गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

इस्त्री म्हणजे...

माझ्या लहानपणी इतकं कसं सगळं सोप्प आणि सुरळीत होतं? कुठलीही गुंतागुंत नव्हतीच. माणसं साधी, गोष्टी साध्या, अन्न घरचं, कुठलेही जास्तीचे नखरे नाहीत ई.

माझ्या आईची एक शिस्त होती, ती एक उत्कृष्ट गृहिणी होती, नोकरी करणं कुठल्याही पद्धतीचा व्यवसाय करणं तिला ठाऊकच नव्हतं. तरी देखील दररोज संध्याकाळी न चुकता जसं कि तिला बाहेर जायचं आहे तशी मस्त झकास तय्यार होत असे. फार मनापासून आवडायचं तिला ते. सतत ती फक्त साड्या नेसायची आणि ते देखील सुती, पण त्या वेळी इस्त्री च वेड लागलं नव्हतं सर्वांना. कंटाळा कशाशी खातात हे देखील माहित नव्हतं. त्यामुळे अगदीच गरज असेल तर घरी इस्त्री करायची आणि अवघड कपडा असेल तर धोब्याला द्यायचं. बास. त्यामुळे तिच्या खूपच कमी साड्या बाहेर जायच्या इस्त्री करायला. पण प्रत्येक दिवशी संध्याकाळी तय्यार झाल्यावर नेसलेली साडी अगदी कडक इस्त्री केल्यासारखी असायची किंबहुना तिला तशीच लागायचीच, दर दिवशी. मला पण महद आश्चर्य वाटायचं कि दररोज कसं काय कोणी इतकं शिस्तीत राहू शकतं. ती तर कधीच इस्त्री करतांना दिसली नाही, बाहेर साड्या दिल्या नाहीत, मग काय गोम आहे. नंतर ध्यानात आलं कि साधी युक्ती होती, सुंदर सुबक घडी घालून साडीची उशीखाली ठेवायची, गादी खाली ठेवायची म्हणजे झाली इस्त्री. अहाहा च. किती सोप्पी पद्धत आणि किती ते समाधान, चिकाटी आणि सातत्य देखील. अशी अनोखी इस्त्री मी खूप वर्ष अनुभवली. काय होते ते दिवस, आता सांगून देखील खरं वाटणार नाहीच ह्या नवीन पिढीला.

बुधवार, २७ एप्रिल, २०२२

व्यक्तीत्व आणि जडणघडण

माझे बाबा एक स्वतंत्र विद्यापीठ होते माझ्यासाठी, सतत काही ना काही शिकण्यासारखं दिसायचं, भासायचं आणि आढळायचं त्यांच्यात, त्यांच्या शब्दात, त्यांच्या वागण्या-बोलण्यात. त्यातलीच एक आठवण आज येथे मांडते आहे. बाबा म्हणायचे प्रत्येक व्यक्ती कडून काही ना काही शिकण्यासारखं असतंच. प्रत्येकाकडून चांगले गुण निवडायचे आणि असेच सातत्याने आपले व्यक्तीत्व घडवायचे, किंबहुना ते घडतेच आपोआप. कळत नकळत ते मी अंगिकारलं आणि त्यामुळे दुर्गुणांकडे कधीच म्हणजे कधीच लक्ष वेधलं गेलं नाहीच.

काही दिवसांपासून मी वैविध्य मुलाखती घेते आहे. वेगवेगळ्या प्रांतातून आलेले, विविध वयाचे, अनुभवांचे व्यक्ती आहेत, अनुभवते आहे. प्रत्येक व्यक्तीची ओळख आधी त्यांनी पाठवलेल्या त्यांच्या माहिती वरून होते. त्यांच्या व्यक्तीतत्वाचा सारांश मांडला असतो त्यात. आणि मग ते प्रत्यक्ष अवतरतात संगणकाच्या स्क्रीन वर, मग त्यांचं दर्शन होत, त्यांना ऐकता येत आणि त्यांनी सादर केलेली माहिती समजते. "व्यक्ती तितक्या प्रकृती" ऐवजी "व्यक्ती तितक्या प्रकारचे सादरीकरण". काही फारच मनाला भावतं तर काही नाही, काहींचा काही भाग उत्कृष्ट असतो तर बाकी .... त्यामुळे आत्ता समजतंय बाबा काय म्हणत होते ते. प्रत्यक्ष व्यक्तीच समोर, आजूबाजूला, संभाषणात नको त्यांच्याकडून शिकायला. आता मला माझा रेझुमी कसा वेगळा आणि देखणा करायचा हे समजलं जास्त चांगल्या पद्धतीने. काय बोलायचं, काय नाही, आवाजाचा चढ उतार, वेष आणि केश भुषा कशी असावी / नसावी ई. बद्दल पुन्हा एकदा नव्याने परीचय झाला. अहाहा च. मला २-३ दिवस भरपूर वेळ प्रत्येकाचा रेझूम बघून, वाचून, मग त्यांना ऐकून, प्रश्न विचारावे लागले पण "इट वॉज वर्थ इट". दोन-तीन दिवस व्यस्त होते, डोळे चुरचुरले, दुखले, पण खूप शिकता आलं, प्रेरणा मिळाली, "चेंज ऑफ वर्क इज रेस्ट" हे पण अनुभवलं खूप आनंदाने. मला हि संधी दिल्यामुळे आयोजकांचे आभार. मनापासून.

मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

Wait endlessly for impossible

अविरतपणे अशक्य आणि कधीही घडू न शकणाऱ्या घटना, गोष्टी, लोकं ई. मी / आपण वाट बघतो. इतक्या आतुरतेने वाट बघून सुद्धा ते येत नाहीत, हवं तसं घडत नाहीच. हा निसर्गाचा नियम आहे, गेलेला परत कधीही म्हणजे कधीही येत नसतो हे माहित असून देखील मग वाट का बघितली जाते? आणि ती देखील एकदा, दोनदा नाही, सातत्याने.

गेलेला क्षण कधीतरी परत येईल का? नाही ना, पण मग ते तसे फार हळवे, काळजाजवळचे काही खास क्षण यावेसे वाटतात परत.
गेलेले जीवलग कधीच येऊ शकत नाहीत पुन्हा, हे माहित असून देखील काहींच्या बाबतीत तर फारच प्रकर्षाने, ओढीने अशक्य घडणार ह्याची वाट पाहतात, कधी मन मोकळे पणाने एकमेकांना सांगून, तर बहुतांशी न सांगता एकटेच.

त्रास होतो ह्या सगळ्याचा, पण साहजिक आहे, नैसर्गिक रित्याच हे आपोआप वाट पाहणं होतंच, तुम्ही ते थोपवू शकत नाहीच.

पण अर्थात ह्या सगळ्या घटनांतून एक गोष्ट नेहेमी चांगली होते ती म्हणजे त्या सगळ्यांची पुन्हा आठवण, मनापासून काढलेली आठवण आणि त्यांनी आपल्यात / आजूबाजूंच्या सगळ्यांमधे रुजवलेले चांगले गूण, उत्कृष्ट सवयी, दिलेली विचारसरणी, स्व कर्तृत्वाने शिकवलेल्या चार गोष्टी ई. उपयोगात येतांना बघून जगावेगळं समाधान मिळतं.  

तर अश्या प्रकारे माझ्यामते तीन प्रकार आहेत वाट बघण्याचे, एक म्हणजे पुढे, अगदी थोड्या वेळात येणाऱ्या व्यक्ती, गोष्टी, घटना ई. वाट बघणे, दुसरं म्हणजे मागे घडून गेलेल्या, आनंद उपभोगलेल्या दिवस, घटना, आनंद, ई. पुन्हा एकदा नव्याने करून बघण्याची वाट, आणि सरते शेवटी अशक्याची शक्यता होऊ शकते ह्या विश्वासावर वाट बघत बसने हे होय.

माणूस म्हटला कि ह्या सगळ्या प्रकारच्या वाट बघण्याच्या प्रसंगाला समोर जावंच लागतं पण तरी देखील हे सगळं करतांना आत्ताच क्षण आनंदाने घालवण्याचे बघा. त्या क्षणाला तुमची वाट बघायला लावू नका.  

Wait to go back

शाळेतले ते पिटुकले चौरंग वजा बेंच, आसनं बसायला, ती सगळी खेळणी, पूर्णवेळेची शाळा पहिलीत सुरु झालेली अचानक, कवायती, डब्बे, आणि सगळं म्हणजे सगळं तेव्हा तर नक्कीच खूप खूप आवडीने केलं, एन्जॉय केलं, पण ते आत्ता पुन्हा करावसं वाटतं.

तशी सारखी चेन पडणारी भलीमोठी सायकल पुन्हा बिनधास्त चालवावीशी वाटते त्या सगळ्या शांत गल्ली मधून, जेथे फक्त मी, माझ्या सगळ्या मैत्रिणी राण्या होत्या, तो रस्ता फक्त आमच्यासाठीच तय्यार केला होता. भरपूर मस्ती केली होती आणि तीच धमाल पुन्हा करावीशी वाटते. ते रस्त्यावर येणारी कुल्फी, चनाचोर गरम, भुट्टे खायचे आहेत, यथेच्छ.

पुन्हा एकदा लहानपणी सारखं खूप आईच्या हातचं, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या हातचं, मित्र मैत्रीणीकडचं पोटभर चाखायचं आहेच.
परत एकदा अंगणात रोज सडा टाकायचा आहे उन्हाळ्यात, तो मातीचा सुगंध अनुभवाचा आहे, रांगोळ्या काढायच्या आहेत, दसऱ्याच्या दिवशी अनोळखी लोकांकडे सोनं वाटायचं आहे, कोजागिरीला अंगणात दूध उकळण्याचा आनंद उपभोगायचा आहे, दररोज बॅडमिंटन खेळायला जायचं आहे, पोळ्याला बैल घेऊन प्रत्येक घरी जायचं आहे, टिक्कर बिल्ला, डब्बा एक्सप्रेस, इलॅस्टिक ई. खेळायचं आहे. आई गं, भली मोठी यादी आहे. तरी अर्धी किंवा पाव आठवली आहे सध्या हे लिहितांना. अजून जसं डोक्यात येईल तस्स लिहीन पुढे.

का कुणास ठाऊक पण मी का ह्या सगळ्याची पुन्हा वाट पाहते आहे हे नाही माहित? कदाचित तेव्हा खूप म्हणजे म्हणजे खूप आवडीनं सगळं केलं होत म्हणून असेल. आता ह्या पैकी सगळं काय काय करता येईल हे माहित नाही मला, पण काळजी घेऊन करेन नक्की, लवकरच सुरु करण्याचा मानस आहे. अशी मनःस्थिती माझीच नसणार आहे सगळ्यांचीच असणार पण कोणी मोकळे पणाने सांगत नाहीत बरेच जणं, का कुणास ठाऊक. लहानपण देगा देवा, असं उगाच नाही म्हणत कोणी, नाही का? चला तर मग पुन्हा एकदा लहान होऊ यात, ते दिवस आठवून पुन्हा आनंद द्विगुणित करू या.  

Wait for future....

At my office we always believed, walked, implemented and enjoyed the expansions, the visionary approach. As a part of it from 2 years or so, 3 more floors were added to the existing infra and due to this expansion, a new lift / elevator was also installed catering or providing services to all old and new floors, and hence the lift is constantly on her toes, overloaded and on demand. And hence obviously the longer wait for the most beloved lift for all. I too use this new lift every day without fail. And the other day while waiting for the lift to arrive and take me on my destination floor a thought touched suddenly that for whom we wait? For example, we seriously and regularly wait for lift now in this case to arrive, maid to come quickly, train / aeroplane to come, ola / uber to come without asking where to come, food delivery personnel, baby’s delivery, new vehicle delivery etc. and there are many more such people, events or things to happen in near future, for which we keep waiting. Sometimes the wait is worth it, few times the delay may cause trouble or slight anxiety or many times it generates, enhances and builds patience with huge amount of learning too. So according to me this wait is like one adhunik guru. So happy learning, build patience, learn to smile while you are waiting for someone or something to happen in near future from here onwards. Enjoy this most important buddy.

अनुत्तरीत असे काही

अगदी लहान होते तेव्हा माझ्या पहिल्या वर्गातले शिक्षक ज्यांनी आम्हाला एक वर्ष शिकवलं त्यांना मी कधीही सोडून जाऊ शकेन असं वाटलं नव्हतं, पण जमलं जेव्हा दुसरीतले सर फारच मोठे ऊर्जेचे भंडार असल्याचे जाणवले आणि त्यांनी त्यांच्या अनोख्या शैलीने आम्हाला खिळवून ठेवलं. छोट्या शाळेतले सवंगडीच मोठ्या शाळेत होते त्यामुळे तेव्हा नाही खास वाटलं पण हो कॉलेज च्या वाटा धरल्या तेव्हा अवघड गेलं पण पुन्हा एकदा इतके भन्नाट नवीन शिक्षक, मित्र-मैत्रिणी आल्या आयुष्यात कि तो टप्पा मग सुरळीत पार पडला, तेच झालं पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षण संपलं तेव्हा देखील. वाईट वाटलं पण तात्पुरतं. तेव्हा कुठलेही संपर्काचे साधनं नव्हते पण प्रत्येकाला ध्येय गाठायची होती, उच्च पदावर पोचायचं होतं, आभाळाएवढं काम करायचं होतं, टिकवायचं होतं, ह्या सगळ्यांमुळे असेल कदाचित पण कुठलीही खंत नव्हती मनात जुन्या आठवणी मागे टाकतांना. पण आता ह्या नवीन अर्धशतकी वळणावर वेगळं घडतंय, जगावेगळं. आता एवढ्यात काही मैत्रीचे नवीन धागे विणले गेले आणि पुन्हा एकदा काही कारणांमुळे नेहेमीसारखी ती मैत्री पुढे नेता येणं अवघड आहे, शहरं  वेगळी आहेत, भेटी होणं हाताबाहेरचं पण आता नकोस वाटतंय, का? माहित नाही. माझी स्वतःची लेकरं बाळं असतांना असं वाटायचं हे "बंडल ऑफ जॉय" कधीच म्हणजे कधीच मोठं होऊ नये, झालं तर ते उडून जातील, त्यांचे त्यांचे सवंगडी तय्यार होतील . आता तर ती पिल्लं खरंच उडून गेलीत, ते देखील रिचवलंआई बाबांसारखी देव माणसं नेहेमीकरता दिसेनाशी झाली ते पचवलं, जरी ठाऊक होतं कि सासरी जावं लागणार आहे, पराकोटीचं अवघड गेलं तेव्हा जरी अगदी लहानपणी पासून घरचे आणि दारचे सतत सांगायचे, चिडवायचे, जाणीव करून द्यायचे सासरी जाण्याबद्दल आणि तरीही....  पण जमवलं. इतक्या विविध टप्प्यांवर काम केल्यावर मग हि छोटीशी मैत्री का इतकी अवघड जाते आहे?, का इतकं अस्वस्थ करून टाकलं आहे?, काय आहे हे नक्की? आणि असं व्हायला हवं का नको? हे योग्य आहे का अयोग्य? हि ओढ, हे बंध नक्की कुठे नेणार आहेत मला? हे फक्त माझ्या पुरतं मर्यादित आहे का त्या समोरच्या व्यक्तीला / सर्वांना, स्थळाला पण तितकीच जाणीव आहे उणीव भासते आहे माझी? काय होतं तेथे?, त्या जागेच महत्व, पाण्याचं, खाण्याचं का अजून काही? चुकलं का माझं काही? खूप खूप प्रश्न उभे आहेत, बघू कधी ह्याची उत्तर मिळतात ते.  का, समोर उभा ठाकला आहे तो क्षण भरभरून जगून घ्यायला हवा काहीही न विचार करता? हेच योग्य आहे. मिळेल दिशा लवकरच.

शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२

उभं राहून काम

माझे ह्या आधीचे अधिकारी अगदी आम्हाला वडिलांसारखे होते. ते अनेकदा खूप भन्नाट गोष्टी सांगून जायचे, न कळत. त्यातली एक गोष्ट म्हणजे एकदा त्यांनी एक नवीन स्टूल सारखं काहीतरी तय्यार करून घेतलं आमच्या वर्क शॉप मधून. त्यांच्या लॅपटॉपची उंची वाढवण्याकरता. ते म्हणायचे कधी कधी अधेमधे उभं राहून पण काम करावं दिवसातून. नेहेमीच बसून राहणं तब्येतीला योग्य नाही. त्या वरून मग मला भारतात नवीन आलेली मॉल संस्कृती आठवली, ज्यात दिवसभर तेथे काम करणाऱ्या सर्वांना खूप खूप तास फक्त उभं राहावं लागतं. सगळे गार्डस आठवले हॉटेल च्या बाहेरचे, ऑफिस च्या गेट समोरचे ई. त्यांचं पण तेच, अनेक तास सलग उभं राहणं. समतोल साधणं अत्यावश्यक आहे ज्याचं बैठं काम आहे त्यांनी उभं राहणं आवश्यक आणि ज्यांना सततच उभं राहणं असतं त्यांना बसायची सोय असणं फारच गरजेचं. कुठलाही भेदभाव नाही, पण मुलींना त्यांच्या त्या दिवसात तरी. प्रकृतीला सांभाळा, तब्येत ठणठणीत असणं फारच आवश्यक आहे, आणि उठत बसत आनंदाने पुढ्यात मांडलं आहे ते काम करा प्रत्येकाचे काम महत्त्वाचेच. कुठलेही कमी जास्त नाही, त्या भानगडीत अजिबात पडायचं नाही.

आनंदी आनंद गडे...

"अगं कित्ती वाट पहिली मी ह्या क्षणाची माहिती आहे, अधीर झाले होते मी. कधी एकदा पुन्हा एकदा माझे पाय जमिनीवर लागतात / पळतात असं झालं होतं. नुसतं एका जागी पडून पडून वैताग आला होता. ते आवाज, ते स्पर्श, तो कलकलाट, ते ठराविक वेळी निघणं-येणं परत, ती रोजनिशी, ते ठराविक दिवशी पंपावर जाणं आणि तो अनोखा सुगंध अनुभवणं, ते प्रेम ती माया, क्वचित कधीतरी माझं रुसणं, ती ठराविक वेळी होणारी स्वच्छता, ते एकमेकांशी खेटून उभं राहायचं, वाट बघायची, अहाहा च. कित्ती बोलू आणि कित्ती नाही असं झालयं मला आज. मी कुठल्यातरी दुसऱ्या दुनियेत तर नाही ना असा भास होतोय, ओरडावंसं वाटतंय, धावावंस वाटतंय आणि काय काय करू काय काय नाही हेच समजत नाही आहे आज. सरते शेवटी अनपेक्षित पण तो दिवस आलाच. ती पिटुकली पाउलं, ते बोल, सगळं अनुभवायला मिळालं, खूप खूप वाट बघितल्यावर. पण हे वाट बघण्याचं खूप गोड फळ मिळालं, मला, माझ्या सख्यांना, आणि सर्वानांच. आज कदाचित शेगडी कशी पेटणार, किती दिवस पेटणार असे कुठलेही प्रश्न आता कोणाच्याही मनात येत नाही आहेत. सगळेच आनंदी आहेत. धन्यवाद सर्वांनाच."

असं काहीसं मनोगत आज कानावर आलं माझ्या, कारण अनेक शाळांसमोर खूप उत्साहात सगळ्या पिवळ्या राण्या उभ्या होत्या दिमाखात, खूप महिन्यांनी.

Its me

Every day, or almost every day, my friend and I used to drive to work together. I'm not sure why, but we used to shake hands rather hold hands every day and then chit-chat before getting in the car to drive to our workplace. And we used to grasp our hands unconsciously for a long time while welcoming / chitchatting at that time.

So today, when traveling alone to work without her, as she is now with a different organization, I felt like writing to her, "Missing holding hands," and I was planned to include the emoji of holding hands as well as a sobbing emoji.

But, after reading this message and before pressing the "send" button, I changed my mind.  This isn't me, I reassured myself.

So I reconsidered and typed, "Reached my office without holding hands," followed by the holding hands emoji. But, on the other hand, I had the distinct impression that this was not me.

So, what's next?

I tried again, and this time I came up with "Driving to my office while recalling the all-beautiful moments, laughs, those eye contacts, jokes, etc. that we enjoyed together while holding hands...", as well as the holding hands emoji, smilewala emoji, and so on, and I knew it was me.

This is, without a doubt, the best use of active-passive voice or looking at the other side of the coin. 

"we are each other’s habitat"

It is generally said that, people should not shake hands with others, but instead go with the Indian way of greeting each other by touching their own hands in the Namaste position. I have read and heard multiple times that when someone shakes hands with each other, the positive and negative energies are exchanged unnecessarily, doing harm to one and benefit to the other. A quick question: can two people only shake hands? Or do they hold hands too? Holding hands signifies many beautiful things; experiencing awesome feelings; and, in short, getting a message that both belong to the same habitat, or, in a better manner, "we are each other’s habitat". Habitat includes increased oxytocin, feeling secured with each other, a special bond, being safe, reduced or no stress and anxiety, and what not. There are enormous benefits to holding hands. This habitat also includes its own language, so go ahead and hold hands to learn the language without speaking with each other directly. This language via touch and senses through the nerves reaches more quickly than other wordy ways, as if it’s one of the important communication tools. It works much more than "a pat on the back". Holding the tiny, cute little hands of our own kids gives us the fulfilment of creativity. Holding hands with friends, kids, or any close once regularly increases and makes the bond between the two stronger. My twins were, of course, only aware of holding my hand outside the home, while crossing the road, climbing stairs, etc., but many times they used to keep their tiny hands on mine to measure how big their tiny hands were as compared to mine. OMG, what a comparison indeed. While writing this anukatha after 18 odd years, I am witnessing those awesome moments as it is, as if kids are sitting in my laps right now. During those days my kids used to hold my mom’s hand as they used to enjoy that wrinkly touch a lot. While exchanging various thoughts, you know, those daily routine chats, unknowingly, me and my kids, even today, hold each other's hands and enjoy holding and talking simultaneously. So many different types of hands we hold in our tiny life, which means we are cherishing many close relationships and that also means we are truly blessed to share such close bonds in the same habitat. Wow.

 

शनिवार, ९ एप्रिल, २०२२

एक म्हण

 "चप्पल एकावर एक किंवा उलटी पडली कि भांडण होतात" हि म्हण खूपदा ऐकली होती. पण का होतात भांडणं? हे ना कधी कोणाला विचारलं आणि ना हि कोणी आपणहून सांगितलं. असो. ती म्हण इतकी भिनली होती ना कि कुठेही मग चप्पल उलटी किंवा एकावर एक बसलेली दिसली रे दिसली कि त्याला सरळ करायचीच हा अलिखित नियम, मग ती कोणाची का असेना. भलताच उत्साह ना मला / आम्हाला.  तर ती तशी चप्पल चांगली नाही दिसत डोळ्याला. सरळ जोडी, एका बाजूला एक अशीच शोभते, चांगली दिसते बास. चप्पल अशी तशी ठेवली म्हणजे भांडण होतात हि म्हण नाही आहे. ते जर थोरल्या मोठ्यांनी बघितलं तर, किंवा शिस्तीचे कोणी घरचे त्यांच्या नजरेस पडलं तर साधी चप्पल पण व्यवस्थित काढता येत नाही का, इतपासून सुरवात होणार आणि मग त्याच रूपांतर भांडण्यात होऊ शकतं, बाकी काही नाही. अंध श्रद्धा तर नाहीच, उगाच भांडणं वगैरे होत नाहीत कारण नसतांना. पण हा हे बेशिस्तीत किंवा घाईघाईत चपला काढणं कसंही हे भांडणाचं मूळ असू शकतं / होऊ शकतं. त्यामुळे मंडळी, चपला पायातून काढतेवेळी शिस्तीत काढा म्हणजे प्रश्नच मिटला, हो कि नाही. आणि ह्याचाच अर्थ खूप वर्षांपूर्वी असं कुठेतरी झालं असेल बेशिस्तीत काढलेली चप्पल बघून थोऱ्यामोठ्यांना राग आला असेल आणि वाद झाले असतील म्हणून हि म्हण, प्रत्येक वेळी तसं होईलच असं नाही. बाकी प्रचलित म्हणींसोबत देखील असं च काहीसं झालं असणार, बघते लागेल शोध लवकरच एकेकाचा. कळवते तुम्हाला.

जेवणाच्या डब्याची पिशवी

चार डोळे असल्यामुळे आणि कदाचित "लिखाणासाठीचे विषय = सावट" सतत डोळ्यासमोर उभं ठाकत असल्यामुळे मी खूप दिवस एक सवय टिपत होते. ते बहुतांशी रोज मला दिसत होतं पण माझं लिहावं असं त्याकडे कधीच लक्ष गेलं नाही. पण सरते शेवटी लिहायला घेतलंच. मी दररोज एका भल्यामोठ्या ऑफिस मधे काम करायला जाणाऱ्या काकांना / व्यक्तीला बघत होते. मी बस स्टॉप वर उभी असतांना मला ते दिसायचे. खांद्यावर लॅपटॉप ची बॅग आणि हातात दुसरी. हा सिलसिला दररोज, अनेक दिवस / महिने चालू. त्यांनी गळ्यात घातलेल्या बिल्ल्यावरून ते मोठ्या कंपनीत आहेत हे समजत होतं. ते सोसायटीतून बाहेर यायचे दोन ब्यागा घेऊन आणि मग गाडीत बसून जायचे. माझी त्यांची काही म्हणजे काहीच ओळख नाही. त्यामुळे पण आणि काय गरज आहे ना मला म्हणून त्या दुसऱ्या ब्यागेत काय नेता हे मी का आणि कसं विचारणार ना? बरं त्यांच्या घरी कोण कोण आहे हे देखील मला अजिबातच माहित नाही. माझी तळमळ समजली कोणाला तरी आणि मी बस स्टॉप वर पोचायला, ते काका यायला आणि तेवढ्यातच त्यांचाच एक मित्र यायला एकत्र गाठ पडली. बास मग काय, मला विचारायचा तो प्रश्न त्यांच्या मित्राने विचारला, अरे दोन ब्यागा का? आणि हि दुसरी तर तुझ्या मुलाची दिसते बॅग? त्यावर उत्तर असं मिळालं, मोठ्या आवाजात की "ह्या दुसऱ्या पिशवीत डब्बा आहे, मुलाची मागल्या वर्षीची जुनी बॅग मग काय फेकून द्यायची? म्हणून मी वापरतो डब्याला". मी उडालेच, देवा, काय हे, शाळेचं जुनं दप्तर, भलं मोठं डब्याच्या मानाने आणि ते जेवणाच्या डब्यासाठी, छे छे. ते दिसतं तर विचित्र होतंच तसं हि आणि आता तर अजूनच भयानक वाटायला लागलं सगळंच, हि कंजुषी का बचत का काटकसर, का बिनधास्त राहणं? एवढ्या मोठ्या कंपनीत जातांना रोज तशी बॅग? असो पण असे विचार करणारे पण हवेतच, चूक काही नाही पण ती जुनी बॅग एखाद्या गरजू मुलाला दिली तरी चालली असती, आणि ह्यांनी घ्यायची एक डब्यासाठी असलेली पिशवी / बॅग. असो ज्याचं त्याच्याबरोबर. मज्जा आली, त्या काकांचं बिनधास्त वागणं आवडलं, सदुपयोग केलेला दिसला आणि त्यामुळे हि अनुकथा जन्माला आली.

Freedom extremities

In 2022 also I am so fortunate that I still get to see, observe and cherish the memories of the prestigious four-wheeler named Ambassador. That beauty reaches our society anytime from or at 7am every day. On my off Saturdays and otherwise to others it is observed that the Ambassador waits till 11am, sometimes beyond that also. Ambassador and that too Chauffeur driven means someone from government sector, right?. Might be because of that or due to work from home the officer using this four wheeler is having complete freedom to start for office any time. At the same time the Chauffeur is endlessly waiting daily for his boss to arrive. The driver must be getting ready really early, leave home, go to the place where this vehicle is parked and then come to pick the officer daily at 7am. This indicates totally no-freedom for this Chauffeur. As and when even after the long wait daily for 4-5 hours the Chauffeur should be ready to take out the vehicle. So what if its his duty and he is getting paid for it, or Chauffeur is used to it now in so many years. But still man-hour is the most critical and crucial unit of measure. This way its not good to misuse it at all. According to me officers should reach before time to the office before every employee arrives, could be one of the keys to succeed for him, his staff, the city and the nation too. This is just one example, which I observed, there could be many such in government sector. According to me this is the height of freedom or freedom-extremities, for one misuse of freedom for other cant use the free time of 4-5 hours daily. Is it only because of educational background or due to the respect to that Chair or designation?  

खुळखुळा

 ह्या पिटुकल्या पण नेहेमीच्या वापरातल्या खेळण्याबद्दल खूप म्हणजे खूप आहे बोलण्यासारखं, कारण हे बहुतेक प्रत्येक बाळाचं पाहिलं खेळणं असतं, म्हणजेच प्रत्येक घरात खुळखुळा वास्तव्याला असतोच. तो विविध आकार, प्रकार, रंग आणि गोष्टींनी तय्यार केला असतो. अहो हो, प्लास्टिक चा, लाकडाचा, चांदीचा, स्टीलचा ई. खुळखुळा हा एक तर छोटीशी दांडी असलेला वर गोलाकार आणि त्यात छर्रे असा किंवा फक्त गोलाकार असा बघितला आहे, वापरला आहे. मी जेव्हा लहान होते तेव्हा कुठला खुळखुळा होता, तो मी किती एन्जॉय केला होता, केला होता का नाही, कधी माझ्या समोर तो वापरला होता ई. प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत. त्या नंतर मी माझ्या लहान मुलांना त्यांची करमणूक करण्याकरता, किंवा त्याचे लक्ष दुसरीकडे वळवण्याकरता फक्त वापरला होता. त्यामुळे खुळखुळा हे एक साधन होतं माझ्या साठी, बास.

काल परवा मी कपाटातून काहीतरी बघतांना मला माझ्या लहानपणी माझ्या आजीने दिलेला चांदीचा खुळखुळा आढळला. मी ताबडतोब त्याच्या सोबत खेळायला सुरवात केली. आणि खूप रमले त्यात, इतकं छान आणि वेगळं वाटलं ना कि ज्याचं नाव ते, मला अक्षरशः शब्दात मांडणं अतिशय अवघड आहे. त्याची खासियत म्हणजे एक छोटासा बॉल सारखा आकार आहे, त्यात छर्रे आहेत, डिझाइन आहे आणि एक दांडा आहे. हो मंडळी, पण तो दांडा साधासुधा नाही बरं का, तो एक सारख्या आकाराचा दांडा नाही तर वर निमुळता आणि  त्याला शिट्टी आहे. आई गं, मी खरंच नव्हता बघितला असा खुळखुळा कधीच. आणि त्या खुळखुळ्याने मी खेळले आहे, त्यात माझ्या आजीचे, आईचे आशीर्वाद आहेत, भरभरून. मी कितीदा शिट्टी काय वाजवली आणि ती वाजली देखील. अहाहा च. माझा आनंद गगनात मावेना असं झालं मला. खऱ्या अर्थाने मी खुळखुळा शी खेळले परवा मनसोक्त, अचानक, आणि स्वतः. कोणी दुसऱ्याने खेळवणं वेगळं आणि हे फारच वेगळं होतं. गम्मत वाटली खूप. चांदीचे खेळणे तय्यार करून घेणे, देणे ई.  म्हणजे तोंडात घातलं तरी काही अपाय होणार नाही पण फायदा नक्कीच, सारखं तोंडात घातलं, खाली पडलं कि धुवायला पण सोप्प आणि अर्थातच गुंतवणूक भावनिक आणि आर्थिक देखील.  खूपच विचारपूर्वक कृती आहे, होती ती मनाला फार भावली. आता मी ठरवलं आहे माझ्या मुलांनी जी सगळी बडबड गीतं बघितली लहानपणी आता ती यूट्यूब वर उपलब्ध असणारच. मी आता आवर्जून बघते आणि शांतपणे आनंद उपभोगतो, पुन्हा एकदा लहान होण्याचा प्रयन्त.

बुधवार, ६ एप्रिल, २०२२

अमन

एक होऊ घातलेला डॉक्टर. सोन्याचा चमचाच तोंडात घेऊन जन्मलेला असा. फार हुशार आणि धनाढ्य संस्कारी कुटुंबात भरपूर प्रेमाने, लाडाने वाढलेला. अगदी जवळून नाही पण अनेकदा बघण्यात आला तो अगदी लहानपणीपासूनच. डॉक्टर होणं अजिबातच सोप्प नसतं मुळी, कठोर मेहेनत, कष्ट, झोकून देऊन अभ्यास, सतत पायावर उभं आणि अवतीभोवती रुग्ण. सरते शेवटी रुग्ण बरा झाल्यावर मिळणार समाधान काही औरच म्हणावं. पण त्यासाठी खूप काही करावं लागतं, अग्निदिव्यातून जावं लागतं सर्वांनाच. अमन देखील जातोय. तसे तर त्याबद्दल खूप काही आहे सांगण्यासारखे, बोलण्यासारखे, शिकण्यासारखे पण काही ठळक वैशिष्ट्ये इथे मांडण्याचा प्रयन्त करते आहे.

एकतर जेव्हा त्याची माझी / आमची भेट होते तेव्हा आधी नतमस्तक होणार सगळ्या म्हणजे सगळ्या मोठ्यांच्या, आपोआप अगदी आवडीने, न चुकता, नेहेमी, सातत्याने.  सर्वांशी प्रेमाने वेळ देऊन बोलणार आवडीने. अगदी साधा, कुठेही कुठलाही दंभ नाहीच. हे काय कमी होतं त्यात त्याच्या बद्दल अजून एक गोष्ट ऐकली एवढ्यातच.

डॉक्टर होतांनाचा एक महत्वाचा भाग म्हणजे  दुसऱ्या तिसऱ्या वर्षी विद्यार्थी रुग्णांना तपासायला जातात, तज्ञ् डॉक्टर्स सोबत, हॉस्पिटल मधे. तेथे भरती झालेले आणि बाह्यरुग्ण पण असतात तपासायला. MBBS हा अभ्यासक्रमचं असा आहे कि विद्यार्थ्याला घरी राहून शिक्षण अवघड होत. त्यामुळे वसतिगृह हाच एक पर्याय आहे. अमन पण शिकायला वसतिगृहात राहतो. सुट्टीला अधेमधे घरी येतो. ह्या वेळी घरी आला तेव्हा आई-बाबा म्हणाले कि आपण तुझ्यासाठी नवीन कपडे विकत घेऊ. गेले सगळे मिळून दुकानात आणि सगळेच त्याच्यासाठी त्यांच्या आवडीचं उचलत होते, कारण आता अमन ची आवड सर्वांना माहित आहे. अमन पण तय्यार होता त्याचे कपडे एका बास्केट मध्ये घेऊन. आई बाबांनी बघितलं तर ते अवाक झाले कारण कपडे फारच साधे उचलले होते त्याने. कारण विचारलं तर म्हणतो कसा अमन "मी संपूर्ण वेळ रुग्णांसोबत असतो, रुग्णालयात असतो, त्यांच्याकडे साधे अंग झाकायला पुरेशे कपडे नसतात आणि त्यांच्या समोर मी महागडे, उच्च प्रतीचे  ब्रँडेड कपडे घालून जाऊ? नाही, मुळीच नाही. मला आणि त्यांना आवडणार नाही, किंवा सोयीचं वाटणार नाहीच. त्यामुळे साधे कपडेच योग्य". हे छोटसं वाक्य पण अमन बद्दल, त्याच्या विचारसरणी बद्दल किती सांगून जातंय ना. अमन ला मनापासून नमन. आई वडिल प्रत्येक मुलावर संस्कार करतातच पण अमनने त्या संस्कारावर त्याचा स्वतःचा केवढा मोठा मनोरा रचला आहे बघा. मी तर ऐकून निःशब्द झाले. पाय कसे घट्ट रोवले आहेत जमिनीवर ह्याच सुंदर उदाहरण आहे अमन. इतका मोठा विचार दुसऱ्यांसाठी इतक्या लहान वयात म्हणजे वाखाणण्यासारखीच गोष्ट आहे. आता विद्यार्थी दशेतच हा इतका समजूतदार आहे, मग प्रत्यक्ष डॉक्टर झाल्यावर रुग्णांवर किती माया प्रेम करेल हे वेगळं सांगायलाच नको. मनापासून माझे आशीर्वाद अमनला, खूप मोठा, प्रथितयश, लोकप्रिय डॉक्टर हो लवकर आणि रुग्णांना पट्टकनी बरं करण्याची जादू तुझ्या हातांना लाभो हि ईशचरणी प्रार्थना. आमेन. 

 Meanings associated with Aman online are:

Aman is Cooperative, Sensitive, Adaptive, Passive, Diplomatic, Peaceful, Warm, excellent partner, kind, balance, friendly, tactful and diplomatic.

मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

अकाली मोठं होणं

आताशा गेले काही वर्ष ह्या तांत्रिक घडामोडींमुळे सर्वांनाच सगळंच एका क्लीक वर उपलब्ध आहे, अगदी सगळं, जे म्हणाल ते, नको असलेलं, जे जाणून घेण्याची गरज नाही असं देखील. असो. ह्यालाच प्रगती म्हणतात कदाचित. जे जेव्हा ज्यावेळी कळायला हवं ते खूप खूप आधी समजल्यामुळे आणि ते लहान गटातल्या मुलांना त्यामुळे माझ्या दृष्टीने ते अकाली मोठे झालेत. उगाचच नको त्या वयात नको ती माहिती मिळतं असल्यामुळे. पण आता तीर कमानीतून सुटला आहे, त्याला थांबवणं अशक्य आहे. मुलांचं वागणं, बोलणं, व्यवहार आणि त्यामुळे दिसणं, चालणं आणि कृती ह्यातून ते सहज ओळखू येतयं. असो.

ह्या नाण्याची दुसरी बाजू मांडण्यासाठी हे अनुकथा लेखन आहे.

मी एक पूर्णवेळ बाहेरजाऊन काम करणारी आई. त्यामुळे माझ्या लेकरांना अवेळी संपूर्ण घरात एकटं अर्थात मावशींसोबत अगदी लहानपणीपासून वेळ आलीच. आता लक्षात येतंय माझ्या कि मी हे टाळू शकले असते, पण असो. ती मग सवयच लागली मला आणि त्यांना देखील. मागील काही महिन्यात मी नागपूरला बदली होऊन गेले होते तब्बल ५ महिन्यांकरिता तेव्हा तर संपूर्ण घर माझ्या लेकीने उत्कृष्ट सांभाळलं, अर्थात मावशी, तिच्या बाबा आणि भावाच्या तुटपुंज्या मदतीने. पण कहर म्हणजे सध्या, गेले काही दिवस, महिना माझे पाय अगदीच साथ देत नाही आहेत. ताकद कमी झाली आहे. त्यामुळे आताशा स्वयंपाकाच्या मावशी देखील काही संपलं तर माझ्या लेकीला सांगणं योग्य समजतात. माझा संसार पण ताकदीने सांभाळते आहे लेक. इतक्या लहान वयात इतक्या जबाबदाऱ्या, पण काहीच इलाज नाही. अभ्यास संभाळून करते सगळं आनंदाने. माझं अहो भाग्य कि अशी लेक माझ्या पोटी जन्माला आली. तिला अकाली मोठ्ठ नव्हतं करायचं मला पण ना इलाज. शिकतेय सगळं ह्यातून ती, पण हि ती योग्य वेळ नाही. ह्या पिढीला आणि मुलीच्या जातीला शिकायला फारसा काय अजिबातच वेळ लागत नाही. पण असो. सध्या मी नाही पण माझी लेक घरातला डोलारा सहजी सांभाळते आहे आणि ऑफिस मधले लोक देखील मला सांभाळून घेत आहेत २०१८ पासून हो. जेव्हा हा सर्वांना प्रश्न पडतो कि मी घरचं आणि दारचं कसं म्यॅनेज करते सध्या, तर उत्तर एकच, मी नाही बाकीचं सगळे करतात मला म्यॅनेज हो.

 "सुख म्हणजे नक्की काय असतं". माझ्या सारखी भाग्यवान फक्त मीच. शतशःधन्यवाद प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत केल्यामुळे आणि त्यांच्या अगणित शुभेच्छांना.

वसतिगृह

माझे काही ठळक विचार आहेत वसतिगृहाबद्दल आणि ते बदलणं कदापि शक्य नाही. माझे हे असे विचार का झाले? हे मला ठाऊक नाही. आणि अगदी आधीपासून आहेत हे रुजलेले जेव्हा मी स्वतः घरी राहात होते, वसतिगृहात गेले नव्हते तेव्हापासून. पाण्यात पडल्यावर आपोआप शिकतात सगळे जणं, वसतिगृह हेच एक ठिकाण नाही आयुष्यात सगळं शिकायला आणि पंखात बळ यायला, माझ्या दृष्टीने. ज्याला शिकायचं आहे तो कुठेही शिकू शकतो, घरी राहून देखील. नाण्याची दुसरी बाजू म्हणजे वसतिगृहात मोकळीक मिळते, शिस्त लागते ई. पण घरी आई-वडिल-मुलं ह्यांच्यात मैत्रीचं नातं असल्यावर मोकळीक मिळायला काहीच हरकत नाही आणि मिळतेच. शेवटी मोकळीक हा फार मोठा आवाका असलेला शब्द आहे.

माझे पिल्लं अगदी जेव्हा एक वर्षाचे देखील नव्हते तेव्हा माझी अवस्था थोडी वेगळी होती. दिवस रात्र एकच असल्यासारखं वाटायचं मला जणू. असो. होतंच असं आणि ते अगदी बोटावर मोजण्याइतक्याच दिवसांसाठी असतं, तात्पुरतं त्यामुळे ठीक आहे. दोघांना सांभाळतांना मावशी आणि माझी आई आजूबाजूला असतांना मला सगळे देव आठवायचे प्रत्येक क्षणी. त्या वेळी आमच्या सोसायटीत एक मॅडम नेहेमी यायच्या आणि त्यांच्या सोबत एक पिल्लू असायची. त्या मॅडम इतक्या मस्त तय्यार होऊन यायच्या ना कि बघून प्रसन्नच वाटावं. छानच वाटायचं. खूपदा यायच्या. त्यांच्या घरी म्हणे जुळी मुलं होती, आणि त्यांच्या सोबत येणारी कदाचित तिसरी मुलगी. आश्चर्यच होत ते. त्यामुळे त्यांच्याकडे बघून आणि मी सदानकदा अवतारातच हो. मुलं माझ्यासाठी प्राध्यान, घर, आई, ई. त्यानंतर मी, त्यामुळे तुलना नाही पण साहजिकच लोकांना ते जाणवलं आणि सरते शेवटी त्यांनी मला बोलून दाखवलं कि बघ जरा तिच्या कडे आणि शिक काहीतरी. असो. थोडीशी चौकशी केल्यावर समजलं कि त्या मॅडम ना फक्त एकच मुलगी होती. त्यांचं दुसरं लग्न होतं ते आणि पहिलीची जुळी होती. ह्या मॅडम नी दुसरं लग्न करते वेळी ठेवलेली बऱ्याच अटींपैकी एक म्हणजे दोन्ही जुळ्या मुल्लांना वस्तीगृहातच ठेवायचं. त्यावेळी त्या दोघांचं वय वर्ष फक्त ५ च्या आसपास होतं. दुसरी अट दोन्ही मुलांना दोन वेगळ्या वसतिगृहात ठेवायचं एकत्र नाहीच. हे सगळं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच हादरली, प्रचंड वाईट वाटलं कि त्या दोन पिटुकल्यांसाठी मी काहीही करू शकत नव्हते, काहीच नाही, सगळं माहित असून देखील.

इतक्या नाजूक वयापासून वसतिगृहात राहणं मला नाही पटलं. किंवा कुठल्याही वयात नाहीच, बहुतांशी आणि हि घटना तर १९ वर्षांपूर्वीची आहे, तेव्हा तर सुविधा काहीच नसणार
वसतिगृहात. घर ते शेवटी घर. आई वडिल कुठे आणि फक्त व्यवसाय म्हणून करणारे वसतिगृहाचे मालक कुठे. अर्थात अपवाद आहेत प्रत्येक ठिकाणी, पण तरी देखील.

धन्य ती आई जिने पिल्लांना घराबाहेर ठेवलं, त्याहून धन्य ते लोकं जे अजाणतेपणे मला बोलले / तुलना केली. गेले ते दिवस माझे आणि त्या लेकरांचे पण. आता मस्त मोठे आणि जाणते झाले असतील, त्यांच्या त्यांच्या घरी राहत असतील कदाचित. 

माझ्यासोबत घडलेला हा छोटासा एक प्रसंग जो वसतिगृहाशी निगडित आहे म्हणून येथे मांडला.  मी जेव्हा PG करण्यासाठी वसतिगृहात गेले आणि आता माझा लेक गेलाय, इतकी काही भरमसाठ सोयींनीयुक्त असं काही ते ठिकाण नाही, नव्हतं माझ्या बाबतीत. पण पर्याय नाही त्यामुळे आई म्हणून लेकाला मोटिव्हेट करणे हे माझं काम आणि निश्चितच काही चांगल्या आठवणी देखील उभ्या राहतील कोणास ठाऊक.

असो, अश्या घटना घडती आणिक स्मृती ठेवुनी जाती.   

तेरे बिना ना लगता जी...

 जी
एका प्रसिद्ध हिंदी चित्रपटातलं एक प्रसिद्ध गाणं आहे जे मला फार म्हणजे फारच आवडतं, त्याची कारणं अनेक आहेत. एक म्हणजे प्रथमच मी एक गाणं मुलाच्या, मुलीच्या आणि त्या कलाकारांच्या आवाजात ऐकलं. (unleashed version) मुक्तपणे गायलेली ह्या गाण्याची आवृत्ती तर फारच वाख्याणण्यासारखी आहे. हे गाणं मी असंख्य वेळा ऐकलं आहे पण परवा ऐकतांना माझं लक्ष "जी" ह्या पिटुकल्या शब्दाकडे वेधलं गेलं. जी किती प्रकारे वापरतात, त्याचे मला समजलेले काही अर्थ येथे मांडावेसे वाटले म्हणून हि अनुकथा.

जी म्हणजे:
हो
होकार
उत्तर देणे
अदबीने उत्तर देणे
जीव
मन (तेरे बिना ना लगता जी)
जगणं

"जी" हा शब्द हिंदीत जास्त प्रमाणात वापरला जातो अदबीने, रागाने आणि लडिवाळपणे देखील. आपण कदाचित "हो" म्हणतो अगदी तसेच. माझे बाबा म्हणायचे, नेहेमीच शांततेत जगण्याचा रामबाण इलाज म्हणजे फक्त "हो" म्हणा. इतका पिटुकला शब्द पण फारच कमाल करून जातो नेहेमीच. तसेच हिंदीत देखील असणार. माझी हिंदी आधीच माशा अल्लाह, त्यामुळे कमीच वापरली जाते, पण "जी" च महत्व आहे हे नाकारता येणार नाही. मराठीत वापरण्यात येणारा "जी" वेगळाच बरं का मंडळी. फक्त एक शब्दाचा महत्वपूर्ण भाग म्हणून वापरला जातो मराठीत. काळजी, शेठजी, रामजी, भाजी, भज्जी, ईमोजी, ई. आणि बरेच असे शब्द आहेत जे "जी" पासून सुरु होतात, त्याची पण वेबसाइट दिली आहे येथे.

https://www.hindi2dictionary.com/%E0%A4%9C%E0%A5%80-meaning-hindi.html 

http://www.maxgyan.com/marathi/english/meaning-of-jee-in-english.html

https://www.youtube.com/watch?v=dIV7nc0bGx4

 


Why Gudhi

 Since a symbol of victory is always held high, so is the gudhi (flag). It is believed that this festival is celebrated to commemorate the coronation of Rama post his return to Ayodhya after completing 14 years of exile. Gudhi is believed to ward off evil, invite prosperity and good luck into the house. - published on Wikipedia page https://en.wikipedia.org/wiki/Gudi_Padwa

https://www.mymahanagar.com/festival/why-gudhi-padwa-is-celebrate/417354/

माझ्या दृष्टीने गुढी हि एक मानव आकाराला दर्शवणारी आहे, डोकं आहे आणि वस्त्रालंकार देखील. डोक्यावर टिळक आहे, गोड गाठी ह्या साठी कि येणार संपूर्ण वर्ष असेच गोड जावे, गोड आठवणी निर्माण व्हाव्यात आणि त्या गाढी सेवन केल्या कि उन्हाचा त्रास होत नाही. कडुलिंब तर औषधीयुक्त आहेच आणि त्याच्यामार्फत येणार / घरात शिरणारा वारा संपूर्ण घराची शुद्धता करतो. नवीन वस्त्र म्हणजे त्या घरच्या माउलीला धन्यवाद देणे, आणि असेच वर्षभर घर नवीन कपड्यालत्त्यांनी भरलेलं राहो ह्या साठी. उंच ह्यासाठी कि ह्या सगळ्यांची सावली, आशीर्वाद घरावर सदोदित राहोत. काठी धुवून, वाळवून, गंध, अत्तर लावून पूजा, धुपारती ई. अशी ती सहकुटुंब सहपरिवार मांगल्यमय वर्षाची सुरवात, म्हणून गुढी उभारायची. मला एका अमराठी व्यक्तीने परवा विचारलेला हा प्रश्न आणि मी दिलेलं उत्तर, म्हणून येथे मंडळी. तुमचे आणखीन काही विचार असतील तर जरून सांगा मंडळी. धन्यवाद. 


संस्कार आणि काळजी

मी जिला अगदी ३ एक महिन्यांची असल्यापासून बघितलं ती आता दहावीत आहे ह्या वर्षी. तिला माझ्या पायांची स्थिती ठाऊक आहे. सध्या नवरात्री निमित्य श्री. रामरक्षा पठण सुरु आहे, ते संपल्यावर मला आवर्जून येऊन विचारते हे पिल्लू, मावशी तुम्हाला मी सोडून देऊ का घरापर्यंत? हे तीच कालच वाक्य होत, आज तर चक्क आली कुठून तरी धावत पळत आणि आली कि मला सोडायला न विचारात. आणि इतक्या विविध विषयावर बोलली, आंबे, आजोबा-आजी, माझा मुलगा, आजोबांचं घर, दहावीची परीक्षा, पायांची चौकशी ई. वा वा च. इतकं भावलं ना मनाला ते माझ्या, तिच्या आईला ताबडतोब कळवलं मी. आईच्या अंगावर मूठभर मास नक्कीच चढलं असणार ह्यात शंकाच नाही. ह्यातून दिसतात / झळकतात संस्कार, आई-वडिलांनी शिकवलेले आणि त्यावर तिने उभारलेला मनोरा. ह्या पिढीतल्या तिला माझी काळजी करण्याचं काय कारण? पण नाही. तिच्यातला हा गुण तिला नक्कीच खूप पुढे घेऊन जाईल ह्यात शंकाच नाही. तशी ती फारच हुशार मुलगी आहे, कविता करते, गाते, स्तोत्र सगळी तोंडपाठ आहेत आणि बरेच काही अजून वाखाणण्यासारखे गुणधर्म आहेतच. तिच्या पुढील सगळ्या टप्पांसाठी खूप शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद तिला, तिच्या विचारांना, आणि कृतीला देखील.  

श्रेय

खूप वर्षांपासून मी फेसबुक वर अधेमधे लिहीत असायचे पण काही ओळीच. पण त्यानंतर सप्टेंबर २०१८ पासून जास्त जोमाने,जोशाने माझ्या हातून लिहिलं गेलं. हळूहळू स्वानुभवांची प्रचिती येत गेली आणि मला सुचेल तसं मी टिपत गेले. २०१३,१४,१५ ची जी स्नातकोत्तर पदवी घेणारी मुलांची बॅच होती त्यात त्या मुलांना प्रकर्षाने जाणवलं कि माझ्या हातून व्यवस्थित प्रत्यक्ष आयुष्यातल्या घटना किंवा गरजा तांत्रिक शिक्षणाशी सांगड घातली जाते आहे. त्यामुळे लिखाणात पण नकळत तात्पर्य येत राहील बरेचदा. फेसबुक वरच आधी लिखाण होत असल्यामुळे मित्र मैत्रिणी त्यांचे अभिप्राय कळवायचे. त्यानंतर मग मी ब्लॉगर, ट्विटर आणि अधेमधे LinkedIn वर पण लिहिलेलं प्रकाशित करायला लागले. मोठा वाचक वर्ग मिळणं किंवा त्यासाठी थांबून राहणं हे माझं ध्येय नव्हतंच आणि असा विसावा घ्यावा इतका वेळ देखील नव्हता, नाही. फेसबुक वर माझ्या ऑफिस च्या अत्यंत प्रिय अश्या मैत्रिणी आहेत काही आणि माझं लिखाण मराठीतून, त्यामुळे त्या नेहेमी मला प्रोत्साहित करायच्या कि इंग्लिश मधे देखील लिहीत जा आणि तो प्रयन्त मी थोडाफार केला पण होता. त्यांचं प्रोत्साहन अगदी वाखाणण्यासारखंच आहे.

माझ्या वाचक वर्गात काही खूप छान अभिप्राय देणाऱ्या माझ्या शेजारणी आहेत, ज्या वयाने, मानाने जेष्ठ आणि श्रेष्ठ आहेत, पण तरीदेखील वाचतात नियमित पणे आणि सूचना देखील करतात, त्यामुळे अजून भन्नाट वाटतं लिहायला पुढे.

"खुपच छान लिहितेस प्रीती तू..." असंच नेहेमी त्यांच्या स्पेशल स्टाईल मधे म्हणणाऱ्या एक नागपूरच्या माझ्या काकू आहेत, आमच्या जुन्या शेजारी. खूप आवडीने त्या वाचतात जे काही मी टिपलं असतं ते, त्यामुळे पण पुढील शब्द पेरले जातात आपोआप.

माझा भला मोठा शाळेचा मित्रपरिवार देखील मला अनेकदा त्यांचे विचार सांगत असतात, माझ्या लिखाणावर उत्तर देत असतात, लाईक करत असतात, त्यामुळे देखील पुढची मार्गक्रमणा सुकर होते.

सध्या माझ्या लेकीला वेळ नाही म्हणून, नाहीतर अगदी बारकाईने लक्ष देऊन वाचते हो. अहाहा च. ती तर माझी सखी, दिशादर्शक, मार्गदर्शक, क्रिटिक आणि मला समजणारी वाचक आहे त्यामुळे ती देखील मला अनेक विषय सुचवत असते.

सगळ्यात नित्य नियमाने मराठी फारसं येत नसतांना वाचणारे म्हणजे माझे चुलत सासरे. ते प्रत्येक लेखाला / गोष्टीला / लिखाणाला अभिप्राय देतात,लाईक करतात ई.

अधेमधे अनेक जण मी लिंक पाठवली तर वाचतात आणि त्यांचे विचार कळवतात, त्यावर आधारित सुधारणा करता येतेच निश्चितच.

माझे PhD चे विद्यार्थी पण मस्त गप्पा मारून विशेष टिप्पणी देतात, वैविध्य प्रकारे कसं लिहिता येईल हे सांगतात, ऐकून घेतात आणि आवडीने वाचून अनेक नवीन विषय सुचवतात देखील.

लिंक पाठवली रे पाठवली कि वाचणारे आणि न चुकता अभिप्राय लिहून कळवणारे माझे ब्रो. आणि काही दिवस जर लिंक नाही पाठवली तर आवर्जून आठवण करून देणारे देखील तेच. किती म्हणजे कित्ती आवड ती, छोटसं काहीतरी लिहिलेलं वाचण्याची. साष्टांग दंडवत च त्यांना.

एका प्रथितयश कंपनीचे तरुण मालक ज्यांनी अनेक अनुकथा चाळून, काय आणि कसं लिहिलं आहे हे अभ्यासून मग माझ्याशी भेटण्याचे नुसते ठरवले नाही, तर स्वतः आले, आणि रिकाम्या हाताने नाही तर माझ्या साठी एक अमूल्य अशी भेट वस्तू घेऊन. तब्बल २-३ तास दिले मला गप्पा मारल्या, सगळं लिहाणामागचं कारण समजावून घेतलं आणि सातत्याने प्रोत्साहित केलं मला १००० अनुकथा लिहायला.

माझे पाय, मला आपोआप सुचणारे शब्द, नजरेस पडणारे विषय, माझे हात जे हे सगळं बिनबोभाट टाईप करतात, डोळे जे मला साथ देतात ह्या सगळ्यात, मोबाईल जो विषय डोक्यात आल्या आल्या सर्वप्रथम ऐकतो किंवा नोट्स सेव्ह करून ठेवतो, माझा बस स्टॉप, आणि बरेच जणं ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे मला लिहायला मदत केली आहे त्या सर्वांना माझा शिरसाष्टांग नमस्कार आणि मनापासून धन्यवाद. आज ह्या सर्वांमुळे माझ्या हातून १००० अनुकथेचा / अनुकथा लिहिण्याचा टप्पा गाठता आला. ह्या सगळ्यांशिवाय हे अशक्य होतं. ह्या पुढे अजून किती लिहायचं आहे, लिहिलं जाणार आहे, वाचक वर्ग मिळणार का नाही, त्यांना उपयोगी पडणार का नाही हे लिहिलेलं हे आणि असे सगळे प्रश्न मला कधीच शिवत नाहीत, "त्याच्या" कृपेने. मी फक्त आज्ञाधारक, "तो" सुचवतो, शक्ती देतो, गती देतो आणि लिहलं जातं. "त्याला" पण नेहेमीच लोटांगण, मला ह्या कामाकरता निवडलंस म्हणून. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.   

सरतेशेवटी माझ्या कथेची पात्रं म्हणजे विविध प्रसंग, माणसं ओळखीची आणि अनोळखी देखील, चार पायांचे मित्र, झाडं फुलं, पानं, गाड्या, रस्ते, स्वभाव, कृती, ऋतू, आणि बरेच जणं, ज्या सगळ्यांमुळे ह्या कथा जन्माला आल्या त्यांना विसरून चालणारच नाही.

दिव्याखाली अंधार

आमच्या सोसायटीत रामनवमी पर्यंत नवरात्र म्हणून रोज संध्याकाळी आम्ही श्री. रामरक्षा पठण करायचं ठरवलं आहे आणि करतो आहे दररोज. बरीच बच्चा पार्टी, आजी मंडळी आणि बाकी मंडळी येतात. बहुतांशी आमच्या सोसायटीत मराठी मंडळी आहेत, किंवा ज्यांना इतकी वर्ष राहून मराठी समजतं. श्री. रामरक्षा इतकी साधी सोप्पी आहे आणि सगळ्यांना माहिती असावी अशी. आज अगदी स्रोत संपतच आलं होतं आणि एकांनी अगदी आमच्या कानाशी दुचाकी मोठ्याने सुरु केली आणि काढली देखील. आम्ही गार वारा खात खात पार्किंग मधे बसतो म्हणायला, फक्त १०-१२ मिनिटे बास, खूप झाले. व्हाट्सअँप वर सर्वांना कळवलं देखील आहे ह्या उपक्रमाबद्दल. ज्यांनी कोणी हि गाडी अशी अजीब पद्धतीने काढली त्यांना साष्टांग दंडवत. अक्कल शून्य व्यक्ती असावी ती. जरा काही क्षण थांबली असती तर काय बिघडलं असतं, किंवा हाताने ढकलत थोडीशी चार पावलं चालून मग सुरु केली असती तर? काहीच हरकत नव्हती. एवढी काय घाई? ऐका ना, संपत आलंय स्रोत. स्वतः तर यायचं नाहीच, काही असे उपक्रम राबवायचे नाहीत, बाकी सगळे करत आहेत तर त्यात हे असं वागणं. छोटी छोटी मुलं काय शिकतील ह्या प्रसंगातून? दुचाकी चालवता म्हणजे मोठं व्यक्ती असेल कोणी तरी? डोळे बंद करून म्हणणं चाललं होत त्यामुळे मला माहित नाही कोण होत ते, पण थोडासा दुसऱ्यांचा विचार करायला शिकलं पाहिजे नक्कीच. असो, त्यांच्या ह्या अश्या कृतीमुळे मला हि छोटेखानी अनुकथा लिहायला मिळाली, नवीन अनुभव घेता आला, असे पण लोक असतात हे समजलं आणि काय करू नये हे देखील. मनापासून धन्यवाद त्या व्यक्तीला. श्री. रामा, सद्बुद्धी दे बाबा सर्वांना.

फार मोठी मदत

"काहीही न करणे", "गप्प राहणे", "नको तेथे सल्ला न देणे", "जमेल तेवढंच काम करणे" ई. म्हणजे खूपच मोठी मदत असते. समजा तुमच्या कडे कार्य आहे. त्यात एक तर तुम्ही हिरीरीने भाग घेऊ शकता, पडेल ते काम करू शकता, मोठ्या जबाबदाऱ्या घेऊ शकता ई. पण मग ते निभावाव प्रत्येकाने. हातातलं दिलेलं किंवा घेतलेलं काम पूर्णत्वाला नेणं फारच आवश्यक आहे, अर्धवट सोडणे नाही. तुम्हाला जमत नसेल तर हातात घेऊ नका ते काम. ते काम अर्धवट करण्यापेक्षा, चुकीचं करण्यापेक्षा न केलेलं बरं तसं स्पष्ट सांगा, मौन बाळगा. त्यालाच मोठं होणं म्हणतात हो. जेथे हवं तेथे, विचारलं तरच, आणि झेपेल तेवढंच करा.

माझे बाबा नेहमी म्हणायचे एकाच्या डोक्याने चालावं, चांगलं वाईट त्यातून शिकतो माणूस. मनं दुखावू नयेत, उगाच वाद घालू नये, आपलंच खरं करण्याच्या पाठीमागे लागू नये.

एकदा आयतं चाखून तर बघा, कित्ती मज्जा येईल, त्या देणाऱ्याला आणि तुम्हाला देखील. "कुछ ना करके भी देखो". असं मौन पाळणं, मधेमधे न करण, दुसऱ्याला मुभा देणं ई. सोप्प नसतं बरं का मंडळी. चांगलीच बैठक लागते त्याला, मन मोठं लागत आणि सगळं आत्मसात करून आपलंस करण्याची कला पण लागतेच. हळूहळू जमेल, करून तर बघा, ह्या ची गोडी / अनोखी चव चाखून तर बघा. वेगळ्या विश्वात वावरायला शिकाल हे नक्की.

शांतपणा

 
मी उन्हाळ्यात वर्गात गेले कि आधी सगळ्या पंख्यांची गती कमी करते. नॉर्मल दिवस होते तेव्हा देखील आणि आता सुद्धा. नॉर्मल दिवसात तर सगळे विद्यार्थी डोळ्यासमोर वर्गात बसायचे आणि आता अर्धे वर्गात, अर्धे घरी. माझा आवाज पोचेल कि नाही हि मला काळजी त्यामुळे पंख्याची गती कमी करते मी. उकडतं माहिती आहे मला, पण त्यामुळे असलेले सगळेच पंखे ५ वर म्हणजे जरा जास्त होतं, माझ्या दुर्ष्टीने. मग आज मी विद्यार्थ्यांना विचारलं ह्या वर काही उपाय आहे का? तर म्हणतात कसे सर्वत्र वातानुकूलित यंत्रणा हवी मॅडम, म्हणजे पंखे लावावे लागणार नाहीत आणि पंख्याच्या स्पीड मुळे तुम्हाला / शिक्षकाला आवाज मोठा करावा लागणार नाही.  त्यावर मग मी त्यांना शांत-पंखे, सायलेंट-फॅन ह्या विषयी सांगितले. ह्या विशिष्ट पंख्याची खासियत अशी आहे कि गती वाढवली तरी ते भरपूर हवा देतात / फेकतात, गारवा देतात, प्रसन्न करून सोडतात पण अतिशय शांत पणे आणि ह्या अश्या शांत पंख्यांची सगळ्यात मोठी गती ५ नाही तर ८ असते.

ह्या सगळ्या वरून एक जाणवलं मला कि असेच शांतपणे आपल्या सभोवतालच्या व्यक्तींसाठी सज्ज राहावं, न कळत शांतपणे तुम्ही आहात हि भावना रुजवावी, त्या करता महागडा AC च व्हायची गरज नाही, साधा पंखा पुरेसा ठरतो, नेहेमीच.

लेस इस मोअर

तसं पाहिलं गेलं खरंच ऑफिस मध्ये काय लागतंय, एक पॉवर पॉईंट बास, लॅपटॉप असतोच, मोबाईल असतो, त्यामुळे हॉटसॉप्ट तय्यार करून काम सुरु. मग पॉवर पॉईंट कुठेही असो.  अगदी घरी पण तेच असतं. कुठंही अगदी कमीतकमी गोष्टीं सोबत पण राहणं सहज शक्य आहे. आपण उगाचच आपल्या गरजा वाढवून ठेवतो, कारण नसतांना. अर्थात आपण प्रत्येकाकडे बघू तसे / अपेक्षा ठेवू तसे आहे. आणि  त्या हि पलिकडे जाऊन घेऊ तसं. अडून राहायचं नाही कधीच, छोटं घर फार सोप्प आवरायला आणि त्यामुळे बाकी गोष्टी करायला भरपूर वेळ मिळतो, खर्च कमी होतात ई.

अगदी तस्सेच, ऑफिस मधे स्वतःच्याच ठिकाणी कामं होतात असे नाहीच. जाऊ तेथे, लॅपटॉप असेल तेथे, इंटरनेट असेल तेथे, फक्त मोबाईल असेल तेथे, कुठेही कामं सुरु राहू शकतं, आजकाल काही अडत नाही, कारण सगळंच सॉफ्ट कॉपी म्हणजे संगणकावर उपलब्ध आहे. जागेमुळे अडत नाहीच, असू नयेच. बाहेर प्रगत देशात तर इतकी कमालीची स्वच्छता असते कॉलेज मधे कि विद्यार्थी घोळक्यात, एकटे किंवा कोणासोबत बसून कामं करतांना दिसतात. कामं होणं महत्वाचं आहे, कुठे बसून केलीत ते नाही.

आधी होतं आणि मान्य देखील आहे, आपली खुर्ची, आपलं टेबल आणि तो माहोल महत्वाचा असतो, पण अडू देऊ नका. जमेल तेव्हा त्या तुमच्या हक्काच्या ठिकाणाचा पण उपभोग घ्याच. पण "चलते रहो", पुढे जाणं हे महत्वाचं च आहे.

हे मी सध्या थोड्याफार प्रमाणात अनुभवते आहे, कारण प्रत्येक वेगळ्या क्लास च्या वेळी माझ्या बसण्याच्या जागेवरून खालीवर करणं माझ्या पायांना शक्य नाही, त्यामुळे मी जेथे तेथे माझं ऑफिस असं सुरु आहे, कोठेही अडथळा नाही, कामं फटाफट मार्गी लागतात आणि समाधान देऊन जातात. आजूबाजूचे मित्र मंडळी प्रचंड समजूतदार आहेत, ठिकाणाला फारसा भाव न देता वेळेवर / वेळेआधी व्यवस्थित कामं करणं महत्वाचं. धन्यवाद परदेशी अनुभवांना, त्या विद्यार्थ्यांना ज्यांच्यामुळे मला हे कळलं आणि पायांना ज्यांच्यामुळे हे मी प्रत्यक्षात आणलं. अर्थात सध्याच्या नवीन दिवसात हे सगळ्यांच्याच अंगवळणी पडलंय ते वेगळं.  

मोठ्ठं घर, भलंमोठं ऑफिस नकोच, उगाच फाफट पसारा नसला तरी चालतो, लेस इस मोअर हेच खरं.

तेल-विरहीत

थालीपीठ म्हणजे एक सुबक-सुंदर गोलसर आईची बोटं उमटलेले सरबरीत आणि ओबडधोबड पण जगावेगळं चविष्ट असं काहीतरी भन्नाट. ह्या पदार्थाला शब्दात बांधणं म्हणजे गुन्हाच. गोलसर आणि इकडे तिकडे छोटे छोटे भोकं केलेले, मुद्दाम. त्यामुळे दिसायला सुशोभित आणि शिजायला पट्टकन. कारण त्या सर्व भोकांमधे थोड्याफार प्रमाणात तेल सोडलं असतं, अवतीभोवती तर असतंच पण मधे देखील. प्रत्येक घास खुसखुशीत लागावा, चव जिभेवर रेंगाळावी आणि पौस्टिक असल्यामुळे असं खाण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून असेल कदाचित हे तेल प्रकरण. असो.

आमचे एक स्नेही एका दूर देशात वास्तव्याला आहेत. शनिवार रविवार आणि सणासुदीला प्रचंड स्वयंपाकाची आवड म्हणून आणि सेवा म्हणून ते तिथल्या स्थानिक देवस्थानात स्वयंपाक करतात भल्यामोठ्या प्रमाणात. आणि त्यांच्या हाताला भलतीच चव आहे, उत्कृष्टच होतो पदार्थ. एकदा भेट झाली तेव्हा आणि त्यांच्या विविध मुलाखतींमधे देखील ते म्हणतात कि विश्वास ठेवा अथवा नाही, माझ्या पुरतं हे मर्यादित आहे कि माझ्या स्वयंपाकाला चव येते ती "त्याच्या" मुळे आणि भरपूर एक मसाला मनसोक्त वापरल्यामुळे, तेल.

तेलाची कदाचित हि खासियत आहे कि चव येतेच पदार्थाला.

काही वर्षांपासून काही लेख छापून आले काय आणि सगळेच वेडे झालेत. कुठेही कान द्या, हेच ऐकायला मिळेल, हे खाऊ नका आणि ते खाऊ नका. ह्या पठडीतले दोन भयंकर प्रकार माझ्या दृष्टीपथात आले इतक्यातच, एक म्हणजे बिनतेलाचं थालीपीठ, दुसरं तेल वेगळं काढलेले थालीपीठ. बाप रे,मी उडालेच. इतकं सगळं करण्यापेक्षा, सोंग आणण्यापेक्षा, खा हो व्यवस्थित. अती नको आपण मन मारून पण नको. खा आणि पचवा, कामं करा, घरातली स्वच्छता करा, खाल्लेलं जिरेल असं काहीतरी नियमित करा आणि ज्या पदार्थांमधे लागतं त्यात हात आवरून घाला हो, तेल. नाहीतर सांधे त्यांचं काम करणार कसे, वंगण मिळायला नको, तेल तूप वाल्यांचा धंदा चालायला नको, तुमचं घर चकचकीत दिसायला नको. मग हे सगळं साग्रसंगीत हवं आहे ना तर तेल तूप वापरा पण सांभाळून. बास. सोप्प आहे. 

सेलिब्रेशन

असं कुठे लिहिलं आहे का कि फक्त वर्षाकाठीच वाढदिवस साजरा करायचा, किंवा कुठलाही दिवस हा एका वर्षानेच साजरा करायचा. कोणी ठरवलं हे? मला माहित आहे कि आपलं "मोजण्याचे एकक" हे वर्षात असते, म्हणजे किती वर्षाचे झालात, लग्नाला किती वर्ष झाली, नोकरी किती वर्ष केलीत ई. वर्षाचं महत्व ठाऊक आहे मला, पण त्या पेक्षा थोडे अधिक आणि वेगळे दिवस साजरे करावेत किंबहुना अनेक जण करतांना दिसतात आजकाल. मी देखील माझ्या लेकरांचा प्रत्येक महिन्याचा वाढदिवस साजरा केला पहिल्या वर्षी. कदाचित मी नवीकोरी आई झाले होते तेव्हा म्हणून असेल, किंवा प्रत्येक महिना पूर्ण करणे हे सुखदायी होतं माझ्यासाठी त्यामुळे असेल किंवा खरं सांगू इतके जणं यायचे ना पिल्लांना बघायला / त्यांच्याशी खेळायला कि भरपूर कपडे आणि ते देखील विचारपूर्वक वाढत्या अंगाचे आणल्यामुळे मग काय फक्त महिन्याचे वाढदिवसचं नाही तर मराठी आणि इतर सण देखील साजरे झाले प्रत्येक वेळी नवीन कपडे घालून त्याच उद्घाटन करुनच. त्यावरून आठवलं कि आजकाल साक्षगंध झाला तो दिवस, भेट झाली तो दिवस, नोकरी मिळाली तो दिवस आणि असे प्रत्येक दिवस सणांशिवाय बरं का मंडळी, साजरे होतांना दिसत आहेत. मागे झालं ते झालं, अनेक मित्र-मैत्रिणी झाल्या, टिकल्या, संपर्कात राहिल्या ई. पण आता जर नवीन ओळख झाली, तिचं मैत्रीत रूपांतर झालं, सूर जुळले तर तो दिवस दर महिन्याला, किंवा दोन-तीन महिन्यातून एकदा का नाही साजरा करायचा? हा आज मला डोक्यात आलेला प्रश्न. मी नक्की प्रयत्न करणार आहेच, तुम्ही पण करा आणि सांगा कसं वाटतंय, काय वेगळं आहे. अश्या एखाद्या दिवशी सरप्राईझ देऊन बघा, खूप छान आणि वेगळं नक्कीच वाटेल हि मला खात्री आहे. आणि हो एकदा का तुम्ही थोडेसे घरच्या जबाबदारीतून मोकळे झालात कि मग काय कारणं च हवी असतात खळखळून हसायला, एकत्र वेळ घालवायला आणि खूप साऱ्या आठवणी निर्माण करायला, नाही का ? घरच्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, आणि इतर माहितीतले रुळलेले दिवस उत्साहात तर सगळेच साजरे करतात, वेगळं करू या काहीतरी. काय म्हणताय मंडळी?  

जरी प्रत्येक दिवस हा साजरा कारण्याकरताच असतो, तरी देखील त्यात वेगळेपण आणूयात. चला मैत्र सेलीब्रेट करू या. 

One possible example : Monthly friends meeting day


दाग अच्छे है ++

एका भल्या मोठ्या कंपनीचं हे ब्रीद वाक्य आहे, जाहिरातीत प्रत्येक वेळा ऐकतो आपण. हे वाक्य मनावर इतकं बिंबल आहे कि पटायला लागलंय आता. डाग पडले म्हणून आकांडतांडव करण्यापेक्षा सोडून द्यावं, ते निघतील का ह्या कडे बघावं, बास. ऊर्जा बरोबर दिशेला वळवणं अत्यावश्यक आहेच. अगदी तस्सेच मी मागे एका अनुकथेत लिहिल्याप्रमाणे नवीन नॉर्मल दिवसात आपण सगळ्यांनी घेतलेले इंजेक्शन्स पण अच्छे आहेत. माझे सध्या बी१२ चे इंजेक्शन्स चालू आहेत ते पण मग फारच अच्छे आहेत. टोचून घ्या, थोडसं दुखलं तर सहन करा कारण ते प्रकृतीकरता आवश्यक आहे, आणि पर्याय नाही आहे. त्यामुळे गपगुमान सगळेच अच्छे आहे म्हणायचं, ऑल इस वेल म्हणायचं आणि पुढे वाटचाल सुरु ठेवायची. आनंदाचा क्षण उपभोगायचा, तो आपला म्हणायचा असं नाही, प्रत्येक क्षण आपला, नाण्याची दुसरी बाजू पण असते आणि ती बघायला शिकलं तर जगाएवढ्या वैविध्य संधी दिसतात. त्यामुळे आता सगळेच अच्छे आहे म्हणा, माणसं, परिस्थिती, वागणं, चढ-उतार ई. बघू तसं आहे, पण हे आपसूक होऊ द्या, ओढून ताणून नको. रोजनिशीचा भाग असा असू द्या आता तरी, आता पासून आणि नेहेमी करता. काम, छंद, व्यायाम, खाणं, घरची - दारची काम, समाज सेवा आणि इतर गोष्टी ह्या मधे इतकं स्वतःला व्यग्र ठेवा कि सगळंच मस्त दिसेल, हा तो, हे ते चांगलं नाही हे म्हणायला पण वेळ नसावा. कारण सोप्प आहे एकाच्या दृष्टीने एखादी गोष्ट बरोबर तर दुसऱ्यांच्या चूक. मग का पडायचं ह्यात, अनाहूत सल्ला नको. कोणाच्या अध्यात मध्यात नकोच.  

सोय आणि उद्देश

माझ्या दृष्टीने आधीच्या काही अनुकथांमधे नमूद केल्याप्रमाणे प्रत्येकालाच गाडी चालवता येणं हि काळाची गरज आहे. एकतर सोय होते, विद्यार्थ्यांना शिक्षण हे उद्देश असतं त्यामुळे वर्ग असतील तसं पोचणं आवश्यक आहे. प्रोजेक्ट्स साठी इथे-तिथे जावं लागतं ई. माझी लेक फारच ते स्वातंत्र, हवेशी गप्पा मारणं, गती, नियंत्रण, ई. मस्त एन्जॉय करते आहे. त्यामुळे एकदम माहितीचा भडिमार करायचा नाहीच असं मी ठरवलं, आणि तसंच वागते देखील आहे, जे तिला फार आवडतंय, आणि त्यातून तिला भरपूर शिकायला मिळतंय आणि वाव पण. असो. तर अचानक एका आडोशाला उभे असलेले पोलीस दिसले आम्हाला ओळीने दोन-तीन दिवस. तो धागा धरून मी तिला सहज सांगितलं कि तुझ्या कॉलेज च्या नेहेमीच्या रस्त्यावर असे पोलीस असतात का थांबलेले ते बघ, लक्ष ठेव. गाडीची कागदपत्र बघून घे, समजावून घे, PUC वेळोवेळी करावी ई. एक अजून वाक्य सांगितलं तिला कि तुझ्या कडे सगळे कागदपत्र आहेत, तू नियमाप्रमाणे आत्मविश्वासाने गाडी चालवत आहेस, तर पोलीस काहीच म्हणणार नाहीत. पण असं होऊ शकतं कि उगाच भलत्या कारणासाठी दंड भरा वगैरे. त्यावेळी उगाच वाद घालायचा नाही, परीक्षा असेल, महत्वाचे तास असतील तर डोक्याला खुराक नको. त्यापेक्षा थोडेसे पैसे द्यायचे मागितले तर, रसीद घ्यायची आणि निघायचं तेथून. त्या पोलीस च्या मुलाला आईस्क्रीम दिल घेऊन आपण असं समजायचं. मग काय करायचं, दुसरा पर्याय नाही. उगाच ह्यामुळेच भ्रष्टाचार वाढतो ई. बोलत बसायचं नाही, त्रागा करायचा नाहीच कारण ते आपलं उद्देश / उद्दिष्ट नाहीच मुळी. अर्थात हा माझा मार्ग, हि माझी पद्धत, ह्या वर दुमत असू शकतं, असायलाच हवं. आणि आधी लिहिल्याप्रमाणे मी फक्त सूचित करते तिला, जबरदस्ती नाही. तिला तिच्या मार्गाने जाण्याची पूर्ण मुभा आहेच. आणि माझ्या मुलीच्या बाबतीत तरी ती तसंच करते, माझं, बाकी मोठ्यांचं ऐकते आणि अतिशय हुशार पद्धतीने कधी फक्त स्वतःला पटेल असं, कधी कॉम्बो अशी कृती करते. बिनधास्त च. असं पाहिजे.

सोमवार, ४ एप्रिल, २०२२

भेटण्याची ओढ

एक ज्वलंत प्रश्न पडलाय मला. दोन व्यक्ती आहेत. दोघांना फक्त एक मेकांबद्दल माहित आहे, बोलणं झालयं त्यामुळे हे माहिती आहे कि साधारण विचार जुळताहेत, फोटोत बघितलं आहे, आणि इतरजणांकडून ऐकलं देखील आहे. त्यामुळे पुढील टप्पा म्हणजे प्रत्यक्ष भेट. पण दोघे दोन भिन्न शहरात त्यामुळे सहज शक्य नाही भेट, मनात येईल तेव्हा. आता प्रश्न असा आहे, कि ह्या पैकी फक्त एकाच व्यक्तीला भेटावसं वाटत असेल? किंवा दोघांनाही तितक्याच आतुरतेने भेटायचं असेल, मग ह्या दोन्ही परिस्थिती नक्की काय होतं? प्रत्येक वेळा "दोनो तरफ आग बराबर लगनी चाहिये" असं काहीतरी का? फक्त एकाची इच्छाशक्ती पुरेशी असते? का वेळ / योग यावा लागतो? किंवा "त्याच्या" मनात असेल तेव्हाच गोष्टी घडतात. एकमेकांना भेटून काही तरी उत्तर मिळणंच नेहेमी अपेक्षित असतं?, मोजण्या एवढं अपेक्षित असतं का प्रत्येक भेटींमधे?,  का भेट निष्फळ पण ठरू शकते? काय असतं नक्की? का तुम्ही बघाल तसं असतं?. जसं अनेक आधुनिक संतांच्या पोथीत दिलंय तसं, क्षणभर फक्त नजरेस पडलं तरी पोटभरतं? फोन वर, चॅट वर बोलणं पुरेसं नसतं का, भेटून काय होणार आहे? का ह्या भिन्न गोष्टी आहेत, तुलना होऊच शकत नाही? बरं हे असं वाटणं फक्त कुठलेही बंध / बांध नसलेल्याच लोकांमधे आढळते, घडते का इतर देखील? बघा ना साक्षगंधा आधी आणि नंतरचा पिटुकला काळ आठवा मंडळी, काय असायचे ते दिवस आणि लग्नानंतर थोडासा बदल घडतो. हे फक्त एक उदाहरण झालं, असंच असतं का प्रत्येक वेळी?

मला थोडक्यात मिळालेली उत्तर अशी: एकाची इच्छा शक्ती पुरेशी आहे भेट होण्याकरता. नकळत काय काय मिळत प्रत्येक भेटीत काहीही सांगता येत नाही, पण मिळणार हे नक्की, दोघांना निश्चितच, फक्त तसा बघण्याचा दृष्टिकोन हवा, कोण कुणासाठी काय घेऊन येईल, दिशा दाखवेल हे देखील फार मोठं गुपित असतं, कुठलाही अट्टाहास मात्र नकोच, अपेक्षा तर फार दूर राहिल्या, सहज, सरळ इच्छा फार मोठी जादू करून जातात. सरते शेवटी "त्याची" इच्छा तर आहेच, त्याच्या पुढे, किंवा पलीकडे काहीच नाही. त्यामुळे त्याच्या इच्छेनुसार च जाऊ या, अनेकांना भेटत राहू या, मनापासून इच्छा व्यक्त करणं आपल्या हातात आहे बाकी काही नाहीच. इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तरी त्या बदल्यात काही तरी "तो" देऊन जातोच मंडळी, जे त्यावेळी आपल्यासाठी योग्य असतं तेच. निराशा कधीच देत नाही, किंबहुना ते त्याच्या दरबारी नाहीच.

नवं प्रेम

मागे लिहिल्यापणाने माझ्या लेकीला सध्या दुचाकीवरचं राहावसं वाटतंय. दर दिवशी नवनवीन रस्ते भ्रमंती सुरु आहे. गेले ३ दिवस सलग पेट्रोल भरलं जातंय, अगदी थोडं थोडं, तो पेट्रोल पंप वाला देखील गालातल्या गालात हसत असेल ह्या वेडीला. काल काय तर अचानक सर्वांना आवडेल असं आईस्क्रीम आणलं गेलं. विचारूच नका. आता घरातच यायचं नसतं पहिल्या ओळीत लिहिल्या प्रमाणे तसंच घरी आलीच तर घराबाहेर पडण्याचे प्रत्येक क्षण टिपले जातात, जास्तीत जास्त उत्साहाने ते क्षण उपभोगले जात आहेत सध्या, कारण गाडी हातात आहे, सत्ता आली आहे असं वाटतंय, फुलपाखरासारखं थोडक्यात. अगदी माझीच साउली ती, मला पुन्हा एकदा जगल्यासारखं वाटतंय फक्त तो खळखळणारा उत्साह बघून, भन्नाटच. त्या माझ्या दिवसात इतकं जगले आहे मी कि तृप्त झाले आहे पूर्णपणे.

आईस्क्रीम आणणं हे इतकं सोप्प नाही हो मंडळी. एक तर ते दुकान कुठे आहे हे स्वतः चालवता चालवता लक्षात आणणं, गाडी वर असतांना तो दुकानाचा बोर्ड बघणं आणि त्याच क्षणी गाडी पार्किंग साठी जागा टिपणं हे लिहितांना, ऐकतांना वाटत तितकं सोप्प नाही च. त्यामुळे हे सगळं ती इतक्या आवडीने, शिताफीने, आपणहून करते आहे हे बघून दाटून आलं. विचारलं तर म्हणते कशी "उन्हाळा आहे, आईस्क्रीम आणण्यासाठी विचारायचं काय? जायचं, आणायचं आणि सगळ्यांनी मिळून फस्त करायचं, बास च". वा म्हणजे वा च. फारच आवडलं मला.

पेट्रोल भरायचं कधी ह्या कडे गाडी चालवता चालवता बघणं, पेट्रोल पंप कुठे आहे, तेथे जाणं, बंद गाडी हातात घेऊन रांगेत उभं राहणं, शुन्याकडे लक्ष देणं, गाडी पुढे घेऊन जी पे, किंवा पैसे मोजून देणं-घेणं हे सगळे टप्पे एकटीने गाठल्याचा आनंद तिला आणि मला शब्दात मांडता येणं फारच अशक्य आणि अवघड. पण जे चेहेऱ्यावर उमटलं ते बघणं म्हणजे माझ्या सारख्या आईला भली मोठी पर्वणीच हो. "सुखं म्हणजे नक्की काय असतं नेमकं", "बोलविणं संवादु", "शब्दांविना भाषा" च जशी. हे असे क्षण उपभोगायला पण अहोभाग्य लागतं मंडळी. इथेच थांबणं नाही, आता तर दुचाकी वापरून रस्त्यावर राज्य करणं चाललंय, आता पुढील टप्पा गियर ची गाडी आणि मग चारचाकी आहे. त्यामुळे माझ्या पुढ्यात अजून अनेक आनंदाचे क्षण रचून ठेवले आहेत, हळूहळू त्याचा आस्वाद घेते आणि चिरतरुण राहण्याचा प्रयन्त करते. 

"अश्या लेकी येति आणिक स्मृती ठेवुनी जाती, आनंद देऊनी जाती, भूतकाळात घेऊनि जाती". 

भिंतीवरच्या आठवणी

मला समजायला लागल्यापासून मी जेथे जेथे म्हणून भिंतींवर लटकवलेल्या फोटो फ्रेम्स बघितल्या आहेत त्या सर्व एक दोरीवजा वस्तूने खिळ्याला लटकवलेल्या असायच्या. ती दोरी अथवा सुतळी एका विशिस्ट पद्धतीने बांधून लटकावयाचे. त्या दोरीच्या / सुतळीच्या मजबूतीची कमालच होती, वर्षानुवर्षे टिकायची हो. काही घरांमध्ये अगदी शिस्तीत ठेवायचे, जपायचे भिंतींवरचे फोटो / पेंटिंग्स ई. पण बहुतांशी घरात ज्या दिवशी ज्यांनी तो फोटो लावला त्यांनतर त्या कडे संपूर्ण दुर्लक्ष. फोटोवर धूळ काय, सुतळीवर जाळ्या काय विचारू नका. असो. त्या नंतर काळ बदलला, आणि ह्या सुताळ्यांना विश्रांती दिली गेली. एक छोटसं हुक फ्रेम मागे लावलं गेलं साधारणतः मध्यभागी म्हणजे ती फ्रेम शिस्तीत लटकवली जाईल, मजबूत पण आणि दोरी नसल्यमुळे काही दिसणार नाही जास्तीच पण फक्त फोटो / पैंटीग, बास. ज्याने कोणी हि हुक ची संकल्पना शोधून काढली त्याला अनेक धन्यवाद. त्यामुळे फोटो फ्रेम लावणाऱ्याला सोपं आणि बघणाऱ्याला सुबक असं. अगदी असंच आपलं मैत्रीचं किंवा कुठलंही नातं जपलं तर, अदृश्य पण मजबूत आणि टिकाऊ, दोघांसाठी अत्योत्तम, कारण नातं हे कमीतकमी दोघांमधे असतं नाही का. नातं आहे हे दाखवायची गरज काय, आणि दाखवणं हाच जर उद्देश असेल तर मग संभाळतोय हे पण दाखवावं लागेल, नाही का? त्यापेक्षा, झाकली मूठ सव्वा लाखाची हे बरंच बरं.

असं असतं, त्या निमूट भिंतींवर विराजमान फ्रेम्स सुद्धा अप्रतिम सौंदर्य बहाल करतातच भिंतींना, बघणाऱ्यांच्या डोळ्यांना सुरेख कलाकृती दर्शवतात आणि शिवाय किती म्हणजे कित्ती गोष्टी शिकवतात माणसांना, बघू तसं आहे, नाही का?

योग्य गुरु

"स्वतः पासून सुरवात", "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले", "कृतीकडे बघून शिका", "शब्द जसे तीर", "शब्दांच्या प्रयोगावरून माणूस ओळखा" ई.

हि अशी सगळी वाक्य, म्हणी म्हणा हवं तर आज मला एखादा चित्रपट बघावा तशी डोळ्यासमोरून झर्र्कन आली-गेली.

मी जेथे योग करायला जाते तो एक बहुउद्देशीय हॉल आहे. त्यात अनेक जण येतात आणि वापरतात असं दिसतंय तो हॉल विविध कारणांसाठी. माझा तास चालूच होता तेव्हा कोणी अजून मंडळी आली, बाकी हळू हळू येत होती. जी मंडळी आली त्यात बऱ्याच जणांनी मॅट उभी अंथरली आणि एकांनीच फक्त आडवी. त्यावरून मला असं समजलं कि त्या शिक्षिका आहेत आणि बाकी विद्यार्थी. तो हॉल बऱ्यापैकी मोठा आहे, खूप साऱ्या खिडक्या आहेत, ६-८ पंखे आहेत, दिवे आहेत ई. हॉल म्हटल्यावर भला मोठा दरवाजा आलाच, नाही का. आणि अहो सकाळची ६.३० ची वेळ, प्रसन्न वातावरण आणि गार वारा, उस्फुर्त वैविध्य पक्षांचे गायन, गप्पा, आवाज, बोल, बडबड ई. आणि शांतता, थंडावा. हि यादी न संपणारी अशी आहे. इतकं सगळं निसर्गाने भरभरून दिलं आहे मुक्तहस्ताने सर्वांनाच, भेदभाव न करता बरं का. त्या हॉल मधे सुद्धा थंडावा जाणवतो कारण आजूबाजूला असंख्य मोठाले वृक्ष आहेत, झाड आहेत, गवत / Lawn आहे, त्यावर फवारे हलकासा पाण्याचा शिडकावा करतात ई. अश्या सगळ्या वातावरणात जेव्हा त्या मॅडम आल्या, आडवी मॅट अंथरली धसड-वसड करत, बसल्या आणि विचारपूस सुरु, "सगळे पंखे चालत नाहीत का? काय हि गर्मी, कसं बसायचं माणसाने..." आणि तोंडाचा पट्टा सुरूच राहिला. मग पुन्हा धसड-वसड करत शेजारी सुरु असलेल्या पंख्याखाली मॅट ओढली आणि बसल्या.

हे सगळं बघून मला महद आश्चर्य वाटल्याशिवाय राहील नाहीच. योग गुरु आहात तुम्ही, तुमचे विद्यार्थी समोर आहेत अथवा नाहीत, तुमचं प्रत्येक वागणं, बोलणं, कृती टिपली जातेच. योग केल्याने, शिकवल्याने एक वेगळा माणूस घडतोच आपोआप. किंबहुना योग शिकवण्याची ती पहिली पायरी आहे, त्या गुरु कडून खूप काही शिकण्यासारखं हवं चांगलं, इतकं कि प्रत्येक वेळी, दर दिवशी काही नवीन, ताज, वेगळं, अकल्पित असं. "गुरु असावा सर्वगुणी आणि महाज्ञानी" नाही का? गुरु इतका अस्वस्थ का? मला हा पडलेला एक ज्वलंत प्रश्न आहे. ह्या सगळ्या शब्दांऐवजी कृती जास्त योग्य ठरली असती. त्यांनी जर शांतपणे मॅट पंख्याखाली  हलवली असती तर, पट्टाकिनी खिकड्या उघडल्या असत्या तर, किंवा विजेचं काम करणाऱ्याला निरोप पाठवला असता तर, किंवा त्या थंड गार वातावरणात आहे तेथेच क्लास सुरु केला असता तर जास्त शिकता आलं असतं त्यांच्या कृतींकडे बघून. आदर्श निर्माण करू शकल्या असत्या त्या. पण असो. योग्य गुरु असणं, बनणं आणि मिळणं हे देखील भाग्याचं नाही का? ह्यांच्या कडून कदाचित काय नाही करायचं, कसं नाही वागायचं ई. तरी शिकता आलं, हे हि नसे थोडके.

सिंहासन

मी आज योग क्लास ला गेले होते. माझा क्लास सुरु असतांनाच, संपत आला होता त्या दरम्यान एक मॅडम आल्या, स्थानापन्न झाल्या मॅट वर आणि त्यानंतर एक आबा आले आणि एका खास जागी विराजमान झाले. ते त्या जागेवर इतके मस्ती करत होते जसे कि किती मज्जा येते आहे त्यांना. पाय काय उंच करत होते, पाय लयीत हलवत होते आणि एकंदरीतच आनंद येत होता त्यांना हे सगळं करण्यात. आपल्याच नादात चाललं होत सगळं त्यांचं, जसे कि त्यांच्या अवतीभोवती कोणी म्हणजे कोणी नाहीच, ते राजा आहेत त्या ठिकाणचे असं. अर्थात पाय लयीत हलवणे म्हणजे एक प्रकारचा व्यायामच सुरु होता असं म्हणायला हरकत नाही, किंवा योग करण्याआधी जो शरीराला आवश्यक ताण द्यावा लागतो तो थोड्या प्रमाणात पण महत्वाचं म्हणजे आनंदात. त्यांना अनेक पर्याय होते इथे तिथे बसायचे, पण हुशार तरुण आबांनी बरोबर जागा पकडली होती, लहानपण जसे त्यांचे. ते बघूनच मला इतकं भन्नाट वाटलं म्हणून सांगते कि ज्याचं नाव ते. असं भासत होत कि ते आम्हाला पण मोटिव्हेट करताहेत न चुकता व्यायाम करण्यासाठी आणि अर्थात आनंदी राहण्यासाठी, संधी चा फायदा करून घेण्यासाठी.

जेथे हा योग वर्ग होतो तो एक छान मोठ्ठा हॉल आहे, अनेक जण अनेक उपक्रम राबवतात तेथे माझ्या मते, त्यामुळे एका बाजूला दोन खुर्चीचे गठ्ठे ठेवले आहेत, खुर्च्या एकावर एक रचून ठेवल्या आहेत. एक मनोरा फारच उंच आहे, पण दुसरा छोटासा. त्या छोटेखानी पण ६-७ प्लास्टिक खुर्च्या एकावर एक म्हणजे सिंहासनावर बसल्या सारखेच. आणि त्यावर ते आबा बसले, त्यांचे पाय पण हवेत हो, जमिनीला पुरत नव्हते, पण त्यांच्या चेहेऱ्यावरचे बाळबोध हावभाव, हसू आणि ..... खूप काही सांगून जात होते. अहाहा च.

असेच जेव्हा मोक्का मिळेल तेव्हा "थोड्यात गोडी" पण राजासारखं फील करा आणि उंच उडा फुलपाखरा सारखे, जसे "दिवस तुझे हे फुलायचे, झोपल्या वाचून झुलायचे" वेगळ्या अर्थानी बरं का मंडळी.

कानाच्या आत

माझ्या लहानपणी पासून अगदी क्वचित कधीतरी कानाच्या आत काहीतरी घातलेलं दिसायचं, एक तर कापूस किंवा ऐकू येण्याचं यंत्र. दोन्ही गोष्टी घालतांना थोडीशी लाज वाटायचीच. त्यात कापूस थोडा तरी बरा, प्रवासात वार लागू नये, बाळंतिणीच्या कानाची काळजी म्ह्णून कापूस, पण जगाला सांगायचं उघड पणे कि मला ऐकू येत नाही आणि त्यामुळे कानात मशीन, छे छे, थोडसं अपमानास्पदच. अजुन एक म्हणजे त्या काळी कानाच्या मशीन ची एक तर एक डब्बी यायची आणि त्यासोबत एक भली मोठी वायर, ते पण बाहेरूंन मिरवायला नको वाटायचं. म्हणजे घालणाऱ्याला आणि बघणाऱ्याला सुद्धा. फक्त काही वर्ष लोटली आणि संपूर्ण ३६० अंशाचे बदल घडले. आता कानात घालून फक्त मिरवत नाहीत तर ऐटीत मिरवतात आणि जगजाहीरपणे कानाच्या समस्यांना मी कसं आमंत्रित करतोय हे दर्शवतात. का हा आमूलाग्र बदल आणि ह्याने काय साध्य होणार आहे? एकाने काहीबाही घातलं कानात कि लगेच दुसरा तय्यार, दिव्याखाली अंधार आणि अंधानुकीकरण नुसतं. हा एखाद दिवशी एखाद वेळा अगदी गरज पडली तर वापरलंय असं नाहीच. सदा न कदा कान बंदच. ज्यांना डॉक्टर व्हायची इच्छा आहे त्यांनी बिनधास्त कानाचे डॉक्टर होण्याची तय्यारी सुरु करावी, हे रुग्ण स्वतः मोठ्या प्रमाणात तय्यारी जय्यत तय्यारी करत आहेत.  

बाटल्यांचा संच

परवा कॉलेज च्या तय्यारीचा भाग म्हणून माझी लेक पाणी पिण्याच्या बाटल्यांचा संच घेऊन आली नवीन विकत दुकानातून. ती तिच्या साठी फक्त एक लागणारी बाटली विकत आणू शकली असती. पण ती ठरली माझीच लेक, आणल्या अनेक, अर्थात चांगलचं आहे म्हणावं, माझ्यासाठी, तिच्या साठी आणि ह्यांच्यासाठी सुद्धा. कारण ? सांगते सांगते थांबा. अहो तिला, मला आणि ह्यांना सुद्धा. रोज नवीन रंगांची बाटली घेऊन ऑफिसला जाणं, कॉलेज ला जाणं किती मोटिव्हेशनल आहे नाही. ड्रेस सोबत सुद्धा रंग जुळवून देखील बाटली घेऊन जाता येईल. दुसऱ्यांसाठी नाही, दाखवण्यासाठी नाहीच, पण स्वतःला भन्नाट वाटावं म्हणून. शेवटी काय पाणी पिणं आणि उत्साही वाटणं जास्त महत्वाचं आहे. आतापर्यंत एकच बाटली घेऊन जायची पाण्याची हे ठरलेलं असायचं, पण नेहेमीच तसंच करायचं हे कोणी सांगितलं आहे. नाही ना?, मग एक आठवडा आणि रोज नवीन रंगाची बाटली, आणि पुढल्या आठवड्यात पुन्हा रंगांची उधळण. भावलं मला फारच, त्यामुळे उत्साहाने उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणं होईल, जे फारच आवश्यक आहे. रोज आता सगळेच कुठल्या रंगाची पाण्याची बाटली भरायची ह्या विचारांनी दिवस सुरु करणार. मस्तच आणि मज्जाच मज्जा. 

माझ्या लेकीला धन्यवाद तिने सहज म्हणून का असा सगळा विचार करून ह्या पाण्याच्या बाटल्या आणल्या मला ठाऊक नाही, पण मी ह्या सगळ्या प्रकाराकडे असं बघते आहे.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...