रविवार, ३० मे, २०२१

भांडी खडखडाट....


जेव्हा पासून भारतात / पुण्यात मोबाइल नावाचा अवयव आलाय तेव्हा पासून मी एक गोष्ट अनुभवली आहे. नेहेमीच हे होत नाही, पण बरेचदा होत, म्हणजे माझ्या सोबत तर इतक्यांदा झालाय कि त्यातून मला आता काही तरी शिकायला पाहिजे.

माझी एक सवय आहे, माझ्याकडे केवळ कोणाचा फोन नंबर आहे म्हणजे मी त्यांना कधीही फोन करत नाही, आधी विचारते, कारण कधी कोणी गाडी चालवत असत, कोणी मीटिंग मध्ये असतात तर कोणी अजून काही महत्वच्या कामात. त्यामुळे जेव्हा मला कळत कि समोरचा व्यक्ती थोडा मोकळा आहे, बोलू शकतो, तरच मी फोन करते. पण तरीही बरेचदा मी जेव्हा जेव्हा फोन करते तेव्हा तेव्हा काही जण इतका आवाज करतात मागे, एक तर दूरसंचार चालू असतो, भांड्यांचा तर इतका खडखडाट ऐकू येतो कि असं वाटत का केला मी फोन जेव्हा कि समोरची व्यक्ती फारच कामात आहे. बरं मी काही रोज रोज फोन करते असही नाही. काय हरकत आहे जर शांत पणे बोललं तर, प्रत्येक वेळा multitasking केलच पाहिजे का?

माझ्या फोन मध्ये असं काही सेटिंग पाहिजे कि ज्यामुळे मला फक्त त्या व्यक्तीचाच आवाज ऐकू येईल, बॅकग्राऊंड चा नाही. शोधते शोधते...

Wrote this on FB Timeline on 22nd July 2019. And from past few days / months a specialized  headsets are available in the market which truncate surround sounds, they are really costly but useful. 

"घर पहावे बांधून, लग्न पहावे करून"

 "घर पहावे बांधून, लग्न पहावे करून"

अशी एक म्हण होती मराठी मध्ये पण आज पासून त्याची सुधारित आवृत्ती देत आहे, ती अशी

"
घर पहावे बांधून, लग्न पहावे करून, संशोधन पाहावे करून "

संशोधन लेखन (research paper writing) करायचे म्हणजे फक्त नाविन्यपूर्ण विचार मनात येऊन चालत नाही. त्यावर पुन्हा पुन्हा विचार विनिमय करावा लागतो, विविध टप्प्यात कृती करावी लागते, त्यांत अतिशय खिळवून ठेवणारी गोष्ट लिहावी लागते, दुसऱ्यांच्या कामाचा संदर्भ द्यावा लागतो, अनेकविध चित्रे काढावी लागतात . तर अश्या तय्यार झालेल्या आवृत्ती ला खूप वेळा चाळून बघावे लागते. हे झालं लिहिणार्याच्या हातातलं काम. मग सुरु होते घौड-दौड ती म्हणजे, असे लेखन कुठे पाठवायचे? ते विद्यापीठाला मान्य असलेल्या ठिकाणीच शोधावे लागते. शोधात शोधात नाकेनऊ येते. मग एकदाचे सापडले ठिकाण हे संशोधन पाठवायला कि मग भला मोठा फॉर्म भरायचा आणि ताटकळत बसायचं. जर लवकर उत्तर आलं तर पेढे वाटायचे नाही तर हे सगळं पुन्हा करण्याची तय्यारी ठेवायची.

दुसरा मार्ग असा आहे कि सुरवातीलाच / पहिल्यांदाच लेख कुठे पाठवायचा हे शोधयच, त्यानंतर विचार, लिखाण, पाठवणे, वाट पाहणे, पेढे नाही तर पुनश: हरिओम....

हूश्श्शह.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...