मंगळवार, ३० मार्च, २०२१

हेअरबँड चा सदुपयोग...

"माझ्या सारखी भाग्यवान मीच" हे तर नक्कीच, आणि त्याची भरपूर कारणे आहेतच. त्यातलं एक देणार येथे मी आणि अर्थातच विणली ना छोटीशी गोष्ट / कथा देखील त्या भोवती, रादर ती विणली गेली, आपोआप. 

कशी? 

ऐका तर मग. 

जेव्हा मी नवीनकोरी आई झाले तेव्हा काही महिन्यांनी मी अंगात आल्या सारखी त्यांच्या म्हणजे माझ्या मुलांसाठी खरेदी करू लागले, माझी मीच, बरं का. लेकीसाठी अनेकविध रंगांचे  हेअरबँड आणले, काहीही गरज नसतांना. तिचं डोकं ते केवढं, केस ते कितीशे पण नाही, माझी हौस. पण नंतर समजलं कि ते  हेअरबँड का आणले होते मी नक्की. नीट निरीक्षण केल्यावर  असं लक्षात आलं / आढळलं कि माझा लेक फारच लकी आहे म्हणे, कारण त्याचे कान "श्री. गणपती" बाप्पांसारखे आहेत. सुपासारखे कान बाहेर आल्यासारखे वाटायचे मला  आणि सगळ्यांनाच. मग काय रियूझ केले  हेअरबँड. 

फा$$$र वाईट आई होते मी. तिचे  हेअरबँड त्याच्या कानाभोवती लावायचे मी. मला वाटायचं कि असं केल्याने त्याचे कान जागेवर येतील. अर्थात आलेच जागेवर,पण कश्यामुळे मला माहित नाही. पण बिच्चारा,खरंच, त्याला काहीही त्यातलं समजत नव्हतं, 

त्याच्याच वयाची मुलगी असल्यामुळे मी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. सौरी पिल्लू. 

काही वर्षांनी मला समजलं कि हि घरभर गोलगोल लोटांगण घालत होती, नंतर रांगत सगळ्या घरभर हिंडत असायची आणि हा अनेक तास फक्त का झोपून राहायचा, का? माझ्या  हेअरबँड ची चूक / दोष, अरेरे. 

Listen to this story on YouTube: https://youtu.be/Inckq7ER2oA

Also on Twitter and Facebook.


माझा अनोखा सोबती / मित्र

ह्या आधीही लिहिल्याप्रमाणे पुन्हा एकदा मला आज लिहावेसे वाटते आहे "त्याच्या" बद्दल. 

का? 

सांगते ना? 

अहो जरी हा माझा दोस्त झाला गेले अनेक वर्ष, पण त्या आधी मी संपूर्णतः अनभिज्ञ होते "त्याच्या" बद्दल, मला पुसटशीही कल्पना नव्हती. पण मग आलाच, पाहुणा म्हणून आधी, तेव्हा काहीही पर्याय नव्हताच पण अकॅसेप्ट करण्याशिवाय. मग काय दर महिन्याला न चुकता येऊ लागल्यामुळे दोस्ती करावीच लागली, हुषार व्हावचं लागलं मला आणि मग न कळत सवय कधी झाली हे हि समजलं नाही. 

हा, पण ह्या सगळ्या प्रवासात किंबहुना प्रवासाआधी त्याला माझ्या सारख्या अनेक मैत्रिणी होत्या. 

दर महिन्याची भेट इतपर्यंत ठीक होत (म्हणायला हो) 

पण बदमाश, 

आता जेव्हा पासून त्यालाच समजलं आहे कि तो मला सोडून जाणार आहे कायमचा, तेव्हा पासून दोनदा यायला लागलाय भेटायला. 

अरे काय, 

म्हणजे कायचं?  

मित्र येणार, न कळवता, ते हि मग तय्यारी, आवभगत, वेळ देणं ई. आलंच कि. 

देवा, आता बा$$$स. पुरे झालं, हुडक म्हणावं दुसरी आता. मित्र असला म्हणून काय झालं. 

अर्थात काहीही तक्रार तर नाहीच कारण करूच शकत नाही. त्यातही आनंदाने कसं राहावं हे नव्याने शिकते आहे मी. नवनवीन मार्ग शोधून काढते आहे. पेशंस इतका वाढलाय म्हणून सांगते, अहाहा, जबरदस्तच.  "आहे मनोहर तरी ...." कुठला.

रविवार, २८ मार्च, २०२१

Colours of life:

 All the elements of our life are full of variety of colors starting from all the three major aspects, Roti Kapada and Makan. The food is full of variety of colors and taste, cloths ofcourse of millions of shades of colors both traditional / international / English mix shades and what not, and I still recollect our tour guide especially mentioning about “no address” part of the world at or near St. Lucia. There the color of the house is your identity. For example for generations together Deshpande’s will have house with a special shade of purple color and so on. So while touring at St. Lucia it was such a wonderful treat to our eyes with new definition of house address. Superb, isn’t it?

In India it is said that every mile the food fashion / trend and concept changes, adding more colors to the existing need and ideas.

Nature is full of colors with range of green leaves, colourful flowers, fall-colors (its beyond wow for me), colourful birds / butterflies, sky color which wears different shades per season or (I must say) as per his mood.

Same water, but in sea itself if you observe carefully varied shades of blue are visible, river water showcases different shades as they are generally surrounded by trees, mountains etc.

Other aspects, elements add more colors to your existing journey which may include music, friends, hobbies, skills, relatives, passion and many others.

So lets enjoy this most colourful life and promise yourself to add colos to your own life as and when possible retaining variations. Have a wonderful, joyful and colourful year ahead dears. Happy Holi and Dhulivandan.

 

 

 

तंबू ...

मंडळी तंबू म्हटलं कि तुमच्या डोळ्यासमोर काय उभं राहत बरं सांगा? मला तरी अनेकविध प्रकार येतात डोळ्यासमोर. अमेरीकेत तंबू मधे जाऊन राहायची पद्धत आहे,उन्हाळ्यात. सहकुटुंब सहपरिवार मित्र मैत्रिणींसोबत जाऊन राहायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. तंबू स्वतःचे विकत घ्यायचे किंवा तेथे भाड्याने पण मिळतात. मग काय कॅम्प फायर, मस्त खाणं पिणं, आणि संपूर्ण व्यवस्था असते. आता येथे सुद्धा तंबूत राहायला जाऊ लागले आहेत लोक... असो. 


घरी लहान मुलांसाठी आणलेले रंगबिरंगी तंबू, आपल्या जवानांचे तात्पुरते उभे केलेले तंबू, आमच्या लहानपणी उहाळ्यात मोठ्या आकाराच्या छत्र्या जवळ जवळ ठेऊन त्यावर आईची जुनी साडी किंवा चादर घालून उभारलेले तंबू आणि बरेच काही.

अजून एक तंबू संदर्भात म्हण आठवते आहे मला "एक खांबी तंबू"...

बरं आज का अचानक हा विषय? सांगते सांगते..

माझ्या कडे काम करणाऱ्या मावशीनी दिलेलं हे नाव आहे माझ्या फ्रॉक लाईक ड्रेसेस ना. त्या नॉर्मल दिवसांमधे जेव्हा माझ्या कडे येत होत्या आणि कपड्यांच्या घड्या करायच्या तेव्हा म्हणायच्या "हा तंबू कशाला आणलाय? घडी करणं लई अवघड आहे...  ई". ३ सलग दिवसांच्या मस्त सुट्ट्या झाल्या नंतर आज पुढील आठवड्याच्या तय्यारी ला लागले. कपडे इस्त्री करतांना ह्या "तंबू" शब्दाची प्रकर्षाने आठवण झाली कारण आजकाल घेर इतका असतो, कळ्या असतात आणि लांबी सुद्धा फार असते कुर्त्यांना. तो एक तंबू इस्त्री करायचा म्हणजे त्यात साधे सरळ आकाराचे ३-४ ड्रेस सहज इस्त्री होतील. पण विविधता हवीच, नाही का. आणि फॅशन करणं पण आवश्यकच आहे ना. त्या मुळे सध्या माझ्या कडे साधारणतः ४-५ तंबू आहेतच, जे मी आलटून पालटून घालते. 

तर अशी हि माझी तंबू ची कहाणी साठा उत्तरी सफळ संपूर्ण.

वैयक्तिकरण / Personalization

 आज मी बदल म्हणून एका मैत्रिणीकडून पुरणपोळी ऑर्डर केली. मागच्याच आठवड्यात एका  मैत्रिणीचे तोंड गोड करण्यासाठी (प्रमोशन झालं म्हणून) मी भरपूर पुरणपोळ्या घरी केल्या होत्या त्यामुळे आज बाहेरून मागवल्या अर्थात घरीच केलेल्या. 

डन्झो केल्यामुळे आणि शिस्त म्हणून कदाचित त्या पाकिटावर माझे नाव लिहिले होते. माझ्या लेकीने वाढतांना बघितले कि आत सुद्धा एक रंगबिरंगी चिट्ठी होती त्यावर 

"सर्वांना होळीच्या गो शुभेच्छा..." असं लिहिलं होत सुवाच्य अक्षरात. 

सहीच नाही का? 

काय भन्नाट वाटलं म्हणून सांगते. जबरदस्त विचार आणि कृती सुद्धा. 

इतक्या सगळ्या व्यापात अशी छोटीशी कृती करण्यास वेळ काढणे म्हणजे काय बोलायचं. तशी काही गरज नव्हतीच पण अगदी अचानक चिट्ठी बघितल्यामुळे झालेला आनंद इथे ताबडतोब नमूद करावासा वाटला. 

हो हो अर्थातच मंडळी, तिला हि कळवलं न. 

आणि माझ्या मुलांना पण एक नवीन छोटीशी गोष्ट शिकायला मिळाली. 

वैयक्तिकरण / Personalization म्हणतात ह्याला.  

Hats off to Asmita's "Time Management" indeed.

रेस्टॉरंट ची अद्वितीय नावं....

 वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥

हा माझ्या सारख्या मराठी मुलीला फारच महत्वाचा श्लोक आहे, रोज न चुकता जेवणाआधी न कळत म्हटला जातोच, आपोआप हात जोडले जातातच. आणि जावेच, कारण अनेक शेतकरी, आणि बाकी सगळे जे सप्लाय-चेन-मॅनेजमेंट मधे असतात त्यांना धन्यवाद देणं आवश्यक आहेच. असो.

आज हा श्लोक आठवण्याचं कारण विचारताय मंडळी? हो हो सांगते, थांबा.

पुण्यात मला खालील नावांचे  उपहारगृह / रेस्टॉरंट आढळले म्हणून हा पंक्ती प्रपंच आणि ते असे:

  • वदनि कवळ
  • सहज हवन
  • पूर्णब्रह्म
  • उदरभरण
  • यज्ञकर्म ई.


आणि ह्या सगळ्या उपहारगृहत / रेस्टॉरंट मधे दोन्ही प्रकारचे भोजन मिळते असं त्यांच्या जाहिरातीत लिहिलं आहे (शाकाहारी आणि मांसाहारी). कारण दोन्ही प्रकारचे भोजन व्यवस्थित पचन होणं अतिशय महत्वाचं आहेच, नाही का?

कोठेही आणि कुठलंही भोजन करा, पण हात जोडा आणि हा श्लोक म्हणत धन्यवाद माना सगळ्यांचे म्हणजे झालं. "अन्नदाता सुखी भव...."


नैवेद्य...

मी अगदी काहीच दिवसांपूर्वी लिहिल्या प्रमाणे माझ्या आईकडे कोणताही पदार्थ केला कि तो देवासमोर ठेवला जायचाच, दररोज. आणि नैवेद्य हि संकल्पना च मुळी मला फारच भावते मनापासून, कदाचित अगदी न कळत्या वयापासूनच आईची शिस्त आणि कृती बघितल्यामुळे असेल कदाचित. असो. 

तर बहुतेक एक दिवसाआड किंवा दररोजच म्हणा ना माझ्या ऑफिस ला ज्याच्या मार्गात दोन प्रसिद्ध मिठाई वाल्यांचे दुकान आहेत. तशी बाकीचीपण छुटुकली-पिटुकली आहेतच, पण हि दोन खास आहेत. त्यांच्या कडे वैविध्य मिठायांचा साठा  / माल आलेला असतो जेव्हा आमची बस तेथूनच पास होते. माल उतरवणं चाललेलं असतं. मिठाईच्या दुकानात काचेच्या कपाटात जे ट्रे ठेवलेले असतात अल्युमिनियम चे ते च उतरवत असतात दुकानात काम करणारी मंडळी भराभर. त्या टेम्पो मधे एकावर एक शिस्तीत मांडलेले असतात ट्रे मिठायांनी भरलेले. ते एक एक किंवा एकावर एक जसे जमेल तसे गाडीतून एक जण देतो आणि दुसरा नेऊन ठेवतो. 

आपण जेव्हा मिठाई विकत घ्यायला प्रत्यक्ष जातो तेव्हा तो मिठाई बॉक्स मधे भरणारा, बिल करणारा ई. डेन्झो / स्वीगी करतो तेव्हा अजून एक जणाची भर पडते. इतके सगळे जण म्हणजे मिठाई तय्यार करणाऱ्या पासून, ट्रे हाताळणाऱ्या पर्यंत आणि बरेच ह्या सगळ्यांच्या नजरा नाही म्हटलं तरीही पडलेल्या असतातच. कोणाला कधी खावी / चाखावी वाटत असणार, कोणाला काही तर कोणाला आणखीनच काही.  हा विश्वासाचा भाग आहे बरं का मंडळी.  ह्या सगळ्यांचा इफेक्ट निघून जावा ह्या करताच मग प्रथम विकत आणलेली मिठाई देखील देवासमोर ठेवण्याची आणि हात जोडण्याची प्रथा आहे. तो काही सेवन करत नाहीच. पण आपलं त्याच्या समोर ठेवणं काम आहेच. अगदी महत्वाचं, माझ्या दृष्टीने. 

अनेक आधुनिक संत म्हणतात कि बाहेरचं खाऊ नये, पण सगळ्यांनाच प्रत्येक वेळी जमेलच घरी करणं असं नाही. त्यामुळे पहिल्यांदा "त्याला" समर्पित करा ज्याने दिले आहे  (डिश घरी केलेली किंवा विकत आणलेली) आणि मग शांतपणे सेवन करा.

शनिवार, २७ मार्च, २०२१

२३ वेळा देवाचं नाव

देवाचं नावं घेणं फारच फायद्याचं असतंच, अनेक कारणांमुळे. त्यामुळेच तर आधीच्या काळी मुलांची नावं पण देवांची ठेवायचे, म्हणजे रोज अनेक वेळा आपोआप त्याच नाव ओठी येत असे. शेवटी देवाचं नाव घेणं हे विश्वासावर अवलंबून असते. कोणी मोठ्या मोठ्याने नाव घेतात विविध प्रकारे म्हणजे स्तोत्र म्हणून, जप करून, पोथी वाचून, आरत्या म्हणून ई. काही जण मानसपूजा करण्यावर भर देतात. काही छोट्या तर काही फारच मोठ्या प्रमाणावर नाव घेतात यज्ञ / होम-हवन वगैरे करून. 

माझ्या पायांनी आणि अनेकदा त्यांच्या दुखण्यामुळे मला अनेक अप्रतिम क्षण अनुभवायला दिले आहेत अनेक वेळा आणि त्यातलाच एक मी इथे आज कथन करणार आहे. 

त्याच असं झालं कि माझे पाय दुखायला लागले होते, आणि अनायसे वेद पण उठला होता, त्यामुळे मी त्यालाच म्हटलं चहा करायला आणि तो हि आनंदाने तय्यार झालाच. मग काय स्वारी गेली स्वयंपाकघरात आणि सगळी प्रक्रिया साग्रसंगीत सुरु झाली. आणि हो, असं अनेक वेळा होतं, म्हणजे वेद नि चहा करणं, त्यामुळे मी आज न कळत लक्ष दिल तर समजलं त्याने चक्क २३ वेळा देवाचं नाव घेतलं ५ कप चहा करतांना. आणि अतिशय विविध पद्धतीने आणि वैविध्य स्वरात. आहे कि नाही खास. अगदी कप काढण्यापासून ते भांड शोधे पर्यंत, आलं किसणी शोधण्यापासून ते गाळल्यावर चोथा बीन मधे टाकेस्तोवर... आई ग. माझे पाय दुखणे तर पळून गेलेच, प्रचंड पोट दुखे पर्यंत हासले आणि आयता चहा हातात मिळाला तो परमानंद वेगळाच, नाही का मंडळी. आणि हो असा तसा चहा नाही हो, देवाचं नाव घेत घेत केलेला. जबरदस्त अनुभव होता. अहाहा.  

Few samples are here, of course in Ved's way, in English:

  • OHHHH MY GOD where are these cups
  • Deva why its so difficult
  • God why it happens always with me
  • Oh no God now I need to take out new milk packet
  • Oh finally god i am done


Things 2 do @home in summer:...

One of my friends on WA asked the entire group a question yesterday. As now the summer vacations and "no school" days started parents of small kids are looking for ways to engage their kids. And here I go with few options useful for all the parents. And my dears these options are all offline options. So enjoy going through the list and I hope you will like them for sure.

  •  1.      New puzzle games available online to order, having varied number of pieces to join to form a specific shape or picture etc., they are also available in 2-D / 3-D form
  • 2.      Various board games entire family can play together and have fun
  • 3.      Patience, awesome game in two variants by physical cards not online and the beauty of which is we can play all alone
  • 4.       Puzzles mentioned in 1. Join puzzle pieces together from back white side, without referring to or looking at  the picture, just by looking at shape and thinking etc. awesome fun
  • 5.      Cook without gas, like jam sandwich, Monaco biscuit+cheese+some other toppings, laddu made up of rotis, puffed rice chivda with raw oil, salt and pepper etc. its tasty and different, kids love it
  • 6.       Make a list of things in and around your house using a specific alphabet
  • 7.      Take “acknowledgement” for ex. As a word and ask kids to make various words using alphabets available in this long spread word, 2/ 3 / 4 / 5 letter words as per the age of child, for ex. Know, now, men, cow etc.
  • 8.      Read story books including Esapniti, Chandamama or others, not online, in physical form, available online to purchase or borrowing from library is another option
  • 9.      Ask kids to write few lines everyday in any language about their friends, teachers, picnic, bird, animal etc. again as per kids age
  • 10.   Use matchsticks to form various shapes and alphabets
  • 11.  Give your kid any shape and ask them which items / things inside or outside house is in that shape, for ex. Rectangle is the shape given to kids for today, TV, mobile, book, newspaper, door etc is in that shape. After few days, give some other shape. Ask them to either make a list of things matching that shape or draw / color etc
  • 12.  Watch old movies which were made for kids / having kids / kids centric or animal based etc in any language, it will be fun again, not cartoons for sure
  • 13.  Kids will enjoy activities like dusting, maintaining newspaper(s) neatly on central table, maintain their and other cupboards, arranging utensils say spoons, steel glasses etc. as per the age of kid again
  • 14.  Origami at small scale using old newspapers, making bags etc.
  • 15.  Reading articles from newspapers as per kid’s age again, reading together is the most memorable and enjoyable activity indeed, try it for sure
  • 16.  Drawing rangoli everyday for sure, which may contain alphabets, flower, leaf, etc. (My son used to draw his biology diagram as revision in the form of rangoli, so anything is fine)
  • 17.  Cut specific news articles, pictures, etc. and maintain them in one of the old copies from old news papers or books etc.
  • 18.  "Twist-A-Tale"
  • 19.  Kids should narrate a story to parents / grand parents
  • 20.  Draw or color pictures
  • 21.  Water plants if you have maintained few pots in your balcony
  • 22.  Ask them what they plan to do the next day, they will feel great
  • 23.  Play with balls of various sizes, maintain pace, its fun, look at various viral videos online to see how kids in Japan play using rhythm with colourful balls, enjoy and its a great group exercise for them
  • 24.  Jump rope, rope skipping
  • 25.  If possible and if you all like or may try few yogasanas for fun and exercise too
  • 26.  If not then just move around on tunes of music for zumba again for fun and exercise both
  • 27.  Introduce them variety of pulses from our great Indian Kitchen, they will love it, then if possible as per age ask them to note down / jot down / write about pulses etc.
  • 28.  Chant shlokas or aratis if you like, everyday in the evening hours
  • 29.  In presence of Mom Dad, grandparent involve kids in making lemonade / drink using raw mango, very useful during summer  
  • 30.  In presence of Mom Dad, grandparent involve kids in painting a part of wall or back side of door
  • 31.   House of cards
  • 32.   Making castle using paper cups
  • 33.  Plant Cilantro or Fenugreek using seeds, and ask kids to take care, observe the growth of plants with tiny leaves, it will be fun exercise for many days
  • 34.  Involve kids in cleaning green leafy vegetables
  • 35.  Without fail narrate the importance of keeping little quantity of drinking water for Sparrows
  • 36.  Use plastic bangles if they are available to make various shapes etc
  • 37.  Introduce kids to various occupations around, starting with watchmen, maid, teacher, nurse, etc.
  • 38.  Involve them every day twice at least during lunch and dinner for arranging table before and then cleaning too, as per their age of course

उन्हाळ्यातील काही उपक्रम...

अनेकदा आपण पालक म्हणतो कि "मुलांची शाळा असलेलीच बरी... एक रुटीन राहतं...". ते अगदी खरं आहे जेव्हा पर्यंत आपली मुलं थोडीशी लहान आणि आपल्यावर अवलंबून असतात. थोडी शिंग फुटली कि त्यांच्या मनात ते नक्की म्हणत असतील " आई बाबांचं ऑफिस असलेलच बरं.... एक रुटीन राहतं शांतता असते ई. ...". तर आता ह्या छोट्या दोस्तांना कसं बिझी ठेवायचं हा यक्ष प्रश्न आहे. तर येथे काही मी थोडेसे ऑपशन्स देत आहे, बहुतेक उपयोगी पडतीलच अशी आशा करते.

  1. विविध तुकड्यांचे पझल आहेत ऑनलाईन, बराच वेळ जातो आणि अनेक विकत घेतले तर वेळ छान जातो, २डी  / ३डी ह्या फॉर्म मधे पण येतात हे गेम
  2. बोर्ड गेम्स, ते हि अनेक आहेत, सगळं कुटुंब खेळू शकतं
  3. पेशेन्स पत्त्याचा गेम जो अनेक प्रकारे एकट्याने खेळता येतो (मोबाइल वर नाही) फिसिकल पत्ते घेऊन
  4. विविध तुकड्यांचे पझल रंगीत बाजूने नाही, उलट्या बाजूने जोडण्याचा प्रयन्त करायचा, अतिशय मज्जा येते, वेगळीच मज्जा आहे ह्यात
  5. गॅस न  वापरता पदार्थ करणे, जसे कि जॅम सॅण्डविच, मोनॅको बिस्कीट आणि त्यावर अनेकविध टॉपिंग्स, पोळीचा लाडू, मुरमुरे कच्चा तेल चिवडा...
  6. एखादा मराठी / इंग्लिश अल्फाबेट वरून घरातील, घराबाहेरील दिसणाऱ्या वस्तूंची नाव लिहिणे
  7. एखादा मोठा इंग्लिश शब्द देऊन त्यातले अक्षरच वापरून अनेक छोटे शब्द तय्यार करणे
  8. इसापनीती / चांदोबा / चंपक सारखे पुस्तक वाचणे, लायब्ररी लावून, ऑनलाईन नाही
  9. रोज काही ओळी लिहिणे, कुठल्याही भाषेत,आपल्या मित्र मैत्रिणी बद्दल, प्राण्यांबद्दल, झाडा बद्दल, आणि अनेक विषय देऊ शकतो वयानुसार
  10. काडेपेटीच्या काड्यांपासून विविध आकार / अक्षर तय्यार करणे
  11. एखादा आकार द्यायचा त्यांना आणि घरात / शाळेत किंवा अजून कुठे त्या आकाराच्या वस्तू लिहायच्या / चित्र काढायची
  12. जुने लहानमुले असलेले / प्राण्यांवर आधारित चित्रपट एकत्र बघणे जमल्यास आपल्या मातृभाषेत
  13. घरातील छोटी छोटी काम करणे रोज जसे कि धूळ पुसणे, पेपर नीट घडी करणे, कपाट आवरणे, भांडी लावणे पेले / चमचे ई.
  14. जुने पेपर वापरून विविध घड्या करून आकार करणे, पिशवी करणे ई.
  15. त्यांच्या वयाप्रमाणे पेपर वाचणे /थोड्या बातम्या
  16. रांगोळी काढणे रोज, अगदी अक्षर, फुल, पान ई काहीही
  17. कात्रण जमा करणे पेपर मधून, जुन्या पुस्तकातून
  18. "Twist-A-Tale" / जुनी गोष्ट नवीन स्वरूपात मांडणे
  19. मुलांनी पालकांना गोष्ट सांगायची / अनुभव सांगायचा
  20. चित्र काढणे, रंगवणे
  21. झाडांना पाणी घालणे रोज, न चुकता, जर घरी कुंड्या असतील तर
  22. एखादा दिवस त्यांनाच आधीच सांगायचं ठरवायला कि ते काय करतील त्या दिवशी
  23. चेंडू टप्पा टप्पा खेळणे घरच्या घरी, विविध आकाराचे चेंडू घेऊन
  24. दोरीवरच्या उड्या
  25. थोड्या प्रमाणात जमल्यास काही योगाचे आसनं त्यांच्या बरोबर करणे, एकत्र, व्यायाम म्हणून
  26. कधी झुंबा / डान्स घरीच एकत्र
  27. विविध डाळी ची ओळख करून देणे, थोडा वेळ मजेत जातो
  28. आवड असेल तर श्लोक आरत्या म्हणणे रोज, दिवसानुसार 
  29. आई बाबा किंवा आजी आजोबांच्या उपस्थितीत लिंबू पाणी / कच्च्या आंब्याचं पन्ह करणे 
  30. आई बाबा किंवा आजी आजोबांच्या उपस्थितीत छोट्याश्या भिंतीला / दाराला रंगवणे  
  31. पत्त्यांचा बंगला 
  32. पेपर कप चा बंगला 
  33. कोथिंबीर / मेथी भाजी लावणे आणि त्याची काळजी घेणे 
  34. रोज न चुकता चिमण्यां साठी पाणी ठेवणे गच्चीत 
  35. बांगड्या असतील घरी तर त्यांचा वापर करून विविध आकार तय्यार करणे 
  36. विविध व्यवसायांबद्दल माहिती देणे, त्यांना विचारणे त्यांना काय वाटत अगदी सोसाटीतल्या चौकीदारापासून, काम करणाऱ्या मावशी, शिक्षक ई. अनेक 
  37. रोज प्रत्येक जेवणाच्या वेळेला टेबल वर वस्तु घेण्यास आणि आवरून ठेवण्यास मदत करणे



शुक्रवार, २६ मार्च, २०२१

नव्याचे नऊ दिवस

माझी एक बहीण आणि सहपाठी ह्यांचं जेव्हा नवीन लग्न झालं तेव्हा माझ्या लक्षात आलेली एक गोष्ट इथे देत / मांडत आहे. 

माझ्या बहिणीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी साधारणतः १०-१२ दिवस आधी मावशी कडे जाऊन पोचले होते, सहज, मदत किंवा असावं कोणीतरी घरी म्हणून. त्यावेळी मला बघितलेलं आठवतंय, माझी बहीण जेव्हा तिची बॅग पॅक करत होती, लग्नाच्या काही दिवस आधी त्यावेळी काही साधे, काही महागडे ड्रेसेस, आणि बरेच तिचे कपडे घेऊन जात होती. सहज विचारलं तर म्हणाली, "नवीन घरी गेल्या गेल्या नवीन ठिकाणी टेलर शोधणं, कपडे विकत घेणं वगैरे होणार नाही, आणि आईकडे पण पट्टाकिनी परत येणं होणार नाही त्यामुळे आईनेच हा स्टॉक घेऊन दिला आहे, सोय म्हणून"

माझी एक सहपाठी कोरेकरकारीत वैविध्य ड्रेस अचानक घालून यायला लागली, तेव्हा समजलं कि तिचं नुकतच लग्न झालंय म्हणे. मग मी तिचं अभिनंदन करायला गेले आणि सहज विचारलं त्या नवीन ड्रेसेस बद्दल, तर योगायोगाने ती तेच म्हणाली आईने मागे लागून शिवून घेतले आणि पाठवले.

इथे जी मी माझी बहिण म्हटलं ना तिच्या मुलीचं लग्न आहे पुढील वर्षी, इतकी जुनी गोष्ट आहे हि आणि सहपाठीच लग्न झालाय आत्ता, महिन्यापूर्वी. 

ह्या दोन्ही प्रसंगाचं माझ्या मनात न कळत जे मॅपिंग झालं, त्यामुळे मला दोन प्रश्न पडलेत, 

1. मुलीच्या आईनेच फक्त हा विचार करायचा असतो का? 

अजुनही? 

इतक्या वर्षांनी देखील? 

का ज्या घरात ती राहायला जाणार असते त्यांनी देखील अजून जास्त विचार करायला हवा? 

मी फक्त येथे कपड्याबद्दल बोलत नाही आहे, सर्वच वस्तूंबद्दल म्हणते आहे. 

अर्थात आजकाल मुली आणि सासवा दोघीही बदललेल्या दिसताहेत, हे चांगलं चिन्ह आहे. 

2. आणि दुसरा प्रश्न म्हणजे माझी मनापासून हि इच्छा आणि प्रार्थना आहे कि हे सगळे नवीन ड्रेसेस, चपला, मोबाइल, पर्स आणि बरेच सगळे फक्त "नव्याची नवलाई नऊ दिवस" न राहता टिकून राहावी, त्या नवीन मुलीला सगळ्यांचेच उत्साहाने साह्य मिळावे म्हणजे मिळवलं. 

अनोखी बाहुली...

मी लहान होते तेव्हा पासून जेव्हा जेव्हा बाबा दौऱ्यावर जायचे तेव्हा तेव्हा ते माझ्या साठी काही तरी आणायचेच. ते छोटं का मोठं, किती किमतीचं ... हे महत्वाचं नव्हतंच कधी, पण तो डबल परमानंद असायचा, एक बाबा दौऱ्याहून परत आल्याचा आणि दुसरं म्हणजे ते छोटीखानी गिफ्ट. अहाहा.

माझे मोठे डोळे अजून मोठे करून, एक बोट नाचवत मी एकदा बाबांना सांगितलेलं आठवतंय मला, कि "ह्या वेळी गावी / परगावी / दौऱ्यावर गेलात कि माझ्या साठी एक बाहुली आणा". ते ताबडतोब हो देखील म्हणाले, कारण ते फा$$$र सोप्प होत.

का म्हणताय?

अहो एक छोटीशी बाहुली आणणं आणि मीच स्वतः हुन सांगितल्यामुळे त्यांना विचार नाही करावा लागणार काय न्यावं ते.

पण मी इतकी सोप्पी बाहुली आणायला सांगितली नव्हतीच, मी एकदम स्पष्ट सांगितलं होत कि "मला डोळे उघडझाप करणारीच बाहुली पाहिजे आहे, तिला उभं केलं कि डोळे उघडे करणारी आणि आडवं केलं कि बंद करणारी अशीच". "बापरे", असंच काहीस म्हटलं असेल त्यांनी मनात, पण "आणतो" एवढंच म्हणाले. बास, मला तेवढं पुरे होत. आणि काय सांगू पुढल्या दौऱ्याहून येतायेता आणली कि तश्शीच बाहुली मला.

आई ग, कित्ती शोधावी लागली असेल, आणि कदाचित फार महाग पण....

ती अजूनही माझ्या घरी मी ठेवली आहे, अर्थात माझ्या आई बाबा आणि दादांनी ती सांभाळून ठेवली होती, आणि आता मला दिली आहे. तिला बघून रोज म्हणजे रोज बाबांची तर आठवण येतेच, पण मी फार त्रास देणारी होते ह्याच हि फार वाईट वाटत.

"आरोग्य हीच खरी संपत्ती आहे" / "Health is Wealth" / "आरोग्यम् धनसंपदा"

उन्हाळ्यात उसाच्या रसाची मज्जा काही औरच. भन्नाट चव, पौस्टिक, नैसर्गिक गोड आणि माझ्या दृष्टीने निसर्गाची भलतीच कमाल. हो, अर्थात मैन्यूअली जे उसाचा रस काढतात त्यांचे कष्ट बघवत नाहीत एस्पेसिअली जेव्हा शेवटच्या उरलेल्या चोथ्याला यंत्रात घातलं जात.

आई ग.

तर आजकाल अनेक ठिकाणाहून घुंगरांचा आवाज येतो आणि त्या बंडी / दुकांनाभोवती प्रचंड गर्दी देखील असते. आणि सगळे शिक्षित मुलं / मुली बिनधास्त कान असलेल्या जाडजूड काचेच्या मोठ्या पेल्यातून रस्त्यावर उभे असतात रस पीत. अश्या ह्या भयानक परिस्थितीत, ते हि पुण्यात,कसचं का$$$$ही वाटत नाही.

बरं प्यायचाच आहे ना उसाचा रस, मग एक तर तो रस वाला पॅक करूनही देतो, किंवा आपलं टपर-वियर, हा-वियर, तो-वियर ई. अनेक विविध रंगांचे उत्कृष्ट झाकण असलेले पेले मिळतात, घ्यावे विकत आणि वापरावे आपआपले, नाही तर पेपर-पेले पण मिळतातच कि, बहुतेक सगळ्याच रस वाल्यांकडे असतातच. जेव्हा आणि जशी जमेल तशी काळजी नको का घ्यायला स्वतःची?

आमच्याच ओळखीची एक जण आहे तिने प्री-पॅक उसाचा रस उपलब्ध केला आहे.

नाही तर ताक आहे, लस्सी आहे (विविध चवींची) आणि बरीच पेये.

होप, तो रस वाला छान गरम पाण्यात स्वच्छ धुत असेल बावा ते ग्लासेस.

मी काही डॉक्टर नाही, त्यामुळे अनेक लोकांनी वापरलेला उष्टा पेला वापरल्याने काय होत का नाही हे मला माहित नाही, पण हे माझ्या दृष्टीने योग्य नाहीच. शेवटी एवढंच म्हणेन "आरोग्य हीच खरी संपत्ती आहे",तिला सांभाळा, हात जोडून विनंती आहे.




गुरुवार, २५ मार्च, २०२१

"शेतच कुंपण खातंय"

मला न उन्हाळा आला रे कि भरगोस नवीनतम अगदी आवडीच्या कामांची फार म्हणजे फार आठवण येतेच.  आई बाबा पण काय लई भारी होते ना कि मस्त वयाप्रमाणे काम दिले जायचे. ती विविधताच मला भावात असे. 

लहान असतांना अनेक प्रकारचे पापड (लाटलेले, पळी आणि अनेक असे) आई अगदी विचारपूर्वक करायची म्हणजे ते अक्ख्या वर्षभर पुरायचे. आणि माझं सगळ्यात महत्वाचं काम होत लहान शेंडेफळ असल्यामुळे कि अगदी सकाळी उन्ह होण्याआधी घातलेल्या पापडांकडे लक्ष देणे, चिमण्या, कावळ्यांपासून वाचवणे आणि त्या नंतरचा फ़ेज म्हणजे माझ्या लहान हातांनी हळूच आईच्या बरोबरीने किंवा तिने सांगितले म्हणून अगदी आज्ञा धारक पद्धतीने ते एक एक पापड उलट करणे. 

तेव्हा एक बाजू / वरची बाजू कोरडी / ड्राय झालेली असायची आणि पोटात ओलं. ते मला जे आठवतंय त्या प्रमाणे ४ पापड उलटे-सुलटे करण्या मागे एखाद-दोन माझ्या पोटात जात असे थेट. 

"शेतच कुंपण खातंय". 

पण तरीही कधीही पोट दुखलं नाही, आणि पापड कधीच कमी पडले नाहीत, आई कदाचित हे सगळं आधीच लक्षात घेऊन च पीठ तय्यार करत असे. ज्वारीचे, तांदळाचे,पोह्याचे आणि साबुदाण्याचे, एवढे पापड मला आठवतात पण त्यात सगळ्यात प्रचंड आवडीचे म्हणजे साबुदाणा आणि ज्वारी. 

अहाहा,  ह्या जगावेगळी चव असायची त्या अर्धवट वाळलेल्या पापडाची कि माझ्या कडे अजिबातच शब्दच नाही आहेत त्याचं वर्णन करण्याकरता, भन्नाट पेक्षा भन्नाट.

बुधवार, २४ मार्च, २०२१

एक भलताच आगळावेगळा अवलिया...

 काही दिवसापूर्वी मला एका अवलियाची नवीन ओळख झाली. माझी आणि त्याची तोंड ओळख होतीच आधीची पण ती फारच साध्या लेव्हल ची होती. परवाच सहज विषय निघाला म्हणून त्याच्या बद्दल एक अनोखी गोष्ट समजली ती अशी.


त्याला म्हणे पाणी पुरी खायला फारच आवडते, साग्रसंगीत, व्यवस्थित सगळं माल-मसाला पाहिजेच ई. म्हटलं त्यात काय नवल आहे. बहुतांशी सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे पाणी पुरी.

त्याने आत्ता पर्यंत म्हणे अनेकविध प्रकारच्या पाणीपुरी खाल्ल्या आहेत. म्हटलं ते हि काही विशेष नाहीच कारण मला खालील प्रकारचे पाणी माहित आहे, अनेकदा चव पण घेतली आहे, चिंचेचं / आंबट पाणी फक्त, आंबट+गोड गूळ घालून, खजूर घालून, हिंग घालून, पुदिना घालून, जीरा घालून केलेलं, कैरी, राजस्थान मधे आलं घालतात म्हणे, काळे द्राक्ष घालून केलेलं पाणी, सोल कढी सारखं म्हणजे आमसूलचा वापर, तिखट मिरची+पुदिना+लसूण+कोथिंबीर ई.

तो म्हणे सगळ्यांना / ज्यांना सहज शक्य आहे त्यांना पाणीपुरीचं पाणी गावाहून देखील आणायला सांगतो, जर त्याने तेथे एखादी खास जागेत पाणीपुरी एन्जॉय कधीतरी केली असेल तरी. हं मंडळी, ह्यामुळे तो अवलिया होत नाही बरं का.

ऐका.

हा अक्षरशः दररोज पोटभर यथेश्च पाणीपुरी खातोच..

त्याची बायको दोन-तीन दिवस पुरेल इतकं पाणी करून ठेवते शीतगृहात / आपल्या फ्रीज मधे हो, आणि दररोज स्वयंपाकाच्या मावशींना न चुकता चणे / पांढरे वाटाणे आणि बटाटा लावावाच लागतो कुकर मधे.

बाप रे बाप. अरे का हे, इतकं प्रेम कधीही पाहिलं नव्हतं बावा मी पाणीपुरी बद्दल.

देवा.

पण एक चांगलं झालं, आता जर अवेळी पाणी पुरी खायची इच्छा झालीच तर घरगुती ठेला माहित होऊन गेला मला हक्कानी जाण्यासाठी.

अहाहा च. भन्नाट.

आता नव्याने भेटायला पाहिजे ह्या अनोख्या अवलियाला. त्याची बायको पण फार खुश आहे. कारण ती म्हणते दररोज संध्याकाळी ऑफिस मधून गेल्यावर "अहो" साठी काय करायचं? हा मला प्रश्न पडत नाही.

त्यावर मग मी प्रतिप्रश्न केला, "पाणी किंवा अजून काही साहित्य संपल असेल त्या दिवशी तर?" उत्तर "मग आम्ही बाहेर जाऊन तो पाणीपुरी खातो मी काहीतरी वेगळं ट्राय करते, बास".

मज्जा च आहे....

कधी म्हणजे कधीच मी असला अवलिया बघितला आणि ऐकला नव्हता.

दररोज नाही पण वारंवार / नियमितपणे / पुन्हा पुन्हा पाणीपुरी खायला आणि त्याहून घरची मलाही आवडेल. पण रोज खायचीच न चुकता ह्या दोन्ही गोष्टीमधे फार अंतर आहे.

मंगळवार, २३ मार्च, २०२१

“Walk the Talk”

To my surprise I came across many personalities who love to crib, complain always and hence obviously remain totally unhappy. But the same people don’t like if someone else cribs in front of them. They constantly keep advising “not to crib / complain, be happy always” etc. I was taken a back after observing these two extremes in the same personality. They are counted under “double dholki” types.

Another example to quote is one of the teachers from my kids’ school always used the word “no” very very frequently during her conversations / communications with students in the class. For ex. If the students asks “may I come in mam?”, the answer is “no”, “Can I show you my copy mam?”, the answer is “no” and for everything there are multiple no’s in her communication. And she used to insist all the students not to use “no”. Again I was taken a back. I was really wondering what’s going on with such people.

Then I understood the crux and only according to me, as this first category of personalities now understood that cribbing, complaining etc. creates bad relationships and imbibes the habit of constantly looking for or try to retrieve only “not so good” points from everyone around. They must have paid huge amounts for their behavior and hence they now promote and request others not to crib and be happy with what you have, based on their experience or sufferings etc. And also, they must be trying to change too, you never know.

Same is the case with the teacher, she is using “no” so frequently and due to her habit, she might have left behind in her life. Hence, she is focusing on upcoming gen to avoid using “no”. She must be practicing the exercise of transforming “active-passive voice”, but its not yet visible to the external world. But simultaneously sharing her suffering is essential. Might be their way they give suggestions and behaviors are contradictory in nature but then I guess all people around them need to accept such personalities and go ahead instead of following the proverb / idiom “penny wise pound foolish” “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले”,  “walk the talk”. 

Keep learning and observe only good points from everyone, everything around, irrespective of gender, age, profession etc. to build our unique personality.

भेट...

माझ्या लहानपणी शेंडेफळ असल्यामुळे आई बाबांबरोबर सगळीकडे जायला मिळायचं आणि मी फार एन्जॉय करायचे त्यांच्या बरोबर सगळीकडे जाणं / भटकणं अगदी बँके पासून ते खरेदी पर्यंत. 

त्या काळी लग्न, समारंभ, आणि बाकी कुठलेही ऑकेजन असलं तरीही स्टील ची भांडी भेट म्हणून दिली जात होती. पण त्याची एक खासियत होती. भांडी किंवा पातेलं किंवा एखादा सेट ई. वर नाव टाकून मग ती भेट दिली जात होती. अर्थात तो काळ फारच वेगळा आणि साधा होता. पण ते छोटसं मशीन सुरु करून सांगितलेलं नाव त्या भांड्यावर अक्षरशः कोरलं जायचं, बहुतेक नेहेमी करता, मिटवता येणं अवघड आणि इतक्या प्रेमाने दिल म्हटल्यावर वापरणं आवश्यक आहेच ना. 

ते नाव कोरण्याची प्रोसेस मला लई भारी वाटायची राव. काय सांगू. 

  • स्थिर हात, 
  • उत्कृष्ट हस्ताक्षर आणि 
  • मराठी / भाषा येणं, प्
  • रत्येक भांड्याचा आकाराप्रमाणे आणि दिलेल्या मजकुराप्रमाणे अक्षर छोटं-मोठं करणं  ई. 

माझ्या दृष्टीने अती आवश्यकच होत, एक कलाच जणू, ज्यात कुठलीही चूक होणे नाहीच, एकदाच चान्स मिळणार, बा$$$स.. 

आता आहे का नाही असलं नाव टाकणं स्टील / पितळ / अल्युमिनियम वर कुणास ठाऊक पण हे लिहितांना सुद्धा मला सगळं माझ्या समोर होत आहे, तो कर्रर्रर्र आवाज, सगळं म्हणजे सगळं उभं ठाकलंय डोळ्यासमोर. 

"भांड्यांवर नाव टाकण्याची प्रोसेस म्हणजे" मला मिळालेली अनोखी भेटच जणू.

शनिवार, २० मार्च, २०२१

ब्रेड चा चिवडा / उसळ...

माझ्या आईकडे हा एक फार आवडीचा न्याहारीचा पदार्थ होता. कारणं अनेक आहेत, एक म्हणजे फारच कमी वेळा ब्रेड घरी येत असे, त्या मुळे हा नेहमीचा पदार्थ नव्हता आणि विविध भाज्या घालून केलेला रंगीबेरंगी, पट्टाकिनी होणारा असा, चटपटीत देखील, आणि पोटभरीचा. बाप रे, वर्णन करू तेवढं थोडच आहे ह्या पदार्थाचं. 

हो आज सकाळी माझ्या कडे हेच होत आणि करता करता मला एक किस्सा आठवला, म्हटलं चला लिहुयात, पट्टाकिनी. 

माझा एक मामे भाऊ होता. त्यांचं कुटुंब अकोल्याजवळ एका छोट्या ठिकाणी राहत असे, कारण तो तेथील बँकेत पदाधिकारी होता. त्याला तीन मुलं. त्याच्या सर्वात लहान मुलाला काहीतरी उपचार करण्याकरता त्यांना मोठ्या शहरात यावं लागत असे. आम्ही नागपुरात राहत असल्यामुळे मग ते नागपूरला येणं प्रिफर करायचे. पाच-सहा महिन्यातून एकदा यावं लागत असे, ज्या प्रमाणे डॉक्टर सांगतील तसे.  मग काय त्यांना आमच्याकडे येणं म्हणजे उपचार+सहल होती. मोठी सुमो नावाची गाडी भाड्याने घेऊन निघायचे आणि आई बाबा तिघे मुलं ड्राइवर आणि बाकी बँकेतील गाडीत मावतील / जागा असेल तेवढी अजून काही मित्रमंडळी. माझ्या त्या भावाला हा ब्रेडचा चिवडा आणि त्यातल्या त्यात माझ्याच हातचा फा$$$$$रच आवडायचा. इतका कि तो एकदा बशीत / मोठ्या वाटीत / डिश / बोल ... मधे  दिलेला संपला कि चमच्याने वाटी वाजवायला सुरु करायचा. आणि जोवर मी त्याला पुन्हा दुसरा राऊंड वाढत नाही तोवर वाजवतच राहायचा. साधा चिवडा तो, पण काय त्याला आवडायचा म्हणून सांगते. खाता खाता इतक्यांदा म्हणायचं "कित्ती झका$$$स करतेस ग तू".  

आज देखील टचकींनी पाणीच आलं डोळ्यात ह्या सगळ्या प्रसंगाची आठवण होऊन.  

न मागता मिळाली दाद किती वर्ष लक्षात राहते नाही. सहीच.

Insult....

 I am narrating my observations since my childhood days, entirely spent in Maharashtra. And Pangat is a enjoyable and respected culture in Maharashtra in those years. "Pangat means sit down on ground or on chair+table for eating food and people will serve you". "Buffet" fashion / practice / culture came later, many years later. From my point of view Pangat and Buffet is totally opposite to each other especially when Pangat is at home for a special event or festival. In general elders always used to suggest kids and all "not to talk" while eating food, and its so true even from science perspective. Another reason again from science perspective is to concentrate while eating food, eat food when its hot, so that it will be digested easily and other hungry people who are waiting will get place to occupy in the next round of Pangat. With so many reasons, I still recollect we used to enjoy food in Pangat due to the variety, and exactly due to so many items in the plate we used to concentrate and eat, which is definitely giving respect to the food. As to live this life, one of the important items is food, other than many others, it is also said that if we get fresh and healthy food two times a day indicates we are really lucky.


Now in this so called modern world, with the invent of technology, at canteen, at home or in restaurants too, many a times I have observed that people make "Best Use" of two given hands, by one hand / thumb they surf the net and with other they eat food, "what is going in?", God knows.

A very simple question "Why?".

And this is not enough my dear friends, sometimes or many a times background music or TV is also going on at the same time.

According to me its a huge insult of food which we are getting in front of us.

So a humble request to all the readers, kindly keep your phones / any gadgets aside for 15-20 minutes and enjoy / cherish the food, look at the variety of colors we fortunately have in our plate, with a range of tastes too. Say thanks to the giant efforts of farmers for providing us the food in ample quantity.

AnnaParabrahma: The Maharashtriya Pangat
Indian Traditional Eating Pangat Outdoor Eat Editorial Photography - Image  of traditional, outdoor: 169618932

Desi solution to downloading attendance of small gathering

Its easy to download the attendance when the class or meeting is going on and before the meeting ends, on these many online platforms, we are using these days. 

Wanted to send attendance of one of our past departmental meeting conducted on Teams, which I never tried it before, and I was asking Google-Baba about it, but somehow there was no success / no answer available. Tried all possible options and links available on Teams, but all efforts in vain. Then forwarded the recording to the concerned person and requested to manually check how many attendees were there in previous meetings. 

Finally, I saw a magical number in colorful circle next to the meetings recording on Teams, immediately just took my cursor on that number and boom, I got the list of attendees, wow, I immediately went on Cloud-9. Desi way solved it temporarily. Took screenshot immediately showing names of all attendees and forwarded to concerned person. But still looking for technical solution. Will get it resolved soon.

Watchman for sometime

I am able to recollect one of the Akbar-Birbal's story where king becomes begger to understand his life etc.

Ofcourse it was not the same, but today at my office bus stop I have requested one watchman for his chair and he gave it immediately. All those who were entering and exiting were amazed to see a watman in different attire today, as after giving away his chair he left and was roaming around here and there I guess.  I am sure I made their (people who were entering and exiting) day already with my tiny presence on that chair. 

As my legs were talking and complaining, it was necessary for me to sit down while waiting for my bus to arrive and there was no other option but to enjoy watchman-ship for a while.

It was fun and a good change for me really.

Truly blessed…

I always heard people saying that “the life has become monotonous”, “same place is now boring” etc. while thinking of leaving the job, of course at every organization irrespective of the domains there are meeting / conference rooms, just to have a change from regular working place to meet and discuss together. 

People prefer to go and eat their own dabba at canteen so that they will have some walk and different visual. 

Thanks to the current situation and online teaching for me, and of course due to ease called laptop, everything remains portable. Because of all these reasons and as my legs sometimes starts complaining still, I get to occupy various places at office, as the objective is to continue teaching and other work. I have never ever thought that I can work from a different place than my own cabin / allotted work-space, but now it’s a reality and everyone at the office are helping me out with it. 

Of course, I just need charging point and a chair, that’s it. I was truly unaware of such working conditions may occur with me, but now I am living with it and its actually a lot of fun, I get to meet many people and feel charged up. I am truly blessed to have wonderful support from my organization starting from head to colleagues, God bless them all.

 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...