माझ्या सोसायटीत आणि कचेरीत शेजारी शेजारी दोन लिफ्ट्स आहेत. हे सर्वश्रुत आहे कि एक बटन दाबले कि लिफ्ट येते. दोन लिफ्ट्स आहेत म्हणजे दोन वेगवेगळी बटणे दाबायची गरज पडत नाही. जी लिफ्ट तुम्ही ज्या मजल्यावर आहेत त्याच्या जवळपास आहे ती येऊन उभी राहते तुमच्या दिमतीला आपसूक. अर्थात तश्या पद्धतीची आदेश / सूचना दिलेली असते लिफ्ट च्या यंत्रणेला. पण तरी देखील आज सहज माझ्या मनाला शिवलेला विचार मांडते आहे इथे कि शेजारी शेजारी दोन वेगळ्या लिफ्ट्स आहेत म्हणजे त्या दोघांमध्ये एक भली मोठी भिंत आहे, विटा सिमेंट ने बांधलेली. शिवाय लिफ्ट चा ढाचा बसवण्याकरता बांधलेल्या विविध थरांच्या भिंती देखील आहेत, स्टील च्या, लाकडी, लोखंडाच्या आणि अजून काही असतील कदाचित. इतक्या भक्कम भिंती मधे असून देखील ह्या दोन शेजारी शेजारी पहुडलेल्या लिफ्ट्स जर संवाद साधू शकतात, संभाषण करू शकतात तर मग माणसं का नाहीत हो? कुठल्याही भिंती भौतिक / फिसिकल बांधलेल्या भिंती आजूबाजूला नसतांना, अगदी शेजारी शेजारी बसलेले असतांना कुठल्याही प्रकारची देवाण घेवाण होत नाहीच. आणि झालीच तर काही अंशी वाद होतो संवाद नाही. आपण बहुतांशी नियमितपणे अश्या शेजारी बांधलेल्या लिफ्ट्स बघतो, वापरतो देखील मग शिकतो काय त्यातनं? माणसानेच, तंत्रज्ञान तज्ञानेच असा प्रोग्रॅम तय्यार केला असेल ह्या लिफ्ट्सनी संवाद साधावा ह्या करता. मग त्याच किंवा त्या सारख्या बाकी माणसांनी का साधू नये साधा आणि सातत्य असणारे संभाषण? कुठल्याही बाबतीत सातत्य अतिशय महत्वाचं, नाही का? त्यामुळे कृपया आत्तापासून तो मोबाईल नामक अवयव जरा बाजूला सरकवा, त्याच तोंड बंद करा आणि भिंती नसलेल्या सजीव प्राणी, पक्षी, झाडं, झुडपं, माणसं ह्यांच्याशी काही क्षण गप्पा मारून तर बघा आणि मला निश्चित कळवा हो मंडळी. आणि हो त्यात सातत्य राखा म्हणजे तीच सगळी सजीव मंडळी तुमची वाट बघतील, तुमच्या सुमधुर आवाज ऐकण्यासाठी उत्सुक राहतील आणि मग "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे". लिफ्ट मध्ये तरी दिलेली कमांड वापरून संवाद साधतात, ती कमांड देखील बुद्धियुक्त माणसालाच द्यावी लागते, पण आपल्याला अशी कमांड द्यावी लागत नाही, आपण कोणावरही अवलंबून नाही, भाषण, संभाषण, संवाद हा नैसर्गिक रित्या यायला हवा आणि येतोच, मग का त्याचा विसर पडला आहे आपल्या सर्वांना? परवाच गंमत म्हणून एका ठिकाणी भोजन करण्यासाठी गेलो आम्ही, बघतो तर काय ती जागा खास तरुणांसाठी होती. त्यामुळे बहुतांशी प्रत्येक टेबलावर जोडी बसली होती आणि दोघे अगदी जेवतांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या मोबाईल मध्ये व्यग्र. काय दृश्य होतं म्हणून सांगते. महद आश्चर्य वाटलं मला. ह्या ठिकाणी तरी नको ना, कारण तुमची अत्यंत लाडकी / प्रिय व्यक्ती समोर बसली आहे, असं असतांना गप्पा मारण्याचं सोडून भलतंच काय? माझ्या आकलना पल्याड आहे हे.
फक्त सजीवांकडून नाही तर ज्यांना आपण कृत्रिम रित्या सजीव केलं आहे, प्रोग्रॅम करून, सूचना देऊन अश्यांकडून देखील शिका,म्हणजे तुमच्या हातून पुढील प्रोग्रॅम अजून प्रगल्भ आणि उत्कृष्ट होईल. माझं हे ठाम मत आहे कि प्रोग्रामर जसा असतो तसे त्याचे प्रोग्रॅम. मग तुम्हीच जर संवाद साधला नाही तर संवाद साधायला लिफ्ट्स ना किंवा इतर मशिन्स ना कसे शिकवणार? साधं आणि सोप्प आहे सगळं.
बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२
संभाषण
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा