अमेरिकेत "थँक्स गिविंग" नावाचा एक उत्सव असतो. त्यावेळी सगळं कुटुंब एकत्र येत, छान मजेत वेळ घालवत, अनेकविध स्पेशल पदार्थ केले जातात, आणि भरपूर पोटभर शॉपिंग देखील. फारच खास डील्स असतात त्या दिवशी / वीकेंड ला. अहाहा. "पेहेला पेहेला प्यार है पहेली पहेली बार है..." असं काहीस झालं होत मला जेव्हा मी "थँक्स गिविंग" नावाच्या उत्सवात सहभागी झाले तेव्हा, वीस वर्षांपूर्वी. एक तर वय तरुण, नवीन उत्सव, आणि भुरळ पडणाऱ्या डील्स, काय घेऊ आणि काय नाही असं झालं होत मला. बरं सगळंच मिळेल ह्याची पण खात्री नसतेच, पण मी / माझ्या मैत्रिणी मिळून भरपूर पर्यंत केला आणि अप्रतिम लॅपटॉप पदरात पाडून घेतला, बाकी छोट्या मोठ्या गोष्टींसोबत. तर तेथून माझ्या पहिल्यावहिल्या लॅपटॉप ची मी मालकीण झाले. तो अनेक वर्ष वापरला आणि मग भारतात परत आल्यावर माझ्या पहिल्या ऑफिसने मला एक बहुगुणी ताजातवाना, सशक्त लॅपटॉप दिला, कारण त्यावेळी माझी पिल्लं लहान असल्यामुळे मी अर्धवेळ काम करण निवडलं होत. घरी येऊन लागल्यास काम करण्यासाठी तो लॅपटॉप होता रिलायन्स डोंगल सोबत. त्यानंतर माझे दिर डेल मधे होते त्यामुळे मला पुन्हा एकदा माझा अजून एक लॅपटॉप मिळाला, कारण तोवर मी ऑफिस चा राजीनामा दिला होता, पूर्णवेळ PhD सुरु केली होती आणि अमेरिकेचा लॅपटॉप तो वर म्हातारा झाला होता. डेल चा लॅपटॉप मी पूर्णवेळ २०१९ डिसेंबर पर्यंत वापरला, अजूनही तो व्यवस्थित चालूच आहे, आणि आता हा नवीन ढंगाचा योग करण्यासारखा लवचिक सोबती घेऊन बसेल आहे गेले दीड वर्ष, सगळं सुरळीत सुरु ठेवलंयं पठ्याने माझे काम. तर असे हे माझे अनेक सवंगडी, विविध टप्प्यावर मला लाभलेले, प्रचंड कमी आलेले, जेव्हा जेव्हा मला ते देऊन टाकावे लागले तेव्हा तेव्हा निर्जीव असून देखील अनेक दिवस मला चटका देऊन गेलेले असे. सुप्रभात ते शुभरात्री म्हणे पर्यंत मांडीवर बसून राहिल्यानंतर सवय होणारच ना, मला त्याची तितकीच त्याला माझी सुद्धा. उगाचच म्हणतात निर्जीव त्याला.
परवा माझा लेक म्हणतो "मम्मा, आत्ता पर्यंत तू किती लॅपटॉप वापरलेस ग?" त्याला सगळं सांगतांना म्हटलं चला सगळ्या सवंगड्यांची आठवण काढून थोडक्यात लिहू या. "थँक्स गिविंग" च्या थंडी च्या दिवसात / रात्री त्या रांगेत उभं राहिलेलं पासून ते सध्याच्या योग लॅपटॉपशी जुळवून घेईस्तोवर अनुभवलेले सगळे प्रसंग, दिवस आणि आठवणी जाग्या झाल्या, हसू आलं आणि एकंदरीत मज्जा आली.
"असे सवंगडी येति आणि स्मृती ठेवुनी जाती".
#laptop #friends #best-friends #non-living-things #yoga-laptop #lenovo
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा