सोमवार, २८ जून, २०२१

निसर्गाचं वरदान

हि साधारणतः २००६-०७ ची गोष्ट आहे. माझ्या मुलांची छोटी शाळा तेव्हा सुरु झाली होती आणि त्यांच्या बरोबर आम्ही, म्हणजे मी आणि माझी आई दररोज शाळेत जात असू, जवळपास एक महिना हा उपक्रम सुरु होता. सगळेच पालक येत होते त्यामुळे दररोज एकमेकांसोबत ३ तास अख्खे घालवायला मिळत होते. खूप छान आणि घट्ट मैत्री झाली त्यामुळे, सगळ्यांशीच, माझी आणि माझ्या तरुण आईची देखील. मग काय उधाण आलं अगदी, सगळे जस जमेल तस एकमेकांकडे येऊ-जाऊ लागलो, आणि अजूनदेखील इतक्या वर्षांनी सगळ्यांशी मैत्री टिकून आहे. एक ह्यांची वर्गमैत्रिण होती आणि ती एका भाड्याच्या घरात राहत होती. तिच्याशी सख्य जास्त जुळलं होत त्यामुळे तिच्या कडे अनेकदा जाण येणं होत असे, अर्थात ती शाळेच्या फारच जवळ राहत होती, उत्कृष्ट कूक होती आणि स्वभावाने तर विचारायलाच नको. मस्त.

अनेकदा तिच्याकडे जात होतो, खाली बगिच्यात मुलांना खेळायला घेऊन जात होतो, तेव्हा तिच्या फ्लॅट च्या शेजारी भला मोठा बंगला होता. तेथे पण आजूबाजूला जाण होत असे आमचं. तो बंगला आणि फ्लॅट हा संपूर्ण एक मोठा प्लॉट होता, अर्धा मालकांनी विकला होता आणि अर्ध्यावर ते त्यांच्या बंगल्यात राहत होते. फक्त नाव घ्या ते झाड त्या बंगल्याच्या परसात होतेच. प्रत्येक फळाचे झाड, फुलाचे झाड, अगदी तोंडात बोट घालावं इतका सांभाळलेला भला मोठा बगीचा. अप्रतिमच. म्हणजे मला शब्द नाहीतच त्याच वर्णन करायला. मग काही वर्ष मधे गेले, मुलं मोठी झाली, वेगवेगळ्या शाळेत गेली, त्यांनी ते भाड्याचं घर सोडून स्वतःच घर घेतलं, आणि मग माझं त्या बाजूला जाण थांबलच. एक दोन वर्षांपूर्वी किंवा कधीतरी मी त्या बाजूने जेव्हा गेले तर मी चाट पडले. आता तेथे ते घर नाही, एक छोटं पान पण नाही, झाड तर सोडाच, प्रचंड मोठी फ्लॅट सिस्टिम उभी आहे. माझ्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहील नाहीच. अर्थाअर्थी ते माझे कोणीही नव्हते, पण ती झाड समूळ उपटून फेकली ह्या कल्पनेनेच मला गलबललं. असतील तशी कारणं पण.... असो.

निसर्गाने भरभरून दिल होत त्या मालकांना, त्या मालकांनी पण ते जिवापाड जपलं होत, आणि अचानक त्यावर सिमेंटच जंगल बघून नको वाटल. पैसा हा फारच महत्वाचा आणि झाड सांभाळणं तर अती अवघड पण ते लाभलेलं वरदान सांभाळायला हवं होत असं प्रकर्षाने जाणवलं खरं. 

#greenery #trees #fruit-trees #flower-trees #nature's-blessings #care #building #horrified

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...