आपल्या भारतीय संस्कृतीत १०८ ह्या संख्येला एक अनन्य साधारण महत्व आहे. जगमान्य अशी हि संख्या आहे आणि १०८ वेळाच का जप करायचा ह्याची शास्त्रोक्त कारणे आहेत जी खालील लिंक वर उपलब्ध आहेत. माझ्या मते आणखीन एक महत्वाचे कारण असावे. रुद्राक्ष माळ वापरून, जमिनीवर किंवा पाटावर बसून जप केला जातो. रुद्राक्षाचे मणी एक विशिष्ट आकाराचे, प्रकारचे आणि खडबडीत पृष्ठभाग असलेले असे असतात. प्रत्येकाच्या गती प्रमाणे, हाती असलेल्या उपलब्ध वेळेनुसार १०८ माळ करायला वेळ लागू शकतो. पण साधारणतः ७ मिनिटे अंदाजे लागतात, श्री राम नामाची माळ करायला. मोठ्याने राम नाम म्हटल्याने घरी, दारी, आणि सर्वत्र ती कंपने सर्वांपर्यंत पोचतात, उपयुक्त ठरतात, जो करतो त्याला आणि इतरांना सुद्धा. मनात म्हटलं तरी त्याची प्रचिती वेगळी येतेच. शिवाय जप माळ धरून किंवा न धरता सुद्धा जप करता येतोच. जप माळेने ऍक्युप्रेशर सहज घडते आणि ७ मिनिटे दररोज हे एकंदरीत आरोग्याला लाभदायक असे सिद्ध झाले आहे. माळ न धरता अगदी सहज आणि सुलभ पद्धतीने जर एक माळ राम नाम जपायचे असेल तर श्री रामाची आरती म्हणा किंवा फक्त श्रवण करा. माझ्या निरीक्षणानुसार ह्या आरतीत मुख्य गायकाने शेवटी राम नाम जपले आहे समूह सोबत आणि संपूर्ण आरतीत फक्त समूहाच्या सुमधुर स्वरात राम नाम पेरले आहे. समूहाची संख्या अगदी मोजमाप करून घेतल्यासारखी आहे, किंवा ते आपोआप घडले असेल श्रींच्या इच्छेने. एक संपूर्ण माळेची सहज श्रवण भक्ती होते हि आरती ऐकल्याने. एकंदरीत राम नाम म्हण्याऱ्यांची कोरस संख्या मला ठाऊक नाही, पण निश्चित खात्री पटली आहे रोज भक्तिभावे श्रवण करून हि १०८ आहे. ह्या पेक्षा आणखीन सोप्पं काय करावं त्याने आपल्या सर्वांसाठी. आता मला हि आरती इतकी सफल का झाली हे उमगलं, समजलं आणि अर्थबोध झाला. क्या बात है. जय श्री राम. तो कित्ती सहजतेने घडवून आणतो सगळे, कमाल आहे.
कोरस ने म्हटलेले, मुख्य गायकाच्या स्वरात आणि शिवाय वाद्यांचे बोल ह्या समीकरणाने एकत्रित उभे केलेले १०८ नाम:
नादातून या नाद निर्मितो श्री राम जय राम जय जय राम |
https://www.youtube.com/watch?v=BK8dDitz8Pk&t=142s
https://servdharm.com/blogs/post/why-we-chant-mantras-108-times