शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

Difference between pulse and pulses

 

Someone recently sent me a system to test, check and validate. the name of the system was something like "pulse management, monitoring and classification" etc. i am not able to recollect the exact name now. By reading that name of the system itself I was sooo happy because one of my PhD scholar is also working on BP, so thought of connecting her with this person who developed this system. 

 

And then wanted to surf through the entire document before testing the system, the moment I started going through report I saw images of Dal / Grains which are used in Indian and other kitchens daily. I got a shock of my life, started thinking about Sujog therapy where I have heard that even grains are alive and can utilize their energy to heal individual etc. so thought that what a extra innovative idea... 

 

But it was actually a classifier to group dals so that a new comer will be able to identify these pulses properly. OMG. while explaining this to my daughter i said why there is an additional s in pulse only becoz of that fact that we cannot use only one grain for sowing, cooking etc. it always comes in group and hence the name pulses, but the pulse is only one to check with living beings. 

 

A uniquely huge experience and learning for me. OMG. me n my daughter had a blast, huge laugh after many days, i was literally in tears. superb...

 

To listen to this Anukatha: https://youtu.be/WWbwELKZeFw

सोबती

ज्यामुळे एका कळीचं फूल झालं आणि ते इतक्या वर्ष जगलं, बहरलं, मोहरलं आणि विविध रंगानी फुललं देखील, अनेक वर्षाची त्याची साथ सांगत होती, सवय इतकी झाली होती कि त्या सोबती बरोबर इतके वर्ष सरले, रोजनिशी व्यवस्थित पार पडली, गाडी चालवली, कचेरीची आणि घरची काम झाली, अधे-मधे थकवा आला पण तो हि अंगवळणी पडला होता. महत्वाचं म्हणजे मला जेवढी ह्या सोबतीची सवय झाली होती कणभर जास्तच त्याला देखील झाली होती हे नक्की. कारण आता मला सोडून जातांना त्याला अतीव दुःख होतंय. त्याला कदाचित माहित नव्हतं कि हि साथसंगत काही वर्षांचीच होती ते. त्यामुळे तो आता इतक्या प्रकारचे नखरे करतो आहे कि ज्याचं नाव ते, म्हणजे न भूतो न भविष्यती असे, कल्पनातीत नाही असे. कधी त्याची त्रास देण्याची दिशा म्हणजे माझे पाय कधी पाठ तर कधी मनःस्थिती आणि शारिरीक दोन्ही दुखणी द्यायला बघतो. मला स्पष्ट कळतंय कि माझ्या सोबतीला खरंच किती त्रास होतोय मला सोडून जाताना पण मी थांबवू शकत नाहीच. 

 

ही जगाची रीत आहे किंबहुना काही ठराविक क्षेत्रात "त्याच्या" येण्याचा मोठा उत्साह मनवतात, खूप लोकांना बोलावतात अगदी छोट लग्नच जणू. मग जातांना किंवा गेल्यावर का नाही बोलवत? का नाही आनंद साजरा करत? अशी प्रथा का नाही? असायला हवी ना? मला मान्य आहे सगळ्या प्रथा ह्या फार विचारपूर्वक मांडल्या आहेत आणि साजऱ्या केल्या जातात कारण त्यातुन काही संदेश दिला जातो. पण संदेश देता यावं अश्याच साठी फक्त समारंभ का? सोबती सोडून गेल्यावर तर जास्त गरज भासते कदाचित काही जणांना, मग नवीन प्रथे बद्दल विचार करावा असं मनात आलं म्हणून हे…… दर महिन्याला आनंद सेलीब्रेट करायला हवा. 

 

https://youtu.be/l6x4PIYsETw

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

लग्नाचे ठिकाण...


  अगदी पूर्वी मला जे वाचनात आलं आणि जे ऐकलं त्या प्रमाणे लग्न हे मुलीच्या दारातच लावलं जायचं, बहुतांशी, कारणं अनेक आहेत,

vकदाचित जागा मोठी असेल, सगळे वऱ्हाडी मावतील अशी,
vसोय,
vपद्धत त्या वेळची आणि
vअर्थात पैशाचं गणित देखील.
 त्यानंतर विविध हॉल उपलब्ध झाले, भाड्याने घेतले जात आणि तेथे लग्न लागत असे. बऱ्याचदा अनेक कुटुंबांमध्ये ठराविक गावी किंवा गावाच्या देवळातच लग्न लावण्याची पिढ्यांपिढ्या रीत आहे. मग काळ बदलला आणि प्रसिद्ध ठिकाणी, शहराबाहेर लांब, देशाबाहेर ई. स्थळ / ठिकाण लग्नासाठी जास्त भावली. त्यात भर म्हणजे हॉटेल मध्ये सुद्धा लग्न लागत होतीच कारण पुन्हा तीच, सोय, एका छताखाली सगळं उपलब्ध वगैरे.
 पण मला ह्या सगळ्या विविध ठिकाणांवर लग्न लागतात आणि त्या नंतर टिकतात ह्याचा काही संबंध आहे का? हा विचार आज मनात आला,म्हटलं लिहावं. पत्रिका बघून, मुहूर्त बघून, ठिकाण विचारपूर्वक ठरवून, थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेऊन, मंत्रोपचारांत आणि सगळ्या संस्कारानी युक्त असं साग्र संगीत मिश्रण आणि वास्तव्य ह्यात मग का तफावत आठळते? मग ह्याच चपराख उत्तर / रामबाण इलाज काय?  माझ्या मते प्रत्येकाने आनंदाने सगळ्यांना समजावून सामावून घेत प्रत्येक दिवस घालवावा म्हणजे मग लग्न कुठे झालं होत आणि मुहूर्त काय होता ई. कदाचित फरक पडणार नाही. तुम्हाला काय वाटत मंडळी?
https://youtu.be/HR7fgjZGeeE
Contact mail id for your views and comments if any: drpreetimulay@gmail.com

थिएटर

 आधीच्या काळी थिएटर ला जाण म्हणजे फारच खालच्या दर्जाचं समजलं जायचं, अर्थात त्याची कारणं हि तशीच होती आणि तो काळ हि वेगळाच होता. त्यानंतर थिएटर ह्या शब्दाला एक कलेच्या आणि वेगळ्या चांगल्या दृष्टीने बघितलं गेलं, अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्व बहरले गेले आणि फार पुढे आले ह्या थिएटर मुळे. अतिशयच सुंदर कलाकृती निर्माण झाल्या आणि प्रत्यक्ष जाणकार प्रेक्षकांपुढे सादर करणं नाटक, संगीत नाटक, एक पात्री ई. हे आव्हानात्मक आहे / होत.
 त्यानंतर सिनेमा हा प्रकार प्रकाशात आला आणि मोठा पडदा हि उदयास आला. अनेक नवीन कलाकार पुढे आले, तंत्रज्ञान बहरत गेलं, दृकशाव्य माध्यम, रंगीत संगीत पूर्ण माध्यम प्रचलित झालं आणि मग काळ जसा सरकत गेला तसा ह्या थिएटर चा कायापालट झाला, एक स्क्रीन ते अनेक स्क्रीन अशी क्रांती झाली. आणि मग थिएटर मध्ये जाण हा एक फार नित्याचा भाग झाला, सगळ्या कुटुंबासहित.  तर अशी हि साठा उत्तराची कहाणी... आज सगळेच आतुरतेने थिएटर आणि सगळंच जनजीवन पूर्ववत होण्याची वाट पाहत आहेत, म्हणजे पुन्हा मोठा पडदा, मोठा आवाज, अतिमोठा वातानुकूलित हॉल, आणि विचारापलीकडले महाग खाण्याचे पदार्थ उपभोगता येईल.   
https://youtu.be/hQ7jeqiilxo

निरोप समारंभ ... Farewell


 

 दोन जानेवारी पासून मी कचेरीत बस ने जायला लागले. त्यामुळे मला सकाळी नाश्ता, डब्बा ई. झाल्यावर थोडी उसंत मिळाली आणि मग काय माझी आणि लेकीची बडबड सुरु झाली ताबडतोब. विषय होता फेअरवेल / अक्का निरोपसमारंभ. ती सध्या बारावीत आहे आणि ह्या वर्षी सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना बोलावून निरोप समारंभ शाळेत किंवा बाहेर होणे अवघड आहे. ह्याच तिला फारच वाईट वाटत आहे.
 दहावीत फारच एन्जॉय केला ह्या मुलांनी त्यामुळे ह्या वर्षी झाला असता कार्यक्रम तर मज्जा आली असती आणि खूप साऱ्या नवीन आठवणी निर्माण झाल्या असत्या. पुढल्या वर्षी पासून सगळे आप आपल्या ठिकाणी व्यस्त राहणार आणि त्यामुळे सगळा वर्ग एकत्र येणं महा-अवघड. त्यावर मी दोन मुद्दे मांडले, १. आपण सगळं नीट झाल्यावर पुढाकार घेऊन करू छोटीखानी समारंभ, २. माझ्या शालेय जीवनात आम्ही सगळेच मित्र मैत्रिणी इतक्या बिनधास्त होतो, सगळ्या गावभर हुंदडायचो, सगळयांच्या घरी यथेच्छ खायचो, ना आम्हाला ना आमच्या पालकांना आक्षेप होता. मग अश्या वातावरणात वाढलेले आम्ही, किती मिस केलाय आमच्या मित्र मैत्रिणींना आमचं आम्हालाच माहित.
 पण आता तंत्रज्ञानामुळे पुन्हा सगळे आलेत एकत्र आणि पुढल्या वर्षी बहुतेक सगळेच थोडेसे मोकळे पण होतील मग आम्ही देखील काही तरी झक्कास प्लॅन करू. आणि त्यानंतर पुढे करत राहू. नेहेमीप्रमाणे तिच्याशी बोलताना, तीच ऐकतांना मज्जा आली. 

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

फोटो शूट ...

 

 मागच्या दिवाळी च्या दिवसातली गोष्ट असेल हि, आमच्या एका ओळखीच्या कुटुंबात अतिशय उत्साहाचं वातावरण होत कारण त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं होत. डिसेंबर ची तारीख हि पक्की झाली. आणि नवीन होणार जोडपं संपूर्ण एक दिवस ठरवून गावाबाहेरच्या ठिकाणी गेले "प्री वेडिंग शूट" करायला. प्रचंड धमाल आणि अप्रतिम फोटोस. त्यानंतर लग्नाचे फार आगळे वेगळे फोटोस काढले / काढून घेतले, मग काय विचारात नवरात्रीच्या आधी काही दिवस अजून एक भरभरून फोटोस चा अल्बम तय्यार झाला, कारण "प्री बेबी शूट" केलं त्यांनी, पुन्हा एकदा खरंच जगा वेगळं आणि आता छोटा सांता, काय दिसतोय फोटोत, अहाहा. ह्यावेळी तिघं मिळून बेबी शूट म्हणावं लागेल. जबरदस्त. कमाल आहे उत्साहाची. सगळेच आकाशाएवढे प्रचंड उत्साही. त्या फोटोग्राफर ला गाठून, जागा निवडून, अनेकविध पोशाख आणि त्याला शोभतील असे दागदागिने आणि बरेच काही. अप्रतिम.
 फक्त फोटो काढतात म्हणून नाही पण माझ्या मते ह्यालाच भरभरून जगणं म्हणतात, उत्साह निर्माण करणं, नवीन गोष्टी आत्मसात करणं, सातत्य टिकवणं आणि हे सगळं परम आनंदाने करणं ....  जबरदस्तच. 
YouTube Audio Link:  https://youtu.be/m2A7eiJX9SM

प्रथम तुला वंदितो

 २१ आणि चतुर्थी ……..
 
आज नवीन वर्षातला कचेरीतील माझा पहिला दिवस. काय योगायोग आहे बघा, मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे २१ हा आकडा गणपती बाप्पाना फारच प्रिय, आज दोन जानेवारी, त्यांची चतुर्थी आणि वर्षाचा पहिला दिवस कचेरीत, अजून काय हवं. अश्या शुभ दिनी कामाची सुरवात नवा जोम देऊन जाणार ह्यात काही शंकाच नाही. सर्व जण मंगल दिवसाला सुरवात करत आहेत म्हणजे फारच अप्रतिम. अर्थात सगळेच दिवस सारखे आणि शुभ पण.

पण आज कणभर जास्त मंगलमय वाटतंय. सगळेच गुरु, आधुनिक गुरु आणि संत सांगतातच न कि आपण मुहूर्त बघून जन्माला येत नाही, तो दिवस ती वेळ आपल्या हातात नसतेच, मग काय तो जीव शुभ नाही, उपयोगी नाही, असं काहीही नसतंच खरंतर. ह्या आज कालच्या नवीन दिवसात लग्न पण माणसांच्या सोईनुसार होत आहेत, प्रत्येक वेळी मुहूर्त बघितला जाईल आणि तो सोयीचा असेलच असे नाही. 

YouTube Audio Link:  https://youtu.be/i_8uo6ccWkw

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...