मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

बहुमूल्य मदत

हि आहे माझ्या एका सख्या मैत्रिणीची पिटुकली एक कहाणी. अर्थात तिच्या परवानगीनेच मी हि अनुकथा लिहिते आहे तिचे नाव जाहीर न करता. "नावात काय आहे?", हा अनुभव कोणाला आला आहे ह्या पेक्षा तो काय आहे, किती महत्वाचा आहे आणि त्यातून काय बोध घ्यायचा हे जास्त महत्वाचं. 

माझी हि जी मैत्रीण आहे, तिचा एक वर्ग मित्र, अगदी लहानपणीचा. त्यावेळी कुठल्याही प्रकारची संवाद साधण्याची साधनं नव्हती आज सारखी त्यामुळे एकदा त्यांचं कॉलेज संपलं आणि संपर्क देखील, कायमचा. त्याचं लग्न फार लवकर झालं काही कारणांस्तव आणि हि खूप शिकली, नोकरी केली ई. त्याच्याकडे एका पाठोपाठ एक दोन कन्यारत्न जन्माला आले आणि हिने पहिल्यांदा नोकरी, स्थिरावणे, मग संसार असा मार्ग पत्करला. गेले काही २-३ वर्षांपासून त्यांच्या वर्गातले सगळेच सोशल मेडिया मार्फत जोडले गेले अचानक आणि संवाद पुन्हा सुरु झाला. त्याच्या मोठ्या मुलीचं लग्न ठरलं आहे, इतक्यातचं साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडला, होणारा जावई भारतीय असला तरी परदेशात स्थायिक आहे. लग्नाची तारीख इतक्यातच ठरली आणि त्याने हिला आमंत्रण पाठवले, अर्थात आग्रहाचे. हिने जेव्हा ते आमंत्रण नीट बघितले / वाचले तेव्हा हिला महद आश्चर्य वाटले. काहीतरी फार मोठ्या प्रमाणात अशक्य असे घडले होते. दाही बोटं तोंडात, अशी काहीशी तिची अवस्था झाल्याशिवाय राहिली नाही, डोळ्याच्या कडा पाणावल्या आणि अगदी मनापासून "त्याचे" पुन्हा एकदा हात जोडले गेले. 

ह्या माझ्या मैत्रिणीने सातत्याने लहान मोठी नोकरी केली. मुलांना पाळणाघरात ठेऊन वगैरे, सतत पळत राहिली आणि तिच्या क्षेत्रात प्रचंड उंची गाठली, नाव कमावले. पण आता तिला अनेक कारणांसाठी थांबावंसं वाटतंय. तिने राजीनामा देण्याचा महाकठिण निर्णय घेतला आहे. तिला खूप महिने आधी आंतरराष्ट्रीय कंपनीच्या नियमाप्रमाणे, तिच्या हुद्याप्रमाणे कळवावे लागते तिच्या निर्णयाबद्दल आणि तारखे बद्दल. आपण सर्वांनीच हे खूपदा ऐकलं असेल, वाचलं असेल, अनुभवलं असेल कि इतक्या वर्षाची सुंदर चाललेली नोकरी थांबवणं खूप अवघड आहे, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि अश्या असंख्य पातळीवर. 

योगायोगाने तिचा ठरलेला शेवटचा कामाचा कंपनीतला दिवस आणि मित्राच्या मुलीच्या लग्नाचा मुहूर्त अगदी लागोपाठ आहे. हि १ तारखेला मोकळी होणार आणि लग्न त्याच महिन्यात ३ तारखेला आहे. त्यामुळे १ तारखेला संध्याकाळी / रात्री किंवा जास्तीत जास्त २ तारखेला पहाटे तिला प्रवास करायला निघावं लागणार कारण लग्न दुसऱ्या शहरात आहे. तिने त्या राज्यातलं लग्न ह्या आधी कधीही बघितलं / अनुभवलं नाही आहे. लग्नाच्या दिवशी रविवार सुट्टीचा वार आहे त्यामुळे सगळे वर्गमित्र, जुन्या मैत्रिणी येण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

ह्याला योगायोग म्हणावा का "त्याचं" भन्नाट, उत्कृष्ट प्लँनिंग? "त्याने" परदेशातील त्या मुलाला, त्याच्या कुटुंबीयाला सुबुद्धी दिली, सर्वांची ओळख करून दिली, सगळं बिनभोबाट जुळवलं, अगदी जवळची तारीख निश्चित केली, इतक्या वर्षांनी सर्वांना एकत्र आणलं, आणि हि यादी फार मोठी आहे. काय म्हणावं ह्या सगळ्या घडामोडींना? कोण म्हणतो कि "त्याचं" लक्ष नसतं? बघा म्हणजे माझ्या मैत्रिणीला कित्ती साथ देतो आहे तो अप्रत्यक्ष, कित्ती ते कष्ट. ती निवृत्त झाल्याचं होणारा किंचित क्लेश, यातना, अस्वस्थता आहे त्या पासून थोडीशी दूर राहिलं, कदाचित नवीन संधी मिळतील किंवा नवीन खाद्य. "त्याच्या" मनात काय आहे, त्याचा प्लॅन काय आहे हे माहित नाही, पण खूप भन्नाट असणार ह्याची कल्पना येते आहे ह्या सगळ्या मांडणीतून नक्कीच. मी हा अनुभव ऐकून निःशब्द झाले, "त्याच्या" पुढे पुन्हा एकदा नतमस्तक झाले. "श्रद्धा आणि सबुरी" ह्यावरचा विश्वास पुन्हा दृढ झाला.   

Awesome blessings

Now at this juncture I don’t know why but suddenly recollected many firsts written on my name. Of course, when I look back, it feels so amazing that I was the chosen one for all these firsts. I was able to contribute as I had the energy to work, think, and act on it. HE and HIS plans worked wonders for me. I am truly thankful to HIM for everything.

It all started at the degree level, bestowed with a first-girl engineer from my mother’s and father’s sides too. It felt nice then, but it never affected me at all. After getting hitched too I retained the same title, the first girl engineer of the family.

It was just the beginning of firsts by HIM, went on to become “first of its kind” mother from mom’s, mother in laws and other relatives side. Blessed with twins, a uniquely-different journey started along with my PhD. First ever girl to work abroad, drive on foreign roads, and earn a PhD too. Doctorate girl in all family members, first of its kind and at the department too. Yes, there was a faculty member before me, but he actually belonged to another department. First female faculty member from the department to become a PhD advisor; first one to earn an international grant from a giant like Microsoft in the department; first one whose PhD scholar went abroad on a fully paid trip; first one who got the opportunity to visit in person to help start a new engineering college; first one in the immediate family to author three books in a row, one technical and two in mother tongue. First female faculty member in the department to conduct many research paper writing workshops continuously for many researchers in the university, etc., to name a few.

HIS blessings and HIS wishes are behind these achievements for sure, but in this journey along with me, he motivated all my family members, colleagues, friends, students, and relatives to help me consistently. All credit goes to HIM. A huge and countless thanks to all those who made it feasible. Lucky me.

खरा उपयोग

ह्याची सुरवात झाली मला समजायला लागल्यापासून, संक्रांतीच्या हळदी कुंकवापासून, त्याच्या वाणापासून. मग प्रकर्षाने आणि उत्साहाने त्यावर भर पडली जेव्हा मी पहिल्यांदा किंवा सुरवातीच्या काळात विमानाने प्रवास करायला लागले. आणि सध्या तर त्याचा कहरच झाला आहे, म्हणून म्हटलं चला लिहावं.

अगदी पिटुकल्या वस्तू वाण म्हणून मिळाल्या कि स्वर्ग सुख प्राप्त झालं असं वाटायचं. इतकं कौतुक होतं त्याचं आणि ते लहानपणीपासून सुरु झालं ते आज अर्धशतकी वाटचाल झाली तरी सुरु राहील. आज मला समजलं कि कुठल्याही उत्पादनासाठी पिटुकली डब्बी का वापरली जाते, का तय्यार केली जाते, किंवा ते उत्पादन मग ते चेहेऱ्याला लावण्याचे क्रीम, मलम, बाम किंवा अजून काही. एक कारण म्हणजे आधी छोट्या प्रमाणात वापरून बघा, आवडलं तर मोठी डबी विकत घ्या. दोन म्हणजे चेहेऱ्याला लावण्याचे क्रीम, मलम, बाम कमी प्रमाणातच लागतात. तीन म्हणजे प्रत्येकाची कातडी वेगळी असते, मोठी डबी एकदम घेतली आणि ती नाही सूट झाली तर वायाच जाणार. चार म्हणजे प्रत्येक मुलगी / महिला सध्या घराबाहेर पडते नोकरी निमित्य किंवा प्रवास करतांना सोबत स्वतःच्या आवडीचं / अनुरूप आणि सोयीस्कर घेऊन जायला छोटेखानी डबीच योग्य, नाही का?

पण छे हो, हि सगळी कारणं म्हणजे चिल्लर, खरं कारण म्हणजे चेहेऱ्याला लावण्याचे क्रीम, मलम, बाम ई. संपलं कि ती देखणी, मजबूत, छोटीशी डबी स्वच्छ घासून पुसून मग कुटलेली सुपारी, लोणचं, जाम ई. घेऊन जायला, किंवा कानातले ठेवायला असं वापरलं जातं  प्रत्यक्षात.

आता समजलं कि हि डब्बी त्या उत्पादकाने खरं का तय्यार केली ते? आहे कि नाही मज्जा.

मला तर खूप खूप सोय होते, फक्त मलाच नाही माझ्या लेकरांना / घरच्यांना देखील किंवा कोणालाही हे बाहेर जातांना काही तरी घालून घ्यायला. आहे कि नाही भन्नाट खरा उपयोग अश्या पॅकिंग चा, पुनर्वापर. माझी खात्री आहे तुम्ही पण असंच काहीसं करत असलंच. सांगा बरं पटापट काय काय करता ते?

आणि जर यदाकदाचित तुम्ही असा पुनर्वापर करत नसाल तर करायला लागा आणि बघा तुम्हालाच नाही तर जे पुनर्वापर केलेली डबी बघतील त्यांना पण किती मज्जा येईल ते. अहो साधं गूळ तूप न्यायला पण प्रचंड उपगोय होतो अश्या पिटुकल्या डब्यांचा. दररोज तोंड गोड होतं, गूळ तूप पौष्टिक त्यामुळे कदाचित फॉलिक ऍसिड वगैरे मिळतं म्हणे, जास्त जड पण होत नाही आणि मोठी जागा पण लागत नाही.

त्या छोट्या डबी सारखी छोटी छोटी गम्मत रोज अनुभवा. 

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३

हवीहवीशी

वैज्ञानिक दृष्टिकोनाने आणि माझ्या मते आपण सर्वजण एकमेकांशी संवाद साधू शकतो प्रत्यक्ष एकमेकांसमोर किंवा तंत्रज्ञानाचे साधन वापरून ते केवळ हवा ह्या माध्यमामुळे. संवाद फक्त सजीव व्यक्ती साधू शकतात, सजीव राहण्याकरता जीव असावा लागतो, म्हणजेच श्वाशोश्वास सुरु असावा लागतो आणि त्या करता देखील हवा, वारा च लागतो. तो काही अंश देखील बंद पडूच शकत नाही. हे झाले अगदी बेसिक. त्यानंतर क्रमाने अनेक गोष्टी येतात ज्या हवेशिवाय अशक्यच आहेत, चालणे, धावणे, गाडी / चारचाकी / सायकल / बस ई. चालवणे. हि यादी खूप मोठी आहे आणि हे सर्वश्रुत आहेच. 

ह्या विश्वात प्रत्येकजण हवेत नकळत काही ना काही मिसळत असतोच, सुगंध, दुर्गंध, वास, सुवास... काही नैसर्गिक असतात तर काही अनैसर्गिक. 

ह्या व्यतिरिक्त मानवनिर्मित कचरा, त्या कचऱ्याला गरज म्हणून किंवा दिलेले काम म्हणून पेटवणारा माणूस, महानगरपालिकेचे कर्मचारी ई. मुळे हवेत मिसळणारे घटक, अगदी घरोघरी होणाऱ्या स्वयंपाकाचा सुवास, देवळांमधे किंवा इतर धार्मिक ठिकाणी होणारे होम-हवन आणि त्या धुराचा हवेशी येणारा संपर्क, प्रदूषण, कारखान्यांमुळे हवेत मिसळणारे धूर, वर्षभर उडणारे फटाके, आणि अश्या इतर अनेक कारणांमुळे हवेवर चारही बाजूनी, आठही दिशांनी, अहोरात्र सातत्याने भडिमार होतंच असतो. पण तितक्याच ताकदीने किंबहुना कणभर जास्त प्रकर्षाने हवा स्वतःला शुद्ध करण्याचा, ठेवण्याचा अविरत प्रयत्न करत असतेच, न थकता, न थांबता. जे भल्या पहाटे किंवा सकाळी कामाला, व्यायामाला किंवा चालायला बाहेर पडतात त्यांना नक्की विचारा हवा अगदी दररोज कित्ती शुद्ध असते ते.  अर्थात हा देखील एक वैज्ञानिक आणि नैसर्गिक चमत्कारच आहे. पण तरी देखील आहे हे महत्वाचं नाही का? आणि हा सगळा आटापिटा फक्त सजीवांसाठीच, म्हणजे दुसऱ्यांसाठी. 

अगदी तसेच प्रत्येकाला चारही बाजूनी, आठही दिशांनी जरी शाब्दिक किंवा मानसिक भडीमार होत असला तरी एक क्षणभर डोळे मिटा, हवेचा स्पर्श अनुभवा, आपोआप हवेच महत्व देखील येईल लक्षात आणि सगळे मळभ दूर जातील नकळत. असं करत राहिलात तर काही म्हणजे काही कचरा साठणार नाहीच आणि तुम्ही अगदी पक्षांसारखे उंच विहार कराल जमिनीवर राहून देखील. 

साथ

मी मागे एकदा लिहिल्या प्रमाणे प्रत्येक सजीव किंवा निर्जीव व्यक्ती अथवा वस्तू तुमच्या संपर्कात येते ती फक्त योग्य वेळेलाच आणि राहते / टिकते फक्त योग्य कालावधी पुरती, किंचित कमी नाही का जास्त. मग तो एखादा बहुमूल्य सल्ला देणारा

  • चित्रपट असो 
  • व्यक्ती 
  • वाक्य 
  • म्हण 
  • अनुभव
  • स्वानुभव 
  • प्रसंग 
  • घटना 
  • वस्तू
  • पदार्थ 
  • जिन्नस ई. 

त्या कालावधी नंतर मग तुम्ही म्हणे समर्थ असता स्वतःला आणि इतरांना सांभाळण्याकरता म्हणून हा ठरलेला कालावधी आणि सहवास. प्रत्येकाला अगदी प्रत्येक गोष्ट अगदी पर्मनन्ट, कायमची राहावीशी वाटते शाश्वत असल्यासारखी. कदाचित बऱ्याच जणांना आपण देखील असावं असं वाटतं असणार त्यांच्या सोबत अगदी नेहेमीसाठी, पण ह्या संपूर्ण अशाश्वत विश्वात हे संभव नाही. त्यामुळे खूप समीकरणं मांडण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. ह्याचा अर्थ   काहीही घाईत करा, निर्णय घ्या असं नाही. संपूर्ण चौकशी करा, विचाराअंती सगळं करा पण त्याला मर्यादा असू द्या. मन विचलित होणं स्वाभाविक आहे मग त्यावेळी उत्कृष्ट घटना, प्रसंग, वाक्य, म्हणी ई. आठवा, हात जोडा, "त्याचं" स्मरण करा, आप्तस्वकींसोबत वेळ घालावा, छंद जोपासा आणि तुम्हाला त्यातून नक्की मार्ग सापडतं जाईल हे निश्चित. 

वाढणे

मी शरीर विज्ञानाची तज्ज्ञ नाही पण ऐकीव माहिती आहे आणि शिवाय काही डॉक्टर्स कडून किंचित तपासून घेतलंय जे माझ्या मनात आलं आहे ते. जन्माला आल्यापासून ते त्या नंतरची बरीच ठराविक वर्ष प्रत्येकाची वाढ होत असते, शारीरिक आणि मानसिक. शरीराची उंची वाढणे म्हणजे प्रत्येक अंतर्गत अवयवाची वाढ होणे. प्रत्येक अवयव हा प्रत्येक दिशेने वाढतो, वरच्या, खालच्या, आडव्या ई. त्याच्या त्याच्या स्वभाव धर्मा प्रमाणे, त्याला आखून दिल्या प्रमाणे. वाढ होणं बऱ्याच घटकांवर अवलंबून असते. माझ्या मते शारीरिक वाढ खूप काही शिकवून जाते, जेव्हा वाढण्याचं वय असतं तेव्हाच नाही तर त्या नंतर सतत. निसर्गानेच बघा ना कसं ठरवलं आहे कि प्रत्येक हाडांची, त्या बरोबर अगदी सगळ्यांची वाढ आधी नमूद केल्या प्रमाणे वरच्या दिशेला जितकी होते तितकीच खालच्या दिशेने सुद्धा. ह्याचा अर्थ प्रत्येकजण जितके स्वतःला मोठं झालेले समजतं (गैरसमज) तेवढ्याच प्रमाणात त्याला जमिनीवर भक्कम पाय रोवून घट्ट उभं राहण्याची "त्याने" सोय केलेली असते. पण त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून बहुतांशी सगळेच उंचच उंच भरारी घेऊ इच्छितो, किंबहुना घेतोच. इतका उंच जातो कि परतणं अत्यंत अशक्य आणि अवघड होतं. हे असं उडणं प्रत्येकवेळी, प्रत्येकाला फायद्याचं ठरतं असं नाहीच. मग त्या बेसलेस उंचीवर टिकाव अवघड होतो आणि मग आपटायची भीती असतेच. 

त्यामुळे निसर्ग दर्शवतो आहे असंख्य वर्ष त्या बाबींकडे लक्ष द्या. तुम्ही कुठल्याही वयोगटात असाल तरी अजूनही किंवा कधीही उशीर होत नसतो. आत्ता हे लक्षात घ्या आणि त्या प्रमाणे फक्त स्वतःच्या परमानंदासाठी तरी हा फॉर्मुला, हि वाढण्याची पद्धत / कन्सेप्ट लक्षात घ्या आणि बघा तर आजमावून. 

मी येथे मांडलं तसं नसतं तर एकाच दिशेने काही किंवा सगळे अवयव वाढले असते. पण सरसगट सर्व मानवांच्या बाबतीत हे घडतं म्हणजे त्यात तथ्य आहेच. हे असं नसतं तर शरीर बेढब दिसलं असतं कदाचित आणि त्याचा परिणाम मग बाकी बऱ्याच सामाजिक स्तरावर / गोष्टींवर झाला असता. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट हि एका सुबक सुंदर आकारात लागते, मग वैचारिक पातळीवर उत्कृष्ट फॉर्म कडे लक्ष द्यायला हवे, चाचपडून बघायला हवे.  प्रिव्हेंशन इज ऑल्वेज बेटर द्यान क्युअर.   

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३

चढउतार

माझे बाबा स्थापत्य अभियंता होते. त्यांच्या कामाचा महत्वाचा भाग म्हणजे विविध रस्ते बंधारे आणि धरणं बांधणे ई. ते नेहेमीच मला त्यांच्या कामाचे अनुभव कथन करत असतं तेव्हा ते म्हणायचे कसे रस्ते बांधतांना नेहेमी जर सरळ रस्ते बांधले तर ते योग्य नाही. रस्त्यावर वळणे हवीत, उंचवटे हवेत, उंचसखल भाग हवेत ई. का म्हटलं तर त्यामुळे तो वाहनचालक सतर्क राहतो. सरळ रास्ता धोकादायक, खूप दूर वर एकसारखे रस्ते नसावेत, झोप येऊ नये म्हणून हा उपाय. फारच साधा उपाय. असं काहीसं म्हणे स्थापत्य अभियांत्रिकी करते वेळी शिकवलं जातं, तांत्रिक ज्ञानाशिवाय. 

आज मला ह्या बाबांनी सांगितलेली छोटीशी गोष्ट आठवली, स्मरली, अचानक. 

मी माझ्या विद्यार्थ्यांची हजेरी भरत होते सॉफ्टवेअर मधे, तेव्हा बघितलं तर काही उपस्थित होते आणि काही अनुपस्थित. दररोज एकाखाली एक जसे विद्यार्थी येतात, नाही येत त्या प्रमाणे टिपून घेतलं होतं मी. अगदी वळणदार, चढउतार असलेल्या रस्त्यासारखं. सगळेच विद्यार्थी एका रांगेत उपस्थित किंवा सगळेच अनुपस्थित असणं किंचित अशक्य.  माझ्या सारख्या शिक्षकाला थॊडासा बदल, विचार करायला, समुपदेशन करायला विचार करणारे असे महत्वाचे P मधे मधे असलेले AB. अहाहा च. AB कसे कमी होतील हे नकळत मनात येतंच आणि मग त्या दृष्टिने प्रयत्न होतात. त्यामुळे P सोबत AB पण फार महत्वाचे, हजेरी घेणं, ते रजिस्टर सगळी प्रक्रियाच खूप शिकवून जाणारी अशी.

Dinning table mat

 In almost all old Marathi movies we witnessed the home-minister around 12 noon carry home cooked fresh food and go to farm to feed her husband and or other family members. All these family members work so hard in farms that such freshly cooked food prove extremely essential, provide nutrients and what not. The lunch menu those days used to be jawar roti, curry and onion. That’s it, very simple and straight forward. Farmers also used to feel fulfilled after having such a meal. This meal used to be kept in one simple wooden basket, and a piece of cloth used to be gently wrapped around it to protect the food and also provide air flow. This piece of cloth used to be taken from or reused from the old nine-yard sarees of mom, grandma, or other sweet, loving elders in the family. This piece of cloth used to serve as a mat too, while having lunch at the farm. Spreading this piece of cloth was used to protect food pieces if they fell off accidentally, so there were many advantages to using this cloth.

Now in this modern generation, aluminum foil is used very regularly to wrap wheat rotis or jagar rotis while getting tiffin to the office. There are many reasons behind this use of foil. Not only rotis but parathas and other items are packed in foil to office. Employees generally prefer to eat on the same desk where they work, so this piece of foil is spread gently before opening all the food boxes, and this foil serves as a mat on the table while having food. With very less time in hand, some employees perform multitasking too while having lunch so this piece of foil prove useful. In spite of using foil myself for many years, I suddenly recalled the same old process followed then, as shown in old Marathi movies, and thought of writing down my memories.

No comparison at all, whether you use cloth or foil but home cooked food is always the best, wrapped with lots of affection, prepared in neat and clean place with fresh ingredients and healthy indeed. So go for it, even though at office sometime we feel bored of eating food in cold state or form, but still its worth it.

पुनर्चक्रण

पुनर्बांधणी, पुनर्रचना अक्का रिसायकल हे शब्द मला देशाबाहेर गेल्यावर परिचयाचे झाले. त्या संकल्पनेची प्रकर्षाने जाणीव झाली आणि नव्याने त्याचं महत्व समजलं. आणि हे सर्व होतांना मला त्या संदर्भात काही घटना, गोष्टी, कानावर आलेलं असं काही आठवलं. माझ्या लहानपणी मानांकित असे एकच भले मोठे आईस्क्रीम चे दुकान होते. त्या दुकानात उन्हाळ्यात तुडुंब गर्दी असायची. खूप उशिरा पर्यंत सुरु असल्याचं म्हणे दुकान आणि दुकान बंद करण्याच्या वेळी म्हणे प्रत्येक कामगाराला एक आईस्क्रीम खायला मिळायचं, दररोज चुकता. कित्ती भन्नाट ना.

 रॉबिनहूड आर्मी आज सुध्या प्रत्येक हॉटेल किंवा खानावळीत उरलेलं अन्न नेते आणि गरजूंना देते म्हणे, शहराच्या विविध ठिकाणी जाऊन. आणि त्यांचं हे काम रात्री उशिरा सुरु होतंबरेच स्वयंसेवक आहेत म्हणे हे काम करायला त्यांच्याकडे आणि अविरत सातत्याने हे काम सुरु आहे

 माझ्यामते प्रत्येक हॉटेल किंवा खानावळीत देखील तेथे काम करणाऱ्या सर्वांना पोटभर खायला देत असतीलच मालक.

 हे सर्व ह्या करता कि . माणुसकी म्हणून . अन्न वाया जाऊ नये म्हणून . कामाचा एक भाग / मोबदला म्हणून.

 फक्त हॉटेल किंवा खानावळ का, मला तरी वाटतंय कि मिठाईच्या दुकानात सुद्धा असेल अशी प्रथा. म्हणजे जी काचेच्या कपाटात मांडून ठेवली असते मिठाई किंवा जी पूर्वीपासून पॅक केली नसते त्यावर कुठलीही तारीख नसते, मग उरली तर खराब होणार आणि वाया जाणार. त्यापेक्षा कोणाच्या तरी पोटात का नाही जाऊ द्यायची? मी कुठल्याही खाद्य व्यवसायात नाही पण मी अंदाज बांधते आहे फक्त.

 ह्या सर्वांशिवाय अजून एक पद्धत आहे. पुनर्चक्रण, पुनर्बांधणी, पुनर्रचना अक्का रिसायकल. अमेरिकेत तर मिक्सर वजा एक यंत्रच बसवलं असतं सिंक मधे स्वयंपाक घरात. काही थोडसं उरलं तर किंवा भांडी घासताना जे कण उरतात ते त्या यंत्राच्या साह्याने फिरवले जातात आणि सांडपाण्यात मिसळेले जातात सहज

 मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करतेवेळी निघालेली भाजी फळाची सालं किंवा अवशेष, शिजलेलं अन्न असे सगळे पदार्थ रिसायकल करून त्याची पुनर्चक्रण, पुनर्बांधणी, पुनर्रचना केली जाते, खत म्हणा किंवा बायोगॅस किंवा अजून काही असेल.

 दररोज मी असंख्य मिठाईच्या दुकानांसमोरून जाते येते, आणि मला यक्ष प्रश्न पडतोच, कि कुठलं चपरख प्रेडिक्शन मॉडेल वापरात असतील हे, कसं ठरवत असतील कि किती मिठाई तय्यार करायची, किती गिर्हाईक येतील निश्चित ते आणि आले नाही तर काय करत असतील त्या साजूक तूप, भरपूर सुकामेवा घालून केलेली मिठाई ? माझ्या अवतीभोवतीचं होतं उत्तर आता गवसलं. प्रेडिक्शन मॉडेल असो अथवा नसो, ते चालो अथवा चालो पण पर्याय आहे, काही वाया जाणार नाही हे निश्चितत्यामुळे राबवा कुठलेही मॉडेल पण शांत चित्ताने धंदा करा, लोकांना खाऊ घाला हे महत्वाचं.  

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...