शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

ताल सुरांची मैफिल

 कंपने, स्पंदने, ताल, लय, मात्रा ई. चा प्रत्येक मनुष्य प्राण्यांवर, सर्वच सजीवांवर निश्चित आणि सुंदर असा परिणाम होतोच. मी जेव्हा जेव्हा झांज, तबला, पेटी आणि इतर वाद्य ऐकते, त्या सोबत भजनांचा अभ्यास किंवा सराव करते तेव्हा तेव्हा मला एक वेगळी ऊर्जा मिळते, अर्थात सर्वांनाच मिळत असावी. मला फक्त ती प्रकर्षाने जाणवते. काहीतरी वेगळं होतं हे निश्चितच मात्र. सगळीच वाद्य कंपने निर्माण करतात आणि ती सुक्ष्म / अतिसुक्ष्म पेशींपर्यंत पोचतात, त्यांना देखील एक वेगळी ऊर्जा मिळते आणि प्रसन्नता निर्माण होते. आज पुन्हा एकदा झांज घेऊन माझ्या मैत्रिणीला साथ देतांना मला हे जाणवलं. प्रत्येक सेंसरी ऑर्गन / ज्ञानेंद्रिय उल्हसीत होतात, आणि सगळ्या वाद्यांची मिळून, त्या ताल सुरांची एक सुंदर मैफिल सुखावून जाते. त्यामुळेच असेल कदाचित मागच्या पिढीत काकड आरती, माध्यन आरती, संध्याकाळी / पूजे दरम्यान केलेली आरती, भजनं, किर्तनं ई. आवर्जून करत असतं, भाग घेत असतं आणि त्यामुळेच सर्वत्र भक्तिमय आणि समाधानी वातावरण तर होतंच, तब्यती उत्तम राखल्या जायच्या आणि प्रत्येक क्षणी कुठलाही ताण-तणाव अजिबात नसायचा. ताण नसायचा त्यामुळे तणावाचे व्यवस्थापन कसे करायचे हे शिकण्याची आणि अनुभवायची सातत्याने गरज पडत नसे. पुजा-पाठ, सण-वार वर्षभर सुरूच असायचे, त्यामुळे त्याचा सराव आलाच, त्यामुळे अजून काही दिवस सुमधुर स्वर, बोल कानावर पडायचे आपोआप. अर्थात त्यावेळी गुगल-बाबा नव्हता हे उत्तम होतं. आणि हो तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सध्या तबल्याचे बोल जैसे थे अँप वर उपलब्ध आहेत, पण त्यामुळे कुठलेही कंपन निर्माण होत नाहीत. तबला किंवा इतर कुठल्याही वाद्यांची जागा इतर कोणीही घेऊच शकत नाही. अँप मुळे थोडीशी सोय नक्कीच होते, पण तबला तो तबलाच सरते शेवटी. त्यामुळे मंडळी जमेल तेव्हा स्वतः वाद्य वाजवा, किंवा काही कार्यक्रमाला हजेरी लावा आणि फरक अनुभवा. असं म्हणतात ना कि ज्या ठिकाणी स्वतः देवांचे वास्तव्य होते त्या स्थळाला जाऊन या, किंवा गायनाच्या / वादनाच्या / भजनांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा म्हणजे त्या दिग्गज कंपनांच्या सानिध्यात तुम्ही येता, त्यामुळे तुमची कंपने आपोआप रंग-रूप बदलतात, सत्संग लाभतो, शारीरिक / मानसिक / वैचारिक / धार्मिक आणि इतर पातळीवर उत्कृष्टच बदल घडतो जो टिकतो आणि त्याचे दुर्श्य परिणाम नक्कीच होतात. आणि हे विज्ञानाने सिद्ध केले आहे अनेक वेळा, खालील वेबसाइट वर ह्या बद्दल जास्त माहिती दिली आहे ती वाचा. 

https://www.healthline.com/health/vibrational-energy#thoughts-behaviors-and-vibrations

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...