तर त्याच असं झालं थोडक्यात कि काल माझ्यामुळे बाथरूम च्या फरशीला थोडासा मार लागलाच हो, असो. मग मी ऑफिसचं काम आटोपल्यावर फिसिओथेरपी डॉक्टर कडे गेले, डॉ. लिना औटी कडे आणि त्यांनी मला बाकी सगळ्या गोष्टी / टिप्स बरोबर हे देखील सांगितलं कि हवं तेवढं चाला आणि बसल्याबसल्या दुखरा पाय वर खाली करत राहा, व्यायाम / हालचाल होणं गरजेचं आहे. पण तो दुखरा पाय काही माझं ऐकेना, अनेक आमिष दाखवली त्याला पण पठ्ठा ढिम्म हालेचना. मग म्हटलं देवा आता काय करू. आला कि सहज उपलब्ध असलेला सवंगडी कामास, हो, अगदी बरोबर ओळखलंत मंडळी. माझा दुखरा पाय मी चांगल्या पायावर आरूढ केला, उजवा पाय मस्त असल्यामुळे त्याला वर-खाली करायला अजिबातच अडचण नव्हती, मग काय बास माझं इकडे काम सुरु आणि त्यांच दोघांचं समांतर पणे. अहाहा, मस्त मज्जा आली. छान वाटलं. अर्थात अजून दुखणं हवं तेवढं कमी नाही झालं पण हे अनुभव लै भारी.
अनोखा प्रकार नाही, एकमेकांना मदत करण्याचा. टू गुड.
#help #knee-injury #exercise #leg-raise #leg-movement #physiotherapy #friend
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा