बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

सुधन्वा


श्री. विष्णु सहस्त्रनाम ह्या स्तोत्रातील एकसष्ठाव्या क्रमांकाचा श्लोक आहे, त्यात सुधन्वा हे नाव नमूद केले आहे. माझ्या कडून दररोज नित्यनेमाने हे स्तोत्र म्हणून घेतलं जातं आणि दर एकादशीला देखील सामुहिक पठण होतं. तेव्हाच फक्त हे नाव मुखात येतं किंवा घेतलं गेलं म्हणा. पण एवढ्यातच एका सोशल मिडिया वर मी हे नाव बघितलं, कसं कुणास ठाऊक पण माझी नजर गेली आणि ते दृष्टीस पडलं. इतकं आश्चर्य वाटलं कारण मी कुठल्याही मुलाचं नाव आज पर्यंत नव्हतं ऐकलं कारण अवघड असे आहे आणि त्याचा अर्थ पण कठिण आहे, खास करून लहानपणी उच्चारायला. त्यात बाहेर देशात गेलं तर अजूनच कठिण. आपल्याकडे देवांची नावं मुलांना ठेवायची पद्धत फार जुनी आहे पण हे माझ्यासाठी नावीन्यपूर्ण होतं आणि ते मी त्यांना ताबडतोब कळवलं देखील. 


जेव्हा त्यांचा dp बघितला उत्सुकता म्हणून, कारण सोशल मिडिया वर आहेत, लिहीत आहेत, आणि मोठ्या पदावर काम करत आहेत म्हणजे साधारण ५०+ च्या आसपास असणार असा माझा अंदाज खरा ठरला. मला फारच आवडलं हे नाव त्यामुळे मग मी अनुकथा लिहिण्याआधी गूगल विद्यापीठाला नक्की विचारपूस करते तर काय  अहो आश्चर्यम्. मी आपली बघेच आहे आणि प्रत्येक क्षेत्रात आहे हो हे नाव, अभियंता आहे, वित्त, मिडिया, लेखक, CA आणि बरेच असे. मी हबकलेच बघून.  माझं एक छोटेखानी केलेलं संशोधन असं आहे कि नावावरून आणि त्यामुळे न्यूमरॉलॉजी मुळे पण सांगतां येणं शक्य होतं कि कोणासाठी कुठले क्षेत्र योग्य आहे.  पण ह्या नावाने तर माझी विकेटच काढली. सरते शेवटी हे श्री. विष्णूंचे नाव आहे, प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करणारंच आणि ते देखील उत्कृष्टरीत्याच. त्या हून मोठं आश्चर्य म्हणजे ह्या विख्यात व्यक्तीचे संपूर्ण नाव "सुधन्वा कुलकर्णी" असे आहे आणि ह्याच नाव-आडनावाची पण असंख्य मुलं आढळली मला ऑनलाईन. माझ्या चार डोळ्यांनी जेव्हा व्यवस्थित निरखून बघितलं तर सगळी वेगळी मंडळी आहेत. कमाल आहे. एका नावाची इतकी माणसं 

आणि ती देखील प्रसिद्ध. तिरंदाज, चौकटी बाहेरचा विचार करणारा, तत्ववेत्ता, विचारवंत, द्रष्टा आणि बरेच अर्थ आहेत ह्या नावाचे. ज्यांनी कोणी हे नाव इतक्या सगळ्या मुलांची ठेवली आहेत त्या सर्वांना दंडवत. नावासारखीच प्रगती आहे.   

तो एक अनोखा सुगंध



आताशा कोजागिरी वर्षातून दोनदा येते का? आणि असेल तर ती आज आहे का? माझी संपूर्ण सोसायटी एक अप्रतिम सुगंधाने सजली, नटली आहे असा मला अनुभव येतो आहे. चार काय आठ दिशेतून घमघमाट सुटलाय नुसता ताज दूध उकळण्याचा किंवा आटवण्याचा. अहाहा च. "काय वर्णू तव गूण ..." अगदी असं झालंय मला. 


हे का झालंय हे देखील सांगते. ह्या मागल्या न्यू नॉर्मल दिवसांमधे आम्ही अमूलचे टेट्रा पॅक दूध आणायला सुरवात केली. त्यावेळची परिस्थिती बघता तेच आम्हाला योग्य वाटलं आणि त्यानंतर तेच सुरु राहिलं. दररोजचे दूध घेणं, ते उकळणं, मग अधेमधे दूधवाला न येणं, कधीतरी ते फाटणं असे सगळे अनुभव येणं 

पण थांबलं. त्यामुळे असेल कदाचित ह्या साध्या दुधाच्या सुगंधाने आज प्रसन्न व्हायला झालं मला, नकळत, अचानक. आणि अचानक झाल्यामुळे अजूनच नाविन्य जाणवलं, किंवा काहीतरी दृष्टिआड झाल्याची जाणीव झाली. 


हा हवाहवासा दुधाचा सुगंध कुठल्याही पठडीत बसवता येत नाही, जसे कि फुलांचा सुगंध, मातीचा, स्वयंपाकाचा, कृतूमानाप्रमाणे येणारा मोहोराचा ई. हा एकटाच आहे त्याच्या ग्रुप मधे. त्यामुळे अजूनच  भावाला मला आज. 


सगळ्या घरी जेथे जेथे आत्ता दहाच्या सुमारास दूध तापवण्याचा सोहोळा पार पडला त्या समस्त मंडळींना शतशः धन्यवाद. माझा दिवस अप्रतिम केल्या बद्दल.  

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

Uniform

 When we use this word or phrase, we imagine a school, factory, security, or nurse's uniform. Today, out of the blue, I got to know the new meaning of the same word. Rather, today I actually came to know how apartments' concepts were formed in the first place. I mean, I am the proud daughter of one of the well-known civil engineers, and hence I was brought up with all those construction-related words only: best utilisation of space, vertical growth, affordable housing, secured, maintenance by society, and the list is huge.

In addition to that, barring a very few apartment complexes, all others look alike. All flats are of the matching measurements, the same built, the identical structure, and what not, uniform in nature.

In school, every child is in the same uniform; they look the same from afar or from the outside, but every student in the same uniform is truly and uniquely different from within. The uniform concept in school is primary to imbibe similarity and equality in everyone at a very early stage, so that they should focus on studies, games, and overall development. Similarly, all apartments are built the same way, all are equal, which means owners think alike, and hence now neighbours who are staying in harmony. But still, interiors and their maintenance are different. See the similarity in apartment and student's uniformity; from within, they are themselves extraordinarily distinct.

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०२३

शिल्पकार


नावाला साजेशी अशी माझी एक खास मैत्रीण आहे. अनेक वर्ष आधी तिचं नामकरण झालं होतं. ज्यांनी कोणी हे नाव ठेवलं त्याला धन्यवाद आणि हि ते जगली सातत्याने. अगदी योग्य, अप्रोप्रिएट, समर्पक असे ते नाव. ह्या अश्या नावामुळेच कदाचित हिला इतकी वर्ष वैविध्य शिल्प साकारता आली, ती सर्वोत्तम शक्ती लाभली. अशीच उत्साहात्मक ऊर्जा आणि क्षमता तिला सतत लाभो हि प्रार्थना. 


तर हि आहे डॉ. शिल्पा गीते. माझ्या मते गेली १५-१७ वर्षे ती सातत्याने विविध शिल्पे घडवत आहे. सुरवात स्वतः पासून केली. म्हणतात ना "लिव्ह बाय एक्साम्पल", "स्वतः आधी कृती करून दाखवा" अगदी तसेच काहीसे, वाहनचालकाशिवाय गाडी चालवण्यासाठी लागणारे तंत्रज्ञानाचा काही भाग शिल्पा मॅम ने संशोधन करून जगासमोर मांडला. अथक प्रयन्त केले, अनेक वर्ष विविध स्तरावर काम झाले आणि विद्यावाचस्पती हि सर्वोत्तम पदवी मिळवली. त्यानंतर कधीही मागे वळून बघितले नाहीच. अधिक मोठ्या प्रमाणावर आणि अन्य विषयांवर संशोधन चालू ठेवलंच आणि अनेकांच्या मार्गदर्शक ठरल्या. त्यात स्नातकपूर्व पदवीचे विद्यार्थी होते, स्नातकोत्तर आणि PhD करणारे संशोधक विद्यार्थी देखील, मोठ्या प्रमाणात. हे झालं कचेरीतलं सांगीतिक शिल्पकृती घडवणं. त्यात घरची दोन पिल्लं घडवली त्यासोबत ते वेगळंच. अहाहा च. "काय वर्णू तव गुण, अल्पमती नारायण" असं काहीसं झालंय माझं एक बातमी ऐकून. एवढ्यातच ह्या शिल्पकाराची एक नवीन (कदाचित प्रथम अशी) शिल्पकृती समोर आली. मॅम च्या हाताखाली अनेक वर्ष काम करून एका संशोधकाला विद्यावाचस्पती होण्याचे सौभाग्य लाभले. मॅम ची हि अशी शिल्प घडवण्याची शैली ज्याला संगीतमय जोड आहेच अशीच अनेकवर्ष सुरु राहो म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना अलभ्य लाभ मिळेल, संशोधनाचे महत्व पटेल, समजेल / उमजेल, आणि ह्या सर्वांमुळे त्यांचं, अनेक प्रशिक्षणार्थी चं, विद्यापीठाचं आणि संस्थांचं नाव होईल, ज्ञानात भर पडेल. Kudos to her.  

लहानपण देगा देवा


मी हि म्हण, अर्थात श्री संत तुकाराम महाराजांची प्रसिद्ध ओळ अनेकदा ऐकली आहे. बऱ्याच जणांनी ती वापरतांना देखील बघितली आहे, किंबहुना प्रत्येक मोठ्या व्यक्तीला हे मनापासून वाटत असतंच कि पुन्हा पट्टाकिनी लहान व्हावं. किंवा पालकांना देखील असंच नेहेमी वाटतं कि आपली मुलं लहानचं आहेत, राहावेत, व्हावेत. लहानपण म्हणजे काय बोलायचं, माझे शब्द अपुरे पडतात. ते बिनधास्त दिवस, पूर्णपणे पळापळ, खेळ, यथेच्छ खाणं, लोळणं, मस्ती, मित्र मैत्रिणी, प्रेमळ शिक्षक, शाळेचा डब्बा, आणि हि यादी फार म्हणजे फारच मोठी आहे. कधीही न संपणारी अशी, भलीमोठी. कशाची म्हणजे कशाची चिंता नाहीच. सगळं कसं मोकळं, हलकं, फारच भारी. 


माझं बालपण तर मला आठवण अशक्यच, पण माझ्या मुलांचं लहानपण मी जगण्याचा प्रयन्त केला. ते बोबडे बोल, हालत डुलत धडपडत चालण्याचा अथक प्रयन्त, तोल जाणं, खात्री नसणं, हळुवार चाल, दुसऱ्यांनी दिलेले कपडे, दुसऱ्याची मदत घेत शिकणे, जीभ, मान ई. ची गडबड आणि असेच बरेच काही.  त्यावेळी मात्र ते बाळबोध वाटत, कौतुक होतं सर्वत्र. ते तोतडे बोल कोणालाच उमगत नसतात पण तरी देखील त्या बाळाला अगदी कुठे ठेऊ आणि कुठे नाही असं होतं त्या घरातल्यांना. तोंड दुखेस्तोवर कौतुकांचा वर्षाव सदोदित. दररोजची एक नवी गोष्ट, नव्या घडामोडी. अगदी विचारायची सोयचं नाही. लहानपण फार कमी काळ टिकतं त्यामुळे असेल कदाचित. मोठी झाली हिच मुले कि मग शिंग फुटतात आणि हाती लागत नाहीत ते वेगळंच. खूप कमी मुलं माणूसघाणी असतात, ठराविक लोकांकडेच जातात, बघून हसतात, बोलतात, विविध कृती करून दाखवतात ई. बहुतांशी सगळेच फार मोकळे असतात. प्रत्येकाशी बोलतात, प्रयन्त करतात, माणसांमधे रमतात, बडबडतात वगैरे. 


माझ्या सोसायटीत बरेचसे जेष्ठ वरिष्ठ वास्तव्याला आहेत. काही जण तर व्यवस्थित त्यांची स्वतः रोजनिशी पाळतात, पाळू शकतात. पण काही जण गाडी गाडी करतांना दिसतात, म्हणजे व्हीलचेअर किंवा चाकांची खुर्ची वापरतांना आढळतात. एक काळजीवाहू, निरीक्षण करणारा व्यक्ती असतो त्यांच्या सोबत, मुलगा अथवा मुलगी. आमची सोसायटी भली मोठी असल्यामुळे सकाळी ऊन खाणं, स्वच्छ शुद्ध हवा अनुभवणं, येणं - जाणं बघत आनंदी होणं हे सगळं सहज करता येतं आणि इमारतीच्या मागल्या बाजूला जेथे कमी रहदारी असते तेथे पाय मोकळे देखील करता येतात. बऱ्याचदा सगळेच जेष्ठ चपला न घालता फिरणं, काही पाऊलं चालणं पसंद करतात. कोणी हातात आधाराला काठी घेतात, काही तसेच चालणं पसंद करतात. माझ्या खिडकीतून मला आता भरपूर वेळ असल्यामुळे किंवा मी सकाळी बाहेर चक्कर मारत असतांना दृष्टीपथात पडतं. आणि पुन्हा एकदा श्री संत तुकाराम महाराजांची ती ओळ आठवतेच. "लहानपण देगा देवा". आपण मनात मागतो, तो देतो, निसर्गनियमांनुसार वय वाढतं पण लहानपण पुन्हा अनुभवता येतच, वेगळ्या धाटणीतलं, अर्थातच. तेच डोलणं, तशीच ती मान,  चालतांना डगमगणं, चाकांच्या खुर्चीवर बसतांना तोल जाणं, खुर्ची नक्की कुठे आहे हि खात्री पट्टाकिनी न पटणं, ते बोल आणि बरेच काही. आई गं. एक छोटासा बदल मात्र आहे. प्रत्येक कुटुंबातून ह्या बोबड्या बोलांचं, डगमगण्याचं कौतुक होतंच असं नाही. आधी पांगुळगाडा आणि आता काठी चा आधार. एक वर्तुळ इथेच पूर्ण होतं. काय नियम आहे ना ह्या निसर्गाचा. असो. प्रत्येकालाच ह्यातून जावंच लागणार आहे. मग ह्या दुसऱ्या लहान टप्प्याचा अत्यानंद घेऊया. जमेल तेवढं ह्या विकसीत टप्प्याचा पण उपभोग घेऊयात, सांभाळून, जेवढं जमेल तेवढं. मस्त आणि स्वस्थ राहून. वेळेवर दररोज रोजनिशी पाळून, म्हणजे सगळं मिळवलं.  

घुटी


भारतीय परंपरेनुसार आणि वैद्यकिय शास्त्रानुसार देखील अगदी जन्मल्यापासून ठराविक प्रमाणात बाळाला घुटी देतात. पद्धतच आहे ती. जसं जसं बाळ वाढत जातं तसे तसे घुटीच्या घटकांचे फेरे पण वाढतात. फारच उपयुक्त घटक असतात घुटीत. ठराविक खास सहाण वापरूनच ती घुटी बहुतांशी घरच्या सर्वात थोर अश्या आजी, काकी, मामी ई. तय्यार करतात, अगदी उत्साहाने. तो उत्साह मात्र वाखाणण्याजोगाच असतो. त्याला सरच नाही कशाची. माझ्या दृष्टीने ती सहाण, ते फेरे, ते शास्त्रशुद्ध आणि चपराक प्रमाणात वापरलेले घटक जितके महत्वाचे तितकाच, किंबहुना कणभर महत्वाचा तो ह्या थोर मंडळींचा दररोज मिळणार आशीर्वाद. ते ज्या मनापासून तय्यार करतात सगळं कि ज्याचं नाव ते. बाळ गुटगुटीत होणारच अशी आशिर्वादात्मक घुटी दररोज घेऊन / प्राशन करून. 


अगदी तसेच औषधी वनस्पतीचे, खोडांचे आणि इतर घटकांचे फेरे होमिओपॅथी औषधी तय्यार करतांना वापरले जातात शास्त्रानुसार. त्यामुळेच पोटेन्सी ठरवली जाते असं मी ऐकलं आणि वाचलं आहे. वयोमानानुसार, रोगाच्या तीव्रतेनुसार आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार विविध पोट्यांसीची औषधें दिली जातात. त्याचा उपयोग निश्चित होतो आणि दुष्परिणाम अजिबात होत नाहीच. 


घरी किंवा दारी, हाताने छोटेखानी किंवा मशीनने मोठ्या प्रमाणात जेव्हा केक तय्यार करतात तेव्हा पण ठराविक पद्धतीने आणि दिशेने पदार्थ / घटक फिरवायचे आणि मिसळवायचे असतात. असं केल्याने त्या मिश्रणात म्हणे ठराविक हवेचे प्रमाण राहते / टिकते ज्यामुळे केक सुंदर, मऊ आणि लुसलुशीत होतो.   


ह्या सगळ्यांची पार्श्वभूमी आज मला प्रकर्षाने ध्यानात आली. आज मी खूप दिवसांनी महाराष्ट्रीयन पद्धतीची आमटी केली. त्यात यथासांग शेवग्याच्या शेंगा घातल्या, आणि बाकी सगळे लागणारे घटक पदार्थ घातले. मुख्य म्हणजे मी अगदी शांतपणे व्यवस्थित वेळ घेऊन ती आमटी केली. आज का कुणास ठाऊक पण आमटी करते वेळी बऱ्याच वेळा किंबहुना प्रत्येक घटक घातला कि एकदा डाव फिरावालाच. त्यामुळे असेल कदाचित गूळ पट्टाकिनी आणि सुंदर विरघळला.  आमसुलाची उत्कृष्ट चव आली. सगळे मसाले व्यवस्थित मिसळले आणि मेथी पण अगदी कणाकणात सामावल्यासारखी उठावदार चव देऊन गेली.  मज्जा आली खूप. एका शिस्तीत डाव फिरवल्याचे इतके सुंदर परिणाम होईल, फळ मिळेल हे आजच समजलं आणि उमगलं मला. अहाहा च.  


सरते शेवटी काय प्रत्येक वेळी उत्तम पद्धतीने वापरलेले फेरे अत्यंत महत्वाचे. अत्यानंद देऊन जातात हे नक्की. मी घुटी चाखली तेव्हा त्याची चव तर मला आठवत नाही पण होमिओपॅथी औषधाने कित्येकदा मी ठणठणीत बरी झाले तेव्हा, घरी असंख्य वेळा केक तय्यार केले तेव्हा आणि आज पुन्हा घुटी चे महत्व आणि मिळालेल्या आनंदची चव अनुभवली.    

रविवार, १९ नोव्हेंबर, २०२३

फुकट


मी मराठी शाळेत शिकलेली असल्यामुळे त्या भाषेवर आणि म्हणींवर माझं भलतंच प्रेम आहे. इतकं कि येता-जाता मला त्या म्हणी आठवतात आणि चपराक बसतात / उपयोगी ठरतात. मला आणि ऐकणाऱ्यांना देखील त्या म्हणींचा नवा प्रयोग समजतो / उमगतो. 


काही वर्षांपूर्वी माझी एक दररोजची सवय होती. कचेरीत जातांना देवळात काही क्षण घालवायचेच. नमस्कार करत शतशः धन्यवाद द्यायचे आणि मार्गस्थ व्हायचं. ह्या माझ्या रोजनिशीत एक गोड जोडपं माझ्या सोबतीला होतं. ते तेव्हा जवळपास नव्वदीच्या पुढचे होते. एकमेकांकडे बघून फक्त स्मितहास्य होत असे आधी मग आम्ही थोडेसे बोलायला लागलो. अर्थात मी पळत असायचे, कचेरीची बस गाठायची असायची त्यामुळे जास्त गप्पा होत नसतं. तरी देखील ते मला एका वाक्यात थोडक्यात खूप काही सांगून जायचे. एकदा म्हणतात कसे, "आपली भाकरी स्वतः कमावायलाच हवी", तुम्ही नोकरी करता ते योग्य आहे, अभिमान आहे, ई. 


जवळपास १९९५ पासून ते २०२३ पर्यंत वैविध्य पदांवर काम करता आले, मुलांना लहानपणापासून एकटं ठेवून मी पळत राहिले आणि आत्ता स्वेच्छा सेवा निवृत्ती  घेतल्यावर ह्या म्हणींचा खरा अर्थ उमगला. "देअर इज नो फ्री लंच" अर्थात "जगात कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही". 


सध्या मी घरी असल्यामुळे बहुतांशी दररोजच माझी भाकरी मी जेवायच्या वेळी स्वतः गरम गरम करून घेते आणि फस्त करते. सबवे नावाचे एक जगप्रसिद्ध रेस्टॉरंट आहे, फूड चेन म्हणा तर. त्यांचे एक ब्रीद वाक्य आहे. "आम्ही आमचा ताजा ब्रेड स्वतः तय्यार करतो". ह्या सगळ्या म्हणींचा अर्थ माझ्या दृष्टीने एकच आहे. स्वाभिमानाने जगा, समाधानी राहा, हवे तेवढे पैसे कमवण्याची ताकद "तो" देतोच, आणि लाभलेल्या शक्तीने स्वतःसाठी घरचे साफ, स्वच्छ, ताजे, जमल्यास करून खा, दररोज / नियमित. 

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

पक्षांनी कधीही गरिबांना एकत्र येऊ दिले नाही


मी अगदी लहानपणीपासून पक्षांच्या, आपाल्या पक्षी मित्रांच्या गोष्टी ऐकून मोठी झाले आहे. जरी त्या फक्त गोष्ट होत्या, तरी मी मोठी होत असतांना असंख्य वेळा पक्षांच्या उपयुक्ततेची महती ऐकली आहे. अनेक संशोधक कित्येक वर्षे ह्या विषयावर संशोधन करत आहेत. त्यांच्या लेखात सुद्धा अनेकदा विविध जातीच्या पक्षांबद्दल लिहिलं गेलं आहे. मानवजातीला पक्षी हे वरदान आहेत. अनेक वृत्तपत्रांच्या लेखात देखील हे आढळेल. काही ठराविक लिंक येथे देत आहे. अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपटात देखील पक्षांबद्दल बोलले गेले आहे. मूकप्राणी आणि त्या मनानी आकाराने लहान, वयोमान कमी असे असून देखील प्रत्येक जात आपल्या ला मदत करत असते सातत्याने, गेल्या अनेक पिढ्या, अनेक वर्ष सलग. 


घरात अगदी छोटासा मिठू जरी असला तरी घरचं वातावरणचं बदलून जातं. तो अगदी घरचा सदस्य असल्यासारखा असतो, राहतो. माझ्याकडे दोन पोपट होते म्हणून मी ते सगळं अनुभवलं आहे. 


मला दररोज पक्षीच साद घालून पहाटे जागं करतात. मी फारच भाग्यवान आहे कि आमच्या घरच्या आजूबाजूला अनेक बहुउपयोगी झाडे आहेत. त्यामुळे पक्षांची सकाळ संध्याकाळ शाळा भरते, विविध सण साजरे होतात, लग्न कार्य होतात, लग्न कार्याची लगबग अनुभवता येते, मग पिटुकले नवे पिल्लं जन्म घेतात आणि अत्यानंद देऊन जातात, परंपरा सुरु ठेवतात. माझ्या आजारपणात देखील मी आधी अनेक लेखात लिहिल्या परिमाणे पक्षांनी मला खूप साथ दिली. त्यांना कसं काय जाणवलं कुणास ठाऊक कि मला त्यांची अत्यंत गरज आहे ते. त्या छोट्याश्या जिवांना माझ्या डोळ्यातले ठरलेले पाणी दृष्टीस पडले म्हणजे महद आश्चर्यच. 


अश्या माझ्या सारख्या पक्षी प्रेमीला जर हे वाक्य "पक्षांनी कधीही गरिबांना एकत्र येऊ दिले नाही" वाचायला मिळालं वर्तमान पत्रात तर प्रचंड दुःख होणारचं ना? काय हे, लिहिणाऱ्याच्या जिभेला काही हाडं? असं कसं शक्य आहे. आणि हा मथळा वाचूनच मी इतकी अवाक झाले कि संपूर्ण बातमी वाचविशीच वाटली नाही.  पण मग  माझा छोटासा मेंदू मी वापरला आणि सद्य स्थितीचा विचार केला तर वाटलं कि हा लिहिणारा कदाचित राजकीय पक्ष्यांबद्दल बोलत असावा. आणि जर तसं असेल तर स्पष्ट लिहावं ना मग, हे काय पक्षांनी गरिबांना ... 


मी काही वार्ताहार नाही का त्या क्षेत्रातली तज्ञ् नाही पण इतकी साधी मूलभूत गोष्ट तर नक्कीच समजते मला. संदिग्ध किंवा अर्धवट का लिहायचं बरं? किंवा लोकांना समजेलच किंवा ते समजावून घेतीलच हे गृहित का धरायचं? ह्याला पत्रकारिता म्हणत नाहीत माझ्या दृष्टीने. आणि त्या वर ज्याने हा लेख छापण्यापूर्वी तपासाला असेल त्याचं काय? माझ्या मते एक नाही, दोन नाही, तीन किंवा जास्त तज्ज्ञांकडून लॆख / लिखित गेल्याशिवाय छापत नाहीत म्हणे? आश्चर्यच आहे.  

https://divyamarathi.bhaskar.com/news/what-is-the-significance-of-birds-in-our-lives-126871414.html

https://www.lokmat.com/maharashtra/importance-birds-biodiversity/

https://maharashtratimes.com/editorial/article/save-the-birds-save-the-humans/articleshow/74211269.cms

Ankur Dhama

 I learned for the first time that there are visually impaired runners who participate and win medals. In today's Times of India newspaper, I came across the news about the uniquely different athlete Ankur Dhama, who is a runner and winner of medals.


In the news article, it is mentioned that Ankur needs a buddy to run along with. It required a minimum of two months of practice to gel well with the feet of both runners. I was only aware of writer given to visually impaired students during written exams.

Being a tech-savvy person and exposed to Siri-like voice help, I feel that voice-enabled tech help is feasible in case of visually impaired runners. According to me, visually impaired individuals' hearing sense is the best. So if the entire route or running track is already fed in, then it's easily possible to run with tech support instead of humans. This is just a thought to share. I hope Siri or Alexa, like Techie, will prove to be better help as they support almost all local languages too.

अंकुर धामा


कालच्या वर्तमान पत्रात एक बातमी वाचून माझे डोळे उघडले आणि पाणावले देखील. अनेक विकलांगांनी आपल्या देशाची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंच केली. अनेक खेळ गटात प्राविण्य मिळवले, पदकं पटकावली आणि हे सगळं अत्यंत चिकाटीने, कठिण परिस्थितीत, शारिरीक मर्यादा असतांना, प्रयत्नांची पराकाष्ठा करून. त्या सर्व खेळाडूंना, त्यांच्या स्व-प्रेरणेला, अपार कष्टांना, मेहेनतीला, त्यांच्या गुरुजनांना, कुटुंबाला माझा साष्टांग नमस्कार. 


अंकुर धामा हा एक धावपटू आहे. लहानपणी काही वर्षांचा असतांना त्याची दृष्टी गेली. त्याने धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला सुरवात केली, पदकं मिळवली आणि त्यामुळे त्याला एक दिशा मिळाली.  आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्याला बरेच सन्मान मिळत आहेत. एवढ्यातच त्याने अजून भरपूर पदकाची कमाई केली आणि त्या बद्दलची बातमी छापून आली होती कालच्या वर्तमानपत्रात जी माझ्या वाचनात आली. अंकुरला एका डोळस धावपटूने ह्या शर्यतीत मदत केली असं त्या दोघांचं छायाचित्र छापून आलेलं आहे. दोघे त्यात काही तरी पकडून आहेत, नाहीतर त्याशिवाय एकत्र पळणे शक्य नाहीच. बातमीत लिहिल्या प्रमाणे कमीत कमी सलग दोन महिने एकत्र सराव करावा लागतो म्हणे दोघांना तेव्हा कुठे दोघांच्या पायांची लय सांभाळली जाते, कोणालाही इजा होत नाही, दुखापत होत नाही. तो अंकुर सोबत पळणारा, साथ देणारा दिशादर्शक असतो, सोबती असतो, मार्गदर्शक असतो आणि जाणिवांचे भान असणारा आणि जपणारा असतो. अंकुर पूर्णपणे त्याच्या सांगण्यावर अवलंबून असतो आणि तशी पाऊले टाकतो, जिंकण्याच्या दिशेने, दृढविश्वासाने. 


मी ह्या आधी फक्त परीक्षेचे प्रश्नपत्रिका लिहायला मदतनीस एवढंच काय ते ऐकलं होतं, अंध व्यक्तींबद्दल. 


पण एका धावपटूला निस्वार्थ पणे मदत करणे, त्याच्या एवढीच, किंबहुना कणभर जास्त मेहेनत घेणे, पळणे, नियमित व्यायाम करणे, खाण्यापिण्यावर प्रचंड बंधने पाळणे, ध्यान करणे, अंकुर ला त्याच्यापेक्षा जास्त समजावून घेणे, कुठे कधी कसे वळायचे, खाली वर रस्त्यावर पळतांना कसे सांगायचे ह्याचे भान राखणे, आणि हे सर्व कुठल्याही पदकाची अपेक्षा न ठेवता, बाप रे अहो हि याही तर न संपणारीच आहे... माझ्या शब्दकोशात ह्या बद्दल शब्द नाहीतच. आणि ह्या साथीदाराला एक प्रचंड समाधान नक्की मिळत असेल, किंवा तो देखील एक खेळाडू असेल पण पदक शेवटी अंकुरलाच मिळणार. 


ह्या करता मला सुचलेला एक उपाय आणि एक तरणोपाय असा:


उपाय : (जो माझ्या हातात नाही किंवा सहज शक्य नाही) सरळ रस्ता / ट्रॅक बांधणे अश्या शर्यतींकरता 

तरणोपाय : (सहज शक्य आणि सध्या वेगळ्या पद्धतीने वापरात असलेला, ओळखीचा असा) आपली सिरी ताई, किंवा अलेक्सा मावशी मग कधी कामाला येणार? त्यांना रस्ते कसे वाचायचे हे ठाऊक आहे, ते समोरच्याला वैविध्य भाषेत कसे कळवायचे ते पण माहित आहे आणि ईअर-फोन / हेड-फोन / एअर-पॉड्स अश्या तावून सुलाखून निघालेल्या अनुभवी वस्तू देखील आहे. अशी तंत्रज्ञाची साथ मिळाली किंवा घेतली तर जास्त सोईचं होईल असा माझा अंदाज आहे. 


अर्थात मी ना धावते, ना मी कुठलीही क्रिडापटू आहे. पण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम केलं आहे, ह्या अश्या वैविध्यतेने नटलेल्या गोष्टी माणसाचे जीवन सुकर करण्यासाठीच आहेत ह्या वर दृढ विश्वास आहे आणि संभवनीय आहे ह्याची खात्री आहे म्हणून मांडले माझे विचार येथे. प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? शेवटी ते पिटुकला श्रवण यंत्र फक्त वापरून बघायचे आहे, आणि त्याला संपूर्ण रस्ता आधीच कळवायचा / फीड करायचा आहे, बास.  

विलंबचीत


कोणीतरी म्हटलं आहे ना कि माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, शिकत असतो किंबहुना शिकायलाच हवे सातत्याने. आज नकळत तसे घडले माझ्यासोबत. मी एक नवीन शब्द शिकले माझ्या मातृभाषेतला. आणि त्यामुळे फारच वेगळं मस्त वाटतंय आज. 


बाकी देशातलं माहिती नाही पण आपल्या भारतीयांमधे बऱ्याचदा असं आढळून आलं आहे कि कामं पुढे ढकलली जातात. अर्थात असे करणारा वर्ग नगण्य असेल, पण अस्तित्वात आहेच. उद्या करू, नंतर बघू, आत्ता करायची काय गरज आहे, काही वेळाने केल्याने काय बिघडणार आहे ई. वाक्य ऐकायला मिळतात, कानावर पडतात. काहींच्या बाबतीत तर अशी ढकलाढकली प्रत्येक गोष्टीत नजरेस पडते. अगदी गळ्याशी आल्यावरचं पावलं उचलायची. असं का हे त्यांनाच ठाऊक. काही विद्यार्थी गृहपाठ किंवा कुठलेही शिक्षकांनी दिलेले काम, खूप आधी गृहपाठ देण्याची / सादर करण्याची तारीख कळवून देखील अगदी शेवटच्या घटकेला काम करायला सुरवात करतात. मग कधी इंटरनेट चालत नाही, नाही तर कधी डोकं / बोटं, ताप काय येतो आणि बरेच काही. 


बरेच जण कचेरीसाठी, मिटिंग करता, महाविद्यालयात जाण्यास इतके उशिरा घराबाहेर पडतात, दररोज कि ज्याचं नाव ते. मग काय जोरात गाडी चालवणं, रस्त्यावर गडबड करणं, कटकट, दुसऱ्याला दोष देणं, उशिरा पोचल्यामुळे राग आणि कारणं सांगणं... काय हे आणि कश्यासाठी. दररोज ची रोजनिशी पाळली तर  सगळं सुकर होतं. "उपचारांपेक्षा खबरदारी चांगली" नाही का? 


मी अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केल्यामुळे बघितलं आणि अनुभवलं आहे कि अगदी शेवटची भरपूर मोठ्या गुणांची परीक्षा असली तरी देखील उशिरा पोचायचं, आणि ते देखील कसे तरी, धापा टाकत, चुरगलेले कपडे, अव्यवस्थित केस, संगणक मग सुरु होत नाही, समूहात काम करत असून दुसऱ्याकडे टीम मेंबर कडे काहीही नसतं ई. अवघड आहे. अर्थात टापटीप येणारे बोटावर मोजण्या इतके असतात देखील. 


हा काही उदाहरणावरून आणि काल झालेल्या चेंडू-बॉल + फळी-बॅट क्रिकेट च्या खेळात झालं तसं विलंबचीत होणं टाळणं सहज शक्य आहे, सर्वांच्या हातात आहे. वेळेला महत्व द्या. सगळी अवजारे तपासा आधीच, वेळेआधी हजर राहा नेहेमीच, तय्यारी ठेवा, शिस्त बाळगा सर्वांनी, प्रत्येक क्षेत्रात कितीही लहान किंवा मोठ्या पदावर गेलात तरी देखील.  

बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

उपयोगी ताण आणि विस्तार


परवा अगदी सहज माझ्या चार डोळ्यांनी काही नाविन्यपूर्ण असे टिपले. माझ्या असंख्य मैत्रिणींपैकी एक जण मस्त लांब, सरळ, चमकते केस मिरवत होती. खूप म्हणजे खूपच छान दिसत होती ती, पाच एक वर्ष तरुण. वाखाणण्यासारखा बदल होता. मला खूप उत्साही वाटलं तिच्याकडे बघून. मग सहज माझ्या छोट्याश्या मेंदूला ताण दिल्यावर लक्षात आलं, कि हिचे केस तर दाट आणि कुरळे होते, साधारण / मध्यम लांबीचे. अर्थात ती पण पाच एक फूट उंचीची असल्यामुळे सध्याचे नवीन केस जरा जास्त लांब रुंद वाटत होते. म्हटलं हे नक्की काय आहे. तेव्हा समजलं कि हिने सरळ करून घेतलेत केस. कुरळे केस सरळ केले ताण देऊन, मशीन वापरून, उष्णतेमुळे विस्तारतात बरेचसे. अहाहा च. क्या बात है. कायापालट च होता तो. 


अगदी तसेच. आपण देखील आपल्या विचारांना, कृतींना, शिकण्याला, आत्मसात करायला किंवा अजून काही अत्यावश्यक बाबींना हवा तेवढा ताण दिला तर? फक्त विचार करा मंडळी कुठे पोचू आपण सर्व, काय काय पादाक्रांत करता येईल सहज अगदी नवीनतम गोष्टी अनुसरुन. नाही का? करून बघायला काय हरकत आहे. किंबहुना आपण सातत्याने करत असतोच. पण कधीतरी, कोणाला तरी एक ठेहेराव येऊ शकतो, साहजिक आहे. तेव्हा एक छोटासा प्रयत्न तर बनता है बॉस. नाही पटलं, आवडलं तर काहीच हरकत नाही. तसेही केस सुद्धा जर तात्पुरते, एका वेळेपुरते सरळ करून घेतले तर एका धुण्यानंतर तर ते मूळ पदावर येतातच. त्यामुळे chill आणि तो आवश्यक ताण द्याच मंडळी.  

That stretch


The other day, I suddenly observed one of my friends, at her middle age, flaunting her very long, shiny, straight hair. I was taken aback to see that awesome length, as I was recollecting her with a bumpy curly one of average length. Then I realised that current straightening practices made it possible. Curls, when they open up, become larger in length than the original. Those systematic stretches play an important role, as does, of course, consistent care.


Exactly. Let's stretch our limits too. This will not only help us shine bright, but we will also be fashionable, trendy, more presentable, and visible, as required. We are born with and learn the basics by observing and practicing a few things. But it's necessary to go with the flow sometimes or many times. So there is no harm in trying. Finally, if you opt for one-time straightening of the hair, after one wash, the hair will come back to its original shape and size. So chill and stretch.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...