मला अगदी शालेय शिक्षणापासून अतिशयच उत्तोमोत्तम शिक्षक लाभले आणि त्यांची पेडागॉजि / शिकविण्याची पद्धत / तरकीब हि नेहेमीच जगावेगळी होती. त्यामुळे असेल कदाचित मी ऑफिशिअली १९९५ पासून जेव्हा शिकवायला लागले स्वतः तेव्हा पासून फक्त शिकवण्यापेक्षा जीवनावश्यक गोष्टी / कथा पण सांगितल्या जातात माझ्या वर्गात नेहेमीच. काही जण त्याला केस-स्टडी म्हणतात.
अनेक वर्ष सतत जेव्हा जेव्हा काही विद्यार्थी म्हणतात कि समुदायासमोर बोलणं अवघड वाटत, किंवा मुलाखत देणं हे एक आव्हान आहे असं वाटत तेव्हा मी त्यांना असं सांगितलं आहे कि
१. आरश्या समोर उभे राहा आणि प्रेसेंट करा. तेव्हा फक्त तुम्हीच असता तुमच्या समोर. हा सराव रामबाण इलाज आहे, अतिशय उपयुक्त असा. आरसा ह्याच्यासाठी कि तेव्हा टेकनॉलॉजि एवढी प्रगत झाली नव्हती.
२. आपल्या समोर को$$$$णी नाही असं गृहीत धरून प्रेसेंट करा, मुलाखत द्या. नवीन कलाकार जे अभिनय क्षेत्रात येतात त्यांना पण असेच सांगण्यात येते.
आज हा विषय का म्हणताय मंडळी? सांगते.
आज का कुणास ठाऊक पण अचानकपणे आणि प्रकर्षाने जाणवलं कि वर नमूद केल्याप्रमाणे (आवश्यक असेल तेव्हा) माझ्या समोर कोणी नाही, मलाच सगळं उभं करायचं आहे, असं समजून वाटचाल केली तर अपेक्षा, अपेक्षाभंग ई. चक्रविव्हात पडणारच नाही माणूस. अवलंबून राहणे, किंवा परावलंबी होणे, त्यामुळे दोष / आरोप / प्रत्यारोप ई. कधीच होणार नाहीच. असं मला मनापासून वाटत. त्याचा अर्थ माणुसघाणं होणे नव्हे, ती सीमारेषा आखता आलीच पाहिजे. असो.
उत्साहात सतत कर्म करत राहायचे, उत्कृष्ट पेरायचं, सोप्प आहे, एकदा सवय लागली कि जमेल. अगदी चिखलात कमळ जसे.
#noexpectations #aloneispower #stagefear #lotus #pedagogy #casestudy #mentoring