बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

URL - Unique Resource Locator

 With due respect to this new generation's extensive use of technology and gadgets, I still have few queries in my mind. And these queries are, 

  • On which platform this new gen is / sits / spends huge amount of time
  • Are they only on social media?
  • Or only on YouTube or alike video platforms?
  • Are they just the users of these platforms or also wish to / try to dig out more information about the source, the origin or the creator etc.
  • Do they know that websites also exists?
  • Do they know every website is assigned with a unique address?
  • If yes, then do they really know the parts of website address or they only believe, prefer and practice on clicking on the readily provided address?
  • How about knowing URL is the synonymous term for the website address?
  • If so, then how this address begins generally?
  • Will the address be from www only? 

I was taken a back when I narrated the website address in a very calm and step-by-step way for example: https://............

This is not my experience with one gen-z but many many. 

The moment I spell https colon double slash, and they type something unusally different and blame that the website doesnt exists, the website is not popping up, i have given wrong details and what not, a list of reasons. 

I was fortunate enough to see across the table how few gen-z type the website address's spelling properly and to my surprise I see many variations, as if they never ever heard of how the website address looks like, or contains.

One gen-z personality typed "https poland double slash", literally, where is colon and where is poland, OMG, unblievable. Whats up to these young once? What can be done for this, its so simple to understand and type and use like a everyday chore.


मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

नात्यांचे पदर

काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीकडे माझं राहायला जाणं झालं. माझा स्वभाव आणि बरं दिसत नाही फक्त आळश्यासारखं बसून राहणं आणि आधाश्यासारखं फक्त खाणं म्हणून तिला मदत करायला गेले. त्या दिवशीच्या सकाळच्या जेवणात भरीत करण्याचा बेत होता तिचा आणि ते देखील नागपूर स्टाईल स्पेशल. आम्ही त्याला कच्च भरीत म्हणतो. कारण वांग ऐवी तैवी भाजलेलं असतंच त्यात मग कांदा घालून फोडणी द्यायची, चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर साखर पेरायची. बास, भन्नाट भरीत तय्यार. काही जण त्यात दही घालून पण खातात, काही बारीक टॉमेटो पण आवडीने वापरतात. माझ्या मैत्रिणीने कांदा पात घालण्याचं ठरवलं होत. कांदा पात चिरायला थोडासा वेळ लागतो आणि तिच्या अहोंना जरा घाई होती त्यामुळे मी चिरायला घेतली पात. पातीचे एक वैशिष्टय आहे त्यात अनेक अतिसूक्ष्म थर असतात आणि काही थर काढूनच टाकावे लागतात कारण ते नीट चावले जात नाहीत. एकावर एक थर असल्यामुळे आणि धुतल्यामुळे थोडासा गुळगुळीत पणा पण आलेला असतो पातीला. चिरताना मज्जा तर येतेच पण थोडसं लक्ष द्यावाच लागत. संपूर्ण पात अगदी बारीक चिरून झाल्यावर मग पुन्हा एकदा मी अक्षरश: निवडल्यासारखे केले आणि न चावता येणार पण चिरला गेलेला पातीचा भाग काढून टाकला. इतक्या मेहेनतीने केलेलं स्पेशल भरीत खातांना मज्जा आली पाहिजे त्यामुळे नको ते पातीचे भाग काढून टाकणंच योग्य, नाही का?

अगदी नात्यातल्या नाजूक थरांसारखे, नको असलेले, गुळगुळीत झालेले अतिसूक्ष्म जरी असले तरी ते थर वेळेत काढून टाकणे / बाजूला सारणे च योग्य. म्हणजे कचरा आणि उपयुक्त भाग मग तो विचारांचा का असेना वेगळा करत राहिला पाहिजे सर्वतोपरी नातं टिकवून ठेवण्यासाठी आणि हे सर्वांनी वेळोवेळी करणं आवश्यक आहेच. जरड, लवचिकता नसलेले भाग जर सांभाळले आणि वापरले सुद्धा तर मग पंचाईत होते. इतक्यांदा ह्याच्या आधी मी पात चिरली आहे पण त्याच दिवशी संपूर्ण वेळ फक्त असेच विचार माझ्या मनात घोळत होते आणि ते फार योग्य वाटत होते.

असमान / विजोड

माझ्या घरी अगदी लहानपणी पासून मी फक्त विळ्या बघितल्या आहेत, विविध पद्धतीच्या, आकाराच्या, आणि प्रकारच्या. भाजी चिरायची विळी, फळं चिरायची, लोणच्यासाठी आंबे चिरण्याची ई. चाकूशी मी अगदी अनभिन्यच होते. होता वाटत एक छोटेखानी चाकू आई कडे, पण तो कधीच वापरात नव्हताच. बहुउपयोगी विळीच वापरली जायची सतत. लग्न होऊन आले आणि ३६० अंश बदल झाले सर्वतोपरी. त्यात एक बदल म्हणजे फक्त चाकूचा वापर. म्हटलं आता आली का पंचाईत. आणि त्यात माझी सासरी चाकुशी ओळख जी झाली ती एका सेट मुळे. अमेरिकेहून तो सेट आला होता, स्टॅन्ड सहित त्यात अनेकविध चाकू होते, विविध आकाराचे, प्रकारचे आणि माझं लक्ष वेधून घेतलं ते एका भल्या मोठ्या चाकूने. बाप रे, खरंच घरच्या कामासाठी होता का तो भलामोठा चाकू? हाच प्रश्न पहिल्यांदा मनाला शिवून गेला. असो. आम्ही पण मग काही वर्षांच्या सवयीनंतर आमच्या पुण्याच्या घरासाठी चाकूचा तस्साच सेट घेतला आणि तस्साच भला मोठा चाकू देखील होता त्यात. आताशा सगळं चिरायला वेद वापरतो तो चाकू.

तर सध्याच्या माझ्या नवीन कचेरीच्या वास्तव्यात म्हटलं जरा डाळींब, सफरचंद ई. फळं खावीत म्हणून आधी फळं मागवली. मग लक्षात आलं कि येथे पुण्यासारखी डाळींब सोलून मिळत नाहीत त्यामुळे चाकू हवा. आमच्या येथे काम करणाऱ्याला विचारलं चाकू बद्दल आणि त्याने उत्साहाने ताबडतोब पाठवला कि चाकू. त्यानेच फळं पण आणून दिली होती आणि त्या दिवशी का कुणास ठाऊक पण त्याला अगदी टेनिस बॉल च्या आकाराची डाळींब विकत मिळाली. कचेरीतुन घरी आले आणि पोट धरून इतकी हसले ना, देवा, म्हटलं कसं व्हायचं माझं. टेनिस बॉल एवढ्या डाळींबांना सोलण्यासाठी हातभार भलामोठा चाकू जाडजूड. बाप रे. विजोड च्या पलिकडले होते ते दृश्य. अर्थात त्याच्या कडे जो होता सहज उपलब्ध तो दिला बिचाऱ्याने मला, पण आश्चर्य ह्याच वाटलं कि फळं आणि चाकू आणणारा एकच मग....

आज मग मी त्या भल्यामोठ्या चाकूचा प्रयोग करून ते डाळींब सरते शेवटी सोलले बाबा एकदाचे. आता ऑफिस मधून आल्यावर मस्त फस्त करीन त्या चाकूच्या आकाराची आठवण करत.

काम झाल्याशी मतलब, जरी असमान किंवा विजोड धागा / पद्धत किंवा माणसं असली तरी, आगे बढो...

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |

 शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |
दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
दिव्यला देखून नमस्कार || १ ||

हा इतके वर्ष रोज म्हटलेला श्लोक आणि त्याच मर्म, माहात्म्य म्हणजे ह्या चार ओळीत साठलेलं अख्ख जग. न कळत सायंकाळी हात जोडलेच जातात, जसे जेवणाचं ताट पुढ्यात आलं कि "वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे...".

आता थोडसं विषयांतर झाल्यासारखं वाटेल पण तरीदेखील सांगावस वाटत कि हे जाहिरात करणारे / लिहिणारे काय अवलिया माणसं असतात ना. मी तर त्यांच्या प्रेमातच पडते अनेकदा, अनेक भन्नाट पण छोट्या जाहिराती बघून / ऐकून. असं वाटत कि कसं काय सुचतं ह्यांना हे लिहायला / नेमक्या शब्दात पेरायला, कुणास ठाऊक. असो. अश्याच एका जाहिरातीच्या प्रेमात पडले आहे मी कारण हाच श्लोक त्या लेखकांनी कसा मांडलाय बघा, आता त्याच्या मागची भूमिका आली आहे लक्षात माझ्या थोडक्यात. एका बाजूला एकत्र संस्कारी कुटुंब आणि दुसरी कडे ह्या जमान्यातली मुलगी, अहाहा, हे भन्नाट कॉम्बिनेशन दाखवण्याची हि अनोखी पद्धत. मला तर नक्की बघायला आवडेल हि येणारी / नव्याने सुरु होणारी मालिका लवकरच. त्या लेखकाला हे सुचलंच कसं हे पण जाणून घ्यायला फार फार आवडेल मला. किती सोप्पा बदल पण ह्या पिढ्यांपिढ्या चालत आलेल्या श्लोकाला हात लावायचा म्हणजे कमालच. धन्य तो लेखक.

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि-विनाशाय दिपक जोशी नमोऽस्तुते |
दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
दिव्यला देखून नमस्कार || १ ||

बंब

जुन्याकाळी घरोघरी बंब हि वस्तू असायचीच. कारण तेव्हा समोर आणि मागे आंगण हि अशी वास्तू रचना होती. आधी तो बंब लाकडाने / कोळश्याने पेटवला जायचा आणि त्याचा धूर होत असे. बंब पेटवणे हि देखील एक कला, त्यातून पाणी काढणे म्हणजे पण एक वेगळी कलाच, तर अशी कलाकारी दररोज सकाळी होत असे. पण काय पाणी तापायचं म्हणून सांगते त्यात, वेगळीच उब होती त्यात, उत्साही वाटावं अशीच अंघोळ होत असे, थोड्याश्या पाण्यात. एका बंबात संपूर्ण कुटुंब सामावत असे, आणि त्यामुळे शिस्त, कारण एका पाठोपाठ एक आंघोळी उरकल्या जायच्याच. अहाहा काय ते दिवस होते. त्या तश्या बंबा नंतर आले इलेक्ट्रिसिटी वर चालणारे हिटर, भले मोठे आणि जाड च्या जाड आवरण असणारे. त्यात देखील एक तर पाणी फार वेळ गरम राहायचं आणि सगळ्यांसाठी पुरेसं देखील. इतकं कि सगळ्यांच्या आंघोळी आटोपल्या कि कपडे भिजवण्यासाठी देखील गरम पाणी शिल्लक राहातं असे. आज हे बंब पुराण का म्हणताय, सांगते, परवा मी माझ्या जिवश्य-कंठश्य मैत्रिणीकडे राहायला गेले होते दोन दिवस आणि बघते तर काय तिच्याकडे अजूनही बंब आहे. वा, इतक्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या ना. कि ज्याचं नाव ते. 


तर आपण सगळे देखील असेच राहुयात, आतून जरी तापलेलं पाणी साठवून ठेवायची क्षमता असली तरी देखील बाहेरून गार, जाड आवरण आणि सगळ्यांना पुरेसा साठा. बंब गरम पाण्याचा साठा उपलब्ध करून देतो तुम्ही आठवणींचा द्या, प्रेमाचा द्या.  

स्मार्ट खानसामा

माझी आई काय, मावश्या काय किंवा आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्याच जणी नेहेमी एक गोष्ट सांगायच्या आणि ती म्हणजे कडधान्यांचे महत्व. त्याशिवाय वाळवलेल्या वड्यांचे प्रत्येक घरातील उच्च स्थान ई. मी फक्त ह्या सगळ्याकडे बदल म्हणून बघत असे, कि अरे वा छान, आज उसळ तर जेवायला, किंवा कशातही सहज सामावतील अश्या त्या वड्या. उत्कृष्ट चव यायची आणि मज्जा सुद्धा ह्या अश्या प्रकारच्या भाज्या सेवन करतांना. शिवाय पौष्टिक हि भरपूर, कारण त्या वेळी ह्या उन्हात वाळवत असत कडधान्य आणि वड्या. त्यामुळे सूर्याची किरणे थेट त्यात सामावलेली असायची.

सध्या मी नवीन कचेरीत आहे आणि दररोज माझा खानसामा मला डब्बा देतो. अर्थातच हे सगळं मी पहिल्यांदा अनुभवत असल्यामुळे आणि सगळ्याच चवी आवडत असल्यामुळे "ओम नमः शिवाय". तो देईल ते खाते आणि अर्थातच खूप कौतुकाने, कारण आज जेवायला, नाश्त्याला काय करायचं हे मी नाही पण तो ठरवतो आणि दररोजचा डब्बा उघडणं म्हणजे वेगळं सरप्राईझ असतं मला.  माझ्या लहानपणी आई शाळेत जातांना डब्बा देत असे आणि तो थेट शाळेतच मधल्या सुट्टीत उघडला जायचा आणि जे मोठं सरप्राईझ मिळायचं म्हणून सांगते. साधं पण भन्नाट. एक वेगळंच उत्साही वाटतं जे शब्दात गुंफण फारच अवघड आणि अशक्य, दररोज जेव्हा मी डब्बा उघडते, आणि त्यातले जिन्नस बघते तेव्हा. पण एक गोष्ट हळूहळू मला उमगली ती म्हणजे त्याचं रुटीन, तो काय देतो आणि आज काय असू शकत डब्ब्यात आता ते सहज समजायला लागलं आहे.

माझी आई, काकू आणि इतर जणी तेव्हा त्या वेळी जेव्हा साधे फोन देखील नव्हते घरी तेव्हा पाहुणे आले कि अश्या वड्या घातलेली भाजी किंवा उसळी करायच्या,  किंवा अगदी भाज्या मिळाल्या नाहीत, पावसाळ्यात किंवा कंटाळा आला कि ह्या कोरड्या गोष्टी म्हणजे रामबाण इलाज. बाहेरून मागवणे ई. त्या काळी माहितच नव्हतं. त्यामुळे ह्या पट्टाकिनी होणाऱ्या पौष्टिक भाज्या अत्यंत आवडायच्या तेव्हा. माझं हे निरीक्षण आहे त्या खानसाम्याबद्दल कि तो रोज सकाळी न चुकता उसळी देतो आणि संध्याकाळी भाजी. सकाळी बिचाऱ्याला नाश्ता केल्यावर एक तर जीवावर येत असावं भाजी चिरणं किंवा एकट्यालाच कंटाळा येत असावा. पण कित्ती हुषार आणि स्मार्ट आहे पहा, संध्याकाळी एकदाच भाजी चिरण्याचे कष्ट घेतो तो. बाकी वेळी एक मोठा डब्बा भरून मसाला करून ठेवलेला दिसतो पठ्याने, बास उसळी शिजवतो आणि घालतो मसाल्यात. झालं झट कि पट भाजी तय्यार. सहसा घरी वापरात आणलेला प्रकार / क्लुप्ती आता मला इथे पाहिला मिळाली म्हटलं लिहावं. मला तर फारच आवडला हा स्मार्ट खानसामा जो काम पण करतो आणि आमच्या सगळ्यांच्या स्वास्थ्याची काळजी देखील रोज सकाळी उसळी खाऊ घालून. "एका दगडात अनेक ........".

डॉक्टर म्हणजे?

डॉक्टर ह्या शब्दाच्या अनेक परिभाषा (अर्थ) आपल्याला ठाऊक आहेतच. त्यात मसीहा, जीव वाचवणारा तज्ज्ञ, अतिशय हुशार व्यक्तिमत्व, काळजी करणारा, आणि इतर बरेच काही. ह्या सगळ्यामधला सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे त्या उच्च शिक्षित डॉक्टर चे हस्ताक्षर, औषध योजना सांगणारे. सगळ्या डॉक्टरांच्या बाबतीत आज पर्यंत मी हे असच ऐकलं होत कि 

१. काय किडे माकोडे लिहितात काही समजत नाही, 

२. त्या औषधांच्या दुकानदाराला मात्र कसं काय समजत कोणास ठाऊक ई. 

एक तर घाई, अनेक आजरी व्यक्ती दिवसात आणि त्यात लिहायचं, समजावून सांगायचं, सगळ्या प्रश्नांना शांतपणे उत्तर द्यायची ई. बाप रे. मग हस्ताक्षराकडे जरा दुर्लक्ष होत. बरोबर कि नाही. पण कालपरवाच एक अवलिया बद्दल समजलं. ते एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत, अनेक वर्ष प्रॅक्टिस करतात, महाराष्ट्रियन आहेत आणि पहिल्यापासून सुवाच्च अक्षरात मराठीत प्रेस्क्रिप्शन लिहितात. काय म्हणावं ह्या अश्या व्यक्तिमत्वाला, कधीही न ऐकलेलं असं समजलं मला. त्या पेशंट ला, त्याच्या सोबत येणाऱ्या नातेवाईकांना, औषध विक्रेत्याला आणि बाकी सगळ्यांना किती फायदा नाही. डॉक्टर म्हटले कि सगळ्याच पद्धतीचे पेशंट्स येणार नाही का? शिक्षित, अशिक्षित, उच्च शिक्षित, मराठी शिक्षित फक्त ई. एक डॉक्टर म्हणजे त्याला माणसू आतून बाहेरून माहित असलाच पाहिजे, तो काय कधी कसा विचार करतो ह्या वर पण बरं होणं अवलंबून असतंच ना, फक्त गोळ्या औषधं देऊन चालत नाहीच. माणसाच्या स्वभावानुसार औषधं आणि त्याच मोजमाप ठरवत असतील बहुतेक. आणि मराठीतलं प्रेस्क्रिप्शन हे "immediate connect" सिद्ध होत असणारच. फार भेटायची इच्छा आहे मला त्या अवलियाला बघू कधी योग येतो ते.

सगळ्याच डॉक्टरांनी प्रिंटाऊट चा आधार घेतला आहे आता, म्हणजे हस्ताक्षरावरून काही ऐकायला नको आणि चुका व्हायला नको. पण मातृभाषेत लिहून देणं जास्त चांगला तरणोपाय ठरेल असं मला वाटत. प्रिंटाऊट जरी द्यायचं असलं तरी त्यात देखील बॅक एन्ड ला मातृभाषेत नाव स्टोर करता येतील नक्कीच. आताशा काही काही औषधांच्या वेष्टणावर / कागदावर देखील मातृभाषेत औषधांची नाव छापलेली दिसतात बरेचदा. काही का असेना ह्या डॉक्टरांनी चालू ठेवलेला प्रयोग आवडला मला आणि भावाला देखील. सरते शेवटी त्या मुळाशी नातं नेहेमी टिकवून ठेवावं हे च खरं, कितीही शिकला तरी आणि कितीही मोठे झालात तरी, आई-बाबा, त्यांची शिकवण, भाषा, लोकांचा आदर आणि साधेपणा. बास.

सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

सुगंधमय क्षण

गेले काही दिवस मी एक निरीक्षण करते आहे, किंबहुना निरीक्षण सहज झालं, कि दिवसाच्या शेवटी जेव्हा आपली पाठ टेकते तेव्हा त्या स्वच्छ, सुंदर, धुतलेल्या चादरीचा सुगंध तुमचं सहर्ष स्वागत करतो. त्यानंतर ज्यांना डोळे मिटून जरा "त्याच" नाव घ्यावसं वाटत, आपलाच हात चेहेऱ्यावरून प्रेमाने फिरवला जातो तेव्हा आपण अजून एक उच्च कोटीच्या सुगंधी विश्वात रममाण होतो, कारण बहुतांशी अंथरुणावर पडायच्या आधी हात पाय धुवून घेतले जातात. त्यानंतर येणारा पांघरुणाचा / ब्लॅंकेट चा सुगंध. माझ्या तरी दृष्टीने थकलेलं शरीर, किंवा स्वप्न नाही झोपेच्या कवेत पाठवत तुम्हाला, हा सुगंध मात्र नक्की च ते काम फार प्रामाणिक पणे करतच, न चुकता. सकाळी उठल्यावर पाऊस असेल तर त्या मातीचा अद्वितीय सुवास, फुलांचा ई. येतोच, निसर्गाची कृपाच. त्यानंतर दंतमंजन अक्का टूथपेस्ट चा आपला ठसा, आज च्या आधुनिक कात टाकलेल्या बाथरूम चा आपलाच दरवळ, पाण्याचा सांभाळून ठेवलेला नेहेमीचा / कधीतरी बदलेला देखील असा अनोखा चविष्ट सुगंध. चहाचा अरोमा तर जगा वेगळाच, अर्थात कॉफी घेणारे तर दुसऱ्याच विश्वात पाऊल ठेवतात कॉफी तय्यार करतांना. मग विविध पदार्थांचा सुवास, देवापाशी लावलेल्या उदबत्ती / धूप आणि कपूरचा, मग येणाऱ्या माविशीनी वापरलेल्या फरशी पुसण्याचा साबणाचा ई. पोटभर उत्तम न्याहारी करून कचेरीत / शाळा / कॉलेज किंवा अजून इतर कुठे बाहेर पडतांना तयार होण्यासाठी वापरलेल्या अनेकविध वस्तूंचा मनमोहक वेगवेगळा सुगंध, ज्यामुळे संपूर्ण दिवस ताजतवानं राहता येत, तुम्हाला आणि त्या सुगंधामुळे इतरांना देखील. कामासाठी बाहेर पडतांना (जातांना आणि येतांना) जे वाहन वापरतो त्यात वापरलेला सुगंध निराळाच.   कचेरीत / शाळा कॉलेज मधे मधली सुट्टी झाली, भूक लागली हे सुद्धा तो खाण्याच्या पदार्थांचा सुगंधच तुम्हाला आठवण करून देतो. त्या सुगंधामुळे भूक तर लागतेच, डब्बा संपल्यानंतरही त्याची आठवण कायम राहते आणि त्यामुळे प्रचंड उत्साहात काम होत ते वेगळंच. ज्यांनी कोणी ते अन्न तय्यार केलं असत त्याची न कळत उतराई होता येत सहज, ते पण त्या सुगंधांच्या आठवणी मुळेच. जे लोक स्वतःच घरच काम स्वतः करतात ते माझ्याशी नक्की सहमत होतील कि कपडे धुण्याकरता वापरलेली पावडर किंवा वडी पण तिच्या वेगळ्याच सुगंधामुळे छापा पाडते, कपडे फक्त धुते वेळी नाही तर वाळल्या नंतरही देखील. आठवड्याच्या शेवटी घरातली आवराआवरी करतांना वापरलेली प्रॉडक्ट्स पण प्रसन्न वातावरण निर्माण करतात. 

आणि हो घराचा सर्वात महत्वाचा मेंबर / सदस्य हो, आपला फ्रिज तो देखील पठ्ठा महान आहे. उन्हाळ्यात एकदम गार हवा / हवेचा झोका तर देतोच पण त्या सोबत एक भन्नाट अरोमा देऊन जातो सहज तो वेगळाच. थंडीत त्याच रुपडं अगदीच वेगळं असत. 

आताशा नवीन फ्लॅट पद्धतीच्या घरात शेजार पाजाऱ्यांकडून येणारा सुगंध अजूनच निराळा. "काय वर्णू तव गुण अल्पमती नारायण". ह्या दररोजच्या / प्रत्येक क्षणाचा  अदृश्य अस्तित्व असलेल्या साथीदाराबद्दल किती लिहू आणि किती नाही असं झालाय मला. सगळं तोच ड्राईव्ह करतो अहोरात्र आणि शिवाय नामनिराळा देखील राहतो. काय काय शिकण्यासारखं आहे बघा ह्याच्या कडून.

माझ्या दृष्टीने प्रत्येक क्षण हा वैविध्य सुगंधाने भरभरून देणारा असा आहे. ते अनुभवा, दोन्ही हात पसरून त्याला ओंजरा - गोंजारा. तो सुगंध कोणासाठी पण कधीच न थांबता त्याच काम करून मोकळा होतोच, कुठंही आड पडदा न ठेवता, कुठलाही भेदभाव न करता. तसेच आपले व्यक्तिमत्व पण सातत्याने सुगंधी ठेवा नेहेमीच तुमच्या व्यक्तिमत्वाच्या सुगंधाने, जो ह्या जगावेगळा असेल ह्यात शंकाच नाही.  तो सुगंध सातत्याने तुम्हाला जगवण्याचं काम करत असतो, उत्साह देत असतो, प्रेमाने भरभरून देत असतो, त्या कडे पण जरा लक्ष द्या, त्याला पण धन्यवाद म्हणा मनापासून म्हणजे मग तुम्हाला "give अँड take" चा मतितार्थ समजेल आणि उमजेल प्रकर्षाने.

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

जन्मदिवस

 जन्मदिवस

मी एका आंतरदेशीय परिषदे मधे भाग घेतला होता काही वर्षांपूर्वी. त्या परिषदेत प्रामुख्याने डायबिटीस आणि मातृत्व ह्या विषयावर होती. त्या परिषदेत त्यांच्या जगभरातल्या संशोधनावर आधारित काही सत्य प्रामुख्याने समजले मला पहिल्यांदया, माझ्या उभ्या आयुष्यात. त्यांच्या संशोधनाप्रमाणे किंवा एकंदरीतच शरीर रचनेनुसार जेव्हा एखादी मुलगी गरोदर असते आणि ते होणार बाळ जर मुलगी असेल तर त्या मुलीची संपूर्ण वाढ तेव्हाच सुरु होते. म्हणजे ते बाळ जी मुलगी आहे, ती मोठेपणी आई होणार आणि त्याची तय्यारी एवढ्या आधी सुरु होते. म्हणजे एक आई जेव्हा एका मुलीची आई होते तेव्हा ती तीन पिढ्या तय्यार करत असते, ती, तिची मुलगी आणि नात / नातू ई. ह्याचा अर्थ असा कि प्रत्येक स्त्रीने ह्या संकल्पनेप्रमाणे अत्यंत काळजी घ्यावी तिच्या प्रेग्नन्सी मधे. असो.

हि परिषद संपल्यावर मला एक नवीन गोष्ट जाणवली.
माझ्या आईचा जन्म ८ सप्टेंबर ला झाला होता अनेक वर्षांपूर्वी. म्हणजेच माझी पण खरी जन्म तारीख ८ सप्टेंबरच नाही का?  

https://www.nature.com/articles/502304a

https://link.springer.com/referenceworkentry/10.1007%2F978-3-319-40007-5_71-1

श्रावक

गेले दोन एक वर्ष एक नवीन सहज आणि दररोज वापरायचं साधन म्हणजे श्रावक. मला जास्त न भावलेला असा तो, कारणं अनेक आहेत. ह्या नवीन दिवसात इतकं सगळं शिकायचं होत, सांभाळायचं होत, जपायचं होत कि ह्या श्रावक का कडे जास्त लक्ष गेलं नाहीच. पण सध्या मला प्रकर्षाने काही गोष्टी जाणवत आहेत. एक म्हणजे आधी श्रावक हे फक्त ऐकण्या बोलण्याचे साधन होते. म्हणजे तुम्ही जे बोलता ते समोरच्याला नीट ऐकू यावं आणि त्याने जे बोललं ते फक्त तुम्हाला / ऐकणाऱ्याला कळावं, असं काहीस. बाकी घरच्यांना / आजूबाजूला असलेल्यांना त्रास न होता. घरूनच काम जास्त प्रमाणात वाढल्यामुळे विविध गोष्टी ऍड झाल्या ह्या श्रावकामधे आणि त्यात एक म्हणजे तुमच्या आजूबाजूचा आवाज फिल्टर होऊन पुढे जातो. पण सगळेच हेड फोन्स फिल्टर करत नाहीत आवाज.  तो हेड फोन एकदा परिधान केला कि वापरणाऱ्याला वाटत कि फक्त तो जे बोलतोय तेच समोरच्याला ऐकू येत. पण असं नाही ना, सगळं मागे / आजूबाजूला चाललेलं ऐकू येतंच. त्यात सगळे माझे विद्यार्थी स्वयंपाक घरातच का क्लास करता बसतात हे मला पडलेलं भलं मोठं कोडं आहे. आणि घराचे पण इतके महान कि क्लास सुरु असतांना गप्प बसत नाहीत, काय काय आवाज ऐकू येतात. गम्मत येते असं म्हणणार नाही मी पण थोडीशी करमणूक होते माझी. असो. "आलीया भोगासी असावे सादर". त्यामुळे ह्या माझ्या शिकलेल्या सावरलेल्या आज च्या पिढीतल्या माझ्या विद्यार्थ्यांना एकच विनंती ती म्हणजे जमल्यास शांत ठिकाणी बसा, गर्दीच्या नको, घरच्यांना पण आता हे सगळं अंगवळणी पडलं असेलच, त्यांना पण सांगा कि वर्ग सुरु असतांना आवाज कमी करा अथवा नकोच शक्यतो. फक्त वर्गापुरतं नाही हे, उद्या तुम्हाला जर एखादि मुलाखत द्यायची असेल, महत्वाची मीटिंग असेल तर हे चांगलं दिसत नाही.

तंत्रज्ञान आपल्यासाठी तय्यार आहे आणि फार उपयोगी पण आहे, पण ते कटाक्षाने पाळा, त्याचे पण नियम असतात हे लक्षात घ्या आणि मग बघा त्याचा सदुपयोग किती आनंद देऊन जातो ते. अर्थात हेड फोन तय्यार करणारी टीम पण कार्यरत आहेच आणि अजून नवीन पद्धतीचे प्रॉडक्ट्स येतील देखील बाजारात लवकरच पण तो वर जपून.

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

रेडिओ जॉकी

१९१० साली Nathaniel Baldwin जो युथा चा होता त्याने चर्च मधे म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थानेला किंवा जे कथन करणारे असतात त्यांचे बोधपर भाषण ऐकण्यासाठी हेड फोन्स चा / सारखा शोध लावला. त्यानंतर टेलेफोन ऑपरेटर करीता, विमान चालवणाऱ्या आणि गाणी सोडून बाकी सगळ्या गोष्टींसाठी हेड फोन वापरला जाई.  मी तर हे देखील ऐकलं आहे कि एखाद्या आजाऱ्यावर उपचार करताना त्याचे सुक्ष्म / अतिसुक्ष्म ठोके किंवा बऱ्याच बाकीच्या गोष्टी ऐकण्यासाठी तज्ञ हेड फोन्स वापरत होते. माझ्या मते जेथे जेथे पट्टाकिनी कृती होणं आवश्यक असतं, त्या कर्तृत्वान व्यक्तीचे हात मोकळे असावे लागतात, ज्यांना एकावेळी अनेक काम करावी लागतात त्यांना असे आयुध उपयोगी असतात. असो.

मी १०-११ वीत असतांना सोनी टीव्ही सोबत जे हेड फोन्स आले होते ते वापरले बरेचदा पण त्यानंतर खास गरज पण पडली नाही आणि त्याच्या कधी आहारी गेलेच नाही, का कुणास ठाऊक.

आज मला एक नवीन संगणक देण्यात आला आणि त्याला म्हणे हेड फोन्स लावावेच लागतात, क्लास घेण्यासाठी, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी. झालं का म्हटलं आता, आली का पंचाईत? देव आठवले मला आणि आमच्या संगणक चमूला देखील. त्यांनी माझ्या कडे असं बघितलं जसे कि मी ह्या जगातली नाहीच, कुठल्या तरी दुसऱ्या ग्रहावरून आले आहे, हेड फोन माझ्याकडे नाहीत म्हणजे काय, असं अविर्भाव होता त्यांचा. असो. पण मग मला एक हेड फोन देण्यात आला सरते शेवटी, आणि दिवसभर घालून मग मी सगळे वर्ग घेतले, भन्नाट वाटलं. एक वेगळीच मज्जा आली. इतकी जास्त मजा आली कि माझंच मला रेडिओ जॉकी झाल्यासारखं वाटलं पहिल्या तासाला. दुसऱ्या तासाला मी अजुनकाही झाले असं जाणवलं. आणि सरते शेवटी मी त्याच्या इतकी प्रेमात पडले कि ज्याचं नाव ते. आता तर ताबडतोब मी घेणारच, हेड फोन हो, म्हणजे रेडिओ जॉकी नसतांना वेगळ्या विश्वात रममाण होऊन माझ्या मुलांना जोमाने शिकवता येईल मला, स्टाईल मधे.  

https://en.wikipedia.org/wiki/Headphones

https://www.smithsonianmag.com/arts-culture/a-partial-history-of-headphones-4693742/

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

चव

चव हि संज्ञा जरी प्रत्येकाची वेगळी असली तरी देखील एका बाबतीत ती सारखी असावी असा अंदाज आहे, जसे कि पुन्हा गरम केलेल्या चहाची चव. चहा काय तर कुठलाही पदार्थ पहिल्या वाफेचाच  अगदी भन्नाट लागतो. कदाचित तो अत्यंत ताज्या स्थितीत असतो म्हणून, किंवा आपल्याला तशीच सवय झाली आहे कदाचित, किंवा करणाऱ्यालाही ते सोप्प जातं, हवं तेव्हा हवं तेवढं गरमागरम खाऊन मोकळं. असो.

तर काल एक छोटा किस्सा झाला. मला एका दादाने मस्त गरमागरम चहा हातात आयता आणून दिला आणि अर्थातच तो त्यावेळी फारच आवश्यक होता पण मला. पण हातात कप यायला आणि विद्यार्थ्यांचं एक कुटुंब मला भेटायला यायला एकाच गाठ पडली. मग ते प्रशस्त नसतं दिसलं त्याच्या समोर चहा पिणं म्हणून मग मी तो झाकून ठेवला. माझ्या बरोबर काम करणाऱ्या ताईने मग ते पालक गेल्यावर मला पुन्हा गरम करून आणून दिला आणि तो मी मिनिटाच्या आत संपवला पण, कारण तो छान लागला, पहिल्यांदा. चव बदल कशी झाली नव्हती? ह्याचंच आश्चर्य वाटलं मला. काय खासियत होती त्या चहात?, दूध अप्रतिम होत, का गरम करण्याची पद्धत का गरज? काही समजलं नाही, पण हे वेगळं होत एवढं खरं. फारच कमी वेळी मी पुन्हा गरम केलेला चहा घेतला आहे आणि तो पट्टाकिनी लक्षात येतोच, किंबहुना त्याचा (राग)रंग पण बदललेला असतो खरा, पण काल काही तरी नेहेमीसारखं नव्हतं हे निश्चित.

असो, अशीच आपल्या नात्यातली चव, पहिल्या वाफेची, टिकवून राहो सदा, किंवा एखादवेळी असं झालंच कि एक उकळी आवश्यक आहे, थंडपणा जाणवतो आहे तेव्हा दुसरा उपाय करा (नवीन चहा करा आणि प्या). प्रत्येक वेळी पहिली वाफ टिकली नाही तरी हरकत नाही, अनेकविध तरणोपाय आहेत ना त्या करता, ते वापरा, मसाले दार चहा सारखी तरतरी दुसरं कोणीही देऊ शकत नाही, ती चव बाकी कोणीही भरून काढू शकत नाहीच. त्यामुळे कृतूमानानुसार बदल करत, चढ उतार उपभोगत चवीचा गोडवा कायम राहील हे आवर्जून बघाच.

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

घर असावे घरासारखे....

 घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती

घर हि एक फार मोठी संकल्पना आहे ज्याला कुठल्याही परिभाषेत, फुटपट्टीत बसवता येत नाही, अर्थात माझ्या साठी. घर, घरटं, निवास, गृह, भवन, आलाय, वास्तु ई. अनेक नावानी नटलेली, सजलेली आणि बहरलेली अशी हि संकल्पना अक्का इमारत. त्यामुळे ती फक्त एक रचना किंवा बांधकाम नाही आहे आणि आपण जेथे राहतो, भरपूर मौल्यवान वेळ घालवतो ते घर. त्यामुळे माझ्या दृष्टीने ऑफिस हे पण एक फार सुंदर कल्पकतेने बांधलेले घर, जेथे कुटुंब संख्या फार मोठी असते, दृष्टीकोन वेगळा आणि नाते त्याहून निराळे. काही दिग्गज कवींनी ऑफिसला मंदिराची उपमा पण दिली आहे.

तर सध्या मी एक आठवडा नवीन ऑफिस मधे स्थिरस्थावर झाल्यावर हळू हळू विविध ठिकाणी जाणं, भेट ई. चालू केलं आहे. त्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे "प्रशासन कचेरी" ला भेट. अचानक ठरलं आणि मला समजायच्या आत मी त्या भव्य-दिव्य ऑफिस मधे होते देखील. जो कोणी वास्तू तज्ञ आहे त्याने फारच विचार पूर्वक घडवलेली ती जागा. अर्थात त्यानंतर त्याला सजावण्याचं काम डिसायनर नी केलं पण त्यात जिवंतपणा आणला तो तिथल्या सर्व लोकांनी, आणि त्यांच्या प्रमुखाने. विचारपूर्वक आणि मनापासून मांडलेला प्रत्येक कोपरा, भिंती, फळे (सुवाच्य अक्षरात लिहिलेला सुविचार आणि माहित दर्शवणारे ), लिखाण, स्वच्छता, रंगसंगती, फोटोस, फ्रेम्स, बैठक व्यवस्था  ई. एक वेगळेपणा निर्माण झाला आहे त्या ऑफिस मधे, हे नक्की.  मनापासून साकारलेल्या आणि सांभाळल्या ठिकाणी मग माणसं तर घडणारच, पण कामं पण भन्नाट होणार ह्यात शंकाच नाही. मग सांगा आपण जेथे आपला दिवसातला सर्वात जास्त आणि कार्यक्षम वेळ घालवतो ते दुसरं घरचं नाही का?. काल मी पाहिलेली ती पहिलीच "प्रशासन कचेरी" आणि त्याही मुळे कदाचित ती मला जास्त भावली, आणि न-कळत हि कविता / चारोळी आठवली.

ऑफिस आहे  घरासारखे
नाहीत नुसत्या भिंती
जेथे आहे प्रेम-जिव्हाळा
नाहीत नुसती नाती  

रविवार, १९ सप्टेंबर, २०२१

आधार

माझ्या पायांमधे पट्टाकिनी हवी तशी शक्ती परत यावी ह्या करता वजन पायाला बांधून व्यायाम करायला सांगितलं आहे. सध्या विकतचे वजन जे घालायला-काढायला-वापरायला सोप्पे असतात त्या सोबत व्यायाम सुरु आहे. आज मला एक नवीन गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि पटली देखील. त्याच काय झालं कि दररोज मी माझ्या पायांवर डायरेक्ट ते वजन बांधून व्यायाम करत असे कारण मला छोटे, गुढ्यापर्यंतचे पँट्स घालायला आवडतात, सोईचे असतात. त्यामुळे पट्टाकिनी बांधलं वजन आणि केला व्यायाम, बास. पण आज थोडं वेगळं होत. आज फुल्ल पॅन्ट घातली होती आणि त्यामुळे त्या पॅन्टवर वजन बांधले आणि व्यायाम करायला सुरवात केली. काही तरी वेगळं जाणवत होत. म्हटलं असेल, लक्ष द्यायचं नाही, आधीच उशीर झालाय उठायला. पण तरी देखील मला सतत ची जाणीव होत होतीच. त्यात आईच एक वाक्य आठवलं. आईचे जेव्हा पाय दुखायचे तेव्हा ती करकचून रुमाल बांधायची. विचारलं तर म्हणायची कि पायांना जसे कि आपण एक घट्ट आधार देतोय, प्रेमाने मिठी मारल्या सारखा आणि त्यामुळे ते लवकर बरे होतात. ई. तिचा तो फंडा होता. आणि त्यामुळे तिला बरं वाटायचं. असो.

आज मला समजलं कि माझा व्यायाम पण मस्त झाला आणि वेगळं छान वाटतंय नेहेमी पेक्षा. त्या पॅन्टच्या जास्तीच्या आधारामुळे असेल कदाचित. भन्नाट सुरवात झाली दिवसाची हेच खरं.

प्रत्येकाला असाच नेहेमी छोटासा आधार मिळावा जेव्हा हवा तेव्हा हीच ईशचरणी प्रार्थना, मग तो कुठल्याही पद्धतीचा आणि स्वरूपात असला तरी चालेल. आधार मिळाला कि लांब पल्ला गाठणं सोप्प होत.

घर आणि बदल

आज मी माझ्या एका सहपाठी च्या घरी जेवायला गेले होते. त्यांचं एवढ्यातच म्हणजे २-३ वर्षांपूर्वी लग्न झालेलं आहे आणि असं म्हणायला हरकत नाही कि राजा-राणी चा छोटेखानी संसार नुकताच सुरु झाला आहे. त्या प्रमाणे त्यांच्या कडे सगळं सुरवातीला असतं तसंच सगळं तात्पुरतं किंवा दोघांपुरतं, साधं, बैठं असं सगळं होत. भव्य दिव्य नाही. मला आमच्या दोघांच्या पहिल्या घराची प्रकर्षाने आठवण आली, सगळं झर्रकन उभं ठाकलं डोळ्यासमोर आणि काही क्षण तर मी नव्हतेच तेथे असं म्हणायला हरकत नाही. मग आम्ही कशी हळू हळू सामानाची जुळवा जुळव केली, भव्य-दिव्य कडे वाटचाल सुरु झाली कि थोडेसे बदल झाले. एक तर आम्ही दोघांचे चार झालो आणि भारतात पुण्यात आलो. आता दोघे पिल्लू अगदी रांगत्या किंवा नुकत्याच चालत्या वयाचे होते त्यामुळे पुन्हा संपूर्ण घर आधी भाड्याचं म्हणून आणि त्यानंतर स्वतःच झालं तरी दोघे छोटे म्हणून मोकळंच. पडतील, कोपरा लागेल, खराब होईल ह्या सगळ्या विचारातून फर्निचर वगैरे जास्त घेतलं गेलं नाहीच, किंबहुना टाळलं. दोन्ही घरात आधी फक्त भारतीय बैठक ठेवली होती.  मुलं जाणती आणि थोडी मोठी झाली म्हणून नवीन फर्निचर, रंगरंगोटी केली आणि त्यानंतर अजून मोठ्या घरात राहायला गेलो.

"चेंज इज द ओन्ली कॉन्स्टन्ट" हेच खरं आहे. हेच सततचे बदल कदाचित सर्वांना नवीन शक्ती, प्रेरणा आणि उत्साह देण्याचं काम करतात.

आम्ही दोघे होतो ते आज हा इतका मोठा पल्ला आणि त्यात अनुभवलेले बैठकीचे बदल भावून गेले, प्रचंड शिकवून गेले मला.
बाहेरील देशातील भारतीय बैठक ते भलं मोठं फर्निचर, ते पुन्हा आपल्या देशाची भारतीय बैठक ते साधे आणि भले मोठे फर्निचर हे उतार-चढाव / रोलर कोस्टर राइड्स अप्रतिम. परप्रांतातली आणि इथली भारतीय बैठकीमुळे झालेला व्यायाम असो, किंवा नरम सोफ्याने दिलेले जगावेगळे सुख असो, सगळंच आनंदाने मनापासून उपभोगा. ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान.

कागद चेहेरा आणि बोल

कित्ती तफावत असते, कागद काय सांगतो आणि चेहेरा काय बोल बोलतो, दोन भलत्याच दिशेला. सॉफ्टवेअर तर तुम्हाला आणि तुमचा चेहेरा फार रंगवून दाखवतो बायो डेटा / रेसुमिया च्या स्वरूपात, पण तो तसा असतो का? नाटक हा विषय शाळेत सगळ्यांना असायलाच हवा असं मला प्रकर्षाने वाटत.कारण का? सांगते.

गेले अनेक वर्ष मी शिक्षकाच्या पदासाठी मुलाखती घेते. कागदावर, प्रत्यक्ष भेटल्यावर / बघितल्यावर आणि ऐकल्यावर कधी कधी भयानक तफावत आढळते. मराठीत एक म्हण आहे ना "तोंड उघडलं कि सत्य सगळं बाहेर पडत", अगदी तस्सेच. बरं आहे कि फक्त कागद बघून निवड होत नाही ते, म्हणजे फक्त नोकरी साठी च नाही, आयुष्याचा जोडीदार मिळवण्यासाठी देखील. कधी कधी बघितल्या बघितल्या आवडते एखादी व्यक्ती,म्हणजे तीन टप्प्यामधले दोन पार होतात, कागद आणि चेहेरा, पण ऐकणं पण महत्वाचं, बोल तितकेच महत्वाचे, भाषा, भाषेवरचे प्रभुत्व, मांडण्याची कला, समोरच्या च्या तोंडून "वाह वाह" निघावं असं काही तरी, वयोमानानुसार ........ माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं ठरतच. असो. फारच व्यक्तिगत विषय झाला हा. आता तुम्ही म्हणाल दिसणं आपल्या हातात असतं का, रंग, रूप ई. नाही, नसतंच. पण जसे आहोत त्यात ठसा उमटवणं तर आपल्या हातात आहे ना, प्रभाव पडेल अशी किंचीत लक्ष देऊन केलेली वेष आणि केशभुषा केली तर उत्साह वृद्धिगत होतो स्वतःचा आणि तुम्हाला बघणाऱ्याचा देखील.

कागद, चेहेरा आणि बोल ह्याचा ताळमेळ साधाच, गरजेचं आहे ते, प्रत्येक टप्प्यात, अहंकाराकडे न झुकता. हा ताळमेळ साधण्याकरता थोडीशी नाटकाची मदत घ्यावी लागली तर गरज असेल तेव्हा घ्या. म्हणून नाटक / अभिनय प्रत्येक शाळेत शिकवावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. काम इतकं करा कि वेळेवर गडबड झाली ई. कशाशी खातात हे बघायलाच नको. बास.

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

संपूर्ण वडिल वर्गाला सलाम. वडिल म्हणजे अगदी जवळचा मित्र, डोक्यावरच छत्र आणि बरेच काही. मी तर फारच भाग्यवान कि मला दोघेही आई-वडिल अगदी मित्रा पेक्षा वरचढ लाभले. आई हे एक वेगळंच रसायन. उलगडत उलगडतं हळू हळुवार आणि समजे पर्यंत कदाचित पुढची पिढी आई-बाबा झाली असते.

मी एवढ्यातच एक जाहिरात बघितली आणि ती विविध फॅशनेबल वस्तूंची, लहानमुलांच्या दुनियेची, कपड्यांची अशी आहे. एक कंपनी आहे जी प्रकर्षाने लहान मुलांच्या विश्वात काम करते, firstcry. त्या कंपनीने
ही लोकांसाठी तय्यार केलेली जाहिरात. अर्थात भरपूर पद्धतीचे कपडे, बूट, दागिने आणि काय काय दाखवलं आहे लहान मुलांनी / मुलींनी घातलेलं. एक भलं मोठं घर आहे ज्यात कुठलातरी सण किंवा उत्सव साजरा होतो आहे. त्यामुळे त्या घरातल्या मंडळी सोबतच घर पण उत्साहाने सजलं आहे. भरपूर मनापासून भरभरून फुलांची सजावट केली आहे, चालू आहे. आणि त्यात हि सगळी बच्चे कंपनी धडपडत, नवीन कपडे सांभाळत काही तरी गौडबंगाल करत आहेत. बहुतेक सगळेच फुलं / पाकळ्या गोळा करून लगबगीने जिना चढून जात आहेत. शेवटी उलगडा होतो कि त्या सर्व पिल्लांच्या आया हसत - खेळत बाहेर पाडतांनाच हि हुषार सगळी मंडळी वरून पुष्पवर्षाव करतात आणि सगळी कडे आनंदी आनंद पसरतो. आता मला हे सांगा ज्यांनी कुणी हि जाहिरात तय्यार केली, ज्याच्या कोणाच्या डोक्यात हि संकल्पना आली त्याने आजी, आजोबा, बाबा, आणि कुणी का नाही घेतलं पुष्पवर्षावा करता, आईच का?

विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही.

मला तर पडलाय, तुम्हाला?

आणि हे माझे उत्तर, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. कोणी तरी जबरदस्त आई भक्त दिसतोय, किंवा फक्त जाहिरात म्हणून मुली दाखविल्या असतील, काहीही असो, इट मेड माय डे and memories..... 

The URL of the video is: https://www.youtube.com/watch?v=yck8JtG8AbY

शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

सेवा

एकदा एक निबंध / कथा लेखन स्पर्धा होती. अर्थात मराठीत असल्यामुळे असेल कदाचित मी पट्टाकिनी भाग घेतलाच. अश्या उड्या मारायला मला नेहेमीच आवडतात. काही ठळक शब्द दिले गेले होते आणि त्या भोवती आम्हाला शब्द गुंफायला सांगितले होते. बास मग काय झाले सुरु, संपवला लेख आणि दिला पाठवून. स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आणि मला स्टेजवर आमंत्रित केलं गेलं, ह्या माझ्या लिखाणाबद्दल सांगायला. त्या लेखाचं शीर्षक होत "सेवा". थोडक्यात म्हणजे गोरगरिबांची वेगळा वेळ काढून, त्यांच्या ठिकाणी जाऊन मोठ्या प्रमाणात सेवा करणं मला जमत नाही, त्यामुळे घरीच येणाऱ्या माझ्या मावशींना सातत्याने मी कशी मदत करते, त्यांच्या कामाचा भार कसा कमी करते ई. बद्दल माझी मतं मांडली होती. पण ती परीक्षकांना भावली आणि मला बक्षीस पात्र समजण्यात आले होते. मग तो लेख एका मासिकात पण आला होता.

आज इतक्या वर्षांनी मला हे का आठवलं म्हणताय? सांगते. 


काल पासून जरा माझी पाठ कुरबुरते आहे, मान धरून आल्यासारखं वाटत होत आणि नवीन ठिकाणी काय करावं सुचत नव्हतं.  पण मग एक मावशी तय्यार झाल्या मालिश साठी, पण वेळेवर त्यांना देखील जमलं नाही यायला. असो.

आज ऑफिस मधे भरपूर काम होत आणि बसणं थोडं अवघड होत होतं. माझ्या बरोबर एक चुणचुणीत मुलगी दिली आहे सगळी मदत करण्या करता. तिला मी चुणचुणीत का म्हटलं आलं का लक्षात? अहो तिने मला बघितल्या बरोबर म्हटलं, मॅडम मी तुम्हाला आत्ताच छान गरमागरम चहा आणून देते म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटेल. त्या नंतर बसल्या जागी इतकं भन्नाट ऍक्युप्रेशर केल्यासारखं मस्त फटाफट दाबून दिल कि माझे डोळेच बंद व्हायला लागले अक्षरश:

ह्यालाच म्हणतात सेवा, मी करू का? देऊ का? आणू का? असले प्रश्नच पडत नाहीत तिला. वा काय व्यक्तिमत्व आहे. एक पाऊल पुढेच जगाच्या. मला खात्री नव्हती कि असे लोक अजून असतील म्हणून पण मी चुकले.

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा ।
बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।
करोमि यद्यत्सकलं परस्मै ।
नारायणयेति समर्पयामि ॥

नवीन दिवसांची शिकवण

मी बहुदा दोन अडीच वर्षांनी मागच्या आठवड्यात पहिल्यांदा विमानात प्रवास केला. ह्या गेल्या दोन वर्षात परिस्थिती पण वेगळी होती आणि गरज नसताना प्रवास टाळणं आवश्यक होत. त्यामुळे हा प्रवास माझ्या साठी फार वेगळा होता, प्रत्येक गोष्टीच अप्रुप वाटत होतं मला. लहान मुलाला फिरायला बाहेर नेल्यावर कसा तो भिरभिर सगळीकडे बघतो, सगळं त्याला टिपून घ्यायचं असतं, प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा असतो अगदी तस्सेच झाले होते माझे, थोड्याफार फरकाने. मी ह्या आधी नॉर्मल दिवसांमधे अनेक वेळेला अनेक ठिकाणी विविध विमानातून प्रवास केला आहे. त्यावेळी अगदी विमानाची चाके उतरतांना जमिनीला टेकली रे टेकली कि सर्व प्रवासी ताबडतोब पटापट, अतिशय घाईत डोक्यावर च्या कप्यात ठेवलेले सामान काढत असतं, प्रत्येकाचे मोबाईल फोन घणघणणे सुरु होत असे आणि इतकी म्हणजे इतकी घाई कि जसे कि ह्यांना ताबडतोब दुसरे विमान गाठायचे आहे.

पण मागल्या आठवड्यात जो माझा विमान प्रवास होता तो वाखाणण्यासारखा होता. विमान ची चाक जमिनीला टेकली, विमान पूर्ण थांबलं, जागेवर जाऊन स्थानापन्न झालं, तरीदेखील कोणताही प्रवासी उठला देखील नाही जागेवरून. सामान काढणं तर फार दूरची गोष्ट. एक्का-दुक्का फोन वाजला, बास. मग माझी मलाच शंका आली, म्हटलं कुठल्या भलत्या देशात तर नेऊन उतरवलं तर नाही ना विमान?. का$$$$ही सांगता येत नाही आजकाल.  पण मग आजूबाजूच्या काही लोकांच्या तोंडी "अबे-काबे" ऐकलं म्हटलं नाही, आपण नागपूरच्या प्रसिद्ध आणि पवित्र ठिकाणी च उतरलो आहोत. हाश. जीवात जीव आला माझ्या. त्यानंतर पहिल्या काही जागी बसलेले च लोक उठून जाण्यास सांगण्यात आले आणि चक्क लोकांनी ते ऐकलं. भरपूर चिमटे काढले मी स्वतःला आणि संपूर्ण श्रेय त्या नवीन दिवसांना देऊन मोकळी झाले. काय काय शिकवून गेले हे नवीन दिवस आणि काय भन्नाट बदल घडवून आणलेत. वाखाणण्यासारखेच. इतका बदल, दृश्य बदल घडवून आणल्याबद्दल शतश: धन्यवाद.

दुसऱ्या देशाशी अजिबात तुलना नाहीच, पण हि अंगिकारलेली शिस्त सर्वांनी टिकवून ठेवावी हि नम्र विनंती म्हणजे कोणाचीच कधीच गैरसोय होणार नाही.  अश्या वागण्याने, अशी सुरवात केल्याने प्रत्येकाची आणि ह्या देशाची भरभराट होण्यास कोणीच थांबवू शकणार नाही. सुगीचे आणि सोन्याचे दिवस पुन्हा लवकरच येणार ह्याची चिन्ह दिसू लागली आहेत मला. जे बात.

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

बेड्या

हा एक मराठीतला फारच खुसखुशीत शब्द आहे  माझ्या साठी, कारण हा टोकाच्या दोन्ही अर्थानी वापरला जातो सहज. हातात बेड्या पडल्या म्हणजे शिक्षा झाली आणि तुरुंगवास पण भोगावा लागणार पण मग तो सुखद (लग्नाची बेडी) का तुरुंगवास म्हणजे दुःखद हे तो कसा वापरला आहे त्यावर ठरत. तुम्ही सर्वांनी जर नीट निरीक्षण केलं तर अगदी जन्मल्यापासून आपण विविध बेड्या अनुभवत असतोच, अगदी छोटेपणीच्या पायातल्या छुमछुम पासून. आणि त्या वेळी त्या बाळाला जास्त समजत नाही आणि शिवाय त्याच्या पायात बळ यावं, त्याला चालायला साथ मिळावी म्हणून मुलगा असो कि मुलगी कुठल्या ना कुठल्या प्रकारचे पायातले अलंकार घातले जातातच त्या बाळाला. तिथपासून सुरु होतो हा बेड्यांचा प्रवास. मग मोठे पाणी खास करून मुलींना कमी आवाजाचे, फॅशन म्हणून अप्रतिम दिसणारे पैंजण लग्नापर्यंत आणि त्यानंतर देखील असतात.  प्रत्येक वेगवेगळ्या बेड्यांचा शरीराला, वाढीला आणि प्रकृतीला प्रचंड उपयोग असतोच. आता हेच बघा ना गेले दोन वर्ष मी इतक्या वेगळ्या प्रकारच्या बेड्या घालते आहे कि ज्याचं नाव ते. पायात वजन बांधून व्यायाम उपयोगी असल्यामुळे मी घरी धान्य वापरून तय्यार केलेले वजन किंवा विकतचे वाळू + मॅग्नेट असलेले घालते. वाळू मुळे आणि त्या वरच्या प्लास्टिक सारख्या कापडामुळे जशी जशी मी व्यायाम करते तसे तसे संगीतमय वैविध्य बोल ऐकू येतात आणि जे मला भलतीच प्रेरणा देऊन जातात रोज आणि ठरवलेला व्यायाम करण्यास खूप मदत होते.  ज्यानी कोणी हे वजन वाळू घालून डिसाइन केले आहे त्याला मनापासून धन्यवाद. अश्या देखील बेड्या असतील ह्या जगात हे मला अनभिन्यच आहे. मला माझ्या पायातले घातलेले छुमछुम लहानपणी आठवत नाहीत पण माझ्या मुलांच्या  गोऱ्या गोमट्या पायातले छुमछुम आणि त्याच्या आवाजाचा मी सतत न कळत घेतलेला मागोवा, हे सगळं आज पुन्हा आठवलं आणि त्या अप्रतिम सुखाच्या दिवसांची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. ज्यांनी ज्यांनी माझ्या पर्यंत हे बेडी रुपी वजन / वेट्स पोचोवले त्यांना मनापासून धन्यवाद. ह्या सगळ्या ची परतफेड होणे नव्हेच.

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

Allowed

“Transfer” is one of the keywords associated with dads only, heard it from my school days. This might be because of the fact that dads only used to go out and work during those days, moms used to be great home makers and wonderful hosts. Hence there was absolutely no question of mom’s transfer, during those days. So, when girls started working due to their educational background, they started moving out of the house on daily basis and started with outstation duties too, as a part and parcel of their work. But of course, on a very small / tiny scale. Few years ago, one of my students, who is now working with a giant MNC company and a young mom too have to relocate herself to UK for 180 days straight in a row, all by herself, alone. Wow, that was an awesome inspiration for me.

So, coming to the point, when this Nagpur assignment popped up and I really don’t know why I said yes for the deputation, millions of questions started pouring-in on me. One of them to my surprise was “how come your husband allowed you to go to the different city?”.

Then the thought process started, is allowed solely important or credibility of the individual also plays an important role? If the individual is credible enough then and then only things happen right. I mean then the person gets chance to move on and explore all sorts of opportunities. If the girl is not educated enough, having guts then only it will be feasible. The efforts have to be from both the sides. If girl is capable then where is the question of “allowed”? And why. And here I am referring to all girls, not restricted to me. I keep listening to these common dialogs on TV and at actual too from various families, that we allowed her to work, we allowed her to drive, blah blah…. what do you mean?

Anyways, nothing is stopping girls to explore and reach to their destinations, kudos to all the girls, go for it dears. Love you all.

No sharing

 I still recollect those golden days when my kids were I guess around 2-3 years young. Since then it continued for many years thereafter in varied forms though. So when our family used to travel in our car, 4 of us, as kids were small, used to fight constantly if allowed them to sit together on the back seat alone and hence we 3 used to sit on the back seat together. Both used to fight even for my individual laps. 

At home, the same scene, after coming back from office both used to again fight for my laps and insist on giving them total dedicated time, "No Sharing" at all. I mean, I should only look at them, play with them, listen to them, no TV, no talking on phone, no working on laptop etc. Me and them, thats it. When together with each other especially my son used to focus on variations of the word "mamma", in different decibel levels, frequencies etc. So such special dedicated / focused time was the best moments spent ever, without multitasking, thats important.

Since few days I am observing one more thing / someone else is insisting on spending time with me, on "no sharing" basis and absolutely no multitasking. He hates when I am with him and if I try to work on something else simultaneously. Oh God. Crystal clear, if I need good results better spend dedicated focused time with him only. And I am forced to follow as my knee is at stake and at Nagpur, setting up new campus's responsibility is on my legs, not on shoulders. Right?. He is none other than my "cold gel pack". When he is with me, i should be quick, move around fast and spend time with some great conversation and requests to him and of course to my knee to heal soon. But I am loving it (his possessive attitude), superb "no sharing" time spent and will do for few more days. 

Its ok to enjoy snails speed and have fun without multitasking rush always, isnt it? Yap, its working wonders for me at least. So try if possible purposely and enjoy "no sharing" space with someone you love, living or non-living characters.


मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

जाणीव

मी संपूर्ण तय्यारीनिशीच आले आहे नागपुरात. ह्यांनी पोरांनी सगळं म्हणजे सगळं काळजीनी पॅक करून दिलंय मला. त्यात औषधं, बूट आणि जेल पॅड देखील, पाय सुजला किंवा दुखाला कि वापरण्यासाठी.

तर काल प्रचंड प्रेमाने गुढगा लागला कि दुखायला. मला माहित होत माझ्या कडे जेल पॅड आहे, पण फ्रीझर नाही ना, एक छोटेखानी फक्त फ्रिज आहे रूम मध्ये. मग म्हटलं आता काय करावं, अनेक उपाय शोधून ठेवले मनातल्या मनात आणि गुढग्याशी संवाद साधला, त्याला म्हटलं जरा सकाळ पर्यंत थांब करू काही तरी. बरं म्हटला खरा, आणि तो त्याच काम करत राहिला.

त्याच वेळी माझ्या रूम मधे काही तरी वेगळा आवाज येऊ लागला सातत्याने. मग मी बालकनीत जाऊन आले, बघितलं काय आहे हा आवाज, नंतर दरवाजा उघडून बाहेर पण बघून आले पण काहीच कुठेच मागमूस लागला नाही आवाजाचा. काहीच कळेना, झोप पण आली नाही काल त्यामुळे तो सतत आवाज मला खुणावत राहिला, प्रकर्षाने, जसे कि कोणीतरी बोलावतंय मला. पहाटे उठले, ध्यान, व्यायाम ई. झाल्यावर मग म्हटलं आता तो जेल पॅक बाहेर काढून ठेवू यात म्हणजे कुठल्यातरी फ्रिज मधे ठेवता येईल, ऑफीस ला जातांना घेऊन जाता येईल. तेवढ्यात विचार आला आणि पट्टाकिनी माझ्या रूम मधे असलेला छोटेखानी फ्रिज उघडून बघितला तर काय त्यात एक पिटुकलं माझ्या पॅक ला पुरेल असं फ्रीझर आहे. व्वा, सोने पे सुहागा. आणि मंडळी पॅक आत ठेवला, माझ्या आनंदाला पारावर च नाही उरला, नाचवसं वाटलं अक्षरश:. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पॅक आत ठेवला रे ठेवला कि फ्रिज शांत, अगदी लहान बाळ निजावं तस्स. रात्रभर तो मला बोलवत होता, फोन करत होता आणि माझ्यात फ्रीझर पण आहे पॅक ठेव हे पण सांगत होता. पण मीच वेडी, माझंच लक्ष गेलं नाही, किंबहुना मी लक्ष दिल नाही, पागल तर आहेच मी, काही शंकाच नाही. 


त्या फ्रिज ची, त्याने केलेल्या फोन ची, त्याच्या प्रयत्नांची, ह्या पॅक ची .... परतफेड कशी करू? विचार करायलाच हवा. 

पण हो, त्या माझ्या अबोल मित्राने फटाफट पॅक गा$$$$र करून दिला देखील मी तो लावूनच लिखाण करते आहे आणि आता ऑफिस ला पळते, सी या. 

बाबा उवाच ...

आधी बरेच दा लिहिल्याप्रमाणे माझे बाबा म्हणजे एक विश्वविद्यालय च होते माझ्या साठी. सतत छोट्या छोट्या गोष्टीतुन खूप काही शिकवून जायचे. आणि हो, उगाचच पाल्हाळ प्रश्न कधीच विचारात बसायचे नाहीत.

एखादवेळी मी डोकं धरून बसलेले दिसले, किंवा एकंदरीत शांत दिसले कि यायचे आणि फक्त पाठीवर थोपटून "हम्म..." एवढंच. बास मग काय तो धागा धरून मी पट्टाकिनी बोलून जायचे, "बाबा माझं डोकं दुखतंय हो$$$$$$$$$$$$$". "आहे तर".  देवा, मग त्यांना पण धपाटा द्यायचे मी आणि "काय हो बाबा, माझं डोकं दुखतंय आणि तुम्ही माझी मजा करताय". अश्या पद्धतीचा आमचा संवाद चालायचा आणि कधी ते डोकं दुखायचं थांबायचं कळतच नसे.

त्यानंतर कधी थोडीशी जास्त वेळ झोपून राहिले कि पुन्हा यायचे आणि त्यांनी फक्त प्रेमाने बघितलं च कि मी सुरु "बाबा$$$$ मला आज ताप आल्यासारखा वाटतोय". "तापचं ना, संताप नाही ना? मग ठीक आहे. कारण ताप गोळी घेतला कि उतरतो, पण संतापला इलाज नाही अजून सापडला". एकदम फ्रेश वाटायचं.

तीच लिगसी आता दुप्पट स्वरूपात आहे माझ्या कडे. माझे पाय किंवा गुढगा दुखायला लागला कि अगदी माझ्या बाबांचा भास होतो मला, दोघे सुरु करतात. "अगं मम्मा, आजोबा म्हणायचे कि नाही डोकं दुखतंय म्हणजे तो त्याची असल्याची जाणीव करून देतोय तुला. ताप येणं म्हणजे तुमचं शरीर लढाई करतंय कोणाशी तरी, चांगली गोष्ट आहे हि. तस्सेच पाय / गुढगा सांगतोय तुला कि मी आहे, थोडीशी अजून काळजी घे, थोडसं थांब, आणि मग पुन्हा सुरु कर. हो कि नाही, तो गुढगा त्याची जाणीव करून देतोय बास. सो चिल".

आता मला सांगा, इतके गोड शब्द ऐकल्यावर गुढगा पण फोन करून सॉरी म्हणाला मला काल आणि नेहेमीच म्हणतो. आणि बाबा काय किंवा मुलं काय सध्या माझ्या समोर प्रत्यक्ष नाहीत पण त्यांचे प्रेमळ शब्द देखील पुरेसे आहेत. काल पुन्हा गुढग्याने डोकं वर काढलं, रात्रभर दुखाला पण हे सगळे प्रसंग आठवले, औषध घेतलं, व्यायाम केला, हे लिहिलं आणि आता पुन्हा काम सुरु, बॅक टू नॉर्मल. चला मंडळी कामं खुणावतात आहे, पळते आता, भेटू पुढील अनुकथेत लवकरच.   

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

सुखं म्हणजे नक्की काय असत ?

मराठीत तर बघण्यात आलं नाही पण इंग्लिश मधे आहे बऱ्याच ठिकाणी "हॅप्पीनेस इज...". असे इंग्लिश मधे पूर्ण झालेले आणि केलेलं वाक्य खूप वाचण्यात आलेत माझ्या ह्या आधी. पण एवढ्यातच मला सुखाची परिभाषा नव्याने समजली / उमगली, समोर उभी ठाकली.

त्याच असं झालं कि गेले तीन एक दिवस मी आमच्या नागपूरच्या नवीन कॅम्पस मधे रुळली आहे, नवीन कॉलेज स्थापन करण्यास हातभार म्हणून. मी येथे पाहुणी असल्यामुळे मला दररोज सकाळी अगदी गरमागरम नाश्ता, दुपारी आणि रात्री जेवण आणि त्यात पराकोटीची विविधता, न सांगता, न मागता. मी निःशब्दच झाले. अनेक दिवस आयतं हातात म्हणजे सोन्याहून पिवळे नाही का. समस्त समर्थ स्त्री जातील प्रकर्षाने कळेल मला काय म्हणायचं आहे ते, निश्चितच.

एक अनुभव सांगते. मी माहेरी येणार म्हटलं कि आई, बाबा, दादा सगळे म्हणजे सगळे इतके कामाला लागायचे ना, काय काय करू आणि काय नाही असं व्हायचं त्यांना. थोडे दिवसात भरभरून सगळं द्यायचं असायचं त्यांना, मला. खायला, प्यायला, सरप्राईझ, गिफ्ट्स आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी, मी येण्याच्या आधी पासून जय्यत तय्यारी सुरु झालेली असायची त्यांची. सतत मागे पुढे, मी काय काय छान करत होते, करते हे सांगतांना कधीच दमले नाहीत ते. माझ्या आधी त्यांना माहित असायचं मला काय हवं आहे, आवडत ते. माहेरी  गेल्याचे सगळे दिवस उभे ठाकले माझ्या समोर आज आणि ते इतके प्रखर आहेत कि मला सध्या स्क्रीन पण दिसत नाही आहे टाईप करतांना एवढे डोळे डबडबलेत.

का? 

माहेरीच आल्याचा भास होतो आहे मला मागल्या ३-४ दिवसांपासून. काही म्हणजे काहीच बघावं लागत नाही आहे.
 

प्रत्येक दिवशी नाश्ता आणि दोनदा स्वयंपाक काय करायचं हा यक्ष प्रश्न असतो रोजचा, कारण ह्याला ते आवडत तर त्याला नाही, डोक्याचा भुगा होतो नुसता. आणि आता मला काहीच ठरवायचं नाही, किंबहुना हातात ताट, वा वा. "सुख म्हणजे नक्की काय असतं?". बरीच सुख येतात आयुष्यात पण माहेरी जाण्याच्या सुखाची तुलना कोणाशीच कधीच होऊच शकत नाही. "माहेरपण देगा देवा".

का इतकं कौतुक असतं मुलीचं, तिच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचं, तिच्या मित्र मैत्रिणीचं, मुलांचं, तिच्या आई वडिलांना नेहेमीच? कदाचित सुखाची परिभाषा समजण्यासाठीच असेल. 

OMG there is absolutely no single word for माहेर in English dictionary, see how unique this place is.

#Maher #MothersHouse #BirthPlace #HappinessIs

ओळख अंगठीची

पाच एक वर्षांची असतील माझी पिल्लं तेव्हा आम्ही बंगलोर ला गेलो होतो माझ्या दिरांकडे. त्यांच्या सोसाटीत भरपूर चाफ्याची झाडं होती, भरपूर फुलांनी बहरलेली. इतकी बहरलेली आणि शिवाय छोट्या उंचीची चाफ्याची झाडं मी पहिल्यांदाच अनुभवत होते. पहिल्यांदा इतकी झाडं एक साथ पाहिल्यामुळे काही क्षण तर मी त्यांचा फक्त सुगंधच अनुभवत होते. मग तेच मी माझ्या दोघांना पण सांगितले आणि त्यांना पण तो सुवास भावाला. त्याच प्रमुख कारण म्हणजे मी ताबडतोब खाली पडलेली आणि थोडीशी ताजी राहिलेली फुल घेतली आणि त्याच्या पटापट असन्ख अंगठ्या केल्या. माझ्या दोन्ही पिल्लांच्या पिटुकल्या गोऱ्या गोमट्या बोटांमधे त्या इतक्या सुरेख दिसत होत्या म्हणून सांगते कि अगदी तो प्रसंग माझ्या डोळ्यादेखत आता उभा आहे असं च वाटतंय / जाणवतंय. ती कदाचित त्याची पहिलीच ओळख त्यांच्या स्वतःच्या अंगठ्याची. लहान असल्यामुळे त्यांना आम्ही घालत नव्हतो प्रत्यक्ष अंगठी बोटात. आणि ह्या त्यांच्या अंगठ्या त्यांना इतक्या आवडल्या कि ज्याचं नाव ते. मग त्यांनी पण करण्याचा सफल / असफल प्रयन्त केला आणि आम्हाला ह्या सगळ्यात खूप मज्जा आली. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही चाफ्याची फुलं बघतो तेव्हा तेव्हा अंगठ्या करतोच. आता माझी मुलं एकदम परफेक्ट पद्धतीने त्या तय्यार करतात. आणि हो त्यांना एक गोष्ट फार भावली आणि त्यांनी तेव्हा मला विचारलं देखील "मम्मा तू खालची फुलं का उचलली अंगठी करायला?". खालची चांगली फुलं च कशी उपयोगात आणायची आणि झाडावरची शोभा का  कमी नाही करायची हे मी त्यांना पटेल असं सांगितलं होत तेव्हा.

कळतंय मला, प्रश्न पडले ना? कि आज हे अंगठी पुराणच का? सांगते हो, ऐका.

आज ऑफिस मधून संध्याकाळी  बाहेर पडले तर काय उच्च कोटींचा आनंद / परमानंद झाला मला. अहो चक्क चाफ्याचं असंच छोटेखानी झाड फुलांनी बहरलेलं दृष्टीपथात पडलं ना माझ्या. मग मी थांबते कि काय, ताबडतोब अंगठी तय्यार केली आणि घातली पण. व्वा म्हणजे व्वा च. संध्याकाळी लेकाला फोन केला तेव्हा ताबडतोब म्हणतो कसा आज काही खास केलेलं दिसतंय किंवा खाल्लेलं. म्हटलं हो, मोठ्या आवाजात अक्षरश: ओरडत सांगितलं अंगठी बद्दल तर म्हणतो कसा "तू इम्पॉसिबल आहेस मम्मा". माझ्या अख्खा खोलीत त्या अंगठ्यांचा मंद सुगंध दरवळतोय अजूनही. निसर्गाची कमाल.  

इतक्या प्रकारची फुलं आपण बघतो वापरतो, वाहतो, अर्पण करतो पण मला सांगा किती फुलांपासून भन्नाट सुगंध मिळतो, दरवळतो, टिकतो आणि आपण अंगठ्या करतो. फक्त चाफा. माझ्या वडिलांच्या घरचं  चाफ्याचं झाड तर इतकं उंच होत कि दररोज गगनाशी संवाद साधत होत. अहाहा. त्या झाडाचा आणि त्यामुळे फुलांचा रुबाबचं अनोखा. नावाला फुल असण्यापेक्षा चाफ्यासारखे दरवळा आणि सर्वत्र आठवणीतल्या  आनंदाचे क्षण निर्माण करा.  

#Plumeria #Chafa #Chapha #FlowerWithFragnance #NaturalLongLastingFragrance #FingerRing #Art #fun #FunWithKids #FunWithFlower #RingWithFlower

अमुल्य भेट

"शिक्षक दिनाची" अमूल्य भेट मिळाली मला मागल्या वर्षी आणि ह्या वर्षी देखील. दोन्ही वर्षी दोन वेगवेगळ्या गिफ्ट्स होत्या आणि अनोख्या देखील. ह्या व्यतिरिक्त आणि ह्या पेक्षा सुंदर / वाखाणण्यासारखी दुसरी भेट वस्तू असूच शकत नाही माझ्या साठी. म्हणून हा छोटेखानी पंक्ती प्रपंच.

आमच्या आंतरराष्ट्रीय विश्वविद्यापीठाने अनेक वर्षांपासून भरपूर संशोधन आर्टिकल्स असलेले डेटा बेस घेतले आहेत आणि सर्वांना उपलब्ध पण करून दिले आहेत. ह्या डेटा बेस चा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि वर्गात शिकवण्याची प्रोसेस इंटरेस्टिंग व्हावी ह्या करता एक स्पर्धा आयोजित केली जाते दरवर्षी. २०१८-१९ दरम्यान मी हे डेटा बेस वापरून स्मार्ट पद्धतीने संशोधन आर्टिकल्स / पेपर्स कसे लिहिता येतील हे शोधून काढलं, अर्थातच माझ्या PhD विद्यार्थ्यांसोबत. त्यानंतर वर्षभर सर्वत्र त्याचे हॅन्ड्स ऑन वर्कशॉप्स घेतले आणि सर्वांनाच त्याचा खूप फायदा झाला. त्यांचा उत्साह वृद्धिंगत झाला, त्यांना आवड निर्माण झाली संशोधन करण्यात आणि आम्हाला सर्वांना एक वेगळंच समाधान लाभलं. मग आम्ही ह्या स्पर्धेत भाग घेतला आणि जिंकली सुद्धा. मागल्या वर्षी AICTE च्या प्रमुखांच्या हस्ते मला बक्षीस मिळालं. 

गतवर्षीच्या विजेत्याला पुढील वर्षी परीक्षक म्हणून बोलवायची पद्धत आहे आमच्या विश्वविद्यालयात, ह्या स्पर्धे करता. त्यामुळेच ह्या वर्षी मला परीक्षक म्हणून आमंत्रण देण्यात आलं. अहाहा. काय वाटलंय मला म्हणून सांगते. परीक्षक होऊन दुसऱ्याने केलेले कार्य, डेटा बेस चा उपयोग आणि विद्यार्थ्यांचा कल ह्या नवीन प्रयोग बद्दल ई. तपासणे आणि ते देखील शिक्षक दिना दिवशी ह्या पेक्षा मोठं शिक्षक दिनाचं बक्षीस काय असणार सांगा. 

दरवर्षी स्वहस्ते विद्यार्थ्यांनी केलेले शुभेच्छा पत्र, आताशा सोशल मिडिया वर आलेले संदेश ई. आठवणी आहेतच टीचर्स डे च्या पण ह्या मागच्या दोन वर्षातील काही वेगळ्याच गिफ्ट्स आहेत आणि त्यामुळे माझ्या आनंदाला पारावर काही उरला नाही. 

"असे इव्हेंट्स होती आणि स्मृती ठेवुनी जाती". 

जगभरातल्या सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. 

आणि प्रत्येक वेळी, दर दिवशी मी सर्वांकडून काही ना काही सतत शिकत असतेच, त्या सर्व गुरूंना पण वंदन.

#TeachersDay #ResearchArticlesDatabase #Scopus #WebOfScience #BestUseOfE-Resources #EventForFaculties #HandsOnWorkshops #BibliometricPapers #SurveyPapers #ReviewPapers


बुलेट एक शान

माझ्या मोठ्या भावाकडे बुलेट आहे. माझ्या लहानपणापासून मी हे बघितलं आहे आणि ते माझ्या मनात पक्कं ठाण मांडून बसलं आहे कि बुलेट हि शान आहे, पोलिसांची, उंच पुऱ्या तगड्या / रांगड्या व्यक्तिमत्वाची. आणि मी आजची बुलेट म्हणत नाही आहे, त्या काळाची, जबरदस्त, ट्रूली हेवी, आणि दुरून च धक-धक ऐकू येणारी अशी. माझी आई हत्ती म्हणायची त्या बुलेटला. पेर्सोनालिटी हवी बुलेट चालवायची म्हणजे माझ्या दृष्टीने. बुलेट चालवणारा म्हणजे दिलाच माणूस, जिगर असेलेला च, पुढे बोलायलाच नको. बास. 


अजुन एक बुलेट ची छोटीशी आठवण मी जेव्हा कॉलेज मधे होते आणि गाडी चालवत होते तेव्हाची. एकदाच मी माझी गाडी थांबवली ट्रॅफिक सिग्नल वर पहिल्यांदा. माझा नियम होता कि एकतर सिग्नल असलेल्या रस्त्यावर गाडी चालवायची च  नाही आणि जावं लागलंच तर गाडी कधीच थांबणार नाही, सुसाट निघालं घरुन कि डेस्टिनेशन वरच थांबायचं. असो. असच एकदा मला ध्यानात आलं कि एका ट्रॅफिक सिग्नल वर एक तरुण पोलीस उभा असतो, दररोज. एक दोन दिवस बघितलं मी त्याला. माझ्या नजरेत तो आला कारण त्याच्या कडे फडतूस एक छोटीशी मोटरसायकल होती, बुलेट नाही. बास, थांबले आणि डायरेक्ट जाऊन विचारलं, "तुम्ही पोलिस इन्स्पेक्टर ना, मग बुलेट का नाही तुमच्याकडे...". तो बिचारा काय बोलणार. 

 
लहानपणी मी ऐकलेलं आठवतंय काही टोळकी भयानक खोडकर. बऱ्याचदा लोकांच्या गाडीच्या सायलेन्सर मधे कागद घुसवायचा. मग काय, बिच्चारा मारतोय किका, पण कसली सुरु होतेय ती गाडी. आणि झालीच तर मग भसाडा आवाज करत सुरु व्हायची.

अजून एक कारण असतांना गाडीच्या सायलेन्सरला खोकला व्हायचा आणि ते कारण म्हणजे कार्बोरेटर मधला / पेट्रोल मधला कचरा. ई.

पण आजकाल तर बुलेट म्हणजे एक खेळणं झालाय. जो उठतो तो बुलेट चालवतो. किडकिडीत शरीरयष्टी असलेले, पोलिसात वगैरे नसतांना उगाचच बुलेट घेऊन आणि मुद्दाम काहीतरी सायलेन्सर मधून आवाज काढून चालवतात. कुत्रा दिसला काढ आवाज, मुलगी दिसली काढ आवाज. उगाचच शान मारायची. आणि तो आवाज एवढा मोठा आणि भसाडा कि एकदम क्षणभर हृदयाचे ठोके बंद होतात. एक तर बुलेट त्यांनी कमावलेली नाही, फुकटच्या पैशानी घेतलेली, त्यात कामधंदे नाहीच. मग ज्यांना काम आहे, जे एखाद्या उद्देशाने किंवा शांत पणे रस्त्यावरुन चालले आहेत, मुके जनावर ई. त्यांना का त्रास द्यायचा. काय मिळत असं करून? माझे हात कधी कधी इतके सळसळता ना, असं वाटत एक द्यावी, पण अश्या युजलेस मुलांना काय समजणार, दिसतच आहे काय दिवे लावतातय ते. बुलेट आताशा शान राहिलेली नाही हेच खरं.  असो. 

#EnfieldBullet #RoyalEnfield #Status #VeryHeavy #BreathTakingPiece #StrongPersonToy #PoliceVehicle #

धडाडी, जिद्द, कल्पकता

ह्या गणपती बाप्पांच्या चैतन्यमय दिवसात टीव्ही वर पण भरपूर भन्नाट कार्यक्रम आयोजित केले जातात. काल मी काम करता करता एक कार्यक्रम ऐकत / बघत होते. त्यात एक अप्रतिम सामूहिक नृत्य सादर होत होतं. त्यात अनेक तारे तारका होत्या. त्यातल्या काही माझ्या ओळखीच्या होत्या तर एक दोन अनोळखी देखील. एका अनोळखी नृत्यांगनाने माझं लक्ष वेधलं. त्याच महत्वाचं कारण म्हणजे सगळ्यांनी जरीच्या नऊवारी साड्या परिधान केल्या होत्या. भरजरी ब्लॉउज होत आणि त्या एका नृत्यांगनेच्या अगदी हाताच्या बोटापर्यंत ब्लॉउज च कापड होत, अर्थात जोडगोळी दोन्ही हातात. मला आधी समजलं नाही पट्टाकिनी. पण मग ते नृत्य आणि बाकी कार्यक्रम बघतांना असं आढळलं कि तिच्या हाताला फ्रॅक्चर झालं होत, हात बांधला होता आणि ते झाकण्यासाठी हि क्लुप्ति शोधून काढली गेली होती. वा वा. लै भारी. हाताला दुखापत झाली असतांना देखील नृत्य करणं, त्यासाठी पूर्ण बाह्यांचं ब्लॉउज घातलं आहे असं दाखवणं, ब्लॉउज च कापड व्यवस्थित गुंडाळणं ई. प्रचंड आवडलं मला. सहज "नाही" म्हणता आलं असत त्या कलाकाराला, माझ्या हाताला दुखापत झाली आहे,मी नाही नाचणार, पण ह्याला प्रोफेशनल म्हणत नाहीत. Right?

According to me this is termed as  धडाडी, जिद्द, कल्पकता.

#salutes #strongPersonality #VeryCreative #ParticipatedInspiteOfFracture #PlasterWrappedWithMatchingCloth

 

 

थांबला तो संपला

बहुतांशी संध्याकाळी रोज कचेरीतुन घरी आल्यावर मुलांशी गप्पा झाल्यावर, संध्याकाळी रात्री काय जेवायला करायचं हे ठरलं कि मग मला थोडासा रिकामा वेळ मिळतो. त्या वेळी किंवा कधीतरी रात्री मी एक हास्यावर आधारित मराठीतला कार्यक्रम ऐकते. माझे डोळे दमले नसतील तर बघते देखील. तर एक फार प्रसिद्ध कार्यक्रम आहे आणि त्यात एक सुविख्यात पात्र आहे. तो तरुण आहे, पिळदार शरीरयष्टी आहे, उंच आहे, डोक्यावर भलं मोठं टोपलं आहे आणि टीव्ही वर च्या कार्यक्रमात आहे म्हणजे तो एक उत्कृष्ट जाणकार कलाकार आहे. बरोबर? 

तुम्हाला कदाचित वाटत असेल कि हि म्हणजे मी ह्या कलाकाराचे एवढे वर्णन का करत आहे. त्याच महत्वाचं कारण म्हणजे त्याचा एक डोळा वेगळा आहे / दुखावला गेला आहे. डोळ्यात किंचितसा दोश असून देखील त्याचे एवढे फॅन फोलोवेर्स आहेत, कसे काय बुवा? ह्याच उत्तर एकच "थांबला तो संपला". पुढे चालत राहणं महत्वाचं, सातत्याने. सगळं बरोबर घेऊन, ऍबिलिटीज आणि डिसॅबिलिटीज सुद्धा. ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना, मग दोन्ही एकदम चालू राहायला हव्यातच नाही का, समांतर पद्धतीने.   डिसॅबिलिटीज ना त्यांचं काम करू द्या, तुम्ही ऍबिलिटीज ना घेऊन हसत खेळत चालत राहा, कार्यरत राहा. ह्या कलाकाराने पण हेच केलं आहे, त्यामुळेच तर तो आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. मला तर फारच आवडतो / भावतो तो. अर्थात ह्या आधी सुद्धा खूप कलाकार होऊन गेलेत त्यांच्या मधे सुद्धा लोकांना उणिवा भासल्या / आढळल्या पण ते देखील कधीच थांबले नाहीत. डिसॅबिलिटीज चा स्वीकार करा, मान्य करा कि आपण अनोखे आहोत, मार्गक्रम करता करता डिसॅबिलिटीज कधी ऍबिलिटीज विथ मेंटल स्टॅबिलिटी प्लस डूराबिलिटी होऊन जातील हे तुम्हाला समजणार पण नाही. डिसॅबिलिटीज ह्या फिचर चा विजय असो. 

#abilities #disabilities #stability #MentalStability #MoveOn #NeverStop #ParallelPaths

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

"झुकू झुकू अगीन गाडी..."

 मी कधीही म्हणजे कधीही विमानाच्या खिडकीतून बाहेर बघितलं नाहीच आज पर्यंत. मला उंचीची भयंकर भीती वाटते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझी मुलाचं बसायची विमानाच्या खिडकीत आळीपाळीने त्यामुळे पण बाहेर डोकावलं जायचं नाहीच. पण काल विमान प्रवासात का कोणास ठाऊक पण बाहेर बघितलंच आणि काय आश्चर्य "माझी ना मी राहिले", असा काहीसा अनुभव आला मला. 

त्यात भरीस भर म्हणजे मी माझ्या नागपूरला निघाले होते, माझ्या मुलांच्या मामाच्या गावाला. आणि ती ढगांची शोभा, ते ढगांचे वैविध्य आकार, रंग, छटा आणि सगळे निसर्ग रूप बघून इतकी भारावून गेले कि मला काहीही सुचत नव्हतच. 

त्यात थोडक्यात मला काही शब्द पेरता आले ते असे, जे "झुकू झुकू अगीन गाडी..." ह्या सुप्रसिद्ध कवितेवर आधारित आहे. मला विमानातून बघतांना आलेले आणि नागपूरला इतक्या वर्षांनी जाते आहे ह्या भावनेची थोडक्यात कोशिंबीर आहे हि, गोड मानून घ्या. 


हवेशी बोलत विमान चाली 

ढगांच्या गर्दीतून वाट काढी 

कापसाचे ढग पाहू या 

मामाच्या गावाला जाऊ या 


मामाच गाव मोठा 

प्लॅटिनम चांदीच्या पेठा (ढगांच्या विविध छटा)

शोभा पाहून घेऊया 


मामाच गाव मोठा 

ढगांच्या विविध पेठा 

शोभा पाहून आनंदी होऊ या 


मामाच्या गावी सगळेच सुगरण 

हल्दीरामचे अख्खे दुकान 

पुडाची वडी फस्त करू या 



मोठा माणूस / मोठे व्यक्तिमत्व

माझ्या लहानपणी पासून ते काही दिवसांआधी पर्यंत मला न एक कदाचित चुकीचा गैरसमज झाला होता. माझ्या बरोबर / माझ्या समोर अनेकदा "साधे नागरिक / सिव्हिलिअन्स" असल्यामुळे खूप काही चांगली वागणूक मिळाली नव्हती. कारण जे सैन्यात किंवा आरमारात काम करतात, देशासाठी काही तरी करतात ते च फक्त बहुउपयोगी असतात, बाकी नाही, त्यामुळे. सिव्हिलिअन्स ना शिस्त माहित नसते, वागत नीट येत नाही ई. ई. त्यामुळे मी बहुतांशी आणि आदरपूर्वक आरमारात काम करणाऱ्या / केलेल्या लोकांशी जरा चार हात दूरच राहत असे नेहेमीच. 

पण मग काही वर्षांनंतर चांगले अनुभव पण आले पण अगदीच एक्का-दुक्का आणि त्यामुळे त्यांच्या वर भरोसा ठेवायचा कि नाही असं किंचित डोक्यात आलं सुद्धा. असो.  पण गेले चार-पाच दिवस हवाईदलातल्या निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांनी "तुम्ही साध्या सिव्हिलिअन तर आहात..." अश्या पद्धतीचे उद्गार काढले नाहीत, तसं भासवलं पण नाही आणि शिवाय मला नागपूरच्या नवीन कचेरीत सेटल होण्याकरता प्रचंड मदत पण करत आहेत आणि खात्री आहे कि करत राहतील. अगदी बारीकसारीक गोष्टींकडे जातीने लक्ष देऊन माझं स्वागत करण्यात आलं. खात्री आहे कि ते सर्वांसाठीच असंच सगळं करत असतीलच. माझ्या प्रत्येक पिटुकल्या प्रश्नाला ताबडतोब उत्तर मिळालं आणि येण्याच्या आधीच मी पुन्हा एकदा नागपूरकर झाले अगदी कंफोर्टटेबली ते सर आणि त्यांच्या संपूर्ण टीम मुळेच.  खरंच, जेव्हा ते हवाई दलात अधिकारी होते तेव्हा देखील आणि आता वागण्यात / बोलण्यात देखील असे "मोठे व्यक्तिमत्व". खूप खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्या कडून आणि इतकी रिस्पेक्ट / आदर पण दिला जातो पदोपदी हे वाखाणण्यासारखं आहे, म्हणून हा खास पंक्ती प्रपंच. आधी व्यक्ती भन्नाट हवी मग ती कोठेही आणि कोणासाठीही का ना काम करेना. सिव्हिलिअन्स म्हणून ह्या नंतर कधीही काहीही ऐकायला मिळणार नाही मला किंवा बाकीच्यांना जर असे अनोखे व्यक्तिमत्व असेल तर. 

"असे अधिकारी येति आणिक स्मृती ठेवुनी जाती". 

जीवेत शरद: शतम् शतम्...
सुदिनं सुदिनं जन्मदिनम्,
भवतु मंगलम् विजयीभव सर्वदा,जन्मदिनस्य हार्दिक शुभेच्छा:!

चिरंजीवी यथा त्वं भो भविष्यामि तथा मुने !
रुपवान्वित्तवांश्चैव श्रिया युक्तश्च सर्वदा ! १ !

मार्कण्डेय नमस्तेस्तु सप्तकल्पान्तजीवन !
आयुआरोग्यसिध्द्यर्थं प्रसीद भगवन्मुने ! २ !

चिरंजीवी यथा त्वं तु मुनिनां प्रवरो द्विज !
कुरुष्व मुनीशार्दुल तथा मां चिरजीविनम ! ३ !

मार्कण्डेय महाभाग सप्तकल्पान्तजीवन !
आयुआरोग्यसिध्द्यर्थं अस्माकं वरदो भव ! ४ !

जय देवि जगन्मातर्जगदानन्दकारिणि !
प्रसीद मम कल्याणि नमस्ते षष्ठीदेवते !५!

त्रैलोक्ये यानि भूतानि स्थावराणि चराणि च !
ब्रह्माविष्णुशिवै:सार्थं रक्षां कुर्वन्तु तानि मे ! ६ !

The apt and crisp meaning of these beautiful wishes are explained on this blog site. https://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118182.html?1161309045


शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

समूहगान

मराठी विश्वकोश, https://vishwakosh.marathi.gov.in › ...
ने समूहगान ह्या शब्दाचा दिलेला अर्थ असा आहे:
समूहगान : (कोरस). संघटित गायक-समूहाने एकसुरात गावयाचा कंठसंगीताचा एक प्रकार.

मी आणि माझ्या शाळेतील वर्ग मित्र मैत्रिणींनी अनेक वर्ष सातत्याने जगलेली हि एक आठवण आहे. कित्ती हिरीरीने, उत्साहाने आणि आवडीने भाग घेत असू आम्ही सगळे ह्या समूहगायनामधे. अहाहा. एक वेगळीच ऊर्जा तर मिळायचीच पण त्यापेक्षा ती जी एकंदरीत प्रक्रिया होती ना, तो एक समूह तय्यार होण्यापासून, गाणं ठरवण्यापासून, विविध टप्प्यातल्या तालमी, मस्त इस्त्री केलेला पोशाख, पॉलीश केलेले बूट, जय्यत तय्यारी आणि सरते शेवटी खणखणीत आवाजात गाणं जेथे असेल तेथे, शाळेत किंवा कुठल्या दुसऱ्या बाहेरच्या शाळेत. चढाओढ हि जीवघेणी नव्हती तेव्हा. आमच्या तय्यारी मुळे खूपदा मोठ्या आवाजात गाणं म्हटलं जायचं आधी शाळेत, तबला पेटी सोबत जेव्हा तालीम असायची त्या दिवशी म्हणजे इतकं भन्नाट वाटायचं ना कि जसे कि ते तबला सर फक्त आणि फक्त आमच्या उत्कृष्ट गायनासाठी आले आहे / साथ देत आहेत. वा वा. आणि शाळेत जी वातावरण निर्मिती व्हायची म्हणून सांगते, ज्याचं नाव ते.

आज अनेक वर्षांनंतर सिंबायोसिस शाळेच्या समूहगानाचा व्हिडिओ बघण्यात आला, आणि सगळ्या स्मृती जाग्या झाल्या एकदम. शाळेत जाऊन आले असं नाही म्हणू शकत मी, फेरफटका मारून आले हे पण नाही योग्य, शरीराने घरी आहे फक्त, कधीच तालीम सुरु पण झाली माझी, ती कोपऱ्यातली खोली, ते सर तबला वाजवणारे, पेटी वर मॅडम, शप्पथ.  

त्या वेळी स्मार्ट फोन काय साधे डब्बा फोन नव्हते, फोटो काढून जपून ठेवणे, तो अनेक लोकांना पाठवणे ई. प्रकार अस्तित्वात नव्हतेच. त्यामुळे आम्ही गायलेले समूहगान तर मी नाही ऐकवू शकत आणि ऐकू शकत पुन्हा, पण खालील लिंक वर सिंबायोसिस शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेला उत्कृष्ट प्रयन्त जरूर ऐका.

ह्या सगळ्या जिवंत आठवणींच्या साठ्याला आणि जगलेल्या क्षणांना सलाम, त्या मित्रमैत्रिणींमुळे आणि शाळेनी दिलेल्या संधी मुळे शक्य झालं / होतंय सगळं.

 https://www.youtube.com/watch?v=peSonma_zIw

 

अनोखा दागिना

अनोखा दागिना
काळ्या वर हिरव्याच्या छटा आणि अनोख्या पद्धतीने गुंफलेल्या वेली
आणि दर दिवशी वेगळ्या छटा वैविध्य आकाराचे प्रकारचे दागिने
इतका बदल, इतकी रेंज
अहाहा
अप्रतिमच

मला तर
ते दृश्य बघून अनेकदा हेवा वाटतो त्यांचा
इतकं सुरेख, आखीव रेखीव कलर कॉम्बिनेशन असतं ना, ज्याचं नाव ते.

सांगा बघू काय म्हणायचं आहे मला?

बरोबर ओळखलंत मंडळी.

२०१३ पासून न चुकता बहुतांशी रोजच कसं काय समजत त्यांना माहित नाही पण आमची ऑफिस ची बस सुटली कि ह्यांनी छोटासा रस्ता
डवलाच म्हणून समजा. एकतर आमच्या बस ची खासियत म्हणजे ती दररोज उशिरा निघायची, ह्याची त्याची वाट बघत, भूका लागलेल्या असायच्या आणि मार्ग नसायचा. आधी किंचित राग यायचा आम्हाला पण मग मज्जा येऊ लागली, कारण ते दृश्यच भव्यदिव्य असायचं, वेगळं असायचं. मला तरी आनंद होत असे, होतो अजूनही.

शेवटी काय रस्ता त्यांचाच तर आहे हो, आमच्या आधी, त्यामुळे त्यांचा हक्क जास्त. त्यात आमचे ड्राइवर काका कधी म्हणजे कधी हॉर्न वाजवणार नाहीतच, शांत पणे बस थांबवणार.

भव्य दिव्य म्हशी ताई आणि त्यांच्या शिंगावर आरूढ झालेले वेल, दररोज च आहे हे दृश्य, दररोज बदलेले वेल, मोठे लहान, विविध पानांच्या आकाराचे, आणि स्थिर त्या शिंगांवर,  आणि त्यात ती भारदस्त डौलदार चाल, गळ्यातली घंटा.... आणि त्यांना पण माहित असत ते कि आपण खूप छान दिसतोय ते, त्या पण मग मिरवतात आमच्या समोर, अहाहा. 

निसर्गाची पण कमाल आहे नाही, आपोआप सौंदर्याच्या गोष्टी बहाल करतात. कित्ती काळजी त्या म्हैस ताईची. मला तर कित्ती लिहू आणि कित्ती नाही असं झालंय. निसर्ग आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर अन-सीझनल / अवेळी / गरज नसतांना दागिने कोण घालणार म्हशी ताईंना नाहीतर. 

कित्ती शिकण्यासारखं आहे नाही ह्या सगळ्यांकडून सतत. अपेक्षा विरहित कार्य सातत्याने सुरु ठेवा, दुसऱ्यांना सजवत राहा सहज.   

#Ornaments #NaturalOrnaments #Buffalo #BuffaloHornsWithTreeBranch #AntlersWithTreeBranch #Antlers&Climber #Black&Green #AwesomeCombo #ColorCombination #Giving #Unseasonal #Beauty

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

"हो"

माझे बाबा नेहेमी म्हणायचे "हो" म्हणायला शिका. समस्या निर्माण होतंच नाहीत बहुतेक वेळा. ह्या छोटेखानी शब्दात प्रचंड ताकद आहे. सतत सांगायचे. मला त्यांचा हा मंत्र इतका आवडतो ना, जसा कि रामबाण इलाज. "हो" म्हणतांना जरासं स्मित-हास्य पेरलं तर सोन्याहून पिवळं, नाही का?

हा रामबाण इलाज मग मी फक्त माझ्या पुरता मर्यादित सांभाळून कसा काय ठेवणार, शक्यच नाही. माझ्या घरच्या आणि दारच्या लेकरांना सतत सांगत असते मी. आज पर्यंत एवढ्यांदा सांगून झालं आहे कि कधी कधी माझ्या घरी काम करणाऱ्या मावशी आजूबाजूला असतात, त्यांचे कान तीक्ष्ण असतात / आहेत हे माझ्या ध्यानात आलं नाही.

काही दिवसांपूर्वी पासून माझ्या हे लक्षात येत आहे कि माझ्या मावशी "हो" हे शस्त्र म्हणून वापरतात आहे. त्यांना कुठलेही काम सांगा, त्या ताबडतोब "हो" म्हणतात. मात्र स्मार्ट पणे त्यांना शक्य असेल तेव्हाच ते काम करतात, ताबडतोब नाही बरं का मंडळी. "मेरी बिल्ली मुझ पर म्याऊ".  बेसिक काम झालं कि जास्तीच किंवा सुचवलेला किंचित बदल त्यांना वाटेल तेव्हाच करणार. असो, शेवटी त्यांना पण मर्यादा आहेत आणि त्या देखील एक माणूस आहेत. 

माझा संशोधनाचा विषय कित्ती उपयोगी आहे बघा, ज्याचं नाव "इन्क्रिमेंटल लर्निंग" असे आहे. आधी मावशींनी बहुतेक अर्धवट ऐकलं माझं बोलणं आणि त्या "हो" म्हणायच्या पण रागात / चेहेऱ्यावरचे बदललेले हावभाव दाखवत. त्यानंतर, एक तर काम सांगितल्यावर गप्प बसायच्या म्हणजे मूक सामंती द्यायच्या आणि आताशा तर मस्त हास्य चेहेऱ्यावर आणि "हो" असा संयोग असतो. भन्नाट च. मज्जा येते त्यांना आणि मला देखील. माझ्या लेकीच्या पण हे ध्यानात आलंच आणि ती पण आता हे सगळं फा$$$$र एन्जॉय करते. बहुतांशी संध्याकाळी ती असते मावशींबरोबर मी ऑफिस मधून घरी येई पर्यंत.

असेच सर्व जण स्मित-हास्या सहित "हो" पेरा सर्वत्र, भरपूर कामं करा एन्जॉय करत करत / हासत - खेळत म्हणजे त्या व्यक्तिला आणि आजुबाजुच्यांना पण मज्जा येईल आणि खूप कामं होतील / मार्गी लागतील सहज.  

"हो" ह्या रामबाण इलाजाचा विजय असो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया. "हो" सोबत प्रत्येक नवीन कामाचा शुभारंभ करू या. 

#SayYes #YesAlways #QuasiSmile #Smile #TenderSmile #JustSmile #CuteSmile #Panacea #EnergeticWord #ShouldTry #MustTry #Happiness #EnergyForWork

"ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान"

मी जेव्हा शाळकरी मुलगी होते तेव्हा पासून घरी अंगणात छान मोठा बगीचा होता. तो मी पण सांभाळायचे, कारण १. लाल चुटुक पेरू, २. वालाच्या शेंगा, ३. चाफा, ४. मोगरा ५. उन्ह्याळ्यात पिटुकले कलिंगड ई. कोणीतरी माझ्या बाबांना एक झाड बक्षीस म्हणून का एका समारंभात दिले होते. त्याला तेव्हा लहान असल्यामुळे काही छोटीशी हिरवीगार पाने होती फक्त. त्यानंतर त्याला एक अतिशयच वेगळ्या पद्धतीचं लाल चुटुक फुल आलं ज्यात मधे एक पिवळसर रंगाचा तुरा पण होता, जास्वंदाच्या फुलात आढळतो तसा. जेव्हा एकामागून एक तशी ती अनोखी फुलं यायला लागली तसा माझ्या आनंदाला पारावर राहिला नाहीच. थोड्या दिवसांनी लक्षात आलं कि खरं तर ती फुलं नव्हतीच, ती लाल रंगांची पान होती. ते त्या झाडाचं वैशिष्ट्य, हिरव्या गार पानांवर लाल चुटक पान आणि तुरे. पण दुरुन बघितलं तर फुलं, किंवा त्या बद्दल माहित नसलं तर फुलांचं शोभेचं झाड. अहाहा. क्या बात है नाही?

"चकाकणारे सर्व सोनेच असते असे नाही", हि म्हण मला प्रकर्षाने जाणवली आणि आठवते देखील जेव्हा जेव्हा मी पॉईन सेशिया किंवा Anthurium ऍन्थुरियम नावाचं हृदयाच्या आकाराचं पान असलेलं झाड बघते. अर्थात बरंच ह्या झाडांबद्दल वाचल्यानंतर समजलं कि हवाई आणि इतर जगाच्या भागात ह्या झाडांपासून लग्नात सजावट करतात किंवा पुष्प गुच्छ तय्यार करतात.

एकदा व्यक्ती जेव्हा मोठा होऊन विद्यार्थी दशेत, नोकरदार / व्यावसायिक म्हणून समाजात वावरतो तेव्हा अनेक लोकांशी संपर्क येतोच, सर्वांसोबत काम करावं लागत, राहावं लागत ई. त्या वेळी अनेक जण कळत न-कळत तुम्हाला वेगळ्या स्वरूपात बघतात, समज - गैरसमज करून घेतात, कधी ते प्रोत्साहन असतं तर कधी मागे खेचणं. प्रत्येकाला स्वतःबद्दल सगळी कल्पना असते, आपण काय आहोत हे माहित असतं, आपल्या कामाची पद्धत आणि विचारपूर्वक केलेली कृती प्रामाणिक असते, मग दुनिया बोलू दे ना काय बोलायचं आहे ते? त्यांना  "पॉईन सेशिया" ला फुल म्हणू दे नाहीतर पान, ते झाड बहरायचं थांबत का? ते झाड बाकीच्या बघणाऱ्यांना हिरमुसलं करत का? नाही ना? मग बुद्धिजीवी माणसानेच का आपल्या वर्तनात बदल घडवून आणायचा केवळ कोणाच्या तरी बोलण्याने. प्रयन्तपूर्वक ह्या वर सातत्याने काम करायला हवं. आणि सतत चित्ती ठेवावे समाधान.

 "All that glitters is not gold", even if you are totally independent personality but some people look at you as totally dependent. Chill, its their problem, they need to change their spectacles, right. Let them stay with their misunderstanding, wrong impressions etc. provided you are totally aware about your good-deeds and clear intentions. Learn to live with it, like red the leaf tree Poinsettia = not flower, but it looks like flower and it never complains for its true existence, isnt it? So enjoy, have fun and move forward always. 

URLs to know more about these couple of flowers / plants, click following links:

https://extension.umn.edu/houseplants/poinsettia

https://www.guide-to-houseplants.com/anthurium-plant.html

#poinsettia #anthurium #plants #flowers #personalities #individuals #misunderstandings #deeds #good-deeds #glitter&gold #leaf #hawaii 

मुल्य वर्धित सेवा / Value Added Services

सध्या आम्ही आमच्या पुण्याच्या ऑफिस / कचेरीत बसून नागपूरच्या नवीन संस्थेसाठी लागणारी सगळी तय्यारी करतो आहे. सध्याचं विश्व हे अंकात्मक / डिजिटल आहे. त्यामुळे सर्वप्रथम वेबसाईट, सोशल मिडिया वर पाठवण्यासाठी उत्कृष्ट जाहिराती, वर्तमानपत्राची वेगळी आणि मोठी जाहिरात, त्याचे विविध मथळे / माहिती / फोटो आणि भरपूर काही तय्यार करणं सुरु आहे. अपेक्षा आहे कि ह्या सगळ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळावा. हवे तेवढे प्रवेश मिळावे म्हणजे झालं बावा.

मी ह्या संस्थेमधे आधीपासून काम केल्यामुळे किंवा वातावरणात वाढलेली असल्यामुळे नवीन जागी एक माहिती असलेली व्यक्ती म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे माझा नंबर देण्यात आला आहे सगळ्या जाहिराती मधे. तय्यार झालेल्या सगळ्या जाहिराती आम्ही आज बघितल्या व्यवस्थित. 

संध्याकाळी मला अचानक एक फोन आला आणि माझी चौकशी करू लागला. मला काहीच समजले नाही आधी. मग त्याने सांगितलं कि तो त्या जाहिरात देणाऱ्या कंपनीत आहे / मालक असावा कदाचित. तो म्हणतो कसा "जाहिरात छापण्यापूर्वी मी नेहेमीच त्या दिलेल्या फोन नंबर वर संपर्क करून माझी खात्री करून घेतो, तो नंबर चालू आहे का नाही त्याची. हे मला कोणीही करायला सांगितले नाही पण मला हे केल्याशिवाय राहावताच नाही. तेच ई-मेल चे पण." त्याचे हे शब्द ऐकल्यावर मला इतकं म्हणजे इतकं प्रचंड आवडलं कि ज्याचं नाव ते. माझ्या दृष्टीने ह्यालाच मुल्य वर्धित सेवा / Value Added Services म्हणतात. धन्य वाटला तो मला. मी CMC / TCS ह्या कंपनीत असतांना हि संकल्पना ऐकली, पेरली आणि वापरली पण होती. त्यानंतर अनेक वर्षांनी अनुभव मिळाला म्हणून ताबडतोब तंत्रज्ञानाने युक्त अशी लेखणी हाती घेतली आणि लिहून काढलंच. जमल्यास पाठवीन त्याला. कदाचित आवडेल देखील. त्याच नाव गाव पत्ता मला काहीही माहिती नाही पण कधी कधी अश्या वक्ती अचानक पुढ्यात येतात, भेट होते, बोलणं होत आणि नेहेमीकरता स्मृती ठेवून जातात. 

असे अनेक तरुण उभे राहावेत म्हणजे गिऱ्हाईक / ग्राहक / क्लायंट अगदी संतुष्ट झाल्याशिवाय राहणारच नाही. अहाहा. काय छोटेखानी पण पहाडासारखा अनुभव देऊन गेला तो फोन कॉल. आवडलं मला, फारच. 

The innovative thinker which I am referring here is Mr. Shrenik Chanekar from https://www.xebecindia.com/, as unique as his name.

#advertisement #newspaper #commercial #AdInNewspaper #YoungMediaPersonnel #impressive #ValueAddedService #unique #CorporateCulture #validation

गोंडस वाढ

आमच्या घराच्या अगदी पाठीमागे एक वॉचमन च कुटुंब राहतं. त्यांना एक अतिशय गोंडस मुलगी आहे. साधारण ८ महिन्यांची असेल. मागे एकदा मी तिच्या बद्दल सुतवाच्च केलं पण होत. फक्त चार पत्रे कसे तरी उभे केलेले हे त्यांचं घर. त्यात आई, बाबा, ती, आजी आणि काका इतके जण राहतात. त्यांच्या घराच्या बाहेर एक जुना मोडलेला सोफा आहे, असाच आणून ठेवलेला. त्यावर आजी सकाळी उठल्या कि बसल्या असतात आणि काही तासातच आडव्या होतात. मी तीच नाव झाशीची राणी ठेवलं आहे. ती आजी जवळ बसलेली असते. ठेकेदाराने जसे काही हिलाच लक्ष द्यायला सांगितले आहे सगळीकडे अशी प्रत्येक येणा जाणाऱ्याला आवाज देत असते वैविध्य पद्धतीने, खणखणीत आवाजात. बाप रे. इतका मोठ्ठा आवाज आहे तिचा कि ज्याचं नाव ते. पहाटे पासून भन्नाट दिवस सुरु होतो माझा त्यामुळे. 

आता हे वाचल्यावर तुम्ही म्हणाल त्यात काय नवल, सगळी मुलं करतात हे सगळं. पण नाही मंडळी. माझ्या झाशीच्या राणीला कुठलेही खेळणी नाही आहेत खेळायला मोटर स्किल्स विकास आणि वाढ व्हायला. कोणालाही म्हणजे कोणालाही वेळ आणि आवड नाही तिच्याशी बोलत बसायला. आई घरच्या कामात बुडालेली, बाबा बाहेरच आणि वॉचमन च काम, काका दुसरी कडे जातो कामाला आणि आजी बहुतांशी शांत. मग तरीदेखील इतकी भर्रकन प्रगती म्हणजे दाही बोट तोंडात च. फारच वाखाणण्यासारखी आहे. तिच्या ह्या टप्प्या टप्प्याने होणाऱ्या गोंडस वाढीचे कौतुक, अगदी मान धरण्यापासून जे छोटे छोटे टप्पे तिने ज्या गतीने गाठले त्याची मी दररोजची साक्षीदार आहे. खूपच अप्रतिम प्रतिसाद मिळत गेले आणि मिळतात तिच्या कडून, असं वाटत सतत खेळत बसावं तिच्याशी. रडणं तर माहीतच नाही पठ्ठीला.

असं बरेचदा आढळलं आहे कि काही समृद्ध घरातली बाळ नाही करत प्रगती सगळं जागच्या जागी असून देखील. अर्थात कधीच कोणाशी तुलना होऊच शकत नाही.    पण तरीही ह्या माझ्या झाशीच्या राणीच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. काय अप्रतिम मैत्रीण, शेजारी आणि उत्साही व्यक्तिमत्व पाठवलंय माझ्या जवळ राहायला. तिचा आवाज ऐकला कि सगळा शीण तर निघून जातोच शिवाय उत्साह मिळतो तो वेगळाच. अहाहा. 

#baby #babygirl #girlchild #growth #phases #brilliantgrowth #respondstoothers #uniquequality #bestfriend #queenofJhasi


विद्यावाचस्पती

सर्वात प्रथम म्हणजे संशोधन करणंच फार आव्हानात्मक, त्यात दुसऱ्याकडून संशोधन करून घेणे त्याहून पुढची पायरी (माझ्या गाईड ने कसं केलं कोणास ठाऊक, देवा) आणि त्यात जर विद्यार्थी भारतीय तंत्रज्ञान संस्था  (IIT) चा माजी विद्यार्थी असेल तर? मग तर गाईड थोडासा मागे पडतोच. अगदी तस्से झाले माझ्या बाबतीत. मी काय ते साध्या संस्थेमधुन शिक्षण घेतलेली एक साधी मुलगी. त्यात गाईड झालेली ते हि भारतीय तंत्रज्ञान संस्था मधून शिक्षण घेतलेल्या आणि स्वतः अनेक वर्ष शिक्षक असलेल्या व्यक्ती ची. प्रचंड मेहेनती, वेळेआधी काम, कधीही कशासाठी पण "नाही" हा शब्द नाही, आणि आवड संशोधनाची. पूर्णवेळ नोकरी सांभाळून, घराकडे लक्ष देऊन, आईबाबांची काळजी घेऊन शिवाय PhD करणं फारच आव्हानात्मक होत. पण त्यांनी ते निभावलं आणि पूर्ण केलं.

असे उत्कृष्ट काम करणारे आणि संशोधनात गोडी असणारे विद्यार्थी सर्वांना लाभो हि प्रार्थना. Kudos to Dr. Rahul Joshi Sir.

अश्या प्रकारे ह्या २०२१ साली बाप्पाच्या कृपेने दोन अभ्यासकांची विद्यावाचस्पती पदवी संपूर्ण झाली, बहाल झाली. मला गाईड ह्या शब्दाचा अर्थ प्रकर्षाने समाजाला. "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे" हे कित्ती पटीने खरं आहे हे पण समजलं. 

#PhD #research #IIT #researchArticles #beforetime #sincere #neversaidno



मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

।। गणपती बाप्पा मोरया ।।

अनेक वर्षांपूर्वी / खुप पिढ्यांआधी बाळ गंगाधर टिळक ह्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली. त्या काळी फारच थोड्या घरात श्री. गणपती बाप्पाची स्थापना होत असे. कारण त्या वेळी गणपती हे दैवत पिढ्यांपिढ्या चालत आलेले होते. त्यामुळे काही जणांकडे काही दिवसांचा, पण काही कुटुंबाकडे एक वर्षाचा गणपती बाप्पा स्थानापन्न होत असे. कधी ते काही कारणांमुळे / नवसामुळे / मुलगा झाला त्यामुळे असे. काही कुटुंबाकडे उजव्या सोंडेचा आणि बाकीच्यांकडे डाव्या असे अनेक पद्धतीने ह्या पाहुण्यांचे अगदी साधे पणाने पण फारच शिस्तीत आणि सोवळ्या ओवळ्या त केले जायचे. घरचेच पौरोहित्य करत असत. 

त्यानंतर हळू हळू एकत्र कुटुंब पद्धती ला फाटा पडला. शिक्षणासाठी, नोकरीसाठी घरचे वैविध्य शहरात राहायला गेले, स्थायिक झाले. गावापेक्षा शहरं खुणावू लागली तरुणांना आणि त्यामुळे सध्या घरांऐवजी बहुमजली इमारती उभ्या राहिल्या त्याच छोट्याश्या जागेत. गेले काही वर्ष खूप ठिकाणी गणपतीच्या मुर्ती विकण्याची दुकानं दिसू लागली आहेत. ह्या वर्षी तर कहरच झाला, फक्त गणपती मुर्तींचे स्टॉल नाही तर अगदी प्रत्येक म्हणजे प्रत्येक प्रकारच्या दुकानांमधे मुर्ती विकायला ठेवलेल्या दिसत आहेत. टिळकांना सर्व लोकांना एकत्र आणण्याचा मानस होता. पण ह्या वर्षी तर सगळेच आपापल्या घरीच हा सण आणि बाप्पा साजरा करणार असे दिसतंय. असो ह्या वर्षीची परिस्थिती जरा वेगळी आहे, पण हे अगदी प्रत्येक घरात बाप्पा मांडणं मला फारच वेगळं वाटायला लागलं आहे. एकत्र येण्या ऐवजी विस्कळीत होत आहेत. नो वंडर इतक्या मोठ्या प्रमाणात मूर्ती विकण्यासाठी ठेवलेल्या दिसत आहेत. सगळ्यांनी एकत्र आरती करावी, मोदक / प्रसाद एकत्र ग्रहण करावा, त्याचं आगमन आणि विसर्जन करावं हे महत्वाचं, माझ्या दृष्टीने.  हॉटेल च्या अर्ध्या भागात, कपडे विकण्याच्या, भाजी वाल्याकडे आणि सर्वत्र मुर्त्या विकायला ठेवल्या आहेत. जरी प्रत्येकाची भक्ती भाव महत्वाचा तरी हे फारच अती होतंय माझ्या मते. असो. मी माझं मत माझ्याचकडे ठेवते. शेवटी "तो" बुद्धी दाता आहे.

मोबाइल आणि त्याचा आकार

आज मी देवाला पुन्हा एकदा मनापासून हात जोडले, अगदी मनापासून होतं ते. का? सांगते.

ज्या माणसाने / टीम ने हि मोबाईल नावाची वस्तू ह्या जगात आणली आहे त्याला सद्बुद्धी दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. मोबाईल विकसित केल्या बद्दल अजिबात नाही, पण तो ज्या स्वरूपात विकसित झाला आहे त्या करता. धन्य आहेत ते बुद्धिजीवी आणि त्यांची विचार करण्याची क्षमता, अनेक पिढ्या पुढे काय करू शकतील हे आधीच कृतीत आणल्याबद्दल / गृहीत धरल्याबद्दल.

बहुतांशी सगळेच मोबाईल धारक स्वतःला एखाद्या देशाचा पंतप्रधान किंवा त्या उपरचं समजतात, अजिबात एक कण त्याच्या खाली नाहीच. जेव्हा फोन येतो तेव्हाच जर उचलला नाही तर कदाचित हि पृथ्वी थांबेल काम करणं, असा त्यांचा ग्रह असतो. आणि म्हणूनच गाडी चालवतांना, रिक्षा चालवताना, स्वयंपाक करतांना, जेवतांना ई. कान आणि खांदा ह्यांचा पुरेपूर उपयोग / सदुपयोग करून घेतला जातो. आताशा काही जण नवीन दागिना (इअर प्लग) परिधान करायला लागले आहेत आणि तो सतत गळ्याभोवती असतोच. पण अनेक जणांकडे नसतो तो, मग काय? उचला खांदा आणि लावा कानाला. 

बरं झालं देवा मोबाईल गोल आकाराचा, त्रिकोणी आकाराचा किंवा शष्ट / अष्ट कोनी नाही तय्यार करायला सुचवलंस नाही तर ह्या सगळ्या मल्टि टास्कर्स च काय झालं असत कोणास ठाऊक.... हा फक्त विचार करून आणि डोळ्यासमोर ते दृश्य उभं करूनच मी हबकले. इतकी वर्ष सातत्याने योग गुरु सांगून दमले मान इकडे तिकडे फिरवा, खांदे वर खाली करा, पण छे, सपशेल ऐकलं नाही कोणी. बघा हा मोबाईल कशी कसरत करून घेतोय ते. अहाहा. बघावं ते नवलच.  

#mobile #mobileholdingstyle #earsholder #bentneck #multitasking #whiledriving #whileeating #whilecooking #yoga #designofmobile #roundmobile #hexagonshape    #pentagonshape


Unique appreciation

These days from past two months or so I am traveling back and forth by auto to my office on daily basis. These days, I am attending college daily and teaching online from office to my students. Don’t know whom to blame, to my back or to the auto's (spare) parts or driving skills of the driver, but it was usually observed that my backache used to start after every auto ride. It is reduced now though to large extent but few years ago I used to completely avoid riding in auto. After training my current auto driver with many requests now he is really careful while riding along with path holes and speedbrakers.

From past two days I am observing someone is predominantly saying “thank you” and appreciating. What was it? Why I am feeling little different and suddenly unique, I was trying to figure out myself and boom there I go, got the answer, after troubling my tiniest brain for few minutes. 

I was really really feeling fresh in spite of the same auto rides on the same route, and that too without any inch of backache, how? And the simplest answer is the daily jerks were shared practically among me, my auto driver and one of my friends. She started riding with me, from past 2 days as her vehicle is not available. "Icing on the cake" was during the entire auto ride as both are from Vidarbha, we constantly talk on varied subjects, thats a different diversion. My back appreciated the company in the auto and liked the change indeed. It was the most unique appreciation given to me by someone without spelling a word though.

Wow, how awesome indeed. 

Lets share everything possible, go together, to experience totally ache-free moments. What a learning received unknowingly, superb.


Virtual reality is more real than actual reality for new gen

In recent past, I had the privilege to listen to the CEO of one of the verticals from a top-notch IT company. During his speech he said that he and his mom used to play with pebbles and stones in their front yard regularly. While doing so and while throwing stones to the tree / tree-base in the vicinity, his mom explained and introduced him to the concept of speed, speed, distance and in general math. Playful way and such simple practical approaches used made a long-lasting impression and clarity about the topics. It not only created an interest in math, but also the entire process of teaching / learning, pedagogy etc. Wow, that was amazing to hear from him.

I still recollect constantly spending time on guava tree, handling cotton for making various things at home, planting / experimenting with my own watermelon in my garden, plucking mehendi leaves to make paste and then design, using specific type / shape of stone-like structures for making / grinding chutney and what not.  This list is really endless.

I felt fascinated when one of my new gen relative’s kids screamed on top of his voice when he came to know that goat exists as animal in real life too. As he always saw or learn G for Goat using pictures in books only.  

Current generation is born in an era where everything is literally virtual. And hence for them virtual reality is more real than actual reality, fortunately or unfortunately. 

#VR #VirtualReality #NewGen #NewGeneration #GenZ #virtual #VirtualWorld #real #realworld

शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

टी शर्ट आजी

सकाळी सकाळी मला दररोज बहुतेक एक मस्त तरुण आज्जी दिसतात. आकड्यांमधे लिहायला गेलं तर वय फार जास्त आहे त्यांच, तरीदेखील छान ह्या जमान्यातला टी शर्ट  पॅन्ट घालून फिरायला गेलेल्या असतात वाटत. वेगवेगळे टी शर्ट घातलेले दिसतात. मला एकाच वेळी आश्चर्य वाटलं आणि समाधान पण. आश्चर्य ह्या करता कि इतक्या जुन्या पिढीतल्या आहेत त्या, कदाचित साडीच, डोक्यावरून पदर ई. बंधन असावीत त्यांना आणि तेथून थेट टी शर्ट पॅन्ट हा प्रवास वाखाणण्यासारखाच आहे माझ्या साठी. समाधान ह्या साठी कि त्यांनी हे सगळं / बदल स्वीकारला. मला माहित आहे इतकं सोप्प नसत बदल स्वीकारणं. त्यामुळे त्यांच्या मोकळ्या स्वभावाला माझा सलाम. इतके दिवस रोज बघितल्यावर आज  सरते शेवटी लिहायला मुहूर्त लाभला मला. 

मी त्यांना बघते तेव्हा एक तर ऑटोरिक्षात असते आणि दुसरं म्हणजे वेगळ्याच ट्रान्स मधे जाणं होत ताबडतोब. त्यामुळे लिहिणं राहूनच जात होत. हरकत नाही. जमेल तेव्हा / वेळ येईल तेव्हा नक्की भेट घेईनच त्यांची. मला आवडेल त्यांच्याशी गप्पा मारायला. रोज एक भन्नाट ऊर्जा नक्की मिळते मला त्या आज्जींना फक्त बघून, बाकीच्यांना पण न कळत किती मोटिव्हेट करत असतील त्या. अहाहा.

ओल्या नारळाच्या वड्या

मी ओट्यावर ठाण मांडून बसून राहायचे संपूर्ण वड्या तय्यार होई पर्यंत लहान असतांना आणि सतत आईला प्रश्न "झालं का?" दे ना थोडं". एक वाटी घेऊनच बसले असायचे मी आणि प्रत्येक स्टेज चाखायचे वडीची. त्यामुळे अगदी मध्यरात्री उठवून दिली तरी मी खाईन इतकी मला ती वडी आवडते. किंबहुना आवडते च्या पलीकडे आहे ते प्रेम. अनेक वैविध्य प्रकारच्या वड्या चाखल्या आत्ता पर्यंत मी, घरच्या, दारच्या, माझ्या हातच्या. पण आज जे चाखलं ते ह्या जगा पलिकडल होत.

जश्या मला ह्या वड्या आवडतात तसेच अनेक पदार्थ देखील आणि त्यात चहा पण आलाच. आणि मी बासुंदी चहा हा बोर्ड जेव्हा पासून बघितला आहे तेव्हा पासून मला चव घ्यायची फारच इच्छा आहे, पण मुहुर्त मिळत नाही आहे.

आज मी एका मिटिंग मधे चहा घेतला. एक घोट प्यायल्यावर मला जरा वेगळेपण जाणवलं. मग थोडे अजून घोट घेतले तर लक्षात आलं कि हा तर नारळाच्या वड्या च्या चवीचा फ्लेव्हर्ड चहा आहे.  वा वा. एका दगडात दोन पक्षी. अहाहा. ह्या आधी कधीही म्हणजे कधीही मी असा चहा घेतला नव्हता. मज्जा आली फारच. जी कुठली चहाची पावडर, मसाला, ई. वापरला होता तो भन्नाट होता. अहाहा. लगेच थोडीशी पुडीत बांधून दे पावडर असं म्हणावसं वाटलं पण नाही मागितलं कारण ते अनोळखी ठिकाण होतं. त्या मुळे पुन्हा एकदा संपूर्ण नारळवाडी तय्यार करण्याच्या आठवणी डोळ्या समोरून गेल्या माझ्या.  

सँडविच च टॉपिंग

आज अनेक दिवसांनी / महिन्यांनी सँडविच खाण्याचा योग आला. आधी वरिष्ठानी घेतलं आणि मग म्हटलं मी घेते. पण काही तरी फारच वेगळं दिसत होतं, झकास, कधी न बघितलेलं, खूपच अट्रॅक्टीव्ह. दुरून मला असं वाटलं कि तिख्खट शेव घातली आहे त्या सँडविच वर. घातली म्हणण्यापेक्षा पेरली आहे. म्हटलं वा क्या बात है, सँडविच विथ शेव, आगळं वेगळं, खाऊन बघितलं पाहिजेच. प्लेट मधे घेतलं तर शेव फूस झालेली आढळली. म्हटलं असेल हवे मुळे, वातावरणामुळे कदाचित. तोवर मी चाखून बघितलं नव्हतं, फक्त दर्शन घेतलं होत. जेव्हा खाल्लं तेव्हा फक्त मी पडले नाही खुर्चीवरून. अहो ते तिख्खट शेवेचं टॉपिंग नव्हतं च, फूस झालेलं, तर किसुन घातलेलं चीझ होत. देवा. पोटात चीझ असतंच त्यामुळे माझ्या चार डोळ्यांना ते चीझ दिसलं नाही, अपेक्षा पण केली नाही. मज्जेत आणि काही क्षणात ते मी फस्त केलं आणि ताबडतोब हे लिहायला घेतलंच.

दोन / चार पायांची आई

अनेक वर्षांपासून माझं एक तीक्ष्ण निरीक्षण आहे जे सगळ्या स्त्री वर्गाला लागू आहे. आमच्या कडे काम करणाऱ्या मावशीनं पासून ते माझ्या बरोबर काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणी पर्यंत, किंबहुना वर्तमानपत्र आणि विविध लेखांद्वारे मोठ्या हुद्द्यावर असलेल्या स्त्रियांची पण तीच कथा थोड्याफार फरकाने. असो.

मला असं बघण्यात आलं आहे कि विद्याविभुषित / उच्च विद्याविभुषित नोकरी करणारी मुलगी लग्न होऊन सासरी आली, आई झाली कि तिची घालमेल आणि कुतरओढ सुरु होतेच, न कळत. अनेक दगडांवर पाय ठेवायचे म्हणजे तारेवरची कसरतच तिची आणि अर्थातच तिच्या बाळाची / बाळांची. काय धर-सोड करायचं समजत नाही, अर्थात निर्णय घेते ती, पण घालमेल सदाची असतेच.  स्वतःच्या मुलाला / मुल्लांना एकटं सोडून कामावर जायचं, घरी-दारी सतत सिद्ध करायचं अवघड होत. पण ती करते सगळं सातत्याने. काही कुटुंबामधे त्या उपर तिला हे पण ऐकून घ्यावं लागत कि १. कोणी सांगितलंय नोकरी करायला, सोड ताबडतोब २. बाकी जगातल्या सगळ्या स्त्रिया नोकरी आणि कुटुंब दोन्ही सांभाळतात हसत-खेळत मग तुलाच कसं जमत नाही. ई. म्हणजे "तबला हि माझा आणि डग्गा पण".

नेहेमी मला एक प्रश्न भंडावून सोडतो जेव्हा मी आपले चार पायांचे मित्र / पाळीव प्राणी रस्त्यावर मालकासोबत फिरतांना बघते तेव्हा. ह्या चार पायांच्या लेकराचं घरी करतं कोण? दोघेही जर नोकरी करणारे, त्यांचीच मुलं पाळणाघरात ठेवून पळणारे, आणि स्वतःच्या मुलांचं संगोपन करण्यासाठी नोकरी करणारी आई / स्त्री घरी राहणं म्हणजे एक प्रकारचा गुन्हा. मग ह्या चार पायांच्या मुलांसाठी घरची स्त्री सगळं सोडून राहू शकते? बाप रे, हे जर खरं असेल तर हे फारच विदारक सत्य आहे. अनेक प्रकारची बाळ सांभाळतो आपण  आपली दोन पायांची, चार पायांची, हिरवी झाडं ई. आपल्या बाळांना अगदीच गरज पडली किंवा शिस्त म्हणून एखादवेळा रागावणं किंवा फटका देणं करू शकतो, पण बाकी बाळाचं काय?

असो, हा जरी ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी देखील मला असं (चुकीचं) का जाणवत आहे कि चार पायांचे जास्त महत्वाचे, त्यांच्यासाठी सगळं माफ, त्यांच्यासाठी आई सहज घरी राहू शकते कदाचित. 

कितीही पायांची असो आई सगळ्यांची तितक्याच प्रेमाने काळजी घेते हे च सत्य आणि बहुतांशी तीच सगळ्यांसाठी उपलब्ध पण असते नेहेमीच. "संपूर्ण आई वर्गाचा विजय असो".

Thousands of salutes

This is a story about a very strong, determined, extra hardworking, totally down to earth, helping and blessed girl. A girl who is a practicing physiotherapist at the giant and growing city like Pune. She made a strong mark in this city and which is commendable for sure.

Today to enhance her skills in physiotherapy and allied areas and in turn further help her patients to heal better she went to attend 4 days long hands-on workshop. She drove all the way 15+ kms on busy Pune city roads, one way and back. After completion of today's session while driving back to clinic as the most dedicated doctor, she called me while driving her giant vehicle to inform about my appointment time. After happily treating 2 grand moms and then me patiently with lots of motivating and encouraging words due to heavy rains, she came all the way to drop me home. Wow. 

After dropping me safely home, she drove in rain 12-13 kms approximately to her place. Due to new-normal conditions it is necessary to take a bath for safety, serve food to family and then her day will be over. Thousands of salutes to her, indeed. I am truly lucky to have such doctor treating me. Where you will find such human being these days? Very, very rare. God bless her always with abundance of smiles, health and what every she wishes for. Amen.

She is Dr. Leena Auty. Her clinic is at Balewadi Pune and she is from Nagpur too. For more details kindly click following link: https://www.practo.com/pune/therapist/leena-auty-physiotherapist




शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

Prayer way

This is one of the reasons I love the social media. Today morning somebody's thoughtfully written words made my day in an extremely awesome way. There was a little story but bit wordy. I usually never ever read such wordy, "many times forwarded" posts, but never know why I read that and thank-God I did that it was worth it. Rather thanks to my bestie who forwarded it to us on our WA group.

The story was related to the prayer offered by a little girl every day by coming to the temple. And when asked by the prist about it, she gave the best answer. She narrated, I know only alphabet a-z, I say them thrice and tell God that your prayers are made up of combination of these alphabet only, right? so combine these alphabet you wish to and accept my prayers. 

Wow, when I told / narrated this story to my daughter she immediately said "see mamma, even that tiny girl also understood the importance of praying without making a drama out of it". Its today's teens language and way to express.

Yeah what she mean to say that no need to especially take out time, sit in front those idols, and .... Even if you pray from bottom of your heart, do no wrong, do not think bad about others, even that is enough. Every one is / may have their own way to pray and those who sit for hours in front of the idols are the once who keep cribbing for those who do not show off. Anyways, thats not the topic of discussion.

Keep doing great for always, try your best and best will come back to you but dont wait for it.

Read this story on : https://twitter.com/vkjha62/status/1430701427089760262

बसलेला घसा

अहो काय सांगू तुम्हाला एका घश्याची गोष्ट. नेहेमीच साधा चालणार घसा वेगळा आणि थोडासा देखील बदल झाला तरी गडबड, त्या घसा-धारकासाठी आणि बाकीच्या ऐकणाऱ्यांसाठी देखील. ऐकणारे जर मशीन असले तर झाली पंचाईत मग, देवा. अहो हो, आम्ही मशीन ना देखील आजकाल शिकवतो ना आवाज ओळखायला. स्पेशिअली जर पैसे काढण्याचं मशीन आवाजावर चालणार असेल तर? म्हणजे पैसे काढणे - घालणे जर आवाज / बोलून कमांड देऊन घडणाऱ्या असतील तर? पंचाईत घसा खरखर झाली कि. असो.

मला माणसांचे आणि काही जनावरांचे नेहेमीचे आवाज माहित आहेत. पण जेव्हा आवाज बदलतो तेव्हा ताबडतोब लक्षात येतो, ह्याला दोन कारणं आहेत, एक म्हणजे तो व्यक्ती एक तर अगदी हळू बोलतो नाहीतर बोलतच नाही. पण जर तो मोठ्या मोठ्याने बोलायला लागला त्याच्या भसाड्या बदललेल्या आवाजात तर? 

अहो, मी परवा उडालेच, जबरदस्त विलक्षण अनुभव होता. बिच्चारा मोठ्या मोठ्याने बदलेल्या आवाजात भुंकत होता. बिच्चारा, खरंच, ऐकून पोटात गोळा आला. त्याला आता कोण औषध देणार? अर्थात त्याला औषधाची गरज पण नाही ते फटाफट तसेच ठीक होतात. पण कशा करता तो भुंकत होता कोणास ठाऊक?  काहीतरी तळलेलं खाल्लं असेल, जे नको खायला, वेडा कुठला. पण मी हे माझ्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकलं त्यामुळे मला वाईट वाटलं कारण मी काहीच करू शकले नाही त्या करता. असो, लवकर बरा हो बाबा आणि तो वर भुंकू नको.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...