शनिवार, ३१ डिसेंबर, २०२२

In brief about 23:


It represents change, progress, and innovation. In terms of numerology, the number 23 signifies new beginnings, revolution, and transformation. This number pattern holds a lot of positive energy.


23 is one of the most commonly cited prime numbers. Twenty three is the lowest prime that consists of consecutive digits. It has two digits, 2 and 3, both of which are prime numbers! The sum of squares of its digits is: 2^2+3^2=4+9=13, which is also a prime number. When written in words, it is: "Twenty three" It has 11 characters, which is also a prime number. When written in Roman, it is: XXIII. It has 5 characters, which is also a prime number.


23 is a royal number it is known Royal star of lion in numerology, it blesses person both in personal and professional life. It also blesses all types of communication skills...


The American Nobel Prize-winning mathematician John Forbes Nash, who was also, the subject of a film called A Beautiful Mind, was obsessed with 23. He believed that the number 23 has a unique role in human relationships, personal health, and life order; it has a special significance for his work.


The average human physical biorhythm is 23 days. All calculations for every human being included 23 even before birth and continued throughout their lives. Such a significant number is part of this new year, and hence this year will be uniquely different for all. With these few facts about the magical number 23 collected from the first page of Google, I wish all my beloved a very joyful, flourishing, and happening 2023. #newbeginnings #newyear #transformation #communication #energy #change #health #innovation #23 #2023

 


बुधवार, २८ डिसेंबर, २०२२

नवीन वर्ष

मी अनेक मराठी भक्तांकडून ऐकलं आहे कि १ जानेवारी ला आपलं नवीन वर्ष सुरु होत नाही, मग ३१ डिसेंबर ला आणि १ जानेवारी ला का सोहोळे साजरे करायचे? आणि हेच मराठी भक्त दोन्ही दिवशी अगदी पाश्त्यांच्या पद्धतीनुसार अंधानुकीकरण करत सर्व यथेच्छ उपभोग घेतात. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारीच्या साधारण पहिल्या आठवड्यात ह्या मराठीभाक्तांच्या चर्चेला उधाण येतं कि गुढीपाडवा हे आपलं नवीन वर्ष. हो अगदी बरोबर, गुढीपाडवा हे नवीन वर्ष नाही ह्या बद्दल दुमत नाहीच. पण मला इथे एक साधं उदाहरण घ्यावंस वाटतं. काही संस्थांमधे कर्मचाऱ्यांची सुट्टी १ जानेवारी पासून ते ३१ डिसेंबर अश्या वर्षाची पकडली जाते. पण त्याच संस्थेमधे काही व्यवहार १ एप्रिल ते ३१ मार्च असे वर्ष म्हणून धरतात. त्यामुळे एक वर्ष म्हणजे काय हे बघू तसं आहे, नाही का? नवीन वर्ष म्हणजे काय हे सद्यस्थितीत दोनदा उपभोगता येतं एकदा पाश्चात्य आधुनिक पद्धतीनुसार आणि नंतर नावीन्याने नटलेल्या पारंपरिक पद्धतीने. काय हरकत आहे? एकाच सण दोनदा अनुभवा उगाचच चर्चा करत आणि दोष देत बसण्याशिवाय. काही भक्त तर संपूर्ण डबल ढोलकी असतात. १ तारीख जानेवारीची आपले नववर्ष नाही, तरुण पिढी अशी आहे तशी आहे असं सारखं बडबड आणि शिवाय ३१ डिसेंबर / १ जानेवारी ला आपण हे करावं / ते करावं, ह्याने असं केलं त्याने तसं केलं हे त्यावरून. सरते शेवटी मला हे सांगा सध्या सगळ्या बाजारात जेथे तेथे कालनिर्णय, महालक्ष्मी, दाते आणि बरीच वैविध्य मराठी भाषेतील आणि इतर बहुभाषीय दिनदर्शिका उपलब्ध आहेत आणि लोकं ते विकत घेत आहेत. मग हे जे सतत तक्रार करणारे महानुभाव आहेत ते दिनदर्शिका १ जानेवारी पासून छापणं थांबवत का नाहीत? दिनदर्शिका ते देखील स्थानिक भाषेतली खरं तर गुढीपाडवा किंवा त्यांच्या त्यांच्या आखीव रेखीव पारंपरिक नववर्षापासून उपलब्ध व्हायला हव्यात नाही का? स्थानिक भाषेत दिनदर्शिका हव्यात, ३१ ची धमाल हवी आणि शिवाय हे आपलं नवीन वर्ष नाही हि चर्चा देखील, अहाहा, काय कॉम्बो आहे नाही. आता बघा सोशल मीडिया पण ओसंडून वाहणार ह्या अश्या पोस्ट्स ने, १ तारखेपासून. त्या पेक्षा १ जानेवारी आणि एप्रिल मध्ये गुडीपाडव्याला दोन्ही दिवशी नववर्ष साजरे करा, १ तारखेला दिनदर्शिका आणा, गुढीपाडव्याला पंचांग. किंवा आताशा दिनदर्शिका हे पंचांग पण आहेच कि. 

१ तारखेला केक सेवन करा आणि गुढीपाडव्याला आमरस + पुरी + आम्रखंड + साग्रसंगीत पारंपरिक असं सगळं यथेच्छ फस्त करा. येत्या ३१ ला आनंद, गोड चांगले शब्द पेरण्यावर / पसरवण्यावर भर द्या, उणेदुणे सोडा. अगदी सर्वांना मनापासून येणाऱ्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ३१ किंवा १ ला, गुढीपाड्वायला जसा आपण आनंद साजरा करतो अगदी तसाच आनंद दरदिवशी साजरा होऊ दे ह्या २०२३ मधे हि ईशचरणी प्रार्थना.  



मायक्रोवेव्ह व्हा

चूल, शेगडी, गॅस, मायक्रोवेव्ह अशी स्वयंपाकघरातली उलाढाल आपण अनुभवली आहेच. मला आज सहज पदार्थ वाढायच्या आधी पुन्हा गरम करत असतांना एक गोष्ट ध्यानात आली. दोन पर्याय होते माझ्या समोर. एक म्हणजे गॅस वर किंवा मायक्रोवेव्ह वापरून गरम करणे. मायक्रोवेव्ह यंत्रणेत काही सेकंदात पदार्थ री हिट / पुन्हा गरम होतो. काही सेकंदात ह्या साठी कारण ती यंत्रणाच तशी तय्यार केली आहे, ते अतिसूक्ष्म किरणे तशीच आहेत जी पट्टाकिनी पोचतात आणि काम करून मोकळे होतात. गॅस वर गरम करायचं म्हणजे ते भांड आधी गरम व्हायला हवं, मग त्यातला पदार्थ गरम होणार. म्हणजे आधी भांड मग पदार्थाला गरम व्हायला लागेल तेवढा वेळ. ते भांड किती जाड आहे त्यावर पदार्थ कधी नक्की गरम होईल हे ठरतं. गॅस वर पदार्थ हलवावा देखील लागतो, म्हणजे लक्ष द्यावं लागतं, सोडून देता येत नाही. त्यामुळे सारांश असा कि आपल्या स्वतःला किंवा इतरांना जर मदतीची गरज असेल तर मायक्रोवेव्ह व्हा. पट्टाकिनी खाता येईल असं तितकंच गरम करून द्या, उत्तर द्या, सहज त्यावर काम करता येईल असे पर्याय सुचवा, नेहेमीच. गॅस वापरून गरम करण्यासारखे टप्पे नकोत कारण सध्या सर्वानांच आटोपशीर तरणोपाय हवे असतात, आपल्या स्वतःला देखील आणि कुठलीही अडचण असली तरी मार्ग निघतोय हे सर्वप्रथम दिसणं जास्त रास्त, नाही का?. मायक्रोवेव्ह सारखा झालं / होता आलं कि मग खूप पाठपुरावा करण्याची गरज भासणार नाही, एकदा पसरट भांड्यात ठेवलं / मांडलं कि मग मायक्रोवेव्ह वर सोपवा आणि निःश्चित व्हा. आधुनिकीकरण करतांना अती होणार नाही ह्याची काळजी घेतातच सहसा, तशी घ्या आणि परमानंद अनुभवा. 

मी निःशब्द झाले

वैविध्य धाटणीतले चित्रपट आज गेली कित्येक दशके तय्यार होत आहेत आणि राहतील देखील. मागील ४० एक वर्ष तरी मी हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपट बघितले आणि त्यातून बोध देखील घेतला. कधी कशी अप्रतिम कलाकृती असावी असा, तर कधी कशी असू नये असा. हळूहळू मी मार्गस्थ झाले आणि माझी एक खास आवड निर्माण झाली. तुम्हाला पटणार नाही कदाचित पण सध्या माझ्या समोर मला आवडतील असे, मला खूप काही शिकवून जाणारे चित्रपट समोर येतात विविध माध्यमांमुळे, जाहिरातींमुळे, वर्तमान पत्रामुळे किंवा सोशल मेडीया च्या माध्यमातून. आज देखील असेच झाले. मला एका चित्रपटाचं शिर्षकचं अतिशय भावलं आणि त्याने तेथेच जिंकलं देखील. मुळात मला लघुकथा आवडतात त्यामुळे देखील असेल, ह्या चित्रपटाची लांबी देखील आवडली प्रथमदर्शनी. मग काय, चिकटले सोफ्याला चक्क ५६-५७ मिनिटे सलग मी. अहाहा च. काय भन्नाट कलाकृती हो, मला माझ्या शब्दसंग्रहात / शब्दसंपदेत असलेले शब्द, उपमा अपुऱ्या पडत आहेत ह्या पिटुकल्या चित्रपटाचे वर्णन करायला. असंख्य लोकांना, दर्दी जनांना फार भावाला आहे हा चित्रपट, त्यामुळे खूप प्रशंसा आधीच झाली असणार पण ह्या चित्रपटाचा लेखक किंवा ज्याच्या सुपीक डोक्यात हि आयडियाची कल्पना सुचली आहे तो एक जगावेगळा माणूस असणारच ह्यात शंकाच नाही. मला मनापासून भेटायचं आहे त्याला / तिला, आणि पट्टाकिनी, लवकरात लवकर. किती बोलू आणि किती नाही असं झालंय मला. काही प्रसंग तर आरपार गेलेत, थेट भिडलेत. हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय उतरवणं अशक्यच. खूप सुंदर दिवस असणार आहेत पुढचे ह्याची शाश्वती देणारा आहे हा चित्रपट माझ्या दुर्ष्टीने. असं घडू शकतं हे दर्शवणारा, झोपलेल्या जिवंत माणसाची कदर करणारा, हे विचार प्रवृत्त करणारा, घरच्या कामाची लाज बाळगू नये हे अप्रत्यक्षपणे संदेश देणारा, कुठलाही भेद न ठेवता आपण आधी माणसे आहोत हे सहज सांगून जाणारा, वायफळ प्रश्न न विचारात समोरच्याला समजावून घेऊ शकतो हे सांगणारा, आणि बरेच काही. मी पूर्णपणे प्रेमात पडले आहे ह्या चित्रपटाच्या "नील मृगसी" च्या, नीलच्या आणि लेखकाच्या. 

माझ्या सारख्या प्रचंड बडबड करण्याची आवड असणाऱ्या, कुठल्याही विषयावर तासंतास बोलू शकणाऱ्या व्यक्तीला निःशब्द केलं आणि कमालीची कलाकृती घडवल्याबद्दल मनःपूर्वक आभार.  

"नील मृगसी": https://www.youtube.com/watch?v=F7pnfKFK7BQ


Neel Mrugasee

I experienced a master-piece today in the form of a short film titled "Neel Mrugasee". I sincerely wish to meet and bow down in front of the director or the writer of this film. It’s the most simplest short film, available on YouTube, but it’s a master piece in all respects for me. It's no surprise that it received millions of views.I am totally floored by the simplicity of the film and by Neel. If I had seen this film five years ago, I would have written a dramatic review, but now I know the truth.I am pretty sure this must have happened to the writer in real life, and hence he depicted it in this form to make it available on the world’s largest platform. The team of this film achieved so many thing in one go by making this film. These are my takeaways from the film, well, to name a few:

  • ·       Living simple is one of the most simplistic things.
  • ·       Understanding others is easier than it appears.
  • ·       It's possible to make simple films and win millions of hearts.
  • ·       The boy, girl, mom, and bro portrayed in this film exist in real life too.
  • ·       There is no need to constantly ask unnecessary questions; instead, work quickly and easily on it.
  • ·       Cooking is a basic survival skill.
  • ·       Respect others always

Once again, again and again I sincerely wish to meet the writer or director of this film asap.

https://www.youtube.com/watch?v=F7pnfKFK7BQ


मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२

My certificate

As always, I was conducting a revision session for postgraduate management students. It was a revision session, as one more session prior to this was conducted by me narrating the details. In this revision session, the students were expected to be ready with the homework given to them; if not, they should complete the homework in the current revision session. To be on the safe side, I reviewed briefly and quickly what was covered in my first session in detail. Then I asked the students to work on their homework, show me, and ask any questions or concerns they had while doing so. There was pin-drop silence during the entire period that was given to students. I was taken aback. But, eventually, one student asked for my permission to summarize what was covered in the sessions. I took 4-5 hours of sessions that were narrated by that student without missing a bit in merely 10 minutes or so. Wow. What else does the teacher ask for? I got my certificate saying that students understood all the details thoroughly. I thanked that student and invited him to the next set of lectures because he was the best orator, apt, and wonderful summarizer. Excellent experience. 

Background verification

Someone called to inquire about one of my students who had gone through the rigorous interview rounds. As always, those rounds included coding, GD, PI (technical and non-technical), HR, etc. Even after all these rounds and after getting the selection letter in the last week of October 22, the background check is happening now. Apart from "How long have I known that person and what is our relationship?" the caller asked me a few more strange questions: "If any problem statement is given, will he be able to solve it using coding?" and "Is he having a positive attitude?"


I was surprised to hear these two questions. What criteria were used to conduct the rounds of interviews back then? I am surprised to know that the answers to these questions were not found in the interview rounds. Should these questions be asked as part of the background check? I am surprised and taken aback.

Isn't it better to provide the caller with proper training and a set of questions to ask based on the answers to previous questions? The caller sounded like he was merely doing his duty, not even performing his duties, by asking these questions. Is that it, so called background verification? Super-surprised indeed. #hr #interview #coding #training #backgroundverification

सोमवार, २६ डिसेंबर, २०२२

मेहेंदी

लग्नाच्या किंवा कुठल्याही शुभ कार्याच्या वेळी हातावर आणि किंवा पायांवर काढलेली सुंदर कलाकृती म्हणजे मेहेंदी. हे तर सर्वश्रुत आहेच. तिचं एक महत्वाचं अढळ असं एक स्थान आहे आपल्या संस्कृती मधे. अशी सुंदर कलाकृती काढली म्हणजे त्या हाताचं सौंदर्य कित्येक पटीने वाढतं. ते ठराविक पद्धतीने रेखाटलेलं चित्र मग नैसर्गिक रंग धारण करतं. हिना काढायला लागल्यापासून ते रंग चढल्या नंतर सुद्धा कित्ती तास एक अलौकिक सुगंध देतो. तो रंग, ते रेखांकन, सजावट त्या धारण करणाऱ्याला आणि बघणाऱ्याला दोघांना आनंद देऊन जाते. प्रत्येक मेहेंदीचं आणि प्रत्येक हाताचं एक खास वैशिट्य आहे. कुठली मेहेंदी कुठल्या हातावर किती रंगेल हे ठाऊक नसतंच, पण तीचा रंग चढतोच. संपूर्ण मेहेंदी काढण्याच्या प्रक्रियेत खूप ऊर्जा मिळते, आनंद प्राप्त होतो, उत्सुकता निर्माण होते, हिरवी-केशरी-गडद तपकिरी ह्या रंगछटा, गारवा-कडकपणा, अर्धवट टवके आणि अश्या सगळ्या स्थिती मुळे एक वेगळीच रंगत चढते. शरीरातली नैसर्गिक उष्णता कमी करण्याचं काम हि मेहेंदी करते. रक्ताभिसरण करणे, चिंता दूर करण्यास मदत करणे, आणि बाकीचे काही किरकोळ प्रकृतीच्या तक्रारी दूर करणे हे सर्व मेहेंदी मूळे साध्य होते. मेहेंदी काढणारी व्यक्ती काही मिनिटे हात धरून ठेवते, त्यामुळे देखील एक प्रकारचे ऍक्युप्रेशर घडत असणार नक्की, कळत - नकळत. ते देखील काही अंशी भन्नाट वाटण्यासाठी कारणीभूत ठरत असणारच. 

म्हणजे सौंदर्य + सुगंध + औषधी गुणधर्म + प्रेरणा देणे  = मेहेंदी, एक संपूर्ण, परिपूर्ण असे पॅकेज. 

ह्या सर्व अगणित कारणांमुळे सण, वार, लग्न, समारंभ ई. वाट मग का बघायची. सवड काढून मेहेंदी अधेमधे काढावीच, भरपूर सदुपयोग होतो, शिवाय काढणाऱ्याची उजळणी होते, त्यांचा व्यवसाय चालतो आणि एक छोटेखानी सोहोळा अनुभवायला मिळतो अधूनमधून खूप जणांना. 

मंगळवार, २० डिसेंबर, २०२२

सामान्य-गरम-गार

कस्टर्ड नावाचा एक चविष्ट पदार्थ आहे आणि शिवाय पौष्टिक देखील. अर्थात ह्या सर्वांच्या आवडीच्या पदार्थाचं मूळ केळीच्या शिक्रणात दडलंय. केळीचे शिकरण हा कोणत्याही वयोगटात आवडीने खाता येणारा, काही क्षणात करता येणारा असा पदार्थ. कुठलीही पूर्व तय्यारी नको, गॅस नको, शिजवायला नको. कस्टर्ड करायचं म्हणजे साग्रसंगीत सगळं लागतंच, वैविध्य चवींची कस्टर्ड पावडर, दूध, फळं, फळांचा मगज / गर, सुकामेवा आवडीनुसार हवा असल्यास ई. आधी दूध गरम करून त्यात एका विशिष्ट्य पद्धतीने, एका ठराविक तापमानात ती कस्टर्ड पावडर मिसळायची, ती एकजीव तर व्हावी लागतेच शिवाय प्रमाणात घट्ट देखील, नाहीतर सुगरणीच्या हातचा पदार्थ होणार नाही. उगाचच घाई, गडबड करून चालत नाहीच हा भन्नाट पदार्थ करते वेळी. गॅस जरा मोठा ठेवला कि खाली लागलंच / करपलंच म्हणून समजा. करपलं कि चव पूर्णपणे बिघडते. सगळी मेहेनत वाया जाते ते वेगळं. ते गरम केलेलं दूध ज्यात कस्टर्ड पावडर एकजीव झाली आहे मग आधी साखर घालून थंड होऊ द्यायचं, मगच बारीक चिरलेली आवडीची फळं त्यात घालायची, स्वादीष्ट रुचकर चव यायला. अनेक ताजी फळं आणावी लागतात, धुवून, बारीक चिरून घालावी लागतात. ती एकमेकांसोबत चवीत भर घालतील कि नाही हे देखील बघावं लागतं, ऋतू, वेळ, प्रसंग, निमित्य काय ई. पण बघावं लागतंच. घरच्यांना, पाहुण्यांना वाढण्याच्या आधी शीतकपाटात ठेवावं लागतं, थंड गार झाल्यावर लज्जत वाढते, आणि ती चव बराच काळ जिभेवर रेंगाळते. पण हे सगळं मिळण्याकरता आधी गॅस वर, गरम, मग शांत सामान्य तापमान, मग थंड अश्या सगळ्या टप्प्यातून जावंच लागतं. 

अगदी तस्सेच आपल्या सर्वांचे पण असते, नाही का? कधी आपण स्वतः विविध टप्प्यातून जातो, अती उष्ण, अती थंड, किंवा सामान्य ई. अगदी तसेच बाकीचे देखील जात असतात, परिस्थिती बदलत असते आणि आजूबाजूचे वातावरण देखील. पण सरतेशेवटी गोळाबेरीज चविष्ट अशीच घडते नाही का? मग सर्वांनीच थोडा धीर धरला तर?, वाट पहिली तर?, वेळ दिला तर? नक्की विचार करा आणि मग कृती. 

रविवार, १८ डिसेंबर, २०२२

ती आणि तो

अनेक दशकं / शतकं आपण वाचतोय, ऐकतोय आणि बोलतोय ह्या दोघांबद्दल. शिवाय त्यांच्या बद्दल तर सर्वच गोष्टी जगमान्य आहेत, वैज्ञानिक दृष्ट्या आणि नैसर्गिक सर्वश्रुत अश्या. पण काल मी अचानक एक चित्रपट बघितला, लघुपट होता तो खरं तर आणि त्यात त्याचं दर्शन घडलं. त्यामुळे एक नवीन दुर्ष्टीकोन उभा ठाकला माझ्या डोळ्या देखत. कितपत योग्य आहे ह्या भानगडीत न पडता मी ह्या सुचलेल्या बाबी टिपून ठेवायच्या ठरवल्या. बास इतकंच. 

समुद्राचा आणि नदीचा स्वभावच मुळी भिन्न. प्रवाहाची दिशा, पाण्याची चव, किनारे, वाहतूक, पातळी, उद्देश, आणि हि यादी प्रचंड मोठी आहे. अगदी माझ्या  शाळेच्या दिवसांपासून मी माननीय विज्ञानाच्या शिक्षकांकडून शिकले आहे समुद्राच्या लाटांबद्दल, भरती-ओहोटी संदर्भात. अवाढव्य आकाराच्या बोटींमधून प्रवास देखील अनेक दिवस केला आहे. समुद्रसपाटी अनुभवली आहे वेगवेगळ्या ठिकाणी. रक्षाबंधनाबद्दल आणि खास करून नारळी पौर्णिमा का म्हणतात ह्या बद्दल मुलांना समजावून सांगितले आहे, महत्व सांगितले आहे. सगळं म्हणजे सगळं त्या सागरचं / समुद्राचं माहितीपूर्वक महत्व माहित आहे, तरी देखील काल वेगळंच काही तरी समोर आलं, ते असं कि जरी त्या पाण्याची शक्ती अपार आहे, शब्दात बांधण्यासारखे नाहीच, इतकी कि माझे शब्दभंडार नक्कीच कमी पडणार. कितीही ताकद, सामावून घ्यायची शक्ती असली तरी माणसं एकामागोमाग एक अती अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरु ठेवत आहे समुद्राच्या पाण्यावर, जसे कि त्या नैसर्गिक साठ्यावर त्यांची मर्जी चालते. आपली सैनिकांची जल वाहतूक, किंवा तेलाची देवाण-घेवाण ई. अत्यावश्यक मालाची वाहतूक ठराविक वेळेला समजू शकतो, पण काही बोटावर मोजणाऱ्या गणपती बाप्पांचे विसर्जन होतं आधी आणि आता तर विचारांच्या पल्याड आहे सगळं, सहलीसाठीच्या असंख्य / अगणित बोटी असोत, मासेमारीसाठी सतत, ई. जी हि माणसं सुटली आहेत त्यामुळे देखील, भयानक वाहतुकीमुळे, वजनामुळे कदाचित तो रागावला आहेच, किती सहन करणार तो आणि का?. त्यामुळे भरती-ओहोटीच्या स्वभावात फरक पडला आहे आणि तो घातक आहे. मी मागे एकदा-दोनदा नमूद केल्याप्रमाणे जशी ढगांची वस्ती असते, कुटुंब असतं, त्यांना माणसांनी त्रास देणे, शांततेत भंग करणे ह्याची मुभा नाहीच,  पण तसे ह्या पाण्याच्या साठ्यांबद्दल घडतंय. "अती तेथे माती" होण्याच्या आधी जागे व्हा, नंतर दोष देण्यात अर्थ नाहीच त्या निसर्गाला.  ती माणसं आवरा आणि तो समुद्रसाठा जपा.

Retired but not re-tired

Today evening, I was fortunate to witness one of the finest, short and sweet, melodious Hindi film song programs. The troupe members were young retired personnel from varied fields. Irrespective of their musical training background, it was visible from their performances that they were truly dedicated to music, the meaningfully weaved lyrics of the golden era, and their interest in the overall process. It's challenging to present seamlessly for hours in front of knowledgeable and conversant audience using the latest technologies. The audience was glued to their chairs throughout the program, cheering, clapping, whistling, etc., which proved truly motivational to the entire troupe. Hence it was evident that all of them were definitely or on paper retired from their respective expert domains but are not re-tired for sure. They are reliving their hobbies, incrementally learning about newer technologies, communicating with each other while performing like pros, and what not. Many more such wonderful, innovative, and exclusive performances to come in near future from this same group. There is so much to learn from them for sure. 

"त्या" आठवणी

माझ्या कानांना एक उत्कृष्ट पर्वणी लाभली आज एका कलात्मक संगीत समारोहाच्या स्वरूपात. छोटेखानी पण अद्यावत तंत्रज्ञान वापरून उभारलेला कार्यक्रम होता आजचा. वैविध्य प्रकारचे, धाटणीतले, पार्श्वभूमी असलेले असे प्रेक्षक तर होते पण साधारण सर्वांचा वयोगट सारखा होता. हा, एक्का दुक्का होते लहान थोर. त्यामुळे त्या सर्वसामान आणि  पुढील वयोगटातील मंडळींना त्यांच्या तरुणपणीची गाणी आत्ता पुन्हा एकदा नव्याने ऐकता येणं हि पर्वणीच, नाही का? आणि ते सर्वांच्या देहबोलीतून स्पष्ट दिसतं होतं, उमगत होतं आणि सहज लक्षात देखील येतं होतं. काय लक्षात येतं होतं? तर, ह्या साध्या वाटणाऱ्या कार्यक्रमामुळे सगळेच्या सगळे त्यांच्या "त्या" भन्नाट दिवसात पुन्हा एकदा रममाण झाले होते. "झोपाळ्या वाचून झुलायचे..." असे काहीसे. कोण म्हणतं कि जुने दिवस पुन्हा जगता येत नाही म्हणून? सपशेल खोटं. आज मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि शिवाय त्याला एक सोनेरी किनार देखील होती. प्रत्येकजण अक्षरशः स्मृती-मुग्ध होऊन त्या सर्व सादरीकरणाचा आनंद उपभोगत होते. सर्वात पुढे एक आणि हॉल च्या बाहेर अनेक म्हणजे कमीतकमी ६ नवीन खुर्च्यांच्या रांगा लावाव्या लागल्या आयोजकांना. मग ह्यातच आलं ना सगळं. अहाहा च. 

"शब्दांच्या पलिकडले..." असे १.३० - २ तास दिल्याबद्दल, बहाल केल्याबद्दल संपूर्ण समूहाचे शतशः धन्यवाद.  अश्या "त्या" आठवणींना उजाळा द्यायचे कार्य तुम्हा सर्वांच्या हातून सातत्याने घडो हि ईशचरणी प्रार्थना. 

सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर

ज्या चमूने १९६० च्या दशकातल्या सुप्रसिद्ध हिंदी गाण्यांच्या धून कराओके च्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्या त्यांना सर्वप्रथम प्रणाम. ज्यांना हे कराओके तंत्रज्ञान वापरून करावं असं सुचलं त्यांना शतशः धन्यवाद. जी गायक मंडळी किंवा गाण्याची शौकीन, अभ्यासक आहेत जे कराओके शिताफीने वापरतात, वैविध्य रचना सादर करतात त्या सर्वांनाचे कौतुक. कराओके वापरायचं म्हणजे आधी १९६०  ते ८० च्या महासागरातून अद्वितीय मोती ओंजळित अलगद वेचायचे, त्याची धून, शब्द रचना आहे कि नाही ते तपासायचे, ते संगणकावर उतरवायचे, त्यांची एक संचयीका अक्का फोल्डर तय्यार करून, नामकरण करून क्रमवार लावायचे म्हणजे आव्हानात्मक काम आहे ७०-७५ च्या युवकाला. हे सगळं करुन, आटोपशीर कार्यक्रम बांधून आज सादर केला आरोह ह्या नवीन स्थापन झालेल्या गाण्याच्या समूहाने. पुण्यातल्या प्रसिद्ध अथश्री ह्या बाणेर भागातील सदनिकेत सादर झाला १५ मधुर, श्रवणीय आणि लोकप्रिय गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. खूप प्रेरणादायी सुरवात आहे हि, "जो थांबला तो संपला" हे सिद्ध करत, तंत्रज्ञान शिकून, मदत घेऊन, कुठल्याही साथीदारांवर अवलंबून न राहता प्रत्येक सादरीकरण उत्कृष्ट झालं. 

Finest use of technology

He must be around 75 or so, properly duct-up, extremely fit and was maneuvering the laptop seamlessly before and after every song. Playing the karaoke of every popular song one after the other must have involved searching online for the apt songs, lyrics, displaying lyrics in visible large fonts, downloading those songs, saving it in folder in a proper sequence and what not. Also finalizing songs which are best suited to the singers both individually and as duet. Selecting rather picking up a few songs which will reach to the audience from the ocean ranging from 1960s to 1980s was yet another challenge. Due to the love and affection for that era, for original singers and composers, to the meaningful words, sweetest memories and appetite for music brought him close to the latest technology. Hats off to the organizing in charge for today’s bestest musical extravaganza at Athashri Society, Baner Pune, by newly created Aroha group. Nothing stopped him from using variety of technologies at just 75. So much to learn from him. I am thoroughly impressed.

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०२२

खरं रहस्य

गेले अनेक वर्ष डायनींग टेबल घरी असणं हे एक आधुनिक कुटुंबाचं लक्षण आहे. ते टेबल हे स्वयंपाक घर किंवा दिवाणखाण्यातला अविभाज्य भाग आहे. आज शनिवार, शिवाय दिनदर्शिके प्रमाणे नवीन वर्ष जवळ येऊन ठेपले आहे त्यामुळे आजचे वर्तमानपत्र हे फार अवजड होते, प्रचंड जाहिरातींचा भडिमार नुसता.  असंख्य जाहिराती आज माझ्या डोळ्यांनी टिपल्या आणि त्या घरातल्या सामानाच्या होत्या, बहुतांशी सोफा, डायनींग टेबल, पलंग ई. दर्शवणाऱ्या. मी अनेकदा पाहून खात्री केली कि त्या जाहिरातीत किंवा त्या दुकानात सहा खुर्च्या आणि टेबल ह्याची किंमत गगनाला भिडलेली अशी होती आणि दोन-तीन प्रकारचे आलिशान सोफे मात्र कमी किंवा वाजवी किमतींचे होते. 

मी अजून एक टिपलेली गोष्ट म्हणजे गेली अनेक वर्षे खुपश्या घरात, प्रत्येक घरात नाही, कितीही मोठे टेबल असले तरी ताट हातात घेऊन सोफावर बसून जेवायची पद्धत असते. त्याची कारणे अनेक आहेत, एक म्हणजे दूरदर्शन बघता बघता, गप्पा मारता मारता जेवणाचा आनंद उपभोगता येतो, त्या शिवाय पाय मोकळॆ करण्याकरता / पुन्हा वाढून घेण्याकरता, त्या निमित्याने पोटात थोडीशी जागा निर्माण करण्या करता उठता येतं, एकाच जागी बसून जेवायची गरज नाही, खूप लोकं असली तर देखील सोफा सोयीचा म्हणून वापरला जातो ई. पण हि सर्व कारणं मुळमुळीत झाली हो, आज मला एक महत्वाचं कारण समजलं. सोफ्याच्या किमती जर जास्त स्वस्त आहेत तर जास्तीचा एक टेबल घ्या, तो सांभाळा, मांडा - उचला, स्वच्छ ठेवा आणि शिवाय सहा खुर्च्या, एक टेबल म्हणजे कुणाकुणाची अडगळ पण होऊ शकते नाही का? त्यामुळे कोणी सांगितलं आहे. नाही तरी सोफावरचं बसायचं असतं मग सोफाच घ्या ना? सोप्प आहे. 

अजून एक कारण म्हणजे त्या जाहिरात दिलेल्या दुकानांमधले सोफे विकले जात नसतील म्हणून देखील त्याची किंमत फार कमी दाखवली आहे. 

काहीही असो, टेबल असो किंवा सोफा, जमिनीशी जेवतांना असलेलं नातं तर कधीच संपुष्टात आलं आहे. उत्कृष्ट पचन क्रिया होण्यासाठी जमीनीवर बसण्यासारखं आसन दुसरं नाहीच, शिवाय उत्कृष्ट व्यायाम होतो तो वेगळाच. शिवाय जमिनीवर बसून मांडलेली पंगत पण कुठेतरी विस्मृतीत गेलेली गोष्ट आहे. नाही तर संपूर्ण पंगत एकसाथ बसणार आणि उठणार देखील, शिस्त होती फार वेगळी आणि वैज्ञानिक महत्व असलेली अशी. काही दिवस नक्की लागतील पुन्हा जमिनीशी नाळ जुळायला पण एकदा जुळली कि "बल्ले बल्लेच". चला तर मग आज पासून सुरवात करून बघूया, ज्यांना शक्य आहे त्यांनी मांडी घालून जमिनीवर बसून जेवण करू या, अर्थिंग / भूयोजन / भूसंपर्कन चे सर्किट / फेरा पूर्ण करूयात, भारतीय पद्धत आत्मसात करूयात आणि बहुतांशी रोगांना दूर ठेवुयात. 


गुरुवार, १५ डिसेंबर, २०२२

BEyou-TIFUL


Wow, how thoughtful indeed! Isn't it critical to be yourself at all times? Then there is no need to compare yourself to others. And it appears that the team is ready to help you improve with their services. Many entities catch my attention on my way to work and invite me to look at them so that I know that I am surrounded by so many intelligent, extraordinary thinkers. When you come across twisted phrases like this or similar ones, it actually helps you / me feel and remain happy and grounded. On my daily commute route, this is one of the boards of a beauty salon / parlour. It proves that not only researchers, but others too, think innovatively, starting with the most uniquely attractive name or title of the business. I am super impressed with the thought process that went into choosing such an apt name and hope that they deliver their services with the same zest and enthusiasm to live up to the title.


As time passes, we forget such a simple phrase and walk away from it quickly or unknowingly. But then people, things, and entities around you will not let it happen for a longer period, and such boards help you realise the importance of being you. People like me tend to regain energy in abundance after encountering such a thoughtfully twisted words, live with them for a while, and then, as nature would have it, return to the normal routine. But then the cycle continues to hit yet another awesome entity to keep you on track.


Many really work for you, and hence it's now our turn to keep working for others by some means or another, right? What say? So how are you planning to kick-start today?



सर्वोतोपरी पौष्टिक

वडे ह्या नावाचा मला किंचितसा विसर पडला होता. आज बरे झाले त्याची आठवण झाली कारण बरीच वर्ष आमच्याकडे दोन पद्धतीने / प्रकाराने केलेल्या टिक्क्याचं जास्त प्रमाणात होत होत्या. त्याची कारणं मला आज कोणाशीतरी संवाद साधतांना प्रकर्षांने लक्षात आली, जी किंचितशी विस्मृतीती गेली होती. मी एक पूर्णवेळ कचेरीत जाऊन काम करणारी गृहिणी असल्यामुळे, मुलांना शाळेच्या डब्ब्यात विविधता देता यावी ह्यामुळे आणि वेळेचा सदुपयोग ह्या विविध अंगांनी सर्वतोपरी विचार करून माझी कृती होत गेली अनेक वर्षे. आता मुलं डब्बे नेत नाहीत त्यामुळे जरासं सगळं मागे टाकलं गेलं होतं. साबुदाणा, भगर, बटाटा (उपवास आणि बिगर उपवास) दोन्ही प्रकारच्या पण टिक्क्याच जास्त प्रमाणात केल्या गेल्या कारण त्या एकदा तव्यावर टाकल्या, किंचित तेलाचे थेंब सोडले आजूबाजूला कि मी माझी सकाळची, घाईची कामं करायला मोकळी. शिवाय थंड झाली टिक्की तरी झकास लागते, न्यायला सोप्पी, जास्त तेल लागत नाही, तळत उभं राहावं लागत नाही, पौष्टिक, चिवट होत नाही, चुकून गडबड झाली तर तेलात वडे उघडण्याची / उडण्याची भीती असते, ते नाही, आदल्या दिवशी रात्री मावशींच्या मदतीने टिक्क्या करून ठेवलं कि सकाळी पट्टदिशी करता येतात, अनेकदा मी मुलांना ह्या अश्या बिगरउपवास टिक्क्या घरगुती बर्गर च्या स्वरूपात ब्रेड मधे घालून पण खपवल्या आहेत.  सर्वार्थानेच सोप्पे, नाही का?. 

दुसऱ्या पद्धतीने होणाऱ्या टिक्क्या म्हणजे जर उपवासाच्या दिवशी खिचडी, भगर, किस उरलाच तर संध्याकाळी गम्मत म्हणून गरमागरम टिक्क्या होतं होत्या. अर्थात इतर दिवशी अगदी कांदे पोहे जरी उरलेच तर त्याच्या टिक्क्या पण लै भारी चविष्ट चवदार लागतातच ह्यात शंकाच नाही.  आपण रगडा प्याटिस घरी करतांना देखील मुख्य बटाटा पण इतर भाज्या घालून, किंवा सहज इतर दिवशी देखील गम्मत म्हणून अश्या विविध टिक्क्या करतोच कि. 

सध्याच्या दिवसात फक्त माझ्या सारखीला उपयोगी पडावं म्हणून वैविध्य पीठं उपलब्ध आहेत बाजारात. त्यातलं एक माझ्या आवडीचं पीठ म्हणजे उपवास भाजणी. ह्या भाजणीत सर्व माल घातला कि टिक्क्या तय्यार. भाजणीचं हुकमी तय्यार नसली तरी अगदी साबुदाणा, भगर ई. ची रवाळ पीठं घेऊन त्यात बटाटा किसून / उकडून, आवडतं असल्यास काकडी, दाण्याचं कूट ई. घातलं कि भिजवावं / शिजवावं वगैरे लागत नाहीच. कोण म्हणतंय कि घरी इन्स्टंट पदार्थ होऊ शकत नाहीत ते?. टिक्क्यांशिवाय अप्पे हा पण तरणोपाय आहे, किंवा पिटुकले थालिपीठं पण. वा वा. म्हणजे बघा ना, माझ्या कष्टांची, तेलाची, वेळेची, माझ्या ऊर्जेची बचत, त्यामुळे खायची रेलचेल आणि उत्साह वृद्धिंगत होतो तो वेगळाच, आहे कि नाही चविष्ट टिक्की सर्वतोपरी पौष्टिक?

काही का होईना एवढ्यात झालेल्या भूतकाळात मस्त फेरफटका मारता आला मला आणि माझ्या हातून काय काय घडवून घेतलं "त्याने"  हे पुन्हा एकदा एखादा चित्रपट बघावा असे डोळ्यासमोर झर्रकन उभे ठाकले. 

आजचा संवाद खूप काही देऊन गेला मला. 

"असे संवाद घडती आणि स्मृती देऊनी जाती".  


खुर्चीचे टेबल

वय वर्ष असावे ६ फक्त, वर्ग दुसरा. काही कारणास्तव आदल्या दिवशी घरचा अभ्यास राहून गेला होता शिक्षकांनी दिलेला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो दुसऱ्या दिवशी शाळेच्या बस थांब्यावर आल्यावर आठवला. मग काय सोप्पं आहे. बाबांनी घरापासून ते बस थांब्यापर्यंत अनायस्या चारचाकी आणली होती. बाबांनी चारचाकीतली ड्राईव्हर / गाडी-वाहनांची खुर्ची जमेल तेवढी पुढे सरकवली. त्यामुळे बसायला जागा झाली पुढच्या आणि मागच्या सीटच्या मधे. मग हे महाराज तेथे स्थानापन्न झाले. मागची चारचाकीची सीट म्हणजे जणू त्यांचं टेबल झालं आणि अश्या पद्धतीने वेगळ्या धाटणीतल्या टेबल-खुर्ची वर बसून लिखाण सुरु झालं. त्या पुढे काय झालं हे मला माहित नाही कारण माझा आजचा खास दिवस अश्या उत्कृष्ट पद्धतीने सुरु झाला. मला तो इतका भावाला कि ज्याचं नाव ते. धन्य ते टेबल आणि आसन, त्या पेक्षा धन्य ते वडिल, शांततेत आणि पट्टाकिनी खूप उत्तम सोय करून दिली, आणि त्या पिटुकल्याने देखील असलेल्या अनोख्या टेबल खुर्चीचा उत्कृष्ट वापर करून न-कुरकुरता लिखाण केलं हे झकास. मला खरंच नव्याने समजलं कि खुर्ची हि पण गरज पडल्यास टेबल होऊ शकते ते देखील कार मधली, क्या बात है? ते अनोखे वडिल कुठल्या क्षेत्रात काम करतात ते ह्या सर्व आनंद उपभोगण्यात विचारायचं राहूनच गेलं, उद्या बघते गाठ पडली तर त्यांची. 

"खुर्चीचे टेबल काय ते झाले, 

मला नव्याने बरेच काही शिकवून गेले". 


अंधारातला उजेड

स्नातक आणि स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना मी शिकवत असल्यामुळे तांत्रिक घडामोडी आणि त्यामुळे होणारा बदल, विद्यार्थांमधले घडलेले लक्षणीय परिवर्तन ई. सहज बघायला आणि अनुभवायला मिळतात. गेल्या दोन वर्षांपासून मला तरी जाणवलेला बदल म्हणजे काळोख. एक तर ह्या संपूर्ण पिढीलाच काळोख आवडतो? का एक करतो म्हणून दुसरा तसेच करतो, कोणास ठाऊक. 

काळोख म्हणजे 

१. त्यांच्या सगळ्या स्क्रीन्स किंवा बॅकग्राऊंड किंवा विविध तांत्रिक उपकरणे ह्यांचे पडदे काळे ठेवले असतात मुद्दाम,  का? 

२. दिवसा ढवळ्या उजेड असतांना देखील खोलीतले पडदे सारून अंधारात बसलेले, काम करतांना दिसतात. नाहीतर खोलीतले दिवे लावायचे पडदे सारून, हे काय खूळ आहे कुणास ठाऊक. 

मला स्वतःला चार डोळ्यांनी त्या काळ्या स्क्रीन वर पांढऱ्या पिटुकल्या अक्षरांनी काय लिहिलं / टाईप केलं असतं ते दिसत देखील नाही हो. मग ह्यांना कसं दिसत असेल तासंतास काम करतांना? 

मी मागे एकदा लिहिल्याप्रमाणे जेव्हा ह्या मागील २-३ वर्षांपासून ऑनलाईन माध्यमातून जर कोणी काही त्यांच्या स्क्रीन वर मांडत असेल तर आज तागायत एक प्रश्न नक्की विचारतात "माझी स्क्रीन दिसते आहे का?". माझ्या दृष्टीने ह्या ऐवजी असे विचारायला पाहिजे "माझ्या स्क्रीनवरचं दिसतंय का?" "इज माय स्क्रीन रिडेबल?" हे जास्त योग्य आहे "इज माय स्क्रीन व्हिसिबल?" पेक्षा, नाही का? 

दिवसा उजेड असतांना अंधार करायचा पडदे लावून, खिडक्या उघडून ताजी हवा उपभोगायच्या ऐवजी वातानुकुलीत यंत्र गरज नसतांना, सतत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात, हे सगळं माझ्या समजण्या पल्याड आहे. असो. ह्या पिढीला लागलेली सवय असेल. पण ह्यातूनच सगळेच विद्यार्थी मोठी उंची गाठतात देखील हे खूप महत्वाचं आहेच, पण त्यांनी त्यांचे डोळे आणि तब्बेती सांभाळाव्यात, उजेडाशी पण मैत्री असावी एवढीच माफक अपेक्षा आणि विनंती. 

बुधवार, १४ डिसेंबर, २०२२

अनोखी मदत

न मागता मिळालेले बक्षीस, भेट वस्तू, सरप्राईज ई. आश्चर्यचकित करून जातातच आणि शिवाय परमानंद देऊन जातात ते वेगळंच. बहुतांशी प्रत्येकजण एकतर विचारमग्न किंवा दुखी असतो, किंवा तो प्रसन्नचित्त अथवा नेहेमीच्या सामान्य स्थितीत असतो. कुठलीही स्थिती असो, न मागता मिळालेली वस्तू, भेट, किंवा असामान्य अनुभव प्रत्येकाला अत्यानंद देऊन जातो. बरेचजणं एका वेगळ्या दुनियेत पोचतात आणि राहतात बरेच काळ. ती भेट वस्तू लहान का मोठी, महाग का स्वस्त, कुठल्या स्वरूपातली ई. महत्वाचं नाही. विचारपूर्वक दिलं आहे, वेळेला न मागता उभं ठाकलं आहे, हवं ते, हवं त्याहून खूप वेगळं, असं ते आहे म्हटल्यावर खास वाटतं ते साहजिकच, कारण कोणीतरी तुमच्या साठी खास खूप विचार करून कृती देखील केली आहे हे महत्वाचं. हे खूप शिकण्यासारखं आहेच आणि ते वेळोवेळी दुसऱ्यांसाठी वापरावं देखील प्रत्येकाने. 

मला काल अचानक काहीही कारण नसतांना खूप वेगळं असं वाटत होतं, किंचित अस्वस्थ असं किंवा न सांगता येणारं असं. तरी वेळेवर मी सकाळी ऑफीला निघाले तय्यार होऊन. गाडी सुरु झाली आणि नेहेमी प्रमाणे रेडिओवर गाणी सुरु झाली. बऱ्याच रेडिओ वाहिन्या आहेत आणि प्रत्येकाची खासियत म्हणजे नुसत्या जाहिराती. पण काल मला एक सुखद धक्का बसला आणि तो म्हणजे एका मागोमाग एक गाणीच लागली, दुसरा हादरा म्हणजे अक्षरशः सगळीच्या सगळी माझ्या प्रचंड आवडीची अशी. मला काही क्षण एक तर विश्वास बसलाच नाही किंवा मला असं देखील वाटलं कि मी माझी आवडत्या गाण्यांची यादी प्ले केली आहेत. पण तसं नव्हतंच मुळी. बिनतारी संदेश दिल्यासारखं त्यांना कसं काय समजलं कि मला थोडसं वेगळं वाटतंय कोणास ठाऊक आणि कधी मी मला परत गवसले माझं मला समजलं नाही. कधी, कोण, कुठे, केव्हा, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करेल काहीही सांगता येत नाही. तेव्हा प्रत्येक वेळी आवर्जून नतमस्तक व्हा, धन्यवाद माना त्या प्रत्येकाचे ज्याने तुम्हाला हवी तेव्हा मदत केली. आणि जमेल तेव्हा, जमेल तशी, जमेल तेवढी मदत करा, उभे राहा म्हणजे थोडीशी उतराई होईल. 

त्या रेडिओ स्टेशन वर काम करणाऱ्या संपूर्ण चमूचे धन्यवाद, माझ्यासाठी माझ्या आवडीची गाणी निवडल्याबद्ल आभार, ती एकापाठोपाठ एक ऐकवल्याबद्दल शुक्रिया, माझा मूडपालट केल्याबद्दल मी ऋणी आहे. मला न मागता मिळालेली हि खूप अनमोल भेट आहे. त्या रेडिओच्या चमूने मला विचारण्यात वेळ नाही घालवला, कृती करण्यावर भर दिला. अगदी तस्सेच आपण सर्वांनी पण नेहेमी करत राहिले तर? उगाचच प्रश्न विचारून भंडावून सोडण्यापेक्षा जमेल तशी कृती केली तर ती नेहेमीकरता लक्षात राहणारी, स्मृती देऊन जाणारी, खूप काही शिकवून जाणारी घटना ठरेल ह्यात शंकाच नाही. चला तर मग, खोचा पदर आणि लागा कामाला.   

डब्बी

माझ्या लहानपणीच्या असंख्य आठवणींचा खजाना आहे माझ्या सोबत आणि अधूनमधून त्यातील बऱ्याचश्या आठवणींना उजाळा मिळतो. काही वस्तू डोळ्यासमोर उभ्या ठाकतात आणि बास, मग काय मी पट्टकनी काढते माझी लेखणी. त्या काळी पुरुषांचे म्हणाला तर त्यांच्या खिशात तेव्हा बऱ्याच डब्या असायच्या, काही डबे देखील. अर्थात ज्या पद्धतीचे काम पुरुषमंडळी करायची त्या मानाने डब्बी किंवा डबे असायचे. काथ - चुन्याची डबी, लवंग - विलायची ची डबी, काहींना प्रकृतीप्रमाणे छोटेखानी व्हिक्स ची डबी बाळगायची सवय, माचीस / काड्यापेटीची डबी, बिडी / सिगरेट / तंबाखुची डबी, कपाळावर गंध लावण्याची सवय असेल तर ती डबी, जेवणाचे डबे + चटणी / लोणच्याची डबी, आणि इतर. मुलींचे किंवा बायकांचे थोडेसे वेगळे होते. त्या काळी टिकल्या कमी प्रमाणात होत्या पण त्या पिटुकल्या डबीत यायच्या, त्यामुळे टिकल्यांची डबी, नाहीतर गंधाची डबी, कोरड्या कुंकवाची डबी, काजळाची डबी, सोफ / सुपारी डबी, खाऊचा डबा, औषधांची डबी, आणि इतर अनेक. व्यक्ती तितक्या प्रकृती, तश्या अनेक पद्धतीच्या डबी, किंवा डबे. त्या काळी प्लास्टिकचा सर्रास वापर होत नसे, उपलब्ध नसे त्यामुळे बऱ्याचश्या गोष्टी, पदार्थ ई. डब्यात आणावे लागायचे. त्यामुळे विविध डब्बे / डबी वापरण्याची प्रथा होतीच. मग प्लास्टिकचा बढेजाव वाढल्यावर मग सुटलेच सगळे आणि डबी पण अस्तित्वात होती हे थोडसं विस्मृतीत गेलं होतं. जुन्या गोष्टी नव्या ढंगाने समोर येतात तसेच काहीसे सध्या मला आढळते आहे. 

अर्थात आकार, प्रकार, उकार ई. बदलले असले तरी ते माझ्या दृष्टीने डबेच / डबीच आहे कारण त्यांना एक प्रकारचा आकार आहे, ती जागा व्यापते, ती काही भरून नेण्यास उपयोगी ठरते आणि बरेच असे उपयोग सांगता येतील. ह्या यादीत आहेत स्वतःचे संगणक जे आपण ने-आण करतो आणि केस अक्का डबी, मोबाईल अधिक कव्हर अक्का डबा, त्या बरोबर चे अविभाज्य घटक पॉवर बँक, एअर पॉड आणि डबी, वायर्ड / वायरलेस इअर फोन / हेडफोन आणि डबी,  मेकअपचं अत्यावश्यक सामान + डबी / डबा, आभूषणांचा डबा / डबी, औषधे ठेवण्याची खास डबी, जेवणाचा डबा आणला तर नाही तर बाहेरून विकत घेतलेले पदार्थ, उरलेले पदार्थाचा डबा, पेन, पेन्सिल आणि इतर वस्तू ठेवण्याचा डबा आणि इतर बरेच.  

तेव्हा आणि आता पिटुकला फरक आहे पण वैविध्य डब्या काही साथ सोडत नाहीच अगदी प्रत्येकाची. 

त्यामुळे ह्या डब्यांचे महत्व जाणून घ्या आणि त्यांना सांभाळा, कारण हे सर्व आपले दैनंदिन साथीदार आहेत अतूट बंधन असलेले, श्वासोगणीत लागणारे असे. प्रत्येक वयातील वेगळे असे, गरजे प्रमाणे बदलावं घडवून आणणारे, डबीतल्या / डब्यातल्या जिन्नसाला एक सुरक्षित कवच देणारे असे भक्कम.  





रविवार, ११ डिसेंबर, २०२२

साय - माय

सायीला मायेची उपमा देतात हे शाळेत एका धड्यात / कवितेत शिकवलं होतं, ते का? हे मात्र एवढ्यात समजलं / उमगलं. प्रथमतः तर फक्त उकळल्या नंतर दुधाला साय येते एवढंच काय ते मला ठाऊक होतं पण मग हळू हळू बाकी घटकांबद्दल देखील लक्षात आलं जसे कि भगरीवर, खिरीवर (गाजराची खीर), मऊसर खिचडीवर, लापशीवर ई. साय येते, काही जण त्याला साय धरते असं म्हणतात, थोडक्यात काय तर एक थर वरती तय्यार होतो त्या पदार्थाच्या. 

दुधावरची साय किंवा कुठलीही त्या खालचा पदार्थ गरम राखण्याकरता, किंवा त्या पदार्थाचं तापमान काही अंशी, काही वेळ जपण्याकरता असते, निर्माण होते आणि हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे असं माझं ठाम मत आहे. थोड्या जास्त वेळ उब राखण्यासाठी केलेली सोय, त्यामुळे गरज असेल तर पदार्थ थोडासा अजून शिजतो, टिकतो, चव राखता येते असे काहीसे. काही दिवसांपूर्वी मला भगर हवी होती डब्यात म्हणून मी ती थोडीशी पातळ केली नेहेमी पेक्षा, म्हणजे पट्टाकिनी खाता येईल, थंड झाल्यावर नाहीतर फार कोरडी होते ती. भगरी सोबत मी अजून काही नेणार नव्हते कारण ती फोडणीची भगर होती आणि त्यामुळे काही नसलं वेगळं तरी चालणार होतं. थोडीशी गरम असतांनाच भरली डब्ब्यात. नेहेमीच्या जेवणाच्या वेळी ऑफिस मधे डब्बा उघडून चविष्ट झाल्यामुळे फस्त झाला क्षणात आणि मग लक्षात आलं कि १. कित्ती मस्त कोमट राहिली होती भगर आणि २. एक वेगळा थर निर्माण झाला होता त्यावर ज्यामुळे ती उब टिकली होती. पहिल्यांदाच मी पातळसर भगर केली होती, आणि ती इतक्या वेळाने सेवन केली होती. त्यामुळे ह्या सायीचा आलेला पहिलाच अनुभव. त्या नंतर मला माझी आई जी गाजराची खीर करायची ती आठवली, पातळसर केलेली खिचडी ध्यानात आली, ज्वारीच्या कण्या झर्रकन डोळ्यासमोर उभ्या ठाकल्या आणि बरेच असे पदार्थ.   बघा म्हणजे त्या पदार्थाला पण कित्ती काळजी असते सेवन करणाऱ्याची, चविष्ट खाऊ घालण्याची, नाही का? अगदी आईसारखी, आत्ता उमगलं सायीला आईची माया का देतात कवी मंडळी ते. 

असे देखील

माझी एक खासमखास मैत्रीण, अनेक वर्षांची ओळख, इतकी दाट मैत्री कि ज्याचं नाव ते. आम्ही दोघी एकमेकींना कदाचित कणभर जास्त ओळखतो त्यांच्या स्वतः पेक्षा. खूप बोलका, मोकळा स्वभाव, प्रत्येकाला जमेल तशी मदत करण्याची धडपड, कामाला वाघ आणि सर्वगुणसंपन्न अशी ती. वायुवेगाने सर्व आटोपशीर व्यवहार, मग ते घरचे असोत नाहीतर दारचे. विविध ठिकाणं बघितली, ह्या-त्या देशाची सहल घडली, कचेरीत खूप जबाबदाऱ्या निभावल्या / निभावता आल्या, घरच्यांचं जमेल तसं सांभाळून, मुलांना वेळ देऊन. तर थोडक्यात "ती" अशी होती. तिच्या घरचे सगळेच फारच मोठ्या उंचीचे विद्याविभूषित, उच्चपदस्थ आणि असे बरेच काही. 

"सध्या ती काय करते?" तर स्वतःच्या तब्बेतीला जपते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण तब्बेत सांभाळणं हे अत्यावश्यक झालंय तिला. एवढ्यातलाच तिच्या घरी घडलेला प्रसंग. तिच्या अहोंना येणाऱ्या नाताळाच्या सुट्टीत ह्या-त्या ठिकाणी जायचे आहे. त्या नंतर म्हणे काही वर्षांनी अत्यंत विश्वविख्यात स्थळांना भेटी द्यायच्या आहेत, एकामागोमाग एक. तेव्हा आहोंनी विचारणा केली आणि ह्या सर्वांचा प्रस्ताव मांडला तिच्या समोर. अर्थात सद्यपरिस्थितीत ती नाही म्हणाली, कारण प्रवास नाही सोसणार हे एक कारण, आणि अहोंना त्रास नको तिच्या तब्बेतीच्या कुरबुरींमुळे हे महत्वाचं कारण, तिसरे कारण म्हणजे तिने बहुतांशी हि स्थळं बघितली आहेत त्यामुळे ओढाताण करून जाण्याची काहीच गरज नाही ई. त्यावर अहोंची प्रतिक्रिया अशी "म्हणजे ह्या पुढे आयुष्यभर मला एकट्यालाच सर्व प्रवास करावा लागणार तर?".  

थोडक्यात ह्या प्रसंगाचं तात्पर्य: आंतरदेशीय शाळेत शिक्षण, बहुराष्ट्रीय कंपनीत अनेक दशकं नोकरी, कामामुळे एकही देश शिल्लक राहिला नसेल एवढी झालेली भ्रमंती आणि सरते शेवटी माणुसकी, ई. सर्व गेलं कुठे? "जिभेला हाड नाही" हे जरी खरं असलं तरी मग लहापणापासून काय शिकले अहो, आई-वडिलांनी, शिक्षकांनी, समाजाने एक तर शिकवलं नाही आणि  त्यांनी स्वतः काहीच शिकलं नाही हे त्रिवार सत्य. "ऍक्टिव्ह प्यासिव्ह व्हॉइस = कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग" हे शाळेत शिकवले होते सर्वांना, मग त्याचा साधा प्रयोग करणं जमत नाही तर अती उच्च विद्या आणि उच्च पदस्थ असण्याचा काय उपयोग? सर्व व्यर्थच. खालील वाक्य उच्चारणं अवघड होतं का स्वतःच्या बायकोसाठी कि "नाताळच्या सुट्टीला दोघे जाऊयात, तुला जेथे सोयीचं असेल तिथे. आणि बाकी ज्या स्वप्नवत जागा आहेत जेथे मला जायचे आहे तेथे देखील तू येणार, तू लवकरच बरी होणार आणि आधीपेक्षा जास्त ठणठणीत ह्याची मला खात्री आहे... ". म्हणायला काय जातंय हो? पैसे पडत नाहीत किंवा अजून काही दमडी खिशातून खर्च होत नाही, शिवाय रस्त्यावरच्या माणसाला नाही बोलायचं आहे, अनेक वर्षांचा सहवास असलेल्या व्यक्तीबद्दल आहे हे. आणि अजून एक मला ज्वलंत प्रश्न पडला आहे तो असा हे त्यांच्या ऑफिस मधे, त्यांच्या हाताखाली किंवा बरोबर काम करणाऱ्यांशी पण असेच वागत असतील का? निश्चितच नाही ना, मग घरीच का? 

"ऍक्टिव्ह प्यासिव्ह व्हॉइस = कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग" सातत्याने वापरण्यासाठी शिकवला गेला आहे हे ध्यानात ठेवा, स्वतःच्या समाधानासाठी तरी वापरा, समोरच्याला बरं वाटेल म्हणून उपयोग करा, सकारात्मकता पसरवण्याची संधी म्हणून वापरा हो मंडळी म्हणजे असे अनेकजण पट्टाकिनी बरे होतील. नाही का?  

तफावत

आधीच्या काळी पायात जड, जाड आणि वैविध्य प्रकारच्या धाटणीतले, कातडे वापरून तय्यार केलेले बुटांचे असे बरेच प्रकार बघायला, ऐकायला मिळायचे. विविध देश फिरायला मिळाल्यामुळे तिथल्या वातावरणाला साजेसे, संस्कृतीयोग्य असे पण बूट बघितले, न्याहाळले आणि त्याची योग्यता समजावून देखील घेतली. आताशा गेली काही वर्ष हलक्याफुलक्या जोड्यांचा / बुटांचा जमाना येऊ पाहतो आहे. सहज सोप्या पद्धतीने काल-घाड करता येतील असे. बुटांच्या प्रकारांबद्दल बोलू तेवढं थोडंच आहे. पण आज मी त्याच बुटाच्या साथीदाराबद्दल खरं तर सुतवाच्य करणार आहे ते म्हणजे मोजे. अगदी लोकरीचे, कापसाचे, नायलॉन तत्सम धागा वापरून घडवलेले, नायलॉन + कापूस आणि बरेच प्रकार. काही खेळाडूंना अगदी घुढग्यापर्यंत उंच मोजे, तर काही जरासे खाली, पायाच्या घोट्यापर्यंतच, अंगठा असलेले, कातडीच्या रंगांचे, आणि आताशा तर दिसेनासे पिटुकले. अशी प्रचंड श्रेणीचं आहे ह्या मोज्यांच्या प्रकारांची. मोजे हे पाय, पायांमुळे / पायांशी संदर्भात होणारे  नैसर्गिक बदल ह्यांच्यातील आणि बुटांमधला खरं तर दुआ आहे. मोज्यांच एक अनन्य सामान्य महत्व आहेच, पायांसाठी, बुटांसाठी आणि आजूबाजूच्या इतर लोकांसाठी देखील. मोज्यांचा रंग कचेरीत जातेवेळी कसा असावा हे देखील फार महत्वाचे असते. मोज्यांचं असं  महत्व डावलून चालणारंच नाही. पण आताशा मला हे आढळून आलं आहे कि मोजे न परीधान करणे हि एक फॅशन आहे मोठ्या समजणाऱ्या लोकांमधे, त्यामागची कारणे मला ठाऊक नाहीत. 

दररोज मी ऑफिसला जातेवेळी काही फर्लांग एका वस्तीतून बाहेर पडते त्यावेळी माझ्या चार डोळ्यांनी हे टिपले कि बरीशी शाळकरी मुलं शाळेला जायलाच फक्त महत्व देतात. कधी त्यांचे बूट फाटलेले किंवा नवीन नसतात, मोजे नसतात किंवा घातलेले नसतात, कधी गणवेश असतो नसतो, पण ते घोळक्याने मार्गक्रमण करतांना दिसतात, थांबत नाहीत, असंख्य तक्रारी करत बसत नाहीत, वेळ घालवत नाहीत. हि आर्थिक तफावत मला प्रकर्षाने जाणवली. एका गटाकडे नाही, परवडत नाही, गरज भासत नाही, ध्येय फक्त गाठायचं आहे ई. तर दुसऱ्या गटाकडे मोजे असून, विकत घ्यायची ताकद असून वापरले जात नाही असंख्य कारणांमुळे किंवा आळस म्हणून, कोणासठाऊक. अक्षरशः दर दिवशी मला काही ना काही नवीन अनुभवयाला मिळतंच ऑफिसला जाते-येते वेळी. "माझ्या कडे हे नाही ते नाही..." अशी रडगाणी जे गातात त्यांनी ह्या अश्या सामान्य गटाकडे निश्चित बघावे, आणि यश / उंची गाठण्यासाठी सरस किंवा कष्टाने कमावलेल्या उच्च पदस्थ लोकांच्या एकंदरीत पदपथकाकडे.   

मी ह्या आधी एकदा एका अनुकथेत लिहिल्या प्रमाणे लग्नासाठी स्थळ बघायला गेलात आणि फाटलेल्या मोज्यातून जर बोटं / अंगठा बाहेर डोकावतांना नजरेस पडला म्हणजे काही तरी व्यक्तिमत्व आणि व्यक्तिव ह्यात घोळ आहे हे निश्चित, अहो सरते शेवटी संपूर्ण आयुष्याचा मामला आहे, नाही का? 

बघा असे हे पिटुकले मोजे पण काय काय शिकवतात आणि दर्शवतात. 

Learn, earn and return

For many years in a row, I have looked forward to this uniquely different day, whose turn comes only once a year. Yesterday was one such day. I was waiting to meet everyone, and they finally arrived; "they came and they conquered." They returned to their memory lanes and talked about infrastructure and their entire four-year lives, among other things. Wow, beautiful moments, awesome memories, and what not—I was truly speechless. All were professionally dressed and looked great, and the beginning of their success was visible not only on their faces but also in their drastically altered body language. All that is a bit difficult to express using my tiny vocabulary, seriously. Listening to our own students turn professionals, meeting them in person, seeing their glorified faces—that is enough to make any teacher happy. Yap, you got it; it was convocation day yesterday, and many of the passed-out students made it for this day all the way from Assam, Chennai, Bangalore, and many other places, most of them with their parents. All of the parents were overjoyed to be able to hold that massive degree certificate, mementos, marksheets, and so on firmly and proudly in their hands. The HoD of our department used the phrase "learn, earn, return" while welcoming all respected parents and students, as the phase of typical learning is over, earning has already started, and next is to give it back to society, parents, and the institute in the form of consistent connections, exchange of ideas, imparting technology to juniors, etc. After we felicitated all the toppers, I was literally in tears. Being a parent myself, I am looking forward to enjoying this very moment after around 2.5 years more with my kiddos. During my graduate and postgraduate studies too, we used to go to the university’s office to get the degree, or the degree-certificate used to come home by post. Such grand events with parents and teachers were never organized. Hence, it is more prestigious for me to enjoy this with my kids as all the parents did it yesterday. Even the parents’ faces were glorified with joy, fulfillment, and satisfaction. The meaning of the word "convocation" starts with "the assembly of..."; it was indeed the assembly of emotions: success, professionalism, utmost satisfaction, pride, victory, etc., to name a few. I hope to be a part of many more such magnificent gatherings in the future. 

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०२२

अर्धवट

माझ्या लहानपणीचे दिवसचं काही और होते. का कुणास ठाऊक पण माझ्या आईला काही तरी समज / गैरसमज होता. माझ्या सारखी मागे लागली असायची गळ्यात छोटीशी साखळी घाल, हातात एखादी बांगडी असू दे, कानात घालावं, छोटीशी अंगठी हवीच . बाप रे. नेहेमीचंच असायचं तिचं. अर्थात त्यावेळी सगळं सोन्याचं, खोटं घालण्याची प्रथा पण नव्हती आणि सुरक्षितता होती हे महत्वाचं. दिखावा म्हणून नाहीच मुळी पण (थोडीशी मोठी झालेल्या) मुलीची व्याख्या तिच्या दृष्टीने अशी होती म्हणून. मी कधी ऐकायचे, कधी नाही ... असो. एवढ्यात मी काही तरी बघितलं किंबहुना माझ्या चार डोळ्यांनी ते टिपलं असं म्हणणं जास्त योग्य आहे. दक्षिण भारतात भरपूर सोनं परिधान करण्याची सवय आहे किंवा प्रथा आहे, मुलींमध्ये किंवा लग्न झाल्यावर जास्त. ठळक दागिने असतात त्यांचे. इतके ठळक कि सहज नजरेस पडतातच, कुठलेही कष्ट घ्यावेच लागत नाहीत. मी काही वर्ष हैदराबादेत वास्तव्याला असल्यामुळे मला जरा ते जास्त जाणवलं. मी एका मुलीला बघते जी अशीच एका दाक्षिणात्य भागातली आहे ती भलं मोठं त्यांच्या पद्धतीचं गळ्यात घालते कदाचित मंगळसूत्र असावं, आणि अर्थात सोन्याचं. पण कानात, हातात खोटं. आणि ते खोटं इतकं खोटं असतं कि पट्टाकिनी निदर्शनास येतंच. हा अर्धवट प्रकार मला अजिबात समजला नाहीच. सोनं घालण्याची आणि मिरवण्याची ताकद आहे मग का असं? आणि ते खोटं कुठल्याही रंगसंगतीशी जुळणारं देखील नसतं, मग का? घालायचं आणि मिरवायचं तर शिस्तीत, ऐटीत, नाहीतर नाही, म्हणजे हे फक्त माझं म्हणणं झालं बरं का, आणि ते दिसायला पण खूपच विजोड दिसतं. आजकाल इतकं अतरंगी कोणी घालून येत नाही सहसा म्हणून विचार आला सहज मनात, बाकी काही नाही. थोडसं लक्ष दिलं कि, रंगसंगती जुळवली कि, स्वतःला आणि इतरांना पण उत्साही वाटतं. दागिन्यांतच नाही तर आपण सर्वार्थाने जेवणात, वागण्यात, बोलण्यात, उठण्यात, बसण्यात एकसूत्रता राखावीच.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...