शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

तिकडच्या आणि इकडच्या पद्धती...

।। गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया ।।

आज श्री. गणपती बाप्पांचे नाव घेऊन त्यांच्या दिवशी / उपवासाच्या दिवशी मला काही सुचलं म्हणून म्हटलं लिहावं. 

त्याच असं झालं... 

माझ्या आईकडेच नाही पण साधारण आमच्या आजूबाजूला जे कुटुंबीय राहत होते नागपूरला त्यांच्या कडे, मित्रपरिवाराकडे साधारण एकाच पद्धतीने स्वयंपाक आणि पदार्थ तयार होत असत, उन्नीस-बीस चा फरक तर असतोच ना, ते ठीक आहे. तर आमच्या कडे साधी प्लेन मीठ घालून केलेली भगर आणि आमटी करण्याची सर्वसाधारण पद्धत होती उपवासाच्या दिवशी. त्याला ऑपशन  म्हणजे फोडणीची भगर, पट्टाकिनी खायची असेल तर, वेळ नसेल तर, डब्यात नेणार असेल तर ई.

फोडणीची भगर आणि शिवाय त्याच्या बरोबर दाण्याची आमटी हे समीकरण मला अजिबात ठाऊक नव्हतं. असो.

तर आमच्या कडे कढी करतात तशीच हि आमटी केली जायची, हो, काही फरक होते, जसे ह्या आमटीत ताकात दाण्याचं कूट, मीठ, साखर आणि तिखट मिसळायचं आणि फोडणी द्यायची तुपाची, बास. एक उकळी आली कि झाली आमटी. साधी सोप्पी अशी.

पण मी जेव्हा सासरी आले आणि उत्साहात एका उपवासाच्या दिवशी भगर आमटी करायची म्हटलं तर समजलं कि कूट, दही, मिरच्या, मीठ ई. म्हणे आधी मिक्सर मधून फिरवून घ्यायचं, मग फोडणी द्यायची. साखर नाही घालायची ई. दही आंबट नसेल तर चिंचेचा कोळ घालायचा हा सल्ला देखील मिळाला. 

बापरे. 

देवा. 

मोठा फरक होता माझ्या साठी. सुरवातीचे काही दिवस वेगळे वाटले पण नंतर आत्मसात केलं सगळं. खैर, आत्ता समजलं मला "प्रत्येक मैलाला म्हणे आपल्याकडे खाद्य संस्कृती बदलते..." आणि "इनक्रेमेंटल लर्निंग" हा माझा आवडता संशोधनाचा विषय का आहे तो.

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

डायबिटीज

तर त्याच असं झालं कि माझी पिल्लं अगदी छोटी होती तेव्हा पासून नेहेमीच्या पद्धतीने आई बाबा / आजी आजोबा आणि इतर सगळे लहान मुलांचे लाड करतो, लाड करतो म्हणजे पापा घेतो, खेळतो, तसेच मी देखील करायची आणि ते बघून धडपडत येऊन रांगत, पकडून उभं राहून, चालत आणि नंतर धावत येऊन माझ्या वर किती$$$$ प्रेम आहे त्यांचं हे दाखवलं जायचंच अगदी दोघांची कॉम्पिटिशन असल्यासारखं, देवा. कधी असंच काही कारण नसताना, कधी आवडता पदार्थ मिळाला कि, कधी गिफ्ट मिळालं कि आणि असे अनेक प्रसंग असतं.... काय होते ते दिवस अहाहा.

मग न कळत मी म्हणायचे "बास आता, लागेल तुम्हाला... ई. आणि डायबिटीज....".  डायबिटीज म्हणजे पुरे आता एवढं गोड नक्को, लाड नको अश्या अर्थाने. हा शब्द प्रयोग मी अनेक वर्ष केला कदाचित अनेक प्रसंगी. कित्ती गोड / कित्ती लाड = डायबिटीज.

मग थोडा काळ मधे गेला, मुलं थोडीशी मोठी झाली आणि एक दिवस ह्यांना एक फोन आला आणि हे बोलतांना जराशे घाबरलेले / काळजीत दिसले. फोन झाल्यावर मी साहजिकच विचारलं काय झालं ते, आणि माझी पिल्लं पण होतीच माझ्या आजूबाजूला तेव्हा. हे म्हणाले ह्यांच्या मोठया भावाला डायबिटीज डिटेक्ट झाला. मला पण अर्थातच काळजी वाटू लागली पण न कळत माझी दोन्ही पिल्लं म्हणतात कशी आम्हा दोघांना, "आम्हाला माहित आहे डायबिटीज म्हणजे काय ते..." ओह, आम्ही दोघेही अगदी चाट पडलो त्या दोघांची ती एकत्र रिऍक्शन बघून / ऐकून.  कारण त्यांच्या शब्दकोशात डायबिटीज म्हणजे फारच गोड लाड करणं आणि त्यांनतर माझ्या कडून हा शब्द ऐकणे एवढेच होते तेव्हा, हाऊ इनोसंट. 

Please listen to this story, click on this link of YouTube: https://youtu.be/8-8effMXb2Y

On Twitter too: https://twitter.com/DrPreetiMulay

And also on Facebook.


"आली कुठुनशी कानी..." आदित्य रानडे

आज हा जगप्रसिद्ध अभंग, ज्याची मी आभाळाएवढी फॅन आहे, तो ओरिजिनल सिंगर च्या आवाजात ऐकला आज पुन्हा एकदा बरेच वर्षानंतर. 

माझ्या सासऱ्यांना अगदी पहाटे पासूनच आकाशवाणी लावायला आणि ऐकायला फारच आवडतं. त्यात "भुले बिसरे गीत", बातम्या आणि त्यानंतर भक्ती गीते असतात. त्यात आज हा अभंग होता. 

ओरिजिनल सिंगर ला सहर्ष आदर प्रणाम कारण अगदी लहानपणी पासून त्यांच्याच आवाजात ऐकलं आहे हे, पण जेव्हा पासून आदित्यने म्हटलेलं ऐकलं आहे तेव्हा पासून मी 

१. आदित्यच्या आवाजाच्या आणि सादरीकरणाच्या प्रेमातच पडली आहे (ह्याच्या आधी सुद्धा मी लिहलंय त्याच्या बद्दल) आणि 

२. आता फक्त आदित्यच्याच स्वरात हा अभंग मला गोड वाटतोय. 

ओरिजिनल सिंगर ची मनापासून माफी आणि प्ररामानंद होतो आदित्यचं हे काही मिनिटांचं सादरीकरण ऐकून, सगळे टेन्शन गायब, सकाळची सुरवात जर ह्याच्या अभंगाने झाली तर दिवसभर कुणाची बिशाद कि टेन्शन येईल ते... मनापासून आशीर्वाद आदित्य ला आणि असाच नेहेमी गात राहा, ऐकवत राहा, इतका जगावेगळा गुरु लाभलाय त्याला मग असा रिझल्ट मिळणारच ना. 

Listen to this story on : https://youtu.be/qD6TaE1kx2s

On Twitter :https://twitter.com/DrPreetiMulay

Also find me on Facebook.



मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

Good morning$$$$ Preeti…

Good morning$$$$ Preeti…

It was the most unusually awesome start of my day today, reason, ohh, its different for me and happened for the first time ever and that too unknowingly and suddenly. Wow.

I have the habit of wishing everyone around me every morning

  • using wonderful, happy, bright etc. like words,
  • in person, by mail, or verbally,
  • to living and non-living things, etc. don’t know why…

it just happens since long, observing myself about this habit.

Today in continuation to that, and a step ahead, unknowingly said “Good morning Preeti” just by looking at me in my favorite restroom mirror. It was so rapid / sudden that I went to the Cloud-9 immediately. Then I realized how important it is to greet ourselves too, the energy generated after this sudden act lasts for the entire day and in that I did multiple tasks so$$$ fast. Wow.

In the list or as a part of trending concept called “me time”, things of spending and taking out time for self, etc. greeting yourself should come first, according to me now.

Greeting self is definitely new to me at least, and if its new in general too, then for this tiny act today the credit goes to my awesome current and past colleagues, research orientation and enthusiastic friends around me, providing support and environment to think and act differently & automatically many a times or I must say almost always.

Enjoy listening to this story in my own voice on YouTube at : https://youtu.be/heOKaoGOYzM

Also on Twitter : https://twitter.com/DrPreetiMulay

And Facebook too. 

 

 

 

दृष्टी आड सृष्टी

"इनक्रेमेंटल लर्निंग (Incremental Learning)" हा माझा संशोधनाचा आवडता विषय आहे, त्यामुळे कदाचित मला फारच इन्क्रिमेंटली लर्न करायची सवय लागली आहे / इम्यून झाले आहे. असो. कसे ते ऐका ....

नॉर्मल दिवस सुरु होते तेव्हा गेली अनेक वर्ष आता मला माझ्या घरापासून ऑफिस आणि परत हा मार्ग संपूर्ण पाठ झाला आहे आणि ठिकठिकाणी बुभुक्षितांची सोय करण्याकरता असंख्य टपऱ्या / ठेले / छोटेखानी खाऊची दुकाने आहेत. मी जरी ऑफिस मधून निघतांना थोडंस तोंडात टाकलंच असत म्हणजे घरी पोचल्या पोचल्या भूक-भूक होत नाही, तरीही ऑटोमॅटिकली डोळे आणि श्वास काही क्षण बंद करण्याची सवयच झाली आहे मला, जेव्हा असे हे खाऊचे ठिकाण वाटेत येतात तेव्हा.

तसेच अनेक वर्ष मी बऱ्याच लोकांबद्दल सहज निरीक्षण आणि अभ्यास केला (झाला) आहे,  लोकांची इरिटेटिंग रिऍक्शन चेहेऱ्यावर कधी दिसणार आता हे मला पूर्णपणे समजलं आहे. त्यामुळे अशा वेळी आपोआप डोळे बंद, बघायचंच नाही, म्हणजे स्वतः वर परिणाम होत नाहीच. प्रश्नच नाही.

तसेच कचऱ्याचे देखील. असं कोणीतरी म्हटलं आहे ना कि "चांगलं ऐकावं, बघावं आणि बोलावं देखील". मग ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याकडे देखील मी कानाडोळा करतेच, पुन्हा एकदा डोळे बंद.

ह्याचा अर्थ संपूर्ण ऑफिस ते घर प्रवासाचा वेळ मोबाईल नामक वस्तूत घालवणे नव्हे. अनेक अप्रतिम आणि निसर्गरम्य गोष्टी आहेत बघण्यासारख्या त्या टिपाव्यात.

तर अशी हि माझी अनोखी "दृष्टी आड सृष्टी". 

Listen to this story / tiny experience on youtube at : https://youtu.be/JbrgPzfrCiQ

Also find me with many such stories at Twitter : https://twitter.com/DrPreetiMulay

And facebook too.

 

Who is the motivational speaker?

  • The one who is trained to speak using motivational words?
  • The one who is a modern guru?
  • The one who is having tons of years of experience of life time?
  • The one who can speak in impactful manner? etc.

Nope dears, not at all. 

For me, I have experienced today one living legend & for me he is the motivational speaker 1000%. He is handsome young musician, singer, composer, etc… and he is the IT guy too, did engineering, MS, worked with world’s best industries & the creator of world’s first unique music app where-in multiple Indian classical music instruments starts playing or accompanying the singer automatically & immediately. He got the applaud from world’s who’s-who in the music world till date for his work & he is also ready with a special version wherein visually impaired can effortlessly use his app for singing along with the live orchestra. He is now a music trainer too, conducts concerts (live but not actually live) & trying to make his app even more suitable for Mac book too. I mean I can go on & on & on about him but now I am sure you know what the motivational speaker is all about, right? 

I am totally satisfied by arranging this expert lecture today & very sure students will cherish this forever, as there is so much to learn from Sandeep as he has achieved it in tiny years, while handling regular riyaz, tiny twins at home & what not. 

I am truly speechless, don’t know how to write & what to write about him literally. 

To conclude, Sandeep’s around 20 years of dedicated work for the world of AI+Music speaks itself & motivates all who listens to him. To know more pl visit www.sandeepranade.com

“Your work should speak about you, not you”, someone said.

रविवार, २५ एप्रिल, २०२१

Remedies (home / suggested by professionals etc.)

Many a times I take help from popular professional search engines to locate remedies especially related to health. Those remedies are either given by experienced nanny / granny or healthcare professionals from varied pathy's. "Remedies" is the keyword included in my searches for sure, and I get to land on many websites who first describes symptoms, reasons behind this health issue, and they go on and on and on and at the end somewhere the remedies are mentioned.

Did I ask for symptoms of issues? nope, not at all. Then why these search engines show me informative websites with these unnecessary details? 

Search engines should pick up those websites which must have displayed only the remedies first. If such websites does not exists then professionals should think of making them quickly to handle tiny health fixes at home. 

So either search engines need to buckle up or I need to modify my search for sure to utilize my time effectually.

My own voice and my own story, enjoy on YouTube, here is the link to click: https://youtu.be/m6rUemYTiEw

Find me on Twitter too, with replica of these story's video: https://twitter.com/DrPreetiMulay

Also on Facebook too.


शनिवार, २४ एप्रिल, २०२१

माझी ना मी राहिले...

अगदी माझ्या आईच्या घरी असल्यापासून मला भिंतीवरून झाडू घेऊन, जाळ्या बघून / काढून घर झाडायला म्हणजेच सोबत सगळं झटकून वगैरे फारच वेळ लागतो.  सुट्टीच्या दिवशीचा माझा हा नेहेमीचा उपक्रम. आधी तर दर आठवड्याला / पंधरा दिवसाला मला आवडायचं सोफा हलवणं, इकडचा तिकडे ठेवणं ई. पण  पाय कामातून गेल्यापासून आणि बरं वाटायला लागल्यापासून मी प्रयत्न पूर्वक "मावशी" होते आणि त्यांच्या सारखं झाडते, काही मिनिटात. पर्यायच नाही आहे, आधी आवडत नव्हतं मला पण आता हे हि फा$$$$र एन्जॉय करते आहे.

आज त्यात एक भर पडली. माझ्या कडे कोणाचाही फोन नंबर आहे म्हणजे मी ताबडतोब लावला आणि बोलले असं कधीच करत नाही. आधी मेसेज / टेक्स्ट करते आणि मग त्यांच्या सवडीप्रमाणे मग पोटभर बोलते. पण आज मीच माझा नियम मोडला. मला एका जणांना डायरेक्ट फोन केला, मला अजिबात आवडत नव्हतं ते,  पण त्या वेळी बोलावसं वाटलं कारण निरोप देणं महत्वाचं होत. काही जण असतात ना डायरेक्ट फोन करणारे, आज मी पण झाले, विद्यार्थी किंवा वेगळं झाल्यासारखं वाटलं.

ह्या दोन्ही प्रसंगात मी माझी नव्हते, पण काळानुसार / गरजेनुसार बदल = प्रवाहपतित होणे आलेच. मज्जा आली.

आज जाणवलं कधी कधी असाही फोन करावा, झटपट आवारासावरी करावी, मावशी पण व्हावं नाही तर त्यातली मज्जा कधी अनुभवता येणार. 

Wish to listen this story in my voice? Its possible dear, kindly click the following YouTube link and enjoy: https://youtu.be/I7PsJQYKgIQ

Also find me on Twitter : https://twitter.com/DrPreetiMulay

And Facebook too.

 

द अदर साईड ऑफ द बेंच...

मी जेव्हा माझ्याचं इंजिनिरिंग कॉलेज मधे शिकवायला गेले तेव्हा माझ्या गुरुजनांनी विचारलेला हा प्रश्न होता "कसं वाटतंय आता, द अदर साईड ऑफ द बेंच एन्जॉय करतांना?"... अजूनही आठवतंय मला.

आज त्याची पुनरावृत्ती झाली. थोडक्यात, पण मी फा$$$$$र एन्जॉय केलं.

तर त्याच असं झालं आज आमच्याकडे टेक-फेस्ट च्या निमित्याने विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी एका खास प्रोग्रॅम च आयोजन केलं होत. आणि अर्थातच मी होते त्यात आणि हिरीरीने भाग घेतला होताच. इतकी मज्जा आली म्हणून सांगते, कि ज्याचं नाव ते. काय काय करवलं आमच्याकडनं ह्या पोट्ट्यानी. देवा.

आधी दोन डोक्याला चालना देणारे गेम ठेवले, त्यानंतर अनोखी प्रस्नावली होती सिनेमा वर आधारीत. आणि असं कधी झालाय का कि कुठलाही उत्साहाने सुरु असलेला कार्यक्रम अंताक्षरी शिवाय होणार. yes, सरते शेवटी अंताक्षरीचे काही राऊंड्स घेतले, आम्ही सगळ्यांनी फुल्टू एन्जॉय केलं. 

अहाहा. पुन्हा एकदा जगले मी "द अदर साईड ऑफ द बेंच..."  

Hear my voice in Video form on YouTube, by clicking on this link: https://youtu.be/noYjNj0WTag

Also on twitter: https://twitter.com/DrPreetiMulay

And also on Facebook.



गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

बघितलं कि सांगितलं

अनेक वर्ष सातत्याने मी हे माझ्या पिल्लांबरोबर अनुभवते आहे, म्हटलं चला लिहुयात, कारण आज हि पुन्हा तसंच झालं. 

मी सगळं जेवण आणून ठेवलं टेबलावर / dinning table आणि आली मंडळी जेवायला. 

वेद ला एक सवय आहे, 

"आज काय आहे जेवायला?" म्हणून आधी सगळं उघडून बघायचं, ताबडतोब म्हणतो कसा "आमटी तू केली आहेस ना? बघितलं कि सांगितलं मी".  

अगदी लहान होती माझी पिल्ल आणि मला शनिवार / रविवार / सुट्टी च्या दिवशी जमेल तशी मी दुपारची किंवा जशी पडतील तशी भांडी घासून ठेवायची सवय होती, तेवढीच मावशींना मदत. माझी पिल्ल (खरंच लहान होती तेव्हा) स्वयंपाक घरात आली आणि त्यांनी बघितली कि सांगायची, हि भांडी तू घासलीस ना?  फक्त ती बघून म्हणायचे दोघे. पानात वाढलेली पोळी बघितली कि तू केली ना?  चव ना घेता, मला भांडी घासताना किंवा स्वयंपाक करतांना न बघता कसे ओळखतात, महद आश्चर्य. भांडी तर ठिक आहे, कारण माझी घासलेली भांडी ठेवायची पद्धत वेगळी आहे, पण पदार्थ फक्त बघून सांगणं हे जरा नवल आहे माझ्या साठी नेहेमीच. 

पण येस, ह्या छोट्याश्या अनपेक्षित वाक्याने १० हत्तीचं बळ मिळत मला. बास अजून काय हवंय.  

Listen to this story in my voice: https://youtu.be/VQLXeP1vQWs

Also find me on Facebook and Twitter dears: https://twitter.com/DrPreetiMulay

अनोखा धन्यवाद

आज नेहेमीप्रमाणे आरोळी ठोकून, कपडे गोळा करून, सरतेशेवटी कपड्यांची मशीन लावली. आज काय महद आश्चर्य पण कपडे थोडे कमी होते. नाहीतर माझे "हे" मला नेहेमी म्हणतात "अगं पुरे पुरे, ओव्हर लोड करू नको त्या वॉशिंग मशीन ला" आणि त्यावर माझं नेहेमीच फंडू उत्तर ठरलेलं असतं ते म्हणजे आणि अर्थातच ते वैज्ञानिक पण आहे माझ्या दृष्टीने "एकदा का पाणी पडणं सुरु झालं, कपडे ओले झाले कि आपोआप जागा होते मशीन मधे". असो. 

रोजचाच / नेहेमीचाच संवाद आहे आमचा तो, दोघेही एन्जॉय करतो आणि दोघेही म्हणायचं काही थांबवत नाहीच. 

पण आज मला मनापासून जाणवलं कि तीच मशीन मला धन्यवाद देत आहे कारण? अहो कपडे थोडे कमी होते ना, तरीही मी एक चादर आणि खोळ पण घुसवली, तरीही जागा शिल्लक. त्यामुळे "तिला" (आणि बहुतेक "ह्यांना" देखील) जरा वेगळं आणि हलकंफुलकं वाटत होत म्हणे. 

सहीच ना. 

असे माझे सजीव आणि निर्जीव घटकांशी सतत संवाद चालूच असतात, कारण माझ्यासाठी सगळेच सजीव आहेतच, कारण ह्या मशीन्स दिसतील अशी / visible बटणं वापरून काम करतात आपली बटणं अदृश्य असतात एवढाच काय तो फरक / बदल, माझ्या दृष्टीने. 

Listen in my voice this tiny story on: https://youtu.be/ARWCY_QQtbM

Locate me also on Facebook and Twitter too: https://twitter.com/DrPreetiMulay

मनगटातील जोर...

जर आपल्याच घराची सगळ्या प्रकारची दारं, खिडक्या, ड्रॉवर्स ई. जर आपण प्रत्येक वेळी आवाज न करता हाताळले तर चालतं ना, का नाही? अहो मंडळी, जर त्या दाराची आदळ आपट केली, जोरात उघडलं / बंद केलं (मुद्दाम आपटलं असं नव्हतं म्हणायचं मला बरं का) तर काय मिळत हो? लाडू, का पेढे का शाबासकी? आणि कोणाकडून? मग जर काहीच मिळत नाही असूरी आनंद सोडून, तर का त्या मुक्या जिवाला त्रास का द्यायचा विनाकारण? आणि आपल्या हाताला, कानाला आणि आजूबाजूच्या जाग्या किंवा झोपलेल्यांना देखील उपद्रव करायचा फुकटचा? मला तर कधीच हे समजलं आणि उमगलं नाही आज तागायत. असो.

माझी आई नेहेमी म्हणायची असं जर चुकून झालंच आमच्या कोणाच्या हातून, किंवा एखादी वस्तू जसे कि माठातलं पाणी काढण्याचं भांड / हात / पळी / वाढी वगैरे... "मनगटात जोर नाही वाटतं, असं का पडतंय सारखं, किंवा एवढ्या जोरात का हाताळला जातोय दरवाजा? "

उसाच्या रसाच्या टपरीवरचे घुंगरू, लहान बाळाच्या पायातले छोटे आवाज करणारे पैंजण, आणि आता हि दार आदळ आपट ची सवय मला एकाच पठडीत बसवावेसे वाटतात, संकेत द्यायला हो कि "येथे उसाचा रस मिळतो", "बाळ येथेच सुरक्षित खेळत आहे", "आता आम्ही उठले आहोत, चहा टाकावा". बरोबर कि नाही मंडळी. अहाहा काय भाषा आहे नाही, अनोखी...

असो, कदाचित ज्यांच्या मनगटात जोर नसतो तेच अश्या मुक्या आणि निर्जीव वस्तूंवर जोर लावायला जातात. 

To listen to this story, kindly click on this link: https://youtu.be/PmsGR5qSC-0

Find me on Facebook and Twitter too: https://youtu.be/PmsGR5qSC-0

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

सासर आणि जर्नल (Journal)

अचंबित झाला ना हे वाचून किंबहुना हे मॅपिंग बघून. hmmm, सांगते काय गम्मत आहे ते. 

