"घर पहावे बांधून, लग्न पहावे करून"
अशी
एक म्हण होती मराठी मध्ये पण आज पासून त्याची सुधारित आवृत्ती देत आहे, ती अशी
"घर पहावे बांधून, लग्न पहावे करून, संशोधन पाहावे करून च"
संशोधन लेखन (research paper writing) करायचे म्हणजे फक्त नाविन्यपूर्ण विचार मनात येऊन चालत नाही. त्यावर पुन्हा पुन्हा विचार विनिमय करावा लागतो, विविध टप्प्यात कृती करावी लागते, त्यांत अतिशय खिळवून ठेवणारी गोष्ट लिहावी लागते, दुसऱ्यांच्या कामाचा संदर्भ द्यावा लागतो, अनेकविध चित्रे काढावी लागतात ई. तर अश्या तय्यार झालेल्या आवृत्ती ला खूप वेळा चाळून बघावे लागते. हे झालं लिहिणार्याच्या हातातलं काम. मग सुरु होते घौड-दौड ती म्हणजे, असे लेखन कुठे पाठवायचे? ते विद्यापीठाला मान्य असलेल्या ठिकाणीच शोधावे लागते. शोधात शोधात नाकेनऊ येते. मग एकदाचे सापडले ठिकाण हे संशोधन पाठवायला कि मग भला मोठा फॉर्म भरायचा आणि ताटकळत बसायचं. जर लवकर उत्तर आलं तर पेढे वाटायचे नाही तर हे सगळं पुन्हा करण्याची तय्यारी ठेवायची.
दुसरा मार्ग असा
आहे
कि सुरवातीलाच / पहिल्यांदाच लेख कुठे पाठवायचा हे शोधयच, त्यानंतर विचार, लिखाण, पाठवणे, वाट पाहणे, पेढे नाही तर पुनश: हरिओम....
हूश्श्शह.
रविवार, ३० मे, २०२१
"घर पहावे बांधून, लग्न पहावे करून"
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा