आता म्हणे सोनं मोबाईल वरून विकत घेऊ शकतो, बिस्कीट किंवा दागिने सुद्धा. ज्यांना "चालता जिना अक्का एस्केलेटर" चढणं अशक्य आहे, किंवा भीती वाटते अशी माणसं देखील म्हणे मोबाईल / मोबिलेअँप वापरून पैशाची गुंतवणूक करू शकतात. मी स्वतः ह्या क्षेत्रात असून देखील हे वाचता क्षणीच मला घाम फुटला. त्याला अनेक कारणे आहेतच, त्यातले एक आणि महत्वाचे म्हणजे सुरक्षितता.
अर्थात तसं बघायला गेलं तर काहीच सुरक्षित नाही पण आणि टेकनॉलॉजि मुळे आहे पण.
तरीही मी अजुनही अगदी मागच्या दोन वर्षा पर्यंत पासबुक ची लई भारी फॅन होते / आहे देखील. ते बँकेत जाऊन, फॉर्म वगैरे भरला किंवा नेहेमीच्या आणि एकाच सोनाराकडून दागिना घेणं वगैरे च भावत कारण त्यात फक्त दोन मंडळी किंवा इंटीटी सहभागी असतात.
पण मोबिलेअँप द्वारे गुंतवणूक म्हणजे तुम्ही, अँप, गूगल, बँक, जेथे गुंतवणूक करणार ते ऑफिस आणि आपली माहिती ह्या सगळ्यांकडे शिवाय फुकट.
हेच फ्युचर आहे हे मला माहिती आहे पण अजूनही अपवाद आहेच काही गोष्टींसाठी माझ्या दृष्टीने.
ह्या आभाळाखाली जे जे म्हणून विक्रीस आहे ते ते मोबिलेअँप / वेबसाईट वापरून विकत घेता येत आहे / लवकरच येणार आहे. पण...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा