शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२
उभं राहून काम
माझे ह्या आधीचे अधिकारी
अगदी आम्हाला वडिलांसारखे होते. ते अनेकदा खूप भन्नाट गोष्टी सांगून जायचे, न कळत.
त्यातली एक गोष्ट म्हणजे एकदा त्यांनी एक नवीन स्टूल सारखं काहीतरी तय्यार करून घेतलं
आमच्या वर्क शॉप मधून. त्यांच्या लॅपटॉपची उंची वाढवण्याकरता. ते म्हणायचे कधी कधी
अधेमधे उभं राहून पण काम करावं दिवसातून. नेहेमीच बसून राहणं तब्येतीला योग्य नाही.
त्या वरून मग मला भारतात नवीन आलेली मॉल संस्कृती आठवली, ज्यात दिवसभर तेथे काम करणाऱ्या
सर्वांना खूप खूप तास फक्त उभं राहावं लागतं. सगळे गार्डस आठवले हॉटेल च्या बाहेरचे,
ऑफिस च्या गेट समोरचे ई. त्यांचं पण तेच, अनेक तास सलग उभं राहणं. समतोल साधणं अत्यावश्यक
आहे ज्याचं बैठं काम आहे त्यांनी उभं राहणं आवश्यक आणि ज्यांना सततच उभं राहणं असतं
त्यांना बसायची सोय असणं फारच गरजेचं. कुठलाही भेदभाव नाही, पण मुलींना त्यांच्या त्या
दिवसात तरी. प्रकृतीला सांभाळा, तब्येत ठणठणीत असणं फारच आवश्यक आहे, आणि उठत बसत आनंदाने
पुढ्यात मांडलं आहे ते काम करा प्रत्येकाचे काम महत्त्वाचेच. कुठलेही कमी जास्त नाही,
त्या भानगडीत अजिबात पडायचं नाही.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा