बुधवार, २३ जून, २०२१

श्लोकांची ताकद

लहानपणापासून ऐकलेलं आणि कानावर पडलेलं माझ्या आईच एक लयबद्ध, स्वरबद्ध, रुटीन होत, आंघोळ झाली कि सकाळी आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी सुस्वरात खणखणीत आवाजात विविध स्तोत्र म्हणायचीच ती. पहिले एक दोन श्री. गणपती स्तोत्र, त्यानंतर नवग्रह स्तोत्र, सर्व रोग शमनार्थ स्तोत्र, घोरात कष्टात स्तोत्र, रामरक्षा, भीमरूपी, हनुमानचालिसा, विष्णू सहस्त्रनाम असे.

मी असं ऐकलं आहे, वाचलं आहे आणि अर्थात वाइब्स / स्पंदन ह्या वर माझा विश्वास आहे कि स्तोत्र पठाणाने असंख्य फायदेच फायदे होतात. कोणाला? अर्थात जो पठण करतो त्याला, जो श्रवण करतो त्याला, त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींना, वास्तूला, प्रत्येक सजीव वस्तूला ई. श्रवण-भक्ती हा शब्द उगाचच नाही तय्यार झाला ना. एका आधुनिक संताने असं म्हटलं आहे कि एक व्यक्ती जर सातत्याने स्तोत्र, मंत्र, जप पठण करत असेल तर तर त्याच्या ह्या प्रयत्नाला यश येत आणि जवळपास चे हजारो लोक समृद्ध होतात, विचारांनी, वागण्यानी, आचारांनी ई.

एवढ्यातच मला कानावर आलं कि माझा एक खास मित्र असिम्प्टम्याटिक asymptomatic आहे, घरीच आहे, आणि आराम आणि काम दोन्ही चालू आहे. त्याला मी कळवलं कि सहज जमल्यास अगदी २ मिनिटाची काही स्तोत्र ऐक फक्त युट्युब वर आणि लिंक पण पाठवल्या. पठ्ठा म्हणतो कसा मी "आज पर्यंत मी कोणाला दुखावलं नाही, मी त्यामुळे काहीही करणार नाही माझं सगळं ठीक आहे, का म्हणू मी हि स्तोत्र?". ई. हि स्तोत्र म्हणायला / ऐकायला सोप्पी आहे, सध्या त्याला जो फावला वेळ मिळाला आहे तो त्याने सदुपयोगी लावावा, स्तोत्र म्हणावी, म्हणजे त्याच्या बरोबर अनेक इतरांचा प्रचंड फायदा होईल. हे कसं सांगू त्या विद्वान माणसाला?  ह्याचाच विचार करते आहे मी. 

अनेक संशोधकांनी हे सिद्ध केलं आहे कि स्वरबद्ध पद्धतीने, एकटयाने किंवा सामुहिक रित्या म्हंटल्या गेलेल्या स्तोत्रांचा, त्या लहरींचा खूप छान परिणाम होतो, दीर्घकाळ टिकेल असा परिणाम. आणि हो मंडळी, हा परिणाम माणसांवरच होतो असे नाही, त्या घरात शिजणाऱ्या अन्नावर, आजूबाजूच्या अनेक प्रकारच्या सजीव वस्तूंवर, वास्तुवर देखील बघायला / अनुभवयाला मिळतो, अर्थात डोळे उघडे ठेऊन बघितलं तर. पौराणिक कथांमध्ये देखील आपण अनेकदा ऐकलं आहे ह्या सगळ्यांबद्दल. असो. ज्याचं त्याच्या बरोबर. मी सुचवण्याचं काम केलं, त्याने नाही ऐकलं आणि उलट मलाच प्रश्न विचारला त्याबद्दल त्याचे भरभरून आभार कारण फक्त त्याच्या प्रश्नांच्या सरबत्ती मुळे आज मला एक नवीन विषय मिळाला लिहायला. अहाहा. फारच उत्तम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...