सोमवार, २८ जून, २०२१

हातरुमाल

परवा मी आणि माझी लेक मिळून काही खरेदी करत होतो ऑनलाईन. त्यावेळी काही तरी शोधत असतांना आम्हा दोघींची दाही बोट एकदम तोंडात गेली, आम्ही उडालोच. काय झालं म्हणताय? सांगते. अहो आम्ही हातरुमाल बघितले स्क्रीनवर एका भल्यामोठ्या कंपनीचे होते ते, आंतर्देशीय, ४ आणि ६ रुमालाची पाकीट होती. अबब काय किंमत, गगनाला भिडणारी. अशक्य आहे इतक्या महागड्या किमतीचे हातरुमाल सामान्य माणूस घेणं. मग ते का होते तेथे, त्या वेबसाइट वर? कोणास ठाऊक. असो. तो विषय नाही आहे येथे.

सहज माझ्या ध्यानात आलं कि हातरुमाल हा सगळेच वापरतात बहुतेक, प्रत्येक वयोगटात, मुलं / स्त्री /पुरुष, सगळ्या स्तरातले,  येथे भारतात तरी, आणि अजूनही ह्या पेपर टॉवेल च्या जमान्यात देखील. हातरुमालाची जीवनरेखा तशी फारच छोटी असते, एक म्हणजे ते फार पातळ असतात आणि सतत / रोज वापरले जातात, त्यामुळे पण.

अनघा, माझी शाळेपासूनची वर्ग मैत्रीण फारच सुरेख आणि समाजोपयोगी काम करते आहे गेली कित्येक वर्ष. अगदी समाजाच्या रसातळाला जाऊन, शेतकऱ्याशी, विणकरांशी बोलून, स्वतःची वेबसाइट तय्यार करून, सोशल मीडिया वर टाकून, त्यांचे प्रॉडक्ट्स विकून त्यांना मदत करते आहे, आणि डायरेक्टली पर्यावरणाचे संरक्षण पण करते आहेच.

तिचे अनेक प्रसिद्ध प्रॉडक्ट्स आहेत, साड्या आहेत, आणि बरेच काही. तिने छोट्या प्रमाणात रुमाल जर सुरु केले तर? विचार करायला हरकत नाही. एकदा मार्केट सर्वे करून बघायला हवा. कापून उरलेल्या कपड्यातून, "बेस्ट आऊट ऑफ वेस्ट" असं काही तरी, किंवा "क्लासेस vs मासेस" म्हणजे थोड्या लोकांपर्यंत पोचणाऱ्या साड्या तर करायच्याच पण सगळ्या जनते पर्यंत उपयुक्त ठरणारे विविध रुमाल देखील, व्हॉट से फ्रेंड्स?

विचार मांडून बघते तिच्या पुढे, मग बघू. 

For more information about Dear Anagha and her venture, kindly visit www.ecotattva.com

#eco-tattva #handkerchief #cotton #cotton-industry #ecology #environment  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...