सध्या मी माझे स्वेच्छा निवृत्तीचे दिवस अगदी अत्यानंदाने व्यतीत करत आहे. जे अनेक वर्ष केले नाही म्हणण्यापेक्षा कामाच्या घाई मुळे, घड्याळाच्या काट्यांवर पळावे लागत असल्यामुळे ते सहज शक्य झाले नाही ते करण्याचे ठरवले आहे. किंवा असं म्हणावं लागेल ते करण्याचा मानस आहे. मी कोण करणारी हो, माझा सगळा भार बाप्पांवर. मग काय ते म्हणतील ती पूर्व दिशा. काम कर म्हटले कि मी उभी राहते? बस म्हटले, पायांनी सांगितले कि पट्टाकिनी आरामात बसून राहते, बास. इतकं सोप्प ठेवलंय मी सगळं. सध्या मी शेफ आहे, मावशी चिरा-चिरी करून देतात आणि मी मस्त फोडण्या घालते. मज्जा येते आहे. हे सगळं आमच्या पुरतं मर्यादित होतं तो वर ठीक आहे, पण अचानक पाहुणे यायचं ठरलं, अर्थात एकचं व्यक्ती जास्त दिवस राहणार होता, पण तरी देखील दडपण आलं, घेतलं, आणि ते देखील प्रचंड प्रमाणात. जमेल कि नाही? सगळं चारी ठाव व्हायला हवं? म्हणजे बघा ना, एका बाजूला मीच म्हणते कि सगळी माझी भिस्त बाप्पांवर, आणि दुसऱ्या बाजूला मी प्रचंड दडपण घेतले. काय हे? विचित्र आणि असं नको व्हायला हवे होते, किंवा मी करायला हवे होते, पण झाले खरे. पहिला दिवस सरला आणि मी हूश झाले. एक दिवस कमी झाला होता. दुसरा उजाडला, खूप जास्त कठिण वाटलं मला, पण तो देखील निघून गेला दिवस, व्यवस्थित सगळं पार पाडलं "त्याने". असं करता करता ११ दिवस झाले आणि मुक्काम वाढला कि, आता? पण आज ११ दिवस पूर्ण झाल्यावर निश्चित झालं कि बाप्पा जिंकला. त्याने केलं सगळं निमूट पणे. लोकांना मी डोळ्यासमोर हातवारे करतांना, कामे करतांना दिसत होते पण खरं तर तो बाप्पाचं होता हो सगळे कष्ट करणारा. जिंकले त्याने, माझा बाप्पा जिंकला ह्यातच मला आनंद आहे, खूप आनंद आहे. त्याने काहीही आडवं येऊ दिलं नाही, पायात जोर कायम ठेवला, डोकं चालू राहिलं, माझ्या मदतनीस / मावशी पण आल्या सांगितल्या प्रमाणे. खरंच हूश्श्श झालं मला. मनःपूर्वक धन्यवाद बाप्पाला आणि सॉरी पण, माझ्या साठी खूप त्रास झाला तुला रे. कित्ती काळजी असावी तुला माझी, वेळोवेळी प्रचिती देतोस बघ. पुन्हा एकदा शतशः धन्यवाद.
सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४
शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४
२०४०: ११ नंबर
हा नंबर माझ्यासाठी फारच मौल्यवान आहे. अनेकांसाठी सुद्धा. कारण आपली नकळत ओळख होते ह्या आकड्याशी आपल्या लहानपणी, साधारण ९-१० महिन्यांचे असतो तेव्हापासून. "स्वतःच्या पायांवर उभे राहणे", त्यानंतर एक एक पाऊल टाकत पुढे जाणे, अनेक प्रयोग करून बघणे आणि अत्यानंदाचा आस्वाद घेणे सुरु होते. त्या पायात शक्ती असतेच पण ती अजून छान बळावते, सुधृढ होते जसे जसे आपण मोठे होतो तसे. माझ्या देखील बाबतीत हेच झाले. खूप म्हणजे खूप लवकर मी चालायला आणि बोलायला शिकले आणि खरंच खूप आधीच पायावर पण उभी राहिले. मग त्याच पायांचा एक प्रयोग म्हणून एक दुचाकी नावाचे प्रकरण उभे ठाकते, आधी सायकल मग मोटर लावलेली दुचाकी शिताफीने बाळगायला तेच आकडे साथ देतात. हिम्मत वाढवतात आणि आपली पोच पण मग वाढते. हे सगळं होत होतं तेव्हा अनेक चारचाकी देवाच्या कृपेने, बाबांच्या कष्टाने, सरकारच्या कामासाठी म्हणून दारात उभ्या असायच्या, पण त्या बाबांच्या आणि बाबांसाठी आहेत हे माहित होते. त्याचा कधीच गर्व केला नाही, किंवा दुरुपयोग तर नाहीच नाही. "दोनाचे चार झाले" आणि मग हक्काची, स्वतःची म्हणावी अशी गियरयुक्त दुचाकी वापरता आली, वाऱ्याची वेगळ्या पद्धतीने गप्पा मारता आल्या. मग काय चार चाकी अर्थात सेकंड-हॅन्ड पण दारात दिमाखात उभी राहिली. मग चाराचे आठ झाले त्यामुळे चारचाकीची व्याख्या आणि व्याप्ती वाढली, भली मोठी गरज असल्यामुळे नवीन सेकंड-हॅण्डच पण चालवायला मिळाली, आणि हो ह्या दोघी तेव्हा, २२ एक वर्षा पूर्वीच गियर नसलेल्या अश्या अत्याधुनिक श्रेणीतल्या होत्या. नवीन कोरी, उंच बांधा असलेली त्या वेळची
सर्वोत्कृष्ट कार मग दाराची शान झाली. आम्ही दोघे दिवसभर घराबाहेर, दोन वेगळ्या दिशेला जाणारे, त्यामुळे मग अजून एक कुटुंबीय लवकरच सामील झाला नकळत. थोडी मोठी, आणि अनेक वर्षांपासून मनात दडवून ठेवलेल्या ब्रँड ची चारचाकी हवी असं होतं त्यामुळे मग १५ वर्षांपूर्वी थोडी मोठी आणि आधुनिक अशी राणी आली, जुनी देऊन नवीन घेतली. आता मी, मुलं सगळेच एक छान वेगळ्या आणि जास्त आनंद घेण्याच्या वयात पोचलो होतो. त्यामुळे हि गाडी अगदी बघितल्यापासून एक वेगळं नातं निर्माण करून गेलीच. अनेक दूरचे प्रवास झाले, कचेरीत मला ने आण करणं झालं, त्या करता मला अभिमानाने कमवता आलेलं स्टिकर ह्या माझ्या राणीने मिरवलं १०+ वर्ष. पाऊस, पाणी, ऊन, वारा आणि सगळ्यापासून तिने आमचं सौरक्षण केलं, अनेक प्रसंग आले पण ती डगमगली नाहीच कधी. मला तर कधीच तिला पंक्चर च्या दुकानात नेलेलं आठवत नाहीच. माझं सगळं बोलणं ती गपगुमान ऐकून घ्यायची, तक्रार न करता, मध्ये मध्ये न बोलता किंवा चुका न दाखवता. फारच साथ दिला तिने मला गरज असतांना. खूप म्हणजे खूप आठवणी आहेत तिच्या सोबतच्या. पण आता ती मला / आम्हाला सांभाळणं अवघड होत होतं, कारण निवृत्तीनंतर दररोजची देखभाल होत नव्हती. त्यामुळे तिला काल परवाच म्हटलं "दिल्या घरी तू सुखी राहा" आणि तिची मांडव परतणी झाली.
त्यामुळे आता पुन्हा एकदा मी ११ नंबर वर आले. जमेल तिथे ह्या ११ नंबरच्या बसने जायचे, नाही तर जवळपास जायला तीन चाकी भाड्याने घ्यायची, कामासाठी भाड्याने चारचाकी मिळतेच कि, मग आता हे सगळं पोटभर अनुभवायचं. कसं असतं नाही? 'पुन:श्च हरी ओम!', इथेच वर्तुळ तय्यार होतं, पूर्ण होतं. अगदी सगळे अनुभव आणि आनंद घेत घेत पुढील वाटचाल करायची. वाईट न वाटू देता, कठोर होऊन काही निर्णय घ्यावे लागतात त्यातलाच हा एक. अवघड आहे पण पर्याय नाही. प्रेमात पडलं कि कदाचित असं होतं वाटतं?
२०३९: नो फरक / समान
मला निश्चित आठवत नाही पण गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कानावर हे एक वाक्य पडतं आहे कि मुलामुलींमध्ये काहीही फरक नाही. मुलांचे प्रत्येक क्षेत्र आता म्हणजे गेली अनेक वर्ष मुलींनी पादाक्रांत केले आहेच. वादच नाही त्यात. फार हिम्मत वाल्या आहेत मुली. शिक्षण क्षेत्र म्हणा, नोकरी म्हणा, गाडी चालवणे, पैसे सांभाळणे आणि उभे करणे, मोठ्या पदांवर काम करणे, देश सांभाळणे अगदी सर्वच कामे त्या शिताफीने करतात, असंख्य उदाहरणे आहेत ज्याने हे सिद्ध झाले आहे. आणि फक्त भारतात नाही तर सगळ्याच देशांमधे, जगभरात हे दिसून येतं, सातत्याने. कुठलीही गोष्ट मुलींना जमत नाही अशी नाहीच. किंबहुना अनेक बाबतीत त्या सरस आहेत, जे मुलांना कधीच शक्य होणार नाही ते ह्या सहजी करून जातात. असे सगळे वाक्य आपल्या सातत्याने कानावर पडतात, वाचायला आणि अनुभवायला देखील मिळतात.
काल त्यात एक सहज भर पडली आणि मला खुद्कन हसू आले, आवारात आले नाहीच मुळी, म्हणून खरं तर हा पंक्ती प्रपंच. तर माझी हि एक सवय आहे कि मी जर स्वयंपाक घरात उदाहरणार्थ चहा करत असले तर काय आधण येई पर्यंत फक्त त्या भांड्याकडे एकटक बघत बसू, का उभी राहू? छे छे, अशक्य कोटीची गोष्ट आहे हि. आधण ठेवलं कि मी इतर अनेक कामे उरकते, आटोपते, करते, भांडी लावते, ओटा आवरते गरज असेल तर, ओटा पुसून घेते, आजूबाजूला जे असेल ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते, पुढे काय भाजी वगैरे करायची आहे, ती सर्व काढून ठेवते, तेवढ्यात फ्रिज वर हात फिरवला जातोच. पण मी मुलगी, माझ्या ऐवजी हे सगळं अनुभवलेला मुलगा जेव्हा त्याच स्वयंपाक घरात जातो तेव्हा तो शिस्तीत फक्त उभा राहतो, बास. त्याला आजूबाजूचे काहीही म्हणजे काहीही दिसत नाहीच, काही म्हणजे काहीच नाही, त्याला कामे म्हणतात, ती करायची असतात हे खिजगणतीतच नाही, अजिबात ते शिवत देखील नाही. "हे सगळं करायलाच हवं का? आत्ताच? मी सध्या चहा करतो आहे ना?" वरून हे सगळं ऐकावं लागतं जर मी चुकून काही म्हटलं तर. आणि हे दोघांच्या बाबतीत सारखंच आहे, सारख्या वयाच्या मुला आणि मुलीच्या बाबतीत. का असू नये? सध्याचा काळ वेगळा आहे, फक्त मुलींनीच कामे करायची हे कुठे नमूद केलेलं आहे? आणि का? ती काय बिनपगारी मोलकरीण नाही ना तुमच्या घरची. अश्या सगळ्या विचारांची भजी झाली आहे डोक्यात अनेकांच्या. त्यामुळे मी थोडीशी बावळट वाटते अनेकदा अनेकांना. पण असो. मस्त वाटलं मला हा विचार मनात आला तेव्हा. भन्नाट आहे सगळं.
2038: Guilt faded away
I began my professional career at
a very young age. It was my mother's perspective on life; at the time, her core
beliefs were to "learn to survive," "learn to earn," or
"prove that earning is easy." And as a result, I carried on being a
working mother full-time. When I had to leave my most precious children with
someone, I used to cry uncontrollably. However, I overcame myself and
continued, and the guilt began to mount. I still carry a heavy burden of regret
over not staying at home to give my kids my whole attention. For someone like
me who enjoys sleeping peacefully, it is nevertheless so terrible that it has
turned into a nightmare. The guilt started to surface more and I began to
struggle more. Eventually, I felt like I needed professional help because I had
kind of preserved and nurtured that guilt within me.
Around the same time, I came
across a lot of write-ups, articles, videos, podcasts, interviews, etc., in
which there were many examples. For instance, someone said she stayed with her
grandmother consistently from the age of 8 months to 18+. Others portrayed
twins who were divided from birth and were entirely cared for by two
grandparents very happily. In other cases, parents kept their children with
grandparents because of work, further education, economic conditions, and other
reasons they knew.
I was inundated with remarkably similar yet distinct stories within the
same category. As these numerous stories appeared out of nowhere, seemingly
with a purpose, I began to recall a great deal of more stories from earlier
archives. Regardless of their upbringing, all children greatly admire and
respect their parents. And suddenly, it was as though I felt lighter than
feathers, as though my entire load had been lifted, or perhaps more accurately,
had begun to wash off from my shoulders. I am grateful for all the stories and
the channels via which they were shared with me. They have undoubtedly relieved
me of a great deal of baggage.
बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४
२०३६: एक वेगळी बाजू
आपल्या देशात इतके विविध पदार्थ का आहेत? त्या विविध पदार्थांमधे इतके वेगवेगळे मसाले किंवा जिन्नस का घातले जातात? आपली भाषा इतक्या हजारो शब्दांनी परिपूर्ण का आहे? आधीच्या काळी आणि आता सुद्धा काही ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती का होती / आहे? बहुतांशी मुलं (सगळी नाहीत, अपवाद आहेत) सदा काही ना काही कुरबुरी का करत असतात? "ससुराल गेंदा फुल... " असे गाणे का लिहिले गेले? असे अनेक प्रश्न माझ्या देखत उभे ठाकले आणि त्याचे उत्तर देखील ताबडतोब मिळाले. ते असे, कि जे सातत्य टिकवून ठेवतात ते आज ह्या जिन्नसाला तर उद्या त्याला नावं ठेवतात, असं महिनाभर / काही वेळ सुरु राहतं आणि मग ये रे माझ्या मागल्या सारखं पुन्हा ते मूळ पदावर / जिन्नसावर येऊन विराजमान होतात. आधी काही शब्द उच्चारले जातात, मग विविधता आणि त्यांची माहिती किंवा दरारा (त्यांच्या दृष्टीने) टिकून राहावा म्हणून विविध पातळीवर जाऊन "उचलली जीभ.." असं करायचं. म्हणून तर शिकलेत शाळेत आणि महाविद्यालयात जाऊन हे सगळे, उच्च विद्याविभूषित. एक जण असा कमी होता म्हणून मग बाकी बारी बारी सुरु होतात. काय मज्जा आहे ना विविधतेत एकता. कुठल्याही स्तरावरची मुलं असोत, शिकलेले, न शिकलेले, उच्च पदस्थ, अगदी साधे मजुरी करणारे, गोरे काळे, उंच ठेंगणे, सगळे. आत्ता लक्षात आलं, इतके पदार्थ, जिन्नस, शब्द मग कसे वापरले जातील ना? वाया जाईल सगळे कष्ट आधीच्या लोकांनी केलेले, जिन्नस शोधण्यास, पाककृती तय्यार करण्यात, शब्द संग्रह मोठा करण्यात ई. म्हणून हे उपटसूंभ सुरूच ठेवतात आणि त्यांचं अस्तित्व अजिबात कमी होऊच देत नाहीत. पुढील व्यक्तीने आता ठरवायचं कसं, काय आणि कितपत वागायचं ते, सगळं सांभाळून.
मला फक्त आज पर्यंत एकाच बाजू ठाऊक होती ती म्हणजे प्रत्येक दहा मैलावर भाषा, संस्कृती,खाद्य पदार्थ, बोली असं सगळं बदलतं. अनेक कचेरीतुन कर्मचारी वैविध्य देशात कामाला पाठवले जातात कारण त्यांनी तेथील सभ्यता, आणि चांगल्या गोष्टी, आदर्श, आदर कसा बहाल केला जातो हे सगळं शिकून यावं, आत्मसात करावं, आणि ते त्यांच्या कृतीतून दृश्य दिसावं, इतकं कि बाकी लोकांमधे पण आवश्यक बदल घडेल. अनेक पद्धतीने पदार्थ होऊ शकतो, प्यासिव्ह ऍक्टिव्ह व्हॉइस, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग शाळेत शिकवले आहे ते वापरण्याकरता हे विसरून चालणार नाही. सगळं आधी द्या तर घ्या, मिळावा असं काहीस असतं. विविध शब्द, चवी, संस्कृती, पद्धतीने हळूहळू व्यक्तिमत्व घडतं, घडायला हवं. पण अनेक ठिकाणी हे पाहायला मिळत नाही. हे दृश्य, चित्र नक्कीच बदलायला हवं. म्हणजे सगळेच गुण्या गोविंदाने नांदतील.
२०३५: स्वरूप बदल
अवंती नावाचा अर्थ अंतहीन, विनम्र असा आहे. अवंती हे नाव खूप सुंदर आहे आणि लोकांना हे नाव आवडते. मराठी प्रचलीत असे हे नाव आहे कारण या नावाचे स्वतःचे महत्त्व आहे. अवंती चा अर्थ अंतहीन, विनम्र असा आहे आणि अशी सुविद्य लेक, तिची वैशिष्ट्ये, स्वभाव आणि वर्तन त्याच्या अर्थानुसार असणारच. अजून काही ठळक वैशिष्ट्ये आहेत अवंती ची, स्थिर, शांत, घर प्रेमळ, तपशील देणारी, आज्ञाधारक, विश्वासार्ह, तार्किक, सक्रिय, संघटित, जबाबदार आणि विश्वासार्ह. (babynameseasy.com)
अवंती हे नाव सामान्यतः आश्चर्यकारक व्यवस्थापन कौशल्यांसह आशीर्वादित आहे. ती विखुरलेल्या दस्तऐवजांचा सारांश, क्लिष्ट परिस्थिती सांभाळून घेण्यात आणि संयमाने समस्या हाताळण्यात खूप चांगली आहे. आणि तिच्या कडे सुपर रिजनिंग पॉवर असल्यामुळे / तर्कशक्ती, तर्क-वितर्क मांडणे, तर्क समाविष्ट करून घेणे ई. सहज साध्य होते, जे संशोधन करण्यासाठी, म्हणजे विद्यावाचस्पती ह्या उंची वरचे, स्थराचे, फार महत्वाचे आहे. आणि ते अवंतीने करून दाखवलेच. माझी आणि ह्या अवंतीची, डॉक्टर. अवंतीची ओळख साधारणतः २०१३-१४ च्या दरम्यान झाली. आम्ही एकत्र एका खास प्रकल्पावर काम करत होतो तेव्हा. आम्ही दिड वर्ष एकत्र काम केले, बहुतांशी दररोजच, कारण कामाची उंची तशीच होती, खूप काही करून दाखवायचं होतं. अनेक दस्तावेज ठराविक पद्धतीने तय्यार करायचे होते, उभे करायचे होते. आणि आम्ही बहुतेक सगळ्या जणी पहिल्यांदाच ह्यावर काम करत होतो. ती एक वेगळी ऊर्जा होती आणि ती टिकवून ठेवायचे काम अवंती ने बखुबी निभावले, अर्थात ती ज्या एका बहुगुणी मॅडम सोबत काम करत होती त्या देखील होत्याच दिशादर्शक म्हणून. पण अवंतीने खूप मस्त सगळं घडवून आणलं. ती आधी आंतरराष्ट्रीय महाविद्यालयात शिक्षकेतर पद्धतीने आपले योगदान देत होती, मग ऐके दिवशी तिने शैक्षणिक क्षेत्रात येण्याचे ठरवले, ती भल्यामोठ्या संस्थेत रुजू झाली आणि तदनंतर PhD ला सुरवात केली. केवढा मोठा आणि वेगळा बदल होता तो. पण तिच्या मूळ स्वभावामुळे ते सहज शक्य झालं. एवढ्यातच आमची अवंती डॉ. अवंती झाली. करावं तेवढं कौतुक कमीच आहे अवंतीचं. मी स्वतःला लेखिका समजते, अर्थात लघुकथा किंवा अनुकथा टिपणारी एक मुलगी, पण मला सुद्धा योग्य शब्द सापडत नाही आहेत, जुळवाजुळव जुजबी करण्याचा हा छोटेखानी प्रयत्न आहे माझा. तिच्या भव्य याच्यापुढे हे चार शब्द फिके, पण खरंच लिहावसं वाटलं. म्हणून हा पंक्ती प्रपंच. खूप म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे डॉ. अवंती कडून निश्चितच.
2034: The paradigm shift
In Italian, Avanti, means
"forward." The Avanti kingdom once ruled over what is now the state
of Madhya Pradesh in ancient India. As I learnt more about this phrase, I
discovered that it is enduringly well-liked not just in India but in many other
nations as well. Whether this name stays in use as a child's name or the name
of any business, it also has some intriguing meanings such as infinite, humble,
modest, etc. That's why it's so well-known. "By keeping the name Avanti,
your child also starts behaving like the meaning of this name," stated one
of the most well-known websites. I will extrapolate this statement to all the
businesses that carry this meaning or operate under this name.
Given this context, allow me to
share one of my favorite experiences to date. Late 2013 or early 2014 was the
time. I was selected or elected to serve on the university-level committee for
the NAAC's Criteria-2, which encompasses a number of institutions. It is a
crucial and significant criterion to focus on. The team was made up of numerous
academic members from various institutes, and we truly collaborated closely
with each other. There were a number of reasons, the primary one being that
this was the first time we had ever undergone such extensive accrediting
process. The top of our criteria, the most modest and knowledgeable ma'am, came
in second.
The most significant, in my
opinion, was Avanti—a modest, amiable, and, I suppose, Mam's assistant at the
time. She was our driving force as she worked in the university's Academics
department and because of her overall demeanor, understanding nature, tireless
work ethic, attention to detail, time management abilities—the list goes on and
on. After some time, the same Avanti transitioned from non-teaching employment
experience to teaching. joined the most challenging flagship institute and
began her doctoral studies. What a paradigm shift, wow. It's OK for a teaching
faculty member to opt for a PhD after many years, but this was very different.
Ms Avanti recently demonstrated
her infinite capabilities by receiving a management doctorate. Truly amazing
accomplishment—she practically lived up to her moniker. Although I refer to
myself as a blogger, I am likewise at a loss for words when describing her
character, diligence, dependability, and approach to multitasking. There is a
plenty to learn from Dr.Avanti.
२०३३: मिसळणीचा / मसाल्याचा डब्बा
प्रत्येक भारतीय घराची शान, आन, बान म्हणजे स्वयंपाक घरातील सर्वात महत्वाची वस्तू, तो डब्बा ज्यात वैविध्य मसाले किंवा स्वयंपाक करण्यासाठी लागणारे महत्वाचे जिन्नस मांडलेले असतात. प्रत्येकाकडे कदाचित एकसारखे चित्र असायला हरकत नाही त्या डब्याचे पण कदाचित रंग वेगळे असू शकतात. जसा त्या अन्नपूर्णेचा सूर, ताल, लय त्या पद्धतीनेच विविध पदार्थांचे रंग खुलतील. तिला जे अत्यावश्यक आहे, जे गरजेचे आहे ते ते त्या डब्ब्यात पहुडलेले दिसणार सर्वांना. हा डब्बा म्हणजे तिचा मदतनीसच. प्रत्येकाची एक खासियत, एक चव, एक ढंग. तो त्या पदार्थाला त्याच्या पद्धतीने वृद्धिंगत करतो, इतका कि चव जिभेवर रंगळणाराच, कायम, किंवा बऱ्याच वेळ. तृप्त नक्की होणार खाणारा, चव घेणारा आणि संतुष्ट होणारे अनेक. विविध खण, छोटेखानी झाकणा वीणा असलेलं भाग, वाट्या किंवा तत्सम अशी ती डब्याची मांडणी. प्रत्येक कप्प्यात किंवा वाटीत एक मसाल्याचा जिन्नस. प्रत्येकाचा सुगंध वेगळा, जडण-घडण वेगळी, अनुभव वेगळे, ताकद त्याहून निराळी. आपआपली प्रतिष्ठा सांभाळत, आपले अस्तित्व जपत / टिकवत तरी देखील बाकीच्या अनेक जणांसोबत सुखाने ते नांदत असतांना आपण सर्वच बघतो. कित्ती म्हणजे कित्ती शिकण्यासारखं आहे ह्या सर्वांकडून. कोणीही स्वतःचा वरचढ पणा सिध्द करायला जात नाही मुळी, कोणीच श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाहीत हे त्यांना देखील ठाऊक आहे. ते पण सजीव आणि दोन पायांचे आपण पण वेगळ्या पद्धतीने सजीव गटात मोडणारे. पण खूप वेळा हे आढळून आले आहे कि आपण उगाचच जेष्ठा-कनिष्ठा च्या शर्यतीत गुंफून घेतो, कळत - नकळत, उगाचच, गरज नसतांना आणि त्याचा परीणाम अनेक जणांवर होतांना दिसतो. तो मूळ पदार्थ, चव साधणे, दिसण्यास लई भारी तय्यार करणे, ई. सगळे विसरुन भलत्याच्या पाठी लागतो, काही जण सतत. त्यामुळे एक विनंति वजा आग्रह आहे, आताशा स्वयंपाक घर हे क्षेत्र फक्त मुलींकरता मर्यादित राहिले नाही आहे. सगळेच खारीचा वाटा उचलतांना दिसतात, म्हणजे सगळेच ह्या मिसळण्याच्या, मसाल्याच्या डब्याशी ओळखीचे आहेत. मग फक्त काही मिनिटांकरता त्याच्या कडे बघू नका, त्याच्या कडून मस्त बोध घ्या. म्हणून तर आपल्या पुर्वाज्यांनी हि डब्याची संकल्पना शोधून काढली आणि वापरात आणली. त्या मागचं हे महत्वाचं कारण आहे असं समजा आणि सुरु व्हा, अत्यानंदाने, शांततेने आणि समाधानाने असंख्य, वैविध्य प्रकारच्या जिन्नसांसोबत पुढे जायला, मार्गस्थ व्हा.
२०३२: बरं झालं
तर त्याचं थोडक्यात असं झालं कि आज मी नेहेमीच्या पद्धती प्रमाणे सकाळी सर्वांसाठी न्याहारी तय्यार करायला सुरवात केली. काल खूप मस्त, तरोताजा मेथीची जुडी आणली होती बाजारातून, म्हणून सर्वांसाठी मेथी पराठ्याचा घाट घातला. माझ्या खाण्याच्या तक्त्याप्रमाणे आज थालिपीठ होते, म्हणून एक थालिपीठ करायला घेतले. गोळा मळतांनाच मला काहीतरी जाणवलं, थापतांना पण वेगळं वाटलंच, पण म्हटलं होईल मस्त. आणि सगळा स्वयंपाक उरकल्यावर मग मी ते थालिपीठ भाजायला घेतले. तवा ठेवला तापायला आणि त्याच्याकडे कुठे बघत बसू म्हणून थोडीशी बाकी कामे करायला घेतली. ती करता करता थालिपीठाकडे लक्ष होतं. म्हटलं उलटावं म्हणून उलथनं घेतलं आणि मस्त तुकडे पडले त्या थालिपीठाचे. मग काय एक एक तुकडा व्यवस्थित पुन्हा सजवून ठेवला गरम तव्यावर पूर्णपणे, दोन्ही कडून शिजायला. मस्त खुसखुशीत तय्यार झाले थालिपीठ लवकरच. हे सगळं करत असतांना मला माझ्या बाबांची प्रकर्षाने आठवण आली. ते जर आज माझ्या शेजारी उभे असते थालिपीठ करतांना, तर त्यांनी अत्यानंदानी म्हटले असते, "चला तुकडे करायला नको खाते वेळी, मस्त आयते तुकडे करून मिळाले. प्रत्येक तुकडा छान खरपूस भाजला गेला आहे, कारण छोटेखानी भाग आहे म्हणून. कित्ती सोप्प झालं हे". ई. त्या जुन्या पिढीतले असले तरी त्यांच्या तोंडी ठराविक, टिपिकल, वैशिट्यपूर्ण असे शब्द कधीच नव्हते, कि "साधं थालिपीठ करता येत नाही? मुलगी आहेस ना? शिकवलं नाही आईने का शिकली नाहीस तू ?" ई. असे. त्यामुळे त्या वेळ पासूनच मला हि अशी सवय. कारण प्रत्येकाकडून गडबड होतेच. आता आजचे थालिपीठ बघा ना? माझ्याकडच्या थालिपीठांना एक सवय झाली आहे, कालची आमटी, किंवा वरणाचा गोळा, उरलेली भाजी सकाळची ई. मस्त साग्रसंगीत घालून मग करायचे / थापायचे ते. पण आज भाजणीशिवाय काहीच उरलेले नव्हते त्यात टाकण्या करता, म्हणून महाराज काही अंशी रुसले, आणि तुकडे झाले उलटतांना, किंवा मी जरा घाई केली हलवायची, असे पण असेल. काही का असेना मला बाबांची उपस्थिती जाणवली, गरमागरम थालिपीठ काप खातांना / फस्त करतांना मज्जा आली, आणि आताशा जे सगळे आधुनिक गुरु सांगतात, समजावतात आणि आपण सगळे ते पाळण्याचा प्रयत्न करतो ते कित्येक वर्ष आधी मला माझ्या बाबांनी त्यांच्या दररोज च्या कृतीतून दाखवून दिले आधीच. क्या बात है? कित्ती भाग्यवान आहे मी. हे असं वागलं कि दोन्ही पक्ष एकदम शांत, घरातले वातावरण निर्मळ / हलकेफुलके असे, आणि त्यामुळे पुढच्या कामाला एक वेगळा विश्वासपूर्वक जोम येतो करायला. नाण्याची दुसरी बाजू बघणे, त्या प्रमाणे विचार करणे, वागणे ई. कित्ती महत्वाचे आहे हे ह्या छोट्या प्रसंगामुळे मला समजले.
शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४
२०३०: मानाचा ठेचा
मी इतक्यात एका दूरच्या भागात पहिल्यांदा गेले कारण तिकडे जायचे कधीच काहीच कारण नव्हते. ते ठिकाण बरेच दूर आणि नवीन असल्यामुळे, किंबहुना आताशा मी टॅक्सिने प्रवास करण्याला प्राधान्य देते. त्यात चार डोळे आहेत, सगळीकडे बघण्याची, टिपण्याची आधीपासूनच सवय आहे, त्यात मी फार मोठी खवैयि आहे, ह्या सगळ्याचा परीणाम म्हणजे मला एक पाटी दिसली. खूप चविष्ट, चवदार, अनोखी पाटी होती ती. आणि त्या पाटीकडे लक्ष जाणार नाही हे तर अशक्यच. त्यावर असं काहीसं लिहिलं होतं "ठेचा वडापाव", अहाहा च. असं वाटलं ना कि ताबडतोब गाडी थांबवावी आणि चव घ्यावी, पण काम पुढे उभं ठाकलं होतं त्यामुळे स्वतःला कसबसं आवरलं त्यावेळी. पण मला कल्पना फार आवडली. एक तर तो वड्यात जास्त प्रमाणात, म्हणजे व्यवस्थित चव येईल इतपत ठेचा घालत असणार, किंवा हिरव्या / लाल मिरच्यांचा ठेचा पावला लावत असणार, चटणी सोबत किंवा ऐवजी. असं काहीसं असणार, घरी आता नक्की करून बघते लवकरच.
हे काय कमी होतं आज कधी नव्हे ते खूप दिवसांनी इंग्लिश वर्तमानपत्र हातात घेतले चाळायला आणि काय महद आश्चर्य, एक पान भर जाहिरात आहे, शाकाहारी मांसाहारी दोन्ही पद्धतीचे पदार्थ नव्या ढंगात सादर केलेत. अर्थात इतकी मोठी जाहिरात म्हणजे असं च काहीसं असणार नाहीतर लाखात कोण कशाला खर्च करेल उगाचच. म्हणून बघितले तर माझे चार डोळे मला खूप काही वेगळे सांगत होते, खुणावत होते. चक्क विदेशी पदार्थ जे भारतात विकले जातात, भली मोठी कंपनी आहे ती, त्यांनी पण ठेचा आवृत्ती काढली आहे, क्या बात है नाही, सहीच.
म्हणजे बघा, त्या ठेच्याची महती कुठवर पोचली आहे ते आणि ठेचा हा काय चीज आहे, अद्भुत, जगावेगळी आणि कित्तीतरी वेळ जिभेवर रेंगाळणारी. अगदी प्रत्येक समुदायाला, वयोगटाला, आणि दर दिवशी भुरळ घालणारी अशी. मी चाट पडले आणि निःशब्द झाले ती जाहिरात बघून आणि वाढता ठेच्याचा सदुपयोग बघून. मस्तच.
शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४
२०२७: मातृभाषा आणि तंत्रशिक्षण
'नविन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०' हे २१ व्या शतकातील पहिले 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' आहे. ह्या धोरणानुसार शैक्षणिक पातळीवर अनेक बदल झाले आहेत. त्यातला एक मला भावलेला बदल म्हणजे मातृभाषेचा वापर. म्हणजे अगदी उच्च शिक्षणात सुद्धा मातृभाषा वापरावी, असा सल्ला दिला गेला आहे. ज्या काही महत्वाच्या घडामोडी असतील, किंवा शब्द असतील ते तसेच राखून पण समजावून सांगण्याचे काम मातृभाषेत करावे एवढेच. ते मला प्रचंड भावले आणि पराकोटीची इच्छा जागृत झाली मराठीतून तांत्रिक शिक्षण देण्याची. एका खूप दिग्गज प्राध्यापकांची ओळख देखील झाली त्याच दरम्यान जे हे धोरण येण्याआधीच मराठीतून शिकवत होते आणि त्याचा त्यांना फायदा पण दृश्य होता. मराठीतून समजावून सांगितल्यामुळे मुलांची प्रगती कुठेही खुंटली वगैरे नाहीच. त्यामुळे मला मनापासून वाटले कि मला अशी संधी मिळायला हवी. आणि असे एक महाविद्यालय आहे पुण्यात जेथे एक अख्खा वर्ग खास मातृभाषेतून शिकतो. त्यांची हि चवथी बॅच / तुकडी आहे जी खूप व्यवस्थित मराठीत मोठी होते आहे, वाढते आहे आणि मज्जा येते आहे. त्यांना काही तास शिकवण्याची सुवर्ण नाही तर प्लॅटिनम संधी मला मिळाली. मराठीवरचं माझं नितांत प्रेम, माझी मातृभाषा, माझं बालपण ज्या भाषेत झालं, अश्या भाषेत शिकवायचं म्हणजे अत्यानंद आहे माझ्यासाठी. आणि दुधात साखर म्हणजे, फक्त संशोधन कसे करायचं हे सांगायचं आहे विद्यार्थ्यांना, बास. मग काय सोन्याहून पिवळं असं झालाय मला. चार तास दिले होते, दोन पूर्ण झालेत. पुढील दोन तासात मी जागून घेणार आहे, कारण हे पहिल्यांदाच घडतंय. जे शिक्षक तेथे सातत्याने काम करतात त्यांना कित्ती समाधानी वाटत असणार. मुलांना किती सोप्प झालंय कारण मातृभाषेत समजावून सांगणार, कोणालाच उगाच इंग्लिश वापरायला नको आणि शिवाय प्रश्न पत्रिका देखील दोन्ही भाषेत छापली जाते, इंग्लिश मधला जर यदाकदाचित प्रश्न नाही उमगला तर पट्टाकिनी मराठी बघा आणि भन्नाट उत्तर द्या. आमच्या वेळी का नव्हतं असं मराठमोळं वातावरण महाविद्यालयांत, विद्यापीठात? उगाच तोडकं मोडकं इंग्लिश वापरावं लागलं मला. असो. आता आहे ना, बास, अजून काय हवंय?
२०२६: चवळी, तू सुद्धा?
मी अगदी लहानपणापासून "चोर" नावाचा शब्द अनेकदा घरी, स्वयंपाकघरात ऐकला, किंबहुना कानावर पडला. मला खूप जास्त उत्सुकता त्यामुळे मग मी त्याचा अर्थ शोधून काढलाच. मटकीशी मर्यादित अशी ती गोष्ट होती, जास्तीत जास्त मुगाला लागू पडत होती. मटकीची उसळ करायची म्हणजे चोराचा जप सुरु व्हायचाच. कारण आईला ते दोन-चार दा रोळून घ्यावे लागत असे, निवडावे लागत असे अगदी व्यवस्थित पद्धतीने, मागे पुढे करून. तरी देखील एखादा चोर सापडायचाच, दाताखाली यायचाच. अर्थात हे अगदी क्वचित होत असे, पण खात्री नसायची. तर चोर म्हणजे न भिजलेले, फुगलेले असे दाणे मटकीचे. त्या वेळी सगळं घरीच करावे लागत असे, त्यामुळे भिजवणे, बांधून ठेवणे, मोड आले कि मग उसळ, किंवा वडे होत असतं. आणि अनेक पदार्थ जसे कि भेळ, मिसळ ई.
आताशा तर सगळेच आयते मिळते मोड आलेली कडधान्य त्याला उपवाद नाहीत. एक टप्पा कमी झाला असला तरी देखील ते कडधान्य नीट निवडावे लागतातच, ह्या चोरांच्या पायी. मुगात माझ्या अनुभवाप्रमाणे जास्त आढळतात लपलेले चोर आणि हे दोन्ही दाणे इतके बारीक असतात कि बराच वेळ लागतो निवडायला.
आज मी उडालेच. जरा हटके बदल म्हणून चवळी भिजवली. आताशा बारीक आकाराची चवळी मिळायला लागली आहे. जसा बारीक / इन्स्टंट साबुदाणा म्हणे पोटाला त्रासदायक ठरत नाही तशीच हि बारीक चवळी. बारीक म्हणजे नेहेमीच्या आकारापेक्षा थोडा कमी आकार, भिजवल्यावर बऱ्यापैकी मोठा होतो तो दाणा. ह्या पठ्ठीला इंग्लिश भाषेत "ब्लॅक आय बिन" म्हणजे "डोळा असलेली" ती, असा काहीसा शब्दशः अर्थ. म्हणजे जिला डोळा आहे, सदृश सगळं मटकी किंवा मुगासारखे नाही, अगदी बारीक आणि एक आकार, एक रंग ई. त्यामुळे डोळा आहे, आकार मोठा आहे, मोड येण्याची जरूर नाही, पट्टाकिनी भिजते आणि शिजते देखील. थोडेसे खोबरे घातलेले वाटण-साटंण घातलं कि भलतीच चविष्ट होते. इतकी वर्ष मी ह्या डोळस मैत्रिणीसोबत आहे, तिला वापरते आहे. पण आज अचानक काय वाटलं कुणास ठाऊक पण म्हटलं एक शिट्टी घेण्याआधी, मस्त धुतल्यावर एकदा नजर फिरवावी आणि बघते तर काय, भला मोठ्ठा प्रश्न उभा ठाकला ना माझ्या पुढ्यात, आणि मी विचारलं "अगं चवळी, तू सुद्धा?" हे असं कधीच पहिले झालं नव्हतंच कधीही. चवळीत चोर? बाप रे, अशक्य आणि अवघड. एक नाही, दोन नाही तर चक्क तीन. हे माझ्या दृष्टीने अशक्यच आहे. ह्या ब्लॅक आय बिन ला, ठळक आणि मोठ्या आकाराच्या डोळस जिन्नसाला विनंती आहे कि जरा अजून मोठे करा डोळे पण चोर शिरू देऊ नका, ते तसेच पडिक राहू देऊ नका तळाशी, करा काही तरी हालचाल. तुम्ही इतर कडधान्यासारख्या नाही आहेत हे लक्षात ठेवा आणि वागा.
मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४
२०२३: ताठ मानेने जगणे
अर्धशतकी वाटचाल झाली कि, स्वेच्छा निवृत्ती स्विकारली कि, थोडेसे हात मोकळे झाले कि, मग "ताठ मानेने जगणे" ह्या म्हणीचा, ह्या वाक्यांशाचा अर्थ नीट समजतो, किंबहुना उमगतो, स्पष्टपणे. मला तरी आत्ता जास्त प्रकर्षाने तो कळला. तर त्याचं असं झालं "सारे कळत नकळतच घडले", खूप मोकळेपणाने अनेक आधुनिक गुरूंचे विचार ऐकायला मिळाले, वेळच वेळ हातात असल्यामुळे. अनेक कार्यक्रम बघितले, ऐकले, खूप वाचन झालं आणि त्यामुळे अनेकविध गोष्टी विचार करण्यासारख्या समोर उभ्या ठाकल्या. आपल्या संपर्कात आलेले प्रत्येक जण, हि संपूर्ण सृष्टी, आणि इतर सगळे किती महत्वाचे आहेत, होते, त्यांचं महत्व पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं मला. अर्थात मी काही दुसऱ्यांचे ऐकून किंवा वाचून गप्प बसणाऱ्यातली नाहीच मुळी. मी माझे ध्यान, योगासन, व्यायाम आणि मनन - चिंतन करत असतांना एक जाणवलं ते म्हणजे मानेचं महत्व.
हा असा एक अवयव आहे ज्याच्यामुळे किंवा ज्याच्या मार्फत श्वासाची, अन्न-पाण्याची देवाण-घेवाण होते. नैसर्गिकरीत्या भलं मोठ्ठं डोकं, मेंदू, चेहेऱ्यावरचे सगळे अवयव ह्या सगळ्यांचं वजन पेलण्याची ताकद ह्या मानेत आहे. सर्वदूर बघण्याची कला ह्या मानेच्या हालचालीमुळे शक्य होते. ताठ मानाने जगण्याची कला काय जगणं हिच तर शिकवते, कारण ह्याच तो कक्ष, हीच ती खोली आणि हीच ती पोकळी / जागा जिच्यामुळे बोलणे, विचार पोचवणे शक्य होते, माझ्या मते. अर्थात ह्या कक्षात प्रत्यक्षात काय काय होतं अंतर्गत भागात हे जरी खूप खोलात माहिती नसलं तरी जाणवलेलं फक्त इथे मांडण्याचा प्रयत्न आहे. डोक्यात काय शिजतंय, डोळ्यांनी काय टिपलंय, कानावर काय पडलंय, काय जाणवलं आहे, हे सगळं शब्दात मांडणे ह्या मानेच्या साहाय्याने शक्य होतं. त्यात माझ्यासारख्या आवाजाच्या क्षेत्रात काम करणारीला तर मानेचे आभार मानावे तेवढे कमीच.
सगळ्या अवयवांच्या साथीने, मला माझे विचार एखाद्या विषयांबद्दल अनेक वर्ष माझ्या विद्यार्थ्यांसमोर मांडता आले उत्कृष्टपणे, ताठ मानेने जगता आलं, त्यामुळे प्रत्येक अणुरेणूंचे तर मी आभार मानतेच, आणि मानेचे खास, जिच्यामुळे माझ्या नावाला, कार्याला मान प्राप्त झाला. धन्यवाद.
२०२१: पक्की सँडविच पिढी
सतत शिकणारी अशी अनोखी पिढी म्हणजे जे माझ्यामते, कुठे तरी वाचलंय १९६५-१९७५ का १९७०-१९८० च्या दशकात म्हणे जन्माला आले. अगदी फोन नाही ते स्मार्ट फोन हा प्रवास, सगळं हाताने करणारे ते अत्याधुनीक, सायकल ते सूर्य उर्जेवर चालणाऱ्या गाड्या चालवणारी अशी कित्येक उदाहरणे देता येतील. त्यातलाच अजुनक एक, म्हणजे नवीन मणी त्या माळेतला, दुर्लक्षित पण आत्यंतिक महत्वाचा असा. असो.
तर ह्याच पिढीतील असंख्य मुलींनी ठराविक सासू-सून नाते बघितले, अनुभवले आणि निभावले देखील. बऱ्याच सुनांनी त्यांच्या सासू-सासऱ्यांची मनःपूर्वक सेवा केली, अगदी मग त्या गृहिणी असोत नाहीतर खिंड लढणाऱ्या, नोकरी करणाऱ्या असोत. जीवाचे रान करून सगळ्या स्तरावर व्यवस्थित कामे निभावली, सगळं आपल्या अंगावर घेतलं, सणवार ते आधुनिक प्रकार सगळं म्हणजे सगळंच.
पण आता अख्खी पिढी बदलली, वारे वेगळेच वाहू लागलेत. त्यामुळे बहुतांशी मंडळी लग्न नाही अशीच भाषा बोलत आहेत. बरं हो-नाही म्हणत केलंच लग्न तर नक्की जोडीदार कोण येईल हे ठाऊक नाही, खात्री नाही, काही मदत होईल हे देखील माहित नाही. त्यामुळे ह्या सुना ज्यांनी त्यांच्या आधीच्या पिढीचं केलं, त्यांचं सगळं सांभाळलं आणि पुढील पिढीला पण घडवलं त्या जेव्हा थकतील तेव्हा काय?
सोयी आहेत, जेष्ठ नागरीक ह्यांच्या साठी वेगळी घरे आहेत, घरी परिचारिका ठेवता येईल, असे अनेक पर्याय आहेत, म्हणजे अजून नवीन शिकणं आलंच. नवनवीन गोष्टी शिकणं काही सुटत नाहीच, कंटाळा येऊन चालणार नाहीच. एक तरणोपाय आहे, शेवट प्रयन्त ठणठणीत राहण्याचा प्रयत्न करायचा, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्तरावर नेहेमी.
हे नवीन जुन्या नव्याचं सँडविच, छोट्याश्या हातभर दुकानांपासून सुरु झालेलं आकाशाएवढ्या मॉल कडे वळलं, आणि अखंड शिकत राहिलं आज तागायत. काय मुहुर्तावर जन्माला आले सगळे हे.
२०२०: कंडिशनर
एखादी गोष्ट चांगल्या अवस्थेत ठेवणारे एक द्रव्य, अनुकूलक. माझ्या लहानपणीपासून ते स्नातक पदवी मिळेपर्यन्त शिकेकाई हाच एक प्रकार होता, शाम्पू उदयास आला नव्हता, मग तर कंडिशनर ह्याची गोष्ट सोडाच. पण हो आमच्या केसांना, लांबसडक, कात्री न पहिल्या अश्या सहज सुंदर केसांचे कंडिशनींग नक्की होत असे. कसे? सांगते. मस्त कडत्त पाण्याने (म्हणजे अर्थात सोसेल आमच्या तापमानाचे हो) जेव्हा केस धुतले जातात तेव्हा शांतपणे ते जाडसर टॉवेल ने बांधून ठेवण्याची पद्धत असायची. अगदी अनिवार्य, अपरिहार्य असे होते ते. त्याची कारणे देखील आहेत. एक म्हणजे तेव्हा फक्त आठवड्याच्या आठवड्याला पुरेसे व्हायचे केस धुणे. आणि तो बहुतांशी रविवार असायचा, म्हणजे केस धुवून बाहेर पडल्या पडल्या गाडीवर हवेत, वाऱ्यात जायला नको, सुट्टीचा हक्काचा दिवस असल्यामुळे. त्यामुळे बांधलेले केस सोडायची घाई नसायची. मला अजूनही आठवतंय कि आई कधी कधी सगळं काम झाल्यावरच केस मोकळे करायची, कारण तेव्हाच तीचा हात रिकामा व्हायचा आणि अर्थात केस चुकून इकडे तिकडे पडू नयेत हे एक कारण शिवाय असावं. तेव्हा तसेही केस नेहेमीच बांधून ठेवायची प्रथा होती. म्हणजे बघा ना ती वाफ, केस धुतल्या नंतरची कित्ती वेळ मुरायची, ते केस त्या मस्त वातावरणात कसे पहुडायचे अगदी अनुकूलक परीणाम साधेल तसे किंबहुना कणभर जास्तच मस्त, अर्थात माझ्यामते.
आपण अनेकवेळा ऐकले आहे, किंवा आपल्या कानावर पडले आहे कि मितभाषी असावे, त्याचे पण खूप फायदे आहेत, अर्थात नेहेमी करता नाही पण अगदीच गरजेचे असेल तर बोलावे. दोन उदाहरणे घेऊ या, म्हणजे मग मुद्दा नीट समजेल. एक म्हणजे खाता पितांना चूप, त्या खाण्यावर लक्ष केंद्रित करा, मग गप्पा मारा. आपल्या भारतात बहुतांशी गरम पदार्थांना जास्त महत्व आहे, पहिल्या वाफेचे हे फार जगावेगळे चविष्ट लागतेच ह्यात दुमत नाहीच. आधी चहा चे उदाहरण घेऊयात. चहा घेते वेळी, घेतल्यानंतर एक प्रयोग हमखास करून बघा. तेव्हा गप्पा नकोच. काही जणांना चहा प्यायला रे प्यायला कि घोटभर का होईना पाणी प्यायची सवय असते. ते पण टाळा, एक प्रयोग म्हणून. आणि मग बघा कसा अनुकूलक परिणाम साधता येतो ते. तो परिणाम फक्त घश्यापुरता मर्यादित न राहता तो संपूर्ण पचन संस्थेपर्यंत लागू पडतो. सगळ्या अंतर्गत भागांना धन्य वाटतेच. एकदा मस्त वाफाळता चहा सेवन केला कि एकटे असतांना डोळे बंद करा, कानांवर हात ठेवा एखाद दोन मिनिटं आणि परिणाम बघाच, अनुभव घ्या. अगदी नाक-कान-घसा ते पोटापर्यंत मस्त वाटतं. हेच जेवतांना सुद्धा होते गरमागरम आमटी ओरपली कि, रस्सा भाजी वर ताव मारला कि ई. बघा तर एकदा अनुभव घेऊन.
नवीन जन्मलेल्या बाळांना देखील बघा ना मस्त मालिश आणि त्या नंतर आंघोळ झाली कि घट्ट गुंडाळून झोपवतात. थंडी चा मौसम असेल तर धुरी देतात, ई. हे सगळं पण अनुकूलक प्रभावी ठरण्यासाठीच. एवढंच कशाला, मोठ्यांची मालिश झाल्यावर, कडक पाण्याने आंघोळ केल्यावर देखील मस्त पांघरुणात घुसून झोपण्याचा उपदेश दिला जातोच.
आता नवनवीन औषध उपलब्ध आहेत तरी देखील अगदी लहान बाळांना जर सर्दी झालीच तर न्हाणी घरात सगळीकडे खूपच गरम पाणी, त्यात विक्स घालून अनुकूलक असा उपयोग होतो, चोंदलेले नाक मोकळे होते आणि आई हातात घेऊन उभी राहिलेली असते तिला पण एक संरक्षक असा प्रभावी उपचार सहज घडतो.
जिभेला जमेल तेवढं गरम दूध हळद घेऊन (अर्थात औषध म्हणून, अर्धा छोटा कप) लगेच डोक्यावरून पांघरुण घेऊन झोपल्यावर अनुकूलक परिणाम साधला जातोच, सर्दी पडसं झालं कि.
असे अनेक मस्त मस्त रोजच्या रोज बघायला, अनुभवायला मिळणारे किस्से सांगता / मांडता येतील जे अनुकूलक आहेत, कंडिशनर आहेत. त्यामुळे तो कृत्रिम असा थंडावा सोडा, गारेगार सतत सेवन नकोच, आपले पदार्थ आपल्याला जास्त योग्य आहेत हे लक्षात घ्या आणि अनुकूलक हा फक्त केसांना उपयोगी नसतो हे देखील ध्यानात ठेवा.
अनेकांचा दिवस गरम पाणी+मध आणि बऱ्याचदा लिंबू असा होतो. मी एका पणजीशी बोलले, संवाद साधला, कुठल्याही बाजूने त्या पणजी वाटल्या नाहीत. त्याचं खास रहस्य म्हणजे त्या कधीच गरम पाण्याशिवाय कुठलेही पेय घेत नाहीत. थंड तर सोडाच, पण साधे पाणी / माठातले ई. पण नाहीच, कटाक्षाने त्यांनी ते पाळले घरच्या जेवणासहित. त्याच पद्धतीने अनेक जणांचा दिवस गरम पाण्याने, हळद-दूध घेऊन संपतो. त्यामुळे कंडिशनींग कसे करायचे मुळतः हे ठरवा जे संपूर्ण स्वास्थ्य बहाल करेल प्रत्येकाला.
२०१९: भागिले १२,१६,१७,१८...
काल परवाची गोष्ट. ऐकिव आणि प्रत्यक्ष ह्यातला फरक आणि फिकर मला जाणवली. तर त्याचं असं झालं कि माझ्या ऐच्छिक निवृत्ती नंतर मला "व्यावसायिक कर" भरावा लागणार आहे, माझा माझा, वेगळा. आधी हे पगारातूनच केलं जायचं, म्हणजे कचेरीतले लोक इतकी वर्षे हे सगळे निमूटपणे सांभाळत होते, मला अगदी खरं सांगते त्याची भनक पण नव्हती. हो माहिती होतं कि असा एक कर भरावा लागतो, भरला जातो, मी भरते ई. पण. हा पण इतका मोठा असेल हे समजले नाहीच कधी. मी सध्या अगदी छोटी-मोठी सेशन घेते इकडे-तिकडे, जसे बोलावतील तसे. जास्त पळापळ नको होते, त्यामुळे ठरावीक तास द्यावे हाच तर खरा उद्देष होता निवृत्तीमागचा.
एका विद्यापीठाच्या कर-सल्लागाराचा मला फोन आला ह्या "व्यावसायिक करा" संदर्भात. आणि त्याच वेळी त्याने एक साधा-सोप्पा प्रश्न केला मला, "मॅडम तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे सध्या?". अर्थातच माझ्याकडे त्याचे उत्तर तय्यार होते कारण मी बघितले होते कि मी ह्या एका वर्षात, नोकरदार ते व्यावसायिक हा बदल टिपतांना किती उत्पन्न मिळवले? तो आकडा सांगतांना अभिमान वाटला कारण तेवढे मला पुरेसे आहेत ह्या क्षणी, माझा महिन्याचा खर्च भागवण्याकरता. कारण देवाच्या आणि ह्यांच्या कृपेने डोक्यावर छत आहे, सर्व सोयी सुविधा आहेत, चारचाकी आहे, मग फक्त महिना उत्कृष्ट रीत्या सरण्यासाठी लागणारी पुंजी आहे. कुठलीही तुलना नाहीच, मीच हे सगळं मागून घेतलं होतं आणि ते मला मिळालं. मी पूर्णवेळ नोकरी करतांना जेवढा महिन्याचा पगार होता त्याला आता भागिले १२,१४,१७,१८... असा तो आकडा आहे, त्यामुळे ती मीच का? हा एक छोटासा प्रश्न / विचार मात्र मनाला शिवून गेला. अर्थात घर-दार पेक्षाही महत्वाची अशी जबाबदारी पण नाही, त्या मुळे देखील गाडी सुरळीत सुरु आहे, आणि ती अशीच सुरु राहणार ह्याची खात्री आहेच, कारण "त्यांचा" आशीर्वाद आहे. पण तो आकडा सांगतांना जरा कडा ओल्या झाल्या आपसूकच. पण चढता क्रम हा टिकून राहिला आहे हे जास्त मनाला भावणारी बाब आहे. आधी मी लहान वयाच्या मुलांकडूनच फक्त रोजच्या रोज शिकत होते. आता विविध वयाच्या, अनुभवाच्या आणि वेगळ्या विद्यालयांच्या मंडळींकडून आत्मसात करते आहे, बऱ्याचश्या गोष्टी. मला त्यांना काही क्लुप्ती कथन करता येत आहेत, अनुभवातून शिकलेल्या अश्या. त्यामुळे पैसे किंबहुना पॉकेट मनी तर मिळतो आहेच शिवाय पुणे दर्शन देखील घडतंय. अजून काय हवं? हे खूप आहे, समाधान आहे आणि एकाच कमाईवर दोनदा कर भरायचा का? ह्या प्रश्नाचे उत्तर देखील आता शोधणे सुरु आहे. एक म्हणजे मिळकत कर आणि दुसरा आता हा व्यावसायिक? एकच माणूस, मिळणारी एकच रक्कम पण कर मात्र दोन. असेल काही त्यावर तरणोपाय, शोधावा लागेल निश्चितच.
आनंद, समाधान, पायांना आराम, कुठलेही वेळापत्रक नाही, सर्वांशी भेट, कार्यक्रमांना हजेरी निवांतपणे दिलेली असे आणि अनेक विविध गुणाकार पण आहेत हो. थांबले नाही मी, पण गती कमी केली आहे, प्रचंड प्रमाणात.
सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४
२०१८: अनोखी बात
काल नेहेमीप्रमाणे एका विद्यापीठात मला बोलावणं आलं होतं आणि मी संशोधन करण्याचे सोपे उपाय, असं समजावून सांगत होते, ते देखील इंग्लिश भाषेत. ऐकणारे फक्त मराठी नसल्यामुळे आणि शिवाय "क्रुत्रीम बुद्धिमत्ता" वापरून शिकवायचं म्हणजे इंग्लिश भाषा आलीच ओघाने. माझं लक्ष फक्त शिकण्याकडे केंद्रित होतं आणि त्या पुढे माझ्या पुढे बसलेल्या समुदायाकडे. पण जेव्हा मी सगळं त्या दिवशीचे काम आटोपून निघाले तेव्हा मला दोघी जणी काही बोलल्या. त्यातली एक लिफ्ट चालवणारी होती. आणि दुसरी शिक्षकेतर कर्मचारी होती एका विभागात. अगदी जेथे माझं सेशन सुरु होतं त्याच्याच दारात, अगदी थोड्याश्या अंतरावर ती लिफ्ट होती. त्यामुळे तिच्या कानावर माझे शब्द पडत असणार. दुसऱ्या मॅडम ज्या होत्या त्या त्याच विभागात काम करणाऱ्या असल्यामुळे त्या येता - जाता ऐकत होत्या, दोन तीनदा म्हणे थोड्याश्या थांबून पण ऐकत होत्या. दोघीही म्हणाल्या कि आम्हाला काहीही समजत नव्हते तुम्ही काय सांगत आहेत पण ज्या पद्धतीने सांगत होतात ते आवडलं आम्हाला.
हो, मी विसरलेच. ह्या आधी, माझं सेशन जसं संपलं तसं एक जण आल्या कि आणि भरभर खूप काही सांगायला लागल्या. त्यांची बसण्याची जागा म्हणे शेजारच्या लॅब / प्रयोगशाळेत आहे. आणि त्यामुळे त्यांना सगळंच ऐकू येत होतं. त्या नेमक्या माझ्याच विषयाशी संलग्न होत्या त्यामुळे त्यांना म्हणे खूप आवडलं. हे होत नाही तर कॉरीडॉर मधे मागल्या सेशनला एक मॅडम होत्या. त्यांची गाठ-भेट झाली. त्या म्हणाल्या, मी संशोधनाचे धडे गिरवायला तर सुरवात केली आहेच, पण शिवाय तुमची शिकवण्याची लकब, पद्धत पण अंगिकारली आहे. त्यात काही माझे, माझ्या विद्यार्थ्यांनुसार बदल केले आणि त्यामुळे खूप मज्जा येते आहे. ह्या मॅडम होत्या ते सेशन मागल्या वर्षी मी घेतले होते.
म्हणजे बघा, थोडेसे शिकलेल्या लिफ्ट-ताई, शिक्षकेतर कर्मचारी, आणि दोन शिक्षिका, आणि ह्या सगळ्या माझ्यापेक्षा तरुण, ह्या पिढीतल्या, त्यांचे आपले विश्व, पद्धती, विचार आणि आचार. पण त्यांना माझ्या सारख्या मराठमोळ्या वातावरणातून आलेल्या मुलीचे वर्ग आवडले हे ऐकून खूप बरं वाटलं, उत्साह आला, नवनवीन प्रयोग करण्यासाठी कंबर कसली गेली आणि फक्त नवीन नाही तर नावीन्याने परिपूर्ण असे. एकतर माझा आवाज मोठा आहे, त्यात माईक होता, शिक्षकी पेशात राहिल्यामुळे आवाजाला शिकवतांना एक वेगळी धार लागली जातेच, नकळत.
विविध स्तरावरची मंडळी होती काल वर्गात, प्राध्यापक, मुख्याध्यापक, नवीन शिक्षक, नवीन संशोधक, स्नातक आणि स्नातकोत्तर विद्यार्थी, सगळेच, ७० च्या घरात असतील कदाचित. त्यामुळे सर्वांपर्यंत पोचायचं म्हणजे त्या त्या पद्धतीची उदाहरणे देणे आलेच, गोष्टी सांगितल्या गेल्या, एकंदरीत मज्जा आली, समाधान वाटलं. "त्याचे" मनःपूर्वक आभार हे सगळं घडवून आणल्या बद्दल. शतशः धन्यवाद
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...