मी आज पर्यंत अनेक वर्कशॉप्स आयोजित केले आहे, आणि अनेक जणांना मार्गदर्शन केले आहे ठराविक पद्धतीचे आर्टिकल्स / पेपर्स कसे लिहायचे ते. त्यात मी अगदी पोटतिडकीने सगळ्यांना विनंती करते कि सर्वप्रथम ज्या जर्नल मधे आपल्याला हे आर्टिकल्स / पेपर पाठवायचा आहे ते शोधा, मग त्यात (म्हणजे त्या जर्नल मध्ये हो) आधीच असा पेपर लिहिला आहे का ते बघा, असेल तर:

  • तो कसा लिहिला आहे, 
  • कधी लिहिला आहे आणि 
  • काय काय त्यात नमूद केलं आहे ते सर्व नीट बघा आणि मग ठरवा कि ह्याच जर्नल मधे पेपर टाकायचा का ते? 

जर उत्तर "हो" असेल तर त्या जर्नल मधे आधी प्रसिद्ध केलेल्या पेपर पेक्षा वेगळी मनुस्क्रिप्ट उभी करावी लागेल, अँप्रोच देखील बदलावा लागेल ई. म्हणजे एक वेगळा पेपर तय्यार होईल वाचकाला उपयोगी असा आणि तो कदाचित एडिटर ला पण आवडेल. 

जर उत्तर "नाही" असेल, तर मग नवीन जर्नल शोधणं आलं, आणि हि सगळी प्रक्रिया पुन्हा करावी लागणार जोवर एकदम हवं तस्स जर्नल मिळत नाही तो वर. एकदा ठरलं कि मग पेपर लिहायला घ्यायचा त्या नुसार, त्या जर्नल च्या गरजेनुसार.

हे सगळं सांगितल्यावर जरा प्रेक्षकांचे चेहेरे बघण्यासारखे होतात. कारण सोप्प आहे. सर्वसाधारण आधी पेपर लिहिला जातो आणि मग जर्नल शोधण्यासाठी वणवण केली जाते. मी जरा उलट सांगते ना म्हणून.....

मग थोडंस वातावरण हलकं करण्यासाठी मी हे उदाहरण देतेच, ते असे :

जर्नल शोधणं म्हणजे लग्नाआधी सासरला अनेकदा जाऊन येणासारखं आहे, चाचपडणं आहे, आढावा घेणं आहे.....

हे वाक्य संपायच्या आधीच सगळ्यांच्या चेहेऱ्यावर जे खळखळून हसू फुटत म्हणून सांगते, हो हो, मुलींच्या जास्त, कारण... जाऊ दे.

ऐकावं ते नवलंच

आता म्हणे सोनं मोबाईल वरून विकत घेऊ शकतो, बिस्कीट किंवा दागिने सुद्धा. ज्यांना "चालता जिना अक्का एस्केलेटर" चढणं अशक्य आहे, किंवा भीती वाटते अशी माणसं देखील म्हणे मोबाईल / मोबिलेअँप वापरून पैशाची गुंतवणूक करू शकतात. मी स्वतः ह्या क्षेत्रात असून देखील हे वाचता क्षणीच मला घाम फुटला.  त्याला अनेक कारणे आहेतच, त्यातले एक आणि महत्वाचे म्हणजे सुरक्षितता. 

अर्थात तसं बघायला गेलं तर काहीच सुरक्षित नाही पण आणि टेकनॉलॉजि मुळे आहे पण. 

तरीही मी अजुनही अगदी मागच्या दोन वर्षा पर्यंत पासबुक ची लई भारी फॅन होते / आहे देखील. ते बँकेत जाऊन, फॉर्म वगैरे भरला किंवा नेहेमीच्या आणि एकाच सोनाराकडून दागिना घेणं वगैरे च भावत कारण त्यात फक्त दोन मंडळी किंवा इंटीटी सहभागी असतात. 

पण मोबिलेअँप द्वारे गुंतवणूक म्हणजे तुम्ही, अँप, गूगल, बँक, जेथे गुंतवणूक करणार ते ऑफिस आणि आपली माहिती ह्या सगळ्यांकडे शिवाय फुकट. 

हेच फ्युचर आहे हे मला माहिती आहे पण अजूनही अपवाद आहेच काही गोष्टींसाठी माझ्या दृष्टीने. 

ह्या आभाळाखाली जे जे म्हणून विक्रीस आहे ते ते मोबिलेअँप / वेबसाईट वापरून विकत घेता येत आहे / लवकरच येणार आहे. पण... 

मूकसंमती, एक अनोखी अनुभवावी अशी भाषा

अनेक वर्ष सातत्याने ऐकलेला हा अनुभव आहे, माझ्या असंख्य मैत्रिणी कडून, नेहेमीच. ह्या मैत्रिणींमधे घरी काम करणाऱ्या मावशी पण आल्या च बरं का, तेथे तेच, का$$$$ही बदल नाहीच. अर्थात ह्याला देखील अपवाद आहेत बरं का, पण माझ्या ऐकिवात आले नाही, किंवा फारच तोडके आले असतील जे विस्मृतीत गेले आहेत कदाचित. हे चित्र देखील झपाट्याने बदलते आहेच आणि तो एक चांगला संकेत आहे.

मी स्वयंपाक आणि संपूर्ण घर सांभाळण्याच्या कलेबद्दल बोलते आहे. जर काही उन्नीसबीस झालच चुकून कधीतरी तर बापरे, ऐकवणं ताबडतोब सुरु अगदी ऑटोमॅटिक बरं का, आणि प्रत्येक वेळी न चुकता, जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखा, कधी कधी अनेक दिवस. 

पण जर सगळं उत्कृष्ट झालं, एकदम झक्कास, साग्रसंगीत ई. जे बहुतेक होतंच तेव्हा ह्याच मंडळींची तोंड बंद. बरोबरच आहे, कारण तेच तोंड यथेच्छ ताव मारण्यात बिसी असतं ना, काय करणार बिच्चारे. आणि तुडुंब खाल्यावर मग ग्लानी येतेच, अन्न आपली कमाल करतोच, मग काय, थोडक्यात म्हणजे "मॉरल ऑफ द स्टोरी" अशी कि मूकसंमती म्हणजे सगळं आवडलंय आणि ते इतकं आवडलंय कि बोलायला देखील जागा उरली नाहीच. आणि हो हे विसरून कसं चालेल मला आणि अख्ख्या स्त्री वर्गाला, जर ह्या ग्रेट मंडळींनी ऐकवलं नाही तर आपण पुढील काही दिवस सगळ्यांना उत्कृष्ट कसं खाऊ घालणार? नाही का? व्हिटॅमिन्स चा डोस हवाच अधून मधून किंबहुना हि त्या सगळ्यांची नवी भाषा आहे असंच मला वाटत, "आय ल$$$$$व्ह यू" म्हणण्याची, hmm कस्स शोधून काढलं मी, हुषारच म्हणतात मला मग. असो. "जीवन चलने का नाम... चलते रहो सुबह-ओ-शाम"

डाग अच्छे है - भाग २

 एवढ्यातच माझ्या मुलांची प्रॅक्टिकल परीक्षा झाली बारावीची. संगणक, भौतिक शास्त्र आणि गणित ह्या लॅब करताना वेगळेच अनुभव आले विद्यार्थ्यांना.  कारणं अनेक आहेत. त्यांना जवळपास एक वर्षांनी शाळेत जायला मिळालं होत, तो युनिफॉर्म पुन्हा एकदा आणि बहुतेक शेवटचा घालायला मिळाला, मित्र मैत्रिणी शिक्षक ह्या सगळ्यांची भेट झाली प्रत्यक्ष, शाळेलाही गदगदून आलंच, साहजिक आहे ते, इतकी वर्ष जिने सतत फक्त किलबिलाटच अनुभवला तिला अचानक इतकी भयाण शांतता अगदी नकोशी झाली होती. 

असो. 

तर, मी उत्साही, कारण सोमवारी रसायन शास्त्राची परीक्षा होती. माझी शनिवार देखील सुट्टी झाली होती, माझे पाय एकदम शांत होते, मग मी माझे पण आठवड्याचे कपडे इस्त्री करतच होते तर अनायस्या म्हटलं द्या काही असेल तर. दोघेही एका स्वरात म्हटले  "लॅब कोट". मी पण उत्साहात इस्त्री करायला सुरवात केली आणि असं आढळलं कि त्या सो कॉल्ड पांढऱ्या रंगाच्या "लॅब कोट" वर पांढरा रंग शोधून सापडणार नाही इतके असंख्य डाग होते, रादर अप्रतिम अशी सुंदर कलाकृतीचं तय्यार झाली होती जणू. मला इतकं लई भारी वाटलं म्हणून सांगते, म्हटलं दिसतंय खूप एन्जॉय केलंय रसायनशास्त्र. ह्या अश्या भारावलेल्या अवस्थेत दोन कोट कधी अप्रतिम इस्त्री झाले मला देखील समजलं नाही. 

कित्ती वर्षांनी मी "लॅब कोट" ला इस्त्री केली माहिती आहे, बहुतेक १९८८ नंतर त्या रविवारीच. अहाहा. भन्नाट छोटेखानी अनुभव.

स्त्रियांची हवेशी दोस्ती

माझ्या संपर्कातल्या सगळ्या मुली, काकू, मावशी, मामी ई. आहेत त्या घर-दार अगदी कुशलतेने सांभाळतांना मी बघितले आहे, अगदी लहानपणी पासूनच. माझ्या शेजारी राहणाऱ्या, मित्र-मैत्रिणीच्या आई ई. पैकी काही नोकरी करायच्या, बाकी घरुनच छोटेखानी व्यवसाय, तर बाकी होम मेकर होत्या. 

पण कोणीही का असेना स्वयंपाकघर काही सुटलं नाहीच. 

हा, आता थोडीशी परिस्थिती बदलतांना दिसते आहे. 

तर ह्या सगळ्या स्त्री वर्गाने अनुभवलेला किंबहुना अनुभवलेले असे अनेक उन्हाळ्यातील स्वयंपाकाचे प्रसंग इथे प्रकर्षाने द्यावेसे वाटतात. 

ह्या सगळ्या स्त्री वर्गा कडे एकतर स्वयंपाक घरात सिलिंग फॅन छोटेखानी असेल पण लावता येत नसेल कारण गॅस सुरु असतो स्वयंपाक करतांना, किंवा नसेल देखील. त्यामुळे ह्या सगळ्या स्त्रिया पंख्याची हवा आणि नो-हवा ह्या दोन्ही अवस्थेत उत्तम कामगिरी करतातच, गेले अनेक पिढ्या आणि अजूनही अनेक घरात हेच दृश्य आहे. पण तक्रार अजिबातच नाही हो. साधारणतः एक तास नक्कीच लागतो संपूर्ण स्वयंपाक व्हायला एका चौकोनी कुटुंबासाठी एका वेळेचा. त्यामुळेच कदाचित ह्या सगळ्या स्त्रीवर्गाला इतकी निकड भासत नाही पंख्याची नेहेमीच, त्या अस्वस्थ नक्कीच होत नाहीत जनरली, चुकून वीज गेली तर किंवा पंखा थोडा वेळ काही कारणासाठी बंद झाला तर. कारण त्यांची पंख्याच्या हवेशी पक्की दोस्ती झाली आहे आणि ती अनेक वर्षांपासून आहे, असला अतिउत्तम, नसला तरी अडत नाही, अडून चालणार देखील नाही. 

घरच्या गॅस ची धग तशी छोटीशी तरीही उन्हाळ्यात नकोशी वाटणारी, हॉटेल मधे काम करणाऱ्यांची अजिबातच तुलना होऊ शकत नाही. तो एक वेगळाच विषय आहे आणि लिहिण्यासारखं सुद्धा. 

हे सगळं जेव्हा मी माझ्या लेकाला सांगत होते तेव्हा साहेब काय म्हणाले ठाऊक आहे, इंडक्शन वापरायचा ना, पंखा पण लावता येईल आणि कूकिंग सहज होईल कारण ज्योत नसतेच त्याला, काही विझायची भानगडच नाही. काय मम्मा, कित्ती सोप्प आहे हे.


पालथं पडण्याचं आधुनिक वय

मला तरी असं ऐकिवात आहे कि लहान बाळांची मान धरली कि ते स्वतःच थोडे थोडे प्रयन्त करून पालथे पडायला लागतात आणि त्याला काही महिने जायला लागतात नक्कीच. 

आमच्या शेजारी एका वॉचमन ची मुलगी आहे, वय तीन महिने पूर्ण चवथा सुरु. अगदी प्रोफेशनल असल्यासारखी पालथी पडते आत्ताच. 

बरं हे सोडा, परवा सहज यूट्यूब वर एक विडिओ च शीर्षक आवडलं म्हणून मी थबकले आणि बघितला तो विडिओ आणि माझी दाही बोटे तोंडात गेली ताबडतोब. त्यात असं दाखवलं होत कि १ महिन्याचा मुलगा पालथा पडतो आहे.

देवा. काय हे, काय घाई आहे खरंच सगळ्यांना. पालथं पाडण्याचं आधुनिक वय आलंय असं दिसतंय. जन्मतः च वेगळीच शक्ती घेऊन येतांना दिसत आहेत हि बाळ. 

अर्थातच तेव्हाही होत आणि आताही असेलच काही बाळ तर पालथी पडतच नाहीत, काही कष्ट नकोत जिवाला जसे कि. त्यांना मग आई बाबा जबदस्ती पालथं ठेवतात, बिच्चारं बाळ. माझ्या बघण्यात होत एक बाळ जे आता मोठं झालंय.

रविवार, १८ एप्रिल, २०२१

अनोखे अजिबोगरीब नियम ...

आमच्या एक ओळखीचे कुटुंब आहे. गेले अनेक वर्ष आम्ही त्यांना ओळखतो. अर्थात त्यांच्या घरी एक्साक्टली आणि प्रिसाईजली काय होत हे मला माहित नाही ह्या फक्त ऐकीव गोष्टी आहेत पण फारच इंटरेस्टिंग. म्हणून म्हटलं मांडावे येथे.

त्यांच्या घरी नेहेमीप्रमाणे कुटुंब प्रमुख, मुलं, मुलांची आई आणि आजी-आजोबा पण आहेत. कुटुंब प्रमुखा शिवाय जर अजून कोणी टेलिव्हिजन लावला रे लावला कि नियमांची मोठी यादी सांगणं सुरु होते.

  • नियम क्रमांक एक: एकदा बघितलेला पिक्चर पुन्हा लावायचा नाहीच.
  • नियम क्रमांक दोन: अगदी शांत पणे कुठलाही कार्यक्रम बघायचा, बडबड करायची नाही, हसायचं तर मुळीच नाही  
  • नियम क्रमांक तीन: फालतूचे कार्यक्रम बघायचे नाहीत जसे कि रिऍलिटी शो, नवीन फिल्म्स, मराठी सिरीयल ई. (यादी फार मोठी आहे, येथे देणं शक्यच नाही) नियम क्रमांक चार आणि असे अनेक (यादी फार मोठी आहे, येथे देणं शक्यच नाही).


असले कंडिशनल नियम ऐकूनच मी दमले. बापरे.

पण तेच कुटूंबप्रमुख आणि घरचे जेष्ठ नागरिक यांनी एकच एक सतत तोच तोच पिक्चर बघितला मोठ्या आवाजात बोलत, हसत तर चालतो कारण जुन्या पिक्चर ची सर नवीन ला नाही म्हणे आणि मग जेष्ठानी करायचं काय? त्यांना आवड आहे म्हणून ते बघतात सगळं, सकाळी जो टीव्ही सुरु होतो तो अपरात्रीच बंद होतो.

मग मी प्रयत्न केला सांत्वन करण्याचा मुलांचा आणि मुलाच्या आईचा, आणि त्यांना हेच सांगितलं कि "सध्या मुलांचं अभ्यासाचं वय आहे, त्यांच्या आईने काहीतरी करून दाखवणं आवश्यक आहे, त्यामुळे हे सगळे नियम तुम्हाला आहेत. टेक इट इझी, चिल, कधीतरी वाटलं तर एखादा कार्यक्रम ऑनलाईन बघा नाहीतर चक्क गप्पा मारा, व्यायाम करा, लिहा, सकाळ संघ्याकाळ पाय मोकळे करा, पत्ते आणि अनेक बोर्ड गेम खेळा. टीव्ही ला अनेक पर्याय आहेत." माझे शब्द आणि पर्याय त्यांना आवडले आणि मला नियम ह्याची परिभाषा नव्याने उमगली. 

२०२१ मधे देखील शिकल्या सवरलेल्या घरात हे दृश्य माझ्या अंगावर काटे आणणार आहे.  असो. 

१५ दिवसांनी, १ महिन्याने पुन्हा आढावा घेतला तर सगळं शांततेत सुरु असल्याचं आढळलं मला. हाश.

शनिवार, १७ एप्रिल, २०२१

मावशी-चहापत्ती आणि टोटल गोंधळ

तर हि काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, ज्या वेळी सगळं सुरळीत चाललं होत. नेहेमी प्रमाणे आमच्या केर-फरशीच्या मावशी आल्या सकाळी सकाळी  ठरलेल्या वेळेला. त्या जरा चिकित्सक वृत्तीच्या आहेत हे मला माहित होत पण जाणवलं नव्हतं. तर नेमक्या त्या येतात तेव्हाच आमचा चहाचा कार्यक्रम चालू असतो कारण त्याच वेळी अख्ख कुटुंब साखर झोपेतून छान उठलं असतं, कोणी सकाळचा वॉक करून आलं असतं वगैरे. 

असो. 

मी आमच्या बरोबरीने मावशींना देखील चहा करतेच. त्या दिवशीही केला. आणि त्या कचरा अंगणात ठेवण्यासाठी थांबतात, म्हणतात "ताई$$$$$, चहा पत्ती टाका म्हणजे मी कचरा नेऊन ठेवते.... ई.". सगळ्यांनाच जवळपास गॅस वरून उतरलेला चहा ताबडतोब लागतो त्यामुळे त्या दिवशी काय झालं कि मी चहा पत्ती, चहा केलेलं भांड ई. सगळं ओट्या वरच ठेवलं, म्हटलं टाकुयात थोड्या वेळात आणि आधी सगळ्यांना चहा देऊन आले, मावशींना पण ठेवला, नाहीतर रोज कोणीना कोणीतरी घुटमळत असतंच आजूबाजूला ते चहा देतात आणि मी वापरलेली पत्ती कचऱ्यात टाकते ताबडतोब.  

नेमका त्याच दिवशी डब्यातला चहा देखील संपला होता म्हणून तो हि आठवणीने काढण्याकरता डब्बा उघडाच ओट्यावर ठेवला होता. 

मी चहा प्यायला टेकले ना टेकले तर चिकित्सक मावशी विचारतात कश्या "ताई$$$$, चहापत्ती टाकायची (राहिली) आहे का?" आणि चहा पिण्याच्या नादात मला ऐकू आलं "ताई$$$$, चहापत्ती काढायची आहे का?". मला गदगदल  ना अगदी, म्हंटल "एकतर ह्यांचं लक्ष बघा किती ते माझ्या स्वयंपाक घरात आणि दुसरं म्हणजे कित्ती काळजी त्यांना कि मला चहा रिफील करायचा आहे डब्यात तो...." सहीच ना.  

टोटल गोंधळ झालेला लक्षात आल्यावर दोघीही पोटभर हसलो सकाळी सकाळी. देवा. 

एक तर त्यांच्या बोलण्यात नाहीतर माझ्या ऐकण्यात चूक आहेच. जाऊ दे, एकंदरीत मज्जा आली आणि जाणवलं ह्या माझ्या चिकित्सक मावशीं बद्दल.

If life is a bicycle...

If life is a bicycle then what are breaks and who rides it?

In many situations earlier I have heard and read a lot about this idiom “Life is like a bicycle....” but every time it is discussed related to the balance while hunting for would-be bride and groom....

And thereafter it is continued with the same couple, when they become parents and what not.

The discussion was related to balance associated with the education background, financial conditions, caste, status and what not when the match is getting fixed.

But thereafter it is continued how both run the house literally, how they manage relationships, friends, work and what not, varied phases of life.

Two wheels of bicycle according the discussions done already are mapped to two people husband and wife or father and mother etc. It is also said that both the wheels of bicycle should be of same size, should run at the same time with same speed and what not, indicating equal thoughtful way of managing their life etc according to me. But if it is true, that two wheels are mapped to two human beings then who rides the bike or who puts the break? Who balances the required equilibrium / stability / steadiness etc.I don’t know at this moment. Hope I will get some clue to write further about it....

तुळशीबाग...

तुळशीबाग... हा शब्द वाचल्या वाचल्या काय काय आलं डोळ्यासमोर मित्र मैत्रिणींनो...
बरोबर, चितळे - भन्नाट शॉपिंग - कावरे आईसक्रिम...
ती गर्दी, ती व्हरायटी, ती किंमत आणि ती मज्जा...
अगदी बरोबर

पण आज मी त्या माझ्या देखील आवडत्या तुळशीबागेबद्दल बोलतच नाही आहे. 

हो अगदी बरोबर वाचता आहात मंडळी तुम्ही. 


तर त्याच असं झालं, ऐका...

१) मला माझ्या फिसिओथेरपीस्ट मैत्रिणीने सांगितल्या प्रमाणे आणि माझ्या पायांच्या वेल बेईन्ग करता सकाळचं चालणं फायद्याचं आहे.
२) आमच्या घरासमोरचा रस्ता अगदी लोण्यासारखा गुळगुळीत झाला आहे एवढ्यातच. त्यामुळे मी आजकाल शुद्ध हवा सेवन रोज करतेच.

आता फिरताफिरता पहिल्यांदा मी बदल म्हणून आमच्या गल्लीच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत गेले, आणि जाते रोज आजकाल.  डाव्या बाजूला एक छोटेखानी स्वतंत्र बंगला आहे. त्या घरमालकाने त्यांच्या घरासमोर तर फुलांच्या आणि झाडांच्या वैविध्य प्रकारच्या कुंड्या ठेवल्या आहेतच पण त्यांच्या घरासमोर एक मोठा प्लॉट रिकामा आहे. त्याचा सदुपयोग त्यांनी करून घेतला आहे आणि अत्यंत सुबक पद्धतीने आणि विचारपूर्वक वैविध्य रंगांच्या फुलांच्या कुंड्या मांडल्या आहेत. फार छान आणि वेगळेपण जाणवलं मला पट्टाकिनी. त्या कुंड्याच फक्त मी पहिल्या दिवशी बघितल्या. पण आज मी अवाक झाले एक गोष्ट बघून. त्याच घरमालकांनी पुढच्या मोकळ्या प्लॉटवर असंख्य तुळशीची झाडे लावली आहेत आणि ती इतकी बहरली आहेत, ज्याचं नाव ते. भन्नाटच. आरोग्याला चांगलं आणि दिसायला उत्तम. ते बघून मला तुळशीबाग आठवली. ओरिजिनल तुळशीबाग ह्या भागात देखील अशीच भरपूर तुळस होती म्हणे, आणि आता. हरकत नाही.

बहरलेल्या तुळशीचे दर्शन हे एक चांगलं निमित्य मिळालं आहे आता मला. 


आपलं घर आणि आंगण तर कोणीही सजवत पण रस्त्यापल्याड जाण हे कौतुकास्पद आहे, म्हणून हा लेख प्रपंच. 

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

मला भावलेली सवय / शिस्त...

हो त्याला शिदोरी किंवा मुल्य असे देखील म्हणता येईल.

तर त्याच असं झालं कि माझ्या मागे एक वॉचमेन च कुटुंब राहत एका पत्र्याच्या झोपडीवजा घरात. त्यांच्या कडे एक पिल्लू आहे जी २५ डिसेंबर ला जन्मली म्हणून नाव म्हणे ख्रिसमस म्हणण्याच्या ऐवजी किसमत असं ठेवलं. फारच बाळसं असलेली गोब्दुल आहे हि "किसमत अक्का माझी झाशीची राणी". अगदी रेअरली रडते पण ते तार सप्तकात. असो.

अनेकदा मी बघितलं आहे कि ती शांतपणे आईच्या मांडीवर बसून काही तरी एन्जॉय करत असते. शेवटी न राहवून भाभीला विचारलंच, तर म्हणते कशी "भाभी मै किसमत को काफी बार / हमेशा  कुराण सुनाती रहेती हुं, और वो भी अच्छेसे शांतीसे सुनती है". व्वा. क्या बात है. मला फारच भावली भाभीची सवय / शिस्त...

ह्या जगा पल्याड ...

अश्या काही गोष्टी नक्कीच आहेत ज्या ह्या जगा पल्याड आहेत माझ्यासाठी. मी बराच वेळ घालवला हे शोधण्यासाठी कि ह्याचा शोधक कोण आहेत ते, पण नाही सापडलं. असो.

मी कशा बद्दल बोलते आहे, "मुळ्याची कोशिंबीर", नेहेमीच्या ब्राह्मणी कोशिंबिरी पेक्षा वेगळी / हटके, कारणे दोन माझ्या दृष्टीने. एक म्हणजे ह्यात मी / माझी आई दाण्याचे कूट घालत नाही आणि दुसरे म्हणजे हि किसून करतात, नाही तर बाकीच्या चोचून / छोटेसे तुकडे करून केल्या जातात. अतिशय भन्नाट स्वभाव आहे ह्या कोशिंबिरीचा, पानातल्या प्रत्येक पदार्थाची चव वृद्धिंगत करते, जबरदस्त च अशी. जेवणाची मज्जा काय असते ते मला विचार जेव्हा मुळ्याची कोशिंबीर पानात वाढली असते. अहाहा. आजच्या कोशिंबिरीसाठी वापरण्यात आलेले मुळे इतके चविष्ट होते, कि ज्याचं नाव ते, अर्थातच दही  फोडणी मीठ साखर मिरची मोहोरी ई. चे साग्रसंगीत असलं जमलं होत ना कि अगदी मनापासून म्हटलं गेलंच "सर्वच अन्नदाता सुखी भव ।।" शेतकरी, शेतजमीन, पाऊस, एकंदरीत आजूबाजूचं वातावरण, भाजीवाला, हे, आणि अगणित अदृश्य सगळे.    

अगदी अशीच अवस्था असते माझी जेव्हा मी लाल भोपळ्याचं भरीत एन्जॉय करते, मिरचीचं लोणचं, दडपे पोहे, मसाले भात, गोळा भात, वडा भात आणि हि यादी अशी आहे माझ्या आवडीच्या पदार्थांची....

एक वेगळीच एनर्जी मिळते बावा हे सगळं केल्यावर / खिलवल्यावर.

अगदी ताबडतोब लिहायचं ठरवलंच, लिहिलं आणि असेच मला भावणारे छोटे छोटे पदार्थ करत राहते म्हणजे अनेक दिवस मज्जेत जातील आणि बऱ्याच आठवणी गोळा होतील. 

असं अनेकदा आपण अनुभवतो कि समोरचा माणूस खुशीत तुम्हाला म्हणतो "तुझ्या तोंडात तूप-साखर, किंवा दही-साखर" ई. मी पण म्हणत असे / म्हणते अनेकदा अनेकांना. मग काही जण वेगळं रिऍक्ट होऊ लागले, इतकं गोड नको वगैरे, मग मी हे वाक्य बदललं आणि "तुझ्या तोंडात बाखरवाडी / चकली...." ई. वर आले. पण हा छोटेखानी लेख लिहिल्यावर मला असं आवाहन करावंस वाटतंय सगळ्यांना कि माझ्या साठी ह्या पुढे असं म्हणा "तुझ्या ताटात मुळ्याची कोशिंबीर...".

मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

प्रवास आणि सायकल...

मला अजूनही ते दिवस अगदी जसेच्या तस्से डोळ्यासमोर उभे ठाकले आहेत जेव्हा मी माझ्या बाबांची भली मोठी दांड्याची जेन्टस सायकल शिकले होते, घरी अनाहूत आलेल्या पाहुण्यांची सायकल कशी चालवली होती आणि जेव्हा मला माझी स्वतःची सायकल मिळाली होती. अहाहा. कुठे कुठे जात असू आम्ही सगळे मित्र मैत्रिणी त्या सायकलीवर, देवा. अख्ख नागपूर पालथं घालत असू, अगदी सहज, आणि हो गियर वगैरे ची सायकल नव्हती बरं का त्यावेळी. तो अत्यानंद काही औरच होता. भन्नाट.

आज हा विषय का म्हणताय मंडळी, सांगते, ऐका.

हो सध्या माझी एक नवीन मैत्रीण झाली आहे, सायकल आणि ती देखील घरातील स्टेशनरी अशी, व्यायाम करण्याकरता, डॉ नि सांगितले कि माझ्या पायात बळ येण्याकरता रोज सायकल चालवायची. "पडत्या फळाची आज्ञा" आणि मी घेतली, ताबडतोब करायला सुरवात पण केली. रोज नियमित पणे जमेल तेवढी चालवते आजकाल. आज ती चालवतांना माझं तिच्याशी झालेलं संभाषण किंबहुना मला जाणवलेलं इथे मांडायचं ठरवलं.

तर ह्या माझ्या मैत्रिणींमधे काही सेटीन्ग्स आहेत, पायडल घट्ट करण्याचे, सैल करण्याचे, उंच रस्त्यावर चालवल्यासारखे, तुम्ही किती चालवली, काय स्पीड नी, किती किलोमीटर झाले आणि बरेच काही. अधे मधे जमेल तसे मी हे सेटीन्ग्स बदलत असतेच पण त्या बरोबर आधी कमी स्पीड,मग वाढवते, मग कधी उलटी चालवते, काही पायडल घट्ट करण्याचे सेटीन्ग्स करते ई. आपणही आपल्या रोजनिशीत असंच काहीस करतो नाही, कधी उत्साहात जोशात जोरात पळतो / कामे करतो, कधी विसावतो, कधी नक्कीच हळू चालावंच लागत तर कधी उंचसखल भाग अनुभवतोच आणि पार हि करतो सहज, अहाहा. अगदी सायकल चालवल्यासारखं, नाही का? फारच साम्य आढळलं मला म्हटलं लिहावं. असे सेटीन्ग्स नसते तर किती कंटाळा आला असता ना, किंबहुना रस्त्यावर देखील जेव्हा आपण सायकल चालवतो तेव्हा देखील न कळत किंवा थकल्यासारखं झालं तर, बदल म्हणून हे सगळे पॅडलिंग मध्ये बदल करतोच, अगदी रोजनिशी सारखे.

मनापासून धन्यवाद ह्या माझ्या नव्या मैत्रिणीला, ती आली म्हणून व्यायाम होत आहे, अजून तरी पाय जैसे-थे  आहेत, वेळ लागेल, पण काही का असेना ह्या सगळ्यामुळे आज मला हे लिहिता तर आले ना. माझ्या स्वतःच्या इतक्या वर्षाच्या रोजनिशीतील प्रवासात  कळत-नकळत स्पीड मधे केलेल्या बदलांचा आढावा सहज डोळ्यासमोर उभा ठाकला. 

To listen to this story pl visit: https://youtu.be/79dg6SjhbJY

You can find me on Twitter: https://twitter.com/DrPreetiMulay

And LinkedIn : https://www.linkedin.com/feed/update/urn:li:activity:6787964553641680896/

And also on Facebook.

 


आवरासावर मंत्री...

मागल्या शनिवारी ह्यांना अचानक उठता बसता येईना. आम्ही सगळे थोडेसे घाबरलोच. रविवारी ते जास्तच झालं. मग मी माझ्याशी संपर्कात असणाऱ्या अनेक डॉक्टरांना विचारलं कि तात्पुरतं काही करता येईल का आणि दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट पण घेतली ताबडतोब. मला समजलं / उमगलं त्याप्रमाणे ह्यांना फिसिओ थेरपी ची आवश्यकता होतीच, गोळ्यां व्यतिरिक्त. म्हणून माझ्या अगदी जवळच्या आणि ज्यांनी मला उभं केलं आहे (शारीरिक आणि मानसिक) आधार देऊन त्यांना विनंती केली घरी येण्यासाठी सोमवारी. आणि त्या ताबडतोब तय्यार झाल्या. सोमवार हा माझा "वर्क फ्रॉम होम" चा दिवस होता, पाठोपाठ ४ लेक्चर होते. डॉ. लीना आधी १०.३० च्या दरम्यान येते म्हणाल्या पण नंतर एक वाजता ठरलं भेटायचं. माझे लेक्चर, मुलांची शेवटची बोर्डाची परीक्षा, त्यांना उशीर होणार होता म्हणून डब्बा, आणि डॉ.  घरी येणार म्हटल्यावर मी भराभर सगळं घर आवरलं, थोडं वेगळं आणि वेलकमिंग दिसेल ह्याची काळजी घेतली, पन्ह करून ठेवलं, त्याबरोबर माठातलं गार पाणी देखील आणून ठेवलं आणि हे सगळं मी खूप खूप दिवसांनंतर किंबहुना खूप महिन्यात / वर्षात केलंच नव्हतं कारण ह्या "नवीन" दिवसात बाहेरच्यांच येणं -जाणं अगदीच कमी झालं आहे. पण मला जे प्रचंड भारी वाटलं म्हणून सांगते, कि ज्याचं नाव ते. म्हणजे घरानी पण थँक्यू म्हटलं जसं.  काहीतरी संचारलं होत त्या दिवशी माझ्यात, अगदी सगळं म्हणजे सगळं आवरलं विजेच्या वेगाने. मज्जा आली. अर्थात ह्यांनाच बरं वाटायला लागलं आणि डॉ. चे क्लिनिक फारच जवळ असल्यामुळे हे म्हणाले मीच जातो, उगाच कशाला त्यांना त्रास. त्यामुळे माझा थोडा हिरमोड झालाच, आणि डॉ. ची प्रत्यक्ष भेट पण नाही झाली, गप्पा राहून गेल्या पण असो. त्या निमित्याने एक वेगळा अनुभव अनेक दिवसांनी चाखता आला.  तसेही माझ्या आईच्या घरी मला हि पदवीच दिली होती सगळ्यांनी "आवरासावर मंत्री... " ते आज जगले मी पुन्हा एकदा. आणि हे मी नेहेमीच करत राहील पाहिजे हे माझ्या मनाशी निश्चित केलं ताबडतोब. 

To listen to this story, please click here: https://youtu.be/If-F7LOqWKk

Twitter link : https://twitter.com/DrPreetiMulay

Also on Facebook.

Give

My father always used to quote the importance of trees in an individual's life (as they give shadow, fruits, flowers, fragrance etc) and according to him our personality should be like a tree “Give without expecting anything back from anyone”. Keep giving always. Not only my father but yes it was a part of my studies too, heard it from my teachers also.

A step ahead, the other day I have realised one more entity from whom everyone can learn about “Giving” and they are the construction workers. As my dad was a Civil Engineer and as our country is "under-construction always", saw the teams / people working on many construction sites keenly to understand their dedication and consistent hard work for sure. Yeah, no doubt its their profession, but those workers never look back, just move on to the next site and then next thereafter. They never sit and think who must be staying in that house they built?, whether the owners liked it or not etc. First of all they do not have any time to think and they don’t need to as they just follow what is instructed to them and generally they do not keep any expectations at all. As we are aware those who construct a permanent roof for others stay in the most temporary place. During my childhood days I used to observe most relaxing and a bit arrogant behaviour of these construction workers, but now the scene is totally different.

Lets bow down whenever possible to all those hands who worked hard to give us the roof on our head(s) which protects us from all seasons, may it be our house(s) or school buildings or office(s) where we stayed, learned and worked for so many years till date.

Just Give you’re best always at home or work and move on. You may wish to look back hardly for a moment to learn, unlearn and relearn but moving on by Giving to others is utmost important. Giving may include sharing knowledge, food, education, good thoughts, experiences and the list is endless, depends on individual and his / her capabilities.

Yeah there are many other professions which involves massive and huge amount of hard work with associated dangers. But I am thinking and thanking to construction workers at this moment in this tiny write-up only. Why so? because like trees and their shadow, fruits, flowers etc. these construction site workers / teams provide the basic necessity called house or roof / shed on my head in which I live with every day as a major part of my life.

To listen to this story kindly click on: https://youtu.be/gxigUScyPdk

Twitter : https://twitter.com/DrPreetiMulay

And I am also have presence on Facebook for many such stories.

शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१

कृपा अक्का ब्लेसिंग्ज

अगदी प्रत्येक जण ह्या धरतीवर कृपा ह्या शब्दाबद्दल आणि त्याच्या परिणामा बद्दल सजग असतोच. सगळेच जण आपापल्या दृष्टीने कृपा ह्या शब्दाचा अर्थ लावत असतात.  

कोणाला असं वाटत कि मोठं घर गाडी पैसा आहे म्हणजे नक्की कृपा आहे,  

तर काही जणांना वाटत कि घर जरी छोटं असलं तरी डोक्यावर छप्पर आहे आणि सगळ्यांच्या तब्बेती ठणठणीत आहेत म्हणजे मोठी कृपा आहे

प्रत्येकाचा दृष्टीकोन (मोजमाप) अगदी वेगळा आणि बरोबर देखील. ह्यात मी पण आलेच. माझं हि कळत कृपेचं मॅपिंग चालूच असत मनातल्या मनात.  

एवढ्यातच अचानक सरकारी आदेशानुसार आम्ही लवकर निघतो आहे ऑफिस मधून कारण वाजता संध्याकाळी सगळं बंद होत त्यामुळे. लवकर निघण्याचे समजल्यावर ताबडतोब बस मधे चर्चेला उधाण आलं. "मग आता आपल्याला लवकर बोलावणार का?" .  

त्यातच माझ्या मुलांची १२वी बोर्ड प्रॅक्टिकल सुरु झालेत आणि त्यामुळे ह्यांना सकाळी शाळेत देखील जावं लागत सोडायला मुलांना

"शाळेत देखील...." ह्याचा अर्थ: माझा बस स्टॉप साधारणतः किलोमीटर दूर असल्यामुळे आणि माझे पाय कुरबुरत असल्यामुळे ह्यांना मला सोडायला आणि घ्यायला यावंच लागत.  

जर माझं हि ऑफिस लवकर झालं असत तर थोडीशी धावपळ आणि पंचाईत झाली असती.  

पण तसं का$$$ही झालं नाही. माझ्या दृष्टीने हि कृपाच आहे "त्याची" नक्कीच. प्रत्येक वेळी, क्षणोक्षणी / पदोपदी सांभाळलं आहे आज पर्यंत इतकी वर्ष "त्याने". मनापासून धन्यवाद.

Listen to this story on YouTube, click on: https://youtu.be/4AjAuhj5BKo

On Twitter: https://twitter.com/DrPreetiMulay

And also on Facebook.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...