अगदी लहान होते
तेव्हा माझ्या पहिल्या
वर्गातले शिक्षक ज्यांनी
आम्हाला एक वर्ष शिकवलं त्यांना मी
कधीही सोडून जाऊ
शकेन असं वाटलं
नव्हतं, पण जमलं जेव्हा दुसरीतले
सर फारच मोठे
ऊर्जेचे भंडार असल्याचे
जाणवले आणि त्यांनी
त्यांच्या अनोख्या शैलीने आम्हाला
खिळवून ठेवलं. छोट्या
शाळेतले सवंगडीच मोठ्या
शाळेत होते त्यामुळे
तेव्हा नाही खास
वाटलं पण हो कॉलेज च्या
वाटा धरल्या तेव्हा
अवघड गेलं पण पुन्हा एकदा
इतके भन्नाट नवीन
शिक्षक, मित्र-मैत्रिणी
आल्या आयुष्यात कि
तो टप्पा मग
सुरळीत पार पडला,
तेच झालं पदवी
आणि पदव्यूत्तर शिक्षण
संपलं तेव्हा देखील.
वाईट वाटलं पण
तात्पुरतं. तेव्हा कुठलेही
संपर्काचे साधनं नव्हते
पण प्रत्येकाला ध्येय
गाठायची होती, उच्च
पदावर पोचायचं होतं,
आभाळाएवढं काम करायचं
होतं, टिकवायचं होतं,
ह्या सगळ्यांमुळे असेल
कदाचित पण कुठलीही
खंत नव्हती मनात
जुन्या आठवणी मागे
टाकतांना. पण आता
ह्या नवीन अर्धशतकी
वळणावर वेगळं घडतंय,
जगावेगळं. आता एवढ्यात
काही मैत्रीचे नवीन
धागे विणले गेले
आणि पुन्हा एकदा
काही कारणांमुळे नेहेमीसारखी
ती मैत्री पुढे
नेता येणं अवघड
आहे, शहरं वेगळी
आहेत, भेटी होणं
हाताबाहेरचं पण आता
नकोस वाटतंय, का?
माहित नाही. माझी स्वतःची
लेकरं बाळं असतांना असं
वाटायचं हे "बंडल ऑफ जॉय"
कधीच म्हणजे कधीच
मोठं होऊ नये,
झालं तर ते उडून जातील,
त्यांचे त्यांचे सवंगडी
तय्यार होतील ई.
आता तर ती पिल्लं खरंच
उडून गेलीत, ते
देखील रिचवलं. आई बाबांसारखी देव
माणसं नेहेमीकरता दिसेनाशी
झाली ते
पचवलं,
जरी ठाऊक होतं
कि सासरी जावं
लागणार आहे, पराकोटीचं
अवघड गेलं तेव्हा जरी अगदी लहानपणी पासून घरचे आणि दारचे सतत सांगायचे, चिडवायचे, जाणीव करून द्यायचे सासरी जाण्याबद्दल आणि तरीही.... पण जमवलं. इतक्या
विविध टप्प्यांवर काम
केल्यावर मग हि
छोटीशी मैत्री का
इतकी अवघड जाते
आहे?, का इतकं अस्वस्थ करून टाकलं
आहे?, काय आहे हे नक्की?
आणि असं व्हायला
हवं का नको? हे योग्य
आहे का अयोग्य?
हि ओढ, हे बंध नक्की
कुठे नेणार आहेत
मला? हे फक्त माझ्या पुरतं
मर्यादित आहे का
त्या समोरच्या व्यक्तीला / सर्वांना, स्थळाला
पण तितकीच जाणीव
आहे उणीव भासते
आहे माझी? काय होतं
तेथे?, त्या जागेच
महत्व, पाण्याचं, खाण्याचं
का अजून काही?
चुकलं का माझं काही? खूप
खूप प्रश्न उभे
आहेत, बघू कधी ह्याची उत्तर
मिळतात ते. का, समोर उभा ठाकला आहे तो क्षण भरभरून जगून घ्यायला हवा काहीही न विचार करता? हेच योग्य आहे. मिळेल दिशा लवकरच.
मंगळवार, २६ एप्रिल, २०२२
अनुत्तरीत असे काही
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा