मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

मंद दरवळ

कालची सोमवार सकाळ / पहाट वेगळी सुरु झाली. काल समजलं "मंडे ब्लूज" असं का म्हणतात ते. माझ्या पायांनी  मनापासून दुखायचं असं मनात, कृतीत आणलं आणि मग काय नकाच त्यांचं माझ्यावर कित्ती अतूट प्रेम आहे हे दाखवायला सुरवात केली. दिवसभर मी अगदी त्या प्रेमाने पुरेपूर वाहून निघाले. पण कामाचा डोंगर आणि व्याप इतका होता कि जमेल तेव्हाच मी त्या प्रेमळ मित्राला प्रतिसाद देत होते, किंबहुना प्रतिसाद आपोआप दिला जात होता. तशीच कामं उरकून ऑफिसची वेळ संपल्यावर मी घरी आले, गाडीतून उतरल्या उतरल्या एक मंद दरवळ मी अनुभवा. तो इतका अनोखा होता कि शब्दात वर्णन तर होऊच शकत नाही आणि कुठल्याही प्रयोगशाळेत तो तय्यार करता येणार नाहीच. मी सर्वत्र न्याहाळलं पण कुठेही आजूबाजूला साधं रातराणीचं झाडं काय फांदी पण दृष्टीस पडली नाही. रातराणी ह्या करता कारण माझ्या दृष्टीने त्याचाच असा मनमोहक सुगंध अनुभवायला मिळतो, सोनचाफा पण त्याच पठडीतला. खूप वेळ  राहून न्याहाळल्या नंतर मला काही तरी वेगळं भासलं / मनापासून जाणवलं कि ह्या मंद दरवळीशिवाय कोणी तरी उपस्थित आहे. किंबहुना ती उपस्थितीत इतकी जगावेगळी आहे कि तीच असा जगावेगळा सुगंध घेऊन अवतरणार. काही वेळ नेत्रांशुसह त्या अदृश्य व्यक्तींसोबत, त्या सुगंधासोबत घालवले आणि घरी परतले. आजचा दिवस देखील पायांना माझ्या कौतुक करून घ्यायचे होते त्यामुळे हट्ट धरून बसले. मी माझ्या परीने त्यांचा हट्ट पुरवण्याचा पर्यंत केला, आवरलं आणि थोडासा उशीर झाला पण ऑफिसला पोचले. तेथे तर सगळी शोभेची झाडं च आहेत अवतीभोवती. पण पुन्हा एकदा तोच दरवळ माझ्या जसाकी सोबत आला होता, रात्रभर माझी वाट बघत थांबला होता जणू. कालच खात्री झालीच होती माझी पण आज मग मनातल्या मनात संवाद साधला आणि खात्री पटली कि माझं घर आणि ऑफीसा बघण्यासाठी, मला काळजी करू नको असं सांगण्यासाठी आई बाबा दोघे जोडीने आले होते, ह्यात कुठलीच शंका नाहीच. अजूनही त्यांना माझ्यासाठी त्रास घ्यावा लागतो, कित्ती काळजी ती, बघा म्हणजे झालं. न कळवता अगदी मला प्रचंड गरज होती तेव्हाच कसं वाटलं त्यांना यावंसं कोणास ठाऊक? "शब्देविण संवादु..." साधून, पाठिवर थाप देऊन गेले पुढील प्रवासाला. मी ऑफिसामधून संध्याकाळी घरी यायच्या आत येऊन हजर होते जोडीने. म्हणून त्या मंद दरवळिला दुप्पट साज चढला होता. दोन दिवस अशी भेट झाली कि पुरेशी आहे हे त्यांना खात्रीशीर माहिती होतं त्यामुळे आज माझे पाय ताळ्यावर आले आणि मी ह्या अश्या अनुभवातून निर्माण झालेल्या कथा लिहायला मोकळी.

अर्थात हे माझ्या आईनेच मला कधी तरी सांगितलेलं आठवतंय अंधुकसं कि असा जगावेगळा सुगंध किंवा कोणीतरी शेजारी आहे ह्याचा अधूनमधून भास होणं म्हणजे काय असतं ते. मी तर काल प्रकर्षाने अनुभवलं आणि इतर दिवशी सुद्धा अनुभवते थोड्याफार प्रमाणात.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...