रविवार, २९ डिसेंबर, २०२४

२११६: वापर


आपण अनेकदा तहान भागवण्यासाठी म्हणून, किंवा सहज गम्मत म्हणून देखील थंड पेयाची बाटली विकत घेतो. अनेक वेळा थंड पेयाची उत्कृष्ट जाहिरात बघून देखील "एकदा चव घेऊया" असं म्हणून देखील विकत घेतली जातेच. हे प्रमाण तरुणांमधे जास्त असलं तरी सर्वत्रच बघायला मिळते. बहुतांशी त्यातलं चविष्ट पेय संपलं तरी ती बाटली राखून ठेवली जाते. ती छोटेखानी, रंगबिरंगी बाटली, अर्थात प्लॅस्टिकची पुन्हा वापरली जाते. कारण ती सोप्पी पडते सहज त्यात पाणी भरून न्यायला. ब्यागेत, पर्स मधे किंवा हातात धरून सहज आपल्यापुरतं पाणी नेता येत. तुम्ही पण अनेक ठिकाणी हे बघितलं असेलच. मला आज त्याच खरं कारण समजलं, उमगलं, म्हणून हा पंक्ती प्रपंच. 


ते पेय संपल्यावर त्यात पाणी भरलं जातं. पहिले काही दिवस त्या पाण्याला पण पेयाचा सुगंध येतोच. म्हणजे घोट घेतांना क्षणभर असंच वाटून जातं कि आपण ते उत्कृष्ट पेयचं पीत आहोत.  कित्ती भन्नाट ना? पितोय पाणी आणि वाटतंय गोड पेय, अहाहा. हा झाला एक अनुभव. त्या नंतर आपल्याला ती बाटली बघून मस्त वाटतं. दुसऱ्यांना पण बाटली बघून असं भासतं कि "काय मज्जा आहे त्याची, मस्त पेय पितोय" असं काहीसं. त्यामुळे मग ती बाटली अनेक दिवस, महिने, हारावे पर्यंत वापरली जाते. हरवली कि मग दुसरे पेय विकत घेऊन, पियुन मग तो सिलसिला सुरूच राहतो. अनेकदा मी ऐकलं आहे, जर अगदीच कोणाला पाणी प्यायची ईच्छा झाली आणि त्याने तुमच्याकडे पाणी मागितलं, तुम्ही हि अशी रंगीत बाटली दिली कि ते लगेच म्हणतातच, "मी पाणी मागितलं हे पेय नाही, पाणी नाही आहे का?" ई. मज्जा आहे कि नाही, कसं फसलं जातं बघा. 


अश्या सगळ्या फसव्या प्रकाराला सोडा आणि एक तुमची अशी पाण्याची बाटली चांगल्या कंपनीने तय्यार केलेली विकत घ्या आणि त्यातून पाणी प्या. हे असलं विकतचे दुखणे नकोच. खरं तर पेयांची बाटली ते संपलं कि व्यवस्थित फेकून द्यायची असते, रि-सायकल करायला दिली पाहिजे, पण नाही, नसता चिकटपणा.  फुशारकी वगैरे मारू नका कि मी कित्ती मस्त मस्त पेय पितो हे अजिबात दाखवायला जाऊ नका, आणि पेय जमली तर विकतची पिणं टाळाच. 

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४

2112: Backstage Warriors


These are the silent players, often invisible, yet the entire crew depends on them completely. Take theater as an example—the drama’s name and the stellar actors performing on stage are the ones who receive all the applause and accolades. However, the immense contributions of the backstage warriors often go unnoticed or overshadowed.

Reflecting on this, I realize how my own body functions as a perfect metaphor for backstage support. My brain directs, thinks, acts, reacts, and helps me recollect countless things, making it seem like I’m performing well. But the truth is, this performance is entirely dependent on my heart consistently pumping blood—both my actual heart and the "second heart," my calf muscles. Every organ, every cell in my body works tirelessly behind the scenes to make this happen.

For years, I’ve taken these internal "backstage warriors" for granted, assuming it’s simply their duty to function without fail. But if we pause to think deeply, it’s not a small feat—it’s an extraordinary collaboration. These unseen warriors, along with nature’s forces, are the true performers behind any success attributed to me.

Without these backstage heroes—be it my body’s systems or nature’s elements like air, gravity, oxygen, and carbon dioxide—there would be no "me," no achievements, and no recognition in my name.

So, let’s take a moment to be truly grateful. Show appreciation to all those who work tirelessly behind the scenes, ensuring our existence and success without ever asking for acknowledgment.

२११३: मदार / भिस्त


पडद्यामागे काम करणारे कित्तीतरी कलाकार हे सातत्याने मागेच राहतात. जर एखाद्या नाटकाचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्या कलाकृतीचं नाव होतं आणि त्यात काम केलेल्या नावाजलेल्या कलाकारांचं फक्त. पण बाकी गृहीत धरले जातात, कि त्यांचंच काम आहे आणि ते करत आहेत, करावंच लागेल, फारसं काय त्यात ई. अर्थात आताशा विचार आणि कृती बदलेली आढळते आहे, काही अंशी ज्यांच्यावरच आपली भिस्त असते त्यांना पण नाव मिळतंय पण क्वचितच. 


माझ्या मनातले फक्त सांगते, आताशा, इतक्यातच मला जास्त प्रकर्षाने जाणवतंय कि माझा मेंदू हा कित्ती म्हणजे कित्ती पद्धतीचे कार्य करतो. माझा तो दिशादर्शक आहे, विचार करतो, कृती करतो आणि करवून घेतो अनेक जणांकडून, हृदय, म्हणजे दोघेही, एक जे रक्तप्रवाह सातत्याने सुरु ठेवतं आणि पोटऱ्या त्याला प्रचंड साथ देतात उलट्या दिशेने प्रवाह सुरळीत राहायला आणि इतर सगळे अणू-रेणू अविरत कार्यरत असतातच, पण नाव मात्र आपलं होतं. मला पडलेला प्रश्न मी नक्की काय करते मग? सगळं तर हेच बघतात, मी मात्र नाममात्र. हे झालं माझ्या अंतर्बाह्य अवयवांबद्दल, पण तितक्याच ताकदीने हि भव्य दिव्य सुष्टी पण सगळं साधते, किंबहुना तीच सगळं करते, गुरुत्वाकर्षण द्वारे, प्राणवायू, वायू, आणि इतर सगळेच आत्यंतिक महत्वाचे घटक. निरपेक्ष सुरु असतं त्यांचं सतत कार्य, आणि नाव होत आपलं कि ह्या अमुक तमुक मुळे झालं ई. असो, हाच नियम जरी असला तरी त्या सर्व शक्तींचे, अणू रेणूंचे आभार माना मनःपूर्वक. ते आहेत, त्यांचं ते कामचं आहे असं गृहीत धरलं होत मी देखील, पण तसे नाही हे खूप प्रकर्षाने जाणवतं आहे मला सध्या आणि पटतंय देखील. ते अविरत, कित्येक वर्ष, न थांबता कार्यरत आहेत म्हणून मी आहे. ह्या शरीराला ओळख देण्यासाठी म्हणून फक्त एक नाव देण्यात आलं आहे. मग मी करते, हे सगळं माझं आहे आणि त्याचा दंभ मिरवणे बरोबर नाहीच. बघा एकदा विचार करून आणि मग नतमस्तक व्हा. सगळं तसंच सुरु राहील तुमच्याच, माझ्याच नावावर पण एका वेगळ्या ऊर्जेने, आनंदाने, प्रत्यर्पित होऊन, वेगळ्या पद्धतीने आणि जाणिवेने.      

 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...