आज माझ्या लेकीला फारच आवडते म्हणून कोरडी लसूण चटणी केली. कोरड खोबरं किसून घेतलं, दाण्याचं कूट तर होतंच आणि लसूण सोलले रे सोलले कि मला माझ्या आईची जशी काही हाकच ऐकू आली. आमच्या लहानपणी म्हणजे ९वी-१० वी त मिक्सर घरी आला तो वर पाटा वरवंट्यावरच सगळे वाटण, चटण्या होत असतं. त्यावेळी हि आणि नंतर मिक्सर आल्यावरही लसूण, मिरची वगैरेचे बारीक तुकडे करून घ्यावेत असं आई म्हण्यायचीच. आजही वाटलं कि ती मला सांगते आहे तेच पुन्हा. कुतूहलाने विचारलं तर म्हणायची कशी पाट्यावर वाटतांना कशाला त्रास, आणि वेळ पण जास्त लागणार अख्खा लसूण वाटायला. मिक्सर आल्यावर पुन्हा मी तोच प्रश्न विचारला तर म्हणते कशी अगं वेळ आणि वीज वाया जाईलच पण त्या मिक्सरला कशाला त्रास जास्तीचा. त्यापेक्षा करावे कि तुकडे, पट्टाकिनी आणि एकसारखी मोकळी चटणी व्हायला मदत होते. "मिक्सरला त्रास" हि संकल्पना फारच भावली मला, इतकी वर्ष झाली पण अजून आठवण ताजी आहे.
शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१
Just another talk with my daughter…
आठवणीतली गोधडी
कार्बन पेपर
अनुकथा (माझ्या मुलांचे विश्व) - "मांडा - पाडा"
माझी पिल्लं अगदी छोटी होती तेव्हा आमच्या कडे एक खेळ होता. अनेकविध रंगांचे प्लस्टिकचे एकात एक मावणारे कप होते. ते ठेवायला फार सोप्पे असायचे कारण फार थोडी जागा लागायची त्याला. त्याला मी फिरवत असे गर्र्कन, त्याच्या रंगांमुळे मला मुलांना विविध रंगांची मराठी आणि इंग्लिश मधे ओळख करून देता आली. मी एक एक ते छोटा कप डोक्यावर घेऊन खाली पडायची "दही घ्या दही" म्हणत, आणि मुलांना मज्जा यायची. त्याच कपाबरोबर मी ते एकावर एक मांडायची आणि चेंडू ने ते मग लगोरी सारखं पडायचं. ओह किती भन्नाट अनुभव तो आणि दिवस होते ते. चेंडू नसला तर त्यातलाच एक कप घ्यायचा आणि पडायचं. मुलांचेही कृतिकौशल्य (motor skills) विकसित होण्यास मदत होत असे ह्या छोटयाश्या खेळा मुळे. थँक्स माझ्या डॉक्टर ना कारण परवा त्यांच्या कडे गेले होते आणि त्यांच्या एका खोलीत लहान मुलांचे असंख्य खेळणी ठेवली आहेत, तिथे त्यांनी माझं फिसिओ थेरपी सेशन घेतलं, त्यात हे माझं "मांडा - पाडा " पण होत. अस्स वाटलं ना कि ताबडतोब घेऊन खेळावं. सगळे दिवस आठवले मला. एका त्या छोट्याश्या कपासोबत किती वैविध्य प्रकारे खेळता येत होत. आणि "मांडा - पाडा" हे नामकरण हि मीच केलेलं, किती छोटीशी गोष्ट पण नेहेमीच आठवण देऊन गेली.
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...