आज अनुभवला मी हा प्रसंग आणि ताबडतोब ऑनलाईन लेखणी उचललीच, आणि सुचले ते हे शब्द आहेत. शब्द सुचवणारा पण "तोच" आणि लिहिणारा पण "तोच", मी फक्त निमित्तमात्र.
तर त्याच असं झालं, कि मी जे परवा बाथरूम मधे धडपडले त्यानंतर दोन दिवस घरात होते, घरून उठत-बसत काम चालूच होत. आज मनाचा ठिय्या करून गेले ऑफिस ला, लंगडत, दिवसभर छान काम झाले, थोडं दुखण्याकडे दुर्लक्ष झालं, लोकांना, मैत्रिणींना बघून हुरूप आला. परत येताना मग बस ने येण्याचा निर्धार केला आणि सुरु झाली माझी गाडी, दे धक्का. देवाचं नाव घेत घेत चालत होते. नेहेमी माझी गाडी / बस अगदी टोकाला उभी असते रोज, फारच दूर. मी म्हटलं देवा पोचले मी कशी तरी बस थांब्यापर्यंत पण आता ह्याच्या पुढे पाऊल टाकणं अशक्य आहे. आणि "टू माय सुरप्राईस" माझी बस कधी नव्हे ते अगदी बसथांब्याच्या पुढ्यात, अगदी पहिली अशी उभी ठाकलेली माझ्या दृष्टीपथात पडली. माझा माझ्या चार डोळ्यांवर अजिबात विश्वास बसला नाही पण हे सत्य होत. माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले, मनापासून धन्यवाद दिले गेले आणि मी जशी बस मधे बसले तशी ड्रायव्हरने गाडी नेवून नेहेमीच्या जागी उभी केली. आता सांगा मंडळी ह्याला काय म्हणणार तुम्ही, कृपाच, दुसरं काही नाहीच. अशीच नेहेमी कृपा ठेवा माझ्यावर आणि सर्वांवर, हि प्रार्थना.
#prayers #HIShelp #God #blessings
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा