लग्नाच्या किंवा कुठल्याही शुभ कार्याच्या वेळी हातावर आणि किंवा पायांवर काढलेली सुंदर कलाकृती म्हणजे मेहेंदी. हे तर सर्वश्रुत आहेच. तिचं एक महत्वाचं अढळ असं एक स्थान आहे आपल्या संस्कृती मधे. अशी सुंदर कलाकृती काढली म्हणजे त्या हाताचं सौंदर्य कित्येक पटीने वाढतं. ते ठराविक पद्धतीने रेखाटलेलं चित्र मग नैसर्गिक रंग धारण करतं. हिना काढायला लागल्यापासून ते रंग चढल्या नंतर सुद्धा कित्ती तास एक अलौकिक सुगंध देतो. तो रंग, ते रेखांकन, सजावट त्या धारण करणाऱ्याला आणि बघणाऱ्याला दोघांना आनंद देऊन जाते. प्रत्येक मेहेंदीचं आणि प्रत्येक हाताचं एक खास वैशिट्य आहे. कुठली मेहेंदी कुठल्या हातावर किती रंगेल हे ठाऊक नसतंच, पण तीचा रंग चढतोच. संपूर्ण मेहेंदी काढण्याच्या प्रक्रियेत खूप ऊर्जा मिळते, आनंद प्राप्त होतो, उत्सुकता निर्माण होते, हिरवी-केशरी-गडद तपकिरी ह्या रंगछटा, गारवा-कडकपणा, अर्धवट टवके आणि अश्या सगळ्या स्थिती मुळे एक वेगळीच रंगत चढते. शरीरातली नैसर्गिक उष्णता कमी करण्याचं काम हि मेहेंदी करते. रक्ताभिसरण करणे, चिंता दूर करण्यास मदत करणे, आणि बाकीचे काही किरकोळ प्रकृतीच्या तक्रारी दूर करणे हे सर्व मेहेंदी मूळे साध्य होते. मेहेंदी काढणारी व्यक्ती काही मिनिटे हात धरून ठेवते, त्यामुळे देखील एक प्रकारचे ऍक्युप्रेशर घडत असणार नक्की, कळत - नकळत. ते देखील काही अंशी भन्नाट वाटण्यासाठी कारणीभूत ठरत असणारच.
म्हणजे सौंदर्य + सुगंध + औषधी गुणधर्म + प्रेरणा देणे = मेहेंदी, एक संपूर्ण, परिपूर्ण असे पॅकेज.
ह्या सर्व अगणित कारणांमुळे सण, वार, लग्न, समारंभ ई. वाट मग का बघायची. सवड काढून मेहेंदी अधेमधे काढावीच, भरपूर सदुपयोग होतो, शिवाय काढणाऱ्याची उजळणी होते, त्यांचा व्यवसाय चालतो आणि एक छोटेखानी सोहोळा अनुभवायला मिळतो अधूनमधून खूप जणांना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा