मी आणि माझ्या आधीची पिढी इतिहास मराठी माध्यमातून शिकले आहेत त्यामुळे त्यांना हि संज्ञा परिचीत आहे / असणारच. आणि हो, ह्या दोन शब्दांमुळेच इतिहास रचला गेला असं देखील म्हणता येईल. संपूर्ण इतिहास नाही पण थोडासा भाग म्हणा. खूप वर्षांनी मला हे सर्व का आठवलं मला माहित नाही पण आठवलं हे नक्की. ह्या संज्ञेचा एक आधुनिक भाग म्हणा आणि तो देखील ज्या मुळे कोणालाही त्रास होणार नाही असा मला सहज उमगला, माझ्या समोर उभा ठाकला. तर त्याचं असं झालं कि माझ्या कडे एक कॅलेंडर आहे, माझ्या टेबल वर विराजमान झालेलं असं, गेले अनेक वर्षांपासून. ते लाकडी आहे आणि वर्षानुवर्षे चालणारं असं. खास सावंतवाडीच्या कारागीरांच्या कुशाग्र हातून घडलेली अशी वस्तू. कल्पक आणि सुपीक डोक्यातून बाहेर पडलेली अशीच. इतकी वर्ष ती माझ्या टेबलावर आहे आणि आज पर्यंत मी दररोज त्यांना स्पर्श करते, तारीख बदलते, गप्पा मारते पण आज एक खास गोष्ट घडली. गेले २ दिवस आमच्याकडे दिवसभर काही शैक्षणिक कार्यक्रम सुरु होता त्यामुळे मी अगदी काही क्षणापुरती मी माझ्या केबीन मधे आले होते. त्यामुळे आज शांतपणे बघितलं तर कॅलेंडर मध्ये १६ तारीख होती, आणि आज १९ मग नेहेमीच्या सवयीप्रमाणे आजची तारीख बदलायला गेले तर फक्त उलट्याचं पुल्ट करावं लागलं इतकंच, बास, 6 चं 9. अहाहा च. आणि हे कॅलेंडर चे ठोकले ज्याने तय्यार केले, किंवा तय्यार करण्याआधी विचार केला त्याचे पाय धरावेसे वाटले पट्टाकिनी. भावलं मला खूप आणि ध चा मा ची आठवण झाली लगेच. इथे कमी जागेत, अर्थात उपलब्ध असलेल्या ठोकळ्यांच्या भागांमधे मावावे म्हणून लढवलेली शक्कल आहे ती, नवीन नसेल देखील पण मला आज ध्यानात आले त्यामुळे हा पंक्ती प्रपंच. इष्टतम = ऑप्टिमाइजेशन, असलेल्या जागेचे सर्वोत्तम उपयोग ह्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे हे कॅलेंडर. तो ध चा मा असो नाही तर 6 चं 9 कल्पकतेला सलाम. प्रत्येकाने त्याच्या क्षेत्रात नेहेमीच अशी / अश्यापद्धतीची उपकरणे वापरावीत,कोणाचं नुकसान होणार नाही हे बघून पण कलात्मक पद्धतीने.
शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२
ध चा मा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा