रविवार, २७ नोव्हेंबर, २०२२

 बाष्प

संशोधन कित्ती महत्वाची भूमिका साकारते बघा, मग ते संशोधन औषधे, प्रॉडक्ट, पदार्थ ई. संबंधित असो किंवा जाहिरातींशी.  माझी मुलं बाळं होती तेव्हा व्हिक्स बाळाच्या नाजूक कातड्यावर लावता यायचं नाही. आता शक्य आहे, अगदी सहज शक्य आहे. कदाचित व्हिक्स च्या घटकांमधे बदल घडवून आणला असेल किंवा फक्त जाहिराती मधे. काहीका असेना आईची सोय झाली आहे, सोप्प झालं आहे बरंच. माझ्या कडे दोघे एकाच वयाचे असल्यामुळे आणि खूप लहान असल्यामुळे एकाला सर्दी पडसं झालं कि दुसऱ्यालाही निश्चित होत असे. कितीही त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी, वस्तू वेगवेगळ्या वापरल्या तरी देखील. आणि मग कसरत सुरु, कपड्याला नाहीतर चादरीला / उशीला इकडे तिकडे व्हिक्स लाव आणि अप्रत्यक्ष परीणाम साधा. पण माझी, माझ्या पिलांची डॉक्टर देखील संशोधन करणारी असावी. तिने मला एक सुंदर उपाय सुचवला. अर्थात तो काही नवा नाही पण माझ्या साठी कोरा करकरीत असा. आता माझी तीच मुलं जवळपास २० ची होत आली आणि काल-परवा मला नव्याने त्या उपायाचा साक्षात्कार झाला. तो सोप्पा उपाय असा होता कि घरातल्या सर्वात छोट्या न्हाणी घरात जायचं. तिथे जितके म्हणून पाणी भरण्याचे भांडे असतील त्यात कडत पाणी घालून त्यात व्हिक्स घालायचं. अश्या कडत पाण्यामुळे एक वातावरण निर्मिती होते आणि मग त्या न्हाणी घरात बाळाला घेऊन उभं राहायचं फक्त. व्हिक्स आंगावर लावण्यापेक्षा जास्त फायदा ह्यामुळे होतो. बाळाला श्वास नीट घेता येतो आणि ........ ह्या पुढे मला एवढ्यात समजलं. त्या वेळी मला आजारी पडणं परवडण्यासारखं नव्हतंच, त्यामुळे ह्या अश्या व्हिक्स ऊर्जित बाष्पाचा मला देखील खूप फायदा झाला, एकाच उपाय आणि मला तरणोपाय, अर्थात एकाला बरं होण्यासाठी आणि माझी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी. अहाहा च. एका दगडात दोन... क्या बात है, सहीच. असे मी आळीपाळीने दोघांना घेऊन उभे असायचे, त्यामुळे दुप्पट फायदा. दोघांसोबत बाथरूम मधे उभे असतांना मग आधीच खेळणी घेऊन ठेवायची, आरशावर काही चित्र काढून दाखवायची, बडबड गीते म्हणायची, काय विचारू नकाच. इतका वेळ घालवायला मिळायचा पिल्लांसोबत म्हणून सांगते, क्वालिटि टाइम हो. कालांतराने हे माझ्या विस्मृतीच्या कप्प्यात कुठे तरी जाऊन बसली होती परवा कडत पाण्याने शॉवर घेतला सर्वात छोट्या बाथरूम मधे मी तेव्हा थोड्याफार फरकाने तशीच वातावरण निर्मिती अचानक घडली / झाली, त्यावेळी करावी लागायची. आणि संपूर्ण जुन्या आठवणींचा चित्रपट डोळ्यासमोर उभा ठाकला. आंघोळ झाल्यावर देखील तो कडत पाण्यामुळे तय्यार झालेला इफेक्ट बराच वेळ टिकला आणि तो मी इतका एन्जॉय केला. छोट्या बाथरूम चे मोठे फायदे बघा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...