मी गेले दोन-तीन दिवस माझ्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेते आहे, ऑनलाईन पद्धतीने. सगळ्या विद्यार्थ्यांना विषय कितपत समजला ते बघण्याचा प्रयन्त आहे आमचा. असो.
बहुतेक सगळेच जण त्याच्या घरून जॉईन करत होते परीक्षेला आणि त्यांचा संगणक वापरून. अगदी बोटावर मोजण्या इतके मोबाईल वापरून परीक्षा देत होते. जे संगणक वर परीक्षा देत होते त्यांच्या पण पुढ्यात त्यांचा जीवनसाथी मोबाईल होताच. अर्थात मला तो दिसत नव्हता पण ऐकू येत होता, कसा म्हणताय? सांगते.
एखादाच, बहुतेक नाहीच. सगळेच जेव्हा जेव्हा तोंडी-परीक्षा द्यायला आले जी अगदी १२-१५ मिनिटांची असते त्या त्या वेळी त्यांचा मोबाईल वाजलाच, गुरगुरला, त्यांना कोणाचा तरी निरोप आला, असे अनेक प्रकार झाले. आता मला हा साधा प्रश्न पडलाय कि शेवटची महत्वाची परीक्षा सुरु असतांना मोबाईल ऑन कसा, त्याचा आवाज बंद करून ठेवावा हे अतीव महत्वाचे आहेच, झालंच पाहिजे, हाताला तशी शिस्त पाहिजेच. माझे विद्यार्थी सगळ्या भारतभर पसरले आहेत बरं का, भारताबाहेर देखील आहेत. सगळ्यांचं एक सारखं वागणं कसं काय? उडालेच मी. आश्चर्य वाटलं मला. का सांगायचं मी, कि आता आपली परीक्षा आहे, मोबाईल थोडासा बंद किंवा सायलेंट वर ठेवा. एवढ्या मोठ्या मुलांना हे का सांगावं लागत? अर्थात मला नाही फरक पडला, पण हा सर्वांगीण शिक्षणाचा एक भाग आहे, महत्वाचा. माझ्या परीक्षे मधे हवा तेवढा गुरगुरू दे मोबाईल, इंटरव्हिऊ मधे, ऑफिसच्या महत्वाच्या मीटिंग मधे, कोणी तुच्याशी बोलत असतांना हा वाजायला नको म्हणजे मिळवलं.
#mobile #notifications #viva #final-exam #same #spread-across-country #students
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा