रविवार, २७ नोव्हेंबर, २०२२

Hidden Inside

One of my relatives is a regular, daily reader of one of the holy / spiritual book. He always mentions that if he is looking for answers to any question or medicine for his tough patient and he reads the same book again as a part of his normal routine, he finds the answer, irrespective of whether he reads the same details for the nth time. Such mapping happens at the correct time only unknowingly.

My route to work from home has hardly changed in many years, might have changed only a few times, but yesterday I suddenly realised something unique and new. There is a tiny society of very few bungalows on my way, and they are constructed very thoughtfully with no balconies or pipes visible from outside. 4-5 look-alike bungalows are constructed in such a way that all of their sides are visible from outside. The first thing that struck me was the independence of the bungalow and the lack of a balcony? and only walls with windows. The civil engineering world made many things feasible, including concealed fittings just for the outer presentation. But then do we keep everything hidden so as to give so much unnecessary importance to outer looks? What about maintenance, and how much you can conceal and why? Even if the materials available today are corrosion-free and other such things, some level of explosion is bound to occur at some point, in some form or another. While observing those bungalows, I felt the same way about human beings. On varied social media platforms, everything looks awesome as the focus is only on presentation. It takes more effort to showcase happiness than it does to be happy itself. Why keep everything hidden inside? Find someone—friends, relatives, or colleagues—with whom you can be yourself and live freely. Why collect stress and then manage it? Isn't it more convenient to work without accumulating stress? 

https://www.linkedin.com/posts/dr-preeti-mulay-536b43a9_hidden-inside-activity-7002639863338405888-FiRT?utm_source=share&utm_medium=member_desktop

Nonverbal communication

 Recently, and fortunately, I was in the audience of one of the spectacular programs. This program was spread over 3 days, and it was full of so much fun, witnessing hard work and coordination, and enjoying the vibes. I learned a lot. The "Cherry on the Cake" was one performance per day. The first day was a thrilling performance by the most youthful gals in their late 70s, and it was mind-blowing. The way they turned, twisted, and played with the famous songs, wow, just wow. Yet another day with astounding performances by siblings, and the wow factor was their nonverbal communication with each other throughout their performance. They were moving around the words of the songs, all over the stage, with the musical beats, as if they were one. I don't have a word in my vocabulary to describe their on-stage chemistry.

I witnessed exactly the same experience, feelings, and wholesome package recently when two of my students performed on the stage. Yeah, true, but with a twist. Here, the stage was in the classroom, and the performance was the final project presentation and viva. I witnessed the same effortless chemistry through nonverbal communication, eye contact, and body language, as well as a lot of enjoyment with strong work. Superb. These acts became more precious to me as the third day of the program featured yet another performance of two siblings, the elder attempting to portray how superior she was while focusing all of her attention and efforts on self, unnecessary moves, steps in her own world.

So when in a team, be one and portray your work as one, irrespective of kind of stage you are on.

https://lnkd.in/dWWKcCBJ
https://lnkd.in/dzB2xzSx

 बाष्प

संशोधन कित्ती महत्वाची भूमिका साकारते बघा, मग ते संशोधन औषधे, प्रॉडक्ट, पदार्थ ई. संबंधित असो किंवा जाहिरातींशी.  माझी मुलं बाळं होती तेव्हा व्हिक्स बाळाच्या नाजूक कातड्यावर लावता यायचं नाही. आता शक्य आहे, अगदी सहज शक्य आहे. कदाचित व्हिक्स च्या घटकांमधे बदल घडवून आणला असेल किंवा फक्त जाहिराती मधे. काहीका असेना आईची सोय झाली आहे, सोप्प झालं आहे बरंच. माझ्या कडे दोघे एकाच वयाचे असल्यामुळे आणि खूप लहान असल्यामुळे एकाला सर्दी पडसं झालं कि दुसऱ्यालाही निश्चित होत असे. कितीही त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी, वस्तू वेगवेगळ्या वापरल्या तरी देखील. आणि मग कसरत सुरु, कपड्याला नाहीतर चादरीला / उशीला इकडे तिकडे व्हिक्स लाव आणि अप्रत्यक्ष परीणाम साधा. पण माझी, माझ्या पिलांची डॉक्टर देखील संशोधन करणारी असावी. तिने मला एक सुंदर उपाय सुचवला. अर्थात तो काही नवा नाही पण माझ्या साठी कोरा करकरीत असा. आता माझी तीच मुलं जवळपास २० ची होत आली आणि काल-परवा मला नव्याने त्या उपायाचा साक्षात्कार झाला. तो सोप्पा उपाय असा होता कि घरातल्या सर्वात छोट्या न्हाणी घरात जायचं. तिथे जितके म्हणून पाणी भरण्याचे भांडे असतील त्यात कडत पाणी घालून त्यात व्हिक्स घालायचं. अश्या कडत पाण्यामुळे एक वातावरण निर्मिती होते आणि मग त्या न्हाणी घरात बाळाला घेऊन उभं राहायचं फक्त. व्हिक्स आंगावर लावण्यापेक्षा जास्त फायदा ह्यामुळे होतो. बाळाला श्वास नीट घेता येतो आणि ........ ह्या पुढे मला एवढ्यात समजलं. त्या वेळी मला आजारी पडणं परवडण्यासारखं नव्हतंच, त्यामुळे ह्या अश्या व्हिक्स ऊर्जित बाष्पाचा मला देखील खूप फायदा झाला, एकाच उपाय आणि मला तरणोपाय, अर्थात एकाला बरं होण्यासाठी आणि माझी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी. अहाहा च. एका दगडात दोन... क्या बात है, सहीच. असे मी आळीपाळीने दोघांना घेऊन उभे असायचे, त्यामुळे दुप्पट फायदा. दोघांसोबत बाथरूम मधे उभे असतांना मग आधीच खेळणी घेऊन ठेवायची, आरशावर काही चित्र काढून दाखवायची, बडबड गीते म्हणायची, काय विचारू नकाच. इतका वेळ घालवायला मिळायचा पिल्लांसोबत म्हणून सांगते, क्वालिटि टाइम हो. कालांतराने हे माझ्या विस्मृतीच्या कप्प्यात कुठे तरी जाऊन बसली होती परवा कडत पाण्याने शॉवर घेतला सर्वात छोट्या बाथरूम मधे मी तेव्हा थोड्याफार फरकाने तशीच वातावरण निर्मिती अचानक घडली / झाली, त्यावेळी करावी लागायची. आणि संपूर्ण जुन्या आठवणींचा चित्रपट डोळ्यासमोर उभा ठाकला. आंघोळ झाल्यावर देखील तो कडत पाण्यामुळे तय्यार झालेला इफेक्ट बराच वेळ टिकला आणि तो मी इतका एन्जॉय केला. छोट्या बाथरूम चे मोठे फायदे बघा.

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

 स्पर्शाचे जीवनचक्र

अगदी नकळत्या वयात बालपणापासून प्रत्येक मुलं हे आई, वडिल, आजी, आजोबा, मोठी भावंडं आणि इतर घरच्या जवळच्या माणसांच्या अंगाखांद्यावर मनमुराद बागडत असतं. कारण ते त्याच्या हालचालींबद्दल अनभिन्य असतं, संपूर्णपणे. पण तो नकळत झालेला स्पर्श, त्या बाळाचे सतत अंगाखांद्यावर बागडणे सवयीचे होते मोठ्यांच्या, घरच्यांच्या. बहुतांशी मुलांसोबत हळूहळू बदल होतहोतं तरी वरच्या इयत्येत जाई पर्यंत आईच्या अवती भोवती करणं, पदराशी खेळणं ई. आणि अनेक खोड्या सुरु असतातच. मग मोठी शाळा, वैविध्य मित्र, मैत्रिणी, सहचारिणी, त्यांची मुलं अशी ती स्पर्शाची लाईफ सायकल / जीवनचक्र सुरूच राहते, सातत्याने, विविध पद्धतीने, नेहेमीच.   

अनेकदा मी चर्चा ऐकल्या आहेत, बरेसचे चित्रपट पहिले आहेत, वाचलं आहे आणि आता लिहिते देखील आहे एका महत्वाच्या मुद्द्याबद्दल. आणि तो म्हणजे पुनर्विवाह वाढत्या वयातला. खूप ताशेरे ओढलेले दिसतात ह्या सर्व विविध माध्यमातून ह्या नाजूक विषयासंदर्भात. मोठेपणी, एका विशिष्ट टप्प्यावर देखील ते स्पर्श चक्र महत्वाची भुमिका निभावतं कुठल्याही अयोग्य / भलत्या अर्थाशिवाय. ह्या पुढे तुमच्या सानिध्यात / ओळखीत कोणीही मांडलं ह्या विषयासंदर्भात तर गैरसमज नको, कुठलीही भलती चर्चा नको, सल्ले तर नकोतच नको, हवी ती फक्त समजुतदारी. उगाच नाही जगभर "कडल थेरपीस्ट" असतात आणि फार महत्वाचे ठरतात, प्रमुख भुमिका साकारतात. कधीही, कुठेही, केव्हाही आणि कदापी न थांबणारे हे चक्र अविरत चालू राहो हि प्रार्थना. 

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

हालता "तो"

"काय वर्णू तव गूण  ...." अशी माझी परवा अवस्था झाली. चार डोळ्यांनी बऱ्याच गोष्टी सहज टिपल्या जातात, नकळत, काय करू? कचेरीत येता जाता रस्त्याकडे, रहदारीकडे, निसर्ग सौंदर्याकडे, शाळकरी मुलांकडे, व्यायाम करणाऱ्या उत्साही लोकांकडे, माझं लक्ष वेधलं जातंच. काल पण असचं काहीस झालं. दररोज इतकी वर्ष त्याच रस्त्यावरून जाते-येते पण काल मला अचानक एका ठिकाणी गाडी थांबली म्हणून नजरेस पडलं. नेहेमी प्रमाणे एक दुकान होतं, त्या दुकानदाराने त्याच्या दुकानाच्या नावाचा भलामोठा फलक लावला आहे रस्त्याच्या कडेला. त्या आधुनिक फलकावर फिरती अक्षरे आहेत. माझ्या अल्प ज्ञानानुसार हालती अक्षरे पुढे जायला हवीत म्हणजे ते वाचणाऱ्याला सोप्पं जाईल. पण हा पठ्ठा भलताच कल्पक दिसतोय. त्याने त्याचा फलक हा मागे मागे अक्षरं जाणारा तय्यार केला आहे. अहाहा च. माझी तर बोलती बंद झाली. खात्री करण्यासाठी मी माझ्या चार डोळ्यांनी पुन्हा बघितलं आणि उडालेच. काय हे? नावीन्यपूर्णतेचा कळस होता तो. असो. तो फलक नसता तर माझी हि अनुकथा तय्यार झालीच नसती ना. मनापासून धन्यवाद त्या दुकानाच्या मालकाला, फलक तय्यार करणाऱ्याला, असंख्य वाचणाऱ्यांना. माझा दिवसभराच्या कामाचा थकवा एका क्षणात कुठे उडून गेला ते समजलं देखील नाही. त्यामुळे मंडळी खिडकीबाहेर बघा, जाता-येता, नेहेमीच. माझे बाबा मला लहान असतांना गाडी किंवा आगगाडीतून प्रवास करतांना आवर्जून म्हणायचे, उजेड असे स्तोवर खिकडी बाहेरचं जग बघा, अंधार पडला कि मग पुस्तक चाळा किंवा काही खेळा. अगदी तस्से. करून बघा प्रयोग, मस्त किस्से तय्यार होतील तुमच्याकडे देखील. 

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

मंद दरवळ

कालची सोमवार सकाळ / पहाट वेगळी सुरु झाली. काल समजलं "मंडे ब्लूज" असं का म्हणतात ते. माझ्या पायांनी  मनापासून दुखायचं असं मनात, कृतीत आणलं आणि मग काय नकाच त्यांचं माझ्यावर कित्ती अतूट प्रेम आहे हे दाखवायला सुरवात केली. दिवसभर मी अगदी त्या प्रेमाने पुरेपूर वाहून निघाले. पण कामाचा डोंगर आणि व्याप इतका होता कि जमेल तेव्हाच मी त्या प्रेमळ मित्राला प्रतिसाद देत होते, किंबहुना प्रतिसाद आपोआप दिला जात होता. तशीच कामं उरकून ऑफिसची वेळ संपल्यावर मी घरी आले, गाडीतून उतरल्या उतरल्या एक मंद दरवळ मी अनुभवा. तो इतका अनोखा होता कि शब्दात वर्णन तर होऊच शकत नाही आणि कुठल्याही प्रयोगशाळेत तो तय्यार करता येणार नाहीच. मी सर्वत्र न्याहाळलं पण कुठेही आजूबाजूला साधं रातराणीचं झाडं काय फांदी पण दृष्टीस पडली नाही. रातराणी ह्या करता कारण माझ्या दृष्टीने त्याचाच असा मनमोहक सुगंध अनुभवायला मिळतो, सोनचाफा पण त्याच पठडीतला. खूप वेळ  राहून न्याहाळल्या नंतर मला काही तरी वेगळं भासलं / मनापासून जाणवलं कि ह्या मंद दरवळीशिवाय कोणी तरी उपस्थित आहे. किंबहुना ती उपस्थितीत इतकी जगावेगळी आहे कि तीच असा जगावेगळा सुगंध घेऊन अवतरणार. काही वेळ नेत्रांशुसह त्या अदृश्य व्यक्तींसोबत, त्या सुगंधासोबत घालवले आणि घरी परतले. आजचा दिवस देखील पायांना माझ्या कौतुक करून घ्यायचे होते त्यामुळे हट्ट धरून बसले. मी माझ्या परीने त्यांचा हट्ट पुरवण्याचा पर्यंत केला, आवरलं आणि थोडासा उशीर झाला पण ऑफिसला पोचले. तेथे तर सगळी शोभेची झाडं च आहेत अवतीभोवती. पण पुन्हा एकदा तोच दरवळ माझ्या जसाकी सोबत आला होता, रात्रभर माझी वाट बघत थांबला होता जणू. कालच खात्री झालीच होती माझी पण आज मग मनातल्या मनात संवाद साधला आणि खात्री पटली कि माझं घर आणि ऑफीसा बघण्यासाठी, मला काळजी करू नको असं सांगण्यासाठी आई बाबा दोघे जोडीने आले होते, ह्यात कुठलीच शंका नाहीच. अजूनही त्यांना माझ्यासाठी त्रास घ्यावा लागतो, कित्ती काळजी ती, बघा म्हणजे झालं. न कळवता अगदी मला प्रचंड गरज होती तेव्हाच कसं वाटलं त्यांना यावंसं कोणास ठाऊक? "शब्देविण संवादु..." साधून, पाठिवर थाप देऊन गेले पुढील प्रवासाला. मी ऑफिसामधून संध्याकाळी घरी यायच्या आत येऊन हजर होते जोडीने. म्हणून त्या मंद दरवळिला दुप्पट साज चढला होता. दोन दिवस अशी भेट झाली कि पुरेशी आहे हे त्यांना खात्रीशीर माहिती होतं त्यामुळे आज माझे पाय ताळ्यावर आले आणि मी ह्या अश्या अनुभवातून निर्माण झालेल्या कथा लिहायला मोकळी.

अर्थात हे माझ्या आईनेच मला कधी तरी सांगितलेलं आठवतंय अंधुकसं कि असा जगावेगळा सुगंध किंवा कोणीतरी शेजारी आहे ह्याचा अधूनमधून भास होणं म्हणजे काय असतं ते. मी तर काल प्रकर्षाने अनुभवलं आणि इतर दिवशी सुद्धा अनुभवते थोड्याफार प्रमाणात.    

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

ध चा मा

मी आणि माझ्या आधीची पिढी इतिहास मराठी माध्यमातून शिकले आहेत त्यामुळे त्यांना हि संज्ञा परिचीत आहे / असणारच. आणि हो, ह्या दोन शब्दांमुळेच इतिहास रचला गेला असं देखील म्हणता येईल. संपूर्ण इतिहास नाही पण थोडासा भाग म्हणा. खूप वर्षांनी मला हे सर्व का आठवलं मला माहित नाही पण आठवलं हे नक्की. ह्या संज्ञेचा एक आधुनिक भाग म्हणा आणि तो देखील ज्या मुळे कोणालाही त्रास होणार नाही असा मला सहज उमगला, माझ्या समोर उभा ठाकला. तर त्याचं असं झालं कि माझ्या कडे एक कॅलेंडर आहे, माझ्या टेबल वर विराजमान झालेलं असं, गेले अनेक वर्षांपासून. ते लाकडी आहे आणि वर्षानुवर्षे चालणारं असं. खास सावंतवाडीच्या कारागीरांच्या कुशाग्र हातून घडलेली अशी वस्तू. कल्पक आणि सुपीक डोक्यातून बाहेर पडलेली अशीच. इतकी वर्ष ती माझ्या टेबलावर आहे आणि आज पर्यंत मी दररोज त्यांना स्पर्श करते, तारीख बदलते, गप्पा मारते पण आज एक खास गोष्ट घडली. गेले २ दिवस आमच्याकडे दिवसभर काही शैक्षणिक कार्यक्रम सुरु होता त्यामुळे मी अगदी काही क्षणापुरती मी माझ्या केबीन मधे आले होते. त्यामुळे आज शांतपणे बघितलं तर कॅलेंडर मध्ये १६ तारीख होती, आणि आज १९ मग नेहेमीच्या सवयीप्रमाणे आजची तारीख बदलायला गेले तर फक्त उलट्याचं पुल्ट करावं लागलं इतकंच, बास,  6 चं 9. अहाहा च. आणि हे कॅलेंडर चे ठोकले ज्याने तय्यार केले, किंवा तय्यार करण्याआधी विचार केला त्याचे पाय धरावेसे वाटले पट्टाकिनी. भावलं मला खूप आणि ध चा मा ची आठवण झाली लगेच. इथे कमी जागेत, अर्थात उपलब्ध असलेल्या ठोकळ्यांच्या भागांमधे मावावे म्हणून लढवलेली शक्कल आहे ती, नवीन नसेल देखील पण मला आज ध्यानात आले त्यामुळे हा पंक्ती प्रपंच. इष्टतम = ऑप्टिमाइजेशन, असलेल्या जागेचे सर्वोत्तम उपयोग ह्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे हे कॅलेंडर. तो ध चा मा असो नाही तर 6 चं 9 कल्पकतेला सलाम. प्रत्येकाने त्याच्या क्षेत्रात नेहेमीच अशी / अश्यापद्धतीची उपकरणे वापरावीत,कोणाचं नुकसान होणार नाही हे बघून पण कलात्मक पद्धतीने.

समुद्र येती / येई घरा

अगदी लहानपणा पासून असंख्य वेळा मी समुद्रा काठी, समुद्रसपाटीवर गेले आहे, ते अगदी मागल्या वर्षी पर्यंत. शहरात राहणाऱ्यांना ओढा असतोच समुद्राचा माझ्या मते आणि तो एक फारच वेगळा अनुभव असतो. प्रत्येक वयाच्या टप्प्यावर काही तरी नवीन शिकवून जातो तो समुद्र, वेगळा आनंद आणि बरेच काही. शाळेत विज्ञान शिकायला सुरवात झाली कि मग लाटांमागचं, फेसामागचं, अथांग पणाचं मार्म्य पिटुकल्या प्रमाणात उमगायला लागतं आणि मग मज्जा द्विगुणीत होते. त्या नंतर मग फक्त समुद्र नाही तर नारळाची झाडं, वाळू, निळा रंग, बोटी, घोडागाडी, सूर्यदर्शन, शांतता आणि बरेच काही भावून जाते आणि प्रत्येकवेळी नवीन अनुभव देऊन जाते, जो शब्दांच्या पलिकडला असा असतो. इतकी वर्ष सलग इतक्यांदा समुद्रसफर घडून देखील, इतक्या अनुभवांची शिदोरी असून देखील मला आज नव्याने एका रहस्याचा उलगडा झाला. माणसं समुद्र दर्शन करायला, त्या पाण्यात डुंबायला का जातात? ते पाणी नैसर्गिकरीत्या खारट असतं, फक्त पाय ओले केले किंवा संपूर्ण भिजलात कि एक वेगळी तारारी येते, खूप उत्साही वाटतं, ऊर्जा मिळते आणि असेल नसेल तेवढा थकवा दूर पळून जातो. हे मी कधी लक्ष देऊन अनुभवलं नव्हतंच. आज आपणहून ते नजरेपुढे उभं ठाकलं माझ्या.

थोडसं विषयांतर पण ते गरजेचं आहे, "साधु-संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा", "पाहुणे येती घरा, तोचि दिवाळी दसरा" अश्या म्हणी म्हणजे माझ्या शिक्षकांचा, तदनंतर माझा जीव कि प्राण. बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा बैठी घरं असायची फक्त, गगनचुंबी इमारती नाहीत. आणि हो अर्थात हे मोबाईल नामक यंत्र पण नव्हते कि विचारून कोणाच्याही घरी ये-जा करायला. दारात भिक्षा / माधुकरी मागायला भिक्षेकरी येत असतं, किंवा साधू संतांचा सहवास पण लाभत असे असंख्य वेळा. त्यामुळे अचानक जर साधुसंतांच्या दर्शनाचा लाभ झाला किंवा त्याची पाऊले घरी पडली कि धन्यता मानली जात असे. पाहुणे म्हणजे अतिथी, देवासमान, त्यामुळे ते येणं, पोटभर जेवून जाणं हे भाग्याचं लक्षण जणू. ज्या दिवशी साधुसंत आले, पाहुणे आले त्याच दिवशी दिवाळी / दसरा, नसतांना देखील. पाहुणे म्हणजे आनंद, हास्य, अनुभव, ऊर्जेचा समुद्र आणि बरेच काही.

सद्यस्थिती ज्या दिवशी माझे पाय अबोल, म्हणजे पेन-फ्री त्या दिवशी जणूकाही माझी दिवाळी / दसराच जणू. आज सकाळी गरम / कडत्त पाण्यात भरपूर मीठ घालून पाय शेकत होते तेव्हा मला खरं गमक समजलं कि समुद्राच्या पाण्यात पाय बुडवले कि भन्नाट का वाटतं ते. आहे कि नाही मज्जा. चला तर मंडळी गाडी काढा, निघा आणि धमाल करा, असतीलच काही वेदना तर त्या कधी सहज विरून जातील हे समजणार देखील नाही समुद्राच्या पाण्याचा स्पर्श झाला कि.

प्रत्येक वेळी समुद्र गाठायची गरज नाही हे देखील मला उमगलं, घरीच "दुधाची तहान ताकावर". अर्थात तो समुद्राचा मंद धुंद सुगंध नसतो पण त्याचा स्प्रे मारू शकतो आणि वातावरण निर्मिती होऊ शकते.   सरते शेवटी माझ्या पायांना धन्यवाद देऊ तेवढे कमीच आहेत कारण आज मला एक नवीन म्हण सुचली त्या बद्दल  "समुद्र येई घरा, तोचि दिवाळी दसरा".

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

बघावं ते नवलंच

मला परवा एक दृश्य दिसलं, एका रहदारीच्या पुलावर. दुचाकी, आई चालवणारी (असावी कदाचित),हेल्मेट नाही, मधे एक छोटं पिल्लू, आणि त्या पिल्लू मागे अजून एक थोडसचं मोठं. त्या थोड्या मोठ्याच्या हातात मोबाईल आणि त्याच्या त्या फोन वर गप्पा सुरु आहेत, वाहत्या रस्त्यावर, एवढं काय महत्वाचं आहे?, ऐकू कसं येतं?, जमतं कसं? आणि गप्पा काय किंवा अभ्यासाच्या बाबतीत केलेली चर्चा काय ती शांततेत केली जायला हवी, एका जागी बसून अशी हालता-चालता रस्त्यावर नाहीच. बरं अगदी एक टक्का मान्य केलं कि कदाचित तो एखादा पत्ता विचारतं असेल तर ते पण अश्यक्य वाटतं कारण बहुतांशी आपण अनोळख्या ठिकाणी जायच्या आधीच पत्ता, जवळपासच्या महत्वाच्या खुणा, रास्ता ई. बघून ठेवतो, मिळवतो नसलेली माहिती. ह्या कृतीतून ती माउली त्या दोन्ही मुलांना काय शिकवते आहे? आजूबाजूला ये-जा करणाऱ्यांना काय दर्शवते आहे? मोबाईल आहे म्हणजे तो असा वापरण्याकरता नाहीच. त्याची एक खास उपयुक्तता आहे. कुठेही, कधीही, केव्हाही, यावेळी, विनाकारण का वापरायचा तो? जीव स्वतःचा आणि आजूबाजूला चालणाऱ्यांचा देखील धोक्यात, कशासाठी? काही मिनिटांनी एकदा तुम्ही त्या ठिकाणी पोचलात की बघा/ बोला/ ऐका, तुम्ही ना हि देशाचे पंतप्रधान नाही राजे, नाही का? जागे व्हा लवकर, तब्बेतीला बरं राहील सर्वांच्याच.

हे सगळं ठीक आहे, माणसांशी किंवा शारीरिक बाबतीशी निगडित आहे. तो जर फोन पडला / निसटला हातातून चुकून, खड्डा आला म्हणून किंवा अजून काही कारणास्तव तर? एक तर तो उचलण्यासाठी धडपड होणार, तुमची आणि इतरांची देखील त्या रस्त्यावरच्या, तो मोबाईल वाचवण्यासाठी कदाचित धडपड होईल आणि त्या नंतर वाचला तर ठीक नाहीतर नवीन घेण्याची घाई आणि वेगळी काळजी. काय हि गोळाबेरीज. त्यापेक्षा शांतपणे भल्यामोठ्या पिशवीत, खिश्यात, किंवा गाडीच्या डिकीत त्याला विराजमान करा, स्वतः "पळती झाडे" बघा, आस्वाद घ्या, घेऊ द्या आणि हव्या त्या ठिकाणी पोचल्यावर मग बघा तो शांतपणे. तो पडला तर आर्थिक, सामाजिक, मानसिक, ई. नुकसान तर होणारच पण त्याला जखमा होणार त्याचं काय? तुमचा अवयव, सखा, सर्वस्व, जीव कि प्राण, खेळणं, त्याला इजा झालेली आवडेल तुम्हाला? विचार स्वतःला आणि सारासार विवेक बुद्धी वापरून कृती करा, म्हणजे मिळवलं.

शुन्य

माझ्या दररोजच्या रोजनिशीत काही ठराविक वेळा आहेत, निश्चित अश्या. कधीतरीच त्यात किंचित बदल घडतो. कचेरीतुन घरी येण्याची वेळ निश्चित आहे. अख्खा दिवस काम करून घरी परतल्यावर उद्वाहक अक्का लिफ्ट समोर पोचलं रे पोचलं कि असं वाटतं कि ती शुन्यावरच उभी हवी, म्हणजे ताबडतोब घरी पोचता येईल. आणि अर्थात माझी राणी उद्वाहक फारच समजुतदार आहे आणि शब्दांविना कळले सारे शब्दांच्या पलिकडले असे काहीसे, अगदी ९९ टक्के वेळा ती दत्त म्हणून शुन्यावर उभीच असते, मी कधी येते ह्याची वाट बघत, काळजी पोटी, माझे बाबाच जणू. पण माणूस कसा असतो बघा, जेव्हा जेव्हा मी घरातून सकाळी धडपडत बाहेर पडते ऑफीस करता तेव्हा त्याच उद्वाहक कडे बघून मनापासून वाटतं कि शून्यावर नाही तर माझ्या मजल्यावरच ती असो. पण नेमकी बहुतांशी ती शून्यावरच असते कारण ती तिचं काम चोख पार पाडत असते, लोकांना सकाळच्या घाईच्या वेळी पट्टाकिनी खाली / खालच्या मजल्यावर पोचवायचं (ग्राउंड फ्लोअर वर). त्यामुळे दोन्ही वेळी येता - जाता मला ती शुन्यावर आढळते दररोज. मला ती एकदाच शून्यावर हवी असते हो, पण असो, शुन्याचं महत्त्व पुन्हा एकदा नव्याने उमगलं मला. ह्या तिच्या कृतीमुळे किंवा नकळत मला कित्ती मोठी खास शिकवण मिळाली बघा. एक: नेहेमी शुन्यावर असावं म्हणजे हवं तिथे जाता येतं, दोन: आपल्या कोणाची तरी वेळेवर, नेहेमीच आणि दृश्य स्वरूपात वाट बघावी.    

नाटकं

हा शब्द किंवा वाक्यांश ऐकला कि आपल्या डोळ्यासमोर उभा ठाकतो तो एक भव्यदिव्य स्टेज, रंगभूमी, भारदस्त अभिनय, कलेवर प्रेम करणारी माणसं, लाईट, शब्दांची फेक, संवाद आणि बरेच काही. कुठल्याही बोली भाषेची गम्मत हि आहे कि जो शब्द ज्या पद्धतीने वाक्यात वापरला जातो त्याचा तसा अर्थ निघतो. ह्या शब्दाचे देखील अनेक अर्थ काढता येतील. त्यातील एक अर्थ असा आहे जो मी सध्या जगते आहे अगदी फुल्टू. मी मागे एकदा लिहिल्याप्रमाणे हि डॉक्टर मंडळी माझ्या सारख्या रुग्णाला अनेक औषधें का देतात? तर माझ्यासारखी व्यक्ती किंवा अश्या अनेक व्यक्ती पाणी फार कमी पितात दिवसभरात म्हणून, अर्थात तो रोग बरा व्हावा म्हणून देखील. सध्या माझे डॉक्टर म्हणतात कसे "ह्या दिलेल्या गोळ्या तर घ्याच, पण त्याशिवाय गरम पाण्याने शेकत जा, मलम लावत जा, हवं तेव्हा तेलाने चोळा, कधी अधेमधे दुखणं कमी होण्याकरता उपयोगी येणारे पॅच लावा ई. माझ्या कडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या मावशींनी घरगुती उपाय सुचवले आहेत ते. त्यात अन्नाच्या  मार्गाने पण पोटात पौष्टिक घटक जावेत त्यामुळे यादी आहे वेगवेळेला फस्त करण्याची ई. जेवायच्या आधी काही मिनिटे हे प्यायचं, हे औषध घ्यायचं, जेवणांनंतर ह्या गोळ्या, जेवणानंतर एक खास पेय आणि मग त्यानंतर सरते शेवटी गोळी ज्याने डोळ्यांवर झापड येऊ शकते म्हणून. अधे मधे लागेल तसं घरगुती उपाय, मलम, शेक, तेल, व्यायाम, फळं आणि बरेच काही. त्या वेळा पाळता पाळता नाकात दम येतो, नाटकं नुसती. ह्या नाटकाची पात्र म्हणजे वैविध्य आकाराच्या, प्रकारच्या, चवीच्या गोळ्या, विविध उष्णतेचं पाणी (पिण्यासाठी, शेकण्यासाठी), वेगवेगळी तेलं, मलमं. कधी पाहिलं आहेत का असं नाटक? शक्यच नाही. आणि ह्याचे प्रयोग दररोज न चुकता होतात / घडतात हो. पण हसत - खेळत सगळे नाटकाचे भाग करण्याशिवाय काहीही पर्याय नाहीच माझ्यासमोर. आज पर्यंत स्वतःकडे लक्ष न देण्याचे परिणाम किंवा अजून काही, पण इतक्या कौतुकाची, इतकं सगळं स्वतःसाठी करण्याची अजिबातच सवय नाहीच मला, त्यामुळे ज्यांना माझ्या ह्या सगळ्या नाटकांची पार्श्वभूमी माहित नाही त्यांना तर हि नाटकंच वाटणार. पण हरकत नाही. हे हि सही. वेळापत्रक हे फक्त शाळा आणि महाविद्यालयातच असतं हे मला माहिती होतं कधी माझं असं एक खास वेळापत्रक असेल असं स्वप्नात देखील कधी वाटलं नव्हतं. त्यामुळे आता "त्याच्या" कृपेने हे सगळं सांभाळतांना अगदी खास एखाद्या राज्याची राणी / राजकन्या असल्याचा भास होतो मला, नसतांना. हे कित्ती खास आहे बघा. असं राणी होणं कित्ती जणांच्या नशिबी असतं? खूप कमी आणि त्यात मी एक अग्रगणी स्थानावर आहे, आहे कि नाही मज्जा?. एका मागोमाग सरबत्ती असते सगळ्या पौष्टिक घटकांची. ह्या सरबत्तीत माझ्या मावशी, लेक, डॉक्टर ई. सगळे सामील आहेत. सरतेशेवटी ह्या लढाईची जीत होवो हि सदिच्छा, म्हणजे नाटकं एकदाची थांबतील.

प्रत्येक घटनेकडे जर एक नाटक म्हणून बघितलं तर कित्ती सगळं सोप्पं होईल नाही? म्हणजे त्याची पात्र तोंडपाठ होतील आणि त्याची लांबी फक्त आणि जास्तीत जास्त ३ तासांची आहे हे माहिती असल्यामुळे ते संपणार आहे हे निश्चित समजेल. त्यामुळे हे आणि येणारी प्रत्येक नाटके खोटा चढवलेला मुखवटा आहे हे लक्षात येईल, दुर्लक्ष करता येईल आणि हसत-खेळत प्रेक्षक म्हणून आनंद उपभोगत येईल.

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

सुवर्णमध्य


कित्ती सांगू आणि काय काय सांगू असं झालयं मला आज, "आनंद गगनात मावेना..." असं काहीसं. मी कचेरीत होते, माझं नुकतंच दुपारचं जेवण आटोपलं होतं आणि माझ्या केबिन मधे अचानक केक अवतरला. अहाहा च. मोठ्ठा केक चा डब्बा घेऊन माझी एक विद्यार्थिनी आली. माझ्या साठी राखून ठेवलेली एक पेस्ट्री दिली आणि मग त्यामागची कहाणी कथन केली. विद्यावाचस्पती होणाऱ्या सगळ्या जणी एकत्र एका खोलीत असतात, मिळून सगळे सण, वाढदिवस आणि बरेच काही साजरे करतात नेहेमीच. आज त्यातल्याच एकिचा वाढदिवस होता म्हणून पेस्ट्रीज आणल्या होत्या. त्यातल्या एकीवर माझं नाव कोरलं गेलं होतं आपसूक. वाढदिवस होता तिच्या घरी केक कापणं चालत नाही, काही कारणास्तव. त्यामुळे ह्या सगळ्या मैत्रिणींनी तिच्या साठी वैविध्य पेस्ट्रीज आणल्या होत्या. कित्ती सुंदर हा सुवर्णमध्य ना? म्हणजे केक खायचा पण ना कापता, शिवाय भरपूर निरनिराळ्या, वेगवेगळ्या चवी चाखायला मिळतात ते वेगळचं. मला फार भावलं. कोणाकडे मेणबत्ती विझवत नाहीत, तर काहींकडे केक पण चालत नसेल, अंड असलेला किंवा कुठलाही ई. तरी पण त्यातून मार्ग काढून आनंद उपभोगणं सर्वांसोबत हे फार महत्वाचं. आणि हे फक्त केक च्या बाबतीत नाही तर प्रत्येक खाण्याच्या आणि इतर सर्व गोष्टींना लागू आहे. त्यामुळे बदल स्विकारा, अडून राहू नका, बोला, मोकळे व्हा, अढी ठेऊ नकाच कोणा आणि कश्याच बाबतीत, म्हणजे मग सर्वत्र स्वर्गाहून सुंदर भासेल. 

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

चेतावणी

तर त्याचं असं झालं कि माझ्या असंख्य मैत्रिणींपैकी एकिने काही तरी खूपदा अनुभवलं. ते जे अनुभवलं ते नंतर अनेकदा / पुन्हा पुन्हा घडतंय हे तिच्या लक्षात आलं आणि त्यात एक खास पॅटर्न आहे हे देखील जाणवलं. तिचं भलं मोठ्ठं कुटुंब, अनेक माणसं, प्रत्येक वयोगटाची, स्वभावाची आणि प्रकृतीची. तिचं, तिच्या लेकराचं सर्वांशी खूप पटायचं, अर्थात आत्ता पण छान पटतंय काहीच शंका नाही. पण फक्त दोन जवळची माणसं अशी होती कि ज्यांचे विचार, आचार आणि कृती हे ह्या जगावेगळी होती, जुनी किंवा भलतीच, ज्याला मराठी भाषेत कुठलाही शब्द नाही अशी. अर्थात काही कारणास्तव किंवा विनाकारण राजकारण म्हणून ते दोघे कधीही न विचारात प्रगट होत असतं माझ्या मैत्रिणीच्या घरी गावाहून. ज्या क्षणी त्यांच्या हातात तिकिटं पडली रे पडली कि त्यांचा फोन यायचा कि आम्ही अमुक अमुक दिवशी येतो आहोत. बास, तो एक काही क्षणाचा फोन आणि भल्या मोठ्या ठिणग्या पडायला सुरवात व्हायच्या. त्या क्षणापर्यंत सुरळीत चालू असलेलं घर आजरी काय व्हायचं, कटकटी काय सुरु व्हायच्या, उगाचच काही तरी व्हायचं, वातावरण गढूळ होऊन जायचं फक्त बातमी आली तरी. माझा प्रत्येकाच्या आजूबाजूला जी वलयं असतात, व्हायब्रेशन्स त्यावर प्रचंड विश्वास, भरवसा आहे, ती आहेत हे निश्चित. हजारो किलोमीटर दूर त्या दोन व्यक्तींमध्ये इतकी शक्ती होती कि इथली  सर्व वलयं तेहेस नेहेस होऊन जायची. जे कधी व्हायचं नाही ते अनुभवाला मिळायचं. आल्यावर मग तर भलते रूप असायचेच. काय करायचं अश्या पाहुण्यांचं खरंच.  

आज अनेक वर्षां नंतर मला हे प्रकर्षाने आठवण्याचे कारण म्हणजे माझा चार दिवसांचा पाहुणा येऊ घातला आहे. आणि तो येणार ह्याची घोषणा दिली गेली आहे, कधी नव्हे ते काय काय विचित्र व्हायला लागले आहे. दरवेळी इतका वेगळा प्रकार कसा काय जमतो ह्याला हेच महद आश्चर्य वाटतं. कित्ती म्हणजे कित्ती शिकण्यासारखं आहे नाही, यायच्या आधीच ह्याच्या इतक्या तऱ्हा आल्यावर तर मग.... काय करायचं अश्या पाहुण्यांचं.

पण हे दोन्ही पाहुणे हक्काचे, महत्वाचे, आपलेच आणि न टाळता येणारे.

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

Noticeable truth

These days EV is a boom and might be the need of an hour. 2-wheelers or 4-wheelers EV run so smoothly that human being blessed with great hearing abilities also will not know when it passes by. Its great and dangerous at the same time. Vehicle’s sound was the identity, just by listening to the sound we used to come to know that which vehicle is coming from behind or passing by from side etc. listening to various sounds on the road was one of the abilities every driver should have, but this phenomenon is no longer valid. “cheery on cake” is the advent of technologies related to wireless devices, music gadgets and ear ornaments (ear phones, head phones, air pods etc). those who use it consistently I don’t think they are musicians / part of giant music industry or surgeons who consistently operate in OT.  

Me and my colleagues were conducting final viva with students last few days. One of my colleagues is a seasoned teacher, her voice is heavy, loud and audible to the entire class. While conducting viva exams there were we, the faculty members, and only two students in the class. There was no background, foreground noise or sound. Proper calm, quiet environment, no fan on high speed but still many students were not able to hear the simplest of the questions asked, queries raised by seasoned teachers. For every word they were requesting to repeat as they were not able to hear us. At the tender age of 18-19 if this is their state of ear how will they survive? Aren’t they realizing what’s going on? Going back to original state of the ear is impossible but they should stop further deterioration of the sensory organ.   

ताल सुरांची मैफिल

 कंपने, स्पंदने, ताल, लय, मात्रा ई. चा प्रत्येक मनुष्य प्राण्यांवर, सर्वच सजीवांवर निश्चित आणि सुंदर असा परिणाम होतोच. मी जेव्हा जेव्हा झांज, तबला, पेटी आणि इतर वाद्य ऐकते, त्या सोबत भजनांचा अभ्यास किंवा सराव करते तेव्हा तेव्हा मला एक वेगळी ऊर्जा मिळते, अर्थात सर्वांनाच मिळत असावी. मला फक्त ती प्रकर्षाने जाणवते. काहीतरी वेगळं होतं हे निश्चितच मात्र. सगळीच वाद्य कंपने निर्माण करतात आणि ती सुक्ष्म / अतिसुक्ष्म पेशींपर्यंत पोचतात, त्यांना देखील एक वेगळी ऊर्जा मिळते आणि प्रसन्नता निर्माण होते. आज पुन्हा एकदा झांज घेऊन माझ्या मैत्रिणीला साथ देतांना मला हे जाणवलं. प्रत्येक सेंसरी ऑर्गन / ज्ञानेंद्रिय उल्हसीत होतात, आणि सगळ्या वाद्यांची मिळून, त्या ताल सुरांची एक सुंदर मैफिल सुखावून जाते. त्यामुळेच असेल कदाचित मागच्या पिढीत काकड आरती, माध्यन आरती, संध्याकाळी / पूजे दरम्यान केलेली आरती, भजनं, किर्तनं ई. आवर्जून करत असतं, भाग घेत असतं आणि त्यामुळेच सर्वत्र भक्तिमय आणि समाधानी वातावरण तर होतंच, तब्यती उत्तम राखल्या जायच्या आणि प्रत्येक क्षणी कुठलाही ताण-तणाव अजिबात नसायचा. ताण नसायचा त्यामुळे तणावाचे व्यवस्थापन कसे करायचे हे शिकण्याची आणि अनुभवायची सातत्याने गरज पडत नसे. पुजा-पाठ, सण-वार वर्षभर सुरूच असायचे, त्यामुळे त्याचा सराव आलाच, त्यामुळे अजून काही दिवस सुमधुर स्वर, बोल कानावर पडायचे आपोआप. अर्थात त्यावेळी गुगल-बाबा नव्हता हे उत्तम होतं. आणि हो तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सध्या तबल्याचे बोल जैसे थे अँप वर उपलब्ध आहेत, पण त्यामुळे कुठलेही कंपन निर्माण होत नाहीत. तबला किंवा इतर कुठल्याही वाद्यांची जागा इतर कोणीही घेऊच शकत नाही. अँप मुळे थोडीशी सोय नक्कीच होते, पण तबला तो तबलाच सरते शेवटी. त्यामुळे मंडळी जमेल तेव्हा स्वतः वाद्य वाजवा, किंवा काही कार्यक्रमाला हजेरी लावा आणि फरक अनुभवा. असं म्हणतात ना कि ज्या ठिकाणी स्वतः देवांचे वास्तव्य होते त्या स्थळाला जाऊन या, किंवा गायनाच्या / वादनाच्या / भजनांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा म्हणजे त्या दिग्गज कंपनांच्या सानिध्यात तुम्ही येता, त्यामुळे तुमची कंपने आपोआप रंग-रूप बदलतात, सत्संग लाभतो, शारीरिक / मानसिक / वैचारिक / धार्मिक आणि इतर पातळीवर उत्कृष्टच बदल घडतो जो टिकतो आणि त्याचे दुर्श्य परिणाम नक्कीच होतात. आणि हे विज्ञानाने सिद्ध केले आहे अनेक वेळा, खालील वेबसाइट वर ह्या बद्दल जास्त माहिती दिली आहे ती वाचा. 

https://www.healthline.com/health/vibrational-energy#thoughts-behaviors-and-vibrations

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२

पाय मोकळे करणे

आधीच्या पिढीला अत्त्योत्तम सवयी होत्या, त्यांना शारीरिक कष्ट, काम, अंगमेहेनत असायची, त्यात भरपूर चालणं होत असे. शेतात, बस थांब्या पर्यंत पोचण्यासाठी, परत घरी, जीने चढ-उतार आणि बरेच असे. त्या वेळी तंत्रज्ञानाची प्रगती झाली नव्हती, सर्वत्र अगदी सारखं वातावरण त्यामुळे लिफ्ट माहिती नाही, सायकल म्हणजे श्रीमंती होती जणू, अकरा नंबरची बस किंवा सार्वजनिक परिवहन व्यवस्था एवढंच. अर्थात काही जण अगदी थोडक्या प्रमाणात आवर्जून व्यायाम म्हणून चालायला जात असतं. रात्री यथेच्छ जेवण करून तृप्त झाल्यावर शतपाउली आवर्जून घडत असे. भारत-अमेरिका हा प्रवास लांबचा आहे. विमान जरी आंतरराष्ट्रीय दर्जाचं असेल तरी देखील इतके तास सलग बसणं आव्हानात्मकच आहे. टीव्ही असतो, चित्रपट बघता  वाचता येत, भरपूर खायला-प्यायला देखील मिळतं पण तरी देखील भरपूर वेळ शिल्लक असतो, ताणून देऊन सुद्धा. त्यात काय करायचं? तर चालायचं. कोणी चित्र रेखाटत असतं, लहान बाळं असतात त्यांच्याशी खेळायचं, गप्पा मारायच्या जमल्यास, फळं ठेवली असतात ती चाखायची ई. भलं मोठं विमान असतं त्यामुळे चकरा मारायला जागा देखील असते आणि ते आवश्यक असतं. गेले ५-७ दिवस मी आणि माझे सहपाठी मिळून विद्यार्थ्यांच्या तोंडी परिक्षा घेतो आहोत आणि आकडा मोठा आहे, त्यामुळे दिवसभर चालू होत्या परीक्षा. जरी आम्ही मनाने आणि शारीरिक क्षमतेनुसार तरुण असलो तरी देखील आता कुठलेही भलेमोठे ध्येय गाठायचे राहिले नाही, बाकड्यावर दिवसभर बसण्याची सवय नाही आणि कोणाला सांगू नका पण ऐकण्याची सवय पण मोडली आहे हो. ह्या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे.....

मग त्यावर आम्ही एक तरणोपाय शोधून काढला. अधेमधे दोन विराम / विश्राम / ब्रेक घेतले आणि त्यानंतर काही प्रेसेंटेशन्स / सादरीकरणे उभे राहून ऐकले. जो वर विद्यार्थी त्यांचा संगणक भल्यामोठ्या पडद्याला जोडत नाहीत तोवर बेंचच्या ओळींमधून चकरा मारल्या आणि मग खूप बरं वाटलं आणि मला माझ्या अमेरिकेच्या केलेल्या प्रवासांची, त्या सीट्स च्या ओळींमधून चालण्याची प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय राहिली नाही म्हणून हा पंक्ती प्रपंच.

तंत्रज्ञानामुळे, बदललेल्या जीवनशैलीमुळे, कामाच्या व्यापांमुळे किंवा अजून इतर काही कारणांमुळे सध्या बैठक जास्त होते आहे, बहुतांशी सर्वांचीच. उठा, उभे राहा, चालते व्हा, पाय मोकळे करा, जेवणा नंतर, अधेमधे, प्रत्येक तासाला किंवा जसं जमेल तसं. पण त्या पायांना देखील बदल हवा तो पुरवा मंडळी. बदल हा सर्वांनाच भावतो, मग पायांना का द्यायचा नाही? जेव्हा जमेल तेव्हा सोशल मिडिया चा वापर करून वाढदिवस किंवा अजून काही प्रसंगांना शुभेच्छा देण्या ऐवजी प्रत्यक्ष त्या व्यक्ती कडे जा, हस्तांदोलन करा, गळाभेट घ्या, तुम्ही जाऊन शुभेच्छा देण्यासारखी दुसरी भेटवस्तू नाहीच, नाही का? आणि पाय देखील खुश. 

पडद्यामागचं रहस्य

जुन्या हिंदी चित्रपटात नायक आणि नायिका खूप चालतात किंवा पळतात, हे का? हा मला एक प्रश्न पडला होता अनेक वर्षांपासून. आज मला त्याचं उत्तर मिळालं, अर्थात एका प्रकारचं. खूप मनापासून लिहिलेले शब्द असायचे गाण्यात, बरेचदा सर्व चित्रपटाचा आढावा जणू. त्यामुळे गाण्याची लांबी जास्त असायची खोली सोबत. आंतरराष्ट्रीय ठिकाणी जाऊन किंवा भारतातच पण काश्मीर किंवा तश्याच अप्रतिम ठिकाणी संपूर्ण चमू ला घेऊन जाऊन शूटिंग केलं जायचं, भरपूर पैसा ओतला असायचा. मग ते ठिकाण संपूर्ण दाखवायला नको का? त्यामुळे हि धावपळ हो, म्हणजे पार्श्वभूमी नैसर्गिक आणि पुढ्यात सुंदर जोडी नायक-नायिकेची. आणि चेरी ऑन केक म्हणजे त्यावेळची लोक दोन्ही बघण्याचा आनंद घेत असतं. त्या ठिकाणची ओळख करून देण्याची अजून कुठली दुसरी पद्धत तर नसेल माझ्या मते. ज्यांनी कोणी हा असा विचार केला असेल, त्या पद्धतीने कॅमेरा वापरला असेल त्याला सलाम. शपथच. कॅमेरा देखील तृप्त होत असेल असा नैसर्गिक खजाना बघून, अनुभवून, नक्कीच आणि नेहेमीच, फक्त त्याला व्यक्त करता येत नाही तेवढंच. जर एखाद्याला कुठलंस ठिकाण मनापासून बघायची सुप्त इच्छा असेल पण जाणं अवघड आहे काही कारणास्तव तर मग जुने चित्रपट बघा, सहज उपलब्ध आहेत ऑनलाईन, दुधाची तहान ताकावर मंडळी, नाही का? तुम्हाला त्या नैसर्गिक देणगी लाभलेलं ठिकाण डोळे भरून बघता येईल त्याच्या मूळ स्वरूपात, प्रदूषण वगैरे नसतांच्या दिवसात होते तस्से. आहे कि नाही मज्जा. बघा तंत्रज्ञानामुळे काय काय शक्य होत आहे ते.

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२

प्रवास

कुठल्याही पद्धतीची चित्रकला साकार करायची म्हणजे कागदं आली वैविध्य प्रकारची,पेन, पेन्सिल, रंग, ब्रश, खोडरबर, आणि इतर साहित्य देखील. अर्थात कुठलीही कला साकारण्याआधी त्याबद्दलचा विचार, नियोजन, कृती, बैठक, मांडणी, प्रसन्नता, वातावरण, वातावरण-निर्मिती, इच्छा आणि बऱ्याच गोष्टी लागतात. ह्या सर्वांपुढे (म्हणजे वस्तू आणि ज्यांनी त्या तय्यार केल्या, तुमच्या पर्यंत पोचवल्या ई) नतमस्तक झाल्यास कलाकारांच्या हातून कलाकृती घडते, जन्मास येते. मग ते चित्र / पेंटिंग असो, किंवा इतर काही. ह्या सर्व वस्तूंची साथ जर मिळाली नाही तर पुढे जाणं शक्य नाही. कुठलीही एक कलाकृती म्हणजे एक खास प्रवास. "त्याने" तय्यार केलेला पूर्वनियोजित असा प्रवास. ते चित्र चित्रकाराला हवे त्यावेळी जमेलच असे नाही. त्या करता सुद्धा वेळ यावी लागते. आणि मग ते चित्र एकदा उभं ठाकलं कि भिंतीची शान होणार, किंवा कोणाच्या मालकीची होणार, का विकली जाणार, त्याच शहरात राहणार का परदेशी जाणार हे ठाऊक नसतंच, कधीच, कोणालाच.  एवढ्यातच मी माझ्या जुन्या संस्थेला भेट द्यायला गेले होते. माझ्या सोबत काही भारतीयच पण परदेशी स्थायिक झालेले असे होते. माझ्या खास मैत्रिणीने जी कि एक संपूर्ण आर्ट-स्टुडिओ सांभाळते महाविद्यालयाचा तिने तिचं एक खास चित्र भेट दिलं. आणि आज ते चित्र दिमाखात विमान प्रवास करत आहे, सातासमुद्रापार जात आहे. तेथे पोचल्यावर ताठ मानेने फ्रेम केल्यावर ते अमेरिकेच्या आलिशान भिंतीवर एक अत्यंत खास आठवण म्हणून विराजमान होणार आहे. त्या चित्राने किंवा माझ्या मैत्रिणीने ते साकारताना पुसटसा तरी विचार केला असेल का कि हे चित्र सरते शेवटी कुठे स्थानापन्न होणार आहे ते? अशक्यच. पण बघा. होतं त्याच्या नशिबी आणि उडाले ते चित्र. अर्थात सध्याच्या आभासी / (तत्वतः) वास्ताविक जगात भिंतीवर विराजमान होण्याआधी ते शेकडो लोकांच्या हाती पोचलं देखील असेल. त्यांनी त्याचा आनंद उपभोगला देखील असेल, त्या चित्राकडे बघून प्रेरणा घेतली असेल आणि परमानंद गाठला असेल.  

 "युअर वर्क शुड स्पिक अबाउट यू, नॉट यू", "तुमचं कार्य बोललं पाहिजे तुम्ही नाही" अशी एक म्हण आहे. त्यामुळे सातत्याने कार्य करत राहा, तुम्ही एका खास कार्यासाठी इथे आहेत, प्रत्येक कार्य महत्वाचं आहे, पुढे वाटचाल करा इतकंच. प्रवास आपोआप घडेल, त्याचा उगम, त्यामागची संकल्पना, उदिष्ट, शेवट ई. कडे लक्ष न देता, त्या करता "तो" आहेच कि.
तर अश्या ह्या अनोख्या प्रवासाची साठा उत्तराची कहाणी सफल संपूर्ण.

हास्य

बऱ्याच दिग्गजांनी असं म्हटलं आहे, लिहिलं आहे आणि अनुभवलं असेल त्यामुळे ते माझ्या वाचनात आलं. त्यांच्या नुसार वैद्यकिय शाखेला देखील अजून संपूर्ण मानवी शरीर समजले / उमगले नाही. मानवी शरीर यंत्रणा हि इतकी गुंतागुंतीची आहे, वेगळी आहे, वैविध्य स्थरावर काम करणारी आहे आणि प्रेत्येकाची कदाचित वेगळी देखील. तंत्रज्ञानाच्या मदती मुळे आत काय चाललंय हे बऱ्याच प्रमाणात समजायला लागलं आहे पण अजूनही तो टक्का फार कमी आहे. वैद्यकिय तज्ञ त्यांचे अनुभव आणि तंत्रज्ञानाची मदत मिळून खूप काही साधता आले आहे पण तरी देखील बराच टप्पा गाठायचा आहे, किंवा अनाकलनीय आहे खुपश्या बाबी. त्यातली एक महत्वाची बाब म्हणजे आहार. सध्या किंवा गेली काही वर्ष पाश्चात्य संस्कृती म्हणा किंवा फॅड रुजू होत आहे आपल्या देशात आणि त्यानुसार बरीच मंडळी डाएट  करतांना आढळतात, द्र्ष्टीस पडतात. संशोधक प्रयोग करतात, त्यांचा अनुभव आणि आलेले परिणाम / निकाल / निष्कर्ष ई. वर डाएट सादर करतात, बरीच मंडळी त्याचं अनुसरण करतात, सफल किंवा असफल होतात. माझ्या मते प्रत्येक संशोधकाचा एक ठोकताळा असतो, ठराविक धाटणीतला निष्कर्ष असतो, काही थोड्या व्यक्तींवर प्रयोग केलेला असतो, त्यामुळे तो प्रत्येकालाच लागू पडेल असे नाही. सहज मला असं जाणवलं कि प्रत्येक व्यक्ती जे खातो किंवा नाही खात, डाएट करतो, टोकाला जातो, अती जास्त किंवा कमी खातो कोणाच्या तरी सांगण्या-बोलण्या मुळे, हे सगळं अजून एक जण जवळून ऐकतं असतो, प्रत्युत्तर देत असतो, आणि पोटभर हासत देखील असतो. आपली पचन यंत्रणा मनात म्हणत असेल कि काय हि शहाणी समजणारी माणसं, त्यांना असा समाज / गैरसमज आहे कि संपूर्ण पचन-यंत्रणा त्यांना इतंभूत माहिती आहे. मानसिक+शारीरिक+आणि इतर अनेक गोष्टींचा परिणाम त्यांना पाठ आहे, मानव हा सर्वश्रेष्ठ आहे. हास्य मांडलंय हे माझ्या मते. पण असो त्या पचन-संस्थेला, एकंदरीत शरीराला हासत-खेळत अविरत काम करता येतं ह्या माणसाच्या अश्या विचार आणि आचारांमुळे. ज्या ज्या सर्वांमुळे पुढ्यात ताजताज वाढलंय त्या सर्वांसमोर नतमस्तक व्हा, शारीरिक सहज, साधा-सोप्पा आणि नियमित व्यायाम होईल ह्याकडे प्रकर्षाने लक्ष द्या, अतिरेक टाळा, सात्विक भोजन करा, थोडेसे छंद जोपासा, हसा, आनंदी राहा म्हणजे तुम्ही स्वतःच हास्य करून घेणार नाही. तुमची पचन-संस्था सातत्याने धन्यवाद देईल.   

Mouse

 “Wireless laser presenter”, “slide changer” or “remote for ppt presentation” etc are synonyms terms which are very frequently used by technical people, I mean they use the term and tiny device too. There are various types of these remotes available, one is just the slide changer, another one is highlighter, pointer and what not. Its challenging to use these remotes while retaining the attention of the listener, crowd or people, as the speaker might not be very familiar with it. The basic requirement is to change the slides while explaining the contents on the screen by maintaining the tempo of story telling independently. The speaker need not request others to jump back and forth to the slides, wait for others to react… I leaned a new smart and fabulous thing / way-out today as one of the teams used wireless mouse as slide changer. I witnessed it for the first time, and it was indeed a wow moment for me. GenZ is awesome and really smart.

Twinning

The moment we see this phrase we just think about similar clothes / attire, thoughtfully planned for a specific event or day, with a beloved friend or colleague etc. This is a boom these days during college festivals or other events just to enjoy the event, to take selfies / photos and to post it on various social media sites. The same phrase was visible to me today during one of the lab exam presentations. Two members were there in a group project. The project was decided and teams worked on it for the entire semester. The first group who was ready to deliver today was in similar looking attire including color code of clothes, belt and shoes too. The presentation was technically very strong. The ppts were apt, graphs were informative, flow includes storytelling using data, communication was awesome etc to name a few. The project was thoughtful planned, benefited for society, implementation, ppt, report and twinning in all respects shows perfect “time management”, interest, self-motivation and team work was carried out with utmost enjoyment. Thanks to my beloved students Dear Aadith and Apoorva, made my day for sure.

संभाषण

माझ्या सोसायटीत आणि कचेरीत शेजारी शेजारी दोन लिफ्ट्स आहेत. हे सर्वश्रुत आहे कि एक बटन दाबले कि लिफ्ट येते. दोन लिफ्ट्स आहेत म्हणजे दोन वेगवेगळी बटणे दाबायची गरज पडत नाही. जी लिफ्ट तुम्ही ज्या मजल्यावर आहेत त्याच्या जवळपास आहे ती येऊन उभी राहते तुमच्या दिमतीला आपसूक. अर्थात तश्या पद्धतीची आदेश / सूचना दिलेली असते लिफ्ट च्या यंत्रणेला. पण तरी देखील आज सहज माझ्या मनाला शिवलेला विचार मांडते आहे इथे कि शेजारी शेजारी दोन वेगळ्या लिफ्ट्स आहेत म्हणजे त्या दोघांमध्ये एक भली मोठी भिंत आहे, विटा सिमेंट ने बांधलेली. शिवाय लिफ्ट चा ढाचा बसवण्याकरता बांधलेल्या विविध थरांच्या भिंती देखील आहेत, स्टील च्या, लाकडी, लोखंडाच्या आणि अजून काही असतील कदाचित. इतक्या भक्कम भिंती मधे असून देखील ह्या दोन शेजारी शेजारी पहुडलेल्या लिफ्ट्स जर संवाद साधू शकतात, संभाषण करू शकतात तर मग माणसं का नाहीत हो? कुठल्याही भिंती भौतिक / फिसिकल बांधलेल्या भिंती आजूबाजूला नसतांना, अगदी शेजारी शेजारी बसलेले असतांना कुठल्याही प्रकारची देवाण घेवाण होत नाहीच. आणि झालीच तर काही अंशी वाद होतो संवाद नाही. आपण बहुतांशी नियमितपणे अश्या शेजारी बांधलेल्या लिफ्ट्स बघतो, वापरतो देखील मग शिकतो काय त्यातनं? माणसानेच, तंत्रज्ञान तज्ञानेच असा प्रोग्रॅम तय्यार केला असेल ह्या लिफ्ट्सनी संवाद साधावा ह्या करता. मग त्याच किंवा त्या सारख्या बाकी माणसांनी का साधू नये साधा आणि सातत्य असणारे संभाषण? कुठल्याही बाबतीत सातत्य अतिशय महत्वाचं, नाही का? त्यामुळे कृपया आत्तापासून तो मोबाईल नामक अवयव जरा बाजूला सरकवा, त्याच तोंड बंद करा आणि भिंती नसलेल्या सजीव प्राणी, पक्षी, झाडं, झुडपं, माणसं ह्यांच्याशी काही क्षण गप्पा मारून तर बघा आणि मला निश्चित कळवा हो मंडळी. आणि हो त्यात सातत्य राखा म्हणजे तीच सगळी सजीव मंडळी तुमची वाट बघतील, तुमच्या सुमधुर आवाज ऐकण्यासाठी उत्सुक राहतील आणि मग "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे". लिफ्ट मध्ये तरी दिलेली कमांड वापरून संवाद साधतात, ती कमांड देखील बुद्धियुक्त माणसालाच द्यावी लागते, पण आपल्याला अशी कमांड द्यावी लागत नाही, आपण कोणावरही अवलंबून नाही, भाषण, संभाषण, संवाद हा नैसर्गिक रित्या यायला हवा आणि येतोच, मग का त्याचा विसर पडला आहे आपल्या सर्वांना? परवाच गंमत म्हणून एका ठिकाणी भोजन करण्यासाठी गेलो आम्ही, बघतो तर काय ती जागा खास तरुणांसाठी होती. त्यामुळे बहुतांशी प्रत्येक टेबलावर जोडी बसली होती आणि दोघे अगदी जेवतांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या मोबाईल मध्ये व्यग्र. काय दृश्य होतं म्हणून सांगते. महद आश्चर्य वाटलं मला. ह्या ठिकाणी तरी नको ना, कारण तुमची अत्यंत लाडकी / प्रिय व्यक्ती समोर बसली आहे, असं असतांना गप्पा मारण्याचं सोडून भलतंच काय? माझ्या आकलना पल्याड आहे हे.

फक्त सजीवांकडून नाही तर ज्यांना आपण कृत्रिम रित्या सजीव केलं आहे, प्रोग्रॅम करून, सूचना देऊन अश्यांकडून देखील शिका,म्हणजे तुमच्या हातून पुढील प्रोग्रॅम अजून प्रगल्भ आणि उत्कृष्ट होईल. माझं हे ठाम मत आहे कि प्रोग्रामर जसा असतो तसे त्याचे प्रोग्रॅम. मग तुम्हीच जर संवाद साधला नाही तर संवाद साधायला लिफ्ट्स ना किंवा इतर मशिन्स ना कसे शिकवणार? साधं आणि सोप्प आहे सगळं.

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०२२

चुंबकत्व

मला समजायला लागल्यापासून अनेक गोष्टींप्रमाणे एक गोष्ट मात्र फार प्रकर्षाने जाणवली / समजली होती कि मनगटी घड्याळ हे कमवावं लागतं. ते सहजी मिळत नाही. त्यावेळी माझ्या घरी फक्त माझ्या वडिलांकडेच फक्त मनगटी घड्याळ होतं. त्यांनी ते कचेरीतुन आल्यावर काढून ठेवलं कि मग मी त्याला स्पर्श करायची, घालून बघायची आणि नकळत संवाद साधला जायचा. अनेक वर्षांनी मग आईला, भावाला अशी घड्याळं मिळाली. तेव्हा एकतर स्टील चा किंवा चामड्याचा पट्टा असायचा. नंतर सोनेरी पट्टा अधेमधे नजरेस पडायचा. व्यक्तिमत्वाला "चार चांद" लागायचे घड्याळामुळे, फक्त माझ्या दृष्टिकोनातून. हळूहळू मग पाण्यात घालता येतील असे मजबूत प्लास्टिक-वजा, बांगडी सारखे दिसणारे, खडेजडित, स्टील धातूंचेच पण वैविध्य रंग चढवलेले असे, इलॅस्टिक स्वभावाचे, कड्या सारखे आणि आताशा पट्टा एका बाजूने वेगळे होणारे (स्मार्ट घड्याळ, ज्यांना चार्ज करावं लागतं असे) अनेकाविध प्रकारचे निघालेत, काही त्याला धरबंध नाहीच. एवढ्यातच माझ्या पाहण्यात आणि वापरण्यात एक अनोखा पट्टा आला आहे जो चुंबक तत्वावर घडवला आहे. त्याला कुठलेही धरबंद नाहीत, म्हणजे हुक नाही, कुलूप नाही, छिद्र / खाच नाही ई. फक्त पट्टा आहे, त्याच्या टोकाला आणि संपूर्ण पट्ट्याला चुंबकीय क्षमता आहे त्यामुळे मनगटाच्या आकारानुसार फक्त ओढून सोडून द्यायचं.   बास. काय काय नवीन निघेल काही सांगता येत नाही. स्वस्त आणि मस्त, कुठलीही डागडुजी बराच काळ लागणार नाही असा तो पट्टा, प्रचंड हलका, पण दिसायला अगदी नेहेमीच्या पट्ट्यासारखाच. वापरल्यावर / हात लावल्यावरच समजणार कि नक्की काय दडलंय ते. प्रचंड लवचिक देखील.

माझ्या दृष्टीने असे नवनवीन शोध लागतात, माणसं नव्याची (नवीन वस्तू विकत घ्यायची / वापरायची / मिरवायची) भुकेली असतातच. त्या व्यतिरिक्त अश्या वस्तूंकडून भरपूर शिकण्यासारखं असतं. आत्ता ह्या क्षणापासून मला वाटतंय कि सर्वांनी कुठल्याही खाच + हुक = लॉक / कुलूप / घट्टपकड अश्या बाह्य आणि जास्तीच्या वस्तूंची गरज पडू देऊ नयेच. हा चुंबकीय शक्ती असलेला पट्टा / घड्याळ कसं प्रत्येकाच्या मनगटाप्रमाणे सहज बदल करतं तस्संच आपणही घरी / दारी करावं ना? काय हरकत आहे, म्हणजे कुठलीही देखभाल / डागडुजी ई. खर्च पडणार नाही, वाढणार नाही आणि त्यामुळे काही अडणार नाही मग कुठलाही माणूस, परिस्थिती, आव्हान का असेना. हलकं फुलकं राहून, आकार बदलून शिवाय चुंबकत्वाच्या शक्तीने भरपूर असे प्रत्येक क्षण आनंदाने पार पडण्याचा प्रयत्न करावाच. चला तर मग, लागा कामाला ताबडतोब.  

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

रुसलेला लाडू

माझ्या आईच्या हाताला एक जगावेगळी चव होती, उत्कृष्ट स्वयंपाक, पक्वान्न आणि इतर सगळे म्हणजे सगळे पदार्थ सहजी करण्याची हातोटी होती तिची. खास असायचं सगळंच आणि ते देखील एकुलती एक मुलगी, प्रचंड लाडात आणि श्रीमंतीत वाढलेली, गुगल वगैरेची साथ नसतांना, माहेरी स्वयंपाकघर कुठल्या दिशेला आहे हे माहित नसलेली अशी. त्यामुळे माझ्या साठी आणि बाकी ज्यांनी ज्यांनी तिच्या हातचं चाखलंय त्यांना ते फार मोठ्या दर्जाचं होतं. बेसनाचे लाडू करावे तर फक्त तिनेच. कधीही मी कुठलेही दुसरे लाडू खाऊच शकत नाहीच, अजून देखील. सर्वप्रथम म्हणजे माझ्या आईला गॅस शेगडी मधे मोठा गॅस पण होतो हे माहितच नव्हतं कारण प्रत्येक पदार्थ हा शांततेत, शिस्तीत कमी आचेवरच केला जायचा. तोंडी सतत एकतर स्तोत्र किंवा भजन आणि परमानंदाची स्थिती, मग चव येणारच ना. सर्वदूर डाळीचं पीठ भरपूर साजूक घरी कढवलेल्या तुपावर भाजलेलं समजायचं, सुगंध पसरायचा, मग त्यात ना मोजता ना मापता एक कोमट दुधाचा हपका द्यायचा, तय्यार ठेवलेली पिठीसाखर मिसळली कि वळायला तय्यार. तळहात लाल व्हायचे पण दृष्ट लागतील असे प्रचंड स्वादिष्ट लाडू उभे राहायचे. मंडळी अगदी बरोरबर वाचलंत उभे राहायचे, कधीही बसले नाहीतच. तो आकार, त्या रंगछटा, माउसरपणा, शिस्तीत पहुडलेला किसमिस अहाहा च. तोंडात टाकला कि विरघळलाच पाहिजे. एक लाडू खाणं माहितच नव्हतं मला कधीच. एका पाठोपाठ एक सुरु. माझे बाबा नेहेमी म्हणायचे, "आईची माया नावाचा मसाला / तडका  / जिन्नस त्यात आहे बेटा", त्यामुळे वर्षानुवर्षे ती चव, तो देखावा कधीही बदलला नाहीच. बसलेले, अर्थवट भाजलेले, अतरंगी, वाकडे-तिकडे, अनाकर्षक असे लाडू बघितले कि एक तर तोंडात टाकायचीच इच्छा होत नाही पण त्यामुळे प्रत्येक क्षण आई सोबत घालवलेला आठवतो, तिच्या स्वयंपाक घरात फेरफटका मारायला मिळतो बसल्याजागी. 

बसका लाडू असतो हे माझ्या खिजगणतीतचं नव्हतं मुळी. ताठ मानेने, अभिमानाने उभे राहिलेले च लाडू बघून लहानाची मोठी झाले त्यामुळे पण असेल कदाचित मान उंच करून जगण्याचीच सवय जडली आहे. ती अशीच शेवटपर्यंत टिकावी हि ईशचरणी प्रार्थना. ध्यानी-माई-स्वप्नी नसतांना लाडू देखील काय भन्नाट शिकवून गेला नाही.

तर अशी हि बसलेल्या / फसलेल्या = रुसलेल्या लाडवांची साठा उत्तराची कहाणी सफल संपूर्ण.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...