सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

२२५९: नवीन मोटर कार छोट्यांसाठी मैदानी खेळ?


गेले काही दिवस मी एक नवीन संकल्पना उदयास येताना बघते आहे, ती म्हणजे लहान मुलांसाठी तयार केलेली मोठी खेळण्यातील मोटर कार. ही मोटार मुले (३ वर्ष वयोगटातील मुलांसाठी) स्वतः चालवू शकतात किंवा रिमोटने आई-वडीलही चालवू शकतात; मुलाने फक्त ऐटीत आत बसायचे, बास. बटनांवर चालणारी, बॅटरी असलेली ही गाडी आठवणीने आणि सातत्याने चार्ज करणे आवश्यक असते, अन्यथा ती चालणार नाही. या मोटारीची किंमत ऐकून तर माझी दाही बोटे तोंडात गेली; बापरे, इतकी महाग! आणि त्यात रिमोटचे सेल, बॅटरीची देखभाल, इत्यादी खर्च वेगळेच. आणि हे सगळे कशासाठी? 

पालक यामागचे कारण काय देतात? तर तो घरी कंटाळतो, सतत मोबाईल/टीव्ही बघतो, आम्ही कामात असतो, त्याला खेळायला खाली घेऊन गेले की तो नुसता पळतो, रस्त्यावर गाड्या येतात, म्हणून त्याला ह्यात अडकवून ठेवायचे. या गाडीत म्हणे गाणी लागतात, मोठ्यांच्या मोटारीसारखी बहुतांशी सगळी सोय आहे, दिवे आहेत, ती मागे-पुढे होऊ शकते आणि बरेच काही.

फक्त माझ्यामते, तीन आणि पुढील वयाच्या मुलांना भूक कशी लागणार जर ते धावले नाहीत, खेळले नाहीत, आणि त्यांना ऊन मिळाले नाही तर? मैदानी खेळांचे महत्त्व सर्वश्रुत आहेच, मग हे असले निष्क्रिय खेळ सध्या कशाला?

मला अजूनही आठवतंय, माझी मुलं जेव्हा लहान होती, तेव्हा सोसायटीत नवीन असल्यामुळे खेळाचे मैदान तयार नव्हते. माझ्या मते, किमान दोन वर्षे मी त्यांना दररोज ऑफिसमधून आल्यावर गाडीत घालून कुठल्या ना कुठल्या मोठ्या बागेत घेऊन जायचे. माझ्यासोबत त्यांना सांभाळणारी मदतनीस असायची, आणि मग ते मनसोक्त खेळायचे. मुलांच्या योग्य वाढीसाठी काहीतरी करणे भाग आहे.

ती गाडी बघून मला कमालीचं वेगळं वाटतं. त्या मोटारी एकतर खूप मोठ्या आकाराच्या आहेत आणि त्या ठेवायला जागा व्यापतात. मुलांना असं रिमोटने चालवणं किंवा त्या छोट्या मुलाला आत्तापासून अशा गोष्टी दररोज करायला देणं... नकोच! उंची वाढणे, ताकद येणे, भूक लागणे, सगळ्या मित्रांशी मिळून मिसळून खेळण्याची सवय होणे, पडणे, धडपडणे, चढणे, चालणे, पळणे, मातीत खेळणे, जंतूंची ओळख होणे, हे सगळं त्यांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. मुलांच्या योग्य शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी खूप काही महत्त्वाचे आहे. नुसती दिवसभर स्क्रीन किंवा एका जागी बसून राहणे पुरेसे नाही.

याऐवजी: व्यायामबद्ध जीवनशैलीसाठी कितीतरी संस्था आहेत; मुलांना तिथे घेऊन जाणे आवश्यक आहे.


रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

२२६१: ती

अगदी लहानपणापासून, काहीही समजायच्या आत, फक्त घरच्यांकडूनच नाही, तर शेजारी आणि संपूर्ण समाजाकडून माझ्या कानावर नेहमी एकच सूर पडला. तो काळ 'का?' हा प्रश्न विचारण्याचा नव्हता; मोठ्यांनी सांगितले तेच अंतिम सत्य. प्रत्येक क्षणी एकच गोष्ट सांगितली जायची: "नीट बस, नीट उठ, सासरी जायचं आहे."

जेवताना, बोलताना, वागताना,  प्रत्येक गोष्टीत सतत एकच पालुपद असायचं: "हे सगळे सासरी उपयोगी येईल." माझ्यावरच नव्हे, तर माझ्या सर्व मैत्रिणींवरही हात राखून खर्च केला जात असे.  घर आवरणे, स्वयंपाक, रांगोळी, गाणे, बागकाम, पूजा-अर्चा,  (ही यादी खूप मोठी होती) अशी सर्व स्तरावर जडणघडण होत होती. जणू आमची जडणघडण फक्त आणि फक्त त्या 'सासर'साठीच होत होती. "हे घर तुझे नाही, ते तुझे खरे घर आहे" असे सतत बिंबवले जायचे. 'काळा दोरा, खोटे दागिने घालायचे नाहीत, मोठ्याने हसायचे नाही, उगाच बोलायचे नाही...' असे संस्कार नकळत कोरले गेले.

हे संस्कार जणू  हवेत पसरलेले प्रेम इतके मस्त  होते की, आम्हा सगळ्या मैत्रिणींनी ते खूपच उत्साहाने स्वीकारले. आम्ही एका अद्भुत दुनियेत वावरत गेलो, मोठ्या कधी झालो कुणास ठाऊक? एकच उत्कट वाट पाहणं होतं की 'तो' येणार, मग आपण संपूर्ण विश्व जिंकायला मोकळे होऊ! तोच सर्वेसर्वा असेल, तो सर्वकाही करेल; तो म्हणजे काय, याची उपमा देण्यापलीकडे होती.

आज वाटते, इतकी वर्षे घरच्यांनी, शेजाऱ्यांनी आणि समाजाने घेतलेले अतोनात कष्ट व्यर्थ नाही गेले. ते व्यर्थ नव्हतेच, पण वास्तव खूप वेगळे होते. तो प्रेमाचा फुगा फुटला नाही, तो कायमचा विरून गेला. हवेतले ते प्रेम कुठे लुप्त झाले कुणास ठाऊक, गाडले गेले, की पुरात वाहून गेले!

या मागे मला आता दोन कारणे जाणवतात:

पहिले कारण: आमची घोडचूक. मुलींनी एका अदृश्य स्वप्नाची इतकी वाट बघितली, बहुतेक सगळं काही दुसऱ्याने करायचं बाकी ठेवलं, किंवा आहे त्यापेक्षा कैकपटीने सर्वोत्तमच चित्र रंगवलं. अर्थात, 'दुरून डोंगर साजरे' असं झालं.

दुसरे आणि महत्त्वाचे कारण: मुलींच्या मागे लागण्यातच सगळे कष्ट करत होते, वेळ देत होते, त्यांना घडवत राहिले, फक्त आणि फक्त 'ती' ला. पण 'त्या' चे काय? त्याला कोणी सांगितले का तितक्याच प्रेमाने की त्याला एका मुलीचा, तिच्या कुटुंबीयांचा, आणि तिच्या भावनांचा सांभाळ करायचा आहे? जसे तिला सांगितले गेले: 'असा बस, असा उठ, असा खर्च कर,' तसे त्याला शिकवले गेले नाही. 'सांभाळणे म्हणजे काय, मुलगी म्हणजे काय?' हे त्याला सांगितलेच गेले नाही.

बरं, सोशल मीडिया नव्हता, तरी पुस्तके होती, वाचनाला वेळ होता, वाचनालये होती. अनेक मुले आम्ही किती मोठे वाचक आहोत यावर अभिमान बाळगतात, मग समाजात बघून, लेखांकडून किंवा स्वतःच्या बुद्धीने तरी त्यांनी थोडी तयारी का केली नाही? ना स्वभाव पातळीवर, ना सामंजस्य पातळीवर, ना वैचारिक पातळीवर तसूभरही तयारी नसताना त्यांनी जोडीदार आणला. आणि मग, झाले संपले! अपवाद वगळता सर्वत्र चित्र फारच विद्रूप आहे. यामुळे विस्फोट, विद्रोह आणि अनेक स्तरांवर भरकटायला झाले.

अर्थात, आता या सगळ्या गोष्टी सोडून देत देत जीवनप्रवास पुढे सुरू राहिला आहे. आता स्वीकारले आहे, जे होणार होते, तेच झाले, आणि जे झाले तेच सर्वोत्तम होते. 'एकला चालो रे' या वृत्तीने, प्रत्येक क्षणी आनंद शोधत, मनःपूर्वक सर्वांना धन्यवाद देत, कुठलीही ढवळाढवळ न करता मार्गस्थ होणे, बाप्पाने दाखवलेल्या दिशेने जाणे, गोड आठवणींना उजाळा देणे, आणि 'प्रेम सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरवणे' हे सगळे मी अत्यानंदाने स्वीकारले आहे.

शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

2243: Back to basics


I love the concept of the bell curve. Ever since I learned about its shape, its formulation, and what it tries to depict, I have been fascinated by it. Hats off to the creator of this concept.

With a lot of free time on my hands and enjoying my "Weekend Forever," literally a new YouTube video stood in front of me and I was captivated by it from beginning to end, due to multiple reasons: the podcast brand's name, the thumbnail, and the topic of discussion itself.

I love to go back to my school days in my mind. I often "visit" my old classroom, those benches, the blackboard, the huge ground, my classmates, and our simple, delicious tiffin. This video added another reason for me to stay there longer, in a simulated, visualized way. Those were awesome days, completely relaxed, full of fun and joy. For me, and I'm sure for many others, it was a time of continuously dreaming about happy things. Negativity never touched me back then; to be frank, I wasn't even aware it existed. But as we climb higher steps in life, in all senses, we get surrounded by unwanted things.

This video helped me come back to basics. The speaker powerfully suggested pronouncing the basic Marathi alphabets loudly and methodically. As per her research, chanting them twice daily can help activate every cell in the body, to overcome minor pains and health issues. What a simple yet terrific technique! The moment you start, you can feel almost every crucial part of your body getting involved. The results are mesmerizing as it takes you back to your school uniform, those benches, fun and group chanting. It's truly nostalgic.

Connect with the speaker and try it yourself. After climbing that high peak, it feels good to come back to basics, doesn't it?

hashtagNostalgia hashtagSimpleJoys hashtagWellness hashtagWeekendForever hashtagBellCurve hashtagSchoolDays hashtagMarathiAlphabet hashtagBackToSchool

https://lnkd.in/dhAnY2xU

२२४४: बालपण देगा देवा


आपण सर्वच जण मनातल्या मनात किंवा मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारताना हमखास म्हणतो, "शाळेचे काय दिवस होते, नाही?" आणि मग सगळेच त्या दिवसांमध्ये हरवून जातात, केवळ त्या क्षणापुरते नाही, तर पुढील अनेक दिवस. काही जणांना तर याची सवयच लागते आणि वेळ मिळाल्यावर ते बसल्याजागी शाळेला भेट देऊन येतात, चेहऱ्यावर एक सुंदर स्मितहास्य घेऊन पुन्हा कामाला लागतात. क्या बात है!

चला तर मग, ही जादू पुन्हा एकदा अनुभवूया. आता पदर खोचून तयार व्हा, कारण अरुंधती ताई आपल्याला त्यांच्या एका व्हिडिओमधून आणि बऱ्याच वर्षांच्या त्यांच्या अभ्यासातून आपल्या ओळखीच्या बाराखडीचे महत्त्व पुन्हा एकदा सांगणार आहेत. सर्वांना माहीत असलेली बाराखडी शास्त्रीय पद्धतीने कशी उच्चारायची, हे त्यांनी व्हिडिओमध्ये समजावून सांगितले आहे. अर्थात, यात सातत्य राखणे खूप महत्त्वाचे आहे. पण यासाठी तुम्हाला काहीही वेगळे किंवा खास करावे लागणार नाही. कारण तुमची शाळा आणि ते जुने दिवस हे सर्व आपोआप घडवून आणतील. एकदा करून तर बघा!

मी जेव्हा हे सुरू केले, तेव्हा मला लगेच ते अगदी सुरुवातीचे दिवस आठवले. ज्या माननीय शिक्षकांनी मला वर्णमालेची ओळख करून दिली होती आणि ती उत्तम प्रकारे शिकवली होती, ते सारे क्षण माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. प्रत्येक स्वरात किती ताकद आहे, हे मला आता समजले आहे. प्रत्येक अक्षर उच्चारताना शरीराच्या कोणत्या भागाची हालचाल होते, ती स्पंदने कुठे पोहोचतात, हे जाणवले. काही अक्षरे उच्चारताना तर शालेय दिवसांपेक्षा जास्त मजा आली. मोठे झाल्यावर पुन्हा शाळेत जायला कोणाला मिळतं? पुन्हा लहान होण्यासाठी, विद्यार्थी बनण्यासाठी? या व्हिडिओने ती सुवर्णसंधी दिली आहे, म्हणून तिचा पुरेपूर वापर करूया.

मी तर रोज सकाळ-संध्याकाळ बेंचवर अत्यानंदाने बसते आहे आणि एका वेगळ्याच, स्वप्नवत जगात रममाण झाले आहे. हे खूप सोपे, आवडणारे आणि महत्त्वाचे म्हणजे विनामूल्य आहे. या टप्प्यावर अजून काय हवे? चला, 'स्कूल चले हम'!

https://lnkd.in/dhAnY2xU

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...