शनिवार, ३१ जुलै, २०२१

Treasure's computations

Webmd.com says 20,000 breaths individual take per day, that means 400 million by the time he /she reach  50

Sharecare.com says 11000 liters of air per day consumed by that person

Healthline.com says 4000 to 8000 steps per day is normal taken by self

Bigthink.com 6200 thoughts and 14,400 – 19,200 times blinks a day by that sole

LinkedIn's one of the informative blogs said, on average 7000 words per day.

Why these calculations suddenly today? 

Precisely day before yesterday, Respected Babasaheb Purandare entered his 100th year. Its more than remarkable, I have no authority to speak about it at all. On that day I came across his interview taken by very famous Shri Sudhir Gadgil. Shri Sudhir Gadgil is extremely well known for conducting interviews and this one was not any different than his previous marvelous work. One of the questions asked was how it feels to enter 100th year? and that question caught my attention.

Of course entering every next year, each milestone including sweet 16, 18, 21, 25, 40 etc are important but entering golden year is having its unique place in everyone's heart. Even though its feasible only because of the blessings of that "Supreme Power". It has a huge meaning all together for that individual and others too.

Based on the computations given above, just imagine the number of natural achievements per person till 50. Tremendous amounts of blessings, isn't it?.  Yes it is, and hence lets bow down in front of that "Supreme Power" always for receiving all these gifts, without asking / demanding / expecting / dreaming.

Now at 50, do what that "Supreme power" tells you do. Better listen to you, your heart, mind and go easy on varied things to be even more satisfied, happy, contended and full of gratitude. Enjoy, and just go with the flow, past is gone, future / worst is yet to come,.....

#supreme-power #golden-year #50 #blessings #go-slow #go-with-the-flow #milestones #breath #air #walk #step #blink #thoughts #per-day #per-hour

गुरुवार, २९ जुलै, २०२१

मुलांची अनोखी शाळा

माझी आई नेहेमी म्हणायची कि घर म्हणजेच पहिली शाळा. अर्थात बऱ्याच दिग्गजांनी पण हे म्हटलं आहेच आणि ते खरं पण आहे. मी स्वतः आई झाल्यावर जास्त प्रकर्षाने जाणवलं मला.

१० वी आणि १२ वी हे शिक्षणातले फारच महत्वाचे टप्पे. मला नाही पण समाजाला आणि इतर जणांना फक्त गुण महत्वाचे १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांचे. आणि नेमकं १० वी तच माझ्या पायांच दुखणं उद्भवलं. माझ्या तर पायाखालची जमीनच हादरली. म्हटलं आता कसं होणार?. पण हळू हळू माझ्या पायांची प्रगती होत गेली, मला स्वतःला ऑफिस च्या कामात, संशोधनात गुंतवून ठेवता आलं, लिखाण सुरूच होत अगदी छोट्या प्रमाणात आणि त्या सगळ्यांचा परिणाम असेल कदाचित, पण मुलांनी फार उत्तम कामगिरी केली १० वीत आणि भरपूर टक्के गुण मिळवले. त्यांच्या अभ्यासात किंवा प्रगतीत पायाचे / दुखण्याचे अडथळे आले नाहीत. 

पण आज का कुणास ठाऊक मला प्रकर्षाने हे जाणवलं कि अडथळे हा फारच मोठा शब्द झाला, उलट माझ्या मुलांना "वेळेचे व्यवस्थापन" करण्याचे प्रत्यक्ष धडे मिळाले, घरीच, बाहेर नाही, किंवा कुठलेहि ट्रैनिंग न घेता. 

आणि पायांच्या कुरबुरी अजूनही थोड्या प्रमाणात चालू असल्यामुळे ट्रेनिंग पण वेगवेगळ्या पद्धतीने चालूच राहिलं. असो. 

म्हणजे अडचणी आल्या तरी कसं वागायचं, कसं बघायचं त्याच्या कडे, विविध पद्धतीने हळू हळू मार्गक्रमण कसं करायचं ई. किंवा ह्या २-२. ५ वर्षात मी ड्राइवर / driver ठेवला, बस वापरली, कधी लिफ्ट तर कधी ऑटो, अनेक प्याथी झाल्या, काही उपयोगी ठरल्या तर काही डोकेदुखी, योग केला, चालण्याचा व्यायाम, आहार ई. हे सगळं फार बारकाईने टिपत असतात मुलं प्रत्येक वेळी. मग हे एक प्रकारचं "प्रोजेक्ट बेस्ड लर्निग" च नाही का?

त्यामुळे  मी वर म्हटल्याप्रमाणे घर हि काही ना काही तरी आवश्यक धडे शिकवणारी अशी शाळा आहे, जी सतत सुरु असते. अर्थात माझ्या उदाहरणावरून फक्त मी हे म्हणू शकते. कारण मी पण अजून शिकतेचं आहे.

जे घडत ते चांगल्यासाठीच. 

Listen to this story on You Tube, kindly click this link: https://youtu.be/7mV0OlO-40g

#school #education #continuous-education #time-management #autorikshaw #training #lessons #home-school #mom #dad #family #driver #ola #uber #my-legs-health-issues #10th #12th #crucial-years #kids

खुर्च्या, फळा आणि मिटिंग

आज मी पुन्हा एकदा वेब एक्स नावाच्या प्लॅटफॉर्म वर जात होते एक मिटिंग अटेंड करायची होती. पण कदाचित इंटरनेट मुळे असेल थोडा वेळ लागत होता. त्यामुळे माझ्या चार डोळ्यांनी काही गोष्टी टिपल्या पटापट आणि माझं मलाच भलतंच आश्चर्य वाटलं. जेव्हा कुठलीही मिटिंग / सभा  छोटी असो वा मोठी असते तेव्हा काय काय लागत आपल्याला, जितकी मंडळी अपेक्षित आहेत तितक्या छान मांडून ठेवलेल्या खुर्च्या, पुसलेला फळा, पाणी, आणि बरंच काही. हे कुठली सभा आहे ह्यावर अवलंबून आहे. बरोबर कि नाही?

ह्या वेब एक्स वर म्हणजे ऑनलाईन मिटिंग / सभा मला जॉईन करायची होती आणि जेव्हा मी जॉईन बटण दाबल्यावर वाट बघत होते तेव्हा एका पाठोपाठ एक सुंदर, योग्य, साजेश्या शब्दात काही मेसेजेस येत होते, "आम्ही खुर्च्या आणतो आहे", "फळा तय्यार करतो आहे", "मिटिंग ची तय्यारी सुरु आहे" ई. बाप रे, काय भन्नाट कल्पना आहे. धन्य आहे ज्यांना हि कल्पना सुचली. फारच अप्रतिम. मी पुन्हा एकदा निशब्द झाले अक्षरश:. अगदी मी ह्या आधी जितक्या मिटिंग ची तय्यारी केली होती नॉर्मल दिवसात, माझ्या कॉलेज च्या दिवसात, माझ्या मुलांच्या शाळेत (APJ येणार होते तेव्हा खूप मदत करता आली मला शाळेत खुर्च्या लावायला) , ई. सगळं म्हणजे सगळं डोळ्यासमोर उभं ठाकलं. मी ते दिवस जगले पुन्हा एकदा आज, खूप खूप छान वेळ गेला, खूप दिवस जुन्या आठवणीत गेले, मी सगळ्या ठिकाणांना जसे कि जाऊन आले.    

थोडासा कनेक्ट व्हायला जरी वेळ लागला तरी पण कोणीही नाराज होणार नाही असे अप्रतिम विचारपूर्वक मेसेजेस वाचले कि, उलट फारच ऊर्जेने सभेत भाग घेणार. ह्याला काय म्हणायचं मंडळी, मानसशास्त्र?. एखादा माणसं खूप जवळून ओळखणारा किंवा मानसशास्त्र जाणणारा व्यक्ती असेल ज्याने हे लिहिलं असेल आणि ते ताबडतोब वेब एक्स ने ते मान्य केलं आणि दाखवलं पण. जबरदस्त अनुभव होता म्हटलं चला लिहावं. 

#Webex #online-platform #meeting #meeting-preparation #chairs #blackboard #whiteboard #arrangements #readiness-of-meeting #thoughtful-messages #impressive #innovative #new #unique #energetic #psychology #human-nature  

इस्त्री आणि सुरकुत्या

माझ्या मते बहुतांशी सगळ्यांनाच कॉटन चे कपडे परिधान करायला फारच आवडतात, भावतात. ते सगळ्या ऋतूत एकतर घालता येतात आणि फारच सोईचे असतात, सांभाळायला पण फारच सोपे आणि मायाळू असे. मी काही वेगळी नाहीच, मला तर भारी प्रेम आहे ह्या कॉटन / सुती कपड्यांवर.

मधे काही जाहिराती बघण्यात आल्या आणि त्यात असं नमूद केलं होत कि त्या एका विशिष्ट कपड्यांना अजिबातच सुरकुत्या पडत नाहीत. मी ते कपडे वापरले नाहीत त्यामुळे मी त्यावर अधिकाराने भाष्य करू शकत नाही. असो.

पण सुती कपडे म्हटले कि सुरकुत्या आल्याचं. ते हाताने धुवा नाहीतर मशीन ने, कितीही काळजीपूर्वक वाळत घाला पण सुरकुत्या पडणारच. मग काय हरकत आहे, इस्त्री आहे कि. छान प्रेमाने इस्त्री केली कि झालं, सुरकुत्या गायब. आणि आपण तय्यार ते कडक इस्त्री केलेले कपडे घालून मिरवायला, किंवा काम करायला. प्रत्येक वेळी ते कपडे घातले कि बहुतेक काही वेळातच किंवा संध्याकाळ पर्यंत त्या सुरकुत्या, किंवा नवीन पद्धतीच्या सुरकुत्या हजर. आणि धुतल्यावर तर येणारच. पण असो, ते सुती कपड्यातले समाधान, सोय ई. जास्त महत्वाची, नाही का? आणि त्यावर तरणोपाय आहे ना, पुन्हा इस्त्री, बास, सोप्प आहे.

आपल्या दररोज च्या रोजनिशीत टप्प्या टप्प्यावर पण असंच असत काहीस नाही का?, अनेक प्रकारच्या सुरकुत्या पडतात कपड्याला, कधी सहज, तर कधी नीट बसलो नाही म्हणून, तर काही इस्त्री नीट तापली नाही, वळवळत छोटं मुलं मांडीवर घेतलं म्हणून  किंवा ते सुती कापड जुनं झालं म्हणून... त्याचा अर्थ आपण थांबत नाही, पाणी शिंपडून इस्त्री करतो, इस्त्रीचे सेटीन्ग्स बदलतो, इस्त्री जास्त तापवतो, किंवा थोड्यावेळ जास्त प्रेमाने इस्त्री करतो, काहीच नाही जमलं तर शेवटी धोब्याला देतो, त्याची मदत घेतो, त्याच्या शक्तिशाली इस्त्रीने मग छान सगळ्या सुरकुत्या निघून जातात.

"जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम..."

आपण ज्या विविध घडामोडीना सामोरे जातो सदोदित त्या पण एक प्रकारच्या सुरकुत्याचं हो, तेव्हा विविध उपाय शोधून काढायचे, (not literally) विविध इस्त्रा शोधून जपून ठेवायच्या, जवळपास चे पट्टाकिनी उपयोगी पडणारे धोबी बघून ठेवायचे आणि गाडी सुरु ठेवायची. त्या सुती कपड्यांना, सुरकुत्यांना, स्वतःला दोष द्यायचा नाहीच. हरकत नाही सुरकुत्या राहिल्या तर. माझे बाबा नेहेमी म्हणायचे "आपण करू ती फॅशन". त्या सुरकुत्या छान दिसत आहेत असे स्वतःला सांगितले / बजावले कि झालं. कोणास ठाऊक अनेक जण तुमचं बघून सुरकुत्या सहित कपडे परिधान करायला शिकतील, किंवा ते पण वाटच बघत असतील कि कोणी तरी अश्या गोष्टी सुरु कराव्यात म्हणून. फारच ओंगळ भोंगळ अवतार दिसणार नाही ह्याची काळजी आपण घेणारच आणि घेतातच सगळे कळत न-कळत. त्यामुळे बिनधास्त राहा.

सुरकुत्यांचा विजय असो.

चला तर मग, जास्तीत जास्त आपल्या देशाला, पर्यावरणाला सुताचे कपडे वापरून मदत करू या, हातभार लावू या. अजून काही जास्त जाणून घ्यायचं असेल तर निश्चितच वाचा www.ecotattva.com 

#cotton #cotton-cloths #press #iron #laundry #wrinkles-on-cloths #wrinkled-cloths #life #difficulties #friends #philosopher #guide #challenges-of-life

बुधवार, २८ जुलै, २०२१

नायगारा धबधबा

मला नायगारा सारख्या अभूतपूर्व विशालकाय धबधब्याचं ४-५ वेळा दर्शन घडलं, प्रत्यक्ष. अहाहा, काय सुंदर, जगावेगळा देखावा होता तो. माझ्या कडे शब्दच नाहीत वर्णन करण्याकरता.

तो धबधबा जवळून बघण्यासाठी किंवा त्याच्या खालच्या भागात चक्कर मारण्यासाठी सोय आहे आणि बहुतांशी एक प्रकारचा प्लास्टिक सारख्या पातळ वस्तूपासून तय्यार केलेला एक झगा देतात परिधान करायला. आणि तो घालायला पण फारच मज्जा येते, जोकर दिसतो सगळे. एक छोटीशी टोपी आणि सरळ डोक्यातून घालण्याचा सोप्पा पोशाख. धबधबा चा मनसोक्त आनंद उपभोगला कि तो झगा तिथे शिस्तीत ठेवलेल्या डब्ब्यात टाकून यायचा असतो. म्हणजे तो पुन्हा प्रक्रिया करून रिसायकल करता येतो.

मी २००५ पासून पुण्यात आज पर्यंत बघते आहे, कि असंख्य जण दुचाकीवर भलताच रेनकोट घालून चालवतात गाडी.  पुण्याचा सध्याचा पाऊस मंडळी, आणि हा अनोखा रेनकोट, त्यात दुचाकी, अहाहा, काय मस्त कॉम्बिनेशन आहे, देवा. नीट, माझ्या चार डोळ्यांनी पाहिल्यावर समजले कि तो रेनकोट नाही आहे, तो त्या नायगारा धबधब्यापाशी जाण्यास जो अतिशय पातळ, एकदा वापरण्या जोगा दिलेला पोशाख / झगा आहे. मी निशब्द झाले, काय आहेत ना हि सगळी मंडळी. खरंच, विचाराची कमाल आहे, पैसे वाचवणं, वस्तू पुन्हा पुन्हा वापरणं कोणी ह्यांच्या कडून शिकावं. 

मला कसं समजलं कि तो तोच झगा आहे? त्या झग्या मागे त्या प्रवासी कंपनीचा लोगो एक विशिष्ठ पद्धतीने छापलेला असतो.  दुरून बघितला कि सहज ओळखू येतोच.

मोबाईल रामायण

आमच्या गल्लीत एक अतिशयच देखणा भूभू / आकू आहे, माझा चार पायाचा दोस्त. तो इतका प्रचंड उंच आणि सडपातळ आहे कि ज्याचं नाव ते. माझ्या गेट च्या शेजारी एक भिंत आहे, त्यावर एक शाळकरी मुळांचे टोळकं बसलं आहे ह्या क्षणी. आमच्या समोर एक छोटी वस्ती आहे तिथली हि मुलं / विद्यार्थी. त्यांच्या हातात फारच नवीन मॉडेल्स आहेत मोबाईल फोन चे. ते त्या भिंतीवर बसून त्या देखण्या आकू चे फोटो काढतांना माझं लक्ष वेधलं गेलं. आणि मग जरा जास्तच लक्ष देऊन बघितलं तर काय समजलं हे सांगते. मी हातातलं सगळं सोडून त्याचं निरीक्षण करते आहे.

१. काल परवा ह्याच मुलांना मी सकाळी विचारलं "शाळा नाही का?" उत्तर: "दुपारी एक वाजता सुरु होते मोबाईल वर".
२. हि मुलं कुत्राचे फोटो काढत आहेत
३. लेटेस्ट गाणे ऐकणं सुरु आहे, भल्या मोठ्या आवाजात
४. शेजारी शेजारी बसून विडिओ चॅट सुरु आहे
५. एक पण गाणं पूर्ण ऐकत नाही आहेत, सतत इकडून तिकडे गाणे बदलत आहेत
६. शिवाय गप्पा सुरु आहेत त्या वेगळ्याच

आणि हे सगळं जीवतोडून मोठ्या आवाजात मराठीत शिक्षक शिकवत असतांना. काय म्हणायचं? 

आई वडिलांनी नाही, फक्त आईनी अपार कष्ट करून महागडा न-परवडत असतांना फोन घेऊन दिला तो हे सगळं करण्यासाठी?

मला माझीच लाज वाटते आहे, मला नाही जमत इतकं अगणित कामे करणं / multitasking करणं, PhD कॉम्पुटर इंजिनीरिंग मधे असतांना. एकाच वेळी एकाच फोन वर शिक्षक शिकवत असतांना गाणं ऐकणं काय, गाणे बदलणे काय, फोटो काढणे, विडिओ चॅट आणि कोणास ठाऊक काय काय करत होते... मग हे सगळं करण्यासाठी जर डोकं आहे तर मग आई एवढे कष्ट करते, आपण व्यवस्थित अभ्यास करावा, उत्तीर्ण व्हावं एवढं साधं कसं कळत नाही ह्या मुलांना? मला तर हा संशोधनाचाच विषय दिसतोय, कुठून आणतात असला मोबाईल पॅक, कुठली बॅटरी, इतकी तास चालणारी, आणि ह्या सगळ्यासाठी पैसे? डोळ्यांचं काय? बाप रे बाप, मुंग्या आल्यात, डोकं जड झालाय माझं अगदी, हे सगळं बघून.  

मी काय करू म्हणजे हि तरुण मुलं मार्गी लागतील?

उगाच सगळे "देशाची प्रगती" होत नाही, ई. विषयावर बोलतो, शिक्षकाला वठणीवर धरतात जर निकाल चांगला लागला नाही तर,  हि मुलं
काय करत आहेत ते बघा म्हणावं पहिल्यांदा. आई बिचारी दिवसभर घराबाहेर कामाला जात असेल आणि ती तिच्या भलत्याच विश्वात, संपूर्ण विश्वास कि माझा मुलगा अभ्यास करतो आहे मोबाईल वर. 

अशक्य आणि अवघड आहे. मी बोलायला गेले तर काही पळून गेले आणि बाकी माझ्यावर गुरगुरले.

त्या देखण्या भूभू मुळे आणि
फोटो काढतांना  तो जसा उभा होता ते बघून हे सगळं सुरु झालं. देवा. 

मंगळवार, २७ जुलै, २०२१

"मी कात टाकली"

गेले अनेक वर्ष मला "जगी, स्थळी, पाषाणी" = ठिकठिकाणी मुली security guards / वॉचमेन दिसतात, ते इस्पितळ असो, विद्यालय असो नाहीतर अजून बाकी ठिकाण, जेथे जेथे वॉचमेन ची गरज आहे तेथे तेथे ह्या आहेतच हजर कामाला. आवाहनात्मक आहे मुलगी / स्त्री असून वॉचमेन चं काम करणं, सोप्प नाहीच. अर्थात प्रत्येकाला, मुलगा / मुलगी कोणालाही कुठलंच काम फार सोप्प नसतंच. पण वॉचमेन च्या क्षेत्रात पुरुषांची आधी मक्तेदारी होती, आता चित्र बदललं आहे, कारण तिने "कात टाकली आहे". 

वॉचमेन म्हटलं कि पोशाख आला आणि तसं बघितलं गेलं तर अगदी साध्या घरातल्या मुलीच / स्त्रिया दिसतात वॉचमेन ची नोकरी करतांना. त्यांच्या कडे २०२१ साली देखील साडी, बांगड्या आणि इतर गोष्टी परिधान करणं आवश्यक आहे, आणि त्यात लग्न बंधनात पण लवकर अडकतात ह्या मुली / किंबहुना खूप जणी अडकवल्या जातात. मग लग्न झालेली मुलगी शर्ट पॅन्ट घालून नोकरी वर जाण येणं म्हणजे मानसिक स्थरावर पण लढाई आलीच. 

जेव्हा जेव्हा मी ऑफिसाला येते तेव्हा तेव्हा असंख्य  मुली वॉचमेन चा पोशाख परिधान करून बसची किंवा वाहनांची वाट बघत रस्त्यावर उभ्या दिसतात आणि दर वेळी त्यांना मनःपूर्वक मनातल्या मनात धन्यवाद देते आणि त्यांच कौतुक करते. लिहावं असं वाटायचं, आणि आज त्याचा मुहूर्त लागलाच. 

माझ्या कचेरीत जे वॉचमेन आहेत त्यांचं मी नेहेमी निरीक्षण करते तेव्हा असं दिसत कि ते नेहेमीचे कपडे घालून ऑफिस ला येतात आणि इथे येऊन गणवेश घालतात / कपडे बदलतात. पण असं सहजी मुलींना जमणं थोडसं अवघड आहे. अर्थात करतात गरज असेल तेव्हा पण प्रत्येक वेळी नाही जमत. 

माझ्या साठी ह्या मुलींचा साडी ते शर्ट-पॅन्ट-बूट हा प्रवास कात टाकण्यापलीकडचा आहे. आधी फक्त साडी च्या ऐवजी आवश्यक पोशाख एवढाच बदल केलेला दिसत होता ह्या मुलींनी, पण आता नाही हो. आता बऱ्याच जणीनी पोशाखाला साजेस तय्यार होणं पसंत केलं आहे. 

ह्या सगळ्या आघाड्यांवर लढाई असते आणि ती त्या हसत मुखाने निभावतांना दिसतात देखील. सर्व वॉचवुमन / सिक्युरिटी-गर्ल्स ना माझा नमस्कार. 

#security-guards #watchmen #uniform #pant-shirt-shoes #transformation #saree-to-shirt #support-for-family #wonderful-change #challenging #hospital-guards #education-institute-guards

Earned Leave ( EL) - कमावलेली रजा

शिक्षण क्षेत्रात नवीन विद्यालयात नोकरी सुरु केली कि जवळपास एक वर्ष फक्त "प्रासंगिक सुट्टी" मिळते आणि वर्षभरानंतर मग जमा होतात सुट्ट्या आणि EL घेता येते. बघा म्हणजे वर्षभर काम केलं कि मग EL नावाची रजा मंजूर होते, तुमच्या नावावर जमा होते. अर्थात ती जमा झाली म्हणजे कधीही घेता येते असं नाही हो, त्याला पण वरिष्ठांची परवानगी लागते. वर्षातून दोनदा EL चा लाभ घेता येतो. अर्थातच माझ्या सारखी आई ह्याची आतुरतेने वाट बघत असते म्हणजे मग घरी पिल्लांबरोबर जास्त भन्नाट वेळ घालवता येतो. असो.

आज हे EL पुराण का? सांगते सांगते. 

सध्या सेमिस्टर ब्रेक आहे, EL चा काळ आहे, सगळेच EL घेतात बहुतेक ह्या वेळी.

आमच्या कडे एक फारच महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. तिच्या बद्दल मी ह्या आधी पण लिहिलं आहे. ती इतकी गोड आहे कि दररोज (अर्थात रविवार सोडून) सर्वांना दिवसातून दोनदा अभिवादन करते, स्वागत करते, न थकता, "सुप्रभात / शुभ संध्याकाळ / धन्यवाद" असं काहीस म्हणून. त्यामुळे सर्वांचा दिवस फारच सुंदर सुरु होतो आणि ऑफिस मधून घरी जाते वेळी पण अप्रतिम ऊर्जा देऊन जातो. आज सकाळी ऑफिस मधे आले तर समजलं कि "ती" EL वर आहे म्हणे. दमली असेल हो बिच्चारी. आणि तिला पण काही शांतता नको का?, येत जाता फक्त तिनेच अभिवादन करायचं म्हणजे काय. असो. मला तिची उणीव जाणवली आज आल्या आल्या पण काय करणार.  सर्वार्थाने विचार केल्यावर म्हटलं असू दे, आराम करू दे तिला. लवकरच भेट होईल अशी आशा, कारण मी च सध्या तीन दिवसांनी ऑफिस ला आले आहे, आमच्या वेळापत्रकाप्रमाणे. त्यामुळे हिची EL किती दिवसाची आहे, कधी सुरु झाली, ह्याची मला कल्पना नाही.

कळलं असेलच ना मंडळी मी कोणाबद्दल बोलते आहे ते, बरोबर, अहो माझ्या ऑफिस मधली बायोमेट्रिक मशीन हो. मला भलतीच आवडते ती, त्यामुळे आज मी हिरमुसले, ती बंद आहे हे बघून. असो. करतील सुरु तज्ञ् मंडळी लवकरच.

तर अशी हि अनोख्या EL ची कहाणी सुफल संपूर्ण. 

#EL #earned-leave #biometric-machine #greet #good-start #CL #casual-leave #anukatha #good-morning #thank-you

Recent diet experience

Not for any cosmetic reasons but for strengthening or for better functioning of my leg's nerves it is recommended to reduce my weight. I started immediately with the help of one of my best friends, neighbors who is a very famous and successful dietician too.  

Its going on from past 15 days and as mentioned earlier I am really having fun as its a lot of variety of food to enjoy, of course with a twist. But in spite of following suggested details there is absolutely no difference in my weight. Its the same. 

When checked the reasons myself, on occasion of my first PhD student's celebrations recently, I thoroughly enjoyed 4-5 sweets, indulged on home made banana cake too during the diet period and nothing else.

I was not satisfied with my performance, and when I was talking about it at home, my beloved daughter said immediately "at least the weight is constant, right?, its not increased, so chill mamma, it will reduce soon". That was a good way to look at it, loved it. 

I frankly informed this to my dietician and she made thing even more strict now for me as I need to stand on my legs firmly, quickly and also, she would love to see me stand tall on my feet energetically. Lets hope for the best. 

#diet #legs-strength #weight-loss #cheating #no-change #constant-weight #dietician #sweets #build-leg-strength 


सोमवार, २६ जुलै, २०२१

लिखाण, मी आणि प्रश्नोत्तर

हैद्राबाद मधल्या महाराष्ट्रीयन लोकांचा एक फेसबुक वर समुदाय आहे, अनेक वर्षांपासून. आणि मी अगदी सुरवाती पासूनच त्या वर आहे, जोडली गेली आहे. अर्थात मी फक्त वाचक आहे, काय काय घडामोडी होतात ते टिपत राहते. पण एवढ्यातच माझ्या मनाला एक छोटासा विचार शिवून गेला आणि मी ताबडतोब त्या समुदायाच्या प्रशासकाला / प्रमुखाला रितसर विचारले. माझ्या हातून जे लिखाण होत ते ह्या ग्रुप वर प्रसिद्ध केलं, ह्या ग्रुप च्या मेम्बर्स समोर मांडलं तर चालेल का?, आणि ताबडतोब हिरवा कंदील मिळाला मला. अर्थातच मी आधी काही लेखाचे / कथांचे नमुने पाठवले आणि मग परवानगी मागितली. पण तरीही मला अजून एक प्रश्न पडलाच आणि तो म्हणजे ह्या समुदायाचे नियम. "मी किती लेख ह्या ग्रुप वर पोस्ट करू शकते?", उत्तर:"महिन्यातून दोन". उत्तम झालं सगळं आधीच विचारलं. मग मला यक्ष प्रश्न पडला, आता कसं करायचं, कारण माझे तर भरपूर लेख आहेत, अनुकथा आहेत, इतक्या सगळ्या कश्या सादर करायच्या?

हा विचार करून मी कधी त्या झोपेच्या स्वाधीन झाले माझं मलाच समजलं नाही. आणि मध्यरात्री कधी तरी कोणी तरी माझ्या समोर अक्षरश: अप्रतिम सुंदर सोप्पा उपाय मांडला. महिन्यातून दोनदा परवानगी आहे ना अनुकथा कथन करायची, मग पुढील महिन्यापासून १-१५ तारखेपर्यंत जे लेख / कथा सुचतील / लिहिल्या जातील त्या एक पोस्ट म्हणून प्रस्तुत करायच्या आणि १६-३०/३१ पर्यंतच्या दुसरी पोस्ट म्हणून, झालं, किती सहज तो उपाय मला दिसला.

हे साधे शब्द त्याचेच, लिहिणारा तोच, शब्दांची मांडणी करणारा तोच, विषय सुचविणारा तोच, यौग्य वेळ आल्यावर मगच अश्या समुदायावर जाण्यास सांगणारा तोच, आणि आता मार्ग / उपाय सुचवणारा देखील तोच. अशी ज्याची कृपा मग कशाला प्रश्न चिन्ह आणि विवंचना. दिसतो मार्ग नेहेमीच. "श्रद्धा आणि सबुरी", एवढी ठेवली कि झालं. बास. "त्याची" कृपा असणं म्हणजे दुसरं तिसरं काय हो? 


कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा ।
बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।
करोमि यद्यत्सकलं परस्मै ।
नारायणयेति समर्पयामि ॥


कोणाचं काय तर कोणाचं काय

कोणे एके काळी आपापसातच लग्न जुळत होती, ह्याच्या त्याच्या नात्यातले ई. मग ओळखीने विवाह होऊ लागले. तो वर सगळं ठीक होत कारण एकत्र कुटुंब पद्धती होती, बहुतांशी एकाच गावात / शहरात पिढ्यानुपिढ्या राहणं होत असे. मग जग बदललं. नोकरी मुळे, व्यवसायामुळे, विविध शिक्षणाच्या संधी मुळे विविध ठिकाणी, वेगवेगळ्या शहरात / देशात भ्रमंती सुरु झाली. अर्थातच त्याच वेळी नेमकी टेकनॉलॉजि विकसित झाली आणि त्यामुळे लग्न ठरवण्यासाठी संगणकाचा सर्रास उपयोग होऊ लागला. भरमसाठ उपयोग, विविध प्रकारे, मुलामुलीने स्वतः जोडीदार शोधणे, पालकांनी शोधणे आणि संगणकाने सुचवणे देखील. हा एक अविभाज्य घटक झाला आणि तो मान्य देखील झाला सर्वत्र. असो.

आधी फक्त ढोबळमानाने काही सहज सोप्प्या गोष्टी जुळवून बघितल्या जायच्या. मग हळूहळू अपेक्षा आणि जुळवाजुळव ह्यांची यादी प्रचंड मोठी झाली आणि तदनंतर तर फक्त भौतिक / शारीरिक / दृश्य हे मोजमाप काही अंशी शिल्लक राहील. जास्त भर स्वभाव, अदृश्य आणि सहज न कळणाऱ्या गुणधर्माना दिला गेला. त्यामुळे AI अर्थात कृत्रिम बुद्धिमतेचा वापर वाढला. हे सगळं कमी होत कि काय, त्यात "न्यू नॉर्मल" दिवस सुरु झाले अचानक आणि आज तर मी उडालेच एक बातमी वाचून. आता म्हणे भावी / होऊ घातलेले मुलं मुली प्रकर्षाने अश्या सगळ्या लग्न जुळवणाऱ्या किवा जोडीदार सुचवणाऱ्या संकेत स्थळावर "मी दोन्ही लसी घेतल्या बरं का..." असे काहीसे टाकत  आहेत म्हणे. देवा. ऐकावं ते नवलंच.

आता प्रत्येक मोठा व्यक्ती स्वतःच्या सुरक्षितते साठी लस घेणारच ना, आणि त्यात बहुतांशी सगळ्याच कंपन्या / ऑफिसेस आता हे लस घेणं अनिवार्य करत आहेत. मग त्यात सांगण्या सारखं काय आणि ते हि अश्या संकेत स्थळावर? मला तर तो लेख वाचून देखील फार समजलं नाही, म्हटलं असो. नको तेथे माझा छोटासा मेंदू कशाला वापरू मी. असो, कोणाचं काय तर कोणाचं काय. वेगळंच / भलतंच / आकलना पलीकडले.  

एक असेही आबा

एक घराची गोष्ट, त्यात एक आबा आहेत, त्यांच्या घराचं दार सदोदित उघड, टीव्ही सतत चालूच आणि दिवा पंखा पण. एका ठराविक जागी ३-४ पुडाचा जेवणाचा डब्बा ठेवलेला दिसतो.  हे आबा इकडे तिकडे, कधी दारात, कधी पलंगावर पहुडलेले, कधी फाटकाजवळ पहारेकऱ्या सारखे उभे, ई. अनेक दिवस / महिने / वर्ष मी त्यांना एकटेच बघितले आहे. थोडीशी चौकशी केल्यावर समजलं कि ते एकटे नाहीत, त्यांचं अख्ख भरलं कुटुंब आहे, बायको आहे, मुलं सुना नातवंड ई. हे आबा असतील ९० च्या आसपास. बाकीची घरची मंडळी अगदी ३-४ प्लॉट्स सोडूनच राहतात. आबांनी स्वतः म्हणे सांगितलं आहे, मला रोजचा दोनदा डब्बा आणून द्या, माझा स्वभाव चांगला नाही, उगाच कोणालाच त्रास नको. मी येथे एकटाच बरा. जबरदस्त च. नाही का?. देवा, हिम्मत लागते प्रचंड एकटं राहायचं म्हणजे, इतकं सोप्प नाही ते, घर खायला उठत. टीव्ही बघून बघून किती बघणार पण तरी देखील हा निर्णय आणि तो ते इतके दिवस / महिने / वर्ष सातत्याने निभावतात आहे म्हणजे काय म्हणावं त्यांना. मी तर निःशब्दच झाले. माझा त्या आबांशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाहीच, पण जे बघितलं आणि ऐकलं ते नवल आणि अनोखं आहे ह्यात वादच नाही. धन्य ते आबा. सहसा नाहीतर फक्त ढवळाढवळ करणारीच मंडळी दिसतात आणि "मी च बरोबर" हा एक नारा असतोच. येथे तर ३६० अंश वेगळं आहे आणि त्यात ते आबा जास्त काय, न-शिकलेलेच दिसतात मला. म्हणजे शिक्षणाचा आणि इतरांशी वागण्याचा काहीही संबंध नाही हे सिद्ध झालं ह्या उदाहरणावरून.

बाळंतपण आणि त्याचे प्रकार

गेले अनेक वर्ष मी आणि माझ्या डिपार्टमेंट हेड ने एक गोष्ट नेहेमी अनुभवली आहे ती हि कि विद्यार्थी त्यांच्या संशोधन प्रकल्पावर काम करतात.  बहुतांशी शेवटच्या टप्प्यात त्यांनी जे काम केलं आहे ते नमूद करून ठेवतात प्रबंध म्हणून, आणि तो विद्यार्थ्यांनी कसाबसा लिहिलेला असतो. त्यांचं शेवटचं सादरीकरण झालं कि ते इन्स्टिटयूट / संस्था सोडून निघून जातात. त्यांचा कोर्स पण पूर्ण झाला असतो. मग काय, ते प्रबंध आणि आम्ही शिक्षक, बसतो त्याच बाळंतपण करत. त्या प्रबंधात लिहिलेल्या महत्वाच्या गोष्टी वेगळ्या काढायच्या, त्या विशिष्ट ढाच्यात मांडायच्या, त्याला पेपर च्या स्वरूपात मांडायचं, योग्य ते जर्नल शोधायचं, पाठपुरावा करायचा, परीक्षकांनी सुचवलेले बदल करायचे ई. बापरे, बाळंतपण हा अगदी चपराख शब्द आहे हि सगळी कामं निस्तरण्यासाठी.

दोन वर्षा पूर्वी माझ्या पायांच्या दुखण्यामुळे आणि सध्या पुन्हा गुढग्यावर धडपडल्यामुळे माझे घरी प्रचंड लाड चालू आहेत, पौष्टिक आहार काय, हातात गरमागरम नवनवीन पदार्थ काय, काळजी काय, फिजिओथेरपी काय, ई. एकंदरीत प्रचंड कौतुक. आज माझ्या फिजिओथेरपी डॉक्टर मन लावून काळजी पूर्वक गुढग्याला इलाज करत होत्या तेव्हा हा विचार माझ्या मनाला शिवला "एका आयुष्यात किती बाळंतपण करायची?" अर्थात नेहेमीच असा प्रश्न पडतो मला.

कौतुक आणि इलाज करून घेणं फारच उपभोगते आहे मी सध्या, कारण दुसरा काही इलाजच नाही ना, पर्याय हो. असो. ह्या दोन्ही निमित्याने मला बाळंतपण ह्या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ समजले / उमजले ते हि नसे थोडके.

Yet another innovative product

There is one more reason for me to love LinkedIn more as I always get to learn lots of new things on this platform. Same thing happened again today. While surfing through my LinkedIn account, I came across this tiny but awesome informative video. This video talks about rechargeable batteries. Yeah, there are devices / gadgets and rechargeable batteries available in the market since my childhood days, so whats new?

Many things are new in these batteries:

  • USB based (re)charging
  • Easy to use
  • Very innovative
  • Can be recharged using any USB port
  • Magnets at both ends of battery, for safety
  • Totally different unique new inner engineering of batteries

Its impossible or hard to believe that pencil cell / battery can be broken into two parts for (re) charging. Superb innovation indeed. Tiny, but simply loved it. 

To know more or see the video of these batteries kindly visit either LinkedIn URL or YouTube video.

 Useful URLs:

https://www.linkedin.com/posts/arpan-sadhankar-966a1029_innovation-gadgets-technology-ugcPost-6824678132105256960-D-I1 

https://www.youtube.com/watch?v=pfBszQPIAyM

 #batteries #pencil-cell #recharging #USB #innovation #fantastic-product #new-way-to-charge #very-useful #very-unique #very-easy #inner-engineering #two-piece-battery #magnetic-ends-batteries

 

रविवार, २५ जुलै, २०२१

Have a cake and eat it also

IVF is the current talk of the town. On the occasion of World IVF Day today, I wish to narrate my collected experiences and stories about IVF. 

In this era, in the year 2021, it is believed that IVF born children are not intelligent as compared to their age-group kids who are born naturally. And to my surprise this is discussed by the group of people who are intelligent, extremely highly educated, claim themselves as vivacious readers, are / were into hardcore sports, roamed around the world etc. Wow, I was taken a back. I am not a medico professional at all but wanted to know:

  • how to gauge intelligence? only by looking at the marks / salary?
  • and why to gauge intelligence of others even though they are your own blood relatives?

 According to me:

  • everyone is just a facilitator
  • everyone is born with their own fate
  • everyone will do something in this world for sure
  • no one can control or decide anything for self or others
  • and marks / salary etc are just the numbers.

When I asked the totally opposite question to the same group of people there was no answer: what is the guarantee that the kids who are born with normal way will turn out to be intelligent always?

There are exceptions in all the cases, outliers do exist, but this is not the point of discussion. If you find someone not intelligent then what are you doing to make him / her intelligent? 

These set of discussions were going on in front of many people from different age groups. Finally one physiotherapy student just gave one statement and that was so true: she said "you want baby too and everything perfect in that baby also? how can it be possible? IVF gives babies to those who are not able to conceive naturally, then people should decide, what is needed etc". Wow it was so good to see the answer from the medico student who started learning about anatomy recently. Superb. 

I came across few informative URLs online who are discussing about the same thing, looks like its a talk of a town by many.

Bit difficult to have a cake and eat it also, right? 

Just enjoy what you have and chill. Thank that Supreme Power always. 

#IVF #Intelligence #marks #salary #learned-people #comparison #horrible-thought #facilitator 

Useful URLs:

https://www.tribuneindia.com/news/archive/health/ivf-babies-as-smart-as-naturally-conceived-kids-413305

https://www.ivf.com.au/blog/ivf-babies-intelligence

https://www.quora.com/Are-IVF-kids-smarter-than-other-kids

अप ^ मान

कोणालाही अपमान झालेला कधीच आवडत नाही आणि अपमान होणार नाही ह्याच्या साठीच सगळी धडपड करतात. भरपूर मेहनत करतात, मनलावून काम करतात, आणि त्यामुळे अपमान होत नाहीच. पण बरेचदा अश्या घटना होतात कि असं वाटत कि अपमान झाला आहे, त्यांनी असं बोलायला नको होत, हा आपल्याच मनाचा खेळ असतो बरेचदा.  खरं तर कोणीच कोणाचा अपमान करू नये कारण प्रत्येक व्यक्ती, त्यांचा अनुभव, त्यांचा व्यवसाय ई. महत्वाचे असतातच, सगळ्यांनी मिळूनच जग चालत, कोणीही छोटा मोठा नाहीच. हे एकदा पक्क केलं मनाशी कि आपल्या हातून तर कोणाचा अपमान होणार नाहीच, शिवाय पुढचा जर काही बोलला तर तो अपमान वाटणार नाही.

 impossible हा इंग्लिश भाषेतला नेहेमी च्या वापरातला शब्द आहे, तो स्वतःच म्हणतो I am possible. अगदी तसेच अपमान सुद्धा स्वतः सांगतो मान ताठ करून जगा, कार्य / कर्तव्य करत राहा, कालपेक्षा आज स्वतः चांगल होण्याचा पर्यंत करा, दुसऱ्याशी तुलना नकोच. कारण प्रत्येक जण वेगळा आहे, वेगळा घडला आहे, आणि तुलनेची गरज फक्त स्वतःसाठी मर्यादित असावी म्हणजे नेहेमीच कूल राहता येईल अप मान ठेऊन. 

#insult #impossible #consistency #no-comparison #compare-self #learn #relearn #unlearn #cool-life #enjoy

शनिवार, २४ जुलै, २०२१

पेट्रोल पंप आणि रिफील

मी अगदी लहानपणी पासून बाबांच्या खास व्हेस्पा वर अनेकदा पेट्रोल पंपावर जात असे, त्यानंतर त्यांच्या गाडीतून, मग ऑफिसची बस आणि बहुतांशी प्रत्येक फेरीत मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. खूप लोक पेट्रोल पंपावर रिकाम्या बाटल्या किंवा कॅन घेऊन येत असतात सुट्ट पेट्रोल नेण्याकरिता. कदाचित कोणाची गाडी / ऑटो रस्त्यात अचानक बंद पडला असेल त्यामुळे तात्पुरती सोया म्हणून हे प्रकार. म्हणजे त्या बंद पडलेल्या गाडीला जवळपासच्या पंपापर्यंत पोचायला आधार. पण खरं ते नियमात बसत नाही, कायद्यात पण बसत नाही, पण काय करणार, दोघे हि तय्यार असतात, तो पंप वाला आणि मागणारे पण. मागणी आणि पुरवठा असल्यामुळे हे धोकादायक काम अविरत सुरु आहेच. पण आता मला एक सांगा मंडळी, काही वर्षांपूर्वी गॅस वर चालणाऱ्या गाड्या आल्या आणि त्याचा आता सुळसुळाट झाला आहे. तो गॅस भरण्याचं जे नोझल असत ते इतकं वेगळं आणि बारीक असत, त्याची भरण्याची पद्धत पण वेगळीच, मग आता सांगा हा गॅस कसा काय पाण्याच्या बाटलीत किंवा कॅन मधे भरून नेणार? अजून तरी अशी काही सोय किंवा जुगाड निघालाय हे मला माहित नाही. निघेल कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून.

परवा एका दिवसात ओला कंपनीची विजेवर चालणारी गाडी लाँच झाली आणि लाखापेक्षा जास्त गाड्याचं बुकिंग झालं देखील. त्यातले आम्ही पण एक आहोत, मुलांसाठी बुक केली एक गाडी.

माझ्या दृष्टीकोनातून आता चालकाला फारच सतर्क / जागरूक राहावं लागणार, अश्या विजेवर किंवा गॅस वर चालणाऱ्या हलक्या फुलक्या गाड्या मधे दोन इंधनाचा पर्याय नाही. त्यामुळे किती चालवली, किती इंधन आहे शिल्लक, कुठे जायचं आहे, इत्यादींची शिस्त अंगी बाळगावी लागणारच, काहीही दुसरा पर्याय नाहीच.

सहज आठवलं मला, अभियांत्रिकी विद्यार्थी होते तेव्हा आणि शिकवायला लागले तेव्हा मला सोमवार ते शनिवार घरून कॉलेज ला जावं लागे. शनिवारी कॉलेज संपल कि आधी पेट्रोल पंप गाठायचा, टाकी फुल्ल करायची आणि मगच घरी पाऊल टाकायचे, म्हणजे सोमवारी एकदा गाडी सुरु केली कि ती कॉलेज मधेच थांबणार. अशी माझी मी ठरवलेली रोजनिशी होती. त्यामुळे पेट्रोल मुळे गाडी बंद कशी काय पडू शकते हा मला पडलेला यक्ष प्रश्न. असो.  

#Petrol #Refill #illegal #discipline #electric-vehicle #gas-vehicles #self-discipline 

पिठलं आणि बरंच काही...

विविध वयाच्या टप्प्यात मी हळूहळू वेगवेगळे पदार्थ खायला शिकले. सुरवातीला गुळ-तुप पोळी, साखर-तुप पोळी, साखरांबा / मेथांबा पोळी ई. पासून सुरु झालेली ओळख मग न्याहारीच्या पदार्थांवर आली. ह्या पदार्थांपैकी कुठलाही पदार्थ चालायचा तेव्हा कुठंही गेलं तरी, कारण आई च्या भजनाचा कार्यक्रम एकदा सुरु झाला आणि रंगला कि वेळ होत असे. मी लहान त्यामुळे भूक लागायची आणि जेथे कार्यक्रम असे त्यांच्या घरचे आणि मी माझी साधी भूक सांभाळून घेत असू. तेच श्री. गुरुचरित्र साखळी परायणाच्या दिवशी देखील. असो.

आमची बहुतेक ठरलेली घरं होती हे सगळे उपक्रम करण्यासाठी. त्यात एक कुटुंब होत ज्यांच्याकडे आजी आजोबा त्यांचे चिरंजीव, सून आणि दोन नातवंड होती. आजी आजोबांना ह्या सगळ्या धार्मिक गोष्टींची आवड फार, पण चिरंजीव अतिशय नास्तिक आणि तरुण पिढीतले. हॉल मधे कार्यक्रम सुरु झाला कि आम्ही मुलं एकत्र अंगणात, गच्चीवर किंवा मुलांच्या खोलीत खेळायचो. मोठी माणसं कार्यक्रमात गुंग आणि आमच्या मुलांसाठी आधी कोरडा खाऊ मिळायचा, पण त्या मुलांचा बाबा फारच शिस्तीचा, रागीट आणि धाकात ठेवणारा पण. आम्ही मुलांनी जेवणाची वेळ झाली कि गरम पोळी खावी असा त्याचा आग्रह. बहुतेक त्यांच्या कडे पिठलं पोळी असायची. मला पिठल्यावर भरपू$$$$$र तूप आवडायचं आणि त्यांच्या मुलांना तेल. काय जेवायचो आम्ही सगळे अहाहा. मज्जा काही औरच होती ती.

नरसोबावाडीला एकदा असेच खूप उशिरा रात्री आम्ही सगळे पोचलो, तेव्हा साध्या फोनचा पण जमाना नव्हता, त्यामुळे पोचल्यावर गुरुजींच्या बायकोने सांगितले, देवाचं दर्शन घेऊन या तो वर मी थोडसं खायला करते, स्वयंपाकाचं बघते. आम्ही दर्शन घेऊन आलो कि त्यांनी ताट वाढली पिठलं भात. बास, पण तस्सा पिठलं भात मी आज तागायत कुठेही खाल्ला नाही, झट कि पट, न कांदा, ना टोमॅटो, फक्त फोडणी, चव मात्र ह्या जागावेगळी उत्कृष्टच. अहाहा.

माझी आई डाळीचं पीठ कालवून आणि न कालवता दोन्ही पद्धतीने पिठलं करायची. ते न कालवलेलं पिठलं तर अजूनच भन्नाट लागायचं, मधे मधे येणाऱ्या गुठळ्या, असं वाटायचं एखादी वड्यांची उसळ / भाजी खातोय, अहाहा...

त्यानंतर पिठल्याच्या वड्यांची ओळख झाली आणि जे गट्टी जमली, ते कायमचीच.  

मग पुढील प्रवासात सुरळीच्या वड्या समोर आल्या आणि मी प्रेमातच पडले त्या पदार्थाच्या...

माझ्या नागपूरचा जग प्रसिद्ध गोळा भात पण डाळीच्या पिठाचा वापर करून केलेला पदार्थ...

एकंदरीत पिठलं आणि डाळीच्या पीठ असलेले विविध पदार्थ जशी जशी ओळख होत गेले तसे तसे फारच आवडत गेले आणि अजूनही आवडतात मनापासून. आज पिठलं भाकरी झुणका असा अस्सल बेत होता, आणि तो मनापासून उपभोगतांना हा भजनांच्या कार्यक्रमापासून सुरु झालेला लहानपणीचा प्रवास आणि खादाडी डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखी उभी ठाकली.   किती साधे दिवस होते ते, मुलांसाठी पण आणि मोठ्यांसाठी सुद्धा, "आन दो" अशी खाण्याची तय्यारी होती, काहीही साधं घरच नेहेमीच चालत असे, नखरे माहित नाहीच. शिवाय व्यवस्थित खाणं, थोडं थोडकं माहितच नाही. नितांत सुंदर दिवसांची आठवण आणि सफर घडली आज, पुन्हा एकदा. सहीच. 

#Pithal #Maharashtrian-Food #Simple-food #foody #Gram-flour-dish #Popular-dish #Easy-to-make #Full-of-proteins #Common-food-item #Gram-flour-dishes #Gola-bhat #Nagpur-special #Simple-life 

बुधवार, २१ जुलै, २०२१

First Ever

 There is always a first time for everything for everyone. That's true for me as well. For the first time someone walked on the path of research with me and successfully completed her PhD in a given span of time. Wow. Hats off to her consistency, hard work and dedication.

Let me take you way back in 2017. One fine day in Sep-2017, one young girl entered my office. She was patiently waiting for me, as I was surrounded by many students at that time. After the gang of students left my office, she entered like an energetic storm and said "I am your JRF, I need your signature" while handing over a piece of paper to me. As the text on that contained hardly a few words, I read it in no time and requested her to take a seat. Before giving her my signature, I wanted to know more details about her thoughts, proposed work etc. Within no time she briefed me about her  thoughts, ideas and entire flow of work, as if she had been waiting for this moment to arrive. I was thoroughly impressed with her at the first go itself. After listening to all her narrations, details (I never wanted to kill her enthusiasm), I took over and briefly explained to her about my research. I then mapped my work with her innovative ideas through which we connected immediately. I signed on the dotted lines and since then we are together. On 8th July 2021 she defended her PhD and we were on Cloud-9. I sometimes wonder whether all this was meant to happen, or if it was just a mere coincidence. I am just overwhelmed about the fact that one of my first PhD students is now finally a Dr.

Her entire journey from JRF-SRF-PhD was beyond amazing.  Being a mom, wife and JRF all together, learning story-telling, writing articles, earning grip on English, understanding new technologies etc. was tough and challenging but she did it with a lot of enthusiasm and consistency. This journey includes writing many research articles (few published, many rejected), one international and one national patent, 4 Microsoft Azure "AI 4 Earth" grants, 1 grant from "Sakal Foundation", 2 book chapters, 2 conference papers and uncountable number of memories.... wow. Dr. Archana set an example for many girls / young-moms who are into research and proved her "time management" skills always in this journey, which in itself is something to learn from her.

My "First Ever" experience has been so unique that I felt like writing immediately about it. All the best to Dr. Archana for her future endeavors.

#PhD #Journey #Research-journey #Awesome-achievement #Incremental-learning #Microsoft-Azure #Microsoft-grants #Sakal-India-Foundation #Symbiosis #SIU #SIT #Research #Time-management


अन्न वस्त्र निवारा - २

 अन्न-वस्त्र-निवारा ह्या आपल्या / संपूर्ण मानव जातीच्या मुलभूत गरजा आहेत.  आपण अन्ना बद्दल अनेक वेळा वाचलं आहेच, शिवाय माझ्या अनेक लेखात देखील मी ह्याच महत्व वर्णन केलं आहेच. तसेच आता थोडसं वस्त्राबद्दल, माझ्या अजून काही आठवणी, महत्वाच्या अश्या.  

माझी एक नकळत जडलेली सवय होती अगदी लहांपणीपासूनची. सकाळी आई उठवत असे दररोज न चुकता (hats off to her patience). आणि मी पठ्ठी आळशी-ढोम संपूर्ण झोप झाली असली तरी देखील पुन्हा आईच्या स्वच्छ आवरलेल्या अंथरुणावर पुन्हा फक्त लोळावं ह्या हिशोबाने जात असे, पण मला गाढ झोप कधी तिच्या कवेत घेत असे ते कधीच कळले आणि उमगले नाहीच. आईची माया, तिचा आशीर्वाद, तिचा त्या पलंगाला / चादरीला झालेला स्पर्श असेल ह्या मागे, निश्चितच. आता देखील माझी मुलं आजीचे ब्लॅंकेट करता भांडतात अक्षरशः, उगाचच नाही ना ते. कारण माझी आई राहिली होती माझ्या कडे मुलं लहान असतांना आणि ती जे ब्लॅंकेट वापरात होती ते पांघरून झोपी जाण्याची मज्जा काही औरच.  

मी अनेकदा वर्तमानपत्रात वाचलं आहे कि भल्यामोठ्या नायिका त्यांच्या लग्नाच्या वेळी आईची / आजीने (त्यांच्या लग्नात)  नेसलेली पारंपरिक साडी / लेहेंगा ई. परिधान करतात, का हो? फक्त आणि फक्त पिढ्यांचा आशीर्वाद. त्यांच्या नव्या जीवनाची सुरवात, सर्वात महत्वाच्या सोहळ्या दिवशी आशीर्वाद च महत्वाचे माझ्या दृष्टीने. त्यांना काय कमी असते, पैसे तर अगणित असतात कदाचित, मग "जुनं ते सोनं" का?

तर अश्या वस्त्रांच्या आठवणी जे शेतकरी आपल्याया देतात त्यांच्या बद्दल जरा जास्त जाणून घेऊ यात. अनघा बालाजी ने हे कार्य केलं आहे, फारच माहितीपूर्व माहिती दिली आहे. कृपया वाचा, www.ecotattva.com. 

#Ecotattva #Blessings #Mom's-blessings #Grandmom's-blessings #Importance-of-cloths #Cloths-a-necessity #Anagha-Balaji #Cotton #Cotton-farmers

अन्न वस्त्र निवारा - 1

अनेक पिढ्या आधी, अनेक काळ आधी श्री रामदास स्वामींनी अगदी सोप्प्या शब्दात "मनाचे श्लोक" शब्दबद्ध केले. त्यातला एक फारच महत्वाचा श्लोक म्हणजे 

"वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥

आम्हाला शाळेत श्री रामदास स्वामींची नव्याने ओळख झाली आणि तेव्हा पासून मला तरी भरलेलं ताट हातात आलं कि आपोआप मनात हा श्लोक सुरु होतोच, काहीही करावं लागत नाहीच. कारण जेवण करणं म्हणजे फक्त "उदर भरण नाही" तर तो एक यज्ञ आहे. मग अर्थातच हा श्लोक मी माझ्या मुलांना शिकवला लहानपणी, पण ते इंग्लिश मध्यम शाळेतले विद्यार्थी असल्यामुळे त्यांना शाळेत हाच मतितार्थ असलेला पण इंग्लिश श्लोक शिकवला. असो, हरकत नाही.

काल परवाच सन्माननीय BK शिवानी दीदींचे एक महत्वाचे वाक्य वाचण्यात आले. आणि ते मनाला फारच भावले. त्या म्हणतात, हे जे भरलं ताट आपल्या समोर आलंय, ज्या शेतकऱ्यांमुळे आलं
आहे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला पोटभर दररोज भोजन मिळू दे, ते कधीही उपाशी झोपू नयेत, अशी जर सर्वांनी "ठरवून सुरवातीला" आणि मग नकळत प्रार्थना केली तर सर्वच जण भरल्या पोटाने अंथरुणावर पहुडतील दररोज. देशाची पण भरभराट होईल अप्रत्यक्षपणे, सुधारेल / इकॉनॉमी वाढेल ई.

अगदी तस्सेच आपल्याला अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागण्याकरता आपली चादर, पांघरूण, ब्लॅंकेट ई. फार फार मदत करतात, नकळत. त्यामुळे आजपासून त्यांना पण धन्यवाद देऊ यात. म्हणजेच जो शेतकरी अगदी त्या कापसाची शेती करतो, कापूस तय्यार झाल्यापासून ते चादर / चादरी तय्यार करून आपल्या पर्यंत पोचवतो त्या सर्व कष्टकऱ्यांना मनापासून नमन. ती उब अनुभवयाला दिल्या बद्दल शतशः धन्यवाद. चादरीं सोबतच आपण परिधान करतो ते प्रत्येक प्रकारचे वस्त्र, दुपारच्या वामकुक्षीकारीता सारलेले पडदे, घराचे सौंदर्य खुलविण्याकरिता वापरलेले सोफाचे कव्हर आणि असे असन्ख वस्त्र प्रकार पण हे कष्टकरी हात देतात. चला तर मग ह्या सगळ्या कष्टकऱ्यांबद्दल अजून जाणून घेऊ या माझ्या सखी कडून अनघा बालाजी कडून. तिच्या वेबसाइट वर तुम्हाला अजून भरपूर माहिती मिळेल. Kindly visit https://ecotattva.com/about/ I will appreciate that.

#Cotton #Ecotattva #Farmers #Bedsheets #Cloths #Cotton-processing #Anagha-Balaji #Respect #Gratitude


हस्तकला

माझी दहावीची परीक्षा संपली रे संपली कि मी दोन क्लास लावले होते, एक टायपिंग आणि दुसरा कांथा वर्क चा. पट्टाकिनी दोन्ही हस्तकला अवगत केल्या आणि भरतकाम / विणकाम माझे अखंड चालूच राहिले मी इंजिनिअर झाली, ३-४ वर्ष नंतर नोकरी केली तो पर्यंत. म्हणजे जवळपास १० वर्ष सलग मी विविध हस्तकलेशी जुळलेली होते. संपूर्ण घर भरलं होत विविध आर्ट फॉर्म नी. त्यानंतर जे बंद पडलं ते आज पर्यंत. असो.

ह्या माझ्या हस्तकलेच्या प्रवासात मान, पाठ, डोळे ह्यांची पार वाट लागत असे, पण जसा कि एक ध्यास लागला होता विविध कला शिकण्याचा आणि घडवण्याचा, त्यामुळे एकदा का ते हातात घेतलेलं भरतकाम / विणकाम / चित्र ई. पूर्ण झालं कि काय समाधान मिळत असे. मला शब्दात मांडणं अजिबातच शक्य नाही. खूपच संयम लागतो, कच्चा माल लागतो, आणि प्रचंड मेहेनतीच वेळखाऊ काम आहे ते. अर्थात मी फक्त नवीन काही तरी शिकण्यासाठी, फक्त माझ्या घरासाठी हे सगळं करत होते ते ठीक आहे, पण अशी कलाकृती नंतर कोणाला देऊन टाकणे जरा अवघडच. मी अनेक प्रयत्न केले आणि भरपूर थर्मोकोल च्या गोष्टी करून भेट म्हणून दिल्या देखील पण आपल्या मेहेनतीने केलेलं देणं अथवा विकणं हे मला फारच अशक्य आहे / होत.

माझ्या साऱखीचा जर हा अनुभव असेल तर जे शेतात मोलमजुरी करून, कापसाचं पीक घेऊन, त्याच सूत कातून, विणून, रंगवून, एक / अनेक कलाकृती तय्यार करतात उदर निर्वाहासाठी, त्याचा आपण सखोल विचार करणे अतिशय आवश्यक आहे, नाही का? त्यांचं पोट आहे त्यावर. प्रचंड मेहेनत, कष्ट, वेळ, पैसा, निसर्गावर अवलंबून ई. आणि त्यानंतर विक्रीची अनिश्चितता. मंडळी हे सगळं आपले शेतकरी बंधू भगिनी अविरत अनेक पिढ्या करत आहेत आपले पर्यावरण सांभाळण्यासाठी, वाचविण्यासाठीच आणि आपल्या पुढील पिढीसाठी सुद्धा. मग आपण त्यांना किंचितसा हातभार लावावा ना, चला तर मग.

मी अनेकदा ऐकलं आहे, जो आपल्या स्वतः साठी पाणी भरतो, पाण्याची बदली भरून दुरून आणतो, किंवा विहिरीतून काढून मग वापरतो, तो पुन्हा कधीच पाणी वाया जाऊ देत नाही, स्वतः पण आणि दुसऱ्यांपण महत्व सांगत राहील.

अगदी माझं पण तस्सेच आहे, मी स्वतः छोट्या प्रमाणात कलेची सेवा केल्यामुळे पट्टाकिनी समजू शकते ह्या कलाकारांची कष्टाची पातळी. म्हणूनच सर्वांना विनंती, एकदा तरी पट्टाकिनी खालील वेबसाईट ला भेट द्या, त्यांचं कार्य जाणून घ्या आणि काही शंका असतील / मदत करायची असेल तर बिनधास्त अनघा बालाजी ला संपर्क करा. धन्यवाद.
https://ecotattva.com/about/
 

विजार आणि इलॅस्टिक

मी बहुतेक गम्मत म्हणून, बदल म्हणून ९-१० वीत माझ्या वाहिनीचे सलवार कमीज सहज घातले होते. पण त्यानंतर लगेचच मी polytechnic कॉलेज ला प्रवेश घेतला आणि त्यामुळे सलवार कमीज घालणं सुरूच झालं सतत, रोज. त्यावेळी इतकी आज सारखी पॅन्ट ची फॅशन नव्हतीच. असो. तेव्हा नाही काही वाटलं आणि सलवारचा नाडा हा नगण्य होता माझ्या साठी. कधीच त्या वस्तू कडे विशेष लक्ष गेलं नाहीच. तो असतोच, आणि वापरावा लागतोच एवढंच माहित होत, वापरला जात होता. पण त्यानंतर एस्पेशिअली माझी पिल्लं झाल्यावर का कुणास ठाऊक पण तोच नगण्य नाडा माझ्या डोक्यात जाऊ लागला, काहीही कारण नाही. इतका कि मी त्याला माझ्या आयुष्यातून काढून टाकले नेहेमीसाठी. पण त्यावेळी का कुणास ठाऊक पण माझ्या दर्जी ला माझं मत पटत नसे. तो फार आढे वेढे घेऊन तय्यार होत असे नाड्या ऐवजी इलॅस्टिक वापरण्याकरीता. देवा, लढाई असे ती, प्रत्येक वेळी. जास्त पैसे घेत असे तो, पण मी फार समाधानी राहू लागले त्या छोट्याश्या बदलामुळे. फारच भावला मला तो पिटुकला बदल.

आज हे सगळं साग्रसंगीत का मांडलंय विचारात मंडळी, सांगते.

सध्या माझा एक पाय सरळ स्थितीत ठेवायला सांगितलं आहे अजून काही दिवस डॉक्टरांनी, त्यामुळे नेहेमीचे स्लॅक्स परिधान करण्यास मला प्रचंड अडचण येत होती. विजार / कुर्त्याबरोबर घालण्याची पॅन्ट असे मोजकेच ड्रेस होते, मग ऑनलाईन मागवले काही. आणि सगळेच्या सगळे आले कि इलॅस्टिक सोबत, नाडा नाही. बापरे काय मज्जा वाटली मला. म्हणजे आता हि गरज कमी फॅशन जास्त झाली आहे कदाचित, किंवा वापरायला इतकं सोप्प कि बघा सगळ्यांना आवडले आहेत,म्हणून तर इतके सहजी उपलब्ध आहेत ना साध्या ऑनलाईन वेबसाईट वर पण.

ते साधे पण नवीन ड्रेसेस इलॅस्टिक असलेली पॅन्ट सहित बघून इतका आनंद झाला ना, म्हटलं आताच लिहावं आणि त्या माझ्या टेलर ला नेऊन दाखवावंच, बघ माझी दूरदृष्टी. असो.

#Elastic #Importance-of-elastic #Salwar-with-elastic #Indian-dress-pant #Ease #Comfort

डोंगराने पांघरली चादर / झालर

"पुणं तेथे काय उणं", सर्वत्र भव्य दिव्य डोंगररांगा नि नटलेलं असं शहर. हे डोंगर उन्हाळ्यात जरी ओस पडले असतात पण तेच पावसाळ्यात हिरवे गालिचे पांघरतात जणू. काही पहिल्या पावसाच्या सरी पडल्या कि रागरंग, संपूर्ण नक्षा आणि सौंदर्याचं पूर्णपणे बदलून जात ह्या डोंगराचं. जोशात आणि नियमित पाऊस पडू लागला कि मग तर काय विचारूच नका. त्यात "दुधात साखर", माझे ऑफिस संपूर्ण डोंगररांगांनी वेढलं आहे, असन्ख छोटे मोठे डोंगर आहेत आजूबाजूला अगदी रस्त्याच्या सुरवातीपासूनच. सकाळी नऊ च ऑफिस असल्यामुळे जेथे जेथे डोंगर दिसतात तेथे आम्ही साधारणतः ८. ३० च्या दरम्यान असतो. आणि त्यात जर पाऊस पडून गेला असेल तर धुकं पडलेलं असत. त्या कडे बघून असं वाटत कि डोंगराने जशी मलमली हलकी सुंदर राखाडी अनोख्या रंगाची चादर / झालर पांघरली आहे. ते दृश्य इतकं विलोभनीय असत कि शब्दात मांडणं अगदी अशक्य आणि अवघडच. आणि हो ती झालर इतकी जादुई असते ना कि जसं ऊन पडेल तस्स, हवेचा झोका येईल तस्स तेही रूप, रंग, तऱ्हा, सौंदर्य, छटा ई. बदलत जाते सतत आणि हे विलोभनीय सौंदर्य-नाट्य संपूर्ण रस्ताभर सुरूच राहत, लपंडाव असतो डोंगर, हिरवाई आणि धुक्याचा, अगदी ऑफिसला येई पर्यंत दररोज, संपूर्ण चार महिने / पावसाळा आहे तो पर्यंत. 

मग काय एकदा हिरवा पोशाख चढला रे चढला, पावसाळा संपला कि मग त्याच चादरींची / झालरीची व्याप्ती संपूर्णपणे बदलते. ती अधिक दाट, शुभ्र, अगदी लवकर सुरु होऊन खूप वेळ टिकते. इतकं अवर्णनीय असा आहे आमच्या भागातला निसर्ग कि जसे कि रोज ते हिवाळ्यातले धुके जणू काही टाळी देण्यास आमच्या बस / गाडी समोर येतात / उभे ठाकतात. "हाय-फाईव्ह" / "दे-टाळी" म्हटलं कि कसं त्यांनाही प्रचंड बरं वाटत असणार आणि अर्थातच सगळ्या ऑफिस मधे येणाऱ्या कर्मचाऱ्यांना, प्रचंड आनंददायी, अर्थात सुखकारक. अशी सुरवात दररोज संपूर्ण दोन ऋतुत होते, "काय वर्णु तव गुण...". आणि हो हे घनदाट धुकं/ हे पिटुकले हलके ढग आम्हाला जे भेटायला येतात ते प्रदूषणाचे अजिबात नाही, ते नैसर्गिक असे, डोंगरावर आपोआप तय्यार होणारे आणि थंडीची जाणीव करून देणारे असे.  

#Nature's-beauty #Mountain-ranges #Rainy-season #Winter-season #Clouds #Fog #Different-types-of-fog #Hide-and-seek #No-pollution #Two-seasons 

 

हाऊस हॉस्पिटल

माझ्या ऑफिस च्या मार्गावर एक भलं मोठं स्वतंत्र घर आहे, तीन - चार मजली असं. त्यात तळमजल्यावर दोन दुकानं होती, एक ATM आणि दुसरं दुकान कपड्याचे. शेजारी एक जिना होता आणि मागे / वर गाववाले / कुटुंब राहतं होत असं दिसायचं, कपडे वाळत घातलेले दिसायचे. माणसं पण दिसत होती अनेकदा कारण घरच होत ते. 

ह्या नवीन दिवसांमुळे दोनदा ऑफिस बंद होत मधल्या काळात, त्यामुळे बरेच दिवस लक्ष गेलं नाही माझं त्या घराकडे, पण आता ऑफिस सुरु झालं आणि अचानक माझं त्या बिल्डिंग कडे लक्ष गेलं. त्याच कारण म्हणजे अचानक दिसलेला हॉस्पिटलचा बोर्ड. पुन्हा एकदा नीट बघितलं तर अवाक झाले. दोन्ही दुकानं काढून टाकली आहेत, संपूर्ण लूक्स बदलेले आहेत आणि काळाची गरज लक्षात घेऊन घराचं पॉश  इस्पितळात रूपांतर केलेलं दिसतंय, झटकापटकी. 

अनेक रुग्णांना नक्कीच फायदा होईल ह्यात शंकाच नाही. अगदी रस्त्यावर ती बिल्डिंग असल्यामुळे जाणंयेणं, पोचणं, अँप्रोच ई. सगळं सोप्प आहे. ज्या चमूने ह्या रूपांतर करण्यासाठी शिवधनुष्य उचललं ते फारच धन्य आहेत, माझ्या दृष्टीने. इतकं सोप्प नाही ना राहत्या घराचं इस्पितळात रूपांतर करणं. बघावं ते नवलच. मग तिथे राहणारे कुठे गेलेत असतील? का त्यांनी हा निर्णय घेतला असेल? किती खर्च आला असेल? राहत घर म्हणजे निवासी जागा आणि इस्पितळ म्हणजे व्यावसायिक, मग हे सगळं कसं काय बदल केले असतील?असे अनेक विचार आणि प्रश्न माझ्या मनात आले म्हणून लिहावसं वाटलं. 

#Transformation-of-building #Hospital #House #Useful-for-patients #Reasons-of-transformation #Residential #Commercial #Paradigm-shift 

एक झंझावात

हि सप्टेंबर २०१७ ची गोष्ट आहे. एक दिवशी एक तरुण मुलगी आली माझ्या केबिन मधे अचानक. त्या आधी अनेक जण होते माझ्या आजूबाजूला. ती शांतपणे थांबून राहिली आणि माझ्या आजूबाजूची गर्दी ओसरल्यावर आली माझ्या जवळ आणि एकदम मान हलवत म्हणते कशी सही हवी आहे मॅडम तुमची, मी "जुनिअर रिसर्च फेलो (JRF)" आहे. आणि सही साठी कागद पुढे केला. मी वाचायला घेतला आणि त्यांना बसायची खूण केली. छोटासाच फॉर्म होता त्यामुळे पट्टाकिनी वाचून झाला / नजर फिरवून झाला. मग मी म्हटलं काय करायचं ठरवलं आहे तुम्ही ह्या संशोधनात?. थोडक्यात, पट्टाकिनी, सरळ आणि अभ्यासपूर्वक उत्तर मिळालं, नवीन ताजा विषय होता. मग मी माझी थोडी पार्श्वभूमी सांगितली, अजून काय करता येऊ शकत ते सांगितलं आणि सही दिली. बाप रे हे सगळे इतके फटाफट झाले कि आज पण मला माहित नाही, मी विचारल पण नाही कि त्या अचानक माझ्या कडे आल्या कश्या? तिथून जो जोरदार प्रवास सुरु झाला, अहाहा, ज्याचं नाव ते.   "जुनिअर रिसर्च फेलो" ते "सिनिअर रिसर्च फेलो (SRF)" ते PhD हा जंगी प्रवास होता.

८ जुलै २०२१ ला त्यांच एक पर्व संपुष्टात आलं आणि दोन नवीन प्रवास सुरु झाले, एक त्यांच्या संशोधन पूर्ण केल्यानंतरचा आणि दुसरा मला आता विद्यावाचस्पती अर्चना ह्यांच्या सोबत पुढे अगणित काम करायचे आहे त्याबद्दलचा.  

ह्या २०१७-२०२१ च्या कालावधीत आम्ही खाचखळगे अनुभवले, उंच भरारी पण मारली, अनेक लेख लिहिले, काही प्रसिद्ध झाले कारण ते आवडण्यासारखे लिहिले गेले होते, आणि बरेचसे आवडले नाहीत पण... पण खूप शिकायला मिळालं, एकत्र वाटचाल खूप आठवणी, शिकवणी देऊन गेली हे मात्र नक्की. अनेक नवीन गोष्टी प्रथम केल्या, जसे दोन पेटंट्स लिहिले, प्रसिद्ध पण झाले, अमेरिकेची वारी झाली कारण मायक्रोसॉफ्ट ला आमचं कार्य आवडलं आणि त्यांनी आम्हाला अनुदान दिले, एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर चक्क चार दा, शिवाय आमच्या संशोधनावर लेख प्रसिद्ध केला ई.

विद्यावाचस्पती अर्चना साठी पण हा प्रवास फार सोप्पा होता असे नाहीच, कारण उच्च मध्यमवर्गीय गृहिणी आणि आईला सर्व सांभाळून, खूप गोष्टी प्रथम करायच्या होत्या, इंग्लिश ह्या भाषेत सहज सुलभ गोष्ट जगाला पटेल अशा भाषेत प्रत्येक लेखात मांडायची होती, नवीन संगणकाची भाषा आणि इतर लागणाऱ्या गोष्टी शिकायच्या होत्या, पण हे आणि इतर बरेच काही अगदी हसत त्यांनी वेळेत उभं केलंच.  त्यांच्या जिद्दीला, चिकाटीला आणि सुसांगतेला माझा सलाम. सर्व मुली ज्या संशोधन कार्यात येऊ इच्छितात त्यांना खूप शिकण्यासारखं आहे अर्चना कडून.

मला प्रत्येक पदोपदी त्यांची संशोधन कार्याशिवाय प्रत्येक कामात ह्या कालावधीत बहुमोलाची मदत झाली. कुठलंही काम असू दे फक्त सांगायचं, झालच म्हणून समजा. "वेळेचं गणित" सांभाळण्याची, माणसं संभाळणायची शिस्त वाखाणण्यासारखी आहे अर्चनाची. कदाचित ह्या सगळ्या गुणांमुळेच त्यांना हे यश प्राप्त झालं. 

खूप कमी विद्यार्थ्यांना नक्की संशोधन काय करायचं आहे हे स्पष्ट नसतं, असलंच तर कसे करायचे ते ठरलेलं नसतं, वेळ पाळणं अवघड होत बहुतेक वेळा ई. पण सुस्पष्ट प्लॅन, झोकून द्यायची तय्यारी, वेळेच्या आत सगळी काम, ऐकणं सांगितलेलं, ग्रँट्स वेळेत पूर्ण करणं, नवीन गोष्टी पटापट आत्मसात करणं, अमेरिका वारी आणि तेथे कामामुळे विद्यालयांचं नाव करणं, दोन पेटंट्स आणि अनेक एकामागून एक साध्य झाल्या जणूकाही झंझावातच.

डॉ. अर्चनाची अशीच सतत प्रगती होऊ दे हि ईशचरणी प्रार्थना.   

#Symbiosis #Symbiosis-university #PhD #JRF #SRF #AzureGrant #Microsoft #AI4Earth #Publications #Patents #PhDJourney

रविवार, १८ जुलै, २०२१

The Dreams ऑफ इंडिया

मी जेव्हा ऑफिशिअल रिव्हूवर झाले काही जर्नल ब्लिशर ची त्या आधी त्यांचे काही ट्रैनिंग्ज करावे लागतात आणि त्यात बरेच काही शिकायला मिळते. त्यात कशाला महत्व द्यायचं हे पण शिकवलं / सांगितलं. अर्थात संशोधन कामाची माहिती लिहिलेल्या लेखाचं नाव पण तस्संच भन्नाट असावं हि माफक अपेक्षा असतेच. तसेच काहीसे मला ध्यानात आले गेली अनेक वर्ष, विविध लेख वर्तमानपत्रात, सोशल मिडिया ई. वर वाचतांना. किंबहुना वर्तमानपत्राचे नाव हे पण तितकंच महत्वाचं माझ्या दृष्टीने.  शीर्षक फार मोठं काम करून जात, मन जिंकण्याचं, वाचकांचं. आज पुन्हा एकदा त्याचा मला प्रत्यय आलं म्हणून हा लेख प्रपंच. त्यात वर्तमानपत्राचे नाव पण प्रसंगानुरूप बदल हा मला फार भावला. आधीच टाइम्स ऑफ इंडिया हेच मला फार भावलेलं नाव त्यात आज आपले खेळाडू ऑलम्पिक सारख्या दिग्गज खेळात सामील होण्यासाठी मार्गक्रमण करणार त्याकरता TOI  ने त्यांचं शीर्षक The Dreams ऑफ इंडिया असं बदललं आज पुरत. वा वा, ज्यांच्या कोणाच्या डोक्यात हि सुपीक कल्पना आली आहे त्यांना माझा साष्टांग दंडवत. तुफान च. TOI अक्का DOI मेड माय डे. आजचा दिवस इतका स्फूर्ती ने सुरु झाला कि ज्याचं नाव ते. शतश: धन्यवाद आणि असेच नवीन ताजे अनुभव देत राहा माझ्या सारख्या सगळ्या वाचकांना.

#TOI #Times-of-India #Newspaper

सुगंध तपासून बघण्यासाठी

अत्तर, पर्फुम, टाल्कम पावडर ई. विकत घेतांना सगळ्यांनाच वाटत कि ह्याचा सुगंध विकत घेण्याआधी समजला तर फार उत्तम, नाही का? ह्या माणसाच्या नेहेमीच्या सवयीमुळे असेल कदाचित अनेक शोध लागले, संशोधन झालं आणि त्यामुळे सगळ्यांनाच त्याचा फायदा झाला, विकत घेण्याआधी समाधान मिळालं, सुगंधाची खात्री मिळाली. काय काय शोध लागले, एक तर सॅम्पल ठेवण्यात आले ठिकठिकाणी, विशिष्ट कागदाच्या पट्ट्या उपलब्ध करून दिल्या गेल्या म्हणजे नेमका सुगंध कळतो आणि उगाचच मनगटावर / हातावर / इकडे-तिकडे सेंट लावून बघायची गरज नाही दुकानात, कधी कधी कोणाकोणाला त्यामुळे चुरचुरतं पण, असो. छोटेखानी बाटल्यांचा सेट पण शोधून काढण्यात आला आणि तो फारच उपयुक्त सिद्ध झाला, आवडीचा निघाला.

टाल्कम पावडर उत्पादकांनी थोडीशी वेगळी शक्कल लढवली / शोधून काढली. पावडरच्या डब्यावर जे वेष्टण असते, जो रंगीबेरंगी कागद चिटकवलेला असतो त्याच्या एका विशिष्ट भागावर सुगंध उपलब्ध करून दिला. कागदाचा तो भाग नाकाजवळ आणला कि पावडरचा नेमका सुगंध समजतो / लक्षात येतोच. अहाहा, मला तर हि आधुनिक कल्पना फारच भावली. काय काय काढतील.... मला खरंच नक्की माहित नाही त्यांनी काय केलंय, हा एक अंदाज फक्त मांडला. असं पण असेल कि पावडरच्या डब्याच्या अगदी वर तशी ओळ लिहिली आहे ठळक अक्षरात, म्हणजे वरच्या भागातून नाही म्हटलं तरी कणभर नेहेमीच ती बारीक अवस्थेतली पावडर बाहेर येत असणार आणि त्यामुळे विकत घेणाऱ्याला सुगंध मिळत असणार. कारण कितीही सुंदर पॅकिंग केलं तरी डब्बा हालला म्हणजे शक्यता आहे पावडर चे कण न कळत बाहेर येण्याची. आणि अगदी त्याच ठिकाणी ती ओळ पण, मग काय, एका दगडात दोन पक्षी. भारी हुशार आहेत हा हे पावडर वाले, काय जागा शोधून काढली आहे सुगंध चाखायची. वा वा, मस्तच.

तुम्ही सगळ्यांनी पण हे अनुभवलं असेल ना मंडळी, नाही? अरे मग पॉंड्स पावडर चा तो नवीन जांभळा डब्बा उंच असा मोठा हातात घ्या, निरीक्षण करा, वाचा, अनुभवा आणि मग तुम्हाला माझी हि अनुकथा आठवेल. 


#ponds #pondsmagicpowder #talkampowder #fragrance #TestOfFragrance #Innovation #Scents #Perfumes #perfumetester

शनिवार, १७ जुलै, २०२१

सोफा ने चहा चाखला

माझ्या सोफ्याला पण आज चहा हवा होता बहुतेक, पिला कि पठ्याने, अगदी गरमागरम असाच.

अहो आज एकाच वेळी दोन गोष्टी करत होते, जरा कप धरताना, बिस्कीट हातात घेतांना डिचमळला आणि ओम नमः शिवाय, सांडला चहा माझ्या हातून. असं म्हणण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने म्हणायला आवडतं मला.  नेहेमीच.

मी लहान होते त्यामुळे माझ्या जर कपड्यांवर काही सांडलं तर मला ते अजिबात आवडत नसे, माझ्या साठी आणि त्या कपड्यासाठी पण फा$$$$र वाईट वाटायचं मला. बास मग काय रडू यायचं. ते बघून मग माझ्या बाबांनी तेव्हा एक अगदी पिटुकली युक्ती शोधून काढली. अर्थात सर्वच आई-वडील हे करत असतीलच, पण माझ्या साठी ते फक्त माझे बाबाचं करायचे, असं होत काहीस. सांडलवंड झाली कि ताबडतोब बाबा म्हणायचे कसे, "अरे वा वा, आज तुझ्या बरोबर फ्रॉकला पण खाऊ घातलं वाटतं?" आणि मग मोठ्याने दोघात हशा पिकायचा. मी कमी होते का, कधी कधी त्यांच्या हातून पण सांडायचं शर्टवर तर मी पण मग तसेच म्हणायचे. असं चालायचं आमच्या दोघांचं काहीबाही. आज त्या पिटुकल्या आठवणी पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. मी माझ्या मुलांना लहानपणी पण असेच सांगितले होते आणि आज पण सांगते गरज पडल्यास.

चहा ऐवी तैवी सांडलाच होता थोडा, मग आधी हातातला उरलेला चहा बिस्कीट चा आनंद घेण्याला मी प्राधान्य दिलं, मग साफसफाई केली. मज्जा आली, बाबांची पुन्हा एकदा प्रकर्षाने आठवण झाली. 

#Tea #Memories #Tea-spilled #Dad-memories #SofaLovedTea #Tiny-Memories #Dads-The-Great #Positive-Approach #No-Cry

हुबेहूब प्रतिकृती

मी जरी शिक्षण क्षेत्रातच नोकरी करते तरी देखील माझी मुलं लहान असतांना त्यांच्या शाळेच्या सुट्टया आणि माझ्या सुट्ट्या अनेकदा जुळून येत नसत. त्यामुळे मग मी ऑफिसला जाताना आणि ते घरी असल्यावर मला काहीतरी उपक्रम / activities ठरवाव्या लागायच्या, समजावून सांगाव्या लागायच्या. तो एक मोठा कार्यक्रमच असायचा. पण माझी शहाणी मुलं ऐकायची. असेच एकदा वर्तमान पत्र चाळतांना R K लक्ष्मण ह्याचा अप्रतिम फोटो किंबहुना कार्टून आलं होत. त्यात आधीचे आणि अत्याधुनिक असे लक्ष्मण सर हातात TOI घेतलेले दाखवले होते. बास, त्या दिवशी मग तेच काढून ठेवा मी ऑफिस ला जावून येते तो पर्यंत, असं सांगितलं. "हो मम्मा" म्हटले आणि लागले कामाला. माझ्या गाडीची आतुरतेने वाट बघत दोघे हातात आपआपले अप्रतिम चित्र घेऊन उभे होते, दारात संध्याकाळी. आत्ता पण माझ्या डोळ्यात पाणी उभं राहील आहे ते सगळं आठवून. माझी मुलं म्हणून नाही पण त्यांच्या वयाच्या मानानी  भन्नाट च काढली होती दोन्ही चित्रे. आणि दोन्ही त्यांच्या पद्धतीने, वेगळी अशी, हुबेहूब पेक्षा पलीकडची.

काल वर्तमानपत्रात एका इन्शुरन्स कंपनीची जाहिरात होती त्यात एक छोटीशी कन्यका हातात रंगबिरंगी छत्री, बूट, केश / वेशभूषा भन्नाट अशी केलेली, गेले काही दिवस झोमॅटो ची ती लाल गाडी + माणूस + टोपी ई. ची जाहिरात झळकते आहे, आणि अश्या अनेक जाहिराती कदाचित रविवार म्हणून अनेक वर्तमानपत्रात दिसल्या आणि हे सगळं आठवलं. आज माझी लेकरं लहान असती तर त्यांना हे सगळं म्हणजे सगळं काढायला सांगितलं असत मी, त्यांनी काढलं पण असत आणि ते हुबेहूब काय त्यात त्याची दोघांची कलात्मक भर पण पडली असती. आज अर्थातच त्यांचं वाढलेलं वय, डोंगराएवढा अभ्यास आणि शर्यत ह्या सगळ्यांमुळे मला सांगणं योग्य वाटत नाही, पण लिहायला, आठवणीत रममाण होण्याकरता तर काही अडसर नाही ना, मग बास, माझ्या करता तेच पुरेसं आहे. ते दोघे एकदा स्थिरस्थावर झाले कि मग किंवा अधेमधे विरंगुळा / बदल म्हणून त्यांची आवड + कला त्यांनी जोपासावी हि अपेक्षा आणि प्रतीक्षा पण त्यांच्या अजून कलात्मक गोष्टी बघण्याची. 

सुदैवाने दोघांमधे एक स्पर्धा / चुरस असायची त्यावेळी लहानपणी, वेळेआधी संपवणे हे ध्येय असायचे, त्याकरता असंख्य वेळा घड्याळ बघितलं जायचं, उत्कृष्टच काढण्याचा प्रयन्त असायचा, ऐकायचे, नवीन काहीतरी करायला मिळाल्याचं समाधान असायचं..... आई ग, हि यादी फारच मोठी आहे माझ्यासाठी. फारच हृदयस्पर्शी आठवणी, अगदी नगण्य पण मौलिक फक्त माझ्यासाठी.  Love you V n V.

#AwesomeMemories #Memories #Drawing #ExactCopyOfDrawing #EngagingActivity #WholeDayActivity #HolidayActivity #Art #UniqueArt #BlessedKids


2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...