मंगळवार, २० डिसेंबर, २०२२

सामान्य-गरम-गार

कस्टर्ड नावाचा एक चविष्ट पदार्थ आहे आणि शिवाय पौष्टिक देखील. अर्थात ह्या सर्वांच्या आवडीच्या पदार्थाचं मूळ केळीच्या शिक्रणात दडलंय. केळीचे शिकरण हा कोणत्याही वयोगटात आवडीने खाता येणारा, काही क्षणात करता येणारा असा पदार्थ. कुठलीही पूर्व तय्यारी नको, गॅस नको, शिजवायला नको. कस्टर्ड करायचं म्हणजे साग्रसंगीत सगळं लागतंच, वैविध्य चवींची कस्टर्ड पावडर, दूध, फळं, फळांचा मगज / गर, सुकामेवा आवडीनुसार हवा असल्यास ई. आधी दूध गरम करून त्यात एका विशिष्ट्य पद्धतीने, एका ठराविक तापमानात ती कस्टर्ड पावडर मिसळायची, ती एकजीव तर व्हावी लागतेच शिवाय प्रमाणात घट्ट देखील, नाहीतर सुगरणीच्या हातचा पदार्थ होणार नाही. उगाचच घाई, गडबड करून चालत नाहीच हा भन्नाट पदार्थ करते वेळी. गॅस जरा मोठा ठेवला कि खाली लागलंच / करपलंच म्हणून समजा. करपलं कि चव पूर्णपणे बिघडते. सगळी मेहेनत वाया जाते ते वेगळं. ते गरम केलेलं दूध ज्यात कस्टर्ड पावडर एकजीव झाली आहे मग आधी साखर घालून थंड होऊ द्यायचं, मगच बारीक चिरलेली आवडीची फळं त्यात घालायची, स्वादीष्ट रुचकर चव यायला. अनेक ताजी फळं आणावी लागतात, धुवून, बारीक चिरून घालावी लागतात. ती एकमेकांसोबत चवीत भर घालतील कि नाही हे देखील बघावं लागतं, ऋतू, वेळ, प्रसंग, निमित्य काय ई. पण बघावं लागतंच. घरच्यांना, पाहुण्यांना वाढण्याच्या आधी शीतकपाटात ठेवावं लागतं, थंड गार झाल्यावर लज्जत वाढते, आणि ती चव बराच काळ जिभेवर रेंगाळते. पण हे सगळं मिळण्याकरता आधी गॅस वर, गरम, मग शांत सामान्य तापमान, मग थंड अश्या सगळ्या टप्प्यातून जावंच लागतं. 

अगदी तस्सेच आपल्या सर्वांचे पण असते, नाही का? कधी आपण स्वतः विविध टप्प्यातून जातो, अती उष्ण, अती थंड, किंवा सामान्य ई. अगदी तसेच बाकीचे देखील जात असतात, परिस्थिती बदलत असते आणि आजूबाजूचे वातावरण देखील. पण सरतेशेवटी गोळाबेरीज चविष्ट अशीच घडते नाही का? मग सर्वांनीच थोडा धीर धरला तर?, वाट पहिली तर?, वेळ दिला तर? नक्की विचार करा आणि मग कृती. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...