"काय वर्णू तव गूण ...." अशी माझी परवा अवस्था झाली. चार डोळ्यांनी बऱ्याच गोष्टी सहज टिपल्या जातात, नकळत, काय करू? कचेरीत येता जाता रस्त्याकडे, रहदारीकडे, निसर्ग सौंदर्याकडे, शाळकरी मुलांकडे, व्यायाम करणाऱ्या उत्साही लोकांकडे, माझं लक्ष वेधलं जातंच. काल पण असचं काहीस झालं. दररोज इतकी वर्ष त्याच रस्त्यावरून जाते-येते पण काल मला अचानक एका ठिकाणी गाडी थांबली म्हणून नजरेस पडलं. नेहेमी प्रमाणे एक दुकान होतं, त्या दुकानदाराने त्याच्या दुकानाच्या नावाचा भलामोठा फलक लावला आहे रस्त्याच्या कडेला. त्या आधुनिक फलकावर फिरती अक्षरे आहेत. माझ्या अल्प ज्ञानानुसार हालती अक्षरे पुढे जायला हवीत म्हणजे ते वाचणाऱ्याला सोप्पं जाईल. पण हा पठ्ठा भलताच कल्पक दिसतोय. त्याने त्याचा फलक हा मागे मागे अक्षरं जाणारा तय्यार केला आहे. अहाहा च. माझी तर बोलती बंद झाली. खात्री करण्यासाठी मी माझ्या चार डोळ्यांनी पुन्हा बघितलं आणि उडालेच. काय हे? नावीन्यपूर्णतेचा कळस होता तो. असो. तो फलक नसता तर माझी हि अनुकथा तय्यार झालीच नसती ना. मनापासून धन्यवाद त्या दुकानाच्या मालकाला, फलक तय्यार करणाऱ्याला, असंख्य वाचणाऱ्यांना. माझा दिवसभराच्या कामाचा थकवा एका क्षणात कुठे उडून गेला ते समजलं देखील नाही. त्यामुळे मंडळी खिडकीबाहेर बघा, जाता-येता, नेहेमीच. माझे बाबा मला लहान असतांना गाडी किंवा आगगाडीतून प्रवास करतांना आवर्जून म्हणायचे, उजेड असे स्तोवर खिकडी बाहेरचं जग बघा, अंधार पडला कि मग पुस्तक चाळा किंवा काही खेळा. अगदी तस्से. करून बघा प्रयोग, मस्त किस्से तय्यार होतील तुमच्याकडे देखील.
बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२
हालता "तो"
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा