बुधवार, २२ मार्च, २०२३

माझ्या डायरीतलं अजून एक पान

माझ्या संपर्कांत आलेल्या असंख्य लोकांपैकी एक खास, माझी मैत्रीण म्हणायला हरकत नाही, ती तशी वयाने, मानाने, अनुभवाने मोठी होती / आहे माझ्यापेक्षा पण तरीदेखील आमची एकदा जी ओळख झाली आणि अजून टिकून आहे. आमच्या तारा फार पट्टिकिनी जुळल्या तेव्हा. तिचाच एक किस्सा येथे नमूद करावासा वाटतो आहे, थोडक्यात सांगते, मुद्द्यावर येते. 

तर तिला एक गोंडस बाळ झालं, थोडसं उशीरा सामाजिक दृष्टीने, आणि काही कारणास्तव तिने झटकीपट निर्णय घेऊन उपचार घेतले आणि त्याचा परिणाम म्हणून हे बाळ जन्माला आलं. उपचार घेणे हा फक्त तिचा एकटीचा धडाडीचा निर्णय होता आणि स्वप्नात देखील हे तिच्या विचारपल्याड होतं कि तिने ते नवऱ्या व्यतिरिक्त अजून कोणाला सांगावे.  गरजच नव्हती. ती दोघे आणि डॉक्टरची फौज च फक्त सगळं सांभाळत होती. पण एकदा नवरोबांनी नकळत काही वर्षांनी ते जगजाहीर केलं आणि सासरी सांगून टाकलं त्या मुलाच्या जन्माचं रहस्य / कहाणी / प्रोसेस. बास मग काय, वर्षाव सुरु झाला त्या दोघांवर. इति सासरकडचे: "तरीच आम्हाला फरक जाणवतं होताच, फक्त आम्ही तो बोलून दाखवला नाही कधी तुला, तुझा मुलगा अगदी ढ आहे, तो कधीच पुढे येणार नाहीच, काहीही करू शकणार नाही, काय करून ठेवलंस हे तुझं? आयुष्य बरबाद केलंस, आता तुझं कसं होणार?....." आणि हे पाढे सुरूच राहिले सतत, खूप वर्ष. ती भीती मग माझ्या मैत्रिणीच्या पण मनात घर करून बसली कारण खूपच प्रमाणात ते सातत्याने सांगितलं जायचं, कुटुंबातल्या बाकी मुलांसोबत सतत तुलना केली जायची आणि काही विचारू नका. तसं पाहिलं गेलं तर त्या मुलाची वाढ अगदी बाकी कुठल्याही मुलाप्रमाणे होत होती, आहे, म्हणजे शारीरिक, सामाजिक आणि मानसिक ई. पण का कुणास ठाऊक भीती मुळे कदाचित ह्या माउलीने कळत - नकळत थोडीशी जास्त कडक शिस्त बाळगली, सगळं शिक्षण व्यवस्थित पार पडलं, पुढील खास क्षेत्रातलं शिक्षण घेणं सुरु आहे, मित्र मैत्रिणी आहेत, मुलगा जगावेगळा हुशार नाही पण ढ नक्कीच नाही आहे.  जरी ह्या भीतीचा माझ्या मैत्रिणीच्या तब्बेतीवर जगावेगळा परिणाम झालाच, भोगावं लागलं, भोगते आहे, पण मुलगा वेगळा नाही निघाला. जगभर असंख्य पालक वैविध्य कारणास्तव वेगवेगळे उपचार घेतात, बाळं जन्माला येतात आणि सगळं सुरळीत होतं देखील. इतका मोठा काळ मधे सरला, तिने मग गूगल विद्यापीठाला विचारलं, शोधलं, शोध निबंध वाचले / चाळले, ठराविक प्रतिष्ठित डॉक्टर्स शी संवाद साधला आणि फरक जाणून घेतला. हे आधी करायला हवं होतं. असो. पण सरते शेवटी सर्वानुमते दोन ठळक गोष्टी समजल्या  

१. नैसर्गिक पद्धतीने किंवा उपचार घेऊन बाळ जन्माला आलं तरी दोन्ही सारखेच असतात आत बाहेर, काहीही फरक नाहीच 

२. नैसर्गिक पद्धतीने किंवा उपचार घेऊन बाळ जन्माला आलं तरी दोन्ही मधे कुठलीही खात्री नसते कि कुठलं बाळ किती हुशार असणार, ते समाजात कसं मिसळणार, त्याची वैचारिक पातळी काय असणार, त्याची वाढ कशी होणार ई. किंबहुना कधीच कशाचीच कधीच खात्री नसतेच, नाही का?

इतक्या खालच्या पातळीला जाऊन, गरज नसतांना त्रास देणं ते देखील स्वतःच्या मुलाला, सुनेला आणि नातवाला हे शिक्षित लोकांचं लक्षण नाहीच मुळी. अर्थात 

जे होतं ते चांगल्यासाठी एवढंच काय ते खरं. आणि जशी कुठल्याही पद्धतीने बाळ जन्माला आलं तरी काहीही फरक नसतो हे त्या सासरकडच्यांनी सिद्ध केलं, ते स्वतः नैसर्गिकरीत्या जन्माला आले, तरी इतकी साधी वागण्याची पद्धत ज्यांना समजत नाही त्यांचा कायच उपयोग, कोण हे इतक्या अधिकाराने बोलणारे, ना उच्च विद्या विभूषित, ना डॉक्टर्स, ना प्रेमळ आई वडिल. असो, हा न संपणारा विषय आहे. 

सोमवार, २० मार्च, २०२३

तो बदल

माझ्या लहानपणीपासूनच अनुभवलेलं लिहायचा मला अधिकार आहे, त्या आधी काय होत होतं ते नकोच. तर मी नेहेमीच भल्या मोठ्या घरात वावरले. त्या वेळी गगनचुंबी इमारती असतात हे देखील मला ठाऊक नव्हतं. शहरात राहून सुद्धा बैठी घरं, बंगले त्या भोवती सुंदर फुललेला, सुगंधाने बहरलेला, सुशोभित, शानदार बगीचा. त्यात असंख्य फुलझाडं, फळांची झाडं, वेली, वृक्ष, भाज्या, दुर्वा, नक्की एखादं कडुलिंबाचं झाडं, आंब्याचं झाडं ई. लावलेले आणि जपलेले असायचेच. सगळंच घरी, हेच बाळकडू मिळालेलं. सर्वत्र हेच वातावरण आणि हिच प्रथा, एक सारखं सगळं आजूबाजूला, जमीन अस्मानाचा फरक नाहीच मुळी. त्यामुळे प्रत्येक धार्मिक कार्याला सगळं घरीच उपलब्ध असायचं, पत्री, फुलं, पानं, अगदी विड्याची पानं देखील. नसतीलच काही कारणांनी तर शेजार देखील बहरलेला आणि फुललेला. त्यात आई, आजी मंडळी घर उत्कृष्ट सांभाळणारी, त्यामुळे सगळं पुढच्या फाटकापासून ते मागच्या आंगणापर्यंत लखलखीत, सजलेलं, संभाळलेलं असंच. काहीच बघायला नको. प्रत्येक पूजा बहुतांशी घरचेच लोक करायचे, पण गुरुजी आलेच तर ते फक्त स्वतः यायचे, पूजा करायचे, दक्षिणा प्रसाद घेऊन निघून जायचे.  आता फ्लॅट संस्कृती + घरची स्त्री उंबरा ओलांडलेली, त्यामुळे मग गुरुजी हा संदर्भ बदलला, पुरता बदलला. सगळे सामान गुरुजींनी आणणं जास्त सोयीस्कर झालं. आता यजमान फक्त बसतात तय्यार होऊन, बाकी सगळं गुरुजी घेऊन येतात. ३६० अंशाचा असावा हा बदल नाही. अर्थात पूजा होणं महत्वाचं, ते संस्कार, लहरी / तरंग (व्हाईब्ज) निर्माण होणं अत्यावश्यक, पूजेसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट उपलब्ध होते त्यामुळे, काहीही कमी पडत नाही, सर्वांनाच समाधान आणि सुकर असा हा बदल. 

माझ्या सोसायटीत एक मस्त-मौला काकू राहतात. त्या हाडाच्या शिक्षिका आहेत, एक वेगळं रसायन देखील आहेत आणि आता निवृत्त झाल्या आहेत. त्यांनी काल एक पोस्ट शेअर केली आम्हा सर्व मुलींसोबत. त्यात असं नमूद केलं होतं कि "स्वयंपाकाच्या मावशी सुट्टीवर आहेत? तर स्वीगी नकोच आता. शेफ ला कळवा तो / ती येऊन तुमच्या घरी स्वयंपाक करून खाऊ घालेल". अप्रतिम भन्नाट अशी कल्पना आहे हि. मला तर फारच आवडली. मी अजून त्या संकल्पनेचा व्यवस्थित आढावा घेतला नाही, चौकशी केली नाही किंवा चर्चा देखील. पण करीन म्हणते, लवकरच. असं काही उपलब्ध असेल तर कित्ती छान ना, अमृततुल्य असे घरचं खायला मिळेल, चव बदल आणि शिवाय दिज्जग व्यक्तीच्या हातचं जो ह्यात माहीर आहे, अहाहा च. वर नमूद केलेल्या गुरुंजी सारखा तो पण जर सगळं साहित्य, इंडक्शन कुकर, कुटुंब संख्येनुसार भांडे घेऊन आला तर फक्त घरच्यांनी वीज उपलब्ध करून द्यायची आणि यथेच्छ खायचं, बास. कित्ती मस्त ना, म्हणजे जे शेफ झालेत त्यांना खूप मोठी गुंतवणूक करून त्यांचे रेस्टॉरंट सुरु करायला नको, ते सांभाळायला नको, लोकं येतील कि नाही ह्याची चिंता तर नकोच, जाहिरातीचा खर्च नको, खुर्च्या, टेबल, वाट्या चमचे ई. काहीच पसारा नको. जशी गरज तसे घरोघरी जा मस्त स्वयंपाक करून खाऊ घाला आणि पैसे कमवा.  मी तर अगदी फिदा च झाले हि संकल्पना ऐकून, ज्याच्या कोणाच्या सुपीक डोक्यातून हि आली असेल त्याला साष्टांग नमन. हो अर्थात माझ्या लहानपणीपासून लग्न कार्याला येणारे स्वयंपाकी बघितले आहेत मी, पण ते यायचे जेव्हा फार मोठ्या प्रमाणात आणि काही दिवस भरपूर करावं लागायचं तेव्हा. त्यांची पूर्ण चमू यायची. हे शेफ प्रकरण अत्याधुनिक आहे, एकट्याचा खेळ आहे.   

आमच्या माहितीतले दोन गुरुजी आहेत ज्यांनी पूजा करून भला मोठा बंगला बांधला आहे पुण्यात, दुसरे गुरुजी होंडाची सर्वात मोठी गाडी मधून मिरवतात.  ह्याचा अर्थ सरळ आहे कि हा दिसतो छोटा व्यवसाय, एकाने चालवलेला पण मस्त चालतो. प्रत्येक शेफ चे आपले दुकानचं असावे असं थोडीचं आहे. 

सौंदर्य प्रसाधन गृहाचे पण अगदी तसेच आहे नाही का? भला मोठा खर्च, गुंतवणूक करण्यापेक्षा घरोघरी जाऊन सेवा द्यायची आणि कमवायचं, समाधानाने. 

सरते शेवटी घरच्या खाण्याची सर कुठेच नाही. स्वस्थ खा आणि मस्त राहा. एकदा शेफ ला घरी बोलावून तर बघा, आवडेल तो बदल सर्वांना. 

रविवार, १९ मार्च, २०२३

लेस इज मोअर

 मी ह्या आधी लिहिल्या प्रमाणे, अगदी लहानपणी पासून छोट्या छोट्या गोष्टी वाचायला प्रचंड आवडतात. मोठीच्या मोठी कादंबरी ज्यात लांबलचक कथा सुरूच राहते हे शांतपणे संयम बाळगून वाचत राहणं हे माझं काम नाहीच मुळी. कथा सुरु होऊन, संपून त्याचं तात्पर्य समजलं कि दुसरी कथा, असं मला खूप आवडतं.  हि माझी जुनी सवय आता अत्याधुनिक पद्धतीने गोष्टी सांगतात तेथे पण सुरु राहिली आहे. युट्यूब च्या माध्यमातून सांगितलेल्या पण बऱ्याच अप्रतिम गोष्टी आहेत आणि त्या मी बघत असते, आनंद घेत असते, पण पुन्हा एकदा छोट्या, कमी वेळेच्या. तंत्रज्ञानामुळे खूप सुंदर वाखाणण्यासारखे बदल झाले आहे जाहिरात क्षेत्रात देखील आणि अनेक व्यवसाय त्याचा बखुबी उपयोग करून घेत आहेत. जाहिरातींच्या नावाखाली सुंदर गोष्ट सांगितली जाते, त्या पात्र पण असतात आणि संदेश देखील. मोठ्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्या कंपन्या उतरल्या आहेत इथे आणि त्यामुळे माझ्यासारखीला ती एक पर्वणीच आहे, पोटभर सुख भोगते मी त्या सगळ्या गोष्टी बघून. भंडार आहे अक्षरशः अश्या गोष्टींचा ऑनलाईन, बघावं तितकं नवलंच आणि न संपणारं असं. 

एक मुलगी एका मुलाशी ऑनलाईन व्हिडीओ चॅट करत आहे असं पाहिलं दृश्य आहे आणि त्याने सुरवात होते. ती किंचितशी नाही पण जरा जास्त वैतागलेली दाखवली आहे कारण मुलगा परदेशी असतो, ३ महिने काम आहे म्हणून जातो आणि आता काही ८ महिने झाले असतात असा संवाद चालू असतो तेवढ्यात दारावरची घंटी वाजते.  तशीच ती दार उघडते तो त्या मुलाचे आई-वडील दारात उभे, ती व्हिडीओ चॅट स्क्रीन तशीच चालू, आधीच गोंधळ त्यात वाढतो. तेवढ्यात त्याची आई एकमेकांना हाय हॅलो करून झाल्यावर विचारते "देऊ का रे? सांगू का एकदाचं?". काही समजायच्या आत मुलाची आई गुढग्यावर बसून सुबक, सुंदर, देखणी, मौल्यवा, तरुण आंगठी पुढे करत म्हणते "करशील माझ्या मुलाशी लग्न?". तिला काय उत्तर द्यावं ह्या बद्दल समजत नाही. सासू (होणारी): "ह्या वयात गुढगे दुखतात गं, जास्त वेळ नाही बसता येणार मला".  

हे सगळं मंत्रमुग्ध होऊन मी बघत होते आणि मी उडाले, हरवले, एक वेगळीच अनुभूती आली. कित्ती म्हणजे कित्ती ताकद असते ह्या माध्यमांमधे. ते प्रेक्षकांपर्यंत पोचत नाहीत साधे तर काळजाला भिडतात, थेट, आरपार. आणि त्या पल्याड म्हणजे मी ह्या सर्वांकडे फक्त जाहिरात म्हणून नाही तर हे बघितलं कि त्या सातासमुद्रापार असलेल्या त्या मुलाने हि अशी भन्नाट आयडियाची कल्पना आधीच्या पिढीतल्या आई-वडिलांना सांगायची, ती त्यांनी स्विकारायची आणि अमलात आणायची, हि सगळी प्रोसेस कित्ती वेगळी आहे. हे असं कुठेतरी, कोणाबरोबर तरी प्रत्यक्षात घडलं असणार आहे म्हणून ते जाहिरात स्वरूपात माझ्या सारख्या सामान्य प्रेक्षकाला दिसलं आणि समजलं. ज्या कुटुंबात हे बीज पेरलं गेलं त्याच्या बद्दल बोलण्यास माझ्याकडे एकही शब्द नाहीच माझ्या शब्दकोशात. अशी माणसं पण आहेत? ह्या जगात? हे ऐकून, बघून, जाणून धन्य झाल्यासारखं वाटलं. किती तरी पिढ्या ना मस्त पद्धतीने कित्ती आणि काय-काय शिकवून गेलेत बघा काही मिनिटांच्या जाहिराती मधून.  धन्य तो मुलगा ज्याला हे असं सुचलं, त्याहून धन्य ते आईबाबा ज्यांनी फक्त तय्यारी दाखवली नाही तर अत्यानंदाने कृती केली, हो म्हटले, तरुण दिसणारी आवडेल अशी सुंदर आंगठी विकत घेतली, मुलीच्या घरी आले, सरप्राईझ दिलं, अत्याधुनिक पाश्यात्य पद्धतीने गुढग्यावर बसून ऐटीत मागणी घातली, कोणाची बिशाद हो ह्या नंतर नाही म्हणायची? अहाहा च.  

बहुतांशी वर्तमानपत्रात किंवा इथेतिथे ऐकून, वाचून आपण नकळत सैरभैर होतो, कारण वर्तमान पात्रात अगदी पहिल्या पानांपासून भरपूर नकारात्मक बातम्या असतात. कुठंतरी शंका-कुशंका घर करतात. त्यात कामाचा ताण, आणि बरीच बाकीची कारणं. अश्या ह्या दलदल वाटणाऱ्या परिस्थितीत सुगंधी, प्रसन्नता वाढवणारं कमळ उगवावं अशी हि जाहिरात. नकारात्मकता समूळ नष्ट करून सकारात्मकता, उत्साह, ऊर्जा, ताकद निर्माण करणारी अशी हि गोष्ट. हि जाहिरात किंवा अश्या पद्धतीच्या वेगळ्या धाटणीतल्या जाहिराती, शॉर्ट फिल्म्स मोठ्या प्रमाणात जनसमुदायापर्यंत पोचाव्यात हि अपेक्षा. 

वैचार्य आणि जिभभान

देहभान ह्या सदराखाली एक खास लेख इतक्यातच वाचनात आला. त्यात लेखकाने गंभीर नाही पण एका ज्वलंत विषयाला हात घातला आहे. त्या लेखाचा विषय / शीर्षक बघितल्यावर उत्सुकतेने मी तो वाचायला घेतला आणि अगदी शेवटच्या ओळीपर्यंत माझी ती उत्सुकता कायम होती, कारण माझी नजर काहीतरी वेगळं शोधत होती. ते महत्वाचं असं मला आता वाचायला मिळेल, पुढील परिच्छेदात मिळेल असं वाटलं. अनेक पेहेलू, वैविध्य घटक मांडले आहेत लेखकाने, अतिशय खोलात जाऊन, विचार करून असे. असो. माझे काही विचार आहेत हा लेख वाचल्यानंतर किंबहुना ह्या विषयाबद्दल ते आता मी थोडक्यात येथे मांडते आहे. 

"डाय एम्प्टी (Die Empty)" नावाचं एक जगप्रसिद्ध पुस्तक, वाङ्‍‍मय, एक साहित्यातला शिरोमणी असलेलं माझ्या वाचनात आलं, मग आम्ही त्यावर चर्चा देखील केली एकत्र. त्या पुस्तकाचा विषय जरी वेगळा असला तरी तो गाभा कायम टिकवून मी भारतीय कौटुंबिक पार्श्वभूमीवर आधारित लिखाण करावं हा प्रकर्षाने विचार करते आहे. मूळ पुस्तकाचा विषय हा प्रत्येकाच्या डोक्यात येणाऱ्या अप्रतिम, सुंदर, नाविन्यपूर्ण कल्पना आणि त्या बद्दलचा उहापोह हा आहे. लेखकाच्या म्हणण्यानुसार नवीन कल्पनेला मूर्त रूप द्या, चर्चा करा, स्वतःकडे जपून / लपवून ठेवू नका, मोकळेपणाने / उघडपणे सांगा आणि अमलात आणा. सगळ्या अप्रतिम कल्पना उराशी बाळगून, त्याचं जडत्व / ओझं सांभाळत निघून जाऊ नका. मोकळे व्हा. 

तसेच प्रत्येकाला जे दुसऱ्यामधे चांगलं दिसतं, आढळतं ते सांगून मोकळे व्हा. भारतीय लोकांची सवय हि आधी हातभार लांब यादी करायची आणि उणेदुणे काढायची आहे.  न विचारता  लांबलचक यादीच द्यायची काय काय चुकतं ते. खूप क्वचित चांगले उद्गार मुखातून निघतात, पट्टाकिनी. 

माझी सर्वांना मनापासून विनंती आहे कि चांगलं बोला, जे आवडलं आहे ते समोरच्याला सांगा, कृतज्ञता व्यक्त करा, गोड बोला, प्रोत्साहन द्या ई. हे मी काही थोडके शब्द किंवा संज्ञा इथे दिल्या आहेत. आणि हे सर्व प्रथम घरच्या, आपल्या माणसांसाठी निश्चित करा, बाहेरच्यांसाठी तर आपण करतोच. आणि मग बघा प्रत्येक नाती कशी फुलतील, बहरतील आणि टिकतील ते. आपल्या माणसाला गृहीत धरून सारखं घालून पाडून बोललात तर कुठलीही कृती हि मनापासून, आवडीने, उत्साहाने घडणार नाही. घरातलं वातावरण पण मग दूषित होऊ शकतं आणि माझ्या दुर्ष्टीने हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहेच. प्रत्येकजण अगदी प्रत्येकजण चार चांगल्या शब्दांचा भुकेला असतोच. मध पेरा जिभेवर आणि बघा तरी स्वतःला कित्ती म्हणजे कित्ती भन्नाट वाटतं ते. "अती तेथे माती", हे लक्षात ठेवून उगाचच, धरबंध नसल्यासारखं गोड पेरू नका, मधुमेह होईल नाहीतर. पण उगाचच मोठे आहात म्हणून, अधिकारी आहात म्हणून, किंवा तुमची सवय म्हणून रागावू नका, चुकीचे शब्द बोलू नका, भरमसाठ अपेक्षा ठवू नका, पुढच्यांचा विचार करा आणि बघा तुम्हाला किती समाधान वाटेल ते. तुमचा दृष्टिकोन बदलाचं मंडळी, स्वतःसाठी तरी. ह्या अश्या पद्धतीने एक्सिट घ्या, "डाय एम्प्टी (Die Empty)". नाण्याला दुसरी बाजू असतेच हे लक्षात असू द्या, "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे", फक्त मी काय ते महान बाकीचे नाही हि धारणा चुकून बाळगत असाल तर संबंध बिघडलेच म्हणून समजा. समोरच्याला प्रेम, आपुलकी, काळजी, हवीशी वाटणे होईल ते फक्त मधामुळे. सातत्य महत्वाचं. कोणीही काहीही एकट्याने करूच शकत नाही, आपल्या जवळचा व्यक्ती हि तितक्याच पातळीवर, कणभर जास्त करत असते, ते दिसत असतं पण बोलून दाखवायला जातं नाही सहसा कोणी, आणि मग कुरबुरी सुरु होऊ शकतात, ज्या मग वेगळ्या वळणावर येऊन थांबतात.  तो मार्ग निवडण्यापेक्षा मधाळ रस्ता बरा, नाही का? प्रयोग म्हणून तरी करून बघा, बाकी कश्याची गरज भासणार नाहीच. फुकट आहे उपलब्ध फक्त ते जाणून बुजून नक्की वापरा. जिभेवर साखर पेरण्याकरता समोरच्याचा तसा विचार व्हायला हवा सर्वप्रथम. 

(With due respect to the writer and his deep thought process, giant experience etc behind this article) बाकी लेखात मांडलेले मुद्दे हे गौण ठरतील जर अँप्रिशिएट करण्याची सवय बाळगली तर. "पेराल ते उगवेल" त्या पद्धतीने, अँप्रिशिएट करा आणि ऍप्रिसिएशन मिळवा, करत राहा मिळवत राहा, कुठलीही इच्छा पूर्ण करणे सोप्प आहे कि नाही?

शनिवार, १८ मार्च, २०२३

झोप

एवढ्यातच माझ्या एका मैत्रिणीशी फोन वर बोलणं झालं आणि तिने एक किस्सा सांगितलं. ती आणि तिची एक नातेवाईक आजी म्हणे खूप दिवसांनी फोन वर बोलत होत्या. त्या आजींना बोलता बोलता हि म्हणाली कि रात्री लवकर झोप येते आताशा दिवसभराच्या दमणुकीमुळे. तेव्हा आजी म्हणतात कश्या "बरी येते ग झोप तुला? मला तर खूप त्रास होतो, झोपच लागत नाही". त्या नंतर माझ्या मैत्रिणीला वाटलं उगाच जास्तीचं बोलून गेले, कशाला नको ती माहिती द्यायची? आणि त्या नंतर तिला तिच्या झोपेचे काही किस्से आठवले आणि माझ्या देखील कडा ओल्या झाल्या. त्यातले काही खाली नमूद करते आहे. 

माझी एक अगदी लंगोटीयार, शाळेपासूनची सख्खी मैत्रीण, अत्यंत म्हणजे पराकोटीची आवड झोपण्याची. झोप म्हणजे तिचं औषध देखील. बाकी काहीही लागत नसे, कधीही कितीही वेळ अगदी मनापासून झोप आवडायची. ह्याचा अर्थ ती जाड होती, आळशी होती असं मुळीच नाही. अभ्यासात बऱ्यापैकी हुशार, कामात पुढे, सर्वांची आवडती, गाडी चालवणे, मग शिक्षण, नोकरी, स्वयंपाक, घरातली कामे, विणकाम-भरतकाम  ई. सगळं नेटकं करायची, पण त्या व्यतिरिक्त झोप.  झोप येत नाही हा प्रकार पण जगात असतो हि तिला माहित देखील नव्हतं. तर अशी हि माझी सखी समाज नियमानुसार मग पुढच्या पायऱ्या चढत गेली, मोठी नोकरी, पुढील शिक्षण, लग्न, दोनाचे चार वगैरे. नवरा फिरतीची नोकरी असलेला होता, बऱ्याचदा गावाबाहेर, देशाबाहेर असायचा. आधी तिची गैरसमजूत होती कि त्याला त्याचं ऑफिस पाठवतं आहे कामानिमित्य, पण काही वर्षांनी समजलं की हाच उड्या मारत मुद्दाम बाहेर जात असे. कारणं माहित नाहीत. त्यामुळे एक खांबी तंबू सारखे सगळं हि जमेल तसे करत असे, घरचे, बाहेरचे, मुलांचे ई. मग नवरा कैलास मानसरोवर, एव्हरेस्ट कॅम्प, हि चढाई, ती ट्रेक, इथे जा तिथे जा असं पण करू लागला, काहीच चूक नाही त्यात, पण त्यामुळे महिना महिना गायब साहेब. काही ठिकाणी अजिबात महिनोन्महिने संपर्क नाही, दोन लहान मुलं घरी, फारच मोठी जबाबदारी आणि भीती पण, मुलांना सांभाळण्याची, त्याला काही झालं तर? त्यात ऑफिसचं काम. ह्या सगळ्यात झोप म्हणजे काय? हे ती विसरलीच. संपर्काबाहेरच्या ठिकाणी गेला नवरा कि महिना भर दिवसा ऑफिस आणि रात्रभर जागी. आता हे असं सगळं केल्यामुळे किंवा शारीरिक बदल, ह्या सगळ्यांमुळे तब्बेतीवर प्रचंड परिणाम झाला इतका कि तो कधीही म्हणजे कधीही न भरून निघणारे असे नुकसान. 

त्यामुळे त्या आजींना तिला सांगावसं वाटतंय कि आता पुन्हा ती झोप एन्जॉय करते आहे.  

कठडा

भारतात, पुण्यात किंवा इतर शहरांमधे साधारण १५ एक वर्षांपूर्वी बांधलेली घरं म्हणजे फ्लॅट. महानगरात फ्लॅट हा थोडासा परवडणारा उपाय आहे. फ्लॅट म्हटला कि एखादी बाल्कनी आलीच. बाल्कनी म्हणजे मोकळी / उघडी जागा, जागेच्या सभोवताली असलेला कठडा, त्यावर बार्स / ग्रिल ई. तो कठडा कदाचित ह्या करता बांधतात कि एक तर त्या ग्रिल / बार्स ना एक आधार शिवाय एक सीमा किंवा कुंपण असल्यासारखे, एक आधार किंवा एक सभोवतालचं बांधकाम ई. त्या कठड्याला एक रुंदी, उंची आणि जाडी असते. त्यावर / त्याच्या आधारे बार्स बांधलेले असल्यामुळे कठडा असून सुद्धा त्यावर बसता येत नाही. मध्यमवर्गीय लोकांना सहसा घर म्हटलं कि हिरवळ आणि चार झाडं, त्यामुळे बाल्कनीत कुंड्या ठेवायची सवय आहेच. छोट्या, चपट्या, आयताकृती अश्या कुंड्या मावतील देखील ह्या अश्या कठड्यावर पण बाल्कनी हि घराबाहेर चा भाग असल्यामुळे बऱ्याचश्या सोसायटीत कुंड्या कठड्यावर मांडण्याची परवानगी नाहीच.  मग तसं बघितलं गेलं तर त्या कठड्याच्या सपाट भागाचा खरं काही उपयोग नाहीच. पण सपाट भाग असल्यामुळे त्यावर धूळ प्रचंड साठते, घाण होते, पालापाचोळा ई. पडतो आणि शिवाय ती साफ करतेवेळी प्रचंड काळजी घ्यावी लागते. नाही तर खालून जाणाऱ्यांची दुसऱ्यांदा आंघोळ व्हायची. हे सगळं अनेक वर्ष बघून आज सहज एक डोक्यात आयडियाची कल्पना आली. सपाट भागाशिवाय जर तिरकस किंवा आतल्या भागात उतार असलेला असं बांधला तर? खूप घाण साठणार नाही आणि धुतांना / पुसताना अगदी सोप्पे होईल, खाली जाणाऱ्यांची आंघोळ होणार नाही आणि सगळं पाणी बालकोनीतच पडेल? कित्ती सहज सोप्पं आहे ना? मग का करत नाहीत हे बांधकाम व्यवसायी?

किंवा आधी कठडा देऊन मग नियम करण्यापेक्षा नाही दिला इतका मोठा कठडा, आडवा देण्यापेक्षा उभा दिला तर जास्त सोयीचं होईल माझ्या दृष्टीने. 

गरज किंवा उपयुक्तता हिचं नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची पहिली पायरी आहे. वापरायला लागलं कि मग त्या वस्तूचे फायदे आणि तोटे दिसायला लागतात, नवीन पद्धती सुचवता येतात आणि अश्या पद्धतीनेच एक व्यक्ती / एक व्यवसाय / एक जागा / एक देश पुढे जातो, प्रगती करतो. वास्तुतज्ञांना माझ्या चार डोळ्यांनी टिपलेले असे हे छोटेसे निरीक्षण आवडेल आणि ते ह्यावर नक्की विचार करतील हि अपेक्षा.    

मंगळवार, १४ मार्च, २०२३

पौष्टिक गरम भेळ-उपमा

मी मागे अनेकदा उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या घरी ज्या स्वयंपाक करणाऱ्या मावशी आहेत त्या माझ्या स्वयंपाक घरात उभ्या उभ्या हिंडून येतात, कुठे भटकून येतात कुणास ठाऊक?, दुबई का अमेरिका?, पण जातात हे खरं. किंबहुना, माझ्या स्वयंपाक घरात निश्चित नसतात हे खरं. आताशा माझा त्यांच्याबद्दलचा इतका गाढा अभ्यास झाला आहे कि त्यांच्या चालीवरून, घरात शिरण्याच्या पद्धतीनुसार, उत्तर देण्याच्या पद्धत / संभाषण ह्या वरून पट्टाकिनी समजतच. आज देखील दौऱ्यावर होत्या बहुदा, लांब पल्ल्याच्या, त्यामुळे त्यांनी फारच उच्च दर्जाची पौष्टिक न्याहारी करून मला खाऊ घातली. मला विचारल्यासारखं केलं, मी सांगितलं व्यवस्थित, त्यांनी केलं, मी खायला घेतलं आणि उडालेच. मस्त, भन्नाट, नाविन्यपूर्ण पदार्थ मी पट्टदिशी फस्त केला घड्याळाच्या काट्याकडे नजर ठेऊन. खाता खाता हे विचार आले, म्हटलं मांडव इथे, म्हणून हा पंक्ती प्रपंच हो. 

माझ्या पुढ्यात होता तो उपमा. त्याला खरं काय उपमा देऊ हेच समजायच्या आता मी तो संपवला देखील. आज उपवास असल्यामुळे बाकीच्यांसाठी खिचडी होती, हा जगविख्यात उपमा फक्त माझ्या साठी पेशल तय्यार केला गेला होता. त्यामुळे माझी ती नैतिक जबाबदारी होती संपवण्याची. घरी केलेला, गरमागरम, पहिल्या वाफेचा, किंचित तुपाची धार असलेला, कांदे, गाजर, उडीदडाळ, अर्थात मिरची कढीपत्ता सहित साग्रसंगीत असा तो. पोह्यावर, ते देखील घराबाहेर टपरीवर का माहित नाही पण कच्चा कांदा वरून पेरून देतात काही ठिकाणी. संध्याकाळी भेळेत कच्चा कांदा बरा वाटतो, पण सकाळी? खातात बरेच लोकं. असो. पण उपम्यावर कोणी वरून कच्चा कांदा वाढलेला, किंवा घेतलेला मी कधीच बघितला नव्हता. आज मला दुग्धशर्करा योग अनुभवता आला. गरम उपमा आणि ना शिजलेला ना कच्चा माल त्यात. वा, म्हणजे वा च. कोथिंबिरीत रवा होता का रव्यात कोथिंबीर हा पण यक्षप्रश्न पडला मला. पण मज्जा आली, काय ते प्रत्येक वेळी एकसारखं खायचं? विविधता पाहिजे कि नाही?, "एका दगडात दोन..." हो आज, भेळ पण आणि उपमा पण, गरम भेळ. सगळ्या भाज्यायुक्त, अर्ध कच्या, घरी केलेला म्हणजे मस्त पौष्टिक असा. अहाहा, माझ्या दिवसाची सुरवात अतिशय अप्रतिम पद्धतीने केल्यामुळे शतशः धन्यवाद मावशींना. भटकंतीला गेल्या होत्या तेथे शिकून आल्या कदाचित हा असा नवीन पदार्थ आणि ताबडतोब वेळ वाया न घालवता, विस्मरणात जाण्याआधी मला खाऊ घातला देखील. दिसतं होता तो आंतरराष्ट्रीय, परदेशी स्पर्श भारतीय उपम्याला. म्हणून म्हणाले मंडळी, बहुतांशी त्या भारताबाहेर गेल्या होत्या चक्कर मारायला हे सिद्ध झालं जे मला वाटलं होतं, आहे कि नाही मी हुशार?

उद्घाटन

आपण अनेक वर्ष हे बघितलं आणि अनुभवलं आहे कि बहुतांशी कुठल्याही नवीन उद्योगाचं, कामाचं उदघाट्न हे फीत कापून केलं जातं. फीत कापण्या करता दिग्गज, अनुभुवी, प्रथितयश, जेष्ठ अश्या व्यक्तिमत्वानां आमंत्रित केलं जातं. फीत कापली कि त्या नव्या ठिकाणी प्रवेश, मग त्या नव्या उद्योगाची माहिती, दर्शन आणि भेटीगाठी ई. त्या कार्यक्रमात समाविष्ट केले असते, थोडक्यात गोडी. मग ते आमंत्रित चार शब्द बोलतात, आशीर्वाद देतात, संभाषण करतात आणि त्या नंतर इतर जणांना प्रवेश दिला जातो वगैरे. फीत कापणे ह्या पद्धतीची सुरवात म्हणे १८०० साली झाली, अमेरिकेत पहिले आगगाडीचे इंजिन सुरु होते वेळी. खात्रीशीर माहिती नाही, आणि त्यानंतर ती प्रथा सुरु राहिली. 

भारतीय पद्धतीनुसार कुठलीही नवीन सुरवात म्हणजे एक बंधन असते. जसे कि लग्न, मुंज, राखी, मैत्र्य आणि इतर असे बरेच. लग्नात उपरणं आणि शाल ह्याची गाठ बांधली जाते, मान्यवरांना फेटा / पगडी बांधले जाते, हातात विशिष्ट मंत्रोच्चारात धागे + हळकुंड बांधले जाते, बोटात देखील काही तरी बांधतात. मुंजीच्या दरम्यान पक्की गाठ बांधून (काही ठिकाणी विविध छोट्या आकाराच्या गाठी बांधून) जानव्ह् गळ्यात घातलं जातं, एक बंधन म्हणून. राखी पण मनगटावर बांधली जाते, मंत्रवून अनेक पूजे दरम्यान (उदा. वास्तू) पवित्र धागे बांधले जातात, मैत्री दिवस सुद्धा रंगबिरंगी तरुण पद्धतीचा बँड बांधून साजरा करतात (नवीन झालेली मैत्री किंवा जुनी नावीन्याने भरपूर असावी + टिकावी म्हणून)... अशी अनेक उदाहरणे देता येतील. 

भारतीय परंपरेनुसार जर नवीन सुरवात बंध निर्माण करून होते तर मग उदघाट्न फीत कापून का? हा मला पडलेला ज्वलंत प्रश्न आहे, का? कुणास ठाऊक. बरं, कापून झाल्यावर त्या फितीचं काय होतं? कदाचित फेकून दिली जाते. ते दोन तुकडे सांभाळून, व्यवस्थित फ्रेम करून, त्याच व्यवसायाचे दुसरे / तिसरे ठिकाण उघडतांना पुन्हा वापरले जाते का? तर नाही. मग जर हे फक्त १. फोटो पुरते, २. इतर सगळे करतात म्हणून, ३. जाहिराती साठी अशी कारणे असतील तर माझ्याकडे ह्या पेक्षा जास्त चांगले पर्याय आहेत, आणि ते असे:

  • जेष्ठ, श्रेष्ठ, दिग्गज व्यक्तींना आमंत्रित करा आणि त्यांना एक बंद / धागा / बँड / राखी असे काहीतरी आणायला सांगा, त्यांच्या पद्धतीचे, आवडीचे असे 
  • उदघाटनाच्या प्रवेश द्वारात दिप प्रज्वलन करा, तोरण आधीच लावले असतेच 
  • मग एक सुंदर, शोभिवंत / सुशोभित असा खांब किंवा वस्तू ठेवा ज्याला आणलेले धागे / बँड बांधता येतील 
  • बांधतांना प्रत्येक दिग्गजाने त्या बँड बद्दल, रंगा बद्दल, पद्धती बद्दल, आणि नवीन वास्तू / उद्योग किंवा ज्याचं उदघाट्न आहे त्या बद्दल बोलावे
  • अश्या पद्धतीचा बँड / बांधण्याची वस्तू का निवडली, त्याचा काय संबंध ह्या नवीन उद्योगाशी असे काहीसे सांगावे 
  • ती सर्वांनी भरभरून आशीर्वाद देत बांधलेला खांब / तत्सम गोष्ट प्रवेशद्वारात नेहेमी करता जतन करावी 
  • प्रत्येकजण बांधतांना, बोलतांना, समजावून सांगतांना फोटो काढावे 
  • हे फोटो जाहिराती साठी उपयोगी ठरतील, नक्कीच 
  • फीतच वापरायची असेल तर गणपती बाप्पांच्या मूर्ती भोवती मांडल्यासारखी ठेवावी, मनात प्रार्थना करावी, साकडं घालावं उद्योगाची भरभराट व्हावी म्हणून 

असे असंख्य आणि मस्त वेगळे पर्याय आहेत, अजमावून बघायला काय हरकत आहे. 

प्रत्येक जण जेव्हा हे असे बंध बांधेल तेव्हा टाळ्या पण वाजवाव्यात. उदघाट्नकाराला थोडासा जास्त अभ्यास निश्चित करावा लागेल, अगदी किंचित खर्च करावा लागेल ते बँड / धागा विकत आणायला, विचारपूर्वक शोधून बँड घ्यावा लागेल, त्या करता थोडीशी भटकंती होईल, पायपीट होईल पण ती मुल्यवान ठरेल हे निश्चित. 

अगदी प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट कपडे, मोबाईल, घड्याळ, खायला, घरातल्या वस्तू, गाडी अगदी सगळं नावीन्याने भरपूर लागतं मग उदघाट्न नवीन भारतीय / आपल्या मूळ पद्धतीने का करायचं नाही? काही जणं होम-हवन, पूजा-अर्चा पण करतात उदघाट्न करते वेळी आधी, घरच्या, जवळच्या माणसांसोबत आणि मग फीत कापण्याचा कार्यक्रम होतो. (आधी ओवाळायचं, मग मेणबत्ती विझवून केक कापायचं, असं काहीसं). 

रिबीन देखील मूळ उपयोगाची बांधण्याकरता असते, तेव्हा बांधा, कापू नका जमल्यास, नवीन सुरवात करतेवेळी. अनेक वर्ष उद्घटनाच्या वेळी एकचं एक समारंभ बघून कदाचित वेगळं करावं असं मनात आलं असेल माझ्या. अजमावून बघा, आवडलं तर कृतीत आणा. 

सोमवार, १३ मार्च, २०२३

आंधळी कोशिंबीर

लहानपणी अत्यंत आवडीने खेळलेला खेळ. काय नाव? कोशिंबीर काय? आंधळी समजू शकते मी, असो. 

ध्यान धारणा, म्हणजे काही तरी नावीन्यपणा निश्चित धारण करायचाच असतो आणि तो म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करणं. उघड्या नेत्रांनी असे होणे नव्हेच. त्यामुळे अंतर्चक्षूंना आणि बाह्य पण तात्पुरते, प्रयत्नपूर्वक बंद करणे अत्यावश्यकच. किंबहुना सहजतेने ते घडतं सवयीने, सरावाने. डोळे बंद म्हणजे अंधारमय भासणारं जग. थोडं वयाने प्रगल्भ झाल्यावर पुन्हा एकदा ह्या तात्पुरत्या अंधाराचं महत्व किंचित लक्षात आलं. खेळात बाह्य पट्टीचा आधार घ्यावा लागत होता, येथे स्वतः बंद करून ठेवायचे होते, हा महत्वाचा फरक. 

सर्वत्र, जगभर, वेळोवेळी, संत, कृषी, मुनी, आधुनिक संत, श्रेष्ठ आणि इतर अनेक काही काळ डोळे बंद करण्याचे महत्व, फायदे, सर्वोत्कृत्ष्ट प्रभाव ई. सांगून हाताच्या बोटावर मोजण्याइतके जण त्याचा भक्तिभावाने वापर करतात, करतांना दिसतात. खूप पद्धतीने सांगून झाले तरी देखील प्रकाश पडत नाही म्हटल्यावर मग "त्याने" वेगळीच क्लुप्ती शोधून काढली, किंबहुना त्याला गवसली माणसांच्या असंख्य विचित्र सवयींमुळे. आधी फक्त ऋतूत बदल म्हटला कि साधारण सर्दी होत असे. बास. आणि ते देखील फक्त पावसाळा आणि हिवाळा बरं का मंडळी, जरा डोळे बंद करून भूतकाळात फेरफटका मारा, ध्यानात येईल.  आणि ती सर्दी काही कालावधी पूर्ती मर्यादित असायची. संपला विषय. मग आली उन्हाळ्याची पेशल खास अशी सर्दी, त्यानंतर उठसुठ सर्दी + त्याचे असंख्य / अगणित अस्थिर, अवघड, चंचल प्रकार. मी इतके व्यक्तिमत्व बघितले आहेत कि जे सर्दीविना नसतातच मुळी अर्थात त्याला एक खास प्रकारची प्रकृती असं संबोधलं जातं शारीरिक शास्त्रात. मला असा गोड गैरसमज होता कि असा अनुभव फक्त आणि फक्त मलाच येतोय, पण नाही हो, कितीतरी शेकडो लोकांना येतो, तो म्हणजे साधारण वाटणाऱ्या पण असाधारण असलेल्या नवीन सर्दी प्रकारात डोळे आपोआप बंद होतात. किंबहुना डोळे बंद झालेले जास्त सुखदायक, दिलासादायक, शांतीवर्धक वाटतात. "स्क्रीन हेच जीवन" झालेल्या माणसांनो डोळे बंद करा दररोज, काही काळ, ध्यान करा, श्वासाकडे लक्ष द्या, चिंतन-मनन-लेखन-गप्पा करा आणि जगा / जगू द्या. मुद्दाम / जबरदस्ती डोळे बंद होणे नको कृपया. पळा पण विसावा पण घ्या नक्की. नाही तर "आंधळी कोशिंबीर" ह्या खेळासारखं व्हायचं, कुठे जायचं / कसं जायचं हळू का जोरात? ठाऊक नाही, मुद्दाम दिशाभूल करणारे आढळतील, चाचपडायला लागेल सतत आणि ध्येय गाठलं जाईल ह्याची शाश्वती दिसणार नाही.   दोन नैसर्गिक टिकले नाहीत काही कारणास्तव, त्यामुळे दोन अनैसर्गिक लाभले, ह्या पुढे ६/८/१० अशक्य, ह्या नंतर शून्य. त्यामुळे जागे व्हा, आणि डोळ्यांना वेळोवेळी ठरवून विश्रांती द्याचं, स्मार्ट घड्याळ, तिथून सुटले रे सुटले कि मोबाईल, मग लॅपटॉप तदनंतर हे नाही तर ते, मागे पुढे चालूच अखंड. 

नाका पेक्षा मोती जड

मी एकंदरीत मराठमोळ्या वातावरणात अनेक वर्ष सुखाने नांदले, इंग्लिश चा किडा कामापुरता चावला कारण पर्याय नव्हता म्हणून. त्यामुळे अगदी लहानपणी पासून घरा दारात असंख्य म्हणींशी दोस्ती झालीच नकळत, कधी कोणास ठाऊक. प्रथमदर्शनी नको वाटायचं त्या सगळ्यांशी खेळायला, किंबहुना त्यांचा वाक्यात प्रयोग करायला, कारण कदाचित तेवढी प्रगल्भता आली नव्हती, किंवा तो दुर्ष्टीकोन जागृत झाला नव्हता. का कुणास ठाऊक पण गेले अनेक वर्ष माझ्या लेकरांसोबत मोठं होतांना मज्जा आली, खूप शिकता आलं आणि म्हणी ह्या त्यातला एक प्रकर्षाने उपभोगलेला भाग नक्की होता आणि आहे. 

तर त्याचं आज असं झालं, मी बऱ्याचदा सांगितलं आहे कि पिटुकले विषय माझ्या समोर सहज उभे ठाकतात, का? कसे? ई. ना सारून मग माझी आधुनिक तंत्रज्ञानाने लाभलेली लेखणी काम सुरु करते. अर्थात फक्त आज झालं असं नाही, आज झाल्यावर मग लक्षात आले ह्या आधी घडलेले तत्सम प्रसंग. वा, भन्नाट मज्जा आली. तर एक कोणीतरी मुलगी आज माझ्या समोरून गेली, एकदा, दोनदा, तीनदा अख्या दिवसभरात वेगवेगळ्या वेळी. तिच्या पायांनी माझं लक्ष वेधलंच. कारण ती उंचीला थोडीशी कमी, साधारण बांध्याची सामान्य, सर्वसाधारण दिसणारी भारतीय तरुणी होती. मी तिला ओळखत नाही, त्यामुळे तिच्या दृश्य तपशीला पेक्षा जास्त मला कुठलीही कल्पना नाही तिच्या बद्दल. गणवेश घातला होता तिने आणि अती-उंच / विचित्र-आकाराने-अती-उंच टाचेचे बूट परिधान केले होते. त्या व्यतिरिक्त ते दिसायला इतके मोठ्ठे होते कि ज्याचं नाव ते. रंग-संगती पण विसंगत होती, जगावेगळी हो. प्रथमदर्शनी तरी वाटलं कि "दादाचे घातलेत चुकून झोपेत, घाईत, आपत्कालीन स्थितीत" ई., पुनः दर्शनी जाणवलं कि फॅशन च्या नावाखाली असेल, पुनःपुन्हा दिसली तेव्हा ते मिसफिट, विजोड, अनावश्यक वाटले, माझा अर्थाअर्थी तिच्याशी, तिच्या जोड्यांशी / बुटाशी कुठलाही संबंध नाही, गरज देखील नाही, पण पुन्हा पुन्हा चार डोळयांना दिसली, दृष्टीस पडली म्हणून विचार उत्पन्न झाले मनात, एवढंच ते काय. 

बाब तिथे थबकली नाही हो, मला एक नवीन अर्थ देऊन गेली "नाका पेक्षा मोती जड" ह्याचा. मी शेवटचं वाक्य तय्यार केलं होतं किंवा वारंवार ह्या म्हणी बद्दल ऐकलं होतं ते नवरी जास्त शिकली असेल नवऱ्या पेक्षा तर सगळेच जण उच्चारायचे. किंवा त्या लग्नोत्तसूख मुलीला नकार मिळायचा, कारण जड मोती नाजूक नाकाला सांभाळणं प्रचंड अवघडंच नाही तर अशक्य, त्याचे दुष्परिणामच जास्त, उपयोगापेक्षा म्हणून. अगदी त्या सगळ्या प्रसंगांची प्रकर्षांने आठवण झाल्याशिवाय राहिलं नाहीच मला, "पायांपेक्षा जोडे जड". ना आपण सीमेवर भारताची / देशाची रक्षा करण्याची जबाबदारी घेतलेले, त्यांना हे असे बूट शोभतात आणि गरजेचे असतात. त्यांची शरीरयष्टी पण जगावेगळी असते, त्यांना शिक्षण दिले जाते ते तसे बूट बाळगायचे. त्या व्यतिरिक्त अजून असे जबाबदारीचे खूप व्यवसाय आहेत जेथे असे जोडे अत्यावश्यक असतातच.  कुठलीही तुलना नाही, पण मला कणभर कारण समजलं नाही तिने का असले बूट परिधान केले होते ते? आत्ता देखील ठीक नाहीच, पण मग नंतर त्याचा कुठल्याही शारीरिक भागावर दुष्परिणाम व्हायला नको म्हणजे मिळवलं. स्वतः खड्डा खणण्यासारखं आहे हे. जपा स्वतःला कृपया. कुठलेही ओझं बाळगू नका, शारीरिक, मानसिक, सामाजिक...    

रविवार, १२ मार्च, २०२३

ते आणखीन एक रहस्य

नाटकं, नृत्य समारंभ, गाण्याचे कार्यक्रम, किंवा इतर रंगभूमीवरचे सगळेच कार्यक्रम इतके आवश्यक का असतात ह्या मागचं आणखीन एक महत्वाचं रहस्य आज मला समजलं, प्रकर्षाने जाणवलं. एक बाजू म्हणजे ते कलाकार, त्यांना काम मिळावं, त्यांची कला सादर करण्याची संधी मिळावी, अनेक विषयांना हात घालता यावा ई. साठी तर आहेच आहे पण दुसरी बाजू प्रेक्षकांची आहे, ती पण कणभर जास्त महत्वाची. ऑनलाईन रंगमंच यायच्या आधी सर्व सादरीकरण रंगभूमीवर होत असे प्रत्यक्ष रूपात, म्हणजे कलाकार आणि प्रेक्षक ह्यांच्या उपस्थितीत, नाट्यगृहात किंवा तत्सम जागी. तोडीचे कलाकार हृदयाला हात घालणारे विषय, सामाजिक संदेश देणारे / पोटभर हसवणारे, प्रचंड मनोरंजन करणारे असे आणि तितक्याच भल्यामोठ्या प्रमाणात दाद देणारे प्रेक्षक, अनुभवी, दर्दी प्रेक्षक. आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणांहून उपस्थित राहिलेले प्रेक्षक, त्यामुळे सत्संग (म्हणजे फक्त भजन / कीर्तन आणि देव-देव नाही हो) म्हणजे नाटकाची आवड असणारे एकत्र २-३ तास सलग बसून परमानंद घेत असतं, मनसोक्त टाळ्या वाजवत असतं आणि खुश / समाधानी होऊन जातं असतं. तो एकत्रपणा + मोकळेपणाने वाजवलेल्या टाळ्या + सत्संग (व्हायब्रेशन्स) + जागा बदल + नाटक / कार्यक्रमाचे लागलेले वेध + कार्यक्रमानंतर केलेली चर्चा ई. गोळाबेरीज म्हणजे सुधृढ प्रकृती. तेव्हा अश्या कार्यक्रमांना जायचं म्हणजे एक सोहोळा असायचा जणू. तिकीट दर जास्त नसायचे, जातीचे कलाकार, उत्कृष्ट अभिनय, वातावरण निर्मिती, खळखळून हास्य आणि प्रत्येक वेळी वाजवलेल्या टाळया तब्बेत जपण्यास मदत करणारच, सवालच नाही. 

कुठलेही तुलना नाहीच, पण तंत्रज्ञानामुळे आणि इतर अनेक कारणांमुळे हे सगळं बंद पडत चाललंय, अगदी थोड्या प्रमाणात सुरु आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  तंत्रज्ञानामुळे जरी अनेक कलाकारांना संधी मिळत आहे, घर बसल्या सगळं बघायला मिळतं आहे तरी त्याची किंमत चुकवावी लागते आहेच. 

त्यामुळे एक नम्र विनंती, "टॉप उप" करायला, म्हणजे ऊर्जा, चैतन्य, उत्साह, स्नेह, आनंद, आणि असे इतर पेहेलू, मस्त घरी आरती करा, अधेमधे देवळात जा, नाटकं किंवा रंगमंचावर सादर होणारे साधे कार्यक्रमांना उपस्थिती लावा, "चला हवा येऊ द्या" अश्या सारखे अनेक हिरेजडित एपिसोड बघा, "व. पु. काळे" / "पु ल देशपांडे" लावा टीव्ही वर, यु ट्यूब वर, डोळे बंद करा आणि मनसोक्त आनंद घ्या, वातावरण निर्मिती होऊन जाऊ दे आज सुद्धा आणि टाळ्या देखील व्हायलाच हव्यात. अत्यंत गरजेचा रामबाण इलाज आहे तो, तेव्हा देखील होता, आज देखील आहे, उद्या पण राहणारच. सोप्पा आहे, फुकट आहे आणि जगावेगळे फायदे देऊन जाणारा आहे, फायदे फक्त देऊन थांबणारा नाही तर टिकविणारा देखील आहे.  सर्वप्रथम गरजेपुरती स्क्रीन वापरा, इतर वेळी वाचन, लिखाण, मनन, चिंतन, मोकळ्या हवेत फिरणं असं काहीसं करा, पण तंत्रज्ञान बाजूला ठेवूनच. आणि मग बघाच कसे मस्त रहस्यमय बदल घडतात ते.  

चाट का चॅट

 हे सर्वश्रुत आहे कि माझ्या पिढीने खूप काही गोष्टी प्रथमच अनुभवल्या आणि आता हे माझ्या मुलांना / विद्यार्थ्यांना सांगितलं तर किंचित आश्चर्य वाटतं त्यांना कि तुम्ही ह्या सगळ्यांशिवाय कसे जगलात आणि जिंकलात पण. झेरॉक्स हा त्यातलाच एक प्रकार. नुकतीच सुरवात झाली होती ह्या प्रकाराची. माझे बाबा मला नेहेमी सांगायचे आणि त्यात खूपच तथ्य होतं ह्यात कुठलेही दुमत नाहीच. त्यांचा ठाम विश्वास होता हाताने लिहिण्यावर. एकदा लिहिणं म्हणजे १० वेळा वाचण्यासारखे आहे असं म्हणायचे ते. लिहितो म्हणजे समजावून घेतो, बघतो, निरीक्षण करतो, ती छाप मग डोक्यात बसते, हाताखालून जाणे म्हणजे जी गोष्ट / कल्पना / संकल्पना / माहिती वाचली आहे, शिकली आहे ती पुन्हा कागदावर उतरवणे फेर नोट्स करण्यासाठी, किंवा असाइनमेंट करून मार्क प्राप्त करण्यासाठी. एक पद्धतीचा महत्वाचा सराव होतो, आधी काही ठळक बाबींचा, बेसिक गोष्टींचा आणि मग पुढील कठिण किंवा प्रगत बाबींचा त्याच विषयातल्या, संदर्भातल्या. एका जागी बसून लिहिणं हे त्यांच्या दृष्टीनेच नाही पण खरंच महत्वाचं असतं. त्यामुळे त्यांचा उठसूट झेरॉक्स ह्या संकल्पनेला कडाडून तात्विक विरोध होता. 

कुठलीही संकल्पना, परिकल्पना, संबोध, बोधकल्पना ई. शिकायचे टप्पे असतात, आधी बेसिक, मग त्याचा प्रत्यक्ष जीवनात वापर कसा करायचा विविध पद्धतीने ते शिकणं, त्या पुढे अजून कठिण / प्रगत किंवा आंतरराष्ट्रीय वापर ह्यावर उहापोह, चर्चा म्हणजे मग तो विषय किंवा टॉपिक्स आत्मसात करायला सोप्पे. आता जर कोणी दुसरे तुमच्यासाठी हे अश्या विविध प्रकारचे लेखन करून देणार असतील तर मग 

१.  तुम्ही काय करणार त्या वेळात?

२.  मूळ संकल्पनेला तडा जाणार 

३.  दुसऱ्याने लिहिलेल्या टॉपिक्स वर शेवटच्या परीक्षेत प्रश्न आला तर? सोडवणे कदाचित अशक्य आणि अवघडच ठरणार

४.  ती संपूर्ण शृंखला ऐकणे / वाचणे, समजणे, लक्षात ठेवणे, लिहिणे, वापर करणे, संदर्भ प्रस्थापित करणे ई. मोडीस निघणार 

५.  सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही कोणासाठी किती काय लिहून देता? काय करता? म्हणून दुसऱ्याने करावं?

मग तो गूगल बाबा असो, नाही तर चॅटGPT हे फुकटचं लिहून देतात, तात्पुरते मार्क्स मिळतात पण मग डोक्यात कधी शिरणार? आधी चॅटGPT ला विचारण्यात वेळ घालवायचा, गूगल वर शोधण्यात देखील, मग कसं तरी सबमिट करून मोकळं व्हायचं. परीक्षेच्या आदल्या रात्री तेच पुन्हा कसंतरी चाळायचं, एका गोष्टीसाठी दोन द वेळ वाया आणि शिवाय डोक्यात काहीच शिरत नाही नेहेमीकरतासाठी / कायमचं. मग त्याचा ताण, त्यामुळे सर्वांना दोश, पुन्हा त्याचा ताण, वेळ + ऊर्जा + पैसा + तब्बेत वाया ते वेगळंच. त्या पेक्षा ह्या सर्वांचा फक्त मदतनीस म्हणून उपयोग करा मंडळी, वापरा पण एक आधुनिक शिक्षक म्हणून बाकी काही नाही. त्याच्या कडे कणभर जास्त असेल, लेखन शैली जाणून घेण्यासाठी, नवनवीन पद्धती अमलात आणण्यासाठी त्या विषयातल्या, पण मग "देअर इज सम थिंग ऑन युअर शोल्डर यूज ईट" ते ओता, तुम्हाला त्यातून काय समजलं / उमगलं हे सांगा, ज्ञानात भर पडू द्या, त्या संकल्पनेचा वापर तुम्ही किंवा इतर कसे करू शकतात हे सांगा हो. तर त्या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग, सरते शेवटी तो कृत्रिम बुद्धिमत्ता लाभलेला आहे आणि तुम्ही बुद्धिवान एवढे कि त्या चॅटGPT ला घडवलं आहे. तो चॅटGPT जितकं जास्त लिहितोय तुमच्यासाठी तितका तो समृद्ध होतोय, तुम्ही लिहा + वाचा स्वतःच आणि जग जिंका. अवलंबून राहू नका कोणावरही, स्वावलंबी व्हा.  तो चॅटGPT  तुमच्यासाठी आहे गरज पडल्यास फक्त कधीतरी क्वचित. जर सातत्याने केवळ तो उपलब्ध आहे म्हणून वापरत गेलात तर चाट पडाल, तुमची खास ओळख / स्थान निर्माण करू न शकल्यामुळे.  

शनिवार, ११ मार्च, २०२३

ध्वनी आणि वायुप्रदूषण

माहित नाही का पण एकाच व्यक्तीची जयंती एका पाठोपाठ एक, म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कशी काय साजरी होते? कसं शक्य आहे ते? दिवस आणि तिथीनुसार असेल कदाचित, आणि काही जण तारखेनुसार तर बाकी तिथीनुसार साजरा करत असतील. माननीय, आदरणीय शिवाजी महाराजांसारखा राजा, त्याची जयंती हि एवढ्यात माझ्या डोळ्यादेखत दोनदा लागोपाठ काही दिवसांच्या अंतराने साजरी झाली. फेब्रुवारीत साजरी झाली ती ढोल पथक, शिवाजी राजांची मूर्ती किंवा पुतळा ह्यांची मिरवणूक, ते देखील शिस्तीत सजवलेल्या पालखीतून, अनवाणी पायांनी चालून, भारतीय वेशभूषा करून, मूर्ती स्थापना, पूजा, आरती ई. करून. काही प्रमाणात तरी साधं सोज्वळ होता हा सोहोळा. 

मार्चमधे / इतक्यातच कचेरीतुन परततांना सहज लक्ष वेधलं गेलंच कारण संपूर्ण भला मोठा रस्ता व्यापणारा केशरी झेंडा लावला गेला होता. संपूर्ण रस्ता केशरी झेंड्यांनी सजला होता. म्हटलं आता काय हे नवीन आणि संध्याकाळी कान फाटतील इतक्या मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु झाला. सगळेच हादरले कि नक्की काय होतंय किंवा काय झालंय? नीट कान देऊन ऐकलं तेव्हा काही क्षणातच उमगलं कि ह्या गोळ्यांचा कर्कश्य आणि सलग आवाज येतोय तो आधुनिक दुचाकीतून, रूपभेद केलेल्या सायलेन्सर मधून येणारा. शेकडोने होत्या गाड्या, ३-४ तास सलग चाललेला होता तो सोहोळा आवाजाचा,  ध्वनी आणि वायुप्रदूषण. पहिल्या दिवशी संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी तेच. हे असं केल्याने काय साध्य होते? इथे शिवाजी महाराज आणि त्यांची जयंती कुठून आली? अशी जयंती का साजरी करायची? शिवाजी महाराज तर पायी, घोड्यावरुन जायचे-यायचे, मग मोटार सायकल का? आणि त्या देखील शेकडोंनी? ह्या सगळ्यांना काही धरबंध नाहीत का? शेजारी पाजारी जेष्ठ नागरीक, नवीन जन्मलेले आणि रुग्ण, रुग्णालय, शाळा असतात. त्यांना त्रास होतोच पण ह्या अश्या मिरवणुकीत सामील झालेल्यांच्या कानांच्या नाजूक पडद्याचं काय? इतकं पेट्रोल महाग झालंय ह्यांना कसं काय परवडतं आणि हा असा अपव्यय का त्या ठरावीक साठा असलेल्या इंधनाचा. कोण परवानगी देतं ह्याला? बरं हे सगळं झालं माणसंच, मुक्या जनावरांचं, प्राण्यांचं, पक्षांचं, किटाणूंचं काय? धरतीमातेला प्रचंड, भयानक आणि असह्य असे हादरे बसतात त्याचं काय? काहीच घेणं देणं नाही का कोणालाच? शिवाजी महाराज ह्या पैकी कुठलीही गोष्ट कधीच सांगून गेले नाही, त्यांच्या कृतीने दाखवून गेले नाहीत. त्यांनी घडवलेल्या आदर्शांपैकी एक कण तरी का नाही आत्मसात करायचा? त्यांचे गड किल्ले का नाही जपायचे ह्या मोटरसायकलीत खर्च करण्यापेक्षा? दररोज, दरवेळी न चुकता मानसपूजा तरी हे मोटरसायकल चालवणारे तरुण करतात का? नतमस्तक होतात का? सर्व गावातल्या मोठ्या लोकांनी, राजकारणी व्यक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे आणि ह्या तरुण पिढीला समजावून सांगायची, ते ऐकतील अश्या भाषेत किंवा पद्धतीने. हे सर्वार्थाने थांबणे अत्यावश्यकच आहे, ताबडतोब, सुष्टीची सहन शक्ती संपण्याच्या आत. 

तो राजहंस एक

खरं तर फेब्रुवारीतच उन्हाळ्याची चाहूल लागली आणि आता मार्च मधे तर उन्हाळा व्यवस्थित सुरु झाला आहे असं वाटतं. अचानक खूप वर्षांनी गुलकंद दररोज सेवन करण्याचा भाव दाटून आला मनात, गेले दुकानात आणि आणला विकत, सेवन केला देखील आणि कडा झर्रर्रकिनी ओल्या झाल्या. काय हे? हि मीच का? गुलकंद विकत आणणारी माझी पिढी नाहीच मुळी. गुलकंद दुकानात मिळतो इथपासून मनाला पटत नव्हतंच पण मी थोडीशी धडपड केली आणि हात टेकले. मला समजायला लागण्या आधीपासून आईचा नित्य नियम गुलकंद सेवनाचा, दररोज, ठरलेलं, कधीही म्हणजे कधीही चुकलं नाहीच. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती खाऊ घालणार ठरलेलं माप, त्यात बदल नाहीच. स्वतःच्या हाताने घरी केलेला असला तरी हू म्हणून फस्त करायचा नाहीच. आमच्या घराच्या आकारापेक्षा कित्येक पटीने मोठी आमची बाग होती, चहू बाजूनी बहरलेली अशी. अगदी मनापासून, विचारपूर्वक लावलेली आणि जपलेली बाग. देशी गुलाब तो अंगणातला, आजोबांच्या गुऱ्हाळातला गूळ आणि साखर, प्रचंड मोठं समोर आणि मागे आंगण, ऊन बेताचं पण हवं तेवढं. बास, काही मिनिटात गुलकंद जेरबंद व्हायचा काचेचा बाटलीत. काही दिवसात खायला तय्यार. गुलाबाचा तो जगावेगळा अप्रतिम हलकासा सुगंध इतका मोहक असायचा, जपला जायचा गुलकंद तय्यार झाला तरी, ऊन खाल्ली तरी, आणि त्या पाकळ्यांची स्वतःची गोडी वाखाणण्या पल्याड अशी. त्यामुळे साखर फार कमी लागायची. चवी बद्दल बोलण्यासाठी माझ्या शब्दकोशात तरी उपमा नाहीच. 

कुठलीही तुलना नाही, पण आज त्यातल्यातात पौष्टीक अशी मनाची समजूत काढून मी एक घास घेतला आणि लक्षात आलं कि अजिबात गरज नसतांना साखरेचा पाक करून त्यात पाकळ्या घातल्या आहेत किंवा ह्या गुलकंदाने कधी नव्हे ते सुर्यबाप्पा शिवाय गॅस चे चटके सहन केले आहेत. आवेष्टन अक्का पॅकिंग पण प्लास्टिक चे आहे ह्या विकतच्या बाटलीचे. मला काहीच गंध नाही प्लास्टिक संबंधी, पण प्लास्टिक च्या बाटलीत उन्हात गुलकंद पौष्टीक होणार नाही कदाचित किंवा चव पण बदलेल. 

मी देशी गुलाबाच्या पाकळ्या कोठे मिळतात का हे शोधलं, मला मिळाल्या देखील पण ना चव ना सुगंध. आणि जरी चांगल्या दर्जाच्या मिळाल्या तरी मी दिवसभर घराबाहेर, त्यामुळे अगदी मोजूनमापून ऊन देणं हे समीकरण जमण्यासारखं नव्हतं. आई बारकाईने ह्या सगळ्याकडे लक्ष द्यायची, गुगल-बाबा, यूट्यूब वैगैरे नसतांनाच्या काळात. साग्रसंगीत ती चव, तो पौष्टिकपणा, तो उपयोग, ते उन्हापासून सौंरक्षण प्राप्त व्हायचं तेव्हा. 

तिच्या पेशल गुलकंदाला राजहंसाची उपमा द्यावीशी वाटली मला अगदी मनापासून, कारण राजहंस = अतिशय दुर्मिळ चव, पौष्टिक, मायेने ओतप्रोत, प्रिझर्व्हेटिव्ह्ज = परिरक्षक स्पर्श न झालेले, वर्षानुवर्षे मिळालेले असे म्हणून. 

बुधवार, ८ मार्च, २०२३

मिडल नेम

भारतात तर नाव आणि आडनावांमधे मिडल नेम लिहिण्याची प्रथा आहे, अर्थात महाराष्ट्रात तरी. मुलगा असला तर त्याचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव. मुलगी असली तर लग्नानंतर तिचे नाव, नवऱ्याचे नाव आणि नवीन आडनाव. आताशा बऱ्याच जणी पहिले नाव, माहेरचे आडनाव आणि सासरचे आडनाव असे पण लिहितांना दिसतात / आढळतात. काही अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतके जण मधले नाव आईचे पण लावतांना बघायला मिळते आहे इतक्यात. पण ढोबळ मानाने आधी वडिलांचे आणि मग नवऱ्याचे नाव लावण्याची परंपरा आहे आणि ती निभावली जाते आहे, मुलीच्या नावासोबत.  कचेरीत उच्च पदावर काम करणाऱ्या महिला / मुली, संशोधन करणाऱ्या मुली देखील प्रत्येक वेळी त्यांचं नाव सांगतांना नवऱ्याचं नाव आणि लग्नानंतरचं आडनाव  ठळकपणे सांगतातच. नोकरी किंवा संशोधन ह्या करतात आणि ठळकपणा कोणा दुसऱ्याचाच?. मग असंच नवऱ्याच्या कचेरीत घडतं का? काम करणार नवरा नाव आणि आडनाव बायकोचं? अशक्यच. 

पिढ्यांपिढ्या भारतात आणि खास करून महाराष्ट्रात असं आढळलंय कि नवऱ्याचं नाव जास्त वर्ष राहतं सोबत कारण आधी तर मुलींची लग्न फार कोवळ्या वयात होत होती. 

आज एका मिटिंग च्या उपस्थितीचा कागद सही करतांना मला हे जाणवलं प्रकर्षाने कि अगदी प्रत्येक ठिकाणी मुली लग्नाआधी त्यांच्या वडिलांचं आणि नंतर नवऱ्याचं नाव सोबत घेऊन जातात, जेथे जातील तेथे. कचेरीतल्या किंवा संपर्कातल्या सर्वांना नवऱ्याचं नाव काही दिवसात अगदी तोंडपाठ होतं, कारण ते प्रत्येक यादीत ठळकपणे असतंच. त्यामुळे मिडिल नेम ची पण ओळख होते, टिकते, ते त्या कचेरीचा एक भाग होतात, काहीही न करता, प्रत्यक्ष काम न करता. त्यांना एक स्थान मिळतं सहज. किती जणांना नवऱ्याच्या कचेरीत किंवा मित्रमंडळात प्रत्येकाच्या बायकोच नाव तोंडपाठ असतं? सांगा पाहू, अशक्य, एखाद्याला ठाऊक असेल. अगदी इंग्लिश स्पेलिंग मधे सुद्धा जेव्हा केव्हा ते म्हणजे शब्द त्याच्या स्पेलिंग सहित जन्मले त्यावेळपासून SHE मधेच HE आहे, MAN हा WOMAN चा अविभाज्य भाग आहेच, पण उलटं कदापी शक्य नाहीच.

कमीत कमी दोन नावं, काही वेळा दोन आडनावं, मुलांच्या नावात स्थान नाही, घर-दार-गाडी ई. वर सहसा नाव नाही तरी देखील जेथे जाऊ तेथे संपूर्ण नाव चं उच्चारलं जातं हि शिस्त, हा बाणा, हि सवय, हा आदरभाव ई. मुली गेले अनेक दशकं सांभाळत आल्या आहेत. स्वतः सर्वार्थाने अलिप्त, कुठेही एकटी अशी दृश्य नाहीच, आणि शिवाय एवढं करून प्रत्येकीला हवा तो मान सन्मान मिळतोच असं नाही. तर अशी हि मिडल नेम ची कहाणी थोडक्यात. सर्वांना माहित असलेली पण पुन्हा एकदा सांगावीशी वाटली. आता एक पाऊल पुढे पडले आहे, पदवी साठी, बँकेच्या व्यवहारासाठी काय ते आईचं नाव विचारलं / वापरलं जातं. प्रत्येकीला मिडिल नेम ची कल्पना आहेच, सवय आहे, सगळं मान्य आहे, फक्त बाकी सर्वांनी हे ध्यानात ठेवा आणि वागा एवढीच नम्र विनंती. "पेराल ते उगवेल", मान द्या, देत राहा, मान आपोआप मिळेल. साधं, सोप्प आणि सरळ समीकरण आहे हे.  मुलांचं बरं आहे जन्मापासून काहीही बदल नाहीच, संपूर्ण नाव तेच, कधीही. काय मज्जा आहे नाही. 

एक कलाच

मी जरी सध्या इथे फक्त कपडे वाळत घालण्याबद्दल लिहिणार असले तरी एकंदरीत घर सांभाळणे, राखणे, सजवणे, सजवून ठेवणे, नीटनेटकेपणा ई. एक कलाच आहे ह्यात काही दुमत नाहीच. मग ते घर एका खोलीचं असो, फ्लॅट असो नाहीतर बंगला. आणि त्यात एक व्यक्ती राहतं असो किंवा अख्ख कुटुंब. 

मी एवढ्यातचं एका ठिकाणी गेले होते काही कार्यक्रमासाठी. ती इमारत साधारण दिड - दोन शतकांपूर्वी बांधलेली होती असा अंदाज आहे.त्याचं एक कारण म्हणजे त्या ओळीने बांधल्या गेलेल्या इमारतींना बाल्कनी नव्हती. एक पण बाल्कनी नव्हती.  मला तेथे राहणाऱ्यांची पार्शवभूमी थोडक्यात माहिती आहे, पण संपूर्ण खोलात मी शिरले नाही. प्रत्येकाने बऱ्याच वर्षांपूर्वी हे फ्लॅट्स घेतलेले दिसत होते. बाल्कनी नसल्यामुळे प्रत्येकाचे कपडे हे खिडकीच्या ग्रिल वर वाळत पहुडले होते कुठल्याही पद्धतीने. कुठलीही शिस्त नव्हतीच त्यात अजिबातच. अर्थात मी तेथे हे सगळं टिपायला गेले नव्हते पण ते नकळत घडलं. पावसाळ्यात असे खिडकीच्या गजांवर तर कपडे वाळत घालणं शक्यच नाही. उन्हाळयात आणि हिवाळ्यात दिवसभर छान ऊन असतं त्यामुळे शिस्तीत छोटे कपडे खाली आणि त्यावर एकतर पातळ टॉवेल / चुन्नी / तत्सम कपडा वाळत घातला कि १. जागा कमी लागते, २. शिस्त दिसते, ३. दृश्य दिसायला चांगले दिसते, ४. स्वतःला समाधान, खूप मोठं समाधान कारण असलेल्या जागेचा वापर छान केला, बाहेरून लोकांना आतले कपडे दर्शन गरज नसतांना होत नाही, त्यांना पण बघून आनंद मिळतो ई.  

बाल्कनी नाही तर खिडकी हि थेट हॉल मधून दिसणारी असेल, किंवा बाकी कुठल्या तरी खोल्यांमधून, मग त्या खिडक्यांच्या गजावर कपडे वाळत घालणाऱ्याची कला दिसली पाहिजे नक्कीच, रोजच, न चुकता. तुमची, तुमच्या सोसायटीची एक शान आहे हे लक्षात ठेवा. सर्वांनी मिळून सोसायटीचा दृश्य भाग, दर्शनी भाग संभाळलाच पाहिजे नाही का? मोलकरीण हे करत असेल तर तिला देखील हे समजावून सांगा. घरचे कपडे वाळत घालत असतील तर मनापासून करा, अजिबात वेळ जास्त वाया जाणार नाही पण जे समाधान मिळेल त्यामुळे फायदे मात्र अनगिनत / अगणित  होतील हे निश्चित. कलात्मकरीत्या वाळत घातलेले कपडे बघून एखाद्याचा मूड परिवर्तन होईल, उत्साह मिळेल. त्यामुळे मंडळी लागा कामाला, प्रत्येक छोटं किंवा मोठं काम अगदी मन लावून करा जसे कि ऍक्टिव्ह मेडिटेशन च. अगणित फायदे होतील तुम्हाला डायरेक्टली आणि तुमच्या अवतीभोवती वावरणाऱ्यांना  / संपर्कात येणाऱ्यांना इन्डायरेक्टली. मी मागे एकदा लिहिल्याप्रमाणे कपडे दांडीवर कसे वाळत घातले आहेत त्यावरून वधू परीक्षा होतं असे. माणसाचा, किंवा कुटुंबाचा खरा चेहेरा समजावून घ्यायचा असेल, लग्न वगैरे ठरवायचं असेल तर नकळत असा सोसायटीत फेरफटका मारा, त्यांच्या बरोबर गाडीत चक्कर मारा, पंगतीत जेवा किंवा जेवतांना बघा आणि मग काय तो निर्णय घ्या. 

मंगळवार, ७ मार्च, २०२३

लई स्मार्ट पिढी (वेगळ्या अर्थाने)

हि जी सध्याची महाविद्यालयांची विद्यार्थी आहेत ते लई स्मार्ट आहेत. प्रचंड प्रमाणात त्यांना मल्टीटास्किंग मोठ्या शिताफीने करता येतं अगदी सातत्याने, न थकता, न दमता, कुठेही, कधीही ई. ते इतके मोठे आहेत, इतक्या मोठ्या लेवल चे स्मार्ट आहेत कि ज्याचं नाव ते. कधी, कुठे, किती वेळ, कुठले खेळणे वापरायचे हे त्यांना पुरते माहित आहेत. मग पुढे कोणीही उभं असू दे, कितीही मोठा व्यक्ती, कितीही यश संपादन केलेला तरी काही क्षणात ते डोकं खाली घालून काही तरी सुरु कारतातच. बास आणि त्यातचं स्वतःला धन्य मानतात. ते खेळणं कशासाठी आहे, कधी वापरण्यासाठी, त्याचा खरा उपयोग काय ई. काहीही घेणं देणं नाहीच. मनगटी घड्याळ, मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप, आयपॅड, दोन स्क्रीनचा लॅपटॉप असे असंख्य खेळणे ते एकाच वेळी वापरतं असतात आणि शिवाय वर्गात, काही भाषण चालू असेल तर त्याकडे लक्ष आहे हे दर्शवतात. सर्वांना चार डोळे आहेत सद्य परिस्थितीत, त्यामुळे त्यांच्याकडे बघणाऱ्यांना ते नक्की काय बघत आहेत हे सहज दिसतं, त्यांच्या हालचालींकडे बघून सहज लक्षात येतं आणि आता सगळ्यात महत्वाचं. मी असं ऐकलं होतं, वाचलं होतं आणि अनुभवलं होतं बऱ्याचदा कि काही विनोद झाला, ऐकला तर हसू येतं, कोणी पडलं सायकल, गाडी वरून, किंवा खुर्ची वरून तर जोरात हसू आवरत नाही, एखादा जोक वाचून, कार्टून बघून आणि इतर कारणांनी च फक्त हसू येतं. उगाचच वर्गात, मिटींग मधे किंवा मोठया माणसांचे भाषण ऐकतांना किंवा कुठलेही काम करतांना खुद्कन हसू येणं क्षणभरापुरतं, कधी तरी क्वचित हे मान्य आहे, पण सातत्याने? हे कसं शक्य आहे? ह्याचा अर्थ ती व्यक्ती जे सातत्याने हसते आहे, ती मल्टीटास्किंगच करते आहे, अवेळी, जे सपशेल चुकीचं आहे. असं करण्यासाठी नसतो बसलेले आपण तेथे. क्षणभर स्वतःला भाषण करणाऱ्याच्या जागी ठेवून बघावं बरं? जर तुम्ही खूप वर्ष मेहेनत घेतली आहे, खूप तय्यारी करून काही सुचवता आहे, शिकवता आहे, नवीन संकल्पना मांडता आहे आणि समोरचा डोकं खाली घालून फक्त बसलेला नाही तर सतत हसतो आहे, ह्याचा अर्थ तो प्रोग्रॅम / कोड / शैक्षणिक काही बघून तर असा सतत हसणार नाही ना? आणि हसण्यासारखं जर डोळ्यासमोर नसेल किंवा ऐकू येत नसेल तर मात्र काही तरी नक्की मोठ्ठी गडबड आहे हे नक्की. वेडा म्हणू शकतो अश्यांना जे भाषणं / शिकवणं सुरु असतांना हसतोय. असा स्मार्टनेस काय कामाचा. जे पेराल ते उगवेल, त्यामुळे उद्या तुम्हाला अश्यांचा त्रास होणार नाही कश्यावरुन, किंवा प्रत्येक घटक वापरण्याची वेळ असते, काही ठराविक काळ असतो, कधीही नाहीच. जे भाषणं करत आहेत, तुम्हाला काही तरी नावीन्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी काही कमावलं आहे, मिळवलं आहे, उंची गाठली आहे, आता तुमची बारी, गेलेला क्षण कधीही परत येत नसतो, त्यामुळे स्मार्ट असाल तर खरंच स्मार्टनेस दाखवा, सिद्ध करा, आटोक्यात राहा, डोळे उघडे ठेऊन वागा आणि आदर द्याल तर घ्याल / मिळवलं नंतर.    

Musical Retreat

My ears became truly speechless today as they heard so much, with an enormously consistent musical retreat. This retreat started at around 8 a.m. and has continued until now, for almost 11 hours or so. There is one club near my house; they started their play list at around 8 a.m. and continued until 5 p.m. at the loudest possible volume. Simultaneously, bits and pieces from surrounding societies added layers and colours to this musical extravaganza today. 

A) I was not aware that we are so rich on the music front and have so many remixes. 

B) Many individuals have restrictions and inhibitions about attending classes at a college for a few hours at a stretch, meeting for longer durations, participating in development programs for a day or two, but for continuous dancing, standing, shouting loudly, listening to the loudest playlist, etc., there is huge energy, interest, and willingness.

According to me, there should be a self-imposed limit to such events, not given by a municipal corporation, the police, or society, for example, an hour or two max, as there are newborns, senior citizens, pets, and other living beings around. Think and act, kindly relook at holi celebrations, is the sincere request.

International Women's Day-2023

On the eve of International Women’s Day, I sincerely request that everyone appreciate the efforts of all women who are working for you. Without collective efforts, achieving success is impossible.

Men is a part of the word women, vice versa is not true though. There could be many or there are some families where a girl or woman is heading the family, formally or informally. All women are powerful, and hence they are referred to as "Baimanus बाईमाणूस" in Marathi. Every person possesses and nurtures multiple features and qualities of both men and women. There is a possibility that few family members will get motherly treatment or care from their father or grandfather. So consider all those women who crossed your path, taught you, helped, and nurtured you in some way or the other. No celebrations are required; just recollect, remember, and bow down. Call or text if possible.

Wishing of International Women's Day-2023.

गुरुवार, २ मार्च, २०२३

पूल टेबल

हि साधारणतः २५ एक वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. मी तो पर्यंत शाळेत, कॉलेज मधे आणि एक-दोन संस्थेमधे बॅडमिंटन आणि टेबल टेनिस एवढे दोनच खेळ खेळले होते. त्या पल्याड मला सगळं अनभीन्य होतं. महागडे खेळ तर माहित नाहीच, खिजगणतीत नव्हतेच अजिबातच. मैदानी खेळ खेळण्याकडेच लक्ष आणि कल होता माझा, माझ्या मैत्रिणीचा आणि त्या वेळा. 

मुळात खेळाची आवड असल्यामुळे मला जेव्हा अतिमहागड्या आणि वेगळ्या धाटणीतल्या खेळांची ओळख झाली तेव्हा माझा आनंद गगनात मावला नाही. उत्साहाने येत नसतांना मी खेळायची तय्यारी केली, शिकायची तय्यारी ठेवली कारण फक्त एक बदल म्हणून, मस्त नवीन माहिती म्हणून आणि उपलब्द आहे म्हणून ते मी करणार होते. मी फक्त हे असे खेळांचे प्रकार चित्रपट बघितले होते. खेळ सुरु करण्याआधी त्या वेळी गूगल बाबा नव्हता त्यामुळे जे स्वतःला अती पारंगत समजत होते त्यांनी मी न विचारता भली मोठी नियमावली सांगायला सुरवात केली. ती नियमावली ऐकूनच मी दमले आणि जराशी घाबरले सुद्धा. नियमावली सांगून थकले नाहीत तर मी प्रत्येकवेळी खेळण्याचा प्रयत्न केला तरी त्याची काय करायचं नाही ह्याची यादी तय्यार असायची. मला तर बऱ्याचदा तो ओरडण्याचा सूर वाटायचा. असो. बिलियर्ड्स अक्का पूल हा खेळ एका मोठ्या टेबलावर मांडला आणि खेळला जातो. तो टेबल पराकोटीचा महाग असतो. त्या टेबलावर अगदी अलगद फक्त बोट टेकवायचं अधांतरी फक्त आणि काही क्षणा पुरतं, हाताचा भार द्यायचा नाही, नाजूक पद्धतीने एकंदरीत सगळं हाताळायचं. त्या टेबलावर पिटुकली जरी रेष ओढली गेली अनवधानाने तरी बॉल्स ची हालचाल व्हायला अडथळा येतो. छोटासा ओरखडा आला तर दुरुस्त करायला खूप पैसे खर्च होतात ई.  यादी भली मोठी आहे सूचनांची. त्यामुळे मी खूपच शिस्तीत खेळले पण थोडसं लांब राहूनच. 

त्याच बिलियर्ड्स किंवा पूल च्या कंपनीने इतक्या २५ वर्षांच्या कालावधीत जमीन-आस्माना एवढी प्रगती केलेली आढळली मला. कारण एवढ्यात काही महिने सलग मी असाच एक पूल टेबल बघते आहे दररोज.  आणि माझा मला धक्का बसतो आहे प्रत्येक वेळी, कारण मला हे सगळे नियम सर्र्कन डोळ्यासमोर उभे राहतात.  आताशा पूल टेबलवर लोक बसतांना दिसतं आहेत. तो टेबल उघडा वाघडा धूळखात पडला आहे. त्यावर ड्राइंग, पेंटिंग,कलरिंग सुरु असतं, हात काय पण सगळ्या वस्तू ठेवल्या जातात. थोडक्यात काय तर बाकी दुसऱ्या साधारण टेबल असल्यासारखं जणू. त्या उपर त्याची काही म्हणजे काही किंमत दिसत तरी नाही. मग नक्की काय खरं आहे, आधी सांगितली गेलेली कथा का मला जे डोळ्यासमोर दिसतंय ते? 

भारतीय वातावरणानुसार, प्रदूषण, सवयी प्रमाणे त्या कंपनीने स्वस्त, मस्त, टिकावू असे टेबल तय्यार केले असणार हे निश्चित. असो. मला ऐकावे लागले तसे नियम कोणालाही ऐकण्याची गरज नाही, हे महत्वाचं. 

प्रत्येकाने आपाआपल्यात असे बदल घडवून आणले तर? कित्ती मजबूत टिकावू गोष्टी घडतील नाही? सर्वच स्तरावर, वैयक्तिक, भौतिक, सामाजिक ई. 

आकलनापलीकडचं समीकरण

 सहज विषय निघाला विविध खाण्याच्या ठिकाणांचा आणि बऱ्याच गोष्टी समजल्या. जी दोघे हे बोलत होते ते अगदी दररोज म्हणे रस्त्याच्या कडेला उपलब्ध असलेल्या विविध खानावळीत, रेस्टॉरंट मधे जातातंच, कचेरीत येते वेळी. प्रमुख दोन कारणे आपणहून दिली गेली, एक म्हणजे ते जेव्हा त्या रेस्टॉरंट मधे पोचतात तेव्हा त्यांना गाडी चालवून तब्बल एक तास झालेला असतो, पाय मोकळे करायचे असतात आणि मग त्या सोबत "चाय तो बनती है ना?" आणि लगे हात "न्याहारी भी". हे ऐकल्यावर माझे विचार (अर्थात माझा काहीही संबंध नाही, तरी देखील काळजी पोटी राहवलं नाही म्हणून): एखादं दिवशी ठीक आहे पण दररोज का? साधारण मध्यम वर्गीय महाराष्ट्रियन कुटुंबात सकाळी एक किंवा दोन वेळा चहा होतोच, त्यानंतर भारतीय कचेरीत देखील दिवसातून दोनदा चहा दिला जातो, घरी पाऊल टाकलं  कि पुन्हा चहा होतोच. मग का?

 मान्य आहे कि कचेरीची वेळ लवकरची आहे, घर आणि कचेरीचं अंतर लांब आहे, कामाचा ताण आहे . पण तरी देखील. पैशांसाठी मुळीच नाही मंडळी, ती दोघे अगदी व्यवस्थित कमवत आहेत, एवढा खर्च स्वतःसाठी काहीच नाही दररोजचा. असं जरी असलं तरी दररोज चुकता बाहेर खाणं ते देखील सकाळचं माझ्या मते योग्य नाहीच. आणीबाणीचा प्रसंग असला तर गोष्ट वेगळी, मग खायला हरकत नाही. पण बाहेरचं सातत्याने खाल्यामुळे कदाचित प्रकृतीवर परीणाम होऊ शकतो. होऊ नये कोणालाच कुठलाच त्रास कधीच, पण यदाकदाचित झालाच तर मग डॉक्टरची बिलं भरत बसा, त्यामुळे मग डोक्याला ताप, कशाला हे सगळं स्वतःहून ओढवून घ्यायचं? त्या पेक्षा अगदी नेहेमी घरचं खाणं उत्तमच, प्रकृतीला आणि पैश्याच्या दृष्टीने देखील. जर घरी सहचारिणी असेल आणि ते देखील कामाला जात असेल तर . बाई ठेवा, . दोघे मिळून आदल्या दिवशी तय्यारी करून ठेवा, . पहाटे लवकर उठा १०-१५ मिनिटे आणि मस्त पैकी स्वतःच्या हातची, घरची एखादी भन्नाट डिश / पदार्थ करा, . बाई कडून सगळी तय्यारी करून घ्या आदल्या दिवशी, . कोरडे पण पौष्टिक असे घरगुती झटकीपट होणारे पदार्थ शनिवार रविवारी करून ठेवा आणि ते डब्बे कचेरीत आणून ठेवा, . फलाहार करा दररोज, त्या सोबत सुकामेवा खा, . खाकरा सारखे पदार्थ हा एक पर्याय आहे, . मावशींकडून रात्री मस्त भरलेले पराठे लाटून घ्या, म्हणजे सकाळी फक्त तूप लावून शेकायचे बास... अहो काढले तर खूप उपाय सहज सुचू शकतात.  शेवटचा म्हणजे आपण बस मधून प्रवास करतो आहे हे समजायचं. दररोज तर बस थांबणार नाही ना तुमच्यासाठी अश्या खाण्याच्या ठिकाणी? मग झालं तर. हे उपाय पैसे वाचवण्यासाठी नाहीत, पण त्यामुळे महिन्याचं, घरच्या खाण्याच्या शिस्तीचं आणि प्रकृतीचं समीकरण मस्त बसेल. सध्याचं ह्या दोघांचं चाललेला नित्यक्रम आणि परिपाठ मला समजण्या पल्याड आहे.

 हे झालं सोमवार ते शुक्रवार किंवा शनिवार चं. साहजिकच घराचे रविवारी बाहेर जाऊ म्हणून मागे लागणार, मग तर काय बोलायला नकोच.

 बाहेरचं खाणं टाळा, आत्ता थोडेसे कष्ट पडतील सगळं घरी करायला पण ते भविष्यात प्रचंड उपयोगी पडेल हे निश्चितच.  वजन आटोक्यात राहील, पटणार नाही सहजी पण डोकं पण शांत राहील सुधृढ राहील आहे त्या पेक्षा. त्यामुळे नम्र विनंती आहे, थोडासा आणि हळूहळू बदल करा जे दररोज बाहेर खातात.  

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...