मंगळवार, २९ जून, २०२१

"त्याची" कृपा

मी माझ्या तोकड्या मराठी शब्दकोशाचा वापर करून कधीही "त्याच्या" कृपे बद्दल लिहूच शकत नाही, पण आज अंगावर काटा आणणारा छोटेखानी प्रसंग मला लिहावासा वाटला म्हणून हा पंक्ती प्रपंच. अर्थात हा प्रसंग नाही हा अनुभव आहे, हि माझी श्रद्धा आहे.

तर त्याच असं झालं कि कालच्या माझ्या धड-पडीमुळे मला असं वाटत होत कि एखाद चपराक औषध मिळावं मला जे ह्या क्षणी माझ्या साठी बहुउपयोगी असेल, ठरेल. ३-४ दिवसांपूर्वी मी माझ्या पायांच्या सततच्या दुखण्याकरता डॉ. वाकनीस काकांकडून काही औषध विचारली होती फोन करून आणि ती औषध वाल्याकडे ऑर्डर पण केली होती. पठ्याने इतके दिवस लावले एक तर आणून द्यायला आणि नेमका माझं काही तरी महत्वाचं काम सुरु असतांना आला डिलिव्हरी करायला. त्यामुळे मी फक्त हे बघितलं कि त्याने मी मागितलेले दोन औषधे दिली आहेत, बास. मी काकांनी सांगितल्याप्रमाणे औषध मागितलं होत आणि आज बघते तर काय एक औषध भलतंच देऊन गेलेलं आढळलं. इतका राग आला ना त्या दुकानदाराचा मला, पण काय करू, म्हटलं जाऊ दे. पण माझ्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे मी गुगल-बाबा ला विचारलं कि हे अनोखं औषध जे मला डिलिव्हर झालंय ते कशासाठी वापरतात आणि त्याने लगेच मला सांगितलं कि पडलं-झडलं / मार लागला / स्नायू दुखावले गेले ई. तर हे औषध घेतात. मग मात्र माझ्या डोळ्यात टचकिनी पाणी आल्याशिवाय राहील नाहीच. बघा म्हणून मी म्हणते "त्याची" कृपा सतत आहे सगळ्यांवर ह्यात शंकाच नाही. ह्याशिवाय अद्भुत अनुभव काय येणार सांगा. धन्य झाले मी हे सगळं अनुभवून, अर्थात हा फक्त माझ्या श्रद्धेचा भाग आहे. आणि ती आता अजूनच दृढ झाली आहे. निश्चितच. "ती" एक सुप्रीम पॉवर आहेच आपल्यासोबत, नेहेमीच. थँक यु.

Ruta-30 was the medicine delivered to me. Read more about this medicine on: https://www.1mg.com/otc/sbl-ruta-graveolens-dilution-30-ch-otc338301

#homeopathy #ruta-30 #pain #recovery-from-injury #blessings #supreme-power

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...