माझा एक बघण्याचा दृष्टिकोन फक्त. आधीच्या काळी स्त्रिया घर सांभाळायच्या आणि पुरुष शेती किंवा अर्थार्जनाचे काम शिस्तीत करत होते. त्यावेळी सोवळं-ओवळं फार कडक होतं त्यामुळे स्वयंपाक घरात सर्वांना प्रवेश नसायचा, किंवा तशी गरज भासायची नाही. त्यावेळी गोष्टच वेगळी होती. आहार भरपूर आणि सर्वतोपरी पौष्टिक असा. कष्ट आणि महेनतीची कामे खूप त्यामुळे भूक पण लागायची आणि अन्न पचयाचं देखील. त्यावेळी बहुतांशी दिवसातून फक्त दोनदा जेवण होतं असे. न्याहारी क्वचित किंवा प्रत्येकाकडची प्रथा नव्हती. पुरुषांना स्वयंपाक घरात प्रवेश ठराविक वेळी आणि स्त्रियांना घराबाहेर जाणं मोजकेच असं काहीस होतं दृश्य, सर्वमान्य असं. घरं मोठी, वाडे आणि रूढी परंपरा देखील अगदी वेगळ्या. कुठलीही तुलना नाही, पण आजच्या मानाने फारच निराळे असे सगळेचं. उपवासाची पण एक खास बात होती. उपवास म्हणजे फक्त दूध, फलाहार किंवा पाणी, इतकंच मर्यादित. कटाक्षाने पाळायचे उपवास करणारे. फारच व्यवस्थित निश्चय आणि संयम पाळला जायचा. उपवासाचा दिवशीचे जेवण देखील फार वेगळ्या धाटणीतले असायचे. उपवासाच्या दिवशी जेवतांना ताटावरून नाही उठायचं हा नियम नाही, कधीच नव्हता, पण त्यावेळी मुलींनी वाढायचे ठरलेले होते. पंक्तीची एक वेगळी शिस्त होती. घरं नेहेमी भरलेले असायचे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे बऱ्याच लोकांचा राबता असायचा. भरपूर लोक एकावेळी बहुतांशी जमिनीवर / खाली बसून जेवायचे. कधी कधी जागा जशी उपलब्ध असेल तश्या प्रमाणे एका नंतर एक पंक्ती पण होतं असतं. जेवतांना बोलायचे टाळले जायचे, तो त्यावेळी अन्नाचा अपमान समजला जायचा. तेव्हाचे ते नियम त्या वेळेनुसार संपुष्टात आलेत. ज्यांच्या घरी दोघे नोकरीला जातात, घराबाहेर पडतात त्यांच्याकडे अतिनियम पाळणे अशक्यच आहे. त्यामुळे "दोन हस्तक आणि एक मस्तक" एवढंच काय ते मनापासून अर्पण करा. "त्याच्या" साठी काही क्षण द्या नक्की तेवढं बास आहे. जेवतांना उठावं लागलं तर काहीही बिघडत नाही, उपवासाच्या दिवशी देखील. कुठलाही असा नियम कुठल्याही ग्रंथात लिहिला किंवा नमूद केलेला नाही. एक ठराव, सून, मुलगी किंवा घराची स्त्री नोकरी करणारी हवी तर मग सगळं माफ, सर्वांनी आहे तसं सामावून, समजून घेतलंच पाहिजे आणि घेतांना दिसतात बरेच जण आताशा. हा चांगला बदल आहे. नाही तर मग घरच्या स्त्रीला घरीच राहू द्या, सन्मानाने.
शनिवार, ३० डिसेंबर, २०२३
शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३
दुसरी बाजू
आपण सगळेच अगदी लहानपणी पासून ते अगदी आत्तापर्यंत अनेकदा डोंगरावर चढत गेलो आहोत. शाळेची सहल, मित्रांबरोबर किंवा घरच्यांसोबत केलेली ती चढाई. मग ती डोंगरावर असेल नाहीतर उंच देवळात, ती मज्जा वेगळीच, नाही का? आठवतेय का? काय म्हणतेय मी, अहो जेव्हा त्या पायऱ्या किंवा नुसता चढ चढल्यावर दम लागतोच. दम लागला कि आपण पाण्याचे दोन घोट घेण्यास टेकतो, दगडावर, पायरीवर, झाडाच्या बुंध्याशी, सावली बघून ई. अगदी दोन शब्द बोलणं पण तेव्हा त्या क्षणी नको वाटतं. थोडासा दम खाल्ला, दीर्घ श्वास नित्य नियमित, सुरळीत झाला कि मग एक स्मित हास्य येत गालावर आणि मग बोललं जातं. तो जो दीर्घ श्वास आपण सगळे घेतो उंच चढल्यावर, सायकल चालवल्यावर, धावल्यावर, पळून झालं कि, खेळून दमलो कि, किंवा इतर वेळी म्हणजे फक्त शारीरिक श्रम नसतात तर ते एक समाधान असते. म्हणूनच बहुतेक दीर्घ श्वास घेते वेळी बहुतांशी सर्वांचे डोळे बंद होतात आपोआप किंवा मिटले जातात. तो आनंद, अत्यानंद, संतोष काही जागावेगळाच असतो. आपल्या शरीराने मस्त काहीतरी कमावले आहे, गुरुत्वाकर्षणाने, हवा, वारा ई. ने ते साध्य करायला मदत केली म्हणून. आपण कळत-नकळत त्या सर्वांना शतशः मनःपूर्वक धन्यवाद देतो, दरवेळी.
हि जी नाण्याची दुसरी बाजू आहे ती प्रत्येक वेळी बघितली तर? मज्जा येईल नाही. दीर्घ श्वास फक्त योग करतांना किंवा करायचा म्हणून किंवा घेतला जातो म्हणून नाही तर कधी कधी असे दीर्घ श्वसन करते वेळी प्रत्येकाला धन्यवाद द्या, अगदी आवर्जून. प्रत्येक दीर्घ श्वास कोणाच्या तरी नावे करून तर बघा काय कायापालट होईल तो. इतक्या वर्षात तुमच्या संपर्कात आलेले सजीव आणि निर्जीव सगळेच आठवायला सुरवात करा म्हणजे नंतर ती सवय होईलच आणि कृतकृत्य होईल. प्रत्येक राहिलेले घर, शाळा, कचेरी, प्रत्येक वस्तू जिच्या मुळे तुम्हाला मस्त शिकता आलं, डोक्यावर सुरक्षित छत लाभलं, शेतकरी ज्या मुळे पोटभर उत्कृष्ट चविष्ट चारीठाव मिळालं आणि तृप्त होता आलं, ते बाकी सर्व व्यक्ती आणि वल्ली देखील हो. चला तर मग ह्या दिनदर्शिकेनुसार सुरु होणाऱ्या नवीन वर्षी हा प्रयोग करून बघूया. सर्वांना नवीन वर्षाच्या पोटभर शुभेच्छा.
प्रकाश झोत
ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आणि शांतपणे जर गाडी पुढे नेण्याचे संकेत द्यायचे असल्यास प्रकाशझोताचा म्हणजे डिप्पर चा वापर करतात. पण ते रात्रीच्या वेळी, अंधारातच गाडीचे दिवे प्रकर्षाने दिसणार आणि वापरता येणार ना? अर्थात काहीच वाहनचालक ह्या पद्धतीने वाहनांच्या दिव्यांचा असा वापर करतात. दिवस उजेडी मी तरी असा वापर केलेला कधीच बघितला नाही कारण त्याचा काहीच फायदा होणार नाही. डिप्पर सारखा वापरायचा म्हणजे एक कामाचं नाही का? वाढीव काम आणि त्यामुळे पुढचा सरकला तर ठीक नाही तर ते कष्ट आणि काम वायाच, उगाच मनस्ताप तो वेगळा. असो.
इतक्यात मी एका संस्थेमध्ये सेशन घायला गेले होते. ते ठिकाणं बरेच दूर होते. गाडी चालक दिवस उजेडी सातत्याने डिप्पर वापरतं होता. इतका कि त्याशिवाय गाडी तो चालवूच शकत नव्हता. इतका जास्त उपयोग त्या दिव्यांचा बरा नाही. पण मी कोण म्हणणार. मी आपली गप्पा बसून सगळे ह्याची देही ह्याची डोळा बघत होते. त्या बिचाऱ्या गाडीच्या दिव्यांची कीव येतं होती मला, पण काहीच तरणोपाय नव्हता. आधी झाली माझी मनातल्या मनात चिडचिड पण नंतर मी ते सगळं आनंदाने स्वीकारलं, नवीन रस्त्यावर, बाहेरच्या पाट्यांवर, विविध दुकानांवर माझं लक्ष्य वेधलं आणि ते ठिकाणं गाठलं. काय हि सवय. अर्थात मी गेली इतकी वर्षे विविध गाड्या चालवल्या आहेत त्यामुळे जास्त त्रास होतो. पण दुर्लक्ष्य करणे एवढंच माझ्या हातात होतं ते मी केलं. "असे चालक येति आणि स्मृती ठेवुनी जाती". मी अनेकदा त्या वरिष्ठ, वयाने श्रेष्ठ, अनुभवी चालकाला सांगण्याचा अथक प्रयत्न केला खरा पण मी कसा श्रेष्ठ, कित्ती वर्ष कित्ती भन्नाट गाडी चालवतो ई. ची टेप सतत सुरु होती. म्हटलं "हे पालथ्या घड्यावर पाणी आहे", सोडा.
बदल
सध्या मी विविध संस्थांमध्ये अतिथी म्हणून जाते. विविध संस्थान म्हणजे वेगवेगळ्या जागा, ठिकाणं, त्यामुळे शहरात फिरायला मिळतं. नवनवीन जागा, रस्ते, वाहतूक आणि बरेच काही सहज टिपलं जातं. एवढ्यात नजरेस पडलेलं वास्तव्य म्हणजे ठिकठिकाणी प्रचंड प्रमाणात वाढलेली खाण्याची दुकानं आणि त्याच्याच शेजारी पानठेले. जेथे बघावं तेथे भरपूर प्रमाणात खाद्य पदार्थ मिळण्याची सोय झाली आहे खरी पण ते कितपत शरीराला योग्य आहे हे पडताळून बघितलं पाहिजे. तसेच सिगरेटचे पण आहे. इतकी जण ओढतांना दिसतात कि ज्याचं नाव ते. का? प्रत्येक वयोगटातील, आर्थिक आणि सामाजिक स्तरातील, विविध प्रकारचे काम करणारी मंडळी, आणि विद्यार्थी देखील. ह्या सगळ्यांमुळे सिगरेट किंवा तत्सम गोष्टी ओधरणाऱ्यांना आणि तो धूर कळत- नकळत संपर्कात येणाऱ्यांना धोकादायक आहेच. संगणक तज्ज्ञांनी असे काही अँप तय्यार केले पाहिजेत कि सिगरेट ओढणे आटोक्यात येईल, त्यावर धरबंध राहील, म्युझिक किंवा इतर थेरपी वापरून शांत करणे, लक्ष वेधणे ई. सल्ले मिळाले तर खूप फायदा नक्की होईल, सर्वांनाच. कुठेतरी आळा बसने अत्यावश्यक आहेच.
बाहेरच्या खाण्या संदर्भात आठवलेली एक गोष्ट अशी कि माझ्या एक प्रमुख डीन होत्या. त्या दिवसभर लागेल एवढं सगळं घरून घेऊन यायच्या. मोठा डब्बा आणत होत्या त्या अगदी दररोज. शिवाय त्यांच्या रोजच्या डब्यात दुसऱ्यांसाठी पण काही पदार्थ भरपूर प्रमाणात असायचे. त्यांच्या कपाटात नेहेमीच कोरडे खाद्य पदार्थ, सुकामेवा ई. साठवलेला असायचा. त्यामुळे त्यांना कधीच बाहेरचं खावं लागलं नाहीच. अशी काही तरी उपाय योजना करायला हवी म्हणजे चांगलं सगळं पोटात जाईल आणि पुढे कुठलीही व्याधी होणार नाहीच. तंत्रज्ञानाची मदत सहज घेता येईल कारण आजकाल सगळंच ऑनलाईन पैसे दिले जातात, त्यात ठिकाणाचं नाव देखील येतं. त्यावरून सगळं सहज शक्य आहे. "हेल्थ इज वेल्थ" तिला सर्वतोपरी सांभाळा मंडळी. नाईलाज असेल तरच बाहेरचे ग्रहण करा.
रविवार, २४ डिसेंबर, २०२३
Wanted
The beauty of any language is the words are like double sword. The meaning is reflected as you use them. Hence its so much of fun to keep using the words in different constructs always. Might be to develop, enhance and augment this habit there was an exercise since school days for all "make sentence from" the given word.
Likewise, the actual and very well known meanings of the word wanted are:
1. Something, some items are needed, wished
2. Criminal is wanted, looking for...
But here I am now wanted by many. As I opted for voluntary retirement, my society friends, neighbours, other friends, family, kids especially, other colleges, other social media groups, relatives and many are looking to talk to me, go with me on excursions, trips, get togethers, some are waiting to get my advise regarding further education of kids and what not. The feeling is awesome, as if they were waiting for me since many years. And they make it a point to inform me that as you were so tide up for so many years we understood and never bothered you. But now you should take part in this and that, lets go places, people are inviting me to stay over and the list is big enough for me to enjoy. Its so much visible that they loved me for so many years and loving me more now. What else to ask for? Which other certificates to earn? I really feel honored. They not only stop by just telling me but go behind me, literally affectionately force me and involve me in all activities. These tiny yet important things make me feel good and wanted enough. Oops rather more than enough. Love you all.
शनिवार, २३ डिसेंबर, २०२३
फुगलेली ++
दिड एक वर्षांपूर्वी मी फुगलेली "ती" नावाची पिटुकली कथा / अनुभव कथन केला होता. आज त्यात एक अजून भर पडली म्हटलं "नेकी और पुछपुछ", आणि ताबडतोब काढली कि माझी संगणकीय लेखणी आणि सुरु झाले. आज रविवार आणि बरेच दिवसात भेट झाली नव्हती तिची म्हणून इडलीचा बेत आखला. सकाळी इडली कुकर लावतांना माझ्या कडे काम करणारी ताई कशी म्हणते "इडली रवा जास्त चांगला नाही वापरायला, तांदूळ पेक्षा?", मी म्हटलं "हो आणि सोप्पा पण वापरायला कारण तो तस्साच न मिक्सर मधून फिरवता डाळीत / डाळीच्या मिश्रणात कालवायचा, बास". त्या वर पठ्ठी म्हणते कशी "तसं नाही हो, रवा वापरला कि ती इडली चांगली फुगते". मी इतकी म्हणजे इतकी हसले, तिला काहीही समजले नाहीच, कारण फुगणे ह्या बद्दल हे मागे लिहिलेलं सगळं तरळलं माझ्या डोळ्यासमोर. बघा फुगणे ह्या प्रकारात अजून एकाची उप्स एकीची भर पडली. क्या बात है. आधी ते पीठ फुगाव लागतं आणि तेव्हाच ती फुगते, नरम होते, भन्नाट लागते आणि सर्वांना आवडते. जसं सर्फ एक्सेल च्या जाहिरातीत म्हणतात "डाग अच्छे है", अगदी तस्सच "फुगणे जरुरी आहे".
https://drpreetimulay.blogspot.com/2022/09/blog-post_3.html
चव
"काय वर्णू तव गूण, अल्पमती नारायण" असं काहीसं होतं माझं हा पिटुकला शब्द कानावर पडल्यावर.
१. नारळाचा चव
२. पदार्थांची चव
पिटुकला दिसतो खरा पण दोन्हीला अगदी सहजी सामावून घेतलं आहे पठ्याने, अर्थात आपली मायबोलीची पण कमाल, धमाल आहेच म्हणावं. तिचं महत्व अनन्य साधारणच. तो आणि ती, अगदी पाण्यासारखी सामावून घेतली आहे ह्या शब्दाने. हवं तसं वापरा, त्या अर्थाने मग वापरात येणार आणि अर्थपूर्ण रित्या देखील. असे असतील अनेक शब्द मायबोलीत पण आज ह्याचं महत्व प्रकर्षाने जाणवलं म्हणून हा पंक्ती प्रपंच. महाराष्ट्रीयन खाणे असो किंवा कोकणी नारळाचा चव अनेक पदार्थांची चव वृद्धिंगत करतोच. दाक्षिण्यात स्वयंपाकात पण आणि अर्थात अनेक भारतीय व्यंजनात आहेच ह्याचं अढळ स्थान.
प्रत्येक माणसामध्ये पण असे दोघांचे गूण असतातच, प्रसंगानुरूप ते बाहेर पडतात, वापरले जातात, कमी येतात. एक मुलगी, स्त्री हिला सन्मानाने बाईमाणूस असं संबोधलं जातं आणि काही वडिल किंवा मुलं आई बहिणीची माया देतातच किंवा त्या पद्धतीने सांभाळ करतात. गुरूंचे देखील नेहेमीच असे असते, कधी आई म्हणून समजावून सांगतात तर कधी वडिलांसारखे वरकरणी कठोर होतात.
समरस होऊन जाणं हा मुळात प्रत्येक सजीवांचा स्वधर्म आहेच, आपण तो नेहेमी अंगिकारतो आणि नकळत तो उभारून येतो गरजेनुसार. त्यामुळे ह्या जीवन श्रुष्टीला त्याबद्दल आभार माना किंवा भाषेला पण कोणीही वेगळं नाही, सगळे सारखे, वैविध्य भूमिका निभावणारे असे.
आणि हो तोच नारळाचा चव आधी चाखून बघितला, पदार्थांमध्ये घालण्याआधी तर त्याची न्यारी, अनोखी, ती उत्कृष्ट चव कळते आणि पदार्थांची चव वाढवते ते वेगळंच. तो चव ती कधी होऊन जातो हे कळण्याआधी माणूस खाऊन तृप्त झाला असतो.
सोमवार, १८ डिसेंबर, २०२३
रुखवत
मी एवढ्यातच एका लग्न सोहोळ्याचा आनंद / अत्यानंद उपभोगला. एवढ्यातच अर्थात नावीन्यपूर्ण रितीने नटलेला, सजलेला आणि बहरलेला असा तो विवाह. तो संपूर्ण भव्य दिव्य झगमगाट डोळ्यात आधी साठवून घेतला, फारच कौतुकास्पद असा मांडला होता, अत्याधुनिक पद्धतीने. प्रत्येक गोष्टीची रेलचेल तर वाखाणण्या पल्याड अशीच होती. आणि हे सर्व पाऊल पडता क्षणी टिपलेल्या गोष्टी हो. मग आम्ही मंडपात / हॉल मधे प्रवेश करते झालो आणि तिथले दृश्य बघून तर डोळे दिपले गेले. सगळं पोटभरून बघितल्यावर माझे चार डोळे रुखवत शोधू लागले. हो मंडळी, अगदी बरोबर वाचलंत. ह्या २०२४ च्या आगमनाच्या टप्प्यावर मी रुखवत शोधात होते. कारण मला इतकंच माहिती होतं कि जर अत्याधुनिक लग्न करायचं तर सगळ्याच बाबतीत ते लागू पडलं पाहिजे, काही नाही. समजावून सांगते. आधीच्या काळी, अनेक पिढ्यांपासून सुरु असलेली रुखवताची परंपरा अशी होती कि सर्व कलागुण जे संसार सुरु करायला, सांभाळायला आणि फुलवायला मदत करतात ते मुलीमधे असले पाहिजेत आणि ते दर्शवता आले पाहिजेत. किंबहुना दर्शवता येतील असेच, मोठ्या प्रमाणात, सुबक आकारात ई. मांडणे म्हणजे रुखवत. मग त्यात काही अजून मुलींचे हातभार लागायचे. लग्न समारंभात आलेल्या प्रत्येकाला थोडक्यात समजलं पाहिजे कि मुलगी किती सत्तगुणी आहे ते. ते रुखवत मग कित्ती तरी वर्ष सांभाळून ठेवले जायचे, दर्शनी भागात, घराच्या.
खैर, आता सगळंच बदललं आहे, सर्व सामान झालं आहे, मुलगा मुलगी हा भेदभाव राहिलेला नाही, सगळेच प्राविण्य मिळवलेले आहेत आणि सोप्प झालंय एकंदरीत. संसार हा दोघांचा झाला आहे सर्वार्थाने. दोघांमध्ये सगळ्याच कला आहेत, अगदी स्वयंपाक ते बाकी सर्वच. मग जर जगाच्या पाठीवर आपण हे मान्य केले आहे तर लग्नात येणाऱ्या सर्वांना दोघांचे गूण का दिसू नयेत. रुखवत अत्याधुनिक का असू नये? आणि त्यात आताशा तर प्रत्येक क्षण टिपण्याची सोय आहे. मग लावा कि सगळ्या कलांचे फोटो, बघू दे सर्वांना. आता प्रमाणपत्रांचा जमाना आहे, ढीगभर असतातच प्रत्येकाकडे. मग ती सगळी लावा आणि ज्याने ते मिळवलं आहे त्याने कला म्हणून चार ओळी लिहाव्यात कि हे प्रमाणपत्र मिळवल्यावर त्यात काय बदल झाला आणि ते त्याने प्रत्यक्ष त्याचा कसा उपयोग केला? ई. स्वयंपाक घरातले केले पदार्थ दाखवावेत फोटोत, ते कश्या विविध्य पद्धतीने केले ते सांगावे. व्हिडिओ प्ले करावा कलागुण दर्शवणारा. नवीन सजवलेलं घर दाखवावं, NGO साठी केलेलं काम, एखादा कचेरीत किंवा इतर ठिकाणी सॉल्व केलेला प्रॉब्लेम टिपावा. बाकी काही शौक, कला अवगत असतील तर त्या दाखवाव्यात. का नाही?
रुखवताचं महत्व अनन्यसाधारण असं आहे सर्वार्थाने बघायला गेलं तर. त्यात देखील काळानुसार बदल होतं गेले. मग ते जपा. एखाद्या व्यक्तीला पैसे देऊन ते सगळं पॅक करायची जबाबदारी द्या. तसं सगळं व्यवस्थित प्लॅनच करा ना, मग बघा त्याची पण एक न्यारी मजा. "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे".
बंगालीमधे पण रुखवत असतो म्हणे आणि त्याला बघा काय म्हणतात ते "तथ्य". क्या बात है, काय चपखल नाव आहे नाही?
रविवार, १७ डिसेंबर, २०२३
ते रिक्कामे डब्बे
आमच्या ह्यांची गेले २४ वर्षांची सवय, अगदी ना चुकता ते काहीही झाले तरी पाळणाराच. कधीच म्हणजे कधीच त्यात खंड नाहीच. इतकी भन्नाट सवय आहे तरी पण मी बायको म्हणून मला प्रचंड राग यायचा. इतका कि विचारू नकाच. पण काहीही झालं तरी ती सवय कधीच बदलली नाही. कुठलाही डब्बा मग तो मिठाईचा असो, नाही तर प्लास्टिकचा, खाण्याच्या वस्तूंसोबत आलेला कुठलाही असो त्यातला शेवटचा घास / तुकडा हेच संपवणार आणि तो डब्बा तस्साच व्यवस्थित पुन्हा झाकून ठेवणार आहे तस्सा. काय हि सवय.
पण आताशा माझ्या लक्षात यायला लागलाय कि हे सगळं फक्त माझ्या सोयीसाठी करायचे, करतात अजूनही. म्हणजे मला माझ्या मावशींना काही कधी उरलेलं किंवा केलेलं बांधून द्यायचं झाल्यास सोप्प जातं. घरचे डब्बे द्यायला नको आणि मग ते नंतर त्यांनी परत करायला नको. कित्ती म्हणजे कित्ती माझी काळजी ती. आवडलं मला. नाण्याची दुसरी बाजू ती, बघितल्यावर / विचार केल्यावर लक्षात येतं. शतशः धन्यवाद ह्यांना.
माझ्या लेकाला काही पाठवायचे असल्यास, प्रवासात पट्टाकिनी काही बांधून द्यावे लागले तर घरचे, स्वच्छ असे, म्हणजे खाल्लं कि फेकून देता येतं, ओझं कमी आणि बाहेरच खायला नको. क्या बात है. मान गये उस्ताद. असाच माझा नेहेमी विचार करत राहा.
शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३
जडण घडण
सध्या जी संपूर्ण पिढी किशोर वयात आहे, त्याच्या विशीकडे वाटचाल होत आहे त्यांच्या जडण घडणाबद्दल मला थोडंस बोलावसं वाटतंय. ह्या वयोगातील मुलं आणि मुली हे मोठे होत असतांना किंबहुना अगदी त्यांच्या लहानपणीपासूनच ते बहुतांशी आजी आजोबांशिवाय वाढले, विभक्त कुटुंबात वाढले. हे काय कमी होतं म्हणून घरचे पालक देखील संपूर्ण दिवस बाहेर होते त्यांचे. ह्या वयातील मुलांना त्यामुळे आईची, वडिलांची माया प्रेम नक्कीच मिळालं पण त्यांना "दुधाची तहान ताकावर" भागवावीच लागली. काही ठिकाणी तर आई इतकी वोर्कहोलिक, कामात प्रचंड व्यग्र होती, तिचे काम इतके वेगळ्या पातळीचे होते कि तिला मुलांसाठी हाती होता तेवढाच वेळ सदुपयोगी लावावा लागला. 'क्वालिटी टाइम' हि संकल्पना कदाचित ह्या पिढीपासून सुरु झाली असावी. हातात असलेल्या वेळेत भरभरून देणे, त्या सुक्ष्म वेळेत जगून घेणे, तो असलेला वेळ कसा उपयोगी आणायचा ह्याचे नियोजन करणे आणि सर्वार्थाने तो उपभोगणे, अगदी लक्षात राहिल असा, समाधान देऊन जाईल असा. तारेवरची कसरतच जणू. पण त्यामुळे हि पिढी फक्त जडण घडण होण्यासाठी आई वडिलांवर अवलंबून नव्हतेच कधी. त्यांनी इतरांकडून देखील खूप आत्मसात केलंय. अर्थात त्यात तंत्रज्ञाची भर आहेच. पण ते फक्त झापड लावल्यासारखे वाढले नाहीत, किंवा शारीरिक वाढ झाली नाही तर डोक्याचा वापर नक्की झाला. हि मुलं तशी त्यामुळे सर्वच शिकण्याची फार घाई असल्यासारखी पण मला भासली अनेकदा त्याची कारणं कदाचित हि असतील. त्यामुळे त्या आधीच्या किंवा १९७०-७५ ह्या दरम्यान वाढलेल्या व्यक्तींना जो प्रश्न नेहेमी विचारला जाई कि "आई वडिलांनी काही शिकवलं नाही का?" हे सध्या लागू नाही. कारण आई वडील तितकेसे नव्हतेच शिकवायला. ह्या मुलांना तितकसं शिकवावं लागलं नाहीच मुळी. त्यांना त्यांच्या बुद्धीचा आणि डोक्याचा, परिस्थितीचा वापर करणे जमले, त्यांची मते फार स्पष्ट तय्यार करता आली आणि त्यामुळे ते जास्त लवकर शहाणे झालेत. ह्या सर्व कारणांमुळे देखील कदाचित हि मुलं खूप कोणाच्या अध्यात मध्यात नसतात, किंवा कोणासाठी उगाच थांबत नाहीत, कुणाच्या परवानगीची वाट बघत नाहीत, मार्ग काढतात आणि पुढे जातात. अर्थात हि अशी मुलं जी मी बघितली आणि जाणली. बाकीच्यांचं मला ठाऊक नाही. मला आधी एक प्रचंड मोठा गैरसमज होता कि माझे समवयस्क जणांना असंख्य देश बघण्याची संधी मिळाली. ते ह्या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन इतका सुंदर बदल घडवून आणतील स्वतः मधे
कि ते एक ढळढळीत उदाहरण म्हणून उभे ठाकतील सर्व स्तरावर. पण अगदी ०.१ % पण हवा असा बदल दृष्टिपथात नाही, ते अजून देखील तेच जुने बुरसटलेले विचार कुरवाळत बसले आहेत. जे कदाचित मूळ कारण आहे विसंवादाचं, हवी तशी प्रगती न होण्याचं, वैचारीक प्रगल्भता न मिळण्याचं आणि असे बरेच.
त्यामुळे सध्याचे किशोर वयीन मुलं सर्वार्थाने उत्तम आहेत. काही अंशी कमी जास्त असलेले तर सर्वत्रच आढळतात.
दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे
"सध्या मी काय करते?" हा एक प्रतीव्यक्ती प्रश्न आहे. कारण एवढ्यातच मी निवृत्ती स्विकारली आहे संपूर्ण वेळ कामातून. इतकी वर्ष सातत्याने पूर्णवेळ काम केल्यामुळे मीच लोकांना ती सवय लावली होती त्यामुळे साहजिकच ते विचारणारच.
खरं सांगू तर साक्षगंध झाल्यानंतरचा अत्योत्तम जो कालावधी असतो ना मला अगदी तस्सेच भासत आहे सध्या. मी तितक्याच अत्यानंदात वावरत आहे. पंख नसतांना उडते आहे. मोकळं झाल्यासारखं वाटतंय. पुढे काय ह्याची चिंता किंबहुना चिंताविरहित झाल्यासारखं वाटतंय. खूप नवनवीन ठिकाणी जाता येतंय, नवीन लोकांशी संवाद साधता येतो आहे, त्यामुळे संशोधन क्षेत्रात पदार्पण करणारे, केलेले आणि करणारे अश्यांशी ओळखी वाढते आहे. त्यांची जशी गरज तशी मी तय्यारी करून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करते आहे. मोकळा वेळ मिळतो आहे, त्यामुळे थोडासाच पण नक्की व्यायाम होतो आहे. पायांना स्वस्थता मिळाली आहे. पुन्हा एकदा प्रत्येक नवीन संस्थेत जातेवेळी पहिल्यांदाच जात असल्यामुळे मी माझा पहिला वर्ग घेते आहे अशी भावना राहते आहे. आणि अशीच काहीशी माझी स्थिती होती माझ्या सासर कडच्यांशी तोंड ओळख झाली तेव्हा. एक नवीन नातं निर्माण होतंय विविध ठिकाणी आणि माझी खात्री आहे कि ते अनेक वर्ष टिकेल.
फावल्या वेळात गप्पा, दूरदर्शन, भरपूर वाचन आणि थोडक्यात लिखाण असे अनेकविध पैलूंवर काम सुरु आहे, संथगतीने. त्यामुळे कधी कधी मज्जा येते ह्या प्रश्नाचं उत्तर देतांना. मी कचेरीत होते अगदी तशीच कार्यरत आहे, पण सध्या फक्त माझ्या साठी आणि संपर्कात आलेल्या नवीन मित्र-मैत्रिणींसाठी. खूप जणांना संशोधनासाठी मदत करायची आहे, स्वतःला वृद्धिंगत करायचे आहे आणि फुलायचे / झुलायचे आहे.
गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३
गुणवत्ता
एका सिमेंट च्या जाहिरातीत म्हटलं आहे कि "भारत हा एक अंडर कॉन्स्ट्रुक्शन देश आहे". मला तरी फारच खरं वाटतं हे वाक्य कारण जेथे पाहावे तेथे बांधकाम सुरूच आहे. इमारती बांधल्या जात आहेत, रस्ते खोदले आहेत, आणि असे बरेच आहेत. आम्ही राहतो त्या परिसरात देखील वेगळं चित्र दिसत नाही, खूप ठिकाणी बांधकाम करत आहेत. एक तर फारच उंच इमारत बांधणं सुरु आहे, गगनचुंबी अशी. बहुतेक त्यांना ती फारच पट्टाकिनी बांधून संपवायची आहे, खूपच घाई झालेली स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे छत किंवा कॉलम बांधतांना जे लोखंडाच्या फळ्या वापरल्या जातात त्या इतक्या भराभर, वेगाने आणि एका मागून एक कुत्रं पाठिमागे लागल्यासारख्या फेकतात उंचावरून कि ज्यामुळे दचकायला होतं, भिती वाटते. ह्या थंडीच्या दिवसात पहाटे उजाडलं नसतांना आणि रात्री खूप उशीरा पर्यंत ठाकठूक अत्यंत जोरात सुरु असते. निरव शांतता असते ह्या दोन्ही वेळी त्यामुळे तो आवाज प्रकर्षाने जाणवतो. त्या काम करणाऱ्यांची कीव येते मला. अर्थात भली मोठी चमू असेल, एकच व्यक्ती इतके तास काम करत नसेल पण जे होतं आहे ते भयानक आहे. कारण सांगते. वर नमूद केल्याशिवाय सूर्याचा नैसर्गिक उजेड आणि दिव्याच्या अंधारातला उजेड ह्यात जमीन आस्मानचा फरक आहेच. अंधारात कायचं घोळ घालतात कुणास ठाऊक. सरते शेवटी हाडामांसाची माणसं आहेत, थकत असतील चं, चुका होत असतील, १९-२० इकडचे तिकडे नक्कीच होणार, १००% खात्री आहे. "चालतंय कि" / "चलता है" हि वृत्ती किंवा स्वभावाचं झाला आहे. पट्टाकिनी बांधकाम करून सुपूर्त करायचं, बास. किती वेळा असे निक्षून ऑडिट होत असणार ह्या सगळ्याचं? खूपच कमी. आणि त्यात एकदा का नाव झालं त्या व्यावसायिकच कि पुरे. इतक्या खोलात जाऊन कुठला ऑडिटर चाचपणार? कोणीही नाही. आणि मग ह्या अश्या बांधकामाला करोडो रुपये मोजायचे? कशासाठी? अर्थात पर्याय नाही आहेत काही वेगळे जास्त त्यामुळे चालतंय सगळ्यांचं. "सेकंड हॅन्ड स्मोक" हि एक घातक संकल्पना आहे. अगदी तशीच आता मला हि देखील महाघातक वाटते "सेकंड हॅन्ड साऊंड". विविधतेने नटलेले भयानक आणि अचानक येणारे आवाज. माझ्या सारख्या दूर ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीला ते इतकं प्रकर्षाने जाणवतं मग त्या बांधकाम करणाऱ्यांना काय वाटत असेल? सवय झाली आहे त्यांना हे ठीक आहे पण तरी नकोच वाटणार. असो, त्यांना देखील पर्याय नाही ना. आजूबाजूला राहणाऱ्या जेष्ठ नागरिक, लहान बाळं ह्यांना, किंवा रुग्णांना पण फार त्रास होत असणार पण सांगतो कुणाला? नियम नाहीत, धरबंध नाहीतच, सामाजिक जबाबदारी वगैरे संकल्पना तर ठाऊकच नाहीत. नियम तर सगळे कधीचेच माळ्यावर फेकले आहेत. घोर कलियुग.
सोमवार, ११ डिसेंबर, २०२३
50 - 100
I always wished to and, till date, have maintained certain levels in many ways. A couple of examples of such maintenance are given here.
Even if I have a branded and the latest mobile phone, I am aware that the battery will last for so many hours or days, but I still prefer not to go below 50%. My habit—what else? I wish to always be safe and charged up for the most preferred or needed gadget.
Likewise, in my four-wheeler, even though I am completely aware of the concept of reserve and the capacity of the petrol tank and I thoroughly know my own car, I still chose to, or am in favour of, keeping petrol levels higher than 100, always.
I precisely know when to refill my two buddies and have followed it religiously for years now. Everything will be fine if the levels go down below 50 or 100, but it never happened. Automatic charging always happens. So to date, along with the routine of my office work, I have followed the timetable of these refills too, very happily.
My kids laugh out loud by looking at these habits, as they are, and this new generation is used to 1% charge also.
साय
"ती" साय, दुधावरची, मायेची. साय सर्वश्रुत आहेच कि ती दुधाचे तापमान सांभाळायला मदतच करते जणू, टिकवून ठेवते एक सुंदर वर आवरण बनून. गाईच्या दुधावरची साय जराशी पातळ पण म्हशीच्या जाडसर, ज्यापासून किंवा अशी जाडसर साय जमा करून मग लोणी, तूप, काही जण दही तय्यार करतात. दह्याचे मग पुन्हा ताक, लस्सी, आणि विविध पदार्थांमधे वापर. अशी ती बहुआयामी वस्तू, ती अगदी सर्व वर्गाला उपयुक्त ठरतेच आणि जगभर हो. हे झालं सायीचं थोडक्यात वर्णन.
तर अश्या आडनावाचे व्यक्ती ज्यांच्या नावात देवाचे स्मरण आहे ते भा ज प कडून निवडून आले आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्ह्णून शपथ घेणार आहेत. मी अनेकदा असं ऐकलं आहे, वाचलं आहे आणि अनुभवलं देखील आहे कि नावाप्रमाणे बहुतांशी व्यक्ती असतात, त्यांचे गुणधर्म असतात आणि ते तसे वागतात, आचरण करतात, उपयुक्त ठरतात. हे नवीन निवडून आलेले मुख्यमंत्री देखील अशीच मायाने जनतेची सेवा करतील, त्यांचे कवच होऊन अनेकविध योजना राबवतील, असंख्य उपयुक्त अशी कामे हातात घेतील आणि पार पाडतील ह्यात शंका नाहीच.
सहाय असे जर त्यांचे नामकरण असते तर मदत हा त्याचा अर्थ आणि त्यानुसार वागणूक असं मानलं असतं. पण आजच्या मराठी वर्तमानपत्रात ठळक बातमी आहे, मुख्यपृष्ठावर आणि त्यात साय असा उल्लेख आहे म्हणून हा पंक्ती प्रपंच.
हि व्यक्ती सायीच्या गुणधर्माप्रमाणे च कार्यभाग साधतील हे फार प्रकर्षाने जाणवतं आहे आणि काळानुसार त्याची गरज देखील आहे. वर वर किंवा तात्पुरते काम करण्याचे दिवस गेलेत आता. जगाच्या पाठिवर आपल्या देशाची प्रतिमा उंचावयाची असेल, आपल्या आदरणीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली कार्य जलद गतीने होण्यासाठी पुढील मार्गक्रमणा आव्हानात्मनक आहे. त्यामुळे सायीसारखं / आई च्या मायेने अनेक दिशांना, अनेक बाजूंना पैलू पाडणं महत्वाचं ठरेल.
रविवार, १० डिसेंबर, २०२३
50 shades older: Time to gin and bear it, babumoshai
This was the article in ToI yesterday. The very famous writer is narrating her own experience about turning 50 or achieving the half century.
A few of my friends like me also shifted their gears recently from full time to part time working options. We all are old school and hence first completed the full time job at hand, relived from it and then took own sweet time to hunt for possible new opportunities on our own terms. People around, the loved once were not patient enough to understand and consistently not only asked many questions "what next?" but also labeled them with unnecessary terms and phrases. Why? Who are you?
Completely on different note, as I am from computer science background, I understand that "data is the new currency" and that too labeled data play its own important role. Right? Labels are important, proved.
The newspaper dream
Our Respected Dr. APJ saw one dream, based on his visits abroad, regarding newspaper design. We attempted to fulfil his dream by successfully completing one project. He always wished to have the first page of every newspaper in our country full of motivational news from all over the world. We applied NLP, classification, and other techniques and achieved it.
As there are separate pages dedicated to sports (the last one or two), for international news, for editorial write-ups, and for jobs too, then why not a single page or two for all news related to deaths, accidents, mishaps, etc. with due respect? A person like me may not read that page at all, especially at the beginning of my awesome day. Rather, I may not visit that page at all, as the newspaper team will never know how many readers read that page in hard copy form. No one. And like me, there would be many who would prefer to do so.
I am requesting all newspapers to think about and act on it, please. I will appreciate that deeply.
बुधवार, ६ डिसेंबर, २०२३
डावी बाजू
माझी मुलं जेव्हा लहान होती, शाळकरी वयातील आणि सगळं खायला लागली होती, चव समजायला लागली होती किंबहुना शिंग फुटली होती तेव्हा हॉटेल मधे गेलो कि फक्त स्टार्टर्स आणि डेसर्टस ह्यावर ताव मारायची. अधलं - मधलं अजिबात शिवायची देखील नाहीत.
महाराष्ट्रियन खाद्य संस्कृती नुसार माझ्या मते डावी बाजू ताटातली हिला अनन्य साधारण महत्व आहे. वैविध्य प्रकारच्या चटण्या (ओल्या आणि कोरड्या), कोशिंबिरी, वाटली डाळ (फोडणीची, परतलेली, कच्ची, आंब्याची), लोणची, तक्कु अहाहा च. त्या शिवाय पंगत असली तर पापड, कुरडया, सांडगे, भजे, वडे, आणि त्यानंतर गोडाचे प्रकार. भन्नाटच. अधलं - मधलं अजिबात नकोच. ह्याच्यावरच ताव मारावा वाटतो मला. आत्ता समजलं माझ्या मुलांमधे हे गूण कुठून आलेत ते.
आमच्या नागपूरची खासियत सांगते. साग्रसंगीत पानात सगळं वाढलं असलं तरी देखील काही ठिकाणी मस्त लाल तिखट आणि त्यावर कच्च तेल (गोडेतेल) वाढायची प्रथा आहे. मीठ तर असतंच त्यामुळे अगदीच कोणाला पदार्थ अळणी भासले तर हे असलं / अस्सल तिखट मीठ लावून यथेच्छ जेवता येतं, ताव मारता येतो. माझ्या घरी हिरवी भाजी, पातळ भाजी असली जेवणात कि आई तिखट तेलाची फोडणी करूनच बसायची जेवायला. आणि सांगायलाच नक्को कि मी तिच्याच पंगतीला. त्यामुळे त्या पौष्टिक भाजी भाकरी ची लज्जत आणखीनच वाढायची, काही पटीनं हो. त्यात जर डावी बाजू हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्यांच्या ठेच्यानी सजली असेल तर विचारूच नका. आई शप्पथ.
नंतर माझं वास्तव दक्षिणेकडे होतं काही काळ तेव्हा दाक्षिणात्य चटण्यांची / चटण्यांनी बहार आणली. कोरड्या आणि ओल्या, कित्ती ते प्रकार, खावे / चाखावे तेवढे नवलच. प्रत्येक पदार्थाच्या प्रकाराप्रमाणे चटणी बदल, माझ्या सारख्या तिखट्ट खवय्याला अजून काय पाहिजे. अगदी उपम्यासोबत देखील चटणी वाढतात.
माझ्या आईकडची अजून एक पद्धत आज प्रकर्षाने आठवली आणि त्याचे महत्व कळले / उमगले, न्याहारीच्या पदार्थांसोबत किंवा पदार्थांवर ती कमीतकमी दोन किंवा तीन प्रकारची शेव पेरायची. क्या बात है. ते इतकं जगावेगळं लागायचं सांगते. म्हणजे आधीच आईच्या हातचे पदार्थ, ते देखील पहिल्या वाफेचे आणि त्यात "चेरी ऑन केक", असली तिखट मटकी + बेसन + रतलामी शेव. बासच.
तोंडी लावण्याचे जे काही पदार्थ असतात आणि हि प्रथा किंवा हि गोष्ट ज्याच्या कुणाच्या सुपीक डोक्यातून आली आहे त्यांना माझा शिरसाष्टांग नमस्कारच.
आज सकाळी सकाळी उपम्यासोबत झणझणीत चटणी खातांना मी माझ्या लहानपणीची, नागपूरची सहल करून आले, फेरफटका मारून आले. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ह्याचा अनुभव मी पुन्हा एकदा घेतला / उपभोगला आज, अगदी म्हणजे अगदी मनापासून.
माझ्या संगणक क्षेत्रात देखील एक प्रथा आहे "add on" ची, तिचा उगम समजला आज मला इतक्या वर्षांनंतर हो. "add on" ची सुरवात करणारा, किंवा ह्या संकल्पनेची सुरवात करणारा नक्कीच महाराष्ट्रियन आणि त्यातल्या त्यात नागपूरकर असणार हे अगदी नक्कीच.
मंगळवार, ५ डिसेंबर, २०२३
Sketched thali
During my recent trip to Bengaluru, I met one of my besties. We planned our meeting, and she gave me two options. We planned to reconnect over lunch. The first option was going to one of the famous a la carte restaurants, and the other one was a thali place. She insisted on the first one so that we would be able to order food of our choice. And I opted for the second one; rather, I preferred the thali, as the restaurant people must have already given a thought while designing the complete meal, which might be based on the day of the week, time, occasion (those were Diwali days), and the complete combo (which goes well with what, etc.). So if someone or the team has already done so much homework for you, then why not? It's so encouraging and respectful, according to me. Why eat always of our choice, cherish someone else's picks too, and feel the difference. My main aim was to talk, talk, talk. There were lots of things to share, discuss, and gossip about. I never wanted to focus on ordering stuff. Finally, being my bestie, she liked my way of looking at the other side, and we thoroughly enjoyed each other's company with the solicitously sketched thali for us, as if only for us.
Habuild
One of my bestest friends inspired me to take the 21-day yoga challenge posed by Habuild. And of course I did that. Fortunately, the challenge started on the very next day of our discussion. Building the daily habit of yoga was the sole moto behind this challenge. I thoroughly enjoyed the different perspectives on yoga researched and presented by an IITan.
Neck moments with concentration on breathing is one of the initial warm-ups in yoga sessions. Up-down, sideways movements of the neck were the same. But the third step is to try and touch the right ear to the right shoulder, and the same with the left too. In this step, generally, novices in yoga tend to bring their respective shoulders up. Due to this, the entire crux is lost and brings no benefits either because of wrong deeds or posture. I've been interested in yoga for a long time, and I have attended numerous workshops. But this IITan asked all the attendees to look up with their respective ear to the ceiling only. He also insisted on not trying to touch the shoulder at all. Tilting the neck and looking up is more important, according to him. Wow, because of this another side of the same pose, the postures remained intact and perfect without even focusing on the shoulder. I absolutely loved this way of looking at things. Superb indeed. I remember him daily during my yoga practice. Isn't it a perfect way to build habits?
शनिवार, २ डिसेंबर, २०२३
Astonished with a query
While I was opting for voluntary retirement, many of my colleagues and loved ones were coming and meeting me. They were worried about how I would utilize the time in hand, as for the last 27 years I have had extremely busy schedules. And I was loving the concern. The moment I finally retired and people, friends, relatives, etc.—came to know slowly about it, the common question posed to me was: How am I and will I manage my finances and expenses? Initially, when the first one or two people asked me this question, I was ok with it, but when the query became common, I was taken aback. How come they were all asking me the same question? An individual should only work for money until the end, is it?. There is nothing beyond money?. Especially for middle-class Indian families where cooking, housework, kids, and other things matter a lot. I never expected this question from the closed once though, hence I was more hurt not only with the question but also with the comments, the words showing that I am kind of useless now.
Hmmmmm, a good start for the new generation of gals. So all girls only focus on earning money and enjoying their lives. That's it, nothing else. Good for making things crystal clear now.
Housewife, a short film
Now that I have a lot of time in my hands and I really love to watch short films, I recently enjoyed a housewife named short film. I enjoyed this for two reasons: first, it was visible that the film was made by novice students from a media background. Two is: in that film, the housewife, the mother, the lady of the house, and the pillar of the house is blessed with two school-going kids. As always, before the kids wake up every morning, the mom is ready with their breakfast and tiffins too. While making food for kids, she is capturing the moments and turning them into videos for her channel. She is kind of very famous in an online medium, and her channel is also liked by many as she is posting very simple, daily recipes every day—well, almost. People get to see how to maintain variety for the entire week for kids and the healthy options. To record her videos, to do multitasking and to cook with lots of enjoyment, she is getting up pretty early, getting ready in a presentable manner, and earning money too, in turn. Wow, hats off to her. No wonder she is the pillar of strength and motivation not only for her house but for her viewers too. There is so much to learn from her. There is no need to take out separate time to record videos, as early morning is the best and quietest time to record, with a charged-up energy level after a good night's sleep and proper planning of which recipe to share with viewers the next day. Superb learning, indeed. Thanks to the entire team who made this short film. Wow.
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...