गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०२४

२०७३: च्या पलीकडे


आज एक दुग्ध शर्करा योग अनुभवाला, आला आणि तो साधता आला. दिवाळी, वर्षातला सर्वात महत्वाचा आणि मोठा सण, दिपोत्सव, थंडीची सुरवात आणि कोवळ्या उन्हाची आस, धार्मिक वातावरण, पूजा अर्चा आणि त्यात भर म्हणजे "दिवाळी पहाट" कार्यक्रमांची मेजवानी. अशी मेजवानी ती कि "छप्पन भोग" च्या पल्याड अशी. कुठलीही उपमा देऊच शकत नाही अशी किंबहुना कुठलीही उपमा तय्यार झालीच नाही शब्दकोशात अशी ती ट्रीट कानांना. क्या बात है? काय सुंदर झाला कार्यक्रम, वाह वाह, कित्ती अप्रतिम गायले ते, काय भन्नाट साथ मिळाली वाद्यांची, वादकांची, ई. च्या पल्याड होतं ते, जे आज "ह्याची देही ह्याची डोळा अनुभवलं". संपूर्ण वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा मिळाली. इतक्या टाळ्या वाजवल्या, विठ्ठल गजर झाला, काटे आले अनेक वेळा त्या ताना ऐकून, बासुरीचे सूर साठवतांना आणि तबल्याचे खडे बोल अनुभवले वैविध्य वेळी तेव्हा. बासुरी ची साथ, तिची जुगलबंदी तर जगाच्या पलीकडची अनुभूती देऊन गेली. कुठल्याही सूत्र संचालनाशिवाय उत्कृष्ट सादरीकरण मी पहिल्यांदा अनुभवलं, असं हि घडतं ते पहिल्यांदा समजलं. पुरेपूर वेळेचा उपयोग, विश्रांती न घेता सलग गायन, ते देखील तब्बल दहा हजार समुदायासमोर, निःशब्द होणे म्हणजे काय हे स्वानुभवातून कळले आज. सुप्रसिद्ध गायक, असंख्य पारितोषिक विजेते  श्री राहुल देशपांडे ह्यांच्या गीताने आज पहाट सजली होती. ती एक पर्वणीच होती सर्वांसाठी. "मोगरा फुलला" हे त्यांनी एक गीत संपल्या संपल्या चटकिनी  सुरु केलं आणि संपूर्ण समुदाय त्यांना साथ देऊ लागलं, अर्थात हळू स्वरात, किंवा आवाजात, पण तो जो माहोल तय्यार झाला त्यावर भाष्य करणे अवघड आणि अशक्यच.  त्यांचा लवाजमा फार मोठा होता, गायक साथीदार, कदाचित त्यांचे शिष्यगण असतील, वादक ज्यात बासुरी, जगावेगळा तबला वादक, अर्थात पेटी आणि पियानो, ढोल ई. शिवाय खुद्द चौरासियांची पुढील नवतरुण पिढी देखील. आसमंत दुमदुमला, अगदी प्रत्येकाने आनंद उपभोगला हे निश्चित, कोणीही नसेल ज्यांनी अंगावर काटे अनुभवले नाहीत हि प्रासादिक गायकी ऐकून. मंत्रमुग्ध करून सोडले सर्वांनी. 

कार्यक्रमाचे आयोजन पण सर्वोत्तमचं. प्रेक्षक आवडीने आलेलं आणि बसलेले, उभे राहिलेले, शिस्त आणि त्या मुळे एकंदरीत उत्कृष्ट जमलेला कार्यक्रम. 

2073: That art form

 I had a previlage of sharing the vibes with The Dr. Asha Bhosale ji during my PhD convocation, during the same stage when she was honoured with the prestigious degree too. She said that "good that I am the devotee of the art form called singing, which I can start any time, any where, with or without any help from instruments, no need of special place, attire or costume or alike things and it will be easy for others eyes, ears too etc. If I would have been the trained dancer then suddenly on request its not possible to start showcasing your talent anywhere" and other details. On the same ground after so many years I realised that there is one more art from which is of category anytime-anywhere and that is storytelling. So my dears the moment any requests pops up story can be narrated easily, no instruments required. Technical story also is possible to narrate in simplest form so as to easily digestable to common personnel. No wonder even the highest authorities in technical field conducts yearly compeition for PhD scholars especially from technical background and ask them to communicate to the world in the easiest form what they are working at or planning to work at etc. 

Hence enjoy storytelling always, academicians and everyone in the form of stories, articles, papers etc.  

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४

2070: चांगली सवय


हि जी आजची तरुण मंडळी आहेत ती त्यांचा मोबाईल सतत सोबत ठेवतात, का कुणास ठाऊक? इतका सतत कि ते जेथे जातील तेथे त्यांचा तो अवयव बरोबर आहेच, असतोच. मला नेहेमी प्रश्न पडायचा कि हे असं का? इतकं काय महत्वाचं आहे त्या मोबाईल मध्ये? आणि इतका तो प्रत्येक वेळी बाळगलाच पाहिजे का? आणि खरं सांगू मला अश्या तमाम सर्वांचा खरं तर प्रचंड राग येत होता आधी पण काल ह्या मागचा दृष्टिकोन बदलला, ह्या कडे  मी आता एक सुरक्षेच्या मार्गाने बघते आहे. 


पासपोर्ट किंवा तत्सम महत्वाची कागदपत्रे ठेवण्याकरता एक पिशवी असते कि कमरे भोवती बांधली जाते. किंवा कंडक्टर वापरतो तशी पण पिशवी चालेल जी गळ्याभोवती घालून ठेवली जाते. अशी पिशवी अगदी प्रत्येकाने ठेवावी आपल्या सोबत, त्या मोबाईल ला बाळगण्यासाठी, हात मोकळे राहतात आणि शिवाय तो सोबत सुरक्षित राहतो ते वेगळंच, पडत नाही, डाग लागत नाही, कुठे ठेवायचा हा प्रश्न नाहीच आणि शिवाय वाजला किंवा गुरगुरला कि समजतं लागलीच. म्हणून हि सूचना. आणि खास करून जे जेष्ठ नागरिक आहेत, जे घरी दारी एकटे आहेत त्यांनी तर आवर्जून हि पिशवी वापरावीच न चुकता, न आळस करता, नेहेमी करता.  ह्या शिवाय एक पर्याय आहे तो म्हणजे ठिकठिकाणी लावलेले फोन, बाथरूम मधे आणि इतर जेथे गरज आहे तेथे. एखादी बेल तरी लावावी म्हणजे जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवलीच तर कमी येईल तंत्रज्ञान. आता आहे टेकनॉलॉजी तर पुरेपूर वापर करून घ्यावा. आणि हे काही जास्त खर्चिक पण नाही ना. जर आपल्या जवळ मोबाईल असला तर गरजे वेळी तो वापरून कोणाला तरी सुचीत करता येईल वेळेत. काल आमच्या सोसायटीत भलेमोठे लाल रंगाचे इंजिन बघितले तेव्हा लक्षात आलंच कि काही तरी गडबड आहे आणि मग समजले कि एक आबा एकटे घरात अडकले होते. ह्या प्रसंगावरून हे सगळं ध्यानात आलं आणि समजलं / उमगलं कि नवीन पिढी आपल्या पेक्षा चार पावलं पुढे कशी आहे ते. सातत्याने तो मोबाईल नामक अवयव सोबत बाळगण्याचे फायदे काल जास्त प्रकर्षाने जाणवले. अर्थात हा फक्त एक भाग झाला त्या मोबाईल वापरण्याचा. 


ह्या वरून मला हे देखील पट्टाकिनी आठवले कि अमेरिकेतले पोलीस लोक जेव्हा आमचे धडे घ्यायला आले तेव्हा त्यांनी देखील सांगितले होते कि मोबाईल हा फक्त आपत्कालीन स्थितीत वापरण्याचे साधन आहे. त्याला उगाच वापरात बसू नका, वेळ फुकट घालवू नका कारण तो अत्यंत महत्वाचा आहे. मर्यादित वेळ आणि महत्व द्या त्या वस्तूला, कारण ती फक्त एक वस्तू आहे. त्या शिवाय अनेक पिढ्या जगल्या आहेत. 

 

2069: शितावरून भाताची परीक्षा

हि एक फारच उपयुक्त म्हण आहे आणि मला फार म्हणजे फार आवडते. त्यात एक भर पडली, मी मागे लिहिल्याप्रमाणे प्रसिद्ध शेफ म्हणतात ना कि प्रत्येक व्यक्ती अनेक प्रकारे खातो, बघून, सुगंध घेऊन, मांडणी नुसार आणि मग चाखून. त्या पद्धतीने जे स्वयंपाक घरात काम करतात ते अगदी थेंब चाखतात आमटी चा, भाजीच्या रस्याचा किंवा काही तर बघून आणि सुगंध घेऊनच ठरवतात, आनंद उपभोगतात कि हा जिन्नस, हा पदार्थ उत्कृष्ट, चविष्ट असाच झाला आहे. त्यात काहीच दुमत नाही. म्हणजे बघा ना, एक थेंब आमटी, त्याचा सुगंध आणि सौंदर्य अनेकविध रंगानी नटलेलं / सजलेलं असं, कित्ती सांगून जातं, त्या स्वयंपाक करण्याऱ्याला, घरच्यांना, आजूबाजूच्यांना अहाहा च. काय म्हण तय्यार केली आहे, जबरदस्तच. प्रत्येक वेळी कोणी सांगितले आहे कि शीत आणि भातच हवा? तो फक्त गमक जुळवण्याचा भाग झाला किंवा एक पर्याय. आपण त्याचा वापर कसा करायचा हे आपण ठरवायचे नाही का? 


आणि हो हे फक्त पदार्थांनाच लागू नाही बरं का, बाकी इतर खूप ठिकाणी पण चपराक बसण्यासारखे वाक्य आहे. असं म्हणतात ना कि मुलगी हि आईची सावली असते. तुम्ही कुठल्या शिक्षकांकडे शिकलात? कुठे राहता? कुठे नोकरी करता? कुठली गाडी चालवता? 


आणि हो फक्त येणाऱ्या पुढील पिढी, किंवा पदार्थ किंवा अजून तत्सम असे नाही तर मागचा पण सगळा इतिहास भूगोल स्पष्ट होतो ह्या म्हणीचा वापर केल्याने.  माझे बाबा नेहेमी म्हणायचे कि "युअर वर्क शुड स्पिक अबाउट यु नॉट यू". एक पिटुकला तो जीव, ते शीत शेतकरी कोण? कसा पाऊस पडतो? कशी मशागत केली आहे? कुठल्या प्रकारची पेरणी? आणि इतर सगळे आधीचे आणि त्यावरून मग चवीचे बोलतो, सांगतो, क्या बात है? जो हा म्हणीचा जन्मदाता आहे त्याला कोटी कोटी प्रणाम. 



2067: Stuffed

In terms of hunger, believe there are two sorts of people. One is individuals who consume and survive on air, water, and small amount of food whenever it is available or served. However, the other person lives for food and need it on regular basis. Otherwise, they ceased working and it is simply not suitable for them. That is it. So, for the second category of persons who need the required amount of meals on  time, they must plan ahead of time if there is any job that will interfere with their meal plans. They need to stuff themselves first, both physically and mentally. They must remind themselves that today is different day with slightly altered schedule, so behave.

Whether it's official meetings, weddings, or parties, it's best to eat something early, simply, and without force, so you may feel satisfied before heading to the event. If   it's latenight party, it works great without interfering with one's lifestyle, emotion,  or health. There is no point in setting unrealistic expectations from others that the food will be provided on time and according to your specifications.

Why wait? 

Plan ahead of time not just for that day, but working professionals in general are well prepared for such occasions, and particularly women are well equipped at the individual bag level, office shelf level, and little variety is always kept handy and refilled no matter what.

I, too, have been following this regularly for many years and thought I'd share with others.

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०२४

२०६६: सोनेरी प्रकाश


आजच एक छोटीशी बातमी वाचली व्हाट्सअँप वर. एक संस्था कार्यरत आहे पुण्यात आणि त्यांचं उद्देश जरा हटके आहे. त्यांच्या संस्थेच्या सिद्धांताप्रमाणे दरदिवशीची एक रोजनिशी हवी, वेळ पाळणे महत्वाचे आणि निसर्ग, आपले पूर्वज, हवा, पाणी, अग्नी, ज्योत, शेतकरी, पिकं ई. सर्वांसमोर सकाळी, संध्याकाळी, रात्री नतमस्तक व्हा. आरती नाही तरी एखादे भावगीत म्हणा रोज, देवळात जा आणि हळुवार घंटानाद करून त्या खाली काही क्षण उभे राहा ई. असे सगळे. आणि हे सगळं करायला दिवसातले साधारण ३-५ मिनिटे लागतात, जास्त नाही. पण वेळ पाळणे महत्वाचे. 


माझ्या, आमच्या आदरणीय गुरु डॉ. गौरी मॅडम अगदी न चुकता दर महिन्यात, सणावारी ध्यानाची उजळणी घेतात, आम्हाला त्याचे महत्व विसरू देत नाहीच. खूप मेहेनत घेऊन अप्रतिम अशी मेडिटेशन ची आखणी केलेली असते. त्या नेहेमी सांगतात आणि करून पण घेतात आमच्या सर्वांकडून ते म्हणजे सोनेरी प्रकाशाची महती. तो जो दिव्य, दैविक सोनेरी प्रकाश आहे त्याची किरणे मेडिटेशन च्या वेळी आपल्या शरीरात, प्रत्येक भागात प्रवेश करत आहेत असा अनुभव घ्यायचा. त्याची प्रचिती येतेच, निश्चित. आणि मग आपल्या आजूबाजूला, सर्वत्र जे प्रकाशमय आहे आपण त्याचाच एक भाग आहोत, त्यात समरूप झालो आहोत, आपण जो प्रकाश अनुभवत होतो तो आणि आजूबाजूचा भव्य-दिव्य प्रकाश एकरूप झाला आहे हा देखील टप्पा महत्वाचा ठरतो मेडिटेशन करते वेळी.   


आता दिवाळीचे दिवस आहेत, सर्वांनाच त्याचे वेध लागले आहेत, आणि त्या पणतीचा जरी प्रकाश आपण बघितला, अनुभवाला तरी एक लक्षात येतं कि हिवाळ्यात, थंडीच्या दिवसात, तिन्हीसांजेला सर्वांच्या घरी, दारी, तुळशीपाशी पणत्या लावल्या जातात. त्या देखील खूप मोठ्या प्रमाणात. उजेड आणि ऊर्जा मिळावी सर्वांनाच ह्या साठी. माती, तेल, वात आणि ऊर्जा हे एक वेगळे समीकरण आहे. इतकी छोटी पणती पण भविष्यरूपी अंधारात आशेचा किरण दाखवत वाट समोर उभी करते. सगळ्या पणत्यांचा एकत्र परिणाम थंडीत सर्व सजीवांना उपयोगी पडतोच. 


बुद्धिवान माणसं पणती, दिवा, उजेड आणि ऊर्जा ह्यांना पण सोडत नसेलच, त्यांच्या बद्दल पण उणे-दुणे काढत बसणारच. मग पणती उजेड आणि ऊर्जा  द्यायचं  थांबवते का? अजिबात नाही. कोणी काहीही म्हणा तो सोनेरी प्रकाश सातत्याने प्रकाशमय राहतो आणि सर्वांपर्यंत पोचत असतोच. त्याच्या कार्यात काहीही फरक पडत नाहीच.  मग आपण माणसं का प्रत्येक वेळी सगळं ढवळून टाकतो? आपण जर त्याच प्रकाशाचा एक भाग आहोत, समरूप झालो आहोत मग हळूहळू ध्यानाकडे लक्ष केंद्रित करून, साधना वाढवून सगळं सोडून देता आलं पाहिजे म्हणजे कार्यरत राहता येईल सातत्याने. 


म्हणून म्हणते, दररोज त्या सुर्यबाप्पाला दोन हस्तक आणि एक मस्तक जोडून विनन्ती करू यात कि त्याची किंचित ऊर्जा, उजेड, शक्ती, भक्ती, सातत्य, ई. सर्वच गूण आम्हाला लाभू देतं. 


एक अंश आहात त्या सोनेरी किरणांचा, आजच्या दिवशी पुढ्यात उभं असलेलं कार्य करा, सद्बुद्धी मिळेल तसे वागा, ध्यान करत राहा आणि सुचवलेल्या मार्गावर चालत राहा, ह्या शिवाय आपण काहीही करत नाही, करू शकत नाही, योग्यता नाहीच, आणि आपलं येथे काहीही नाही. हे ध्यानात असू द्या. 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...