मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

चेतावणी

तर त्याचं असं झालं कि माझ्या असंख्य मैत्रिणींपैकी एकिने काही तरी खूपदा अनुभवलं. ते जे अनुभवलं ते नंतर अनेकदा / पुन्हा पुन्हा घडतंय हे तिच्या लक्षात आलं आणि त्यात एक खास पॅटर्न आहे हे देखील जाणवलं. तिचं भलं मोठ्ठं कुटुंब, अनेक माणसं, प्रत्येक वयोगटाची, स्वभावाची आणि प्रकृतीची. तिचं, तिच्या लेकराचं सर्वांशी खूप पटायचं, अर्थात आत्ता पण छान पटतंय काहीच शंका नाही. पण फक्त दोन जवळची माणसं अशी होती कि ज्यांचे विचार, आचार आणि कृती हे ह्या जगावेगळी होती, जुनी किंवा भलतीच, ज्याला मराठी भाषेत कुठलाही शब्द नाही अशी. अर्थात काही कारणास्तव किंवा विनाकारण राजकारण म्हणून ते दोघे कधीही न विचारात प्रगट होत असतं माझ्या मैत्रिणीच्या घरी गावाहून. ज्या क्षणी त्यांच्या हातात तिकिटं पडली रे पडली कि त्यांचा फोन यायचा कि आम्ही अमुक अमुक दिवशी येतो आहोत. बास, तो एक काही क्षणाचा फोन आणि भल्या मोठ्या ठिणग्या पडायला सुरवात व्हायच्या. त्या क्षणापर्यंत सुरळीत चालू असलेलं घर आजरी काय व्हायचं, कटकटी काय सुरु व्हायच्या, उगाचच काही तरी व्हायचं, वातावरण गढूळ होऊन जायचं फक्त बातमी आली तरी. माझा प्रत्येकाच्या आजूबाजूला जी वलयं असतात, व्हायब्रेशन्स त्यावर प्रचंड विश्वास, भरवसा आहे, ती आहेत हे निश्चित. हजारो किलोमीटर दूर त्या दोन व्यक्तींमध्ये इतकी शक्ती होती कि इथली  सर्व वलयं तेहेस नेहेस होऊन जायची. जे कधी व्हायचं नाही ते अनुभवाला मिळायचं. आल्यावर मग तर भलते रूप असायचेच. काय करायचं अश्या पाहुण्यांचं खरंच.  

आज अनेक वर्षां नंतर मला हे प्रकर्षाने आठवण्याचे कारण म्हणजे माझा चार दिवसांचा पाहुणा येऊ घातला आहे. आणि तो येणार ह्याची घोषणा दिली गेली आहे, कधी नव्हे ते काय काय विचित्र व्हायला लागले आहे. दरवेळी इतका वेगळा प्रकार कसा काय जमतो ह्याला हेच महद आश्चर्य वाटतं. कित्ती म्हणजे कित्ती शिकण्यासारखं आहे नाही, यायच्या आधीच ह्याच्या इतक्या तऱ्हा आल्यावर तर मग.... काय करायचं अश्या पाहुण्यांचं.

पण हे दोन्ही पाहुणे हक्काचे, महत्वाचे, आपलेच आणि न टाळता येणारे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...