कित्ती सांगू आणि काय काय सांगू असं झालयं मला आज, "आनंद गगनात मावेना..." असं काहीसं. मी कचेरीत होते, माझं नुकतंच दुपारचं जेवण आटोपलं होतं आणि माझ्या केबिन मधे अचानक केक अवतरला. अहाहा च. मोठ्ठा केक चा डब्बा घेऊन माझी एक विद्यार्थिनी आली. माझ्या साठी राखून ठेवलेली एक पेस्ट्री दिली आणि मग त्यामागची कहाणी कथन केली. विद्यावाचस्पती होणाऱ्या सगळ्या जणी एकत्र एका खोलीत असतात, मिळून सगळे सण, वाढदिवस आणि बरेच काही साजरे करतात नेहेमीच. आज त्यातल्याच एकिचा वाढदिवस होता म्हणून पेस्ट्रीज आणल्या होत्या. त्यातल्या एकीवर माझं नाव कोरलं गेलं होतं आपसूक. वाढदिवस होता तिच्या घरी केक कापणं चालत नाही, काही कारणास्तव. त्यामुळे ह्या सगळ्या मैत्रिणींनी तिच्या साठी वैविध्य पेस्ट्रीज आणल्या होत्या. कित्ती सुंदर हा सुवर्णमध्य ना? म्हणजे केक खायचा पण ना कापता, शिवाय भरपूर निरनिराळ्या, वेगवेगळ्या चवी चाखायला मिळतात ते वेगळचं. मला फार भावलं. कोणाकडे मेणबत्ती विझवत नाहीत, तर काहींकडे केक पण चालत नसेल, अंड असलेला किंवा कुठलाही ई. तरी पण त्यातून मार्ग काढून आनंद उपभोगणं सर्वांसोबत हे फार महत्वाचं. आणि हे फक्त केक च्या बाबतीत नाही तर प्रत्येक खाण्याच्या आणि इतर सर्व गोष्टींना लागू आहे. त्यामुळे बदल स्विकारा, अडून राहू नका, बोला, मोकळे व्हा, अढी ठेऊ नकाच कोणा आणि कश्याच बाबतीत, म्हणजे मग सर्वत्र स्वर्गाहून सुंदर भासेल.
बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२
सुवर्णमध्य
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा