. पण एक शान होती. एक स्टाईल किंवा वेगळेपण जाणवायचं. घालायला, वापरायला, दिसायला पण फार छान वस्तू ती. तुटायची भीती नाहीच चपले सारखी आणि क्लास वाटत कुठल्याही वेशभुषे सोबत. अशी ती बहुगुणी, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारी वस्तू माझी सखी होती अनेक वर्ष. आता तिची आजी माझ्या सोबत आहे. तेच सर्व गूण पण जरा निर्मळ, कोमल आणि मऊ अशी, कॉटन / कपड्याची बेलीज. माझंच मला बढती झाल्यासारखं वाटतंय.
आताशा आजूबाजूच्या नवतरुण मुलींनी टाक-टाक चालायला सुरवात केली कि माझे "ते" दिवस आठवतात आणि अत्यंत रम्य अश्या भूतकाळाची सफर सहज घडते.
छोटे आयुष्य
एका (कदाचित) अभ्यासु हस्तरेषा तज्ज्ञाने मला आपणहून माझं भविष्य सांगितलं. कदाचित तो फार पोचलेला होता ह्या क्षेत्रात कारण काही क्षणात त्याने खडान्खडा सगळं सांगितलं देखील. मी असं ऐकलं होत कि विचारल्याशिवाय बोलू नये आणि सगळं दिसलं तरी भान राखून बोलावं. असो.
तर माझ्या हातात म्हणे फार कष्ट लिहिले आहेत, फार ऍडजेस्ट करत च राहते म्हणे मी, प्रचंड पैसा आहे म्हणे (माझ्यापेक्षा त्याला माहिती हो), आणि प्रचंड पैसा असून देखील आयुष्य फारच छोटं आहे ई.
मी अगदी लहान असतांना माझे बाबा मोठ्या पदावर असल्यामुळे भरपूर मान / सन्मान मिळायचा त्यांना आणि गाड्या ड्राइवर चा ताफा घरासमोर उभा आमच्या नेहेमी. एकुलती लेक असल्यामुळे भरपूर लाड, प्रचंड खाण्याची मला आवड त्यामुळे भारतातीलच नव्हे तर कित्येक देशातले पदार्थ चाखायला मिळाले, भरपूर विविध देश दाखवले मला नवऱ्याने, दोन सोन्यासारखी लेकरं, PhD पर्यंतचा प्रवास, ह्या प्रवासाचे अनेक विदयार्थी साक्षीदार, भरपूर प्रेम करणारे काळजी करणारे मित्र-मैत्रिणीचा गोतावळा, सोज्वळ आणि जगावेगळे शेजारी, शैक्षणिक क्षेत्रात बऱ्याच ओळखी, भरपूर संशोधन पेपर्स, मराठीतल्या शेकडो छोट्या अनुकथा चं लिखाण, अर्धशतक पायावर उभं राहायला मिळणं, वैविध्य गाड्या चालवायला मिळणं, आणि हे सगळं मिळाल्याचं प्रचंड समाधान.
आता तुम्ही मला सांगा FOXBASE, PASCAL, FORTRAN ते Python ह्या प्रवासाला छोटा कसं काय म्हणता येईल हो? मला तर नेहेमीच आश्चर्य वाटत कि लायकीपेक्षा जास्त दिलयं "त्याने", भरभरून, अगदी सुरवातीपासून, का?
आता ह्यापुढे प्रत्येक दिवस मौलिक, चेरी ऑन केक, जास्तीचा, जो संपूर्ण आनंदाने उपभोगायचा. त्याची शक्ती आणि दिशा पण तोच देणार कि हो, मी कोण?
अपघातांची श्रुंखला
ती अगदी लहान असतांना अचानक राजकारण्यांमुळे / घडामोडींमुळे ब्राह्मणांच्या घरांना आग लावण्यात आली, त्यात एक घर तिचं होत. त्यानंतर छोट्या मुलाला वाचवण्यासाठी भुकंपामुळे तिच्या पाठीवर भिंत कोसळली. तिच्या नवऱ्याची बदलीची नोकरी. त्यामुळे सतत एका ठिकाणांहून दुसरीकडे जाण-येण. त्यावेळी फक्त सरकारी जीप असायच्या प्रवासाकरता. अगणित त्या जीप चे झालेले अपघात. चूक कोणाची, कशी ई. न पडता त्यातून बाहेर येणं ह्याला तिने जास्त महत्व दिल. सगळे जीव वाचले, ड्राईव्हर सहित हे महत्वाचं. हे झाले असंख्य शारीरिक आघात. मानसिक प्रहार पण तेवढेच होते, अगदी छोटी असल्यापासून आणि तेही स्वतःच्या अतिशिस्तीच्या आणि कडक स्वभावाच्या मोठ्या भावाकडून. त्यानंतर अनेक छोटो मोठे प्रसंग आले पण तिने सगळं निमूट पणे आणि आनंदाने मान्य केलं. कधीही भगवंतावरची तिची श्रद्धा ढळू दिली नाहीच. कोणालाही कधीही दोष दिला नाही. कोणावरही भार न होता, उलट भरपूर आठवणी, शिकवणी, वैचारिक संपत्ती देऊन ह्या जगाचा निरोप घेऊन गेली पण.
शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१
सामाजिक भान
आज मी माझ्या एका मैत्रिणीला आणि मित्राला ऑनलाईन शोधताना, मधेच एक काम आलं म्हणून एक व्हिडीओ दिसला / योगायोगाने दृष्टीपथात आला. अगदी छोटासा होता आणि अतिशय उत्कृष्ट, त्या पेक्षा उच्च कोटींचा, त्यामुळे मग मी बघितला. त्या व्हिडिओ त एक शाळकरी मुलगी दाखवली आहे तिच्या खोलीत बसलेली आहे संगणका समोर, शेजारी एक पलंग आहे, खाली कार्पेट आणि त्यावर एक गोंडस भूभू. तो कंटाळून बसलेला दाखवला आहे कार्पेट वर. पण थोड्याच वेळात एकदम खुश झाला आहे संगणकाच्या स्क्रीन वर मनीमाऊ बघून. वा वा. मग ती मनी लोळते, तर हे भाऊ पण अगदी तसेच करतात,सगळं म्हणजे सगळं. अहाहा. शपथ. आणि ह्या दोघांच्या विविध कृती ती शाळकरी मुलगी बघते आणि तिला फार समाधान मिळत. ह्या नवीन दिवसात भूभू आणि सगळेच घरी, काहीच व्यायाम नाही त्यामुळे त्या पिल्लू ने ते हेरलं, हा साधा अँप तयार केला आणि तो उपयुक्त ठरला पण. भन्नाट. हे सगळं काही क्षणात दाखवलं त्यांनी त्या व्हिडीओ मधे. एवढ्या लहान वयात इतकी समज, सहीच ना.
फारच सुक्ष्म निरीक्षण
आज श्रावण शुक्रवार. माझी आई सुद्धा आता आत्ता पर्यंत जिवती ची पूजा करून मला पण ओवाळत असे. तेच मी देखील पुढे चालू ठेवलं आहे. माझ्या दोघांना ओवाळणे. आज जरा मी कन्यकेला सगळी तय्यारी, पुजा, औक्षवणाची तय्यारी ई. करायला सांगितली. आणि तिने केली देखील. पुरण होणं राहील होत, बाकी सगळी तय्यारी झाली होती. मी पुरणाचे दिवे केले आणि तूप घालून वात वगैरे लावण्यासाठी जेव्हा तबक उचलले तेव्हा बघते तर काय त्या औक्षवणाच्या तबकाखाली अक्षता होत्या. माझ्या नजरेस पडल्या. बाप रे, टच किनी पाणी आलाच आपोआप माझ्या डोळ्यात. औक्षवण झाल्यावर तबक तसेच खाली जमिनीवर ठेवायचे नाही हे लेकीने किती शिताफीने हेरलं हे माझ्या लक्षात आलं आणि ते तिने हेरलच नाही तर अमलात आणलं देखील, अर्थात आधी, पण असो. वा वा, अप्रतिम. अशीच निरीक्षणाची शक्ती तिला सतत लाभो हि प्रार्थना.
माझ्या आईने कधीही मला सांगितले नाही एखाद्या पदार्थात काय काय घालायचं ते. ती म्हणायची स्वतः बघ मी करतांना, चव बघ आणि सांग, काही कमी वाटलं तर मी मग सांगते. तेच जेव्हा मी नोकरी करायला सुरवात केली तेव्हा आणि आता माझ्या विद्यार्थ्यांना पण हेच सांगते कि नोकरीच्या पण ठिकाणी स्वतःच निरीक्षण करत शिकत राहावं लागत सतत. नाविन्य पूर्ण विचार करणे, ते कृतीत आणणे ई. फार महत्वाचे, तारुन नेणारे.
बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१
सिर्फ संडे को खाना
एक छोटेखानी कुटुंब आहे, ज्यात नवरा, बायको(माझी मैत्रीण), छोटी मुलगी, सासू ई. दररोज नणंद, तिचा छोटा मुलगा आणि नवरा असतात माझ्या मैत्रिणीकडे, ऑफिस ला जाता येता त्यांच्या मुलाला ने-आण करण्यासाठी. माझी मैत्रीण, नणंद आणि तिचा नवरा हे नोकरी करणारे आणि दररोज घराबाहेर पडणारे. बाकी मुलं, सासु आणि मैत्रिणीचा नवरा घरी. माझी मैत्रीण दररोज सकाळी घरच सगळं करून येते, सकाळचा नास्ता, स्वयंपाक आणि संध्याकाळचं / दुपारचं खाणं पण. त्यात प्रत्येकाची आवड वेगळी. मुलं लहान म्हणून त्यांच्या पण आवडी-निवडी. असो.
दर रविवारी एक सुंदर वाक्य तिला ऐकायला मिळत. कारण रविवारी ती सगळे पदार्थ ज्याच्या त्या वेळी करते. त्यामुळे सगळ्यांना गरम खायला मिळत. "हा एक रविवारच आहे ज्या दिवशी काही झाल्यासारखं वाटत हो, गरम मिळत..." इति सासू. "बाकी दिवशी तर काही जात च नाही घश्याखाली". देवा. मी हे ऐकून निःशब्द झाले, पूर्णपणे. ह्याला काय म्हणायचं. आणि माझी मैत्रीण आहे म्ह्णून नाही पण खूप छान आणि विविध पदार्थ करतेच ती, सर्वांच्या आवडी-निवडी सांभाळते. संध्याकाळी मावशी सगळी चिराचिरी करून ठेवतात त्यामुळे सकाळी सोय होते हिची. पण हे काय बोलणं झालं. छे छे. बरं (उलट) उत्तर द्यायला शिकवलंच नाही, त्यामुळे अडतंय घोडं आणि भावतंय.
मला तर असे किस्से ऐकले कि एक विचार मनात निश्चित येतोच, "मोठे लोक म्हणजे काय मग नक्की?", असं बोलणारे?
असो, नोकरी असल्यामुळे हिला फक्त रविवारीच असलं काही बाही ऐकावं लागतंय, नाही तर रोजचंच झालं असतं.
सर्व्हिसिंग
ह्या शब्दाचा साधा सोपा अर्थ मला माहित होता तो म्हणजे दुचाकी / चारचाकी ई. ची वेळोवेळी केलेली साफसफाई, चाचणी वगैरे म्हणजे सर्व्हिसिंग. अशी सर्व्हिसिंग करत राहणं फार महत्वाचं त्या गाडीच्या चांगल्या वर्तवणुकीसाठी, ती नीट सेवा द्यावी, मधेच बंद पडू नये ह्या साठी, भरपूर वेगवेगळे पार्टस एकत्रित सुरळीत चालू राहावे म्हणून. असो. त्यानंतर जेव्हा हे सोशल मिडिया नावाचं भूत आलं तेव्हा अजून एक अर्थ समजला ह्या शब्दाचा आणि तो म्हणजे म्हणे दसऱ्याच्या दिवशी आपल्या मनाची सर्व्हिसिंग करा, किंतुपरंतु सोडा, लागलेली / लावून घेतलेली जाळं-जळमटं काढून टाका प्रयत्नपूर्वक... आणि मग काय प्रत्येक सणालाच थोडेफार फरकाने हेच / अशाच अर्थाचे संदेश येत राहिले / येतात.
मी गेली काही वर्षे बघितलं आहे कि सायकलींची दुकानं ठिकठिकाणी जास्त प्रमाणात सुरु झाली आहेत आणि त्याच्या किमती ऐकून माझी दाही बोट तोंडात गेली आपोआप. बाप रे. आणि ते प्रकरण तेथेच थांबले नाही तर म्हणे ह्या अतिमहागड्या सायकलींना सर्व्हिसिंग करायची. प्रत्येक सर्व्हिसिंग चे हजारो रुपये. मग मला असा एक प्रश्न सहज मनात आला, कि जर ती सायकल शोभेची वस्तू म्हणून विकत घेतली आहे आणि शान मारण्याकरता फक्त एखाद वेळी तिच्या चाकांनी धूळ चाखली आहे तरीदेखील महिना संपला म्हणून सर्व्हिसिंग करायची. हे कसलं वेड? आणि हि कसली पद्धत? मला वाचूनच संताप झाला, तर पुढचं न बोललेलंच बरं. काही काय, बऱ्याचश्या गोष्टी माझ्या आकलना पलिकडल्या आहेत.
माझ्या वडिलांची सायकल हि माझी तिच्याशी झालेली पहिली ओळख. तिची चेन पडली तर लावायची, ऑइल घालायचं घरीच आधी खाली जुने वर्तमानपत्र ठेवून आणि वेळोवेळी हवा भरायची ती पण घरीच. बास. ह्याच्या पुढे सायकल ला कुठलीही कधीही गरज नव्हती च.
फार मोठ्ठा पल्ला गाठला ह्या पठ्ठीने फारच कमी कालावधीत. वडिलोपार्जित च असायची घरटी एक अशी. आता म्हणजे विकत घ्यायची, साधी चेन ते थेट असंख्य गियर काय आणि किमती तर अबब.
मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१
श्रद्धेने केलेली पुजा
जुन्या रुढी, परंपरा, चालिरिती आणि त्या अनुषंघाने तय्यार झालेले सगळे संस्कार, धार्मिक विधी ई. चा पूर्ण मान ठेऊन मी माझी मतं इथे मांडते आहे. श्रद्धेने केलेली पुजा आणि त्यानंतरची उदकशांत ह्या त आई, आईच्या सासुबाई, त्यांच्या सासुबाई आणि अजुन एक आधीची पिढी इतकंच सतत समाविष्ट केलेलं आढळलं. त्या दरम्यान असं हि सांगण्यात आलं कि सासरी आल्यावर जसं सासुबाईंनी, आजेसासुबाईंनी सांभाळलं, रुढी शिकवल्या तश्याच आता ह्या नवीन घरात, नवीन वातावरणात पण तिला दिशा दाखवा, समजावुन घ्या ई. हे सगळं मान्य आहेच. पण मग आजी, तिची आई ई. पण तर अगदी जन्मल्यापासुन सगळं शिकवतातच नं, घर आणि आई हि पहिली शाळा असते. आणि मग शहाणी / मोठी / कळती झाली कि सासरी जाणं होत. मग ह्या महत्वाच्या संस्कारात माहेर का विसरलं गेलं आहे पुर्णपणे? माझी एक शंका आणि प्रश्न पण.
मोठी तिची सावली... मोलकरीण बाई
ह्या नावाची एक नवी मलिका सुरु होत आहे उद्या पासून. त्यावर एक छोटासा लेख आला आहे वर्तमानपत्रात आज. ह्या मालिकेच्या जाहिराती बघितल्या बऱ्याच. आणि असा जाणवलं कि हि मालिका खूप विचारांती घडवली आहे. अगदी रोजचा विषय हाताळला आहे ह्यात. थोडक्यात म्हणजे आज च्या ज्या नोकरी किंवा रोजगारी साठी बाहेर पडणाऱ्या मुली / बायका आहेत त्यांच्या साठी घरी काम करणाऱ्या मोलकरणी ह्या फार महत्वाची भूमिका निभावतात, अगदी सावली सारखी. मोठ्या सावली सारखी म्हटल्या सारखं. दोघींचाही फायदा होतो मालकिणीच्या आणि मोलकरणीचा देखील. घरकाम हे हि प्रचंड असतं, न संपणार असंच. त्यात जर भन्नाट मस्त बाई जर मिळाली तर रोजच जगणं सुखकर होत अजून. दोघीही त्यांच्या त्यांच्या मानानी कचेरीतच जातात, कामं वेगवेगळी असतात, स्वरूप भिन्न असत पण एकमेकींची साथ मिळाली तर सोन्याहून पिवळे, नाही का? बघायची आहे हि मालिका मला. सगळे कलाकार हि खूप निवडून घेतले आहे, कसलेले आहेत, त्यामुळे काही छान उपयुक्त पहिल्याच समाधान मिळेल असं वाटतंय.
Shared on FB on Mar 24th 2019.
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...