जुन्या हिंदी चित्रपटात नायक आणि नायिका खूप चालतात किंवा पळतात, हे का? हा मला एक प्रश्न पडला होता अनेक वर्षांपासून. आज मला त्याचं उत्तर मिळालं, अर्थात एका प्रकारचं. खूप मनापासून लिहिलेले शब्द असायचे गाण्यात, बरेचदा सर्व चित्रपटाचा आढावा च जणू. त्यामुळे गाण्याची लांबी जास्त असायची खोली सोबत. आंतरराष्ट्रीय ठिकाणी जाऊन किंवा भारतातच पण काश्मीर किंवा तश्याच अप्रतिम ठिकाणी संपूर्ण चमू ला घेऊन जाऊन शूटिंग केलं जायचं, भरपूर पैसा ओतला असायचा. मग ते ठिकाण संपूर्ण दाखवायला नको का? त्यामुळे हि धावपळ हो, म्हणजे पार्श्वभूमी नैसर्गिक आणि पुढ्यात सुंदर जोडी नायक-नायिकेची. आणि चेरी ऑन केक म्हणजे त्यावेळची लोक दोन्ही बघण्याचा आनंद घेत असतं. त्या ठिकाणची ओळख करून देण्याची अजून कुठली दुसरी पद्धत तर नसेल माझ्या मते. ज्यांनी कोणी हा असा विचार केला असेल, त्या पद्धतीने कॅमेरा वापरला असेल त्याला सलाम. शपथच. कॅमेरा देखील तृप्त होत असेल असा नैसर्गिक खजाना बघून, अनुभवून, नक्कीच आणि नेहेमीच, फक्त त्याला व्यक्त करता येत नाही तेवढंच. जर एखाद्याला कुठलंस ठिकाण मनापासून बघायची सुप्त इच्छा असेल पण जाणं अवघड आहे काही कारणास्तव तर मग जुने चित्रपट बघा, सहज उपलब्ध आहेत ऑनलाईन, दुधाची तहान ताकावर मंडळी, नाही का? तुम्हाला त्या नैसर्गिक देणगी लाभलेलं ठिकाण डोळे भरून बघता येईल त्याच्या मूळ स्वरूपात, प्रदूषण वगैरे नसतांच्या दिवसात होते तस्से. आहे कि नाही मज्जा. बघा तंत्रज्ञानामुळे काय काय शक्य होत आहे ते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा