शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३

पुनर्चक्रण

पुनर्बांधणी, पुनर्रचना अक्का रिसायकल हे शब्द मला देशाबाहेर गेल्यावर परिचयाचे झाले. त्या संकल्पनेची प्रकर्षाने जाणीव झाली आणि नव्याने त्याचं महत्व समजलं. आणि हे सर्व होतांना मला त्या संदर्भात काही घटना, गोष्टी, कानावर आलेलं असं काही आठवलं. माझ्या लहानपणी मानांकित असे एकच भले मोठे आईस्क्रीम चे दुकान होते. त्या दुकानात उन्हाळ्यात तुडुंब गर्दी असायची. खूप उशिरा पर्यंत सुरु असल्याचं म्हणे दुकान आणि दुकान बंद करण्याच्या वेळी म्हणे प्रत्येक कामगाराला एक आईस्क्रीम खायला मिळायचं, दररोज चुकता. कित्ती भन्नाट ना.

 रॉबिनहूड आर्मी आज सुध्या प्रत्येक हॉटेल किंवा खानावळीत उरलेलं अन्न नेते आणि गरजूंना देते म्हणे, शहराच्या विविध ठिकाणी जाऊन. आणि त्यांचं हे काम रात्री उशिरा सुरु होतंबरेच स्वयंसेवक आहेत म्हणे हे काम करायला त्यांच्याकडे आणि अविरत सातत्याने हे काम सुरु आहे

 माझ्यामते प्रत्येक हॉटेल किंवा खानावळीत देखील तेथे काम करणाऱ्या सर्वांना पोटभर खायला देत असतीलच मालक.

 हे सर्व ह्या करता कि . माणुसकी म्हणून . अन्न वाया जाऊ नये म्हणून . कामाचा एक भाग / मोबदला म्हणून.

 फक्त हॉटेल किंवा खानावळ का, मला तरी वाटतंय कि मिठाईच्या दुकानात सुद्धा असेल अशी प्रथा. म्हणजे जी काचेच्या कपाटात मांडून ठेवली असते मिठाई किंवा जी पूर्वीपासून पॅक केली नसते त्यावर कुठलीही तारीख नसते, मग उरली तर खराब होणार आणि वाया जाणार. त्यापेक्षा कोणाच्या तरी पोटात का नाही जाऊ द्यायची? मी कुठल्याही खाद्य व्यवसायात नाही पण मी अंदाज बांधते आहे फक्त.

 ह्या सर्वांशिवाय अजून एक पद्धत आहे. पुनर्चक्रण, पुनर्बांधणी, पुनर्रचना अक्का रिसायकल. अमेरिकेत तर मिक्सर वजा एक यंत्रच बसवलं असतं सिंक मधे स्वयंपाक घरात. काही थोडसं उरलं तर किंवा भांडी घासताना जे कण उरतात ते त्या यंत्राच्या साह्याने फिरवले जातात आणि सांडपाण्यात मिसळेले जातात सहज

 मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करतेवेळी निघालेली भाजी फळाची सालं किंवा अवशेष, शिजलेलं अन्न असे सगळे पदार्थ रिसायकल करून त्याची पुनर्चक्रण, पुनर्बांधणी, पुनर्रचना केली जाते, खत म्हणा किंवा बायोगॅस किंवा अजून काही असेल.

 दररोज मी असंख्य मिठाईच्या दुकानांसमोरून जाते येते, आणि मला यक्ष प्रश्न पडतोच, कि कुठलं चपरख प्रेडिक्शन मॉडेल वापरात असतील हे, कसं ठरवत असतील कि किती मिठाई तय्यार करायची, किती गिर्हाईक येतील निश्चित ते आणि आले नाही तर काय करत असतील त्या साजूक तूप, भरपूर सुकामेवा घालून केलेली मिठाई ? माझ्या अवतीभोवतीचं होतं उत्तर आता गवसलं. प्रेडिक्शन मॉडेल असो अथवा नसो, ते चालो अथवा चालो पण पर्याय आहे, काही वाया जाणार नाही हे निश्चितत्यामुळे राबवा कुठलेही मॉडेल पण शांत चित्ताने धंदा करा, लोकांना खाऊ घाला हे महत्वाचं.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...