कुठल्याही पद्धतीची चित्रकला साकार करायची म्हणजे कागदं आली वैविध्य प्रकारची,पेन, पेन्सिल, रंग, ब्रश, खोडरबर, आणि इतर साहित्य देखील. अर्थात कुठलीही कला साकारण्याआधी त्याबद्दलचा विचार, नियोजन, कृती, बैठक, मांडणी, प्रसन्नता, वातावरण, वातावरण-निर्मिती, इच्छा आणि बऱ्याच गोष्टी लागतात. ह्या सर्वांपुढे (म्हणजे वस्तू आणि ज्यांनी त्या तय्यार केल्या, तुमच्या पर्यंत पोचवल्या ई) नतमस्तक झाल्यास कलाकारांच्या हातून कलाकृती घडते, जन्मास येते. मग ते चित्र / पेंटिंग असो, किंवा इतर काही. ह्या सर्व वस्तूंची साथ जर मिळाली नाही तर पुढे जाणं शक्य नाही. कुठलीही एक कलाकृती म्हणजे एक खास प्रवास. "त्याने" तय्यार केलेला पूर्वनियोजित असा प्रवास. ते चित्र चित्रकाराला हवे त्यावेळी जमेलच असे नाही. त्या करता सुद्धा वेळ यावी लागते. आणि मग ते चित्र एकदा उभं ठाकलं कि भिंतीची शान होणार, किंवा कोणाच्या मालकीची होणार, का विकली जाणार, त्याच शहरात राहणार का परदेशी जाणार हे ठाऊक नसतंच, कधीच, कोणालाच. एवढ्यातच मी माझ्या जुन्या संस्थेला भेट द्यायला गेले होते. माझ्या सोबत काही भारतीयच पण परदेशी स्थायिक झालेले असे होते. माझ्या खास मैत्रिणीने जी कि एक संपूर्ण आर्ट-स्टुडिओ सांभाळते महाविद्यालयाचा तिने तिचं एक खास चित्र भेट दिलं. आणि आज ते चित्र दिमाखात विमान प्रवास करत आहे, सातासमुद्रापार जात आहे. तेथे पोचल्यावर ताठ मानेने फ्रेम केल्यावर ते अमेरिकेच्या आलिशान भिंतीवर एक अत्यंत खास आठवण म्हणून विराजमान होणार आहे. त्या चित्राने किंवा माझ्या मैत्रिणीने ते साकारताना पुसटसा तरी विचार केला असेल का कि हे चित्र सरते शेवटी कुठे स्थानापन्न होणार आहे ते? अशक्यच. पण बघा. होतं त्याच्या नशिबी आणि उडाले ते चित्र. अर्थात सध्याच्या आभासी / (तत्वतः) वास्ताविक जगात भिंतीवर विराजमान होण्याआधी ते शेकडो लोकांच्या हाती पोचलं देखील असेल. त्यांनी त्याचा आनंद उपभोगला देखील असेल, त्या चित्राकडे बघून प्रेरणा घेतली असेल आणि परमानंद गाठला असेल.
"युअर वर्क शुड स्पिक अबाउट यू, नॉट यू", "तुमचं कार्य बोललं पाहिजे तुम्ही नाही" अशी एक म्हण आहे. त्यामुळे सातत्याने कार्य करत राहा, तुम्ही एका खास कार्यासाठी इथे आहेत, प्रत्येक कार्य महत्वाचं आहे, पुढे वाटचाल करा इतकंच. प्रवास आपोआप घडेल, त्याचा उगम, त्यामागची संकल्पना, उदिष्ट, शेवट ई. कडे लक्ष न देता, त्या करता "तो" आहेच कि.
तर अश्या ह्या अनोख्या प्रवासाची साठा उत्तराची कहाणी सफल संपूर्ण.
बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२
प्रवास
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा