मला परवा एक दृश्य दिसलं, एका रहदारीच्या पुलावर. दुचाकी, आई चालवणारी (असावी कदाचित),हेल्मेट नाही, मधे एक छोटं पिल्लू, आणि त्या पिल्लू मागे अजून एक थोडसचं मोठं. त्या थोड्या मोठ्याच्या हातात मोबाईल आणि त्याच्या त्या फोन वर गप्पा सुरु आहेत, वाहत्या रस्त्यावर, एवढं काय महत्वाचं आहे?, ऐकू कसं येतं?, जमतं कसं? आणि गप्पा काय किंवा अभ्यासाच्या बाबतीत केलेली चर्चा काय ती शांततेत केली जायला हवी, एका जागी बसून अशी हालता-चालता रस्त्यावर नाहीच. बरं अगदी एक टक्का मान्य केलं कि कदाचित तो एखादा पत्ता विचारतं असेल तर ते पण अश्यक्य वाटतं कारण बहुतांशी आपण अनोळख्या ठिकाणी जायच्या आधीच पत्ता, जवळपासच्या महत्वाच्या खुणा, रास्ता ई. बघून ठेवतो, मिळवतो नसलेली माहिती. ह्या कृतीतून ती माउली त्या दोन्ही मुलांना काय शिकवते आहे? आजूबाजूला ये-जा करणाऱ्यांना काय दर्शवते आहे? मोबाईल आहे म्हणजे तो असा वापरण्याकरता नाहीच. त्याची एक खास उपयुक्तता आहे. कुठेही, कधीही, केव्हाही, यावेळी, विनाकारण का वापरायचा तो? जीव स्वतःचा आणि आजूबाजूला चालणाऱ्यांचा देखील धोक्यात, कशासाठी? काही मिनिटांनी एकदा तुम्ही त्या ठिकाणी पोचलात की बघा/ बोला/ ऐका, तुम्ही ना हि देशाचे पंतप्रधान नाही राजे, नाही का? जागे व्हा लवकर, तब्बेतीला बरं राहील सर्वांच्याच.
हे सगळं ठीक आहे, माणसांशी किंवा शारीरिक बाबतीशी निगडित आहे. तो जर फोन पडला / निसटला हातातून चुकून, खड्डा आला म्हणून किंवा अजून काही कारणास्तव तर? एक तर तो उचलण्यासाठी धडपड होणार, तुमची आणि इतरांची देखील त्या रस्त्यावरच्या, तो मोबाईल वाचवण्यासाठी कदाचित धडपड होईल आणि त्या नंतर वाचला तर ठीक नाहीतर नवीन घेण्याची घाई आणि वेगळी काळजी. काय हि गोळाबेरीज. त्यापेक्षा शांतपणे भल्यामोठ्या पिशवीत, खिश्यात, किंवा गाडीच्या डिकीत त्याला विराजमान करा, स्वतः "पळती झाडे" बघा, आस्वाद घ्या, घेऊ द्या आणि हव्या त्या ठिकाणी पोचल्यावर मग बघा तो शांतपणे. तो पडला तर आर्थिक, सामाजिक, मानसिक, ई. नुकसान तर होणारच पण त्याला जखमा होणार त्याचं काय? तुमचा अवयव, सखा, सर्वस्व, जीव कि प्राण, खेळणं, त्याला इजा झालेली आवडेल तुम्हाला? विचार स्वतःला आणि सारासार विवेक बुद्धी वापरून कृती करा, म्हणजे मिळवलं.
गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२
बघावं ते नवलंच
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा