बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२

हास्य

बऱ्याच दिग्गजांनी असं म्हटलं आहे, लिहिलं आहे आणि अनुभवलं असेल त्यामुळे ते माझ्या वाचनात आलं. त्यांच्या नुसार वैद्यकिय शाखेला देखील अजून संपूर्ण मानवी शरीर समजले / उमगले नाही. मानवी शरीर यंत्रणा हि इतकी गुंतागुंतीची आहे, वेगळी आहे, वैविध्य स्थरावर काम करणारी आहे आणि प्रेत्येकाची कदाचित वेगळी देखील. तंत्रज्ञानाच्या मदती मुळे आत काय चाललंय हे बऱ्याच प्रमाणात समजायला लागलं आहे पण अजूनही तो टक्का फार कमी आहे. वैद्यकिय तज्ञ त्यांचे अनुभव आणि तंत्रज्ञानाची मदत मिळून खूप काही साधता आले आहे पण तरी देखील बराच टप्पा गाठायचा आहे, किंवा अनाकलनीय आहे खुपश्या बाबी. त्यातली एक महत्वाची बाब म्हणजे आहार. सध्या किंवा गेली काही वर्ष पाश्चात्य संस्कृती म्हणा किंवा फॅड रुजू होत आहे आपल्या देशात आणि त्यानुसार बरीच मंडळी डाएट  करतांना आढळतात, द्र्ष्टीस पडतात. संशोधक प्रयोग करतात, त्यांचा अनुभव आणि आलेले परिणाम / निकाल / निष्कर्ष ई. वर डाएट सादर करतात, बरीच मंडळी त्याचं अनुसरण करतात, सफल किंवा असफल होतात. माझ्या मते प्रत्येक संशोधकाचा एक ठोकताळा असतो, ठराविक धाटणीतला निष्कर्ष असतो, काही थोड्या व्यक्तींवर प्रयोग केलेला असतो, त्यामुळे तो प्रत्येकालाच लागू पडेल असे नाही. सहज मला असं जाणवलं कि प्रत्येक व्यक्ती जे खातो किंवा नाही खात, डाएट करतो, टोकाला जातो, अती जास्त किंवा कमी खातो कोणाच्या तरी सांगण्या-बोलण्या मुळे, हे सगळं अजून एक जण जवळून ऐकतं असतो, प्रत्युत्तर देत असतो, आणि पोटभर हासत देखील असतो. आपली पचन यंत्रणा मनात म्हणत असेल कि काय हि शहाणी समजणारी माणसं, त्यांना असा समाज / गैरसमज आहे कि संपूर्ण पचन-यंत्रणा त्यांना इतंभूत माहिती आहे. मानसिक+शारीरिक+आणि इतर अनेक गोष्टींचा परिणाम त्यांना पाठ आहे, मानव हा सर्वश्रेष्ठ आहे. हास्य मांडलंय हे माझ्या मते. पण असो त्या पचन-संस्थेला, एकंदरीत शरीराला हासत-खेळत अविरत काम करता येतं ह्या माणसाच्या अश्या विचार आणि आचारांमुळे. ज्या ज्या सर्वांमुळे पुढ्यात ताजताज वाढलंय त्या सर्वांसमोर नतमस्तक व्हा, शारीरिक सहज, साधा-सोप्पा आणि नियमित व्यायाम होईल ह्याकडे प्रकर्षाने लक्ष द्या, अतिरेक टाळा, सात्विक भोजन करा, थोडेसे छंद जोपासा, हसा, आनंदी राहा म्हणजे तुम्ही स्वतःच हास्य करून घेणार नाही. तुमची पचन-संस्था सातत्याने धन्यवाद देईल.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...