•थंडीची चाहूल लागताच आमची
कन्यका आली तिची थोडीशी उसवलेली गोधडी घेऊन. मग म्हटलं सुई दोऱ्याचा डबा पण आणून
दे. पडत्या फळाची आज्ञा जशी, तशी फक्त तिने तो डबा आणून दिला. देवा त्यात सगळ्यात
वर बरेचसे धागे एकात एक गुंतलेले दिसले. मग म्हटलं कुठून सुरवात करावी. तर आधी तो
गुंता सोडवण्याचं मी ठरवलं. गुंता सोडवता सोडवता मला माझे भरतकाम आणि विणकामाचे
दिवस आठवले. कधी कधी त्यात हि असेच धागे सोडवावे लागत होते / वापरावे लागत होते.
मी दहावी नंतर, तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतांना आणि नोकरी करता करता फार हौशीने आणि
नियमीत भरतकाम, चित्रकला, आणि बरेच काही करत असे. त्यानंतर आमच्या शेजारी एक नवीन
लग्न होऊन वाहिनी राहायला आली. तिला पण प्रचंड शौक ह्या सगळ्या गोष्टीचा. पण तिचे
काम प्रचंड शिस्तीचं. ती म्हणायची कि उदारणार्थ एक फुल भरायला जास्तीत जास्त १५
मिनिटे, त्या पुढे नाही. आणि असं केलं तरच आपल्याला अंदाज येतो कधी आणि किती
भरायचं ते आणि बरेच काही टिप्स दिले तिने.
•आमच्या कडच्या छोट्याश्या
दोऱ्यांचा गुंता सोडवता सोडवता मी लक्ष्मीनगरात फेर फटका मारून, सगळ्यांना भेटून,
पुन्हा एकदा ते दिवस आठवून आले देखील. गुंता कधी सुटला, मी कधी गोधडी शिवली हे
माझं मलाच कळलं नाही.
•
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